Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

Gharcha Vaidya
Gharcha Vaidya
Gharcha Vaidya
Ebook297 pages1 hour

Gharcha Vaidya

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

आपण आपल्या घरी जे फळ भाज्या आणि मसाला खातो त्याचे गुण आणि उपयोग जर आपणास माहित झाले तर ते आपल्यासाठी डॉक्टरसारखे काम करु शकतात. आपण जे काही खातो त्याला अशा पध्दतीने खा की ते आपल्यासाठी उपयोगी सिद्ध होतील. आजीबाईचा बटवा किंवा घरगुती इलाज हे सर्व या गोष्टीपासुनच होतो आणि हाच घरचा वैद्य ठरतो. आंबा, संत्री, लिंबू, पपई आणि टरबूज ह्या अशा उपयोगी फळ-भाज्या आहेत ज्यांचा योग्य उपयोग आरोग्यवर्धक होऊ शकतो.
सदर पुस्तकात घरात वापर होत असलेल्या फळ-भाज्या, मसाले इत्यादीच्या संदर्भात उपयोगी माहिती देण्यात आली आहे ज्यांचा उपयोग करुन वाचक आपल्या खाण्याच्या पदार्थांना अधिक स्वादिष्ट, चविष्ट तसेच आपल्या आरोग्याचे रक्षणही करु शकतो.
Languageमराठी
PublisherDiamond Books
Release dateOct 27, 2020
ISBN9789352782345
Gharcha Vaidya

Related to Gharcha Vaidya

Related ebooks

Reviews for Gharcha Vaidya

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    Gharcha Vaidya - Dr. Rajeev Sharma

    सोयाबीन

    आंबा

    आंबा सहज उपलब्ध आणि सहज पचन होण्यासारखा आहे. हा इतका चविष्ट, सुगंधीत आणि पौष्टीकतत्त्वयुक्त आहे की त्यामुळेच त्याला ‘फळांचा राजा’ असे संबोधन मिळाले आहे.

    ओळख

    आकारामानानुसार आंब्याचे दोन प्रकार आहेत

    कोय जमिनीत गाडून जो आंबा लावला जातो त्याला देशी आंबा म्हणतात. हा रसाळ असुन त्यातला रस तोंडाने चोखुन खाता येतो. किंवा रस काढून ‘आमरस’ म्हणूनही सेवन केल्या जातो.

    जो आंबा कलम करुन लावल्या जातो त्याला ‘कलमी आंबा’ असं संबोधण्यात येतं.

    हा फरक वगळता आकार, रंग, चव आणि गुण इत्यादी फरकावरुन आंब्याचे इतरही अनेक प्रकार आहेत. जसे की - हापुस, पांढरा, लंगडा, पायरी, नीलम, पोपटी, राजभोग, मोहनभोग, फजली, दशहरी इत्यादी. देशी आंब्यातील कोय केसाळ असल्याने तो रसाळ असतो. पण कलमी आंबा तसा नसतो त्याला कापुन खावे लागते. पचन होण्यासाठी रसाळ आंबा चांगला असतो आणि चोखून खाल्याने लवकर पचतो.

    गुण

    पिकलेला आंबा-गोड, वीयवर्धक, स्निग्ध, शक्तीवर्धक तसेच सुखदायक, वजनदार आणि वातनाशक, हृदयाला पुष्टी देणारा, वर्ण रंग/उजळ करणारा, शीतल आणि पित्तवर्धक, तुरट रसाचा तसेच अग्नि, कफ तसेच वीर्यवर्धक असतो.

    आंब्याचे गुण, स्थितीनुसार वेगवेगळे असतात. झाडावरील आंबा वात शमन करणारा, गोड तसेच पित्त व किचिंतसा पित्त नाशक असतो. गवताखाली पिकवलेला आंबा पित्तनाशक, अम्लरसरहित आणि खास करुन गोड असतो पंरतु अढीमधून पिकवलेला आंबा खराब झाल्यास त्याची चव बिघडते आणि त्याचा वासही येतो, अशा आंब्याचे सेवन नाही केले पाहिजे.

    कच्च्या आंब्याला कैरी असं म्हणतात. कैरीची चव तुरट, वात पित्त उत्पन्नदायक आंबट, बेचव, तिन्ही दोषांना उत्पन्न करणारा तसेच रक्तविकार उत्पन्न करणारा ठरतो. कैरीचे साल्टे काढून मगजाचे तुकडे उन्हात वाळत घातले जातात ज्याला आमचूर म्हणतात. त्याला दाळ, भाजीमध्ये टाकलं जातं. हे आंबट, तुरट दस्तावर , धातुंना दुषित करणारा तसेच वात व कफ नाशक ठरतो. आमचूर चे सेवन प्रमाणातच केले जाते.

    आंबा हे एक असे झाड आहे ज्याचे केवळ फळच नाही तर त्याचा प्रत्येक भाग औषध म्हणून उपयोगात आपल्या जावू शकतो. इतर भागाचा उपयोग असा होऊ शकतो.

    आंब्याचा मोहर - शीतल, चवदार, ग्राही, वात आणि अतिसार. कफ, पित्त, प्रमेह आणि रक्तप्रदर आदींचा नाशक आहे.

    आंब्याच्या मुळ्या - तुरट, मलरोधक, शीतल, चवदार तसेच कफ आणि वात नाशक आहे.

    आंब्याची पाने - कोवळी पाने, तुरट, मलरोधक आणि त्रिदोषनाशक आहेत.

    आंब्याची कोय - गोड, आंबट आणि थोडी तुरट असते. वमन अतिसार आणि हृदयस्थ पीडा दूर करते.

    आंब्याची साल - संकोचक, रक्तस्त्राव बंद करणारी, मुळव्याध, वमन आणि अतिसार कमी करते.

    उपयोग

    सेवनाव्यतिरिक्त तपासणी करण्यासाठी देखील याचा उपयोग केल्या जातो

    आंब्याचा रस तसेच दुध

    आंब्याचा महत्त्वाचा आणि अंत्यत गुणकारी उपयोग म्हणजे आंब्याचा रस आणि दुध एकत्र करुन पिणे, पिकलेल्या आंब्याच्या रसात व्हिटामिन ‘ए’ आणि व्हिटामिन ‘सी’ मोठ्या प्रमाणात आढळते. डोळ्यांसाठी तसेच शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘व्हिटामिन-ए’ आणि चर्मरोग तसेच रक्तदोष कमी करण्याव्यतिरिक्त, केस, दातं व रक्तासाठी ‘व्हिटामिन-सी’ गरजेचं असतं. आंब्याच्या रसात पुरेशा प्रमाणात दुध मिसळून पिल्यास त्याच्या उपयोगी गुणात वाढ होते आणि हे वीर्य तसेच रक्तवर्धक टॉनिकसमान काम करतं. दुर्बल, दुबळं-सडपातळ देह्यष्टीच्या तरुणी-तरुणांना तसेच स्त्री-पुरुषासाठी अल्परक्त, क्षय. रक्तदोष, धातु-दुर्बलता आणि वीर्यपतन आदी समस्येसाठी आंब्याचा धातु-दुर्बलता आणि वीर्यपतन आदी समस्येसाठी आंब्याचा रस व दूधाचे सेवन अंत्यत गुणाकारी ठरतं. या मिश्रणात मृदु विरेचन गुण आढळतो. तात्पर्य मलाविरोधाच्या पेशंटसाठी अंत्यत गुणाकारी सिध्द होतो. आम्लपित्त (हायपरअ‍ॅसिडिटी), आतड्याची कमजोरी, कोठा, अरुचि, यकृत-वृद्धी, शुक्रजतुंची उणीव आदी व्याधींना दूर करण्यासाठी आंब्याचा रस आणि दुधाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

    अन्न त्याग करुन ४० दिवसापर्यत केवळ आंब्याचा रस आणि दुधाचे सेवन केले तर अंत्यत फायदेशीर ठरतं. याच्या दोन पद्धती आहेत. एक तर आंब्याचा रस आंब्यातून चोखुन पोटभर खा आणि त्यानंतर गरम केलेलं थंड दुध प्या किंवा आंब्याच्या आणि दुधाच्या सारख्या मिश्रणात एक दोन चमचे तुप मिसळुन ते सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा प्यायला हवे. प्रथम दुध पिल्यावर नंतर आंब्याचा रस पिल्या जाऊ शकतो. एक किंवा दोन महिन्यापर्यंत असा प्रयोग केल्यास शरीरात नवीन उत्साह, नवीन शक्ती. संचारल्यासारखे वाटेल तसेच चेहर्‍यावर एक प्रकारचे तेज येते. गर्भवती स्त्रीयांनी आंब्याचा रस आणि दुधाचे सेवन करायला हवे. लैंगीक कमजोरी असणार्‍यांनी हा प्रयोग आवश्यक करावा.

    अंब्यांच्या पानांना पाण्यात टाकून उकळा. पाणी एक चर्तुतांश शिल्लक राहील त्यावेळी उकळणे बंद करुन थंड होऊ द्या. १-२ चमचे मध घालून गुळण्या करा व असे मिश्रण पिल्यास गळा ठीक होतो.

    स्त्रीयांचा रक्तस्त्राव आणि मुळव्याधाच्या रोग्यांच्या रक्तस्त्राव कमी करण्यासाठी त्यांना आंब्याच्या कोईतील बारीक गर २-३ ग्रॅम इतक्या प्रमाणात पाण्यासोबत सकाळी-संध्याकाळी घ्यावा. आंब्याची कोवळी पाने रगडून, चोळून त्यात थोडी साखर टाकून पिल्यास फायदा होतो.

    कैरीला गरम राखेत भाजून, त्याचा रस काढून खडीसाखर टाकून पिल्यास उष्माघात उतरतो.

    आमचुरला पाण्यात मिसळून त्वचेवर लेप लावल्यास किड्याचे विष उतरण्यास मदत होते. आंब्याच्या कोईतील गर पाण्यात मिसळून भाजलेल्या अंगावर लेप लावल्यास तात्काळ थंड वाटते. वर सांगितल्यानुसार संबंधीत आजाराच्या संदर्भातला प्रयोग तो विशिष्ट आजार बरा होत नाही तोपर्यंत करीत राहिले पाहिजे.

    आंब्याचे अति सेवन हानिकारक ठरु शकते. यामुळे अपचन, रक्तविकार, विषमज्वर, मलावरोध आदी रोग उत्पन्न होतात. आंब्याला योग्य प्रमाणात तसेच दुधासोबत सेवन करायला हवं. आंबट आंबा सेवन केला नाही पाहिजे. आंबा खावून अपचन होण्याची स्थिती आली तर अर्धा चमचा सुंठीचा चुर्ण, गार पाण्यासोबत सेवन करा किंवा एका ग्लास दुधात टाकून थोडा वेळ उकळून प्या. अशा सेवनाने आंबा खाऊन झालेलं अपचन ठीक होतं.

    वेगवेगळ्या भाषेतली नावे

    संस्कृत - आम्र. हिंदी - आम. मराठी - आंबा. गुजराती - आम्बो. बंगला - आम. तेलगु - माविडी. कन्नड - माविनफल. मल्याळम - मावु. फारसी - आम्बा. इंग्रजी – Mango Tree. लॅटिन – Megnifera Indica.

    काही इतर उपयोग

    आंब्यात पौष्टिक तत्त्व आहेत. व्हिटामिन ‘ए’ आणि ‘सी’ आंब्यामध्ये आढळतं. कजरी ही आंब्याची एक जात आहे. या जातीमध्ये सफरचंद आणि संत्रीपेक्षा ३० टक्के व्हिटामिन ‘ए’ आणि ‘जी’ सापडतात. हे जीवन तत्त्व आंब्याच्या रसामध्येच नाही तर आंब्याच्या कातडीत किंवा आंब्याच्या प्रत्येक भागात सापडतात. आरोग्य तसेच सौंदर्याच्या दृष्टीने आंब्याचा उपयोग अंत्यत आवश्यक आहे.

    पाण्यात आटवलेल्या कैरीला पाण्यात मिसळून त्याचा रस गाळून घ्या. त्यात साखर, भाजलेले जिरे, काळी मिर्ची, बारीक केलेला पुदीना या सर्वांना एकत्र करुन आरोग्यवर्धक तसेच स्वादिष्ट शरबत करण्यात येतो. असे केल्याने उष्माघात तसेच ऊन लागलेलं कमी होतं. वाळलेल्या कैरीचा रस शरीरावर चोळल्यावर लागलेलं ऊन उतरतं.

    कैरीला कापून बारीक तुकडे करुन ते वाळवले जातात. वाळलेल्या तुकड्यांना आमचुर म्हणतात. त्यांना पाण्यात मिसळून लावल्यास विषारी प्राण्यांचे विष उतरतं.

    आंब्याचे शरबत कैरीपासूनच बनवले जाते. असे शरबत हृदयासाठी शक्ती तसेच वीर्यवर्धक ठरतं. हे पटकीच्या रोग्यासाठी अति उपयुक्त होते. पटकीच्या रोग्याला दोन-दोन तासाला २५ ग्रॅम शरबतात १२५ ग्रॅम पाणी मिसळून थोडे-थोडे पाजा. यामुळे आजाराच्या प्राथमिक स्थितीत तात्काळ सुधारणा होते.

    मुंरब्बा कैरीपासुनच तयार केला जातो. हे पौष्टिक, धातू विकृती नाशक तसेच क्षुधावर्धक ठरते. याच्या सेवनानंतर पाणी वर्ज्य आहे. हे एक महारसायन आहे. हे व्याधिनाशक, शक्ती, वीर्यवर्धक, नवतारुण्य तसेच नवीन स्फुर्तीदायक आहे. हे मेंदु आणि मनाला एक दिव्य शक्ती प्रदान करते. कंठ-वाणीत कणखरपणा येतो.

    कैरीपासून तिन प्रकारची चटणी केल्या जाते. ती खायला चविष्ट, भुक, अग्नि तसेच बुद्धिवर्धक असते. परंतु पित्ताचा त्रास असणार्‍यांनी कैरी खाणे टाळावे.

    आंब्याचा उपयोग आरोग्यासाठी रामबाण औषध आहे. हे कोष्ठबद्धतेला दूर करुन शौच समस्या दुर करते. यामध्ये मैदा साफ होतो. निद्रारोग असेल तर दूर होतो.

    आंब्याला जर मधासोबत सेवन केले तर क्षय तसेच जीव्हापासून सुटका होते.

    आंब्याला तुपासोबत सेवन केल्यास शक्तीवर्धक ठरतं.

    आंब्याचे गोड लोणचे रक्त पित्ताला दुर करण्यास मदत करतो.

    आंब्याचा रस तसेच सुगंधीत द्रव्य मिसळून बनवला जातो. असे करायला कष्ट पडतं. हे वीर्य, शक्ती, बुद्धी तसेच आयुवर्धक ठरतं. क्षय, संग्रहणी, दमा आदी व्याधीसाठी अंत्यत गुणाकारी ठरतं.

    आमरस पिकलेल्या आंब्यापासून तयार केला जातो. नवजीवन प्राप्तीसाठी अतिउत्तम आहे. ५० ग्रॅम ते १०० ग्रॅम इतक्या प्रमाणात, दोन वेळेच्या जेवनापूर्वी याचे सेवन करायला हवे.

    आंब्याचा प्रत्येक भाग हा औषधीगुणयुक्त आहे, निर्दोष आहे. आंब्याची मूळं मलावरोध, वात-कफनाशक असते. मुळ्याचे तुकडे हातावर बांधल्यास पित्त ज्वर कमी होतो. आंब्याच्या वृक्षाची फांदी दातवण करण्यासाठी उपयोगी पडते. यामुळे मुख दुर्गंधी कमी होते. आंब्याचे खोड रक्तस्त्रावासाठी उपयोगी ठरतं. आंब्याचा मोहर मलावरोधक, अग्निदीपक, पित्त, कफनाशक समजला जातो. याचा कूट किंवा चुर्ण अतिसारासाठी उपयोगी ठरतो. मच्छर झाल्यास आंब्याचा पाला जाळला जातो. आंब्याची कोवळी पाने पाण्यात मिसळुन त्यात थोडी साखर मिक्स करुन पिल्यास मुळाव्याध्यीचा रक्तस्त्राव कमी होतो. २५ ग्रॅम कोवळ्या पानांचा रस काढून त्यात २५ ग्रॅम खडीसाखर मिसळून सेवन केल्यास रक्तप्रदर समस्येसाठी तात्काळ फायदा होतो. आंब्याची पाने मलावरोधक, त्रिदोषनाशक, रक्तातिरासाठी उपयोगी पडतात. पानांच्या रसाला गरम करुन कानात टाकल्यास कर्णदोष दूर होतो. आंब्याची पाने तोंडल्यावर जो द्रव निघतो त्याला काढून पापण्यावर लावल्यास नेत्रदोष दूर होतो.

    आंब्याचा चीक स्तंभक तसेच रक्त वाढविणारा आहे. हा गोंद गरम करुन फोंडावर लावल्यास फोडे पिकतात आणि पु बाहेर पडतो आणि जखम

    Enjoying the preview?
    Page 1 of 1