Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

Masala King : Dhananjay Datar
Masala King : Dhananjay Datar
Masala King : Dhananjay Datar
Ebook398 pages2 hours

Masala King : Dhananjay Datar

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

भारतीय उद्योजकता क्षेत्रातलं एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून धनंजय दातार यांच्याकडे आदराने बघितलं जातं. व्यवसायाइतकंच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतही त्यांचं योगदान आहे. दुबईत भारतीय आणि विशेषतः मराठी संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी ते उत्साहाने काम करतात. स्वतः गरिबीतून वर आल्याने आपल्याप्रमाणेच उद्यमाची आकांक्षा बाळगणाऱ्या गरीब तरुणांना मार्गदर्शनासाठी ते स्वखर्चाने गावोगावी जाऊन व्याख्यानं देतात आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांना साहाय्य पुरवतात. अमरावती ते दुबई हा ह्यांचा प्रवास जाणून घेण्यासारखा आहे. 

 

Languageमराठी
Release dateOct 20, 2023
ISBN9798223194927
Masala King : Dhananjay Datar

Related to Masala King

Related ebooks

Reviews for Masala King

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    Masala King - Dhananjay Datar

    आई  

    कै. सौ. शशिकला महादेव दातार

    जिने माझं व्यक्तिमत्त्व घडवलं...

    बाबा

    कै. महादेव दत्तात्रय दातार

    ज्यांनी मला उद्योजक म्हणून घडवलं...

    हातून काही नवीन घडलं की

    मी ते नेहमी तुम्हांलाच येऊन सांगायचो...

    आत्ताही तेच करतोय...

    धनंजय दातार

    भारतीय उद्योजकता क्षेत्रातलं एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून धनंजय दातार यांच्याकडे आदराने बघितलं जातं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिरखेड (जिल्हा - अमरावती) इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. नंतर त्यांनी मुंबईतल्या कलिना इथल्या म्युनिसिपालटीच्या शाळेतून आणि सांतक्रूझच्या पाठक टेक्निकल हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण घेतलं. दादरच्या सेंट जॉन कॉलेजमधून इयत्ता बारावीपर्यंत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून ते बाबांनी दुबईत सुरू केलेल्या किराणा दुकानात मदतीसाठी रवाना झाले आणि तेहतीस वर्र्षांच्या काळात एका छोट्याशा दुकानातून अल अदील हा बहुराष्ट्रीय समूह उभा केला. आखाती देशांत एकोणचाळीस सुपर स्टोअर्सची साखळी, दोन अत्याधुनिक मसाला कारखाने, दोन पीठगिरण्या आणि एक आयातनिर्यात कंपनी असा विस्तार करून दाखवला.

    अल अदील समूहाच्या माध्यमातून त्यांनी आजवर नऊ हजारांहून अधिक भारतीय उत्पादनं आखाती बाजारपेठांत पोहोचवली आहेत; ज्यांत त्यांच्या स्वतःच्या ’पिकॉक’ या ब्रँडची सातशेहून अधिक अस्सल, दर्जेदार आणि सुरक्षित उत्पादनं समाविष्ट आहेत. त्यांच्या कार्यासाठी त्यांना दुबईच्या शासकांनी पुरस्कारा समवेत ’मसालाकिंग’ या बहुमानाने गौरवलं आहे. ’फोर्ब्ज मिडल इस्ट’ मासिकाने आखाती देशातल्या आघाडीच्या भारतीय नेत्यांच्या यादीत डॉ. दातार यांना उच्च मानांकन दिलं आहे. हा सन्मान मिळवणारे ते बहुधा एकमेव महाराष्ट्रीय उद्योजक असावेत. दुबईतल्या अमेरिकन लिबर्टी युनिव्हर्सिटीतून त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विषयातील डॉक्टरेट विशेष गुणवत्तेसह पूर्ण केली आहे.

    व्यवसायाइतकंच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतही त्यांचं योगदान आहे. दुबईत भारतीय आणि विशेषतः मराठी संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी ते उत्साहाने काम करतात. स्वतः गरिबीतून वर आल्याने आपल्याप्रमाणेच उद्यमाची आकांक्षा बाळगणाऱ्या गरीब तरुणांना मार्गदर्शनासाठी ते स्वखर्चाने गावोगावी जाऊन व्याख्यानं देतात आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांना साहाय्य पुरवतात.

    मनोगत

    सस्नेह नमस्कार!

    ‘मसालाकिंग’ या माझ्या पहिल्याच पुस्तकाची एकाच वर्षात चौथी आवृत्ती प्रसिद्ध होत असल्याचा मला खूप आनंद वाटतो. हे काही एखादं परिपूर्ण आत्मचरित्र नाही...तर हा केवळ आठवणींचा प्रवास आहे. सुमारे वर्षभर मी व्यावसायिक व्यापातून वेळ काढून या पुस्तकाचं लेखन करत होतो. मी काही अनुभवी आणि कुशल लेखक नाही. तरीही धाडस करून बघायचं ठरवलं. त्यामागे दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे, माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातले अनुभव आणि त्यांतून शिकलेले धडे यांबद्दल माझ्या फेसबुक पेजवर मी गेली दीड वर्षं लिहितोय. ते लेखन अनेकांना आवडलं होतं आणि या, तसंच माझ्या इतरही आठवणी पुस्तकरूपानं एकत्र वाचायला मिळाव्यात अशी इच्छा बऱ्याच मित्रांनी प्रतिक्रियांमध्ये व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेचा मान राखणं मला अगत्याचं वाटलं.

    दुसरं कारण थोडं विस्तारानं सांगतो. व्यवसायातल्या उपेक्षा-अपमानांचे अनेक घाव पूर्वी सोसल्यामुळे माझा स्वभाव आता बिनधास्त, आव्हानं स्वीकारणारा बनला आहे. अमुकतमुक गोष्ट तुला किंवा तुम्हा लोकांना जमणार नाही अशी हेटाळणी झाली की, माझ्यातलं मराठी रक्त खवळतं. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मला हे वाक्य वारंवार ऐकायला लागलं... पण त्यातूनच करून बघायचंच आणि दाखवून द्यायचंच ही जिद्द माझ्यात निर्माण झाली; म्हणूनच न्यूनगंड वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या अंगावर मी आक्रमकपणाने चाल करतो. एक आठवण सांगतो. शाळेत असताना मी मुखदुर्बळ होतो. अमरावती जिल्ह्यातल्या शिरखेडच्या ग्रामीण शाळेतनं एकदम मुंबईतल्या शहरी शाळेत दाखल झालो... तेव्हा माझ्या खेडवळ बोलण्याला सगळे विद्यार्थी हसत आणि त्यावरून माझी टर उडवत. त्यामुळे मी कानकोंडला होऊन वर्गात गप्प बसायचो. शिक्षकांच्या प्रश्‍नांना उत्तर द्यायची वेळ आली की चाचरत आणि तोंडातल्या तोंडात बोलायचो. ही सवय मोठेपणीही पुष्कळ दिवस टिकली होती. आयुष्यात प्रथम जाहीर व्याख्यान द्यायची वेळ आली; तेव्हा मी घाबरलो होतो आणि संकोचाने ‘नाहीऽ नाहीऽऽ’ म्हणत होतो... पण त्या कार्यक्रमाचे संयोजक म्हणाले, दातारऽ अहो, भाषण करणं फारसं अवघड नाही. फक्त साधं, सोपं बोला आणि मित्राशी संभाषण करत असल्याप्रमाणे जीवनातल्या आठवणी सांगा. मी तसं केलं; आणि आश्चर्य म्हणजे तेच प्रांजळ भाषण श्रोत्यांच्या मनाला भिडलं. माझ्यातल्या मुखदुर्बळतेचा न्यूनगंड त्या क्षणी गळून पडला.

    या लेखनाबाबतही हेच घडलं. गंमत म्हणजे या वेळेस, ‘अरे, तुला हे पुस्तक वगैरे लिहिणं जमणारे का?’ असं कुचेष्टेनं विचारणारं दुसरंतिसरं कुणी नसून खुद्द माझं शंकेखोर मन होतं. माझ्या पूर्वायुष्यातल्या समग्र आठवणी अगदी माझ्या कुटुंबीयांनाही मी कधी सांगितल्या नव्हत्या. ‘मान सांगावा जना आणि अपमान सांगावा मना’ अशी म्हणच आपल्याकडे आहे. मात्र मला जेव्हा काही पुरस्कार मिळाले, तेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी माझ्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी माझा उद्योजकतेमधला आजवरचा प्रवास त्यांना उलगडून सांगावा असं मला वाटायला लागलं. ते वृत्तान्त माझ्या मुलांच्या वाचण्यात आल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली, बाबाऽ हे सगळं तुम्ही आम्हांला कधीच सांगितलं नव्हतं. आता निदान या सर्व आठवणी एकसलग तरी लिहून काढा... त्यामुळे मी लिहायला लागलो; पण आधीच म्हटल्याप्रमाणे माझ्याच मनात द्वंद्व निर्माण झालं. एक मन म्हणायचं ‘लेखन ही एक कला आहे. जमणार आहे का तुला?’ त्याच वेळी चेव चढलेलं दुसरं मन म्हणायचं- ‘बिनधास्त लिही. करके तो देखो.’ मग मीही हिंमत बांधून लेखनात मुशाफिरी सुरू केली. आठवून आठवून लिहिणं, पुन्हा पुन्हा वाचून त्यात दुरुस्त्या करणं यांतही खूप वेळ गेला. त्यातून ही भट्टी किती जमलीये ते तुम्हीच ठरवा. काही आठवणींची किंवा संदर्भांची पुनरुक्ती झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा.

    ‘मसालाकिंग’ हे या पुस्तकाला दिलेलं शीर्षक म्हणजे आत्मप्रौढी किंवा आत्मगौरव नाही. खरं तर या पुस्तकाला नाव काय द्यावं, हा प्रश्‍न आठवणी लिहून झाल्यावर मला पडला होता. ‘सेल्समन ते बिझनेसमन’, ‘एका दुकानदाराचा प्रवास’ अशी शीर्षकं माझ्या मनात घोळत होती पण ती तितकीशी पटत नव्हती. एक दिवस त्याचंही उत्तर लख्खकन्‌ मनात चमकलं. मी आजवर नाव, प्रसिद्धी, पुरस्कार यांच्यामागे कधीच गेलो नाही. सरळ मार्गानं, प्रामाणिकपणानं व्यवसाय करण्यावरच लक्ष केंद्रित केलं. मला पहिला पुरस्कार मिळाला तो सन 2001 मध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या राजघराण्यातले एक प्रमुख शासक हिज हायनेस शेख अहमद बीन सईद अल्‌ मक्तुम यांच्या हस्ते. तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी स्टेजवर गेलो, तेव्हा मनातून धास्तावलो होतो. ज्या देशात आपण व्यवसाय करतो; तिथल्या शासकांच्या पुढ्यात उभं राहण्याचा पहिलाच प्रसंग. पुरस्कार घेताना माझे हात थरथरत होते. गंमत म्हणजे माझा आणि माझ्या कंपनीचा परिचय निवेदक वाचून दाखवत असताना इकडे शेखसाहेब माझ्याशी हस्तांदोलन करत म्हणाले, दातारऽ तुमच्या पिकॉक ब्रँडच्या मसाल्यांनी आमच्या रसोईखान्यात इतकं हक्काचं स्थान मिळवलंय की, आमचे खानसामे इतर ब्रँडच्या मसाल्यांना आता हातही लावत नाहीत. तुम्ही तर दुबईचे मसालाकिंग आहात. आयुष्यात कधी कल्पना केली नाही, अशा त्या कौतुकोद्गारांनी मी थरारून गेलो. दुकानात झाडूपोछापासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्याला एक दिवस त्या देशाच्या राजघराण्याकडून ‘तुम्ही इथले मसालाकिंग आहात.’ अशी प्रशंसा ऐकायला मिळत होती. जीवनसाफल्य म्हणजे आणखी काय असतं? त्या दिवसापासून लोकांकडून माझा उल्लेख ‘मसालाकिंग’ होऊ लागला. मीही विनयानं हे बिरुद स्वीकारलं... कारण माझ्या आयुष्यातली ती पहिलीच सर्वोच्च प्रशंसा होती; म्हणूनच प्रेमाचं प्रतीक असलेले हे शब्द मी या पुस्तकाचं शीर्षक म्हणून वापरले आहेत.

    अलीकडे मी व्यावसायिक व्यापांतून वेळ काढून उद्योजकता विकासात सक्रिय झालो आहे. सामाजिक क्षेत्रात रस घेऊन उपक्रम आखणाऱ्या संस्थांकडून मला व्याख्यानासाठी आमंत्रण येतं... तेव्हा मी स्वखर्चानं तिथे जाऊन, विशेषत: तरुणांना व्यवसायात उतरण्याचं आवाहन करतो, नवउद्योजकांना मार्गदर्शन करतो. त्या व्याख्यानात माझीच जीवनकथा त्यांच्यापुढे मांडतो. त्यामागे प्रसिद्धी किंवा बडेजाव मिरवण्याचा हेतू मुळीच नसतो. भारतातल्या असंख्य गरीब तरुणांच्या डोळ्यांत समृद्धीची स्वप्नं तरळत असतात. त्यांच्याकडे बघताना मला माझंच प्रतिबिंब दिसायला लागतं. मला वाटतं की, धनंजय दातार नावाचा गरीब, सर्वसामान्य तरुण जर एका छोट्याशा दुकानापासून सुरुवात करून जागतिक पातळीचा एक उद्योगसमूह उभारू शकतो; तर कोणत्याही मेहनती तरुणाला तशीच कामगिरी का नाही जमणार? मग माझ्या व्यावसायिक वाटचालीत गवसलेले यशाचे मंत्र मला या होतकरू उद्योजकांना सांगावेसे वाटतात. माझ्या जीवनाची चित्तरकथा वाचताना अधूनमधून असे मंत्र वाचकांना नक्की गवसतील.

    माझा जीवनप्रवास सरळ रेषेत झालेला नाही. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे त्याला अनेक धक्कादायक वळणं आहेत. त्याचीच मला नेहमी गंमत वाटते आणि मनात प्रश्‍न उभे राहतात. ज्या घराण्यात सगळे नोकरदार होते; तिथं उद्यमशीलतेचं बीज अचानक पडलंच कसं? मला धंद्यात यायचं नव्हतं; तरी मी उद्योजक झालो कसा? युद्धामुळे सर्वस्व गमावलं जाण्याचं चित्र समोर दिसत असताना परिस्थितीला अचानक कलाटणी मिळून मला चौपट फायदा झाला कसा? एक छोट्याशा दुकानातून एकोणचाळीस सुपर मार्केट्सची साखळी निर्माण झाली कशी? पूर्वायुष्यात माझ्या अंगी नसलेली गुणसंपदा मिळवण्याच्या प्रक्रियेत व्यवसायानं गुरूची भूमिका बजावली कशी? वगैरे. काळानंच या अनाकलनीय योगायोगांची अनुभूती मला दिली असावी.

    या पुस्तकात मी दोन गोष्टींवर लिहायचं टाळलं आहे. आयुष्यात खडतर वाटचाल करताना जसे अनेक चांगले लोक भेटले; तसेच काहींनी प्रचंड मनस्तापही दिला. व्यवसायात मी कुणाच्या वाटेत न येता, धक्के खात पुढे जाण्याची धडपड करत असताना काही छुप्या स्पर्धकांनी डावपेच खेळले. त्या क्लेशदायक घटनांचा अथवा उपद्रवी व्यक्तींचा उल्लेख मी या पुस्तकात केलेला नाही. त्यापेक्षा ज्यांनी पाठीवर हात ठेवून उमेद दिली; त्यांची आठवण ठेवणं मला अधिक योग्य वाटलं. दुसरी गोष्ट म्हणजे मी सामाजिक कार्यात कुणाकुणाला कशी आणि किती मदत केली हेही लिहिण्याचं टाळलं आहे.

    याच पुस्तकात मी एका स्वतंत्र भागात माझे आईबाबा, माझी पत्नी आणि मुलं यांचीही  

    शब्दचित्रं रेखाटली आहेत. त्याचं कारण म्हणजे माझ्या परिवाराशी माझी उत्कट भावनिक जवळीक आहे. माझ्या जडणघडणीत आणि सुखदु:खात ते वाटेकरी आहेत. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करताना ‘पाहावे आपणासी आपण’ या वचनानुसार मी कुटुंबीयांच्या मनाच्या आरशात माझं प्रतिबिंब बघितलं आहे. आईबाबा आज हयात असते; तर त्यांनाही या पुस्तकात माझ्याबद्दल लिहायचा आग्रह केला असता.  

    या लेखनाच्या पहिल्या वाचकाची भूमिका माझी पत्नी सौ. वंदनाने बजावली आहे. कच्च्या स्वरूपात लिहिलेल्या आठवणींच्या तपशिलात दुरुस्त्या सुचवून अचूकता आणणं आणि प्रसंगांना अनुरूप सुभाषितं, काव्यपंक्ती सुचवणं ही तिची मदत अनमोल आहे. मजकुरावर लेखनसंस्कार करणारे माझे मित्र योगेश प्रभुणे आणि समन्वयक उत्तरा मोने यांनी केलेल्या सूचनांमधून मी बरंच काही शिकलो.  

    मला मदत करणाऱ्या सर्व सुहृदांचे मनापासून आभार! आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हे सुहृद मला भेटत गेले. हे पुस्तक घडलं. खरंतर माझ्याकडून या गोष्टी घडत गेल्या. शेवटी परमेशराकडेही हेच मागणं आहे की, माझ्या हातून अशाच चांगल्या गोष्टी घडत राहोत.  

    जेथे जातो तेथे तू माझा सांगाती। चालविसी हाती धरूनिया॥  

    चालो वाटे आम्ही तुझाचि आधार। चालविसी भार सवे माझा॥  

    बोलो जाता बरळ करिसी ते नीट। नेली लाज धीट केलो देवा॥  

    अवघे जन मज झाले लोकपाळ। सोइरे सकळ प्राणसखे॥  

    तुका म्हणे आता खेळतो कौतुके। जाले तुझे सुख अंतर्बाही॥  

    धनंजय दातार

    मनोरथा, चल त्या नगरीला... 

    रविवार, 26 फेब्रुवारी 1984 या दिवशी एअर इंडियाच्या गंगा विमानाने मी दुबईला रवाना झालो. हे गोड स्वप्न मी गेल्या पाच वर्षांपासून नियमितपणे बघत होतो आणि ‘मुंबई ते दुबई’ या तीन तासांच्या प्रवासात त्यात आणखी काही गोड मनोरथांची भर पडत होती. माझे वडील दहा वर्षांपूर्वीच दुबईला गेले होते... पण तिथे जाणं हे काही त्यांचं स्वप्न नव्हतं. भारतीय हवाईदलाच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर मिळायला लागलेल्या तुटपुंजा पेन्शनमध्ये संसार चालणार नाही, हे ओळखून कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठीची ती धडपड होती. परदेशातल्या कंपनीत नोकरी मिळवली तर पगाराच्या रूपाने चार पैसे जास्त मिळतील, इतकाच फायद्याचा विचार त्यामागे होता. एखाद्या विशिष्ट देशाबाबत वाटणारं आकर्षणही त्यात नव्हतं. त्या काळात आखाती देशांमध्ये मनुष्यबळाला मागणी होती आणि बाबांना पहिली संधी संयुक्त अरब अमिरातीत मिळाली, म्हणून ते तिथे गेले. इतर कोणत्याही देशात नोकरी मिळाली असती तरी ते तिकडे गेलेच असते... पण दुबईने त्यांना पहिली संधी दिली आणि पुढे ही महानगरी त्यांची, आणि कालौघात माझीही कर्मभूमी बनली.  

    माझं मात्र बाबांसारखं नव्हतं. दुबईलाच जाणं हे माझं स्वप्न होतं आणि ते मी महाविद्यालयीन वयापासून बघत होतो. अर्थात त्यामागे कोणताही पोक्त विचार नसून निव्वळ पोरकटपणा होता. मला फक्त श्रीमंत बनायचं होतं. वेडेपणाच्या वयाला आपल्याकडे गद्धेपंचविशी म्हणतात; माझी गद्धेपंचविशी बहुधा दहा वर्षं अगोदरच, म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षापासून सुरू झाली होती. माझे बाबा दुबईत काम करतात म्हणून मला तिथे जायचं नव्हतं; तर मुंबईतून दुबईला जाणारे लोक दोन-तीन वर्षांतच झटपट श्रीमंत बनतात; या गैरसमजापोटी मी दुबई - दुबई असा जप करत होतो. हे स्वप्न झटपट सत्यात उतरावं म्हणून अगदी सोळाव्या वर्षीच मी पासपोर्ट काढून ठेवला होता.  

    ‘दुरून डोंगर साजरे’ किंवा ‘आसमान से गिरा, खजूर पे अटका’ या म्हणींचा अर्थ दुबईत पोहोचल्यावर मला समजला. या कर्मभूमीने जितक्या कठोरतेने माझी सत्त्वपरीक्षा घेतली, तितक्याच मोठ्या मनाने मला सुखसमृद्धीही दिली. त्याच प्रवासाची ही मनोवेधक कथा...

    बालपण आणि आजोळचे दिवस

    आम्ही दातार मूळचे कोकणातले. पण तिथल्या नक्की कोणत्या गावचे हे आम्हांला ठाऊक नाही. आमच्या कुठल्या पिढीतल्या पूर्वजांनी कोकणातून नक्की कधी, कशासाठी आणि कसं कसं स्थलांतर केलं याचीही मला माहिती नाही आणि ती मिळवण्याच्या फंदात मी कधी पडलो नाही. त्याचं कारण म्हणजे गावचा, जातीचा किंवा घराण्याचा अभिमान मिरवण्याजोगे माझ्याकडे काही नाही आणि या गोष्टींचा मला आयुष्यात कधीच उपयोगही झालेला नाही. तसंही एकाच जागी पिढ्यान्‌पिढ्या राहिल्याने माणसाचा उत्कर्ष होतोच असं नाही. उपनिषदात हे तत्त्व खूप छान वर्णन केलं आहे-

    ––––––––

    आस्ते भग आसीनस्य उर्ध्वस्तिष्ठती तिष्ठतः।  

    शेते निपद्यमानस्य चराति चरतो भगः॥  

    - बसून राहणाऱ्याचं नशीब बसून राहतं, उभं राहणाऱ्याचं उभं राहतं; निजून राहणाऱ्याचं निजून राहतं आणि चालत राहणाऱ्याचं चालत राहतं...  

    या सुवचनाचा अन्वयार्थ मला भावतो. उत्कर्ष साधायचा तर माणसाने बसून न राहता चालत राहायला हवं हे मला पटतं. प्रगतीसाठी गाव सोडणाऱ्या माझ्या पहिल्या पूर्वजांपासून अगदी माझ्यापर्यंत ही स्थलांतराची परंपरा कायम राहिली आहे, हे एक प्रकारे चांगलंच झालंय.  

    ‘मी कोण?’ असा प्रश्‍न स्वतःलाच विचारला, तर मला एकच एक अशी ओळख सांगता येणार नाही. पूर्वज कोकणातले होते म्हणून मी कोकणस्थ; तर नातेसंबंध देशावर असल्याने मी देशस्थ आहे. जन्म आणि बालपण विदर्भातले असल्याने मी वैदर्भीय आहे. मुंबईतल्या वास्तव्यामुळे आणि शिक्षणामुळे मी मुंबईकर, तर व्यवसायानिमित्ताने दुबईला स्थायिक झाल्याने मी दुबईकर आहे... मी मराठी आहे; मी भारतीय आहे. निरनिराळ्या देशांमध्ये व्यवसाय विस्तारल्यामुळे आता जगाचा नागरिकही बनू पाहतोय, केशवसुतांनी त्यांच्या ‘नव्या शिपाई‘ या कवितेत म्हटल्यानुसार-  

    ‘जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत..  

    सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत...’

    अशीच माझी मानसिकता बनलेली आहे.

    ––––––––

    पोटासाठी भटकत जरी... 

    आमच्यातल्या जिप्सीची सुरुवात माझ्या दातार आजोबांपासून झाली. माझे आजोबा दत्तात्रय दातार रेल्वेत कारकून म्हणून नोकरीला होते. रेल्वेतली नोकरी म्हणजे विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर. बदलीची ऑर्डर आली की, निमूटपणे बाडबिस्तारा गुंडाळायचा आणि कुटुंबासह नव्या गावात संसार मांडायचा, ही जीवनशैली आजोबांच्या अंगवळणी पडली होती. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना राहायला स्टेशनजवळच क्वार्टर्स असल्याने राहण्यासाठी कुठल्याही गावात जागा शोधण्याची

    Enjoying the preview?
    Page 1 of 1