Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१६
प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१६
प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१६
Ebook267 pages1 hour

प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१६

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

प्रसाद शिरगांवकर यांच्या कथा, कविता आणि लेखांनी नटलेला आगळावेगळा "मोबाईल" दिवाळी अंक, “प्रासादिक” चं हे दुसरं वर्षं!

विविध आशय आणि विषयांच्या कथा, कविता, लेखांनी सजलेला आणि एकाच माणसानं लिहिलेला मराठीतला आगळा-वेगळा मोबाईल दिवाळी अंक!

या अंकामध्ये "सहजच, भटक्याची डायरी, माझी ड्रुपलगिरी, सोशल बिशल, लघुकथा/लघुभयकथा आणि पशा म्हणे, या सहा विभागांमध्ये सत्तरेक प्रकारचे लेख, कथा, कविता आहेत!!

मराठीतला हा प्रयोग दुसऱ्या वर्षीही आपल्याला नक्कीच आवडेल!!

Languageमराठी
Release dateOct 30, 2016
ISBN9781370522736
प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१६
Author

Prasad Shirgaonkar

I am a writer and a poet by passion and a technologist by profession.

Related to प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१६

Related ebooks

Reviews for प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१६

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१६ - Prasad Shirgaonkar

    पणती प्रासादिक दिवाळी २०१६ पणती

    प्रासादिक विषयी...

    दिवाळी म्हणजे पणत्या, आकाशकंदील, लायटिंगच्या माळा… दिवाळी म्हणजे लाडू, चिवडा, चकल्या, करंज्या, शंकरपाळ्या… दिवाळी म्हणजे तेल, उटणं, मोतीचा साबण, अभ्यंगस्नान… दिवाळी म्हणजे नवे कपडे, नवी खरेदी, घराचं डेकोरेशन… दिवाळी म्हणजे किल्ला, फटाके, सुट्टी आणि मनमुराद उधळून केलेला कल्ला…

    दिवाळी म्हणजे कुटुंब, मित्र, नातेवाईक, सगळ्या आप्तांच्या गाठीभेटी… दिवाळी म्हणजे बायकोनी नवऱ्याकडून, बहिणी भावाकडून हक्कानं घेतलेली ओवाळणी… दिवाळी म्हणजे नाती आणि नात्यांचं सेलीब्रेशन….!

    दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि उधाण-भरला उत्सव…! दिवाळी म्हणजे आयुष्यात प्रकाश निर्माण करून तो साजरा करणं…

    आणि हां… दिवाळी म्हणजे दिवाळी अंकसुद्धा!

    ‘अन्न, वस्त्र, निवारा, नाती-गोती’ या जगण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी ‘साजऱ्या’ करण्याच्या उत्सवामध्ये, आपण मराठी माणसांनी, कथा, कविता, लेख, विनोद, विडंबन, व्यंगचित्र या साहित्यिक गोष्टींनाही सामावून घेतलं आहे… उत्सवाचं अविभाज्य अंग बनवलं आहे…

    पंजाबीमध्ये बैसाखीनिमित्त, मल्याळीमध्ये ओणमनिमित्त, इंग्रजीत ख्रिसमसनिमित्त, उर्दू/अरेबिक मध्ये ईदनिमित्त, काही साहित्यिक विषेशांक निर्माण होतात का हे माहित नाही… पण मराठीत दिवाळीनिमित्त आपण दिवाळी अंक तयार करतो…

    अन्न, वस्त्र, निवारा, नात्यां इतकंच साहित्यही जगण्यासाठी, जगण्याचा आनंद साजरा करण्यासाठी महत्वाचं आहे हे आपण मानतो…

    या अशा मराठी संस्कृतीत आपण योगायोगानं जन्माला आलो… त्यात आपलं काहीच कर्तुत्व नाही… त्यामुळे त्याचा अभिमान वगैरे बाळगायची गरज नाही… पण आपल्या भाग्यानं आपल्या वाट्याला आलेला हा सांस्कृतिक ठेवा मनसोक्त अनुभवणं आणि तो पुढच्या पिढीकडे सोपवणं हे आपणं नक्कीच करू शकतो!

    अन हा ठेवा जर पुढच्या पिढीकडे द्यायचा असेल तर तो पुढच्या पिढीच्या भाषेत, त्यांच्या व्यासपीठांवर असायला हवा….

    म्हणूनच, ‘प्रासादिक’ हा नव्या पिढीच्या भाषेतला, नव्या पिढीला समजेल अशा व्यासपीठांवरचा मोबाईल दिवाळी अंक आहे!

    गेल्या अंकाप्रमाणेच हा ही आपल्याला आवडेल अशी आशा आहे… आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा…

    दिवाळीच्या अंतःकरणपूर्वक आभाळभरून शुभेच्छा...!

    पणती प्रासादिक दिवाळी २०१६ पणती

    प्रासादिक मोबाईल दिवाळी २०१६

    लेखक : प्रसाद शिरगांवकर | प्रकाशक : साधं सोपं डॉट कॉम

    मुखपृष्ठ : अल्पना शिरगांवकर

    वेबसाईट: www.sadha-sopa.com | फेसबुक: https://www.facebook.com/PrasadikDiwali

    ईमेल: prasad@aadii.net

    प्रसाद शिरगांवकर विषयी

    Prasad Shirgaonkar

    जन्मगांव पुणे... नोकरी / व्यवसायाच्या निमित्त युरोप, अमेरिका व इंग्लंड मध्ये प्रवास व वास्तव्य... सध्या वास्तव्य पुण्यामध्ये..

    शिक्षणाने Cost Accountant (ICWA), पण अनेक वर्षे वेगवेगळ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये Techno-Functional व व्यवस्थापकीय कामांचा अनुभव...

    सध्या Drupal या मुक्तस्रोत तंत्रज्ञानाचं देशा-विदेशात प्रशिक्षण देण्याचं काम

    काव्य, कथा आणि ललित लेखनामध्ये विशेष रूची... गेली अनेक वर्षे विविध ऑनलाईन माध्यमांमध्ये नियमित लिखाण...

    'i-बाप' या इंटरनेट आणि मोबाईल युगातल्या एका संवेदनशील पित्याच्या 'स्टेटस अपडेट्स' च्या पुस्तकाचे लेखन

    'आनंदाचं गांव' हा स्वनिर्मित कवितांचा कार्यक्रम... 2002 पासून पुणे, मुंबई, ठाणे व लंडन येथे अनेक प्रयोग संपन्न...

    या अंकातले काही लेख, कथा, कविता वगैरे तुम्ही कदाचित फेसबुकवर वाचले असतील. काही तुम्हाला Whats App वर कधी फॉरवर्ड होऊनही आले असतील. तिथे Copy Paste करणाऱ्यांनी मूळ लेखकाचं नाव ठेवलं असेलच असं नाही. त्यामुळे काही लेख वाचताना, ‘अरे, हे तर WA वर आलं होतं, इथे कसं काय?’ असं वाटण्याची शक्यता आहे.

    म्हणूनच, या अंकातलं सर्व लिखाण ही पूर्णपणे माझी स्वतःची निर्मिती आहे, कोणतेही कॉपी-पेस्ट-फॉरवर्ड्स नाहीत हे नम्रपणे सांगावंसं वाटतं!

    पणती प्रासादिक दिवाळी २०१६ पणती

    पणती

    सहजच

    पणती प्रासादिक दिवाळी २०१६ पणती

    सुखांचे सॅशे!

    आपण किराणामालाच्या दुकानात उभे असतो, मुलानी कुठलीशी दुधात घालायची पावडर आणि बायकोनी कुठलासा लै भारीवाला शांपू आणायला सांगितलेला असतो… या दोन्हीच्या च्या रेग्युलर पॅक्स वरच्या किंमती बघून आपले डोळे पांढरे व्हायची वेळ आलेली असते… आपण ते घ्यावेत का नाही या द्विधा मनःस्थितीत असताना दुकानदार हळूच सांगतो, ‘दोन्हीचे सॅचे आहेत साहेब… try करून बघा…’ मग आपण ते ‘सॅचे’ किंवा सॅशे बघतो… अगदीच पाच-दहा रुपयांना असतात… खुष होऊन आपण दोन्हीचे दोन-चार सॅशे घेऊन टाकतो आणि ताठ मानेनं घरी परत जातो!!

    'सॅशे' हे भारतीय बाजारपेठेसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेलं सगळ्यांत मोठं इनोव्हेशन आहे! हल्ली शांपू पासून सॉसेस पर्यंत, साबणांपासून मसाल्यांपर्यंत, गोळ्या-बिस्किटांपासून ते नारळपाण्याच्या पावडरी पर्यंत कशाकशाचेही सॅशे मिळतात… गिऱ्हाईकाला एकदम एक मोठ्ठा पॅक शे-दोनशे-चारशे रुपयांना घ्यायला लावायच्या ऐवजी दोन-पाच-दहा रुपयांचे ‘छोटे पॅक्स’ देणं हे त्या गिऱ्हाईकाच्या आणि आपल्याही फायद्याचं आहे हे आजकाल सगळ्याच कंपन्या जाणतात आणि तसं वागतातही…! आपणही खूप पैसे देऊन मोठ्ठे पुडे विकत घ्यायच्या ऐवजी कमी पैसे देऊन छोटे पॅक्स आणि सॅशेज विकत घेतो…

    पण किराणामालाच्या दुकानातल्या व्यवहारांत दाखवत असलेला हा समजुतदारपणा आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र अमलात आणत नाही!!

    आपण आपल्या आयुष्यात सुखांच्या मोठ्या मोठ्या पॅकेट्सच्या मागे अहोरात्र धावत असतो…. मोठ्ठं घर… मोठ्ठी गाडी… भरपूर बॅंक बॅलन्स… अफाट प्रसिद्धी… प्रचंड यश… वगैरे वगैरे वगैरे…. सुखांचे हे भले मोठ्ठे पॅक्स मिळावेत म्हणून आपण जीवापाड मेहनत करत रहातो… हे मोठे पॅक मिळाले / मिळवले तरच आनंदी होतो… नाही मिळाले तर किंवा मिळत नाहीत तोवर दु:खी रहातो…

    पण सुखं ही फक्त मोठ्या पॅक्समध्ये मिळत नाहीत तर छोट्याश्या सॅशे मध्येही मिळू शकतात हे आपण लक्षातच घेत नाही!!

    म्हणजे,

    मोठ्ठं घर होईल तेंव्हा होईल, पण सध्याच्या छोट्या घरात निवांत जगत सुखानं शांत झोप लागू शकणं हा किती छान सुखाचा सॅशे असतो...

    मोठ्ठी गाडी घेऊ तेंव्हा घेऊ, पण सध्याच्या छोट्या गाडीतून वाऱ्यावर स्वार होऊन गावभर बेभान भटकणं हाही एक सुखाचा सॅशे असतो…

    हेच सारं प्रसिद्धी, यश वगैरे साऱ्या साऱ्या मोठ्या पॅकेजेसचं… या सगळ्या मोठय़ा पॅकेजेसचे कोणते ना कोणते छोटे सॅशे असतात… जे आपण ओळखून अनुभवले ते मोठ्या पॅक्सहून जास्त सुखाचा अनुभव आपल्याला येऊ शकतो…

    रहाता रहाते गोष्ट ती भरपूर बॅंक बॅलन्स किंवा खिशातल्या अफाट पैशाची… पैसा हे एक असं पॅकेज आहे की ज्याच्या सॅशेमध्ये मजा नाही असं आपल्याला वाटतं… हजारच्या नोटेची किंमत शंभरच्या नोटेला नाही आणि शंभरच्या नोटेची ऊब पाच रुपयाच्या नाण्याला नाही…

    खरंच असं वाटतं तुम्हाला?

    तर मग, धो धो पाऊस कोसळत असताना, टपरीवरचा वाफाळता चहा आणि गरम्म भज्जी घेण्यासाठी हजारची नोट देऊन बघा किंवा लाखो रुपये बॅलन्स असलेलं तुमचं क्रेडिट कार्ड देऊन बघा…!!

    नाही मिळणार ते सुख तुम्हाला हजारो लाखो रुपयांनी…

    तिथे पाच रुपयांच्या कॉईन्सचे दोन-चार सॅशेच पुरेसे असतील!!

    पणती प्रासादिक दिवाळी २०१६ पणती

    मन सुद्द तुजं, गोस्ट हाये प्रिथवी मोलाची...(खरंच?)

    ऐकलंय का हे जुनं गाणं? फार भारी वाटतं ऐकताना ना!

    "मन सुद्द तुजं, गोस्ट हाये प्रिथवी मोलाची...

    तू चाल रं पुडं, तुला रं गड्या

    भीती कुनाची.. पर्वा बी कशाची?"

    सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीच्या अत्यंत निरागस काळात लिहिलेलं हे गाणं...

    आपलं मन शुद्ध असेल तर आपल्याला दुसऱ्या कोणाचीही भीती बाळगायचं कारण नाही वगैरे सांगणारं...

    पण काळ बदललाय आता यार. शुद्ध-स्वच्छ मनानं जगणाऱ्या माणसांनीच साऱ्या जगाची सतत भीती बाळगत जगण्याचा काळ आलाय...

    आमचं क्रीम लावलं की तुम्ही गोरे व्हाल पासून ते आमचं टॉनिक प्यायलं की तुम्ही बरे व्हाल पर्यंतच्या लाखो जाहिराती या साध्या-सरळ-शुद्ध मनाच्या लोकांना टार्गेट करत असतात. आणि 'सुद्ध' मनाचे सारे, हे सारं खरं मानून गोरेपणाच्या आणि बरे होण्याच्या मागे धावत सुटतात...

    'सुद्द' मनाच्या लोकांना, 'सच्चे दिन' वाले राजकारणी टोप्या घालतात आणि 'अच्छे दिन'वाले राजकारणी गंडा घालतात. अन बाकीचेही राजकारणी 'धार' मारण्यापासून घोटाळे करण्यापर्यंत काय वाट-वाट्टेल ते करत असतात. अन हे असं करणाऱ्या लोकांनाच 'सुद्द'

    Enjoying the preview?
    Page 1 of 1