Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

मुली तू हे करू शकतेस
मुली तू हे करू शकतेस
मुली तू हे करू शकतेस
Ebook237 pages1 hour

मुली तू हे करू शकतेस

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

हे पुस्तक मुलींच्या दुखापतीला बरे करेल! या दीर्घ-प्रतीक्षित पुस्तकात, स्त्रियांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांना ज्या अनेक अशक्य समस्यांना सामोरे जावे लागते त्यात त्यांनी देवाच्या ज्ञानाला मदत करू द्यावी.
विशेषत: मुलींसाठी लिहिलेल्या या शक्तिशाली नवीन पुस्तकाचा आनंद घेत असताना देव तुमच्या जीवनाला स्पर्श करेल आणि तुम्हाला बळ देईल

Languageमराठी
Release dateAug 30, 2018
ISBN9780463205709
मुली तू हे करू शकतेस
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to मुली तू हे करू शकतेस

Related ebooks

Reviews for मुली तू हे करू शकतेस

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    मुली तू हे करू शकतेस - Dag Heward-Mills

    अध्याय १ 

    स्त्रिया

    हे पुस्तक मी स्त्रियांसाठी लिहित आहे. सर्वत्र असलेल्या स्त्रियांसाठी हा एक संदेश आहे. स्त्रिया पुरुषांपासून वेगळ्या पद्धतीने निर्माण केल्या गेल्या होत्या आणि माझा असा विश्वास आहे की त्या एका विशेष संदेशास पात्र आहेत. 

    येशूने स्त्रियांना दोन वेगवेगळ्या प्रकारे संदर्भित केले. तो त्यांना एकतर बाई किंवा मुली असे म्हणत असे.

    एक मुलगी आणि एक बाई यांच्यात फरक आहे. मी जर बाई असलो असतो तर, येशूने मला मुली म्हटले असते तर मला ते आवडले असते. मला वाटतं मुलगी सामान्यत: अधिक ग्रहणक्षम, अधिक मोकळी आणि अधिक नम्र असते. नैसर्गिकपणे, एखादी प्रौढ स्त्री मुली इतकी प्रभाव पाडण्यास सोपी नाही.

    जीवनाची कटुता

    बऱ्याच स्त्रिया त्यांच्या जीवनातील अनुभवांनी प्रभावित होतात. त्या कठोर, क्षमा न करणाऱ्या आणि कृतघ्न आहेत. जीवनाच्या वेदनादायक अनुभवांनी विश्वास आणि भरवशाचे सौंदर्य धुवून टाकले आहे. एखाद्या माणसावर कधीच विश्वास ठेवू नका त्या म्हणतात. त्या स्वत:ला म्हणतात, दुसऱ्या स्त्रीवर कधीच विश्वास ठेवू नकोस. मी लक्षपूर्वक पाहिले की किती तरी स्त्रिया एकाकीपणात राहतात. त्या जवळजवळ मैत्रिणी नसलेल्या एकट्या आहेत. 

    येशू शोमरोनी स्त्रीशी कसा बोलला याकडे लक्ष द्या. तो या स्त्रीला ज्या गोष्टी सांगत होता त्यावर तिने विश्वास ठेवावा म्हणून तो प्रयत्न करीत होता.

    . . . बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरूशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान.

    योहान ४:२१

    व्यभिचार करत असताना धरलेल्या स्त्री सोबत येशू कसा बोलला याकडे लक्ष द्या. ही एक स्त्री होती जिने क्षमा न करणाऱ्या माणसांच्या हातात आपला जीव जवळजवळ गमावला होता. तिने पुन्हा प्रीतीवर विश्वास ठेवावा अशी त्याची इच्छा होती.

    . . . बाई तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही का? ती म्हणाली, प्रभुजी कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवत नाही; जा ह्यापुढे पाप करू नको. 

    योहान ८:१०, ११

    अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेल्या स्त्री सोबत येशू कसा बोलला याकडेही लक्ष द्या. या स्त्रीला अनेक गोष्टींमधून जावे लागले होते. ती बऱ्याच काळापासून कटुता आणि वेदना सहन करत होती. या स्त्रीला एका चमत्काराची आवश्यकता होती. मंडळीमध्ये येशूने तिला कसे संबोधित केले ते पाहा:

    . . .बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली.

    लूक १३:१२, १३

    अध्याय २

     मुली

    स्वाभाविकपणे बोलायचे झाल्यास, मुली कटुता आणि अक्षमाशीलतेने  भरलेल्या नाहीत. गोडवा आणि निरपराधपणा मुलीला वैशिष्ट्यपूर्ण ठरवतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुलीला आपल्या वडीलाच्या प्रति एक खास भरवसा आणि आत्मविश्वास असतो. दुर्दैवाने, मुलगी प्रौढ स्त्री होत असताना तिचा विश्वास, आशा आणि प्रेम अंधुक होत जाते.

    येशूने काही स्त्रियांना मुली म्हणून संबोधले. माझ्या मते त्यांचा त्याच्यावर असलेल्या विश्वासामुळे त्याने असे केले. त्याच्या प्रति असलेली शुद्ध प्रीती त्याने त्यांच्यात पाहिली.

    चला, ज्या स्त्रियांची येशूने सेवा केली त्या गटाकडे पाहूया. या वेळी, आपल्या लक्षात येते तो त्यांना वेगळ्या प्रकारे संबोधित करतो.

    येशूने केलेल्या महान चमत्कारांपैकी एक होता रक्तस्रावी स्त्रीला बरे करणे, आपल्याला पहायला मिळते की येशू तिला मुली म्हणतो ! ही स्त्री अभिषेक मिळवण्यास सक्षम झाली जरी आजूबाजूच्या लोकांना याची काहीही जाणीव झाली नव्हती.

    . . . आणि त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला.

    मार्क ५:२९

    या मुलीबद्दल असे काहीतरी आहे जे मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. सर्वप्रथम, तिला येशूच्या क्षमतेवर मोठा भरवसा होता. ती आपल्या आजारपणात आणि अशक्तपणात गर्दीतून पुढे जात राहिली आणि तिने येशूच्या वस्त्रांना शिवले. 

    भरघोस गर्दीतून पुढे जाण्यासाठी या स्त्रीला मोठ्या विश्वासाची गरज लागली असावी. या कृतीनेच तिला एक महान मुलगी बनवले: विश्वास आणि भरवसा. वेगवेगळ्या लोकांसोबत तिला आलेले तिचे बारा वर्षांचे कटू अनुभव तिच्या अंत:करणाच्या विश्वासाची तहान भागवू शकले नाहीत.

    जागरूक स्त्रिया

    कधी-कधी, वेगवेगळ्या पुरुषांसोबत पापपूर्ण अनुभवांची पार्श्वभूमी एखाद्या स्त्रीला कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेवण्यास अवघड बनवते. तिचा तिचे वडील, तिचे पाळक किंवा देवाच्या कोणत्याही सेवकावर थोडा आत्मविश्वास असतो. ती सहज चांगुलपणा आणि पवित्रता यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवू शकत नाही. कधी- कधी, शंकेच्या आणि गप्पेच्या संस्कृतीत वाढल्याने, तिच्यात भरवसा न ठेवण्याचे बीज कायमचे पेरले जाते. अशा स्त्रिया सतत शंकाळू, अविश्वासी, संशयवादी आणि साशंक असतात. थोडक्यात, एक स्त्री जी भरवसा ठेवण्यात असमर्थ असते ती प्रीती करण्यात देखील असमर्थ ठरते. परिपूर्ण प्रीती भय काढून टाकते. पवित्रशास्त्र सांगते प्रीती . . .

    ... सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते ... 

    १ करिंथ. १३:७

    मुलींना त्यांच्या वडीलांचा अभिषेक प्राप्त होतो

    या मुलीबद्दलचे (रक्तस्त्रावी स्त्री) दुसरे उल्लेखनीय चिन्ह, ही सत्यता होती की तिला येशूचा अभिषेक प्राप्त झाला होता. पवित्रशास्त्रातील ही एकमेव नोंद आहे की अभिषेक एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रवाहित झाला आणि दोन्ही व्यक्तींना त्याची अक्षरश: जाणीव झाली. येशूला त्याच्यामधून अभिषेक निघाल्याचे जाणवले आणि मुलीला अभिषेक तिच्या शरीरात येत असल्याचे जाणवले.

    तुला माहितच आहे, ती मुलचं असतात जी त्यांच्या पालकांकडून सर्वात मौल्यवान भेटवस्तू प्राप्त करतात. पित्याकडून ज्यांना वारसा मिळतो ती मुलचं असतात, बरोबरचे लोक किंवा सहकारी नसतात.

    एखाद्या स्त्रीच्या जीवनात एक अशी वेळ येते जेव्हा ती एखाद्या पुरुषाच्या अधिकाराला आव्हान देते. अनेक पुरुष बेजवाबदार आणि अविश्वसनीय आहेत म्हणून मी तिला दोष देत नाही.

    तथापि, पुरुषांशी लढा देणे आणि त्यांच्या अधिकाराप्रति आंदोलन करणे ह्या गोष्टी तुला अभिषेकापासून सहज दूर ठेवतील. देवाच्या वरदानाविषयी तुझी वृत्ती कायमची प्रतिरोधी होईल. तुला ठाऊक आहे की, देव वापरत असलेली अनेक पात्रे ही पुरूष आहेत.

    जेव्हा तू एखाद्याला एक पिता म्हणून प्राप्त करते तेव्हा तू त्याच्याकडून मिळणाऱ्या दानांना घेण्याकरिता स्वत: ला तयार करते. कदाचित, म्हणूनच येशूने तिला मुली म्हटले.

    तो तिला म्‍हणाला, "मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.

    मार्क ५:३४

    मुली सदा आहेत

    दुसऱ्या एका प्रसंगी, येशूला जेव्हा वधस्तंभावर खिळण्यासाठी नेले जात होते, तेव्हा लोकांचा एक मोठा जमाव त्याच्या मागे चालला होता. या गर्दीत, अशा काही स्त्रिया होत्या ज्या येशूवर केल्या जात असलेल्या अन्यायाबद्दल संतुष्ट नव्हत्या. त्यांनी त्याला उघडपणे पाठिंबा दिला आणि सार्वजनिकरित्या त्याच्याशी आपली ओळख असल्याचे दाखवले.

    त्या समयी सर्व पुरुषांनी व प्रेषितांनी प्रभूला सोडले, तेव्हा त्या स्त्रिया दृढ उभ्या राहिल्या. येशूने त्यांच्याकडे वळून त्याच्या हृदयातून त्यांच्याशी भविष्यसूचक वचन बोलला. त्याने त्याचे समर्थन करणाऱ्या या स्त्रियांना स्त्रिया म्हटले नाही तर कन्यांनो म्हटले.

    येशू त्यांच्याकडे वळून म्‍हणाला, अहो यरूशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वत:साठी आपल्‍या मुलांबाळांसाठी रडा.

    लूक २३:२८

    एक अशी स्त्री होण्याचा निर्णय घे जिच्याकडे येशू एक कन्या म्हणून पाहील. अशी कोणीतरी जी अभिषेकासाठी ग्रहणक्षम असेल! अशी कोणीतरी जी देवाच्या माणसाला पाठिंबा देणारी आहे! अशी कोणीतरी जी दर्शनाप्रति उघडपणे आणि ठामपणे ओळखण्यासाठी तयार झालेली आहे.

    अध्याय ३

    आच्छादन

    स्त्रियांना आच्छादन / ओढणी आवश्यक आहे

    स्त्रियांना त्यांच्या जीवनासाठी आच्छादन आवश्यक आहे. हे आच्छादन संरक्षणाची ढाल म्हणून कार्य करते. दुर्दैवाने, अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या या वास्तविकतेला स्वीकारत नाहीत. त्या स्वत:ला पुरुषांसमान पाहतात आणि इतर कोणाच्या समान चांगल्या व सुंदर दिसू पाहतात.

    तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्‍या मस्तकाचा अपमान करते; कारण ती मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच होते.

    १ करिंथ. ११:५

    केवळ नम्रतेच्या भावनेनेच तुम्ही ही वास्तविकता स्वीकारू शकता. एका बालकांसारखे झाल्यास देवाच्या राज्याचा उत्तम रितीने पाठलाग करता येतो.

    ‘‘मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.

    मत्तय १८:३

    स्त्रीने आध्यात्मिकरित्या  आच्छादित असणे  महत्त्वाचे आहे आणि हे डोक्यावर असलेल्या ओढणीद्वारे येते. एखादी स्त्री विवाहित असो किंवा नसो, ती तिला हवे असलेले आच्छादन घेऊ शकते.

    ... स्त्रीचे मस्तक पुरूष आहे ...

    १ करिंथ. ११:३

    हे आच्छादन कधीकधी पती, पाळक किंवा आध्यात्मिक पित्यांकडून पुरविले जाते. या आध्यात्मिक आवरणाशिवाय सेवा करत असलेल्या स्त्रीचे स्थान सेवेत नसते. अर्थातच, जर तुझे लग्न अविश्वासणाऱ्या पुरूषाशी झाले असेल, तर तो तुझे आध्यात्मिक आवरण होवू शकत नाही.

    जर तुझे लग्न आध्यात्मिकरित्या सुस्त असलेल्या पतीशी झाले आहे, तर तो तुझे आवरण नाही. आध्यात्मिकदृष्ट्या तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीने आवरण प्रदान करणे आवश्यक आहे. म्हणूनच त्याला आवरण असे म्हटले जाते.

    प्रिय बहीणी, तुला आध्यात्मिक आवरण आहे का? काय तुझे त्या पुरूषांच्या मार्गदर्शनासाठी मन मोकळे आहे ज्यांना देवाने तुझ्या आवरणासाठी दिले आहे? तुझे आध्यात्मिक आवरण कोण आहे? तू बंडखोर आहेस का? आपल्यापैकी कोणीही देवाच्या वचनापेक्षा श्रेष्ठ नाही हे विसरू नकोस.

    अध्याय ४

    मुली, हा तुझा सन्मान आहे!

    बाराक तिला म्‍हणाला, तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, नाहीतर जाणार नाही. ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर अवश्य येईन, पण ह्या तुझ्या स्वारीत तुझी प्रतिष्ठा होणार नाही, कारण परमेश्वर सीसरा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे. मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली.

    शास्‍ते ४:८, ९

    या गोष्टीत एका स्त्रीला

    Enjoying the preview?
    Page 1 of 1