Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

तुम्ही देवासमवेत दररोज परिणामकारक शांत समय कसा घालवू शकता
तुम्ही देवासमवेत दररोज परिणामकारक शांत समय कसा घालवू शकता
तुम्ही देवासमवेत दररोज परिणामकारक शांत समय कसा घालवू शकता
Ebook135 pages48 minutes

तुम्ही देवासमवेत दररोज परिणामकारक शांत समय कसा घालवू शकता

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354509
तुम्ही देवासमवेत दररोज परिणामकारक शांत समय कसा घालवू शकता
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to तुम्ही देवासमवेत दररोज परिणामकारक शांत समय कसा घालवू शकता

Related ebooks

Reviews for तुम्ही देवासमवेत दररोज परिणामकारक शांत समय कसा घालवू शकता

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    तुम्ही देवासमवेत दररोज परिणामकारक शांत समय कसा घालवू शकता - Dag Heward-Mills

    अध्याय १

    शांत समय – तुमच्या जीवनातील सर्वांत महत्वाची सवय

    मनुष्याच्या जीवनाचा दुसरा अर्धा भाग त्याने पहिल्या भागामध्ये प्राप्त केलेल्या संवयीने बनलेला असतो.

    दोस्तयोवेस्की

    एखाद्या माणसाच्या गुणांची शक्ती त्याच्या नेहमीच्या कृतींपासून बनते. 

    पास्कल

    एक सवय म्हणजे तुम्ही याबद्दल विचार न करता किंवा तसे करण्यास इच्छुक आहात असे काहीतरी.  प्रत्येक चांगल्या ख्रिस्ती व्यक्तीमध्ये ब-याच चांगल्या संवयी असतात. या चांगल्या संवयीनींच आता तो जो आहे तसे त्याला केले आहे.  

    सर्व महान माणसांना सवयी आहेत ज्यांनी त्यांना महान बनवले आहे.

    येशू ख्रिस्त

    १. नियमितपणे चर्चला जाणे

    येशू ख्रिस्ताला सुद्धा चांगल्या संवयी होत्या हे तुम्हांला माहित आहे काय? शब्बाथ दिवशी चर्चला जाण्याची त्याला संवय होती असे बायबल आपल्याला शिकविते. 

    मग ज्या नासरेथांत तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परीपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी साभास्थानांत जाऊन वाचावयास उभा राहिला.

    लूक ४:१६

    २. एकांत स्थळी प्रार्थनेस जाणे

    एका विशिष्ट उद्यानांत किंवा एकांत स्थळी जाण्याची येशूची संवय होती. ती अशी जागा होती की तो तेथे नेहमी जात असे. उद्यानामध्ये जाऊन प्रार्थना करणे ही त्याची संवय होती हे प्रत्येकाला माहित होते. 

    हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला; तेथे बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले. ही जागा त्याला धरून देणा-या यहूदालाहि ठाऊक होती; कारण येशी आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. 

    योहान १८:१-२

    दानीएल

    दानीएल दिवसाच्या एका विशिष्ट समयी प्रार्थना करीत असे. ते तसे कांहीतरी करण्याची त्याची संवय होती. त्यच्या जीवनांतील सर्वांत मोठ्या रहस्यांपैकी ते एक रहस्य होते.  

    ह्या फार्मानावर सही झाली आहे असे दानीएलाने ऐकलेतेव्हा तो आपल्या घरी गेला; त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या; त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसांतून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला.

    दानीएल ६:१०

    सवयीबद्दलच्या दहा गोष्टी ज्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तींना

    माहित असणे आवश्यक आहे

    १. विचार न करता किंवा नियोजन न करतात जी कृती सहजपणे केली जाते तिला संवय म्हणतात.  

    २. जी कृती तुमची पद्धत किंवा रूढी बनते तिला संवय म्हणतात मग त्याबद्दल तुम्हांला जाणीव असो व नसो. 

    ३. अनेकदा संवय ही भविष्याला प्रभावित न करणारी एक सामर्थ्यहीन कृती आहे असे वाटते. म्हणूनच अनेक लोक चांगल्या सवयी असल्याच्या संकल्पनेला यशाचे एक चांगले साधन म्हणून ओळखत नाहीत. सकाळची प्रार्थना आणि

    ४. संवय ही चांगली किंवा वाईट, स्वाभाविक किंवा आध्यात्मिक असू शकते. सकाळची प्रार्थना, आणि प्रभूसोबत शांत समय व्यतीत करणे ह्या सगळ्या आध्यात्मिक संवयी आहेत. स्वाभाविक संवयी म्हणजे सकाळी दांत घासणे आणि रोज आंघोळ करणे होय. 

    ५. चांगल्या संवयींची जशी सहजपणे पुनरावृत्ती होते तशीच वाईट संवयींची सुद्धा होते. 

    ६. एखाद्याव्यक्तीला काय होत आहे ह्याची जाणीव न होता, वाईट सवयींमुळे सतत अपयश आणि पराभवाला सामोरे जावे लागते.

    ७. एखाद्या व्यक्तीला काय होत आहे ह्याची जाणीव नसतांनाहि चांगल्या संवयीं सुसंगत यश आणि विजय मिळवून देतात. 

    ८. वाईट संवयी सहजपणे लागतात परंतु त्यांच्याबरोबर जगणे हे फार कठीण असते. चांगल्या संवयी लागणे फार कठीण असते परंतु त्यांच्याबरोबर जगणे हे फार सुलभ असते. 

    ९. प्रत्येक यशस्वी ख्रिस्ती व्यक्तीला अनेक चांगल्या संवयी असतात ज्यामुळे त्यांना यश प्राप्त झालेले असते. अनेक वर्षांपूर्वी, माझ्या एका मित्राने मला प्रत्येक सकाळी देवासोबत शांत समय कसा व्यतीत करावा हे शिकविले. मी ती माझी एक वैयक्तिक संवय म्हणून विकसित केली आणि प्रथम एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आणि नंतर एक सेवक म्हणून ते माझे एक सर्वांत मोठे रहस्य झाले. मी जो कांही उपदेश देतो किंवा शिकवितो ते सर्व कांही ह्याचा परिणाम आहे. 

    १०. संवयीं ह्या ख्रिस्ती लोकांसाठी सुरक्षा प्रक्रिया आहेत. याचे कारण असे की जेव्हा एखादा नेता दबावाखाली असतो, तो स्वाभाविकरित्या आणि सहजपणे काही चांगल्या गोष्टी करील. जेव्हा नेता दबावाखाली असतो, तेव्हा त्या नेत्याला काय करावे आणि कशी कृती करावी ह्याचा विचार करण्यांस त्याला वेळ नसू शकतो. प्रार्थना करणे किंवा प्रभूसोबत शांत समय व्यतीत करणे हे त्याला कठीण परिस्थितीतून बाहेर काढू शकेल. येशू सारखेच मी सुद्धा ठरविले की मी प्रार्थनेला जाईन. मी अनेकदा माझ्या पाळकांबरोबर प्रार्थना करावयास जातो. जरी मला धोक्याची जाणीव नसेल तरीहि ही संवय मला आध्यात्मिकरित्या सुरक्षित राहाण्यांस मदत करते. 

    अध्याय २

    शांत समय - अनेक महान पुरुषांचे रहस्य

    मोशेने देवाबरोबर अनेकदा शांत समय व्यतीत केला होता

    परमेश्वर मोशेला म्हणाला, पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्यां घडून तयार कर म्हणजे तू फोडून टाकिलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचनें होती ती मी त्यांच्यावर लिहीन. तू पहाटेस तयार हो आणि पहाटेस सीनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वतशिखरावर माझ्यासमोर हजर हो. तुझ्याबरोबर कोणी चढून येऊ

    Enjoying the preview?
    Page 1 of 1