Discover this podcast and so much more

Podcasts are free to enjoy without a subscription. We also offer ebooks, audiobooks, and so much more for just $11.99/month.

होळी रे होळी, पुरणाची पोळी

होळी रे होळी, पुरणाची पोळी

FromUtsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha


होळी रे होळी, पुरणाची पोळी

FromUtsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

ratings:
Length:
12 minutes
Released:
Mar 6, 2023
Format:
Podcast episode

Description

नमस्कार श्रोतेहो, तुम्हा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !मनातील सर्व राग-रुसवे , हेवेदावे विसरून आनंदाने हिंदू नववर्षाची सुरुवात पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने करावी असे सांगणारा हा होळीचा सण .. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा.. होळी पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमा. जागोजागी  संध्याकाळी पेटवलेल्या होळ्या, नैवेद्याला खुसखुशीत पुरणपोळी ही ह्या सणाची खासियत. त्याचबरोबर होळीच्या दुसऱ्या दिवशी येणारे धुलीवंदन आणि पंचमीला येते ती  रंगपंचमी ... वसंत ऋतूत येणारा, रंगांची उधळण करणारा हा सण लहान-थोर साऱ्यांच्याच आवडीचा...या सगळ्याबद्दल जाणून घेऊया या पॉडकास्ट मधून.  भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतात कसा साजरा केला जातो याबद्दलही ऐकूया.  सादरकर्त्या ... अपर्णा, सरोज आणि वैद्या स्वाती...मग नक्की ऐका... 
संकल्पना व सहभाग -सौ.अपर्णा मोडकवैद्या स्वाती कर्वेसौ.सरोज करमरकरSee omnystudio.com/listener for privacy information.
Released:
Mar 6, 2023
Format:
Podcast episode

Titles in the series (27)

आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा.. संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे.   सृजन सख्या ची माहिती विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.