Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

Lok Vyavhar
Lok Vyavhar
Lok Vyavhar
Ebook576 pages5 hours

Lok Vyavhar

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

चार चौघांशी वागणे ही एक अशी कला आहे, जी माणूस असल्यामुळे सर्वांना प्रभावित करते, पण कोणतीही कला तोपर्यंत प्रभावित करू शकत नाही, ज़ो पर्यंत तुम्ही व्यवहार सिद्धांताला वास्तविकतेच्या पातळीवार आणत नाही. तुम्ही समाजाच्या कोणत्याही थरातील किंवा व्यवसायातील असलात तरीही, जीवनात पुढे जाण्यासाठी आणि सफलता मिळविण्यासाठी इतरांना प्रभावित करणे आवश्यक असते. ड़ेल कार्नोगी यांचे 'चार चौघांशी वागणे' हे पुस्तक आकर्षक शैली आणि सोप्या भाषेमध्ये वाचकांना सामान्य जनतेशी ज़ोडून घेण्याच्या अचूक पद्धती सांगते. त्यामुळे प्रत्येक वाचकाची ज़ीवन जगण्याची कला विकसित करते.
Languageमराठी
PublisherDiamond Books
Release dateSep 15, 2022
ISBN9789352617791
Lok Vyavhar

Related to Lok Vyavhar

Related ebooks

Reviews for Lok Vyavhar

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    Lok Vyavhar - Dale Carnegie

    चार चौघांशी वागणे

    प्रभावी व्यक्तिमत्त्वाची कला

    Icon

    eISBN: 978-93-5261-779-1

    © प्रकाशकाधीन

    प्रकाशक : डायमंड पॉकेट बुक्स (प्रा.) लि.

    X-30, ओखला इंडस्ट्रियल एरिया, फेज-II

    नई दिल्ली-110020

    फोन : 011- 41611861, 40712100

    फैक्स : 011- 41611866

    ई-मेलः : ebooks@dpb.in

    वेबसाइटः: www.diamondbook.in

    संस्करणः : 2016

    चार चौघांशी वागणे

    by : ड़ेल कार्नेगी

    अनुवाद : रवींद्र कोल्हे

    प्रस्तावना

    ‘हाऊ टू वीन फ्रेंड्स अँड इन्फ्ल्युएन्स पीपल’ ची पहिली आवृत्ती १९३६ मध्ये प्रकाशित झाली. त्याच्या अवघ्या पाच हजार प्रती काढण्यात आल्या होत्या. ड़ेल कार्नेगी किंवा प्रकाशक सायमन अँड शुस्टर यांना यापेक्षा या पुस्ताकाच्या जास्त प्रति विकतील, अशी अपेक्षा नव्हती. हे पुस्तक एका रात्रीतून लोकप्रिय झाले आणि त्याच्या सर्व प्रति हातोहात विकल्या गेल्या तेव्हा सर्वच आश्चर्यचकित झाले. लोकांची मागणी इतकी प्रचंड होती की त्याच्या एका नंतर एक आवृत्त्या प्रकाशित कराव्या लागल्या. ‘हाऊ टू वीनफ्रें ड्सअँड इन्फ्ल्युएन्स पीपल’ हे पुस्तक जागतिक पुस्तकांच्या इतिहासात सर्वकालीन सर्वोत्तम खपाचे पुस्तक झाले. त्या वेळी मंदीचा काळ संपला होता, हे पुस्तकाच्या लोकप्रियतेचे कारण होते, असे आम्ही म्हणत नाही. वास्तविक पाहता या पुस्तकांने सामान्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला होता, माणसाची अशी एक गरज भागविली होती की शतकानंतरही या पुस्तकाच्या लोकप्रियतेत आणि मागणीत खंड पडला नाही.

    दहा लाख डॉलर कमावणे सोपे आहे, पण इंग्रजी भाषेत एखादे वाक्य लोकप्रिय करणे कठीण असल्याचे डेल कार्नेगी यांचे म्हणणे आहे. ‘हाऊ टू वीन फ्रेंड्स अँड इन्फ्ल्युएन्स पीपल’ हा एक असा वाक्यांश आहे, जो लोकांनी उदघृत केला आहे, रचला केला आहे, वाक्प्रचार केला आहे इतकेच नाही तर राजकीय व्यंगचित्रांपासून कादबंरीपर्यंत अनेक संदर्भात त्याचा वापर केला आहे. जगातील सर्व लिहिल्या जाणार्‍या भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद करण्यात आला आहे. प्रत्येक पिढीने त्याचा नव्याने शोध घेतला असून त्याची प्रासंगिकता आणि मूल्ये ओळखले आहे.

    आता आपण मूळ तार्किक प्रश्नाकडे येऊ : इतके लोकप्रिय आणि शाश्वत महत्त्वाचे असलेले हे पुस्तक रिव्हाईज करण्याची आवश्यकता होती का? सफलतेसोबत मोडतोड कशासाठी?

    याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला याची जाणीव असायला हवी की स्वत: डेल कार्नेगी आयुष्यभर आपल्या पुस्तकांना रिव्हाईज करीत आले आहेत. ‘हाऊ टू वीन फ्रेंड्स अँड इन्फ्ल्युएन्स पीपल’ हे पुस्तक एखाद्या क्रमिक पुस्तकाच्या स्वरुपात लिहिण्यात आले होते. इफेक्टिव्ह स्पीकिंग अँड ह्युमन रिलेशन्स च्या अभ्यासक्रमाचे क्रमिक पुस्तक म्हणून. आजही हे पुस्तक याच स्वरुपात वापरले जाते.१९५५ मध्ये आपला मृत्यू होईपर्यंत ते आपला अभ्यासक्रम आणि पुस्तके सतत रिव्हाईज करीत राहिले. बदलत्या जगाच्या बदलत्या गरजा योग्य प्रकारे पूर्ण करता याव्यात यासाठी ते हे बदल करीत असत. सध्याच्या जगाच्या बदलत्या स्वरुपाविषयी डेल कार्नेगी यांच्या इतके संवेदनशील दुसरे कोणीही नव्हते. त्यांनी आपल्या शिकवण देण्याच्या पद्धतीतही सातत्याने बदल केले. त्यांनी इफेक्टिव्ह स्पीकिंग विषयीची आपली पुस्तके अनेक वेळा अपडेट केली. ते आणखी काही काळ जिवंत राहिले असते तर त्यांनी नक्कीच ‘हाऊ टू वीन फ्रेंड्स अँड इन्फ्ल्युएन्स पीपल’ हे पुस्तकही सुधारित केले असते. म्हणजे ते बदलत्या जगासाठी अधिक प्रासंगिक झाले असते.

    या पुस्तकात देण्यात आलेली अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची नावे या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या वेळी चिर परिचित होती. काही उदाहरणे आणि वाक्यांश आता जुने वाटतात. एखाद्या व्हिक्टोरियन कादंबरीतील सामाजिक वातावरण आपल्याला जुने वाटते, अगदी तसे. या पुस्तकातील महत्त्वाचा संदेश आणि संपूर्ण प्रभाव आता बर्‍याच प्रमाणात कमकुवत झाला आहे.

    हे रिव्हिजन करण्यामागे आमचा उद्देश हे पुस्तक त्याच्या मूळ स्वरुपाला धक्का न लावता आधुनिक वाचकांसाठी अधिक सदृढ आणि सक्षम करण्याचा आहे. आम्ही ‘हाऊ टू वीन फ्रेंड्स अँड इन्फ्ल्युएन्स पीपल’ हे पुस्तक बदलले नाही. आम्ही फक्त त्यातून काही बारीक सारीक गोष्टी वगळल्या असून त्यात नवीन उदाहरणांचा समावेश केला आहे. कार्नेगी यांची उतावीळपणाची आणि जोशपूर्ण शैली तशीच कायम ठेवण्यात आली आहे. इतकेच नाही तर तीसच्या दशकातील स्लॅगही ठेवले आहेत. ड़ेल कार्नेगी स्वत: जसे बोलत असत त्याच शैलीमध्ये म्हणजे उत्साही, गप्पा मारण्याच्या, चर्चा करण्याच्या शैलीमध्ये हे पुस्तक लिहिले आहे.

    त्यांच्याच शब्दात सांगायचे तर या पुस्तकात अजूनही तितकाच दम आहे, जितका पूर्वी होता. जगभरातील लोक कार्नेगी कोर्सेसमुळे प्रशिक्षित झाले आहेत. त्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. लाखो लोक ‘हाऊ टू वीन फ्रेंड्स अँड इन्फ्ल्युएन्स पीपल’ वाचून आपले जीवन सुधारण्याच्या मागे लागले आहेत. त्या सर्वांच्या समोर आम्ही हे संशोधित पुस्तक सादर करीत आहोत. त्यामध्ये आमचे योगदान फक्त इतकेच आहे की एका सुंदर वस्तूला आम्ही फक्त चकचकीत केले आहे. लखलखीत केले आहे.

    —ड़ोरोथी कार्नेगी

    (मिसेस डेल कार्नेगी)

    ॥अनुक्रमणिका॥

    पुस्तक लेखनाची रुपरेषा

    खंड पहिला

    लोकांना प्रभावित करण्याच्या युक्त्या

    १. मध गोळा करण्यासाठी पोळ्यावर लाथ मारू नये

    २. व्यवहार कुशल होण्याचे यशस्वी उपाय

    ३. नवीन करण्यासाठी जगात इतरांपेक्षा वेगळे व्हावे लागते

    खंड दुसरा

    लोकांच्या मनात जागा मिळविण्याच्या सहा सोप्या पद्धती

    १. प्रत्येक ठिकाणी सन्मान कसा करावा?

    २. लोकांना प्रभावित करण्याची सोपी पद्धत

    ३. तुम्ही हे करू शकला नाहीत तर संकटात सापडाल

    ४. यशस्वी वक्ता होण्याची सोपी पद्धत

    ५. लोकांमध्ये रस घ्या

    ६. लोकांना लगेच प्रभावित कसे करावे?

    खंड तिसरा

    आपले म्हणणे इतरांनी मान्य करण्यासाठी काय करावे

    १. वादामुळे कोणाचाही फायदा होत नाही

    २. आपले वैरी ओळखा आणि समजून घ्या

    ३. चूक स्वीकारण्याचे पथ्य बाळगू नये

    ४. मधाचा एक थेंब पुरेसा आहे

    ५. सॉक्रेटिसचे रहस्य

    ६. तक्रारींपासून मुक्तता

    ७. इतरांचे सहकार्य कसे मिळवावे

    ८. उत्तम तंत्र चांगला चमत्कारही करू शकते

    ९. माणसाला काय हवे असते?

    १०. प्रत्येकाला आवडेल असे

    ११. चित्रपटात घडते ते प्रत्यक्षात का नाही घडू शकत?

    १२. काम झाले नाही तर असे करा

    खंड चौथा

    लोकांना व्यथित न करता कसे बदलावे

    १. चुकांचा शोध कसा घ्यावा

    २. रुग्णाला वाचविण्यासाठी निंदा करा

    ३. इतरांच्या चुकांपूर्वी आपल्या चुका सांगून टाका

    ४. कोणावर अधिकार गाजवू नका

    ५. समोरच्या व्यक्तीला सन्मान वाचविण्यासाठी संधी द्या

    ६. यश मिळविण्याचे उपयुक्त तंत्र

    ७. वाईटालाही चांगले नाव द्या

    ८. चूक सुधारणे अवघड नसते

    ९. ज्यामुळे लोक तुमचे काम करतील तेच योग्य तंत्र

    पुस्तक लेखनाची रुपरेषा

    विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या पस्तीस वर्षांमध्ये अमेरिकेत दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली, पण त्यापैकी बहुतेक निरस आणि अप्रभावी होती. त्यामुळे विक्रीच्या हिशोबाने ती काही फायद्याचा सौदा नव्हती. हा फक्त माझाच विचार नाही तर एका महत्त्वाच्या प्रकाशन संस्थेच्या अध़्यक्षांनीही ही गोष्ट मान्य केली आहे.

    इतके सर्व माहीत असूनही मी हे पुस्तक का लिहित आहे, असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. तसेच तुम्ही हे वाचण्याची चूक का करीत आहात?

    दोन्हीही प्रश्न अगदी अचूक आहेत आणि त्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी माझ्या परीने पुरेपूर प्रयत्न करणार आहे.

    १९१२ पासून मी न्यूयॉर्कमध्ये व्यापाराशी संबंधित व्यक्ती आणि व्यवसायिक यांच्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रम राबवित आहे. सुरूवातीच्या काळात मी लोकांना जाहिर भाषण करण्याची कला शिकवित असे; पण नंतर मला असे जाणवू लागले की प्रभावीपणे बोलण्याच्या कलेसोबतच रोजच्या व्यापारी आणि व्यवसायिक जीवनात लोकांशी कशा प्रकारे वागायला हवे हे सुद्धा लोकांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे.

    प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्या क्षेत्रातील संबंधित व्यक्तींना प्रभावित करणे, हे सर्वात मोठे आव्हान असते. मग ती व्यक्ती डॉक्टर असो, इंजिनिअर असो, किंवा मग साधारणसा धोबी किंवा शिंपी असो.

    ही मौल्यवान कला शिकण्यासाठी जगभरातील सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष अभ्यासक्रम सुरू करायला हवेत, असे तुम्हाला वाटत नाही का? तरीही आतापर्यंत मी अशा प्रकारच्या एकाही अभ्यासक्रमाचे किंवा महाविद्यालयाचे नाव ऐकलेले नाही.

    आज पर्यंत चार चौघात वागण्याविषयी एकही पुस्तक लिहिले गेले नसल्यामुळे हे पुस्तक तयार करण्यासाठी मी अथक परिश्रम घेतले आहेत. मी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधधील लेख, कौटुंबिक न्यायालयातील दस्तवेज तसेच अनेक नवीन आणि जुने तत्त्वज्ञ वाचून काढले. एकट्या थि़योडर रुझवेल्टचीच मी शेकडो जीवन चरित्रे वाचली.

    मी किती तरी यशस्वी व्यक्ती जसे मार्कोनी आणि एडिसन यांच्यासारखे संशोधक; फ्रॅंकलिन डी रुझवेल्ट आणि जेम्स फार्ले यांच्यासारख्या राजकीय व्यक्ती, ओवेन डी यंग यांच्यासारखे बिझनेस नेता, क्लार्क गेबल आणि पीकफोर्ड यांच्यासारखे चित्रपट कलावंत याशिवाय मार्टिन जॉनसन यांच्यासारख्या संशोधकाच्या वैयक्तिक मुलाखती घेतल्या.

    सामान्यपणे ज्या पद्धतीने पुस्तके लिहिली जातात तसे हे पुस्तक लिहिले नाही. एखादे मूल आई वडिलांच्या छत्रछायेत हळूहळू मोठे होत जाते तसे हे पुस्तक साकार होत गेले आहे. हे पुस्तक एका प्रयोगशाळेत मोठे झाले असून अगणित लोकांच्या जीवन अनुभवाचे ते सार आहे.

    इथे देण्यात आलेले नियम हे कोरे सिद्धांत किंवा अंधारात मारलेले तीर नाहीत तर ते एखाद्या जादूसारखे मंत्रमुग्ध करणारे आहेत.

    तुमच्यातील सूप्त क्षमता आणि शक्तीचा तुम्हाला चांगल्या प्रकारे परिचय व्हावा, त्यामुळे तुमचे जीवन सुखमय व्हावे यासाठी हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. प्रिंस्टन विद्यापीठाचे माजी अध्यक्ष ड़ी.जॉन जी. हिब्बन यांचे मत होते, ‘शिक्षण म्हणजे जीवनातल स्थितीचा सामना करण्याची योग्यता आहे.’

    पहिली तीन प्रकरणे वाचल्यानंतर आपण काहीच शिकलो नाही, तसेच जीवनातील स्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम झालो नाहीत, असे तुम्हाला वाटले तर तुम्हाला समजावून सांगण्यात हे पुस्तक कमी पडले आहे, असे मी समजेन. कारण हार्बर्ट स्पेन्सर यांनी तसेच लिहिले आहे, ‘शिक्षणाचा उद्देश ज्ञान नाही तर कर्तृत्व आहे.’

    हे पुस्तक कर्तृत्वाबद्दल लिहिले आहे.

    - ड़ेल कार्नेगी

    भाग पहिला

    लोकांना प्रभावित

    करण्याच्या चांगल्या युक्त्या

    १.

    मध गोळा करण्यासाठी मधमाशांच्या

    पोळ्यावर लाथ मारीत नाहीत.

    इ.स. १९३१ मधील ७ मे रोजी न्यूयॉर्कमध्ये एक मोठी चकमक होत होती. ही चकमक त्यावेळी आपल्या अंतिम टप्प्यात होती त्यामुळे लोकांमध्ये रोमांच संचारला होता. अनेक महिने लपाछपीचा खेळ खेळल्यानंतर प्रसिद्ध लुटारू आणि खुनी क्रॉली याला चहुबाजूने घेरले होते. तिथे तो ‘दोन नळीची बंदूक’ या नावाने प्रसिद्ध होता. जो खुनी यावेळी चहुबाजूने घेरला होता आणि जो यावेळी आपल्या प्रेयसीच्या घरात लपलेला होता तो सिगारेट ओढीत नव्हता की मद्यपान करीत नव्हता.

    तो वरच्या मजल्यावर लपून बसला होता आणि १५० पेक्षा अधिक पोलिस, गुप्तहेर यांनी त्याला जमिनीपासून आकाशापर्यंत घेराव घातला होता. पोलिसांनी छताला छिद्र पाडून आणि त्यातून आत अश्रूधूर सोडून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. जवळपासच्या इमारतीवरही मशिनगन तैनात ठेवण्यात आल्या होत्या. न्यूयॉर्कमधील या भागात गेल्या एक तासापासून मशिनगन आणि बंदुकीतून गोळ्यांचा वर्षाव होत होता. पोलिस आणि खुनी इसम यांच्यातील चकमकीची मजा हजारो लोक घेत होते. न्यूयॉर्क शहरात याच्या आधी असे दृष्य क्वचितच पहायला मिळाले असेल.

    शेवटी क्रॉलेला पकडण्यात आले. न्यूयॉर्कच्या इतहिसातील तो आतापर्यंतचा सर्वात धोकादायक गुन्हेगार असल्याचे पोलिस कमिशनर ई. पी. मलरुनी यांनी सांगितले. कमिशनर म्हणाले, ‘तो इतका सजग आणि चतुर होता की पंख फडफडल्याची चाहूल लागताच तो कोणालाही मारून टाकीत होता.’

    हा ‘दोन नळ्यांची बंदूक’ स्वत:च्या दृष्टीने काय होता? आम्हाला या गोष्टीची माहिती कशी काय मिळाली? कारण पोलीस जेव्हा क्रॉलीवर गोळीबार करीत होते तेव्हा तो एक पत्र लिहिता होता. ते पत्र लिहित असताना त्याच्या जखमांमधून सातत्याने रक्त भळभळत होते आणि त्याचे डाग त्या पत्रावरही पडले होते. त्या पत्रामध्ये क्रॉलेने लिहिले होते, ‘माझ्या शर्टाच्या खाली एक अतिशय दयाळू तरीही दु:खी हृदय आहे. एक असे कोमल हृदय, जे कोणालाही नुकसान पोहचवू इच्छित नाही.’

    पत्र लिहिण्याच्या काही काळ आधीची ही गोष्ट आहे. एकदा क्रॉले लीग आयलँड गावातील रस्त्यावर आपल्या प्रेयसीसोबत मौज मस्ती करीत होता. इतक्यात अचानक एक पोलिसवाला त्याच्या कार जवळ आला आणि त्याच्याकडे लायसन्सची मागणी करू लागला. इतक्या लहानशा गोष्टीची शिक्षा म्हणून त्या पोलिसाला मृत्यूदंड मिळाला.

    क्रॉले काहीच बोलला नाही. त्याने आपल्या जवळचे रिव्हॉलव्हर काढले आणि त्या पोलिसाच्या छातीची गोळ्या मारून चाळणी केली. तो पोलिस जमिनीवर पडल्यावर क्रॉलेने आणखी एक गोळी त्या मेलेल्या पोलीसाच्या छातीत मारली. आता जरा विचार करा की इतका क्रूर आणि निष्ठूर माणूस म्हणत होता, ‘माझ्या शर्टाच्या खाली एक अतिशय दयाळू तरीही दु:खी हृदय आहे. एक असे कोमल हृदय, जे कोणालाही नुकसान पोहचवू इच्छित नाही.’

    क्रॉलेला मृत्यूची शिक्षा ठोठावण्यात आली. तुरुंगात त्याला मृत्यूदंड देण्यासाठी नेले जात होते तेव्हा जरा विचार करा तो काय म्हणाला असेल? हेच की ही लोकांचा प्राण घेतल्याची शिक्षा आहे. नाही, तो म्हणाला होता, ‘ही तर स्वत:ला वाचविण्याची शिक्षा आहे.’

    तर या गोष्टीचे सार असे काढता येईल की ‘दोन नळ्यांची बंदूक’ क्रॉले स्वत:ला कोणत्याही गोष्टीसाठी दोषी समजत नव्हता. गुन्हेगारांमध्ये आढळून येणारी ही सामान्य बाब आहे, असे तुम्हाला वाटते का? आता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो.

    ‘मी आपल्या जीवनातील सोनेरी दिवस लोकांचे भले करण्यासाठी घालविले. कारण लोकांनी सुखाचे जीवन जगावे असे मला वाटत होते; पण त्याच्या बदल्यात मला फक्त शिव्याच मिळतात आणि पोलिसांपासून लपून छपून रहावे लागते.’

    हे शब्द अमेरिकेतील सर्वात कुप्रसिद्ध गुन्हेगार अल कोपेनचे आहेत. तो शिकागोमधील सर्वात कुप्रसिद्ध टोळी प्रमुख होता. इतर गुन्हेगारांप्रमाणे अल कोपेनही स्वत:ला गुन्हेगार समजत नाही. तो तर स्वत:ला खरा परोपकारी समजत होता. लोक त्यालाच चुकीचा समजत होते.

    न्यूयॉर्कमधील सर्वात कुप्रसिद्ध गुन्हेगारांपैकी एक असलेला ड़च शुल्टजही असेच म्हणत असे. आपल्या एका मुलाखतीत त्यांने सांगितले होती की, मी तर लोकांचे भले करीत आहे. आपण म्हटलेल्या या वाक्यावर त्याचा पूर्णपणे विश्वासही होता. या विषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी मी न्यूयॉर्कमधील सर्वात प्रसिद्ध तुरूंग सिंगसिंगचे वॉर्डन लुइस लीस यांच्याशी अतिशय दीर्घ पत्रव्यवहार केला. त्यांचे म्हणणे आहे, ‘या तुरुंगातील खूप कमी गुन्हेगार स्वत:ला गुन्हेगार समजतात. आपल्या सर्वांसारखीच तीही माणसे आहेत. त्यामुळे स्वत:ला खरे ठरविण्यासाठी ते विविध प्रकारे तर्क वितर्क करीत असतात. आपण कोणावर तरी गोळी का चालविली किंवा एखादी तिजोरी का फोडली, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी कारणे असतात. याच तर्काच्या आधारे प्रत्येक गुन्हेगार स्वत:ला खरे सिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असतो. तसेच तो स्वत:ला शिक्षेसाठी पात्र असल्याचेही समजत नाही. ’

    जर अल कोपेन, ‘दोन नळ्यांची बंदूक’ क्रॉले, डच शोल्टेज किंवा मग तुरुंगामध्ये जाते फिरवणारे अनेक गुन्हेगार स्वत:ला दोषी समजत नसतील तर मग आपण ज्यांना रोजच या ना त्या निमित्ताने भेटत असतो, त्यांचे काय?

    अमेरिकन स्टोअर्सच्या साखळीचे संस्थापक मालक असलेले जॉन वानामेकर यांनी हे मान्य करून टाकले होते, ‘दुसर्‍या कोणाला तरी दोष देणे मूर्खपणाचे असल्याचे अनेक वर्षांपूर्वीच माझ्या लक्षात आले होते. आपल्या स्वत:च्या मर्यादा ओलांडण्यासाठी माझ्याकडे किती तरी अडचणी असताना देवाने सर्वांना एकसारखी बुद्धी दिली नाही म्हणून मी माझी डोकेफोड का करून घेऊ?’

    वानामेकर यांनी तर हा धडा लवकरच शिकला होता, पण मला हे शिकण्यासाठी तेहतीस वर्षे लागली. या दरम्यान माझ्याकडून किती तरी चुका झाल्या. तेव्हा कुठे माझ्या लक्षात आले की शंभरपैकी नव्ह्याण्णव लोक कधीही स्वत:ला दोष देत नाहीत. त्यांनी कितीही चुका केल्या असल्या तरीही त्यांना काही आपल्या

    चुका दिसत नाहीत. ते कधीही स्वत:ची निंदा करीत नाहीत. निंदा केल्यामुळे खरं तर कोणालाही काहीही लाभ होत नाही कारण त्यामुळे समोरची व्यक्ती आपला बचाव करायला लागते. कारणे सांगून तर्क द्यायला लागते. निंदा अतिशय धोकादायकही असते कारण त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या आत्मसन्मानास ठेच पोहोचते. मग त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल वाईट भावना भरली जाते.

    जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ बी एफ स्कीनर यांनी आपल्या प्रयोगातून हे सिद्ध करून दाखविले आहे की निंदा केल्यामुळे कोणतीही सुधारणा होत नाही. उलट निंदेमुळे त्या व्यक्तीशी असलेले आपले संबंध बिघडतात. हीच बाब प्राण्यांनाही लागू होते. ज्या प्राण्याला त्याच्या चांगल्या वागण्यासाठी बक्षिस दिले जाते तो प्राणी ज्या प्राण्याला त्याच्या वाईट वागण्यासाठी शिक्षा दिली जाते, त्याच्या तुलनेत जास्त वेगाने शिकते.

    थोर मनोविश्लेषक हैंस सेल्वनेही म्हटले आहे, ‘प्रत्येक व्यक्ती कौतुक आणि प्रेमाची भुकेली असते. प्रत्येक जण निंदेला घाबरत असतो.’ निंदा किंवा टीका केल्यामुळे कुटुंबातील सदस्य, मित्र, कर्मचारी, सहकारी अशा सर्वांचे मनोबल कमी होते. त्यामुळे त्यांच्या स्थितीत काहीही सुधारणा होत नाही.

    एनिड, ओकालहामाचे जॉर्ज बी. जांसटन एका इंजिनिअरिंग कंपनीत सुरक्षा अधिकारी या पदावर काम करीत होते. कार्यस्थळावर काम करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍यावर लक्ष ठेवणे, हेच त्यांचे काम होते. पूर्वी एखादा कर्मचारी हेल्मेट न घालता दिसला की ते संतापाने थरथरत असत. त्या कर्मचार्‍याला नियमाचे उदाहरण देत असत. त्याचा परिणाम असा होत असे की सदर कर्मचारी नाईलाजाने त्यांच्या समोर तर हेल्मेट घालीत असे, पण ते निघून गेले की काढून ठेवीत असे. त्यांनी यावर एखादी नवीन युक्ती शोधून काढण्याचा विचार सुरू केला. आता त्याला एखादा कर्मचारी हेल्मेटशिवाय दिसल्यावर तो त्याला विचारत असे की त्याला मिळालेले हेल्मेट आरामदायक नाही का? किंवा त्याच्या डोक्याला ते योग्य प्रकारे फीट बसत नाही का? बोलता बोलता तो कर्मचार्‍याला याचीही जाणीव करून देत असे की सदर हेल्मेट त्याच्याच सुरक्षिततेसाठी आहे, एखादे ओझे डोक्यावर द्यायचे म्हणून नाही. सर्व कर्मचार्‍यांनी मग आपली सुरक्षितता लक्षात ठेवून हेल्मेट वापरायला सुरूवात केली. तसेच मि. एर्निड बद्दल त्यांच्या मनात कोणतीही दुर्भावना निर्माण झाली नाही.

    निंदा किंवा टीका केल्यामुळे कोणत्याही समस्येवर उत्तर काढले जाऊ शकत नाही, याला इतिहास साक्षी आहे. सर्वात पहिले उदाहरण थियोडर रुझवेल्ट आणि राष्ट्रपती टॅफ्ट यांच्यातील वाद आहे. एक असा वाद ज्यामुळे रिपब्लिकन पार्टीचे विभाजन झाले. विड्रो विल्सन यांना व्हाईट हाऊसमध्ये बसण्यासाठी विवश करण्यात आले तसेच पहिल्या महायुद्धात मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये काही ओळी नोंदविल्या. इतकेच नाही तर इतिहासालाच वळण दिले. इ.स. १९०८ मध्ये रुझवेल्ट व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रपतीपदी निवड झालेल्या ट्रॅफ्ट यांना पूर्ण सहकार्य केले. मग सिंहाची शिकार करण्यासाठी रुझवेल्ट अफ्रिकेला गेले. ते परत येईपर्यंत परिस्थिती खूपच बदलली होती आणि ती पाहून ते प्रचंड संतापले. मग अनुदारवादासाठी त्यांनी ट्रॅफ्ट यांच्यावर निंदा करायला सुरुवात केली. तिसर्‍या वेळी स्वत:ला राष्ट्रपती करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. मग त्यांनी बूल मूस नावाच्या पक्षाची स्थापना केली आणि जी.एस.पीला जवळपास जमिनदोस्त करून टाकले. पुढच्या निवडणुकीत विल्यम हॉवर्ड ट्रॅफ्ट आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचा वाईटरित्या पराभव झाला. फक्त दोन राज्यांमध्ये म्हणजे ऊटा आणि वरमाँट मध़्येच त्यांचे प्रतिनिधी निवडून आले.हा या पक्षाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि लज्जास्पद पराभव होता.

    रुझवेल्ट यांनी पराभवासाठी ट्रॅफ्ट यांना जबाबदार धरले, पण राष्ट्रपती ट्रॅफ्ट यांनी कधी स्वत:ला यासाठी जबाबदार धरले असेल? कदाचित अजिबात नाही. ड़ोळ्यात आसवे आणि भरलेल्या गळ्याने ट्रॅफ्ट फक्त इतकेच म्हणाले, ‘मी जे काही केले त्याशिवाय दुसरे मी काय करू शकत होतो?’ शेवटी दोष कोणाचा होता? ट्रॅफ्ट यांचा कि रुझवेल्ट यांचा? कोणालाही हे माहीत नाही. मलाही माहीत नाही. अर्थात मला त्याची काही चिंताही नाही. मला फक्त इतकेच माहीत आहे की रुझवेल्ट यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात केलेली निंदाही ट्रॅफ्ट यांना आपण जबाबदार असल्याचे मान्य करायला लाऊ शकली नाही. तर मग या सर्व निंदेचा काय फायदा झाला? काहीच नाही. फक्त दोघांच्याही मनात एक दुसर्‍याबद्दल कडवटपणा मात्र निर्माण झाला. ट्रॅफ्ट तर आपणच योग्य असल्याचा तर्क करू लागले. दुसरे उदाहरण टीपॉट डोम ऑईल अफरातफरीचे घेऊ शकतो. १९२० च्या दशकात ही बातमी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर सातत्याने प्रकाशित होत होती. अमेरिकन लोक ही अफरातफर नेहमी आपल्या लक्षात ठेवतील. या फरातफरीतील काही तथ्ये अशा प्रकारची आहेत - हार्डिंगच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री अल्बर्ट बी फॉल यांना एल्फ हिल आणि डीपॉट डोमची सरकारी तेल भांडारे भाड्याने द्यायची होती. काही अशा प्रकारची तेल भंडारे नौसेनेच्या भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवण्यात आली होती. फॉल यांनी त्याचा न लिलाव केला वा त्यासाठी टेंडर मागविले. त्यांनी आपले मित्र एडवर्ड एल. डोहोनी यांच्या पुढे समारंभपूर्वक सादर केली. ड़ोहोनीनेही लगेच दहा लाख डॉलर ‘कर्ज’असे नाव देऊन फॉल यांना दिले. त्यानंतर फॉल यांनी जिल्ह्यातील युनायटेड स्टेटस मेरिसला एल्क हील तेल भांडारातून गळणारे तेल जमा करणार्‍या प्रतिस्पर्ध्यांना तेथून हटविण्याचा आदेश दिला. या प्रतिस्पर्धी कंपन्यांना बंदुकी आणि संगीनीच्या धाकाने तिथून हटविण्यात आल्यावर त्यांनी निराश आणि दु:खी होऊन न्यायालयात दाद मागितली. मग टीपॉट डोम अफरातफरीचे इंगित उघडकीस आले. मग तर जणू काही गोंधळाची स्थिती निर्माण झाली. हार्डिंग सरकारावर धोक्याचे आणि संकटाचे ढग फिरू लागले. सर्व देश थरथरला. रिपब्लिकन पार्टीचे भवितव्य अंधकारमय झाले. शेवटी याचा परिणाम म्हणून अल्बर्ट बी. फॉल यांना तुरुंगाची हवा खावी लागली.

    फॉल यांच्यावर तर जणू काही टीकेचे बरसात झाली होती. अशा प्रकारची जाहिर निंदा फार कमी लोकांना सहन करावी लागते, पण त्यापैकी कोणावर तरी त्याचा काही परिणाम झाला आहे का? त्यांनी कधी पश्चाताप व्यक्त केला? त्यांना कधी आपल्या चुकीची जाणीव झाली? कधीच नाही. अनेक वर्षानंतर एका सार्वजनि भाषणामध्ये हार्बर्ट ह्यूवर म्हणाले की राष्ट्रपती हार्डिंग यांचा मृत्यू एखाद्या सामाजिक धक्क्यामुळे झाला होता. कारण त्यांच्या एका मित्राने त्यांचा विश्वासघात केला होता. हे ऐकल्यावर श्रीमती फॉल तर सुन्न झाल्या. त्या रडत रडत म्हणाल्या, ‘काय? हार्डिंग यांच्याशी फॉल विश्वासघात करतील? माझे पती तर कधीही कोणाचा विश्वासघात करण्याचा विचारही करू शकत नाहीत. सोने -चांदी आणि हीर्‍या-मोत्यांनी भरलेले घरही माझ्या पतीचा विश्वास डळमळीत करू शकत नव्हते. त्यांना कोणीही चुकीचे काम करायला भाग पाडू शकत नव्हते. विश्वासघात तर उलट त्यांच्याशी करण्यात आला आणि त्यांनाच बळीचा बकरा बनवून फासावर लटकविण्यात आले.’

    हाच तरी मानवी स्वभाव आहे. प्रत्येक जण हेच तर करीत असतो. प्रत्येक गुन्हेगार आपले आरोप दुसर्‍याच्या डोक्यावर फोडीत असतो. कधी त्यासाठी तो विरोधी परिस्थितीला जबाबदार धरतो, पण तो आपल्यावर मात्र डाग लागू देत नाही. त्यामुळे यापुढे कोणाचीही निंदा करताना अल कोपेक, ‘दोन नळीची बंदूक’ क्रॉले आणि अल्बर्ट हॉल यांची नक्कीच आठवण ठेवा. निंदा तर बूमरॅंग होऊन परत आपल्याकडेच येत असते. म्हणजेच निंदा करणार्‍या व्यक्तीला स्वत:चीच निंदा सहन करावी लागते. तसेच आपण ज्या व्यक्तीची निंदा करीत आहोत किंवा ज्या व्यक्तीला सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत, ती व्यक्ती एक तर तो फरक पुसून टाकण्यासाठी एखादा युक्तिवाद करू शकते किंवा ट्रॅफ यांच्याप्रमाणे नम्रपणे कबूल करून टाकतो, ‘मी जे काही केले त्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता’ असे म्हणू शकतो; हे आपण लक्षात ठेवायला हवे.

    १५ एप्रिल १८६५ च्या सकाळी एका स्वस्त लॉजिंग हाऊस मधील मोठ्या हॉलमध्ये अब्राहम लिंकन यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. हा हॉल फोर्ड थिएटरच्या अगदी समोर होता आणि इथेच जॉन विल्किस बूथने लिंकन यांचे शरीर गोळ्यांनी चाळणी केले होते. लिंकन यांचे ते अंथरूण त्यांच्या दृष्टीने विचार करता खूप लहान होते. रॉज बॅन्हारची प्रसिद्ध पेंटिंग्ज ‘द हयर्स फेअर’ ची स्वस्त नकल त्याच्यावर टांगलेली होती. बाजूला लावलेली एक गॅस बत्ती पिवळा प्रकाश टाकीत होती. संरक्षण मंत्री स्टॅटिन लिंकनच्या पार्थिवा समोर उभे राहून लोकांना म्हणाले, ‘लोकांच्या हृदयावर राज्य करणारा जगातील सर्वश्रेष्ठ सत्ताधिश आज आपल्याला सोडून निघून गेला आहे.’

    लोकांची मने जिंकण्याची लिंकन यांच्यामध्ये अशी कोणती कला होती? त्यांच्या सफलतेचे काय रहस्य होते? पूर्ण १० वर्षे मी लिंकन यांची अनेक चरित्रे वाचली आहेत. ‘लिंकन द अननोन’ हे पुस्तक लिहायला तर मला पूर्ण तीन वर्षे लागली. लिंकन यांचे घरगुती आणि सार्वजनिक जीवन, तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास माझ्याप्रमाणे इतर कोणी केला असेल असे मला वाटत नाही, याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. लिंकन लोकांसोबत कशा प्रकारे वागत असत याचाही मी अभ्यास केला आहे. ते

    Enjoying the preview?
    Page 1 of 1