Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

Manatla kahi- By Nitin Salunkhe
Manatla kahi- By Nitin Salunkhe
Manatla kahi- By Nitin Salunkhe
Ebook428 pages2 hours

Manatla kahi- By Nitin Salunkhe

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

‘मनातलं काही’ हे माझं पहिलंच ई-बुक..! माझ्या मनात, त्या त्या वेळी एखादा प्रसंग अनुभवताना जे जे उलट-सुलट विचार आले, ते सांगणाऱ्या लेखांचं हे पुस्तक.
गेल्या चार पांच वर्षातलं मी वेळोवेळी केलेलं लिखाणापैकी काही निवडक लेखन आता डिजिटल साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य ‘ब्रोनॅटो’ तर्फे प्रसिद्ध होतं आहे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाचीही गोष्ट आहे. आनंदाची यासाठी की, ई-बुकच्या माध्यमातून आता माझं लेखन...

Languageमराठी
PublishershaileshSLK
Release dateOct 10, 2019
ISBN9780463427729
Manatla kahi- By Nitin Salunkhe

Related to Manatla kahi- By Nitin Salunkhe

Related ebooks

Reviews for Manatla kahi- By Nitin Salunkhe

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    Manatla kahi- By Nitin Salunkhe - shaileshSLK

    माझ्या पहिल्याच ‘ई-बुक’ प्रकारच्या निमित्ताने

    ‘मनातलं काही’ हे माझं पहिलंच ई-बुक..! माझ्या मनात, त्या त्या वेळी एखादा प्रसंग अनुभवताना जे जे उलट-सुलट विचार आले, ते सांगणाऱ्या लेखांचं हे पुस्तक.

    गेल्या चार पांच वर्षातलं मी वेळोवेळी केलेलं लिखाणापैकी काही निवडक लेखन आता डिजिटल साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य ‘ब्रोनॅटो’ तर्फे प्रसिद्ध होतं आहे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाचीही गोष्ट आहे. आनंदाची यासाठी की, ई-बुकच्या माध्यमातून आता माझं लेखन अधिक जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि अभिमान एवढ्यासाठी की, ‘ब्रोनॅटो’सारख्या प्रतिष्ठीत संस्थेला माझं ई-पुस्तक प्रकाशित करावसं वाटलं म्हणून..!

    आज पुस्तकं विकत घेऊन किंवा वाचनालयातून आणून वाचण्याचं प्रमाण कमी झालंय. याला अनेक कारणं आहेत व त्यापैकी एक म्हणजे तंत्रज्ञानाचा अविष्कार. आज आपल्या हातातला स्मार्ट फोन बसल्याजागी आपल्यासमोर जगातली हवी ती चीज काही सेकंदात हजर करत आहे. यात, अर्थातच, पुस्तकंही आलीच.

    आजच्या तरुणाईचं आयुष्य पूर्वीच्या मानाने खुपच जास्त व्यस्त झालंय. नोकरी-व्यवसायामुळे त्यांची भटकंतीही वाढलीय. जगही स्पर्धेच आहे आणि या स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी आजच्या तरुण पिढीला सतत कार्यरत राहावं लागतं. यातून तिला स्वत:साठी खुप कमी वेळ उरतो, पण जो काही वेळ या पिढीला मिळतो, त्यातला बराचसा वेळ ही पिढी स्मार्टफोनवर आलेलं किंवा किंडल सारख्या मुद्दाम विकत घेतलेल्या उपकरणावर डाऊनलोड करुन घेदलेलं बरं-वाईट साहित्य वाचनात घालवत असते. म्हणजे 'वाचन कमी झालेलं नाही, तर वाचनाचं माध्यम फक्त बदललंय'. वाचनाची भुक अजुनही आहे याचं हे लक्षण आहे. सोशल मिडीया, मोबाईल वरील विविध ऍप  किंवा किंडलसारखी साधनं किंवा ई बुक ही साधनं पुस्तकांपेक्षा तुलनेने स्वस्त तर आहेतच, परंतु एकावेळी अनेक प्रकारची पुस्तक स्टोअर करण्याची सुविधा देणारीही आहेत. पुस्तक एका वेळी एकच वाचता येतं किंवा प्रवासात नेता येतं. तसं याचं नाही. या ईलेक्ट्राॅनिक माध्यमात असलेली अक्षरक्ष: शेकडो पुस्तकं, या उपकरणांच्या माध्यमातून खिशातून कुठेही घेऊन जाता येतात व आपल्या त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे वाचता येतात. हा या माध्यमाचा फायदा.

    अशा या वाचनवेड्या मुलांना चांगल्या व सकस वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने शैलेश खडतरे या तरुण तंत्रज्ञाने ‘ब्रोनॅटो’ ही ई-बुक प्रकाशन संस्था युरू केली आहे. आणि असा काही उद्देश घेऊन कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे आपलं पुस्तक प्रसिद्ध होतंय, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

    कोणत्याही गोष्टीच्या पहिलेपणा’चं कौतुक कुणालाही असतंच. ‘मनातलं काही’ हे माझं पहिलं ‘ई-बुक’..! मलाही याचं कौतुक आहेच. त्यात माझ्या पहिल्याच ई बुकाचं बाळंतपण जर शैलेश खडतरेंसारख्या निष्णात आणि सर्जनशील ‘सर्जन’च्या हातून होतंय, ह्यातं कौतुक मला अंमळ जास्तच वाटतंय..

    आपणही या माझ्या बाळाचं कौतुक कराल अशी अपेक्षा आहे.

    -नितीन साळुंखे

    मी का लिहितो..?

    ‘तुम्ही का लिहिता?’ हा प्रश्न मला अनेकजण विचारत असतात. मलाही हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. इतरांना पटो वा न पटो, पण याचं साधं सोपं उत्तर आहे. ते म्हणजे, मला लिहायला आवडतं, हे. परंतू हे एवढंच नाही. तर माझ्याकडे सांगण्यासारखं जे आहे किंवा मला जे प्रश्न पडतात, ते मला कागदावर (आता स्क्रिनवर) मांडायला (आता टायपायला) आवडतं, असा त्याचा पुढचा भाग आहे.

    तसं सांगण्यासारखं तर प्रत्येकाकडे काही न काही असतं आणि ते सारखंच इंटरेस्टींग असतं. प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा पट कोणत्याही चित्तथरारक कादंबरी किंवा चित्रपटापेक्षा तसूभरही कमी नसतो असं मला वाटतं. माझ्या आयुष्यात आलेले अनुभव, मी भोगलेलं किंवा उपभोगलेलं जगणं, मला माणूस म्हणून जगताना, नागरिक म्हणून वावरताना, ग्राहक म्हणून किंवा नातेसंबंधातल्या विविध भुमिका बजावताना आलेले तेवढेच विविध अनुभव मला कुणाशी तरी शेअर करावेसे वाटतात, म्हणून मी लिहितो. मी लिहू शकतो, कोणताही आडपडदा न ठेवता आणि कुणाचाही मुलाहीजा न राखता. मी लिहू शकतो, बाकीचे लिहू शकत नाहीत म्हणून, हाच काय तो फरक. गंमत म्हणजे मी जे लिहितो, ते माझं वाचणाऱ्यांशी बऱ्याच टक्क्यांनी रिलेट होत असतं, असा मला गेल्या चार-पाच वर्षांचा अनुभव आहे. याचा अर्थ एकच, व्यक्ती लहान असो की मोठी, गरीब असो की श्रीमंत, आयुष्य जगताना आणि जगण्यातल्या विविध भुमिका बजावताना येणारे अनुभव सर्वांचे सारखे, युनिव्हर्सल असतात, फरक असलाच तर फक्त तपशिलातला. उदा. कोणत्याही स्तरातल्या अथवा जगातील कोणत्याही कोपऱ्यातल्या गांवात राहाणाऱ्या नवरा-बायकोंचा एकमेंकांबद्दलचा अनुभव सारखाच असतो; किंवा आपल्या देशात सरकारी अधिकाऱ्यांचा, एक नागरिक म्हणून आपल्या कुणालाही येणारा अनुभव सारखाच असतो. हे सारं मला कुणाला तरी सांगावसं वाटतं म्हणून मी लिहितो.

    वर म्हटल्याप्रमाणे, सांगण्यासारखं तर प्रत्येकाकडे काही न काही असतं आणि ते सारखंच इंटरेस्टींग असतं. माझ्यासोबत एक राजु नावाचा मुलगा काम करायचा. दारू आणि जुगार एवढंच त्याचं आयुष्य. परंतू हे दुर्गुण म्हणावेत, तर तो टोकाचा प्रामाणिक. यालाही सारखं काहीतरी सांगायचं असायचं. परंतू एका बेवड्याचं काय ऐकायचं, म्हणून ड्रिंक्स घेणारी प्रमाणिक माणसं त्याला टाळायची. बरं, त्याचं सांगणं म्हणजे अगदी लहान-सहान गोष्टी असायच्या. जसं आज मी लावलेला आकडा लागला आणि मला पैसे मिळाले, त्या पैशांने म्हातारीला(पक्षी-आईला) एक मोबाईल दिला किंवा आज अमुकतमूक माणसाने मला पैसे दिले आणि त्या पैशांच्या मी माझ्या चाळीतल्या मुलांना वह्या कशा वाटल्या वगैरे वैगेरे. त्याचा आनंद त्या सांगण्यातंच असायचा, पण ऐकायला कुणी नसायचं. माझंही बऱ्याचदा असंच व्हायचं किंवा होतं. मलाही कुणालातरी काहीतरी सांगायचं असायचं, पण ऐकायला कुणाकडे वेळच नसायचा. अशा वेळी राजू दारू पिऊन रस्त्यावर बडबडायचा, तर मी लिहायचो. राजूला त्याच्या मनातलं बोलण्यासाठी दारुची धुंदी लागायची, तर माझी लिहण्यातच तंद्री लागायची, म्हणून मी लिहायला लागलो.

    इतरांचं माहित नाही, परंतु सोशल मिडियावरचं माझं लिहिणं म्हणजे माझा मी माझ्याशीच केलेला संवाद असतो. मला सतावणारे परंतु इतरांना बावळट वाटणारे प्रश्न, मला वाटत असलेली भिती, खंत, मला आलेले अनुभव माझ्यासमोरच मांडण्यासाठी मी लिहितो. मला सापडलेली उत्तरं तपासून पाहाण्यासाठीही मी लिहितो. हा आत्मसंवाद असतो. तुकोबांनी सांगीतलंय ना, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाचि वाद आपणासि.. अगदी तसंच..! 'मनासी संवाद..' असला म्हणजे, वेगळं कौन्सिलिंग लागत नाही, वायफळ आणि वाळूत मुतल्यासारख्या चर्चा नकोत, वाद नकोत की काही नको. माझं लिहिणं म्हणजे माझ्या मनाचं रिसायकलिंग किंवा ओव्हरहॉलिंग असतं. असं केलं की मग स्वत:चीच स्वत:शी, स्वत:च्या मनाशी घट्ट मैत्री होत जाते आणि मग एकटेपणा अजिबात जाणवत नाही. वेगळे योग-प्राणायाम करायला लागत नाहीत. कुणीतरी म्हटलंय ना, की आपणच आपले फ्रेन्ड, फिलॉसॉफर, गाईड असतो म्हणून. ते जे कुणीतरी म्हणलंय, ते नेमकं अशावेळी अनुभवायला येतं. स्मार्ट फोनच्या जमान्यात आपण इकडे बसून जगातल्या कुठल्याही व्यक्तीशी क्षणात संवाद साधू शकतो आणि आपण तसं करतही असतो. अनेकजण जवळच्या माणसांना कारणपरत्वे भेटत असतात. आपल्याकडे वेळ नाहीये, तो स्वत:लाच भेटायला. लिहण्यातून मला माझ्यातल्या मला भेटता येतं. मला वाटतं, लिहिणंच कशाला, कोणत्याही माध्यमातून व्यक्त होणाऱ्या कुणाही प्रत्येकाची हिच भावना असावी, मी लिहून तसं करतो एवढंच..!

    गेली चार वर्ष मी सातत्याने लिहितोय. माझं लिखाण फेसबुक-व्हाट्सअॅपवर पोस्ट करतोय. माझ्या पोस्ट्सना उत्तम प्रतिसाद मिळतो. अक्च्युली, तो प्रतिसाद मला नसतो, तर मी माझ्याशी केलेल्या संवादाला असतो, कारण माझ्या मनाशी मी केलेला संवाद हा प्रत्येकजणांनी त्यांच्या त्यांच्या मनाशी केलेल्या संवादाचेच शब्दरुप असतं. प्रतिसाद मिळतो, तो त्या सारखेपणाला, मला नाही. अनेकांना असं वाटतं की मी लोकप्रिय होण्यासाठी लिहितो. लोकप्रियता ही शाश्वत नाही, विचार शाश्वत असतात. मी विचार मांडण्यासाठी लिहितो, ते चुकीचे की बरोबर हे वाचणाऱ्यांनी ठरवायचं परंतु ते मला पटलेले विचार असतात. मला पटलेलं मांडण्यासाठी मी लिहितो, लोकप्रियतेसाठी बिलकूल नाही. लोकप्रियता मिळत असेल, तर ते बायप्रॉटक्ट आहे असं मी समजतो. बायप्रॉटक्टच्या नादात मी ‘मनसंवाद’ या मुख्य प्रॉडक्टकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून पुन्हा लिहायला बसतो..!!

    मी माझ्याच विचारांना शिस्त लावण्यासाठी लिहितो, ती शिस्त मग अंगात भिनत जाते आणि प्रगट स्वरुपही घेते. देहबोलीचा तो पाया आहे. आत्मसंवादाचा फायदा हा की आपल्याच जगण्याने आपल्यालाच घातलेली कोडी आणि समोर उभे केलेले प्रश्न आपल्यालाच सोडवता येतात. त्यासाठी हैराण, परेशान होऊन कुणाच्या तोंडाकडे पहावं लागत नाही, म्हणूनही मी लिहितो..! माझ्यासमोर परिस्थितीनुरूप, मग ती मानसिक असो वा सामाजिक, वेळोवेळी उभे राहिलेले प्रश्न आणि मी त्यावर त्या त्या वेळी उत्तर शोधायचा केलेल्या प्रयत्नाचे हे लेखन आहे. काही लेख त्या त्या वेळी समाजात उद्भवलेल्या परीस्थितीच्या संदर्भात वाचल्यास, ते अधिक चांगल्या प्रकारे समजतील.

    पेपरलेस कारभार; एक भ्रम..

    गेली काही वर्ष आपण पेपरलेसच्या गोष्टी ऐकतोय व त्याच्या गप्पाही मारतोय. संगणकीकरण, डिजीटलायझेशन वैगेरेमुळे पेपर्स वापरण्याचं प्रमाण कमी होईल असं खरंच वाटत होतं. मलाही बरं वाटलं होतं. पर्यावरण, झाडं वगैरे वाचतील हा विचार नंतरचा, पण ती कायतरी टायपलेल्या कागदांचं ओझं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं वाचेल, म्हणून मला जास्त आनंद होत होता. पण परवाच एका वकिल मित्राकडे बसलो असता, तो संवाद कानावर पडला आणि मी भानावर आलो. मित्राकडे आलेला क्लायंट मित्राला, त्याच्या कागदपत्रांच्या किती प्रति काढू, असं विचारत होता आणि वकील साहेबांनी शांतपणे १५ प्रति काढा असं अगदी सहजतेने सांगीतलं. किमान दिडेकशे कागदांच्या प्रत्येकी पंधरा प्रती काढा म्हणणं मला विचार करायला भाग पाडू लागलं..

    कम्प्युटर, डिजीटायझेशनमुळे कागदी घोडे नाचवणं थांबेल असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात होतंय उलटंच. कम्प्युटर, प्रिंटर अगदी हाताशी आल्यापासून कागदाचा वापर आणि बेपर्वाई खुप प्रमाणात वाढली आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. काही काळापूर्वी हाताने लिहिताना खूप काळजी घेतली जायची. काही चुकल्यास पुन्हा सगळ लिहावं किंवा टाईप करायला लागायचं व ती मेहेनत टाळण्यासाठी पहिल्यापासूनच लक्ष देऊन काळजीपूर्वक लिहीलं जायचं. परंतू आता मात्र कम्प्युटर टायपिंग झाल्यापासून टायपिंग सुबक व छान होतं मात्र त्यातील टायपोग्राफिक चुका सुरुवातीला तेवढ्याशा काळजीपूर्वक स्क्रीनवरच तपासल्या जात नाहीत. टाईप करून पहिला एक ड्राफ्टचा प्रिन्ट आऊट काढला जातो व मग तो तपासला जातो. त्यातील चुका स्क्रीनवर दुरुस्त करून, पुन्हा प्रिन्ट आऊट काढला जातो व त्यात बारीकशी जरी चुक आढळली तरी ती नंतर दुरुस्त करून पुन्हा फायनल प्रिन्टआऊट काढला जातो. त्यात लेटरहेडचे माप, मार्जिन वगैरे गोष्टी तपासताना, फायनल ड्राफ्टच्या पुन: दोन-चार एकदम फायनल ड्राफ्ट काढून मग पत्र फायनल केलं जातं. मग एकदाचं फायनल झालेलं पत्र प्रिन्टींगला सोडलं जातं आणि मग लक्षात येतं, की अऽऽर्रेरे, ते नेमकं लेटरहेडच्या मागच्या बाजूला छापलं गेलंय आणि मग आणखी एक ८० जीएसएमचा देखणा आणि महागडा कागद शहीद होऊन दुसरं लेटरहेड प्रिन्टरच्या मुखात सोडलं जातं. एक पानाचं एक पत्र टाईप करायचं असल्यास असे किमान सात-आठ कागद कचऱ्याच्या डब्यात टाकले जातात. अशी दहाएक पत्र तरी रोज एका ऑफिसात टाईप केली जात असतील, तर शंभर-एक तरी कागद विनाकारण वाया जात असतील. कम्प्युटर-प्रिंटरचा हा फायदा की तोटा हे कळत नाही पण, सोपं झालं की किंमत नाहीशी होते हे मात्र खरं..

    आपण भले डिजीटायझेशनच्या गप्पा मारत असू, पण आपला 'लेखी' गोष्टींवर जास्त विश्वास असतो. त्या बाबतीत मात्र आपण कंप्युटरपूर्व युगातच आहोत. हातात कागद असल्याशिवाय आपला त्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. बरं नुसता ओरिजिनल कागद चालत नाही, तर तो हरवला तर काय, म्हणून त्याच्या चार-पाच झेरॉक्स प्रती काढून ठेवायच्या आणि एवढं करूनही आयत्यावेळी एकही प्रत सापडत नाही म्हणून पुन्हा मूळ कागदाच्या आणखी प्रति काढायच्या. झेरोक्स अतिस्वस्त झाल्याचा हा परिणाम. सगळ्याच गोष्टी गरजेपेक्षा जास्त झाल्याचा हा परिणाम. इथंही कागदाचं वेस्टेजच.!

    कोर्टाएवढा कागदाचा अपव्यय इतर ठिकाणी बहुतेक होत नसावा. अर्थात याला शासन अपवाद, कारण ते चालतंच कागदी घोड्यांवर. कोर्टात कागदपत्रांच्या ज्या अमाप प्रती काढल्या जातात, त्या अशीलाचे आणि वादीचे वकील सोडले तर इतर पक्षकारांपैकी कुणी वाचत असेल का? याची शंकाच आहे. तरीही नियम म्हणजे नियम, कागदं दिलीच पाहीजेत, मग ती फुकट गेली तरी चालतील. जे कागदावर असतं, ते आपण कम्प्युटरच्या किंवा स्मार्टफोनच्या स्क्रीनवरही सहज पाठवू शकतो, पाहू शकतो आणि गरज लागल्यासच प्रिन्ट आऊटही घेऊ शकतो. तरीही आपल्याला प्रिन्टेड कागदंच का द्यावी लागतात? हे समजण्याच्या पलिकडचं आहे. कित्येक वकीलांच्या ऑफिसमधून असे उघडूनही न पाहीलेले गठ्ठे महिना अखेरीस रद्दीच्या दुकानात विकायला आलेले दिसतील. माणसं दिलेला शब्द पाळायला शिकली तरी देशातली सर्व कोर्ट्स दुसऱ्या दिवशीपासून बंद पडतील. मग पेपर तर सोडा, लाईट-पाणी आणि ज्युडिशिअरीवर होणारा खर्चही वाचेल. अर्थात हा माझा वेडा आशावाद आहे, तसं होणार नाही..!

    असंच शासनात चालतं. बाजुच्या टेबलावर बसलेल्या बाबुकडेही लेखी कागद पाठवले जातात. कारण पुरावा म्हणून. त्यात काय लिहीलं आहे हे महत्वाचं नसतं, तर मी तुला 'लेखी' कळवलं हे कळणं महत्वाचं असतं. विधानसभेचं अधिवेशन चालू असताना तर शासनाच्या अनेऽऽक महामंडळांचे अहवाल, अधिवेशनात विचारले जाणारे तारांकीत-अतारांकीत प्रश्न, शासकीय-अशासकीय ठराव व इतर अनेक कागदांच्या प्रती प्रत्येक आमदाराला देणं कायद्याने बंधनकारक असतं. काही ठराविक आमदार सोडले, तर बाकीचे हा कचरा उघडूनही बघत नाहीत हा माझा अनुभव आहे. अनेकांना तर त्या महामंडळांची नावंही माहीत नसतात, तरी अशा एखाद्याला एखादी प्रत मिळाली नाही, तर तो आमदार सभागृहात बोंबाबोंब करतो. कुणी जर ते उघडूनच बघणार नसेल, तर द्यायचंच कशाला मुळात.? सर्वांच्या मोबाईलवर किंवा इ-मेलवर त्या प्रती पाठवायच्या, ज्याला जे महत्वाचं वाटेल त्याची प्रत तो काढून घेईल असं नाही का करता येणार? पण नाही, आम्हाला लेखीच मिळालं पाहीजे असा हट्ट असतो. इगोसाठी, दुसरं काय..!!

    इ-मेलचंही तसंच. प्रमाण कमी असलं तरी इ-मेलचेही दोन-दोन प्रिन्टआऊट काढून फाईल करून ठेवणारे महाभाग आहेत आपल्याकडे. खरं तर इ-मेल मधला पत्रव्यवहार जोवर आपण डिलीट करत नाही, तोवर तो तसाच असतो आणि कधीही-कुठेही पाहता-दाखवता येऊ शकतो. हे लक्षात न घेता सरळ प्रिन्ट-आऊट घेऊन ठेवले जातात आणि कागद-फायलिंगची संख्या नाहक वाढवली जाते.

    आपल्याकडे कागदाला 'पुरावा' म्हणूनच भरपूर वापरला जातो. आपण राहतोय डिजीटल जगात, पण विचाराने मात्र त्याच अद्याप 'लेखी' युगात आहोत. 'कागदा'ला आपल्या जीवनात अतोनात महत्व आहे. लांब पल्ल्याचं तिकिट हल्ली डिजीटल चालत असलं तरी आपण त्याचं प्रिन्ट आऊट काढूनच प्रवासाला निघतो. त्याची कारणं दोन, एक म्हणजे डिजीटलवर आपला भरवसा नसतो आणि दुसरं म्हणजे, तो तिकीट तपासणीस आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या तिकिटावर विश्वास ठेवीलंच याची आपल्याला खात्री नसते. एकूण काय, तर पेपर हवाच.

    काही लोक डिजीटलचा दुरुपयोग करतात हे खरंय पण म्हणून सर्वांनाच लबाड समजून एका मापाने तोलून कागदाची मागणी करणं कितपत योग्य आहे हे मला समजत नाही. डिजीटल प्रणाली जास्तीत जास्त सुरक्षित करणं हा त्यावर उपाय आहे, प्रिन्ट आऊट नाही.

    हवा तसा कागद वापरायचा, त्या कागदासाठी बेसुमार जंगलतोड करायची आणि वर 'शीऽऽ किती हॉट क्लायमेट होत चाललंय हल्ली!' म्हणून कागदाच्याच टिश्यूने चेहरा, कपाळ, नाक, गळ्याचा घाम पुसायचा, हे कितपत योग्य आहे.? टिश्यूवरनं आठवलं, हल्ली रुमालाने हात-चेहरा पुसणं मागासलेपणाचं समजतात म्हणे आणि टिश्यू पेपरचा वापर पुढारलेपणा..! टॉयलेटमधेही हल्ली पेपरच (वाचण्यासाठी नव्हे, तर..) वापरतात अनेक सुधारलेले मॉडर्न लोक. मॉडर्नपणाची निशाणीच आहे ती हल्लीच्या..

    पूर्वी लोक निगुतीनं कागद वापरायचे. लिहिताना, टाईप करताना पुरेपूर काळजी घ्यायचे. झेरॉक्सच्या आगमनापूर्वी कार्बन कागद वापरून प्रती काढल्या जायच्या. आताच्या कम्प्युटरसारखी त्यावेळच्या टाईपरायटरमधे सेव्ह करायची सोय नसली तरी डोक्यात सगळंच आपोआप ऑटोसेव्ह व्हायचं. गोळा-बेरीज काय, तर आधुनिक संगणकीय युगात आपण पेपरलेसच्या गप्पा मारत परंतू जास्तीत जास्त कागद वापरत ‘ग्लोबल वॉर्मिंग'वर वातानुकुलीत केबीनीत बसून चर्चा करत असतो. कथनी आणि करनी यात काही एक संबंध नसणारे आपण, ढोंगी आहोत हे मात्र खरं..!!

    शिष्य व्हा, गुरु ठायी ठायी आहेत

    (गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लिहिलेला लेख)

    गुरू कोणाला म्हणावं? याची व्याख्या करणं काही फार कठीण नाही. आपल्याला जो जो काही शिकवतो, तो तो आपला गुरू. या अर्थाने गुरू यत्र तत्र सर्वत्र भरून राहिलेला आहे. गुरुचा धर्मच त्याच्याही कळत वा नकळत शिकवणं हा असतो, प्रश्न आपण त्याच्याकडून काय आणि किती शिकतो, हा आहे. आई-वडील, शिक्षक, पत्नी व आणखी काही जवळचे मित्र-परिचित हे आपले प्रत्यक्ष गुरू. पण अप्रत्यक्ष, अपरिचित गुरू तर अगणित असतात. ते देतच असतात, आपण किती घेतो आणि आपल्या वाटेला आलेला शिष्य धर्म कसा निभावतो याचा विचार आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करणं गरजेचं ठरतं..

    आमच्या मुंबईसारख्या शहरात रोज सकाळी कामासाठी बाहेर पडल्यापासून

    Enjoying the preview?
    Page 1 of 1