Discover this podcast and so much more

Podcasts are free to enjoy without a subscription. We also offer ebooks, audiobooks, and so much more for just $11.99/month.

आज हिंदु नववर्षदिन अर्थात गुढीपाडवा” म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा..

आज हिंदु नववर्षदिन अर्थात गुढीपाडवा” म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा..

FromUtsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha


आज हिंदु नववर्षदिन अर्थात गुढीपाडवा” म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा..

FromUtsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

ratings:
Length:
20 minutes
Released:
Mar 22, 2023
Format:
Podcast episode

Description

सर्वात प्रथम हिंदु नववर्षदिनाच्या सर्व रसिक  श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा !!! गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा' या पॉडकास्ट मालिकेची सुरुवात झाली. गेल्या वर्षभरात आम्ही ह्या मालिकेअंतर्गत २६ भाग सादर केले. यातील प्रत्येक भागात  हिंदू सणांची, उत्सव, परंपरांची आणि त्याचबरोबर काही राष्ट्रीय सण तसेच महत्त्वाच्या दिनविशेषांची माहिती देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक भाग सादर करताना आम्हाला पुस्तके, ग्रंथ, काही मान्यवर व्यक्ती आणि अर्थातच एपिलॉग मीडियाचे अभिजीतसर, रोहन व सर्व तंत्रज्ञ यांची मदत झाली. त्या सर्वांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. ह्या आमच्या पॉडकास्ट मालिकेतील सर्व भागांविषयी संक्षेपात माहिती देण्याचा प्रयत्न, आम्ही ह्या शेवटच्या भागात केला आहे. आम्हाला खात्री आहे, की, ही माहिती ऐकल्यावर जर तुम्ही आजपर्यंत यापैकी कोणताही भाग मिस केला असाल, तर तो नक्कीच ऐकाल आणि सर्व सणांची माहिती नक्की एन्जॉय कराल... याच नोटवर आम्ही आपली रजा घेतो. धन्यवाद?
सहभाग -डॉक्टर सौ. स्वाती कर्वे, सरोज करमरकर,अपर्णा मोडक.See omnystudio.com/listener for privacy information.
Released:
Mar 22, 2023
Format:
Podcast episode

Titles in the series (27)

आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा.. संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे.   सृजन सख्या ची माहिती विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.