Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

अभिषेकाचे मधुर प्रभाव
अभिषेकाचे मधुर प्रभाव
अभिषेकाचे मधुर प्रभाव
Ebook227 pages2 hours

अभिषेकाचे मधुर प्रभाव

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

एक ख्रिस्ती ह्या नात्याने, तुमच्या जीवनात सर्वश्रेष्ठ आणि मधुर प्रभाव हा पवित्र आत्माच असला पाहिजे. हे पुस्तक तुम्हाला तुमचे चारित्र्य, विवेक बुद्धी, सृजनशीलता , आणि पवित्र असण्याची क्षमता हे समजून घेण्यास मदत करते आणि हे देखील पवित्र आत्म्याने प्रभावित होऊ शकते. डाग हेवार्द- मिल्स ह्यांच्या ह्या विलक्षनिय पुस्तकाच्या द्वारे, तुम्ही पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनाला प्रभावित, प्रेरित आणि सदैव बदलून टाकण्याची परवानगी द्यावी.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354332
अभिषेकाचे मधुर प्रभाव
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to अभिषेकाचे मधुर प्रभाव

Related ebooks

Reviews for अभिषेकाचे मधुर प्रभाव

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    अभिषेकाचे मधुर प्रभाव - Dag Heward-Mills

    अभिषेकाचे मधुर प्रभाव

    २ री आवृत्ती

    डाग हेवार्द –मिल्स

    पार्चमेंत गृह

    उल्लेख नसल्याशिवाय, सर्व शास्त्रभागातील उद्गार तर बायबल सोसायटीच्या मराठी भाषांतरातून घेण्यात आले आहेत.

    कॉपीराईट © २०१३ डाग- हेवार्ड -मिल्स

    पहिले प्रकाशन २०१३ पार्चमेंत गृह  द्वारे

    ४थे प्रकाशन २०१४

    डाग हेवार्द- मिल्स यांच्या बद्दल अधिक माहिती मिळण्यासाठी:

    हिलिंग जीजस कॅम्पेन

    ईमेलः  evangelist@daghewardmills.org

    वेबसाईटः  www.daghewardmills.org

    फेसबुकः Dag Heward-Mills

    व्टिटरः  @EvangelistDag

    आंतरराष्ट्रीय ग्रंथावरील हक्काच्या अंतर्गत सर्व हक्क अधिकृत. प्रकाशकाकडून लेखी परवानगी घेतल्याशिवाय ह्या पुस्तकातील कोणत्याही भागाची पुनरावृत्ती किंवा उपयोग करता येणार नाही.

    अनुक्रमणिका

    अध्याय १: तुम्हाला काय प्रभावित करू शकते?

    अध्याय २: तीन दुष्ट प्रभाव

    अध्याय ३: देवाच्या तुमच्या ज्ञानावरील पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय ४: तुमच्या प्रार्थनेच्या जीवनावर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय ५: तुमच्या पवित्र राहण्याच्या क्षमतेवर अभिषेकाचे मधुर प्रभाव

    अध्याय ६: तुमच्या अध्यात्मिक बळावर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय ७: तुमच्या शारीरिक बळावर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय ८: तुमच्या बौद्धिक स्तरावर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय ९: तुमच्या चारित्र्यावर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय १०: तुमच्या प्रेम करण्याच्या क्षमतेवर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय ११: तुमच्या सेवाकार्याच्या शैलीवर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय १२: तुमच्या सेवेतील यशावर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय १३: तुमच्या सेवेतील भर देणाऱ्या गोष्टींवर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय १४: तुमच्या हृदयाच्या नेत्रांवर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय १५: तुमच्या शब्दांवर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय १६: तुमच्या करिस्मा (अध्यात्मिक तेज) ह्यावर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय १७: तुम्हाला खात्री देण्यासाठी पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय १८: तुमच्या आज्ञापालन करण्याच्या स्तरावर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय १९: तुमच्या धाडसीपणाच्या स्तरावर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय २१: तुमची इच्छा आणि उत्सुकता ह्यांच्यावर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय २३: तुमच्या सृजन क्षमतेवर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय २४: तुमच्या उत्पादक बनण्यावर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय २५: तुमच्या यशप्राप्तींवर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय २६: तुमचे पाचारण आणि भवितव्य ह्यांच्यावर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय २७: तुमच्या प्रामाणिकतेच्या स्तरावर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय २८: पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव तुम्हाला जीवन देतात

    अध्याय २९: तुम्ही एक पाळक बनण्यावर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय ३०: तुमच्या ख्रिस्ताच्या शरीराशी असलेल्या नात्यावर पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव

    अध्याय ३१: पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव कसे उत्तेजित करणे

    अध्याय ३२: ‘’संगतीच्या द्वारे’’ अभिषेक कसा पकडून घ्यायचा

    अध्याय ३३: ‘’मैत्रीच्या द्वारे’’ अभिषेक कसा पकडून घ्यायचा

    अध्याय ३४: ‘’वातावरणाच्या द्वारे’’ अभिषेक कसा पकडून घ्यायचा

    अध्याय ३५: ‘’उपलब्ध होण्याने’’ अभिषेक कसा पकडून घ्यायचा

    अध्याय १

    तुम्हाला काय प्रभावित करू शकते?

    त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.

    मत्तय १३:३३

    खमीर हे अदृश्य, दडलेल्या स्वरुपात पिठाला फुगवते, वर येऊन ते अधिक हलके बनते. येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवले आहे की स्वर्गाच्या राज्यावर देखील असे अदृश्य प्रभाव आहेत ज्याचा सर्वकाही गोष्टींवर परिणाम होतो.

    पिठावर खमिराचा प्रभाव हा खरा आणि अद्भुत आहे. तरीही खमीर महान रीतीने कार्य करत असताना अदृश्य असते. अदृश्य प्रभाव खरे असतात. अदृश्य प्रभाव हे चांगले किंवा वाईट असतात.

    सर्वश्रेष्ठ हित, एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात अदृश्य प्रभाव म्हणजे पवित्र आत्मा आणि हे पुस्तक देखील त्याच अदृश्य पण खऱ्या प्रभावाबद्दल आहे!पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव!

    पवित्र आत्म्याचा प्रभाव मिळण्याचे विभिन्न क्षेत्र ह्यांची यादी ह्या पुस्तकात दिली आहे. आपण ते शोधावे आणि प्रार्थना करावी. पवित्र आत्म्याचा प्रभाव महत्वाचा आहे. आपल्या जिवंत राहण्यासाठी तो अत्यंत महत्वाचा आहे.

    तुम्हाला काय प्रभावित करत आहे? एक सेवक म्हणून, तुम्हाला काय प्रभावित करत आहे? तुम्ही ज्या गोष्टी करता त्यासाठी काय मार्गदर्शन करून बनवत आहे? तुम्ही चांगल्या किंवा वाईट प्रभावाखाली आहात?

    ख्रिस्ती लोक हे तीन अदृश्य दुष्ट प्रभाव जाणून घेत नाही व चुकीच्या अर्थाने समजून घेतात. ख्रिस्ती लोकांवर पहिला दुष्ट अदृश्य प्रभाव म्हणजे सैतान. ख्रिस्ती लोकांवर दुसरा अदृश्य प्रभाव म्हणजे जग किंवा ही पृथ्वी. तिसरा अदृश्य प्रभाव म्हणजे आपले ज्ञानेंद्रिय. जेव्हा लोक पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली नसतात तेव्हा ह्यापैकी एकाच्या प्रभावाखाली असतात. म्हणूनच, ते तर पृथ्वीवरचे, दैहिक किंवा सैतानी असतात.

    गलतीकरातील लोकांना लिहत असताना, प्रेषित पौलाने त्यांना अदृश्य आणि घुसखोरी करणाऱ्या प्रभावांच्या बद्दल इशारा दिला जे मंडळीला प्रभावित करत होते. त्याने ह्या प्रभावांना खमीर असे म्हणते आहे.पौलाने खमिराचा परिणाम स्पष्ट करून सांगितला. तो म्हणाला की खमीर म्हणजे एक प्रकारची मनधरणी होती. हा अदृश्य प्रभाव इतका शक्तिशाली होता की एका ख्रिस्ती व्यक्तीला सेवेत त्याचे अडखळण होऊ शकले असते. हे शास्त्रवचन पहा: "तुम्ही चांगले धावत होता; मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हांला कोणी अडथळा केला? तुम्हांला पाचारण करणार्‍याची ही बुद्धी नव्हे.थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते.’’

    (गलतीकरास पत्र ५:७-९). 

    हे पुस्तक पवित्र आत्म्याच्या मधुर प्रभावांच्या बद्दल आहे! हे तुम्हाला तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्र जे पवित्र आत्म्याने परिणामी होऊ शकतात ते प्रगट करतील. देव तुमच्याशी ह्या पुस्तकाच्या द्वारे बोलत असताना तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रती स्वतःला खुले कराल. तुम्ही पवित्र आत्म्याला आपल्या जीवनातील विभिन्न क्षेत्रांवर प्रभाव टाकण्याची परवानगी द्याल आणि तशी अपेक्षा कराल.

    अध्याय २

    तीन दुष्ट प्रभाव

    हे ज्ञान वरून उतरत नाही; तर ते ऐहिक, इंद्रियजन्य, सैतानाकडले आहे.

    याकोब ३:१५

    पवित्र आत्म्याच्या मधुर प्रभावाचा अंतिम परिणाम म्हणजे तुम्हाला अध्यात्मिक बनवणे असा आहे.नवीन कराराध्यात्मिक लोकांबद्दल खूप चांगले बोलतो. मंडळीत अध्यात्मिक लोक सर्वात महत्वाचे असतात. पण प्रत्येक मानवाला चार पर्यायांमधून निवड करायची असते. तो पृथ्वीचा, दैहिक, सैतानी किंवा अध्यात्मिक असू शकतो.

    व्यापारी जगतात व्यापारी लोक अत्यंत महत्वाचे असतात. आरोग्याच्या विश्वात डॉक्टर महत्वाचे असतात, पण मंडळीत अध्यात्मिक लोक महत्वाचे असतात. प्रेषित पौलाने त्याच्या सर्व लेखणी अध्यात्मिक लोकांच्या अधीन केल्या कारण त्याला ठाऊक होते की केवळ अध्यात्मिक लोक त्या देवाकडून आहेत अथवा नाही हे सांगू शकतात. जर कोणी स्वत:ला संदेष्टा किंवा आत्म्याने संपन्न असे मानत असेल, तर जे मी तुम्हांला लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे असे त्याने समजावे. (१ करिंथकरास पत्र १४:३७).

    पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली राहणारी अध्यात्मिक व्यक्ती बनण्याचा तुमचा हेतू असावा. पवित्र आत्म्याचे मधुर प्रभाव तुम्हाला एका अध्यात्मिक व्यक्तीत बदलून टाकतील. दुसरीकडे, तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली राहिला नाही तर दुसऱ्या कोणत्या प्रभावाखाली तुम्ही निश्चित येणार.

    पृथ्वीवरील, दैहिक किंवा सैतानी!

    तुम्ही एका पृथ्वीवरील, दैहिक किंवा सैतानी प्रभावाखाली राहू शकता. दैहिक, पृथ्वीवरील, किंवा सैतानी व्यक्ती ओळखणे काही सोपे नसते. सर्व काळ आपण त्यांना सभोवताली पाहतो. अध्यात्मिक बनण्याच्या ऐवजी, अनेक ख्रिस्ती लोक पृथ्वीवरचे, दैहिक किंवा सैतानी असतात!

    एक दैहिक व्यक्ती कशी असते?

    एक दैहिक व्यक्तीवर त्याच्या संवेदना आणि भावना अधिकार गाजवतात. तो त्याची भूक भागवतो आणि त्याला जे काही आवडते किंवा जे काही तो पाहतो त्याच्यामागे जातो. एक दैहिक व्यक्ती खूप झोप घेणार, खूप खाणार, खूप शारीरिक संबंध ठेवणार, आणि जे काही संतोष उपलब्ध असतील त्यात सहभागी होतात. अनेक तरुण आपल्या ज्ञानेंद्रियांचे अनुसरण करून आयुष्य सुरु करतात. डिस्को, रात्रीचे क्लब आणि पार्टीची ठिकाणे अशा लोकांनी भरलेले असतात जिकडे लोक नाचगाणे ह्यात रमून जाऊन आपल्या दैहिक इच्छा पूर्ण करण्याच्या मागे असतात. आमली पदार्थांचे व्यापारी आणि त्यांचे सेवन करणारे लोक म्हणजे जे लोक स्वतःच्या नाशासाठी त्यांचे अनुसरण करतात.

    एक दैहिक व्यक्ती देवाला

    Enjoying the preview?
    Page 1 of 1