Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

तुम्ही सामर्थी ख्रिस्ती कसे होऊ शकता
तुम्ही सामर्थी ख्रिस्ती कसे होऊ शकता
तुम्ही सामर्थी ख्रिस्ती कसे होऊ शकता
Ebook211 pages1 hour

तुम्ही सामर्थी ख्रिस्ती कसे होऊ शकता

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

तुमचा प्रभु व तारणारा म्हणून येशू ख्रिस्त ह्याला प्राप्त केल्यावर तुम्ही पुन्हा नव्याने जन्मलेले ख्रिस्ती आहात आणि तुमचे नाव जीवनी पुस्तकात लिहिले आहे. तुमचा प्रश्न हा आहे की: “घेण्यासाठी पुढले पाऊल काय आहे?” ख्रिस्ती बनणे हे एक चांगले पाऊल आहे, पण ही फक्त सुरुवात आहे. तुम्हाला एक चांगले, मजबूत ख्रिस्ती व्हायला पाहिजे. 'तर मी हे कसे करू?' - या श्रेष्ठ पुस्तकामध्ये, तुम्ही पाऊल कसे टाकावे, आणि दृड ख्रिस्ती कसे व्हावे जो मृत्यू आणि स्वर्गात उचलेले जाण्यास तयार असेल.

Languageमराठी
Release dateAug 28, 2018
ISBN9781641354530
तुम्ही सामर्थी ख्रिस्ती कसे होऊ शकता
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to तुम्ही सामर्थी ख्रिस्ती कसे होऊ शकता

Related ebooks

Reviews for तुम्ही सामर्थी ख्रिस्ती कसे होऊ शकता

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    तुम्ही सामर्थी ख्रिस्ती कसे होऊ शकता - Dag Heward-Mills

    अध्याय १

    सामर्थी ख्रिस्ती होणे म्हणजे काय

    आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये व त्यांच्या पराक्रमाच्या शक्तिमध्ये सबळ व्हा. 

    इफिसकरांस ६:१०

    र्सव बायबल मध्ये ख्रिस्ती लोकांना सशक्त होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. सशक्त व्हा हे वाक्य सपूर्ण बायबल मध्ये तुम्हाला खूप वेळा दिसेल. सशक्त होण्यासाठी स्वताला बळकट करणे आवश्यक आहे.  बहुतेक मसीह जन आपल्या शरीराने मजबूत असतात, राजकारणात मजबूत असतात, शिक्षणात मजबूत असतात, व्यवसायात मजबूत असतात, नातेसंबंधात मजबूत असतात परंतु प्रभूमध्ये दृढ नसतात.  आपण प्रभूमध्ये दृढ असणे आवश्यक आहे याच्यावर परमेश्वर भर देतात. परमेश्वरा मध्ये मजबूत होणे म्हणजे एक सशक्त मसीह होणे होय. खूप जन परमेश्वराला जाणून घेण्यासाठी येतात पण ते कधीही परमेश्वरा मध्ये सशक्त होत नाहीत.  ते आयुष्यभर आध्यात्मिक कमजोर राहतात. हे पुस्तक तुम्हाला चांगले आणि सशक्त मसीह कसे व्हावे हे शिकवेल. बर्याच गोष्टी आहेत जे एका चांगल्या मजबूत मसीह लोकांचे व्यक्तिचित्रण करतात.  जर तुम्ही एक मजबूत विश्वासू होणार असाल तर तुम्हाला हे सर्व गुणधर्म विकसित करणे आवश्यक आहे. मजबूत मसीह होण्यासाठी तुम्हाला प्रभूमध्ये आध्यात्मिकता, उत्साह, परिपक्वता, पवित्रता आणि स्थिरता विकसित करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला एक सशक्त मसिह म्हंटले जावे तर तुम्हच्या जीवनातील खूप सार्या भागाना विकसित करणे आवश्यक आहे. ही सपूर्ण पुस्तक या भागांना विकसित करण्याच्यासाठी आहे जे तुम्हाला एक सशक्त मसिह होण्यासाठी प्रेरित करते. तुम्ही प्रभूमध्ये दृढ होऊ इच्छित असल्यास तुम्हाला नऊ भागाचे विकास करणे आवश्यक आहे जे खाली सूचीबद्ध केले आहेत: 

    १. एक सामर्थी ख्रिस्ती होणे म्हणजे एक सखोल ख्रिस्ती जीवन विकसित करणे होय.

    तुझ्या धबधब्याच्या आवाजाने जणू काय लोंढा लोंड्याला बोलावीत आहे; तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ मजवरून गेले आहेत.

    स्तोत्र ४२:७

    २. सामर्थी ख्रिस्ती होणे म्हणजे दृढ होणे होय.

    यास्तव माझ्या प्रिय बंधुनो, प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहा; म्हणून   तुम्ही स्थिर, अढळ व प्रभूच्या कामामध्ये अति तत्पर असा.

    १ करींथकरास१५:५८

    ३. सामर्थी ख्रिस्ती होणे म्हणजे अस्थिर होणे होय. 

    यास्तव माझ्या प्रिय बंधुनो, प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहा; म्हणून   तुम्ही स्थिर, अढळ व प्रभूच्या कामामध्ये अति तत्पर असा.

    १ करींथकरास१५:५८

    ४. सामर्थी ख्रिस्ती होणे म्हणजे अध्यात्मिक होणे होय.

    बंधूजनहो, जसे आत्मिकाबरोबर बोलावे तसे तुम्हाबरोबर माझ्याने बोलवले नाही, तर जसे दैहिकाबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकाबरोबर, तसे बोलावे लागेल. 

    १ करींथकरास ३:१

    ५. सामर्थी ख्रिस्ती होणे म्हणजे पवित्र होणे होय. 

    सर्वाबरोबर ‘शांतिने राहणे’ व ज्यावाचून कोणास प्रभूचे दर्शन होत नाही असे पावित्रकरण, ‘ त्याच्या पाठीस लागा’.

    इब्री लोकांस१२:१४

    ६. सामर्थी ख्रिस्ती होणे म्हणजे परिपक्व होणे होय.

    यासाठी की आपणा यापुढे बाळासारखे असू नये, म्हणजे मनुष्याच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गाच्या नेण्यार्या व्युक्तीने, उपदेशरूपी प्रत्येक वार्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.

    इफिसकरांस४:१४

    ७. सामर्थी ख्रिस्ती होण्यासाठी एखाद्या उत्साहाने नेहमीच उत्साहवर्धक असले पाहिजे. प्रभूमध्ये सामर्थी असणे हे आवेशाने भरलेले असणे होय.

    तुमच्यासंबधाने योग्य सदासर्वदा खटपट करावी हे चांगले आहे, आणि हे मी तुम्हाजवळ आहे तेंव्हाच केवळ व्हावे असे नाही. 

    गलतीकरांस४:१८

    ८. एक सामर्थी ख्रिस्ती होणे म्हणजे फलदायी होणे होय.   

    तुम्ही मला निवडिले नाही, तर मी तुम्हास निवडिले व तुम्हास नेमिले आहे, ह्यात हेतु हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे; आणि जे काही तुम्ही माझ्या नामाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. 

    योहान १५:१६

    ९. एक सामर्थी ख्रिस्ती होणे म्हणजे कोणत्याही वेळी परमेश्वराला भेटण्याची तयार राहणे होय.

    यास्तव हे इस्राएला, मी तुला असेच करीन, मी तुला असेच करीन, म्हणून हे इस्राएला, आपल्या देवासमोर येण्यास सिध्द ऐस

    अमोस ४:१२

    आपण स्वतःला बळकट करण्याचे सहा कारण

    १. तुम्हाला दुर्जनांवर मात करता यावे म्हणून स्वतःला बळकट करा.

    बापानो, मी तुम्हास लिहले आहे, कारण जो प्रारंभापासून आहे त्याचे ज्ञान तुम्हास झाले आहे. तरुणांनो मी तुम्हास लिहले आहे, कारण तुम्ही सबळ आहा, तुम्हामध्ये देवाचे वचन राहते, आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. 

    १ योहान २:१४

    दुष्ट मनुष्य दुबळा नाही. फक्त जेंव्हा तुम्ही सामर्थी असाल तेंव्हाच दुष्टावर मात करू शकता. जर तुम्ही शत्रू सोबत विनोद कराल, तर तुम्हा स्वत: ला दोष ठरवावे लागेल. सैतानाशी लढा करणे म्हणजे एका अनुभवी योद्धाशी लढण्या सारखे आहे जो खूप लढाया पाहिलेल्या आहेत. सैतान अनेक वर्षांपासून अनेक ख्रिस्ती लोकां सोबत लढले आहे. ख्रिश्चनांचा नाश करण्यात आणि त्यांना प्रलोभन देण्यात तो अनुभवी आहे. येशू जिवंत असताना सैतान जिवंत होता. तो एक नवीन नाही, पण तुम्ही आहात! उठून उभा राहा आणि बलवान व्हा; म्हणजे तुम्ही दुष्ट लोकांचा पराभव कराल.

    मी माध्यमिक शाळेत होतो तेव्हा, मला दुष्ट वरिष्ठांद्वारे त्रास दिला जात होता. मी फक्त एक वर्षापूर्वी माझ्यासमोर असणाऱ्या लोकांना सर्व प्रकारच्या छळ आणि शिक्षा देऊन मला त्रास दिला. या काळात, मला मानवजातीच्या हृदयात अस्तित्वात असलेली दुष्टता किती खोल आहे याची मला जाणीव झाली. हे तेरा आणि चौदा वर्षांचे युवक माझ्यावरील अंतिम शक्तीचा वापर करतात कारण ते एक वर्षाने पुढे होते.

    काहीवेळा मला ज्याला 'माकड नाच' म्हणतात ते करण्यास संगितले. इतर वेळी मला 'टॉवर ऑफ लिबर्टी' दंड करण्यास सांगण्यात आले होते. कधी कधी, मला 3:00 पर्यंत शौचालये आणि स्नानघरांना मांजावे लागले. कधीकधी मला पाच किलोमीटरच्या अंतरावर माल्मुत्राच्या अनेक बादल्या वाहून घेऊन जावे लागले. काहीवेळा मला पहारेकरी करण्यास आणि पलंगावर फिरत असलेल्या कोणत्याही डासांना मारण्यास सांगितले गेले. अस्तित्वात असलेल्या जे इतर शिक्षामध्ये गरी (कसावा फ्लेक्स)आणि कडू कोयनेल गोळ्या कुठून खाणे समाविष्ट आहे. कित्येक महिने मी या दुष्ट वरिष्ठांच्या हाताखाली त्रासला गेलो. एक दिवस, माझ्या लक्षात आले की माझ्या वर्गसोबत्यांपैकी एकाला कोणीही त्याला कधीही काही म्हंटले नव्हते, कधीही त्याला कुठेही पाठवले गेले नाही, कधीही त्याचा छळ केला गेला नाही आणि कधीही त्याला शिक्षा केली नाही!  पण मला माहित आहे! तो वरिष्ठांपेक्षा खूपच मोठा आणि सामर्थी होता!  माझा हा वर्गमित्र माझ्या वर्गाच्या इतरांपेक्षा मोठा, सामर्थी व वयाने मोठा होता आणि वरिष्ठ त्याला खरोखर घाबरत होते. तो एका क्षणाचा नोटीस देऊन त्यांच्या पैकी कोणालाहीमारू शकले असते.

    काही वेळा वरिष्ठ एक लहान पोरा म्हणून बाहेर ओरडत असत याचा अर्थ हे की जो वरिष्ठ एक लहान पोरा म्हंटले आहे सर्व कनिष्ठ त्याच्याकडे धावत जावे. आम्ही सगळेच धावत जात असत पण मोठा, बलवान मुलगा वरिष्ठांच्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करेल आणि तो काही करत आहे ते करत राहत असत. कोणीही त्याला काहीही विचारण्याची धाडस केले नाही. तो इतका बलवान होता की त्याला ते त्याला घाबरत होते!  पण मी बलवान नव्हतो.  मी अशक्त, पराभूतकरण्याजोगा आणि दंडनीय होतो. मी त्या दुष्ट हृदयाच्या वरिष्ठांचा एक चांगला शिकार होतो. जर मी माझ्या मोठ्या आणि हृष्ट-पुष्ट सहकार्या सारखे बलवान असलो असतो तर.  

    येथेच मला शक्तीचे महत्त्व समजले. जेव्हा तुम्ही बलवान असता तेव्हा दुष्टांना तुम्हाला एकटे सोडणे भाग पडते. दुष्टांना माहीत आहे की ते पराभूत होतील. सैतान पण एक समस्या सुरवात करण्याची हिम्मत करणार नाही कारण त्याला माहित आहे की त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे समाप्त होणार. जेव्हा तुमच्यापेक्षा जास्त बलवान तुमच्या विरोधात येतो तेव्हा तो तुमचा मात करील आणि नाश करून टाकेल.

    जेंव्हा हत्यारबंद बळकट मनुष्य आपल्या वाड्याची रखवाली करितो तेंव्हा त्याची मालमत्ता निर्भय राहते; तरी त्याच्यापेक्षा बळकट असा एकदा मनुष्य त्याजवर येऊन त्याला जिंकीतो तेंव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्याने भरवसा ठेवला होता ती तो घेऊन जातो, व त्याने लुटून आणलेली चिजवस्त वाटून टाकतो.

    लुक ११:२१-२२

    स्वतःला बळकट करण्यासाठी हे सर्वात मोठे प्रेरणास्थान असावे! जसजसे तुम्ही बळकट व्हाल तसतसे दुष्ट व्यक्तीला तुम्हाला एकटे सोडण्याची सक्ती होते कारण त्याला माहीत आहे की अनेक प्रलोभने तुमच्यावर काही काम करणार नाहीत. प्रभूमध्ये दृढ रहा!

    २. तुम्हाला स्वतःला प्रभुमध्ये बळकट करणे आवश्यक आहे कारण तुमचा शत्रू तुमच्यावर पुन्हा हल्ला करण्याची योजना आखत आहे.

    एकाएका माणसाने एकाएका माणसाचा समाचार घेतला; तेंव्हा आरामी लोक पळत सुटले आणि इस्राएल त्यांच्या पाठीस लागले; आरामचा राजा बेन-हदाद हा आपल्या घोड्यावर स्वार होऊन कांही घोडेस्वारानिशी निसटला. इस्राएलाच्या राजाने बाहेर पडून घोडे व रथ यावर मारा करून आराम्याची मोठी कत्तल उडविली. मग तो संदेष्टा इस्राएलाच्या राजाकडे येऊन म्हणाला, तू आपली मजबूती कर, सावध राहा, जपून वाग;

    Enjoying the preview?
    Page 1 of 1