Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

Jeevan Ke Prerak
Jeevan Ke Prerak
Jeevan Ke Prerak
Ebook290 pages1 hour

Jeevan Ke Prerak

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

जीवनातील प्रेरक’ माझ्या हुशार वाचकांना आवडले, पण त्यांची एक तक्रारही होती. हजारो वाचकांनी मला पत्रे लिहिली आणि फोन केले, की महापुरूषांची अमर वाणी आणि त्यांचे प्रेरक प्रसंग याचे साहित्य बाजारात विपूल आहे. आदरणीय वाचकांनी लिहिले, ‘आम्हाला इतर महापुरूषांचे विचार नाही, तर सूर्या सिन्हा यांचे विचार हवे आहेत. आम्हाला त्यांचेच विचार वाचायचे आहेत. म्हणून पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीत फक्त त्यांचेच विचार समाविष्ट करा.’
Languageमराठी
PublisherDiamond Books
Release dateOct 27, 2020
ISBN9789352789337
Jeevan Ke Prerak

Related to Jeevan Ke Prerak

Related ebooks

Reviews for Jeevan Ke Prerak

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    Jeevan Ke Prerak - Surya Sinha

    ज्ञान-अज्ञान

    भूत, वर्तमान,

    भविष्य

    तुमच्यासाठी सर्वात अवघड काम कोणते आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल, तर माहीत करून घ्या, की तुमच्यासाठी सर्वात अवघड काम ते आहे, जे तुम्ही काल करू शकला नाहीत.

    * * *

    तुम्हाला उद्यासाठी तयारी करायची असेल, तर तुम्ही आजचा सदुपयोग करा, कारण आजमधूनच सोनेरी उद्या निर्माण होत असतो.

    * * *

    गेलेल्या काळाकडे पाहून आपण जीवन समजू शकतो; पण येणार्‍या काळावर लक्ष ठेवून आपण जीवन जगू शकतो.

    * * *

    तुम्ही फक्त वर्तमानाची काळजी करा, भविष्य आपली काळजी स्वत: करते.

    * * *

    इतिहास निर्माण करणार्‍यांकडे कधीही इतिहास लिहिण्याइतका वेळ असत नाही. त्यामुळेच असे म्हणतात की इतिहास निर्माण करणारे वेगळे असतात आणि इतिहास लिहिणारे वेगळे असतात.

    * * *

    कधीही कालची किंवा उद्याची काळजी करू नका, कारण कालपासून आपल्याला काहीही मिळत नाही, तर भविष्याची आपल्याला काहीही कल्पना नसते, त्यामुळे फकत वर्तमानाची काळजी करा.

    * * *

    तुम्हाला माहीत आहे, का की आतापर्यंत तुम्ही गमावलेला काळ कधीही तुमच्या आजची बरोबरी करू शकत नाही.

    * * *

    भूतकाळात आपल्या हातून घडलेल्या चुका आणि उद्याच्या काळजीची भीती याच्या विचारात तुम्ही आपला आज वाया घालवू नका.

    * * *

    आपले भविष्य सुधारण्यासाठी आपण आपल्या भूतकाळापासून धडा घ्यायला हवा. कारण भूतकाल हाच आपला सर्वात श्रेष्ठ शिक्षक असतो.

    * * *

    या जगात तीन प्रकारचे लोक असतात. पहिले इतिहासाचा अभ्यास करतात. दुसरे इतिहास लिहितात, त्यामुळे इतिहासाच्या पहिल्या पानावर त्यांचे नाव असते. तिसरे लोक इतिहास निर्माण करणारे असतात. त्यामुळे पूर्ण पुस्तक फक्त त्यांच्याबद्दलच लिहिलेले असते.

    * * *

    महापूर किंवा दुष्काळ याचा विचार न करता प्रत्येक शेतकरी असाच विचार करीत असतो, की पुढच्या वर्षी आपण नक्की श्रीमंत होऊ. या शेतकर्‍याप्रमाणे तुम्हीही आपले विचार सकारात्मक ठेवा.

    * * *

    भविष्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसणे खूप बरे असते कारण नाही तर आपण एक क्षणही सुखाने राहू शकणार नाहीत. भविष्याची काळजी ही अशा प्रकारची वाळवी असते, जी आतल्या आत माणसाला पोखरून पोकळ करून टाकते

    * * *

    आपल्या उद्याचा विकास करण्यासाठी विचारपूर्वक आज परिश्रम करायला तयार रहा.

    * * *

    प्रत्येक व्यक्तीचे जीवन फक्त वर्तमानातच स्थिर असते. कारण भूतकाळात तर काम होऊन गेलेले असते आणि भविष्य तर अनिश्चित असते.

    * * *

    प्रत्येक समजूतदार व्यक्तीच्या सोबत भूतकाळ असतो, त्यापासून धडा घेऊन तो पुढे वाटचाल करीत राहतो आणि प्रत्येक मूर्खासोबत भविष्यकाल असतो, ज्याच्या काळजीत तो नेहमी झुरत असतो.

    * * *

    कोणत्याही दु:ख आणि भीतीशिवाय तुम्ही तुमचा भूतकाळ आणि भविष्य याचा विचार करीत असता तेव्हा तुम्ही सफलतेच्या मार्गावर असता.

    * * *

    तुम्ही वर्तमान अशा प्रकारे जगायला हवा, की त्यामुळे तुमचे भविष्य वाया जाता कामा नये. तुमचा आज हेच उद्याचे प्रतिबिंब असते.

    * * *

    आपला वर्तमान सफल करण्यासाठी सतत आपले काम करीत रहा. वर्तमान चांगले असेल, तर भविष्य नक्कीच चांगले असते.

    * * *

    इतिहासाच्या पानात सफल व्यक्तीची जीवनगाथा भरलेली असते. तुम्हीही असे काही तरी करायला हवे, की त्यामुळे इतिहास सुद्धा तुमच्या सफलतेचा साक्षिदार व्हायला हवे.

    * * *

    जीवन जगण्यासाठी भविष्याची काळजी असायला हवी, पण ते समजून घेण्यासाठी भूतकाळाची पानेही उलटून पहायला हवीत.

    * * *

    तुम्ही उद्या कोण होणार, हे आज ठरवित असतो, कारण तुम्ही आज काय करीत आहात यावरूनच तुमचे चांगले किंवा वाईट भविष्य नक्की होत असते.

    * * *

    निरोगी मेंदूमुळे निरोगी शरिराची निर्मिती होत असते, त्यासाठी आजचे विचार ग्रहण करा आणि उद्याचे विचार धुऊन काढा. उद्याचा विचार करू नका, त्यासाठी अजून खूप वेळ आहे. तो येईल तेव्हा पाहता येईल.

    * * *

    कोणीही व्यक्ती अनेक किंवा मोठी चूक न

    करता थोर व्यक्ती होऊ शकत नाही.

    अनुभव, धडा

    आपल्या चुकांपासून आपण घडा घ्यायला हवा, कारण अनेक वेळा एखादी क्षुल्लक चूकही मोठ्या सुधारणेसाठी सुखद कारण होत असते.

    * * *

    आपल्या अनुभवाचा लाभ घेणार्‍या व्यक्तीला चतूर म्हणतात. सफल व्यक्ती मात्र दुसर्‍याच्या अनुभवाचा फायदा करून घेत असते.

    * * *

    अनुभव घेण्यासाठी आपल्याला अनेक पट जास्त किमत चुकवावी लागते; पण त्यापासून आपल्याला मिळणारी शिकवण दुसर्‍या कशापासूनही मिळू शकत नाही.

    * * *

    एखाद्या व्यक्तीने मला पहिल्यांदा फसवले असेल, तर त्याला तेव्हा लाज वाटायला हवी; पण त्याच व्यक्तीने मला दुसर्‍यांदा फसवले, तर मात्र मला त्यावेळी लाज वाटायला हवी. लाज यासाठी की एकदा फसवणूक झाल्यावरही मी त्यापासून काहीही धडा घेतला नाही आणि पुन्हा फसवल्या गेलो.

    * * *

    तुम्हाला दुसर्‍या व्यक्तीचा अनुभव कळला असेल, तर तुमच्यासाठी तो एक नवीन अनुभव असतो.

    * * *

    तुम्हाला जे हवे असते, त्याच्याऐवजी तुम्हाला दुसरेच काही मिळाले तर त्याला अनुभव म्हणतात.

    * * *

    दुसर्‍याच्या अनुभवापासून शिका आणि शक्य होईल तितका त्यापासून लाभ मिळवा. अशा प्रकारे मग तुम्ही बुंद्धिमान लोकांच्या रांगेत जाऊन बसता.

    * * *

    आपला येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला गेलेल्या अनेक वर्षांपेक्षा मोठा वाटत असतो.

    * * *

    ओव्या लहान असतात; पण त्यांची रचना करण्यासाठी खूप मोठा अनुभव लागत असतो.

    * * *

    अहंकार

    दुसर्‍याचा प्रकाश विझवून तुम्ही जर आपला प्रकाश पाडीत असाल, तर हा उजेड म्हणजे तुमच्या अंहंकाराचे प्रतीक आहे.

    * * *

    आपले पद किंवा स्थान याचा अभिमान बाळगणारा कधीही मोठा होऊ शकत नाही, तर अभिमान दाखवून ती व्यक्ती आपण आपल्याला कोते असल्याचे सिद्ध करीत असते.

    * * *

    तुम्ही स्वत:ला खूप जास्त रूबाबदार आणि शूर -वीर समजत असाल, तर दुसर्‍याच्या कुत्र्याला आदेश देऊन पहा म्हणजे तुम्ही किती शूरवीर आहात ते तुमचे तुम्हाला कळते.

    * * *

    गुन्ह्याची आपली भाषा असते, ती काहीच न सांगता सर्व काही उघड करते

    * * *

    जो नेहमी फक्त आपल्याच स्वार्थाचा विचार करीत असतो, त्याचा लवकरच अंत होतो

    * * *

    शरीर, धन आणि नशीब याचा कघीही अभिमान बाळगू नये. शरीर हे चितेचे इंधन आहे, धन म्हणजे चंचल लक्ष्मी आहे आणि नशीब फक्त त्याची रचना करण्यालाचा माहीत असते.

    * * *

    आत्मविश्वास

    तुमचा विश्वास अटळ असेल आणि जिद्द ठाम असेल, तर तुम्ही मिळवू शकणार नाहीत असे या जगात काहीही नाही. तुम्ही सर्व काही मिळवू शकता आणि सर्व काही करू शकता.

    * * *

    आत्मविश्वासाच्या अभावी अंधविश्वास निर्माण होतो. आत्मविश्वास मजबूत केल्यावर अंधविश्वासाचा अंधार आपोआप नाहीसा होतो.

    * * *

    आपल्या आत्मसन्मानाने आपला आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे स्वत:ला ओळखा आणि आपल्या आत दडलेल्या शक्ती जाणून घ्या. तेव्हाच तुम्ही आपला आदर करू शकाल आणि आत्मविश्वास वाढवू शकाल.

    * * *

    आपण नक्की यशस्वी होऊ यावर आत्मविश्वास ठेवा.

    * * *

    आत्मविश्वासाचा अभाव, हे अपयशाचे मूळ आहे. त्यामुळे तुमच्या

    आत्मविश्वास असलेली व्यक्ती सागरात नाव

    Enjoying the preview?
    Page 1 of 1