Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

पाळक करतात त्या दहा मुख्य चुकां
पाळक करतात त्या दहा मुख्य चुकां
पाळक करतात त्या दहा मुख्य चुकां
Ebook153 pages1 hour

पाळक करतात त्या दहा मुख्य चुकां

Rating: 5 out of 5 stars

5/5

()

Read preview

About this ebook

आपण सर्वच अनेक चुकां करतो असे बायबल म्हणते—ह्यापासून पाळक मुक्त नाहीत. चुकांची एक प्रवृत्ती आहे की त्यां आपल्याला पुढे घेऊन जाण्याऐवजी मागे घेऊन जातात. चूक आपल्याला प्रगती करण्यापासून रोखू शकते. कोणती संभाव्य चूक पाळक करू शकतो? पाळकाच्या कोणत्या दहा प्रमुख चुकां असू शकतात? ह्या आश्चर्यकारक पुस्तकाच्या प्रत्येक पानास वाचण्यासाठी तुम्हांला ह्यासाठी निमंत्रण दिले जात आहे की कोणत्या चुकां करण्याच्या धोक्यांत तुम्ही आहात आणि पाळक करू शकतील अशा चुकांना कसे टाळले जाऊ शकते हे तुम्ही स्वत: शोधून काढावे. हे सर्वस्वी महत्वाचे पुस्तक तुम्हांला आणि तुमच्या सेवाकार्याला आशीर्वादित ठरेल.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354417
पाळक करतात त्या दहा मुख्य चुकां
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to पाळक करतात त्या दहा मुख्य चुकां

Related ebooks

Reviews for पाळक करतात त्या दहा मुख्य चुकां

Rating: 5 out of 5 stars
5/5

1 rating0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    पाळक करतात त्या दहा मुख्य चुकां - Dag Heward-Mills

    बरेच पाळक त्यांच्या सेवाकार्याच्या प्रगतीविषयी फार मंद असतात. कधी कधी त्यांना प्राप्त देवाच्या पाचारणाचे पालन करण्यासंबंधित ते मंद असतात. कदाचित, हे त्यांच्या मंदबुद्धी आणि निरुत्साही स्वभावामुळे असेल. सेवाकार्यामध्ये मंदपणा हा फार धोकादायक असतो. आपल्या जीवनातील निर्धारांपैकी एक निर्धार म्हणजे पुढे जाण्याची आपली गति.

    देवाच्या समयानुसार काय वेळ आहे? एकाच वेळी चालत असलेल्या तीन वेळां आहेत. माझी वेळ, तुमची वेळ, आणि ती वेळ.

    त्यावरून येशू त्यांना म्हणाला, माझा समय अजून आला नाही; तुमचा समय तर सर्वदा सिद्ध आहे.

    योहान ७:६

    तुमच्या घड्याळाकडे आता पाहा. स्वाभाविक क्षेत्रांत हा तुमचा वेळ आहे. इतर दुस-याच्या घड्याळाकडे पाहा. त्याची ती वेळ आहे. परंतु काय वेळ आहे?

    वास्तविक जीवनांत, प्रयेक घड्याळाच्या वेळांत थोडासा फरक असतोच. उशिरा जाण्याच्या सवयीवर काबू करण्यासाठी माझे घड्याळ मी पंधरा मिनिटे पुढेच ठेवले आहे. इतर लोकांकडे अधिक अचूक घड्याळे आहेत. ही घटना प्रत्येकाला अनेक विविध वेळांची वाढ देते.

    आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, आपल्या सर्वांच्या विविध वेळां आहेत. माझी वेळ तुमच्या वेळेपेक्षा वेगळी आहे. आणि म्हणून येशूने म्हटले की, माझा समय अजून आला नाहीप तुमच असमया तर सर्वदा सिद्ध आहे.

    कांही वर्षांपूर्वी, डायना राजकुमारीने, अचानक ह्या जगातून शोकान्तिक निर्गमन केल्यामुळे ह्या जगाला तिने धक्का दिला. तिने मरावे अशी कोणीहि अपेक्षा केली नव्हती. रविवारी सकाळी ती मेली अशी कोणीहि अपेक्षा केली नव्हती,

    ती मरण्याच्या एक आठवड्यापूर्वी, जर तुम्ही मला विचारले असते, वेळ काय आहे? मी म्हटले असते, रविवारच्या सकाळची वेळ आणि चर्चला जाण्याची वेळ आहे. जर तुम्ही तिला हाच प्रश्न विचारला असता तर तिने कदाचित उत्तर दिले असते की, ही दुस-या रविवारची सकाळ आहे आणि थोड्या दिवसांपूर्वी मी फ्रान्स येथील माझ्या प्रियकराबरोबर राहण्यांस जाणार आहे. परंतु प्रत्यक्षांत तिच्या मरणाला सात दिवस होते. दुर्दैवाने तिला हे माहित नव्हते.

    मरण्यापूर्वी रविवारी, ती तिच्या मिसरी प्रियकराबरोबर पॅरिस येथे संध्याकाळचे जेवण खात होती. जर कोणी तुम्हांला विचारले असते की, ही काय वेळ आहे? तुम्ही कदाचित म्हटले असते, आठ वाजले आहेत. जर तिला कोणी विचारले असते तिने कदाचित म्हटले असते, ही शनिवारची रात्र आहे, आणि ही प्रेम करण्याची आणि चांगल्या भविष्याबद्दल स्वप्न पाहाण्याची वेळ आहे. परंतु ते चुकीची होती; अंत होण्यापूर्वी तिच्यासाठी वास्तविक वेळ दोन तासांचा होता. ती तिच्या अंत्य विधीच्या केवळ एक आठवडा जवळ होती.

    "माझी वेळ" मी माझ्या जीवनाच्या वेळापत्रकानुसार जेथे असतो त्याबद्दल हे सांगते. तुमची वेळ, तुम्ही तुमच्या जीवनाच्या वेळापत्रकानुसार जेथे असता त्याबद्दल हे सांगते," आणि ही वेळ, आपण देवाच्या संपूर्ण वेळापत्रकानुसार जेथे असतो त्याबद्दल हे सांगते.

    ब-याच लोकांना अज्ञानत असे पृथ्वीवरील हे जीवन अगदी वेळे-संबंधित आहे. प्रत्येक अनुदेश किंवा संधी ही वेळे-संबंधित आहे. हे ऐका आणि फार चांगल्याप्रकारे ऐकून घ्या: देवाने तुम्हांला दिलेल्या प्रत्येक अनुदेशासोबत एक घड्याळ लावलेले आहे. देव जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हापासून उलट मोजणी सुरु होते. ते कर्तव्य पार पाडण्याची उपलब्ध वेळ ही जाणा-या प्रत्येक तासाने कमी होते. बरेच लोकांना ते योग्य संधीची प्रतिक्षा करीत आहेत आणि नंतर ते देवाचे बोलणे गंभीरतेने घेतील असे वाटते. तुमची फसवणूक होऊ देऊ नका! तुमच्या अतिरिक्त कालावधीची कालबाह्यता तारीख जलद येत आहे.

    जसे मी म्हटले, राजकुमारी डायना ही कदाचित तिच्या लग्नाची तयारी करीत असावी. ती येथून कायमचे निघून जाण्याच्या रात्रीपासून दूर नव्हती हे तिला माहित नव्हते. ती सर्वांत मोठ्या अशा दफनक्रियेचा विषय होणार होती ह्या सत्याबद्दल तिला माहिती नव्हती. तिला वेळ माहित नव्हती.

    तुम्हांला वेळ माहित आहे का?" आपल्याला वेळ माहती आहे का?

    जर देवाने तुम्हांला कांही काम करण्यांस सांगितले आहे तर घड्याळाचा कांटा पुढे सरकत आहे. अशी वेळ येईल की तुम्ही तो अनुदेश पूर्ण करू शकणार नाही.

    कधी कधी देव माझ्या राज्यासाठी आर्थिक साहाय्य करा असे तुम्हांला सांगतो. कदाचित पांच वर्षांच्या कालावधीत त्याचे तुम्ही पालन करू शकता. कदाचित तो तुम्हांला सांगेल की, मिशनरी म्हणून जा. कदाचित त्या अनुदेशामध्ये दहा वर्षांची मुदत असू शकेल. कांही लोक त्या मुदतीमधील आठ वर्षें इतर कामें करण्यांत घालवितात आणि नंतर शेवटची दोन वर्षें देवाची आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांची वेळ जवळ जवळ पूर्ण झालेली असते. उरलेल्या त्या दोन वर्षांत प्रभावशाली असे कांहीहि करता येणार नाही.

    एके दिवशी, देव आपल्या जीवनातील वेळेच्या घटकास काढून टाकणार आहे. ह्याची प्रकटीकरणाच्या पुस्तकांत भविष्यवाणी केली आहे जेथे त्याने शपथ घेतली आहे की येथून पुढे वेळ असणार नाही. परंतु तोपर्यंत आपण जे सर्व कांही करणार ते सर्व घड्याळाच्या टिकटिक आवाजाशी संबंधित आहे.

    प्रिय ख्रिस्ती जन, त्याला सदासर्वकाळ प्रसन्न केले पाहिजे असे जर तुम्हांला वाटत असेल, तर तुम्ही सर्वाधिक प्रकारच्या फसवेगिरीमध्ये राहात आहात.

    आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यांत जे कांही आहे, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते, आणि समुद्र व त्यांत जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले: आणखी अवकाश लागणार नाही.

    प्रकटीकरण १०:६

    सर्वांचा कांही उचित काळ म्हणून असतो; भूतलावरील प्रयेक कार्याला समय असतो.

    उपदेशक ३:१

    मी एक पुस्तक वाचले ज्यांत लेखक असे म्हणतो की, जी पुस्तकें तुम्ही लिहिण्याचे ठरविले आहे ती लिहा आणि ते आताच लिहा. त्याने पुढे असे म्हटले, "तुमच्या जीवनाच्या दुस-या टप्प्यावर, तुम्ही तेव्हा ज्या गोष्टीं लिहिल्या असत्या

    Enjoying the preview?
    Page 1 of 1