Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

पवित्र शास्त्राचे पाठांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्वपूर्ण हस्तपुस्तक
पवित्र शास्त्राचे पाठांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्वपूर्ण हस्तपुस्तक
पवित्र शास्त्राचे पाठांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्वपूर्ण हस्तपुस्तक
Ebook217 pages52 minutes

पवित्र शास्त्राचे पाठांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्वपूर्ण हस्तपुस्तक

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354691
पवित्र शास्त्राचे पाठांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्वपूर्ण हस्तपुस्तक
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to पवित्र शास्त्राचे पाठांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्वपूर्ण हस्तपुस्तक

Related ebooks

Reviews for पवित्र शास्त्राचे पाठांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्वपूर्ण हस्तपुस्तक

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    पवित्र शास्त्राचे पाठांतर करण्यासाठीचे अत्यंत महत्वपूर्ण हस्तपुस्तक - Dag Heward-Mills

    पवित्र शास्त्राचे पाठांतर करणे तर मोठ्या सेवाकार्यात महान पाया आहे. आज, बरेच लोक एका मजबूत पायावर उभे नसल्याने त्यांना पृथ्वीवर देवाचे महान कार्य करता येत नाही.

    कष्ट करून एका नम्र आणि न्यायी वृतीने, देवाची कृपादाने बाळगणारे चारित्र्य तुम्ही आवश्यक स्वरूपाने विकसित करू शकता. पवित्र शास्त्राच्या पाठांतराने तुमचे सेवाकार्य तर सर्वात उच्च स्तरावर जाऊ शकेल.

    पवित्र शास्त्राचे पाठांतर म्हणजे अगदी सहजच महत्वाची वाचणे पाठ करत राहणे म्हणजे जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा ते तुम्ही पटकन बोलू शकता.

    ख्रिस्ताचे अनुयायी होणे

    त्याने त्यांना म्हटले, माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.

    मत्तय ४:१९

    येशू ख्रिस्ताचा खरा अनुयायी बनवण्यातील खरे ध्येय म्हणजे ज्याने वचने पाठ केली.

    आयुष्यातील रोजचा दिवस म्हणजे पवित्र शास्त्रातील वचन पाठ करण्यासाठी आहे.

    आयुष्यातील रोजचा दिवस म्हणजे एक चांगले आणि अधिक सुधारित चारित्र्य विकसित करण्यासाठीचा आहे.

    प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवणे म्हणजे शास्त्रवचन पाठ करण्यासाठी संधी आहे.

    सह विश्वासणाऱ्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवणे म्हणजे तुमच्या पाठांतर कौशल्यांची चाचणी करून घेण्याची संधी आहे.

    पुढील पृष्ठात, तुम्हाला शास्त्रवचने दिसतील जे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने पाठ करण्याची अपेक्षा असते. मी तर वयक्तिक रीतीने ह्यातील प्रत्येक शास्त्रवचन निवडले आहे.ही शास्त्रवचने केवळ तुम्ही संदर्भ देण्यासाठीचे नाहीत. ते तर पाठांतर करण्यासाठीचे आहे! तुम्हाला बरीच शास्त्रवचने माहित असतील पण खूप कमी शास्त्रवचनाचा तुम्ही उल्लेख करू शकता!

    हे पुस्तक सदैव तुमच्याबरोबर राहू द्या. जेव्हा विचारणा होईल तेव्हा कधीही ह्यांचा उल्लेख करण्याची तयारी ठेवा. काही महिने जेव्हा तुम्ही ख्रिस्ती बनता, ह्या शास्त्रवचनातील किमान वचने तरी तुम्ही सांगू शकला पाहिजे. खरच तुम्ही तर पवित्र शास्त्र सतत बोलून दाखवणारे देवाचे सेवक बनले पाहिजे.

    तुम्ही येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून मी घोषित करतो आणि ह्या अलौकिक पवित्र शास्त्राचे पाठांतर करण्याचे पुस्तक ह्याद्वारे सेवाकार्याचे चांगले उदाहरण म्हणून प्रस्तुत करतो!

    अध्याय २

    पवित्र शास्त्राचे पाठांतर करण्याचे महत्व

    एक सरदार देवाचे वचन प्रसारित करणारा हवा. देवाचे वचन आणि त्यातील गौरव ह्याने त्याने संपूर्णपणे व्यापून जावे. म्हणूनच सेवाकार्य विकसित करण्यात पवित्र शास्त्राचे पाठांतर इतके महत्वाचे आहे.

    प्रारंभी शब्द होता. ह्याचा अर्थ म्हणजे देवाचे वचन नेहमी देव जे काही करतो त्याच्या आधारस्थानी असेल.

    आज, शास्त्रवचन पाठ करणे म्हणजे महत्वाचे आहे कारण देव तर अधिक गौरवी मंडळी विकसित करत आहे. जी मंडळी सुवार्ता गाजवत आहे त्यापेक्षा ह्या नंतरच्या मंडळीचे गौरव तर पूर्वीच्या मंडळीच्या गौरवापेक्षा अधिक महत्त्वाचे असेल. ह्याचा अर्थ म्हणजे सेवक जेव्हा उभे राहतील, शेवटल्या काळात अधिक अभिषिक्त होऊन आधीपेक्षा अधिक गौरवी बनतील. देवाचे वचन त्यांना जाणून घेऊन ते तर कोणतेही श्रम न घेता उद्युक्त करतील!

    हे गौरवी सेवक आणि मंडळया ह्यांचा जन्म होऊन ते कसे निर्माण होऊ शकतील? त्यावर पवित्र शास्त्र तर स्पष्ट आहे. देवाच्या वचनाने त्याचा सेवक विकसित होतो आणि येशूच्या सेवेत अधिक महान कार्ये करण्यासाठी तयार होतो. शास्त्रवचनाचे ज्ञान जाणून घेण्याबद्दल हे सर्वकाही असते!

    २ तीमथी ३:१६-१७ मध्ये, आपण तर जो चांगला सेवक सत्कृत्ये करण्यासाठी आधीच तयार असतो: शास्त्रवचन ह्यावर शक्तीशाली आणि महत्वपूर्ण प्रगटीकरण पाहतो!

    "सर्व शास्त्रवचन तर ईश्वर प्रेरित, सर्व सिद्धांत, नीतिशास्त्र, सुधारणा, नीतिमत्तेत सूचना देण्यासाठी रास्त आहे: जेणेकरून देवाच्या सेवकाने परिपूर्ण असावे, आणि सर्व सत्कृत्य करावे.’’

    पवित्र शास्त्र पाठांतर करण्याचे हस्तपुस्तक तुम्हाला माहित असावे अशी शास्त्रवचने पुरवते. अशा माहित असाव्यात अशा शास्त्रवचनाचा हा साठा आहे. ह्या पुस्तकातील शास्त्रवचनांना आपल्या मनात पाठ करून साठवून ठेवा. ही शास्त्रवचने जशी तुम्ही पाठ करता तुम्ही स्वतःला सेवाकार्यासाठीचा मजबूत पाया रचून देता.

    आपला तारणारा येशू ह्यासारखे व्हा! येशू ख्रिस्त तर वचने पूर्ण होता! तुमच्या शेजाऱ्याला ही पाठ केलेली शास्त्रवचने बोलून दाखवण्यास शिका. तुम्ही पाठ केलेली ही वचने उर्वरित आयुष्यात तुम्हाला मार्गदशन करतील. अरण्यात येशू ख्रिस्ताने ही शास्त्रवचने बोलून दाखवली आणि मोहात पडण्यापासून टाळण्यासाठी त्याचा हा मुख्य आधार होता.

    आज, जगभरातील मुख्य धर्म तर त्यांचे पवित्र ग्रंथ पाठ करण्यावर अधिक विसंबून राहतात. त्यांचे तरुण तासंतास बसून ह्या पवित्र ग्रंथातील शास्त्रवचने पाठ करत बसतात. अशा प्रकारचे समर्पित पाठांतर ह्याने तर लोक मारण्यास तयार होतील अशा अमुलाग्रह विश्वासाला निर्माण केले आहे.

    आपण पवित्र ग्रंथ पाठ करून ख्रिस्तासाठी आमुलाग्रह बनले पाहिजे! ह्यानेच पुहे जाण्याचा मार्ग बनतो- आमुलाग्रह सेवक ज्यांना देवाचे वचन जाणून घेऊन कोणतेही परिश्रम न घेता अगदी सहजच ते बोलून दाखवायचे आहेत!

    माझी वयक्तिक साक्ष म्हणजे माध्यमिक शिकलेली शास्त्रवचने तर माझे ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य ह्याचा आधार बनले. शाळेनंतर, प्रत्येक शास्त्रवचन मी पाठ करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच तुम्हाला समजेल की तोच तुम्हाला मिळालेल्या शास्त्रवचनाचा आधार बनला.

    माझी तुमच्यासाठी ही प्रार्थना आहे की पवित्र शास्त्राचे पाठांतर करणे तुम्हाला कायमस्वरूपी बदलून टाकेल. तुमच्या जीवनातील सर्व सत्कृत्यांसाठी आकार देण्यास तुम्ही सुसज्ज व्हा! अगदी सहजतेने तुम्ही शास्त्रवचने बोलून दाखवा! पवित्र शास्त्रवचने ऐकून तुमचे श्रोते चित्त व्हावे! आमेन!

    उत्पत्ती

    १. उत्पत्ती ८:२२

    पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हायची राहणार नाहीत."

    २. उत्पत्ती ३२:२८

    त्यावर तो त्याला म्हणाला, "ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत,

    Enjoying the preview?
    Page 1 of 1