Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

तुम्हांपैकी एक जण सैतान आहे
तुम्हांपैकी एक जण सैतान आहे
तुम्हांपैकी एक जण सैतान आहे
Ebook296 pages1 hour

तुम्हांपैकी एक जण सैतान आहे

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

“तुम्हांपैकी एक जण सैतान आहे” हे गहन विधान येशूने त्याच्या बारा शिष्यांच्या छोट्या गटाला केले होते. आपल्यापैकी बरेच जण सैतानाद्वारे सतावले गेले आहेत कारण आपण त्याला उघडे कसे करावे किंवा त्याच्या हस्तकौशल्यास कसे ओळखावे हे आपल्याला माहित नाही. ह्या आशीर्वादित पुस्तकामध्ये तुम्ही सैतानाच्या पापांना शोधाल आणि तुम्ही कधीच त्यांमध्ये आचरण करणार नाही हे ठरवाल. “तुम्हांपैकी एक जण सैतान आहे” हा वाक्यांश कधीच तुम्हांला लागू न होवो!

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354578
तुम्हांपैकी एक जण सैतान आहे
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to तुम्हांपैकी एक जण सैतान आहे

Related ebooks

Reviews for तुम्हांपैकी एक जण सैतान आहे

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    तुम्हांपैकी एक जण सैतान आहे - Dag Heward-Mills

    अध्याय १

    सैतानाची पापें ही मनुष्याची पापें कशी होऊ शकतात

    येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हां बारा जणांस मी निवडून घेतले नाही काय? तरी तुम्हांतील एक जण सैतान आहे.

    योहान ६:७०

    येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले, तुम्हांपैकी एक जण सैतान आहे. सैतानाच्या पतनाच्या वेळेपासून येशू सैतानाला ओळखत होता. त्याला त्याची भ्रष्टता, दुष्टपणा, स्वभाव, आणि त्याचे पतन ह्याबद्दल ठाऊक होते. तुमच्यापैकी एक जण सैतान आहे असे येशूचे त्याच्या शिष्यांबद्दल म्हणणे हे एक फार मोठे विधान आहे .

    त्याचा अर्थ असा होतो की त्याच्या शिष्यांपैकी एक जण खुद सैतानाच्या पापामध्ये आचरण करीत होता आणि त्याच्या पावलांवर पाऊल टाकून चालत होता. त्याच्या शिष्यांपैकी एक शिष्य अगदी सैतानासारखा वागत होता. सैतानाला ओळखणे येशूसाठी फार सोपे होते कारण त्याला त्याचे पूर्वीचे वैभव, त्याचे पाप आणि त्याच्या पतनाबद्दल ठाऊक होते!

    आज अनेक लोक सैतानाच्या पपांमध्ये आणि त्याच्या पावलांवर पाऊल टाकून आचरण करीत आहेत. सैतानाने जी प्रत्येक पापें केली होती ती सर्व ते करीत आहेत. लूसिफर ज्या मार्गाने चालला होता त्या मार्गांत अनेक पाळक लोक चालतात आणि सैतान आज अंधाराच्या ज्या संभ्रमित राज्यांत आहे तेथे त्यांचा शेवट होतो. तुम्ही सैतानासारखे वागत आहांत काय? तुम्ही सैतान आहांत काय? सैतानासारखा वागणारा व्यक्ती जो लूसिफरने केलेली सर्व पापें करीत आहे अशा व्यक्तीस तुम्ही ओळखता का?  

    प्रकाश आणि अंधाकाराच्या क्षेत्रात असण्याऐवजी आज, सैतानाला अंधाराच्या बंधनांत बांधून ठेवण्यांत आले असून तो मर्यादित आहे. तो स्वर्गातील एक देवदूत असतांना त्याने त्याने केलेल्या चुकां आणि पापें ह्यामुळे त्याचे जीवन, सेवाकार्य आणि त्याचे भविष्य सर्व कांही नष्ट झाले आहे. त्याने हजारों देवदूतांची दिशाभूल केली आणि जगात आज असलेला सर्व गोंधळ, दंगल आणि दुष्टपणांस तोच कारणीभूत झाला. 

    आज अनेक सेवक गोंधळात जगत असून ते अपयश, गरीबी आणि अत्यंत अंधारापर्यंतच मर्यदित असतात. त्यांना काय होत आहे ह्याची त्यांना जाणीव सुद्धा नसते. त्यांचे सेवाकार्य इतके मर्यादित, प्रतिबंधित आणि गरीब का आहे हे त्यांना समजून येत नाही.  

    तुम्ही सैतानाच्या प्रत्येक पापांना समजणार आहात आणि हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही त्यामध्ये कधीच आचारण करणार नाही!

    ह्या पुस्तकामध्ये, तुम्ही स्वत: सैतान होण्यापासून कसे टाळू शकता आणि त्याच्या पापमय मार्गापासून कसे दूर राहू शकता हे आज मी तुम्हांला दाखविणार आहे. सुवार्तेच्या प्रत्येक सेवकाने, लूसिफर जो एकदा देवाच्या सर्वोच्च सेवकांपैकी एक होता त्याच्या पावलांवर पाऊल टाकून चालण्याचे टाळले पाहिजे. लूसिफर जो प्रकाशामध्ये राहणारा त्याचे पतन होऊन तो जर इतक्या गोंधळास कारणीभूत होऊ शकतो, तर आपण जे अंधकारमय आणि आंधळ्या जगाच्या राहणारे किती अधिकरित्या पतन पावून गोंधळ निर्माण करू शकतो!  

    अध्याय २

    येथे मानवी सैतान आहेत काय?

    येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हां बारा जणांस मी निवडून घेतले नाही काय? तरी तुम्हांतील एक जण सैतान आहे.

    योहान ६:७०

    तुमच्या जीवनांत एखादा व्यक्ती एक कार्यरत मूर्त सैतान असू शकतो हे तुम्ही स्वीकारलेच पाहिजे. अशा व्यक्तीची आज्ञा मानू नये, त्याच्याशी सहमत होऊ नये,  आणि त्याचे मुळीच ऐकून घेऊ नये. 

    तुम्ही जे पाहता त्याद्वारे कार्य करू नका. तुम्ही ज्या व्यक्तीला हाताळत आहांत त्याच्या दैवी प्रकटणाद्वारे तुम्ही कार्य केले पाहिजे. 

    कांही लोकांबरोबर ते सैतान आहेत असे समजूनच त्यांच्याशी वागले पाहिजे कारण ते (फक्त कांही काळासाठी) तुमच्यासाठी सैतानाच आहेत. कांही लोकांना संपूर्णपणे सैतानाने झपाटलेले आणि व्यापून टाकलेले असते! कांही लोकांशी सैताना म्हणून वागले नाही तर फार गंभीर समस्या उभी राहते. मी असे कांहीतरी का म्हणतो? पवित्र शास्त्र आपल्याला शिकविते की आपले झगडणे रक्तमांसांबरोबर नव्हे तर, सत्ताबरोबर, अधिका-यांबरोबर आहे. ह्या शास्त्रभागावरून हे स्पष्ट होते की आपला शत्रू हा रक्त किंवा मांसाचा असून तो आत्मा आहे! खरच, आपले झगडणे, संघर्ष करणे, आणि लढणे हे रक्तमांसांबरोबर नाही. ते दुष्टात्म्यांबरोबर आहे.   

    तथापि, हे दुष्टात्में अशाप्रकारे कांही लोकांमध्ये राहतात, त्यांना प्रभावित करतात, आणि त्यांना झपाटतात की मनुष्यामध्ये आणि सैतानामध्ये फरक ओळखणे कठीण जाते. असे जेव्हा होते, तेव्हा मनुष्यप्राणी खरच सैतान होतो आणि त्याला सैतानाचीच वागणूक दिली पाहिजे. 

    जर एखादा मनुष्य संपूर्णपणे सैतानाने व्याप्त, प्रभावित झाला आहे किंवा सैतानाद्वारे उपयोगांत आणला जाता आहे तर अशा व्यक्तीला सभोवती मुळीच कार्य करू देऊ नका. अनेक सेवाकार्ये नष्ट होत असलेली मी पाहिली आहेत कारण पाळक लोक सैतानाला हाताळतांना फार विनयशील, सौम्य आणि खूप संयमी होते. स्वत: सैतानासारखे वागणा-या कांही लोकांशी पाळक लोक फार विनयशील, सौम्य आणि खूप संयमी वागत होते म्हणून त्यांचे सेवाकार्य देखील नष्ट झाल्याचे मी पाहिले आहे!    

    असे कांही लोक आहेत की त्यांच्याकडे तुम्ही केवळ सैतान म्हणूनच पहिले पाहिजे. तुम्ही अशा लोकांबरोबर बोलतांना प्रत्यक्ष सैतानाबरोबर बोलत आहात असे समजून बोला! असे न केल्यांस तुम्ही सैतानाला तुमच्या सभोवती आणि तुमच्या विरुद्ध कुयुक्ती करण्यासाठी मोकळे सोडून देता.  

    डायाबोलोस

    ‘डायाबोलीस’ ह्या शब्दाचे भाषांतर सहसा ‘सैतान’ म्हणून केले जाते आणि हा शब्द अक्षरश: सैतानाचा उल्लेख करतो. संपूर्ण नाव्याकरारामध्ये ‘डायाबोलीस’ ह्या शब्दाचा अडतीस वेळां उपयोग करण्यांत आला आहे. पस्तीस वेळां ‘डायाबोलीस’ ह्या शब्दाचा सैतान म्हणून अनुवाद करण्यांत आला आहे. उदाहरणार्थ, तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यांत नेले. 

    तथापि, इतर तीन लक्षणीय प्रसंगी, मनुष्याचे वर्णन करण्यासाठी डायाबोलीस ह्या शब्दाचा उपयोग केला गेला आहे. हे आश्चर्यकारक नाही का? डायाबोलीस  ह्या शब्दाचा उपयोग दुस-या कोणासाठी नव्हे तर यहूदा इस्कर्योत, कांही पाळक लोकांच्या बायकां, आणि कांही वृद्ध महिलांचा उल्लेख करण्यासाठी करण्यांत आला आहे. (कृपया हे तुम्ही स्वत: सत्यापित करा). मी हे कांही सांगत आहे त्याबद्दल जर बायबलमध्ये लिहिले आहे तर, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे.

    येशू ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुसरण करा

    आणि कांही विशिष्ट लोकांना सैतान म्हणूनच वागणूक द्या.

    १. पेत्र जणू कांही सैतान आहे असे समजून येशूने त्याला हाताळले होते.

    तेव्हा पेत्र त्याला जवळ येऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभुजी, "आपणांवर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.!"

    परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा; तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.

    मत्तय १६:२२-२३

    येशू ख्रिस्ताप्रमाणेच, तुम्हांला सत्य स्वीकारणे आवश्यक आहे की कांही लोक कांही वेळेसाठी सैतानाने झपाटले जाऊन त्यांचा अशाप्रकारे उपयोग केला जातो की ते तुमच्या जीवनांत अक्षरश: सैतानाचे मूर्त रूप होतात. पेत्र, ज्याला येशूने मंडळीचा पुढारी बनविले होते, तो कांही क्षण अक्षरश: सैतान बनून वागला  होता आणि येशूने त्याला कठोरपणे आणि निर्णायकपणे हाताळले होते. येशूने त्याच्या उपस्थितीत त्याला त्याचे बोलणे चालू ठेवण्याची परवानगी दिली नाही. त्याने त्याला त्याच्या जीवनांत कार्य करण्याची परवानगी दिली नाही. 

    पेत्र हा सैतानाद्वारे प्रभावित झाला होता असे येशूने म्हटले नव्हते! पेत्राला सैतान म्हणूनच येशूने संबोधले होते!

    पेत्र येशूशी परिचित होता. मंडळीचा प्रमुख म्हणून त्याची नियुक्ति कदाचित त्याच्या डोक्यांत शिरली होती आणि त्याने त्याच्या मर्यादेबाहेर पाऊल टाकले होते. येशूच्या सेवाकार्याचे निर्देशन करण्याचा त्याला मोह झाला होता. त्याने देवाच्या पुत्राला दटाविण्यांस सुरुवात केली होती. वधस्तंभाच्या मूर्खतेस विसरून जाण्यांस तो येशूला सांगत होता! वधस्तंभाचा उपदेश हा कित्येक लोकासाठी मूर्खपणा आहे! त्या दिवशी पेत्रासाठी तो खरच मूर्खपणाचा होता. पुढे जाऊन कोणत्याहि वधस्तंभाकडे जाण्याची मुळीच गरज नाही असे त्याने येशूला सांगितले होते. येशूने पेत्राच्या अपरिपक्वता आणि परिचयाच्या माध्यमांतून पाहिले होते. परंतु पेत्र हा अपरिपक्व किंवा परिचित होता असे येशूने म्हटले नाही. सैतान पेत्राच्या वाणीचा उपयोग करीत होता हे येशूने ओळखले होते. त्याने त्वरित पेत्राला दटाविले आणि सैतानाला थेट रोखले. 

    १९३३ साली जेव्हा अडोल्फ हिटलर जेव्हा भाषणे देत होता तेव्हा लोकांनी जर सैतानाचा आवाज ओळखला असता, तर त्यांनी त्याला तेथे मध्येच थांबविले असते. परंतु पाळक लोकांनी सुद्धा ह्या समूहाच्या हत्याराची तेव्हा प्रशंसा केली होती. अडोल्फ हिटलर हा पांच कोटी लोकांच्या मृत्यूस कारण झाला होता. त्याने जाणूनबुजून अनेक लोकांना मारून टाकले होते. त्याच्या स्वत:च्या जर्मन लोकांना नष्ट करण्याची त्याने शेवटची सूचना दिली होती. ते युद्धांत पराजित झाल्यामुळे त्यांना जगण्याचा हक्क नाही असे त्याने म्हटले होते. ह्या माणसाला बोलण्यांस, जिवंत राहण्यांस, कार्य करण्यांस, आणि त्याची भरभराट होऊन त्याला नेता बनू देण्याची जर्मनीने कधी केली नव्हती अशी महान चूक त्यांनी केली होती. सैतानाला ओळखले जाऊन त्याला मध्येच रोखणे आवश्यक आहे! 

    एका मिनिटासाठी सुद्धा सैतानाला तुमच्या जीवनांत कार्य करण्याची अनुमती देऊ नका. येशू ख्रिस्ताप्रमाणे हुशार आणि जलद व्हा. तुमच्या दिवाणखान्यांत जर तुम्हांला विषारी साप असल्याचे आढळले तर तुम्ही त्याला काही आठवडे तेथेच राहू द्याला का? 

    आपल्या दिवाणखान्यांत विषारी सापाला राहण्याची अनुमती देणा-या लोकांकडे लक्ष असू द्या! ते एक महा भयंकर चूक करीत आहेत!

    तुमच्याशी अतिपरिचित होणा-या लोकांकडे लक्ष असू द्या! जे लोक त्यांच्या मर्यादेचे उल्लंघन करतात त्याच्याकडे लक्ष असू द्या! देवाच्या सेवकाला निर्देश करणे, त्याच्यावर नियंत्रण करणे किंवा त्याला दटावणे हे त्यांचे काम नाही ही जाणीव ते गमावून बसतात. 

    देवाच्या माणसांच्या मानवतेशी हाताळत असतांना आपल्याला गोंधळून जाऊन नियमाच्या बाहेर जाण्याचा मोह होऊ शकतो. 

    २. यहूदा इस्कर्योतास जणू कांही सैतान आहे असे समजून येशूने त्याला हाताळले होते.

    येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हां बारा जणांस मी निवडून घेतले नाही काय? तरी तुम्हांतील एक जण सैतान आहे.

    योहान ६:७०

    शिष्य आणि सहकारी हे डायाबोलीसमध्ये (सैतानामध्ये)  बदलून जाऊ शकतात आणि ते सैतानासाराखेच वागायला सुरुवात करतात.

    येशूने स्वत:च्या विश्वसनीय लेखापालास डायाबोलीस असे म्हटले होते. यहूदा इस्कार्योतचा डायाबोलीस म्हणून उल्लेख करण्यांत आला होता. तुमच्या सभोवती अनुपकारी विश्वासघातकी व्यक्तीला कार्य करण्याची अनुमती देणे हे एखाद्या नाग सर्पाला तुमच्या घरांत राहण्याची आणि मुक्तपणे फिरण्याची अनुमती देणे ह्याच्याशीच तुलना केली जाऊ शकते.   

    कोणत्याहि अनुपकारी व्यक्तीला तुमच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका. तुमच्या पाळकीय कर्माचा-यांमध्ये नाग सर्पांना अस्तित्वांत राहू देऊ नका. त्यांना ओळख आणि पटकन त्यांना हाताळा. 

    येशूने यहूदाचा सैतान म्हणून उल्लेख केला होता. यहूदा सैतानाद्वारे प्रभावित झाला होते असे येशूने म्हटले नव्हते. यहूदा हा सैतान होता असे त्याने म्हटले होते. त्याने म्हटले, "मी तुम्हांला निवडून घेतले नाही काय? तरी तुम्हांतील एक जण सैतान आहे." तुमच्या जीवनांत आणि सेवाकार्यामध्ये जर तुम्ही सिअतनल कार्य करण्याची अनुमती दिलीत, तर खात्रीने, तुम्ही समस्येमध्ये सापडाल. मंडळीमध्ये अनुपकारी सहका-याला मुक्तपणे कार्य करण्याची अनुमती देणे हे मंडळीमध्ये सैतानाला त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची अनुमती देण्यासारखेच आहे. 

    तुमच्या घराच्या दिवाणखान्यांत खडखड्या सांप असल्याची तुम्ही कल्पना करू शकता का? तुम्ही त्याला सतत तेथे राहण्याची अनुमती द्याला का? त्याच्याकडे तुम्ही एक खूनी म्हणून पाहणार नाही का? तुमच्या घरांत तुम्हांला जर काळा साप आढळला तर, त्याला तुम्ही तेथेच सोडून द्याल का? तुमच्या जीवनासाठी तो फार धोकादायक आहे ह्याची तुम्हांला जाणीव होणार नाही का? तो तुमच्या मृत्यूचे कारण होऊ

    Enjoying the preview?
    Page 1 of 1