Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

मेंढपाळ होण्याचा अर्थ काय आहे
मेंढपाळ होण्याचा अर्थ काय आहे
मेंढपाळ होण्याचा अर्थ काय आहे
Ebook314 pages1 hour

मेंढपाळ होण्याचा अर्थ काय आहे

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

‘मेंढपाळ’-मेंढरे हे शब्द ऐकल्यावर केवळ एकमेव गोष्ट तुम्हाला आठवते! मेंढरे म्हणजे स्वतंत्र सृष्टी ज्यांना मेंढपाळाची आवश्यकता असते. एक मेंढपाळ म्हणजे मेंढरांसाठी तो काळजीपूर्वक मार्गदर्शक असतो. पवित्र शास्त्रात, देव आपल्याला देवाच्या कुरणातील मेंढरे म्हणून संदर्भित करतो. येशूने शिष्य पेत्राला त्याच्या मेंढरांना तारनार्यावर प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी पोषण देण्यास सांगितले. एक मेंढपाळ बनणे म्हणजे मोठी कामगिरी आहे. त्याच्या कार्यात सहभागी होण्यास आणि मेंढरांची काळजी घेण्यास पाचारण होणे म्हणजे देवाने दिलेला हा सन्मान आहे. ह्या पुस्तकात, डाग हेवार्द-मिल्स आपल्याला आमंत्रण देतात, विनवणी करतात, आणि देवाच्या लोकांची काळजी घेण्याचे काम आपण कसे करावे हे दाखवतात. एक मेंढपाळ बनण्याच्या ह्या सुंदर कार्यातून मागे राहू नका!

Languageमराठी
Release dateJun 19, 2018
ISBN9781641354516
मेंढपाळ होण्याचा अर्थ काय आहे
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to मेंढपाळ होण्याचा अर्थ काय आहे

Related ebooks

Reviews for मेंढपाळ होण्याचा अर्थ काय आहे

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    मेंढपाळ होण्याचा अर्थ काय आहे - Dag Heward-Mills

    अध्याय १

    एक मेंढपाळ काय असतो?

    तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ ते गांजलेले व पांगलेले होते.

    मत्तय ९:३६

    एक मेंढपाळ कोण असतो ह्याची व्याख्या काय आहे ह्याच्याशी आपल्याला संघर्ष करण्याची काहीच गरज नाही.मेंढपाळ त्याच्या मेंढरांसाठी काळजी घेणारा प्रेमळ मार्गदर्शक असतो. मेंध्रांची काळजी घेण्यासाठी देवाने मेंढपाळाला बोलावलेले असते.

    पवित्र शास्त्रात, देवाच्या लोकांना मेंढरे आणि त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांना जे देवाने नियुक्त केलेले असतात त्यांना मेंढपाळ म्हंटलेले आहे. देव आपल्याला साप, मांजरी, आणि कुत्रे ह्यांचा संग्रह म्हणून पाहत नाही. नाही! तो आपल्याला मेंढराचा कळप म्हणून पाहतो ज्यांना प्रेम, काळजी आणि मार्गदर्शन ह्यांची गरज असते.

    याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची उपासना करू, त्याला नमन करू.कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल!

    स्तोत्र ९५:६-७

    मी हे पुस्तक लिहत आहे कारण माझा हा विश्वास आहे की अनेक लोक देवाच्या मेंढरांची काळजी घेण्यात सहभागी होऊ शकतात. देवाच्या लोकांची काळजी घेण्याच्या कार्याला स्वीकारण्याची ही वेळ आहे. सर्वकाळच्या उत्तम गोष्टीतील एक म्हणजे मेंढपाळ बनणे कारण आपल्या प्रभूचे त्याच्या लोकांवर प्रेम आहे आणि ज्या मेंढरांना काळजी आणि मार्गदर्शन पाहिजे असते असे तो आपल्याकडे पाहतो. एक मेंढपाळ बनणे खूप मोठी कामगिरी असते. म्हणूनच जे काम प्रेषित पेत्र, मंडळीचा प्रमुख ह्याला दिले गेले. लक्षात ठेवा! येशूने पेत्राला मेंढरांची काळजी घेऊन त्यांचे पोषण करून सिद्ध करून दाखवण्यास सांगितले. पेट्रा, तुझे माझ्यावर प्रेम आहे का? तुझे माझ्यावर जर प्रेम असेल तर माझ्या मेंढरांना अन्न पुरव!

    त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय, प्रभू; आपणावर मी प्रेम करतो, हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. पुन्हा दुसर्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय, प्रभू; मी आपणावर प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी मेंढरे पाळ. तिसर्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्यावर प्रेम करतोस काय? असे तिसर्यांदा त्याला म्हटले, म्हणून पेत्र दु:खी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे; मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हटले, "माझी मेंढरे चार.

    योहान २१:१५-१७

    प्रत्येक मंडळीत दोन प्रकारचे लोक असतात: मेंढपाळ आणि मेंढरे. तुम्ही एक मेंढपाळ किंवा मेंढरू आहात. एक मेंढपाळ मूलतः एक पाळक असतो. खरच, अनेक भाषांमध्ये ‘मेंढपाळ’ आणि ‘मेंढरे’ ह्यांच्यासाठी काही वेगळा शब्द नसतो. मेंढपाळासाठी जो शब्द वापरला जातो तोच पाळकासाठी वापरला जातो. मला मेंढपाळ हा शब्द वापरायला आवडतो कारण त्या कामाचा अर्थ काय आहे हे त्यातून सर्वांना कळते. मला ‘मेंढपाळ’ ह्या शब्दाचा अर्थ आवडतो कारण त्याचा अर्थ म्हणजे तुम्ही लोकांना मेंढरे म्हणून पाहावे आणि असेच त्यांना संबोधित देखील करावे.

    ‘पाळक’ ह्या शब्दाचे खूप अनोळखे भाषांतरे आहेत आणि पाळकाने काय असावे किंवा करावे ह्याविषयी प्रत्येकाची एक कल्पना असते. तरीही, जेव्हा तुम्ही एक मेंढपाळ आहात असे म्हणता तुमचे काम म्हणजे मेंढरांची काळजी घेणे. स्वाभाविकच, तुम्ही जर मेंढपाळ असाल आणि तुमच्यात जर मेंढरासारखी गुणधर्म नसतील आणि तुमची काळजी घेतली जाऊ शकत नाही, शिकवले जाऊ शकत नाही, मार्गदर्शन केले जाऊ शकत नाही असे जर तुम्ही असाल तर तो तुमच्याकडे बघू शकत नाही.इंग्रजी भाषेत, पाळक म्हणजे ‘देवाचा सेवक’ किंवा देवाचा प्रतिनिधी. ह्यामुळे, संदेष्टे, प्रेषित, डिकन आणि प्रत्येक देवाच्या प्रतिनिधीला ‘पाळक म्हंटले जाते. एक मेंढपाळ म्हणजे ठराविक प्रकारचा कर्मचारी ज्याला काळजी घेण्यास, प्रेम करण्यास, अन्न पुरवण्यास आणि मेंढरांना एकत्र करण्याचा समय असतो.

    वरील शास्त्रवचनात पहा की मेंढरे हे विखुरले गेले कारण मेंढपाळ नव्हता. संदेष्टा नसल्याने मेंढरे काही विखुरले जात नाही. सुवार्तिक किंवा डिकन नसल्याने मेंढरे काही विखुरली जात नाही.मेंढपाळ नसल्याने मेंढरे विखुरली जातात.माझा हा जबरदस्त विश्वास आहे की अनेक लोकांना मेंढपाळ होण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. अनेक लोक त्यांचे प्रेम, वेळ, उर्जा हे दुसर्यांची काळजी घेण्यासाठी देऊ शकतात. मला हे ठाऊक आहे कारण अनेक लोक आई व वडील बनतात आणि मुलांची काळजी घेण्याची त्यांच्यात ती नैसर्गिक क्षमता असतेच. एक मेंढपाळ बनणे म्हणजे त्यात कितीतरी प्रेम, काळजी आणि मार्गदर्शन घेणे की मेंढरे त्यांच्या मेंढपाळाना वडील म्हणू लागतात. जेव्हा कोणीतरी मेंढपाळाच्या अभिषेकाने सेवेत वर उठतात, लोक त्याच्याभोवती जमतात कारण प्रत्येकाला प्रेम, काळजी आणि मार्गदर्शन ह्यांची आवश्यकता असते.

    देवाचे लोक ह्यांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांचे पोषण करण्यासाठी ‘’मेंढपाळ’’ हा शब्द वापरला जातो कारण ते तसे असतात. जेव्हा तुम्ही स्वतःचे वर्णन एक मेंढपाळ म्हणून करता, एक मेंढपाळ म्हणून तुमच्या कार्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करावे त्यासाठी तशी मदत होते.आज, जे लोक काळजी घेऊन घेणारे प्रेम करणारे आणि मेंढरांना मार्गदर्शन करतात ते जगिक लोक बनतात जे मंडळीसाठी नाही तर विद्यापीठासाठी अगदी साजेसे असतात.

    एका बँकेत त्याच्या टेबलाच्या मागे जर तुम्ही एक मेंढपाळ बसलेला बघितला, तुम्ही लगेच त्यांना विचारणार, ‘’तुम्ही आपल्या बकऱ्या आणि मेंढरे कुठे सोडल्या?त्यांना काय होत आहे? त्यांची काळजी कोण घेत आहे? आज, अनेक मेंढपाळ आपले मेंढरे आणि बकऱ्या ह्यांना सोडून बाजारपेठात मेंढपाळापेक्षा काहीतरी वेगळे करताना दिसतात. देवाच्या लोकांची काळजी घेऊन त्यांचे पोषण करण्याच्या सन्मानाला त्यांनी तुच्छ लेखले आहे. हे पुस्तक काही फेकून देऊ नका. तुम्ही एक मेंढपाळ बनून देवाच्या लेकरांची काळजी घेऊ शकता. देवासाठी देखील तुम्ही काहीतरी करू शकता!

    आम्ही प्राप्त करून घेतले अशी वेळ होती पण आता देण्याची वेळ आहे! अशी एक वेळ होती की आपल्याला शिकवले गेले पण आता शिकवण्याची वेळ आहे!कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन द्यायचे पण आता मार्गदर्शन देण्याची वेळ आहे!मेंढपाळ बनण्याच्या ह्या उदार कार्याला वाहून घ्या- लोकांवर प्रेम करणे, काळजी घेणे आणि शिक्षण देणे. हा एक सन्मान आहे. जरी तुम्ही एक सामान्य व्यक्ती असला तरीही, तुम्ही मेंढपाळ बनू शकता.अनेक सामान्य लोक सेवेत असतात.तुम्ही तसे सन्मानित सामान्य लोक असू शकता जे देवाची एक मेंढपाळ म्हणून सेवा करतात.

    पूर्णवेळ सेवेत जर तुम्ही असाल तर, देवाचे सेवक म्हणून नाही तर एक मेंढपाळ म्हणून स्वतःचा विचार तुम्ही करा. ह्यामुळे तुम्हाला तुमचे पाचारण अधिक चांगल्या रीतीने समजेल. देवाच्या प्रेमळ, काळजी घेणाऱ्या , मार्गदर्शन देणाऱ्या आणि शिक्षण देणाऱ्या वरदानात वाहत राहा आणि देवाच्या लोकांसाठी तुम्ही एक मेंढपाळ बाणाल. येशूचे त्याच्या मेंढरांवर खूप प्रेम असते ह्याची आठवण ठेवा. तो आपल्यासाठी मरण पावला. त्याने खूप आपुलकीने काळजी घ्यावी! जे कोणी देवाच्या मेंढरांची काळजी घेतात ते देवाच्या प्रेमात थेट जातात कारण येशू ह्या मेंढरांसाठी मरण पावला आणि त्यांनी त्यांच्यावर प्रेम केले.

    अध्याय २

    तुम्ही मेंढपाळ का बनू शकता

    ह्या अध्यायात, तुम्ही मेंढपाळ होण्याची अनेक शास्त्रवचनावर आधारित वचने आहेत असा माझा विश्वास आहे. तुमच्या ख्रिस्ती विकासाच्या एका क्षणी माझा विश्वास आहे की, तुम्ही किमान एक मेंढपाळ बनू शकता. पवित्र शास्त्र आपल्याला अनेक पैलूंनी शिकवते की सेवेत आपण फलदायी होणे गरजेचे आहे. वचन आपल्याला हे देखील शिकवते की सेवेसाठी ‘’अनेक’’ नाही तर ‘’थोड्या’’ लोकांना पाचारण झाले आहे.

    आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले;

    ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे.

    इफिसकरास पत्र ४:११,१२

    ह्या शास्त्रवचनाचे सामाण्य्रूपाचे भाषांतर म्हणजे देवाने मंडळीला विशेष सेवा करणारे कार्य तीन मुख्य कारणांसाठी दिले:

    1. संतांना परिपूर्ण करण्यासाठी.

    2. सेवाकार्य करण्यासाठी.

    3. ख्रिस्ताच्या शरीराला शुद्ध करण्यासाठी.

    हे खरे आहे. तरीही, आपल्याला ह्याची जाणीव असावी की पवित्र शास्त्राच्या भाषांतर करणार्यांनी विरामचीन्हांकन घातले, जे काही वेळा परिच्छेदाचे दुर्भाग्यवश भाषांतर देऊ करते. इफिसकरास पत्र ४:१२ मधून जेव्हा तुम्ही स्वल्प विराम काढता, त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा होतो, जो अधिक अचूक असल्याचा माझा विश्वास आहे. इफिसकरास पत्र ४:१२ मधून तुम्ही स्वल्प विराम काढा आणि वचन काय सांगते ते पहा.

    आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले;

    ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे.

    इफिसकरास पत्र ४:११,१२

    शास्त्रवचन आता सांगते की देवाने सेवाकार्यासाठी संतांना परिपूर्ण करण्यासाठी प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक दिले.

    दुसऱ्या शब्दात, हे विशेष सेवाकार्यातील जवाबदार्या परिपूर्ण सामान्य संतांना देण्यात येतात जेणेकरून सेवाकार्य करण्यास त्यांना सहाय्यक ठरतात. ह्याचा अर्थ काय आहे? ह्याचा अर्थ म्हणजे सामान्य संतजन सेवाकार्य करू शकतात. ठराविक प्रेषित आणि शिक्षक हे सेवाकार्याला जतन करून ठेवत नाहीत.

    सेवेतील मोठा भाग मेंढपाळ समाधानकारक रीतीने पूर्ण करू शकतात.

    जेव्हा तुम्ही इफिसकरास पत्र ४:११,१२ ह्याचे भाषांतर करता, आपल्या सर्वांवर सेवेची जवाबदारी येऊन ठेपते काही थोडक्या लोकांवर नाही. ही तर बाब असावी, कारण पवित्र शास्त्र सांगते की अनेकांना पाचारण आहे!

    देवाने काही थोड्या लोकांना त्याचे कार्य करण्यासाठी बोलवले नाही. प्रतिसाद दिला त्यापेक्षा देवाने नेहमीच अधिक जास्त लोकांना बोलवले आहे.

    तुम्ही जर देव असता आणि सिद्ध करण्यासाठी मोठी कामगिरी असती तर- संपूर्ण जगाचे तारण करण्याची कामगिरी, तुम्ही थोड्या लोकांना बोलवून त्यांना बाहेर पाठवणार का? निश्चितच नाही! शक्य तितक्या लोकांना बोलवून तुम्ही त्यांना पाठवणार. दुर्भाग्याने, काही थोडके लोक ह्या पाचार्नाला प्रतिसाद देतात, म्हणूनच, द्राक्षमळ्यात सेवा करण्यासाठी काही थोडक्या लोकांना बोलावण्यात आले आहे.

    पाचारण इतके मोठे कार्यआहे का?

    आपण देवाच्या पाचार्नाला काही रहस्यमय अनुभव बनवले आहे ज्यात वाणी ऐकणे, दृष्टांत पाहणे, आणि ठळक अध्यात्मिक अनुभव येणे ह्यांचा समावेश असतो. हे एक चुकीचे सामान्यत्व आहे. अनेकांना ‘’पाचारण’’ मिळाले, पण त्यांनी येशूचे दृष्टांत बघितले नाही. पवित्र शास्त्र आपल्याला शिकवते की आपले संत बनण्यासाठी पाचारण आहे.

    त्या तुम्हांला देव जो आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून कृपा व शांती असो. …

    रोमकरास पत्र १:७

    देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून :

    १ करिंथकरास पत्र १: २

    इफिसकरास पत्र ४:१२ नुसार कार्य संतांनी करणे अपेक्षित आहे.आता आपण प्रामाणिक असू या. संत बनण्याच्या आपल्या पाचार्नात, आपल्यातील किती लोकांनी अशा अलौकिक वाणी ऐकल्या? आपल्यातील किती लोक तारण मिळण्यासाठी विजा कडकडणे आणि गडगडणे ह्यांचा आपल्याला भीती भरवण्यासाठी उपयोग केला? दिमिष्काच्या रस्त्यावर आपल्यातील किती लोक खाली पडले?खूप कमी ख्रिस्ती लोकांना देवाप्रती असे नाट्यात्मक पाचारण मिळाले आहे.

    त्याचा अर्थ असा नाही, की आपल्याला ख्रिस्ती बनण्यासाठी पाचारण नाही.

    सर्व नव्याने जन्मलेले ख्रिस्ती लोकांना त्यांच्या जीवनावर संत बनण्याचे अलौकिक पाचारण आहे. ते तितके ठळक नसेल पण निश्चितच ते अलौकिक आहे. तुम्ही जर स्वतःला ख्रिस्ती म्हंटले तर, तुम्हाला एक पाचारण मिळाले आहे ज्याला तुम्ही प्रतिसाद दिला. मी तुम्हाला हे सुचवतो की न जाणता, तुम्ही खरेतर एक पाचारण ऐकले आणि दैवी पाचार्नाला प्रतिसाद दिला.

    ते पाचारण काय होते? ती तर केवळ एक जाणीव होती जी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या वास्तविकतेच्या बद्द्ल समजली. त्याच जाणीवेने तुम्हाला ख्रिस्ताला जीवन देण्याचे मार्गदर्शन दिले , आणि त्यामुळे तुम्ही नव्याने- जन्मलेले ख्रिस्ती बनला.

    काही लोक जे काहीतरी रोमांचक होण्याची वाट पाहतात ते तर देवाचे खरे अलौकिक प्रेम आणि हालचाल चुकवतात. त्याच रीतीने जसे आपल्याला ख्रिस्ती म्हणून बनण्याचे पाचारण आहे, एका किंवा दुसऱ्या स्तरावर देव आपल्याला त्याच्या सेवेसाठी निश्चितच पाचारण करेल. तुम्हाला एलीयासारखी श्वास रोखणारी सेवा करण्यासाठी पाचारण झाले नसेल, पण तरीही ते तर एक पाचारण आहे!

    शमुवेल संदेष्ट्याचे सेवाकार्य पहा. देवाचे पाचारण जेव्हा आले तेव्हा शमुवेल मंदिरात होता.

    कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो, हे वचन विश्वसनीय आहे. …

    १ शमुवेल

    Enjoying the preview?
    Page 1 of 1