Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

जे लोक बहाणा करतात
जे लोक बहाणा करतात
जे लोक बहाणा करतात
Ebook214 pages1 hour

जे लोक बहाणा करतात

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

मंडळयां अगदी थेट बहाणा करणाऱ्या लोकांनी भरलेल्या आहेत जे अप्रामाणिक बनतात. सैतानाची एकमेव गुरुकिल्ली म्हणजे फसवणूक आणि बहाणा. जो पुढारी एका बाहा करणाऱ्या व्यक्तीच्या मुखवट्यातून पाहू शकत नाही त्याला त्याच्या आंधळेपणासाठी त्रास सहन करावा लागेल. भीती, प्रसिद्धी आणि गोंधळ हे सेवकांशी लढाई करणारे दुष्ट आत्मे आहेत. बरेचदा, ल्कांना त्यांच्या विरुद्ध काय संघर्ष करत आहे हे ठाऊक देखील नसते. हे पुस्तक तुम्हाला अंतर्यामी शत्रूशी लढण्यास सहाय्य करेल.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354479
जे लोक बहाणा करतात
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to जे लोक बहाणा करतात

Related ebooks

Reviews for जे लोक बहाणा करतात

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    जे लोक बहाणा करतात - Dag Heward-Mills

    अनुक्रमणिका

    बहाणा देणाऱ्या व्यक्तीचा आत्मा

    अप्रामाणिक बहाणा देणाऱ्या व्यक्तींमधून कसे पाहावे

    धमकावणे आणि अप्रामाणिकपणा

    उपदेश देण्यापासून तुम्हाला भयग्रस्त होणे कसे थांबवते

    तुम्ही भयग्रस्त का होऊ नये

    गोंधळाबद्दल तुम्हाला माहित असाव्यात अशा सात गोष्टी

    परिचित असणे म्हणजे काय?

    चार गट जे परिचित होण्याची अधिक शक्यता असते

    परिचित होण्याची बारा चिन्हे

    परिचितपणाला हाताळण्याचे सात मार्ग

    प्रस्त्वाना

    अनेक गोष्टी अप्रामाणिक नसताना दिसतात पण त्या प्रत्यक्षात तशा असतात. ते म्हणजे प्रवृत्ती आणि वागणुकीच्या [अद्ध्ती ज्यामुळे विश्वासघात आणि अप्रामाणीकपणा जन्मास येतो. ह्या गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे कारण गंभीर नेतृत्वाच्या संकटात बरेचदा त्या कारण ठरतात.

    प्रभूच्या मंदिरात सैतान गोंधळ निर्माण करतो आणि मंडळीतील अप्रामाणिक घटकांना धाल्व्ळून टाकण्यासाठी त्याचा उपयोग करतो. अनेक लोक बहाणा करणे, परिचित बनणे आणि भयभीत करण्याच्या सामर्थ्याला अप्रामाणिक बनण्यासाठी उपयोग करतात.

    अध्याय १

    बहाणा देणाऱ्या व्यक्तीचा आत्मा

    १. एका बहाणा देणाऱ्या व्यक्तीत नटाचा आत्मा असतो.

    २. एका बहाणा देणाऱ्या व्यक्तीचे खोटे आणि फसवणारे व्यक्तिमत्व असते.

    ३. एका बहाणा देणाऱ्या व्यक्तीत ढोंगीपणा आणि अप्रामानिक्तेचा आत्मा असतो.

    ४. एका बहाणा देणाऱ्या व्यक्तीत हेरगिरी आणि आधुनिक काळातील गुप्त सेवा करण्याचा आत्मा असतो.

    ५. एका बहाणा देणाऱ्या व्यक्तीत लबाडी आणि फसवणुकीचा आत्मा असतो.

    ६. एका बहाणा देणाऱ्या व्यक्तीत येणाऱ्या नाशाचा आत्मा असतो. तुमच्याजवळ जर अशी बहाणा देणारी व्यक्ती असेल तर, तुम्ही खूप धोक्यात राहता.

    ७. एका बहाणा देणाऱ्या व्यक्तीत खून करण्याचा आत्मा असतो कारण सर्व बहाणा देणारे लोक खुनी आणि नाश करणारे असतात.

    पवित्र शास्त्रातील सर्वोच्च बहाणा देणारे लोक

    १. दलीला एक बहाणा देणारी व्यक्ती होती. तिने शमशोनावर प्रेम करण्याचे नाटक केले. तिने त्याचे सांत्वन केले, त्याला विसावा घेऊ दिला आणि आपल्या मांडीवर झोपवले. शेवटी ती एका लबाड, फसवणारी आणि खुनी असल्याचे प्रगट झाले.

    नंतर सोरेक खोर्‍यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले. तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार त्या स्त्रीकडे जाऊन तिला म्हणाले, त्याच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि आम्हांला त्याच्यावर वर्चस्व कसे मिळवता येईल, हे तू त्याच्याकडून लाडीगोडीने काढून घे. म्हणजे आम्हांला त्याच्या मुसक्या बांधून त्याला जेरीस आणता येईल. आम्ही प्रत्येक जण तुला चांदीची अकराशे नाणी देऊ.

    दलीला शमशोनाला म्हणाली, तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि कशाने तुम्हांला बांधले असता तुम्ही जेर व्हाल हे कृपया मला सांगा. त्याने आपले सारे मनोगत सांगितल्याचे पाहून दलीलाने पलिष्ट्यांच्या सरदारांना बोलावणे पाठवले व सांगितले की, आणखी एकदाच या. कारण त्याने आपले सारे मनोगत मला सांगितले आहे. तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार पैसे घेऊन तिच्याकडे आले. तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपवले; आणि एक मनुष्य बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटांचे मुंडण करवले. मग ती त्याला सतावू लागली आणि तो निर्बल झाला. ती त्याला म्हणाली, शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे, ह्याची त्याला कल्पना नव्हती. (शास्ते १६:४-६, १८-२०)

    २. यहूदा एक बहाणा देणारा व्यक्ती होता. येशू ख्रिस्ताचा विश्वासू शिष्य असल्याचे त्याने भासवले. शेवटी तो एक विश्वासघातकी, फसवणारा आणि खुनी असल्याचे प्रगट झाले.

    तेव्हा बारा प्रेषितांपैकी एक जो यहूदा, ज्याला इस्कर्योत म्हणत, त्याच्यात सैतान शिरला;

    तो मुख्य याजक व सरदार ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती त्याला कसे धरून द्यावे ह्याविषयी त्याने त्यांच्याशी बोलणे केले. तेव्हा त्यांना आनंद झाला व त्यांनी त्याला पैसा देण्याचा करार केला.

    त्याला तो मान्य झाला आणि गर्दी नसेल तेव्हा त्यांच्या हाती त्याला धरून देण्याची तो संधी शोधू लागला.

    प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला तेव्हा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्याला आढळले. तो त्यांना म्हणाला, झोप का घेता? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा. तो बोलत आहे इतक्यात पाहा, लोकसमुदाय आला, त्यात यहूदा नावाचा बारा जणांतला एक जण त्यांच्यापुढे चालत होता; तो येशूचे चुंबन घेण्यास त्याच्याजवळ आला. येशू त्याला म्हणाला, यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय? (लूक २२:३-६, ४५-४८)

    ३. अबशालोम एक बहाणा देणारा व्यक्ती होता. अबशालोम ह्याने त्याच्या भावाला जेव्हा मेजवानीसाठी निमंत्रित केले तेव्हा त्याच्यावर प्रेम करण्याचे त्याने भासवले. शेवटी, ती मेजवानी एक लबाड युक्ती असल्याचे प्रगट झाले. त्याचा भाऊ अम्मोन ह्यास ठार करण्यसाठी त्याने ते कारस्थान रचले होते.

    अबशालोम अम्मोनास बरेवाईट काही बोलला नाही; अम्मोनाने त्याची बहीण तामार भ्रष्ट केली म्हणून अबशालोमाने त्याच्याशी वैर धरले. पुरी दोन वर्षे गेल्यावर एफ्राइमानजीक बाल-हासोर गावी अबशालोमाने आपल्या मेंढरांची लोकर कातरवली; त्या वेळी सर्व राजकुमारांना आमंत्रण केले. तो राजाकडे जाऊन म्हणाला, माझी अशी विनंती आहे की आपल्या सेवकाच्या मेंढ्यांच्या लोकरीची कातरणी आहे म्हणून राजाने आपले चाकर घेऊन ह्या सेवकाबरोबर यावे.

    राजा अबशालोमाला म्हणाला, माझ्या पुत्रा, नाही, आम्ही सर्वांनी येणे बरे नाही; आमचा भार तुझ्यावर पडू नये. त्याने फार आग्रह केला तरी तो गेला नाही, पण त्याने त्याला आशीर्वाद दिला.

    मग अबशालोम म्हणाला, आपण येत नाही तर माझा भाऊ अम्नोन ह्याला तरी आमच्याबरोबर येऊ द्या. राजाने त्याला विचारले, त्याने तुझ्याबरोबर का यावे? अबशालोमाने त्याला एवढा आग्रह केला की त्याने अम्नोनास व सर्व राजकुमारांना त्याच्याबरोबर जाऊ दिले. अबशालोमाने आपल्या सर्व सेवकांना अशी ताकीद देऊन ठेवली होती की, सावध राहा, अम्नोन द्राक्षारस पिऊन रंगात आला म्हणजे मी तुम्हांला इशारा केल्याबरोबर तुम्ही अम्नोनावर प्रहार करून त्याला ठार करा, काही भिऊ नका; मी तुम्हांला हुकूम करतो आहे ना? हिंमत धरा, शौर्य दाखवा. अबशालोमाच्या आज्ञेप्रमाणे त्याच्या चाकरांनी अम्नोनाचे केले. तेव्हा सर्व राजकुमार उठून आपापल्या खेचरांवर बसून पळून गेले. (२ शमुवेल १३:२२-२९)

    ४. याएल एक बहाणा देणारी व्यक्ती होती. तिने कनानी सैन्याचा सेनापती सीसरा ह्याला फसवले. तिने त्याला न घाबरण्याचे सांगितले आणि त्याला आत येऊन विसावा घेण्याचे उत्तेजन दिले. त्याच्या कानशीलात तिने मेख ठोकली.खूप कमी लोक इतके क्रूर कृत्य करू शकतील. ती मवाळ, सांत्वनदायी, बहाणा देणारी स्त्री तर खुनी होती. वाह!

    सीसरा मात्र केनी हेबेर ह्याची बायको याएल हिच्या डेर्‍याकडे पायी पळून गेला; कारण हासोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचे घराणे ह्यांचे सख्य होते. तेव्हा याएल सीसराला सामोरी येऊन त्याला म्हणाली, या स्वामी, या इकडे माझ्याकडे! भिऊ नका. तेव्हा तो तिच्याकडे डेर्‍यात गेला व तिने त्याला कांबळीखाली लपवले. तो तिला म्हणाला, मला थोडे पाणी प्यायला दे बरे! मला तहान लागली आहे. तेव्हा तिने दुधाची बुधली उघडून त्याला दूध प्यायला दिले व त्याला झाकले.

    तो तिला म्हणाला, डेर्‍याच्या दाराशी उभी राहा आणि कोणी येऊन तुला विचारू लागला की, येथे एखादा पुरुष आहे काय? तर नाही म्हणून सांग.

    मग हेबेराची बायको याएल हिने डेर्‍याची मेख आणि हातोडा हाती घेऊन, आणि पाय न वाजवता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली; ती आरपार जाऊन जमिनीत रुतली. तो थकून गेल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती. अशा प्रकारे तो मेला. (शास्ते ४: १७-२१)

    ५. हुशय एक बहाणा देणारा व्यक्ती होता. तो अबशालेमाच्या बाजूने असल्याचे त्याने भासवले. चांगला सल्ला देऊन त्याने प्रत्येक मुद्दा कारणे म्हणून देण्याचा बहाणा दिला. खरेतर, हुशय दावीद राजासाठी काम करत होता आणि आतून दावीद राजाला सहाय्य करण्यासाठी त्याला अबशालेमाच्या महालात ठेवले गेले.

    डोंगराच्या माथ्यावर ज्या ठिकाणी देवाची आराधना करीत असत तेथे दावीद जाऊन पोहचला, तेव्हा हूशय अर्की त्याला भेटायला आला; त्याचा अंगरखा फाटलेला होता व त्याच्या डोक्यात धूळ घातलेली होती. दावीद त्याला म्हणाला, "तू माझ्याबरोबर आलास तर मला तू भार मात्र होशील.तर तू नगरात परत जाऊन अबशालोमाला म्हण, ‘महाराज, मी आपला दास होतो; पूर्वी जशी मी आपल्या पित्याची नोकरी केली तशी मी आता आपली नोकरी करतो;’ असे केल्याने तू माझ्यासाठी अहीथोफेलाची मसलत निष्फळ करशील. तेथे तुझ्याबरोबर सादोक व अब्याथार याजक हे असणार नाहीत काय? जी

    Enjoying the preview?
    Page 1 of 1