Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

दुष्ट आत्मे आणि त्यांच्याशी कसा व्यवहार कराल
दुष्ट आत्मे आणि त्यांच्याशी कसा व्यवहार कराल
दुष्ट आत्मे आणि त्यांच्याशी कसा व्यवहार कराल
Ebook224 pages1 hour

दुष्ट आत्मे आणि त्यांच्याशी कसा व्यवहार कराल

Rating: 5 out of 5 stars

5/5

()

Read preview

About this ebook

डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354219
दुष्ट आत्मे आणि त्यांच्याशी कसा व्यवहार कराल
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to दुष्ट आत्मे आणि त्यांच्याशी कसा व्यवहार कराल

Related ebooks

Reviews for दुष्ट आत्मे आणि त्यांच्याशी कसा व्यवहार कराल

Rating: 5 out of 5 stars
5/5

1 rating0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    दुष्ट आत्मे आणि त्यांच्याशी कसा व्यवहार कराल - Dag Heward-Mills

    अध्याय १

    दुष्टात्म्याच्या उपक्रमाची अंतिम प्रतिकृती

    मग ते समुद्राच्या पलीकडे गरसेकरांच्या देशात आले. 

    आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरांतून निघून त्याला भेटला. तो कबरांत राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडेतुकडे केले होते; आणि त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. 

    तो नेहमी, रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगडाधोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. 

    येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला; आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, ‘तू मध्ये का पडतोस?’ मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस. कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या, ह्या माणसातून नीघ. 

    त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य; कारण आम्ही पुष्कळ आहोत. आणि आम्हांला ह्या देशातून घालवू नकोस अशी तो त्याला आग्रहाने विनंती करत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा भुतांनी त्याला विनंती केली की, आम्ही त्या डुकरांत शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हांला पाठवून दे. 

    मग त्याने त्यांना परवानगी दिली; तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरांत शिरले, आणि तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला. डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतामळ्यांत हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले. 

    ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्याच्यात सैन्य होते तो, बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला; आणि त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा ‘आपण आमच्या प्रांतातून निघून जावे’ असे ते त्याला विनवू लागले. 

    मग तो मचव्यावर जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की, ‘मला आपल्याजवळ राहू द्या.’ परंतु येशूने त्याला येऊ दिले नाही, तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा; प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. 

    तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस प्रांतात जाहीर करू लागला; तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले.

    मार्क ५:१-२०

    गरसेकरांच्या देशातील वेड्या माणसाचा अभ्यास म्हणजे दुष्ट आत्म्याच्या उपक्रमाचे रोगनिदान अभ्यास आहे. तुम्ही केवळ या प्रकरणाचा अभ्यास करून सैतान आणि दुष्ट आत्मा यांच्याबद्दल अनेक गोष्टी शिकाल. अनेक लोकांना रोगनिदान कशाबद्दल आहे याचे आश्चर्य वाटते. आपण अनेकदा विचार करतो की का कोणीतरी मृत शरीराचा अभ्यास करण्यासाठी आपला वेळ खर्च करतो. एक वैद्यकीय विद्यार्थी या नात्याने मला हे समजले नाही की, मृत व्यक्तीचे विच्छेदन करण्यात डॉक्टरांनी आपला वेळ घालवणे किती महत्त्वाचे होते. मला वाटले होते, एकदा ते मेले तर, ते मेले होते, त्यांना एकटे सोडा!

    तथापि, मला समजले की रोगनिदानशास्त्र हे मानवी शरीरावरील विविध रोगांच्या प्रभावाचा अभ्यास आहे. हा रोगाचा अंतिम परिणामांचा अभ्यास आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, एखाद्या रोगास पसरू दिले तर काय होईल हे समजून घेण्यासाठी, आपण रोगनिदान शास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अनेकदा, केवळ मृत शरीरातच, आपल्याला रोगांचा अंतिम परिणाम दिसून येईल.

    उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या मनुष्याच्या मृत शरीराचे विच्छेदन केले, जो दीर्घकालीन उच्च रक्तदाबामुळे मरण पावला होता तर, तुम्हांला त्याचे हृदय, त्याच्या रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडांत बदल दिसतील. हे बदल या रोगाने पिडीत असलेल्या जिवंत लोकांवर उच्च रक्तदाबाचा काय परिणाम करतात हे समजून घेण्यास तुम्हांला मदत करतात.

    एखाद्या विशिष्ट रोगाच्या पूर्ण विकसित प्रकटीकरणाचा अनुभव आलेल्या मृत शरीराचा अभ्यास करून डॉक्टर त्या रोगांविषयी अधिक समजून घेतात. त्याचप्रमाणे गरसेकरांच्या देशातील भूतग्रस्त माणसाचा अभ्यास करून तुम्ही मानवामधील दुष्ट आत्म्याच्या अंतिम उपक्रमाचा परिणाम समजून घेऊ शकता.

    गरसेकरांच्या देशातील वेड्या माणसाची कहाणी, उच्चतम प्रकारचा दुष्ट आत्म्याच्या घुसखोरीचा एक अभ्यास आहे. जर सैतानाला संधी मिळाली तर तो तुमच्या जीवनाचे काय करेल याचे हे प्रकटीकरण आहे. वेड्या माणसाच्या अस्तित्वाचे प्रत्येक वैशिष्ट्य सैतानी गुण प्रकट करते. त्याची स्थिती तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी असलेल्या सैतानाच्या दृष्टीकोनातून विविध पैलू दाखविते. जर सैतानाला आपल्या जीवनात संधी मिळाली तर तुमचा आणि माझा शेवट त्याच स्थितीत झाला असता.

    जरी बहुतेक लोक गरसेकरांच्या देशातील वेड्या माणसाप्रमाणे पूर्ण वेडे होणार नाहीत तरी आपल्यापैकी बहुतेकांना कमी परिमाणात या समान दुष्ट आत्म्याचा अनुभव येईल, जो या वेड्या माणसामध्ये दाखवला गेला आहे.

    गरसेकरांच्या देशातील वेड्या माणसाची साक्ष आपल्याला तीन गोष्टी दाखवते.

    १. जर दुष्ट आत्म्यांना संधी मिळाली तर ते तुम्हांला काय करतील? 

    २. दुष्ट आत्मे लोकांसोबत काय करत आहे, तथापि हे ते सर्व हळुहळू करत असतात.

    ३. एका व्यक्तीची अंतिम अवस्था ज्याच्यामध्ये दुष्ट आत्म्यांच्या पूर्ण प्रभाव आहे?

    तुम्ही हे पुस्तक वाचत असताना, देव तुम्हांला दुष्ट आत्म्यांची कार्ये व त्यांचा तुमच्यावर कसा परिणाम होतो हे तुम्हांला प्रकट करेल.

    तुम्ही हे पुस्तक वाचून पूर्ण कराल, तेव्हा तुम्ही दुष्ट आत्म्याच्या क्रियाकलापापासून मुक्त झालेला असाल.

    अनेक जण असे मानतात की, गरसेकरांच्या देशातील वेड्या माणसाची गोष्ट ही एका विक्षिप्त व्यक्तीची कथा आहे जो एका मानसिक अवस्थेशी संबंधित होता. ते स्वत: असा विचार करता की, "मी एक वेडा मनुष्य नाही म्हणून, ही गोष्ट माझ्याशी संबंधित नाही. या विपरीत, ही साक्ष आपल्या सर्वांशी संबंधित आहे.

    कोणत्याही युद्धात जिंकण्यासाठी आपल्या शत्रूचा क्रियाकलाप आणि हेतू समजून घेणे महत्त्वाचे असते. जर तुम्ही दुष्ट आत्म्या विरुद्ध लढाई जिंकू इच्छिता तर तुम्हांला हे माहीत असायला पाहिजे की, तुमचा शत्रू कोठे आणि कधी कार्य करतो. शत्रू तुमच्या विरोधात कशाची योजना करत आहे तुम्हांला माहित असणे आवश्यक आहे.

    अशा हेतूने की, आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये; त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.

    २ करिंथ. २:११

    अध्याय २

    अंधकार - दुष्ट आत्म्याचे घर

    कारण आपले झगडणे... सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर,...आहे.

    इफिस. ६:१२

    या जगाचा अंधकार हा दुष्ट आत्म्यांचे घर आहे. अंधकार अशा वातावरणाविषयी बोलतो ज्यात दुष्टता वृद्धिंगत होते. सैतान या जगाच्या अंधारात राज्य करतो. फसवणूक हा एक प्रकारचा आध्यात्मिक अंधार आहे. याचे कारण असे की फसवणुकीचे वातावरण दुष्ट आत्म्यांसाठी प्रजनन स्थळ आहे.

    अंधकार केवळ फसवणुकीचे एक असे वातावरण आहे ज्यात सैतान कार्य करतो. आपला पराभूत शत्रू निबिड अंधारात वृद्धिंगत होतो. जेव्हा तो बाहेर प्रकाशात येतो तेव्हा त्याचे काहीच चालत नाही. म्हणूनच सैतान देवाच्या वचनाचा इतका द्वेष करतो.

    येशू हा प्रकाश आहे जो मनुष्यांवरील सैतानाचा प्रभाव नष्ट करतो. तो देवाचा शब्द आहे. देवाचा शब्द प्रकाश आहे जो अंधारात प्रकाशतो. परमेश्वराचे वचन जिथे शिकवले जाते तेथे सैतानाचा क्रियाकलाप मोठ्या प्रमाणात कमी केला जातो.

    तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही.

    योहान १:५

    मंडळीच्या विरोधात असलेल्या सैतानाच्या शक्तीची तुलना आजच्या जगातील अनेक युद्धांशी आणि संघर्षांशी करता येईल. जेव्हा महाबलशाली सैन्य निम्न श्रेणीच्या सैन्याशी लढाई करते तेव्हा, कमकुवत असलेल्या पक्षाला माहित असते की, खुल्या परंपरागत युद्धात त्यांचा टिकाव लागणार नाही. म्हणून हा पक्ष लपून बसतो आणि गुप्त, कपट आणि काळोखाच्या स्थानाहून लढाई लढतो. याचे रुपांतर सहसा गनीमी युध्द आणि दहशतवादी कार्यात होते.

    उदाहरणार्थ, इस्राएलाचे सैन्य पलिष्टी सैन्यांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे; पलिष्टी सैन्य इस्राएलच्या लष्करी सामर्थ्यासमोर टिकाव धरू शकत नाही. इस्राएलला परमाणु ऊर्जा संपन्न असेही म्हटले आहे. पलिष्टी सैन्य टिकाव धरू शकत नाही म्हणून ते आत्मघाती हल्यांचा आणि दहशतवादी कृत्यांचा सहारा घेतात. इस्राएलची विमानांचे अपहरण करणे आणि इस्राएलच्या ऑलिम्पिक संघातील सदस्यांना ठार मारणे ही काही युद्धाची साधने आहेत जी कमकुवत सैन्य वापरते.

    ११ सप्टेंबर रोजी झालेला दहशतवादी हल्ला हा कमकुवत आणि लहान असलेल्या सैन्याचा बलाढ्य सैन्याशी लढण्याचे आणखी एक उदाहरण आहे. अशाच प्रकारे, दुष्ट आत्म्यांची सेना मंडळी विरुद्ध व्यूह रचना करते, जी परमेश्वराच्या सामर्थ्याची बरोबरी करू शकत नाही. आपल्या युद्धाची शस्त्रे समर्थ आहेत.

    कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत.

    २ करिंथ. १०:४

    येशूच्या नावाचा उल्लेख केल्यास सैतान थरथरतो. आपण रक्ताविषयी गातो तेव्हा दुष्ट

    Enjoying the preview?
    Page 1 of 1