Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

रक्तातील सामर्थ्य
रक्तातील सामर्थ्य
रक्तातील सामर्थ्य
Ebook124 pages45 minutes

रक्तातील सामर्थ्य

Rating: 5 out of 5 stars

5/5

()

Read preview

About this ebook

पवित्र शास्त्र अनेक प्रकारच्या रक्तांच्या बद्द्ल बोलते: बकऱ्या, मेंढरे आणि कबुतरांचे रक्त! अगदी ठळकपणे पवित्र शास्त्र म्हणते की रक्त सांडल्याशिवाय पापक्षमा नाही. म्हणूनच ह्या वेगळ्या प्रकारचे रक्त आपले पाप घेऊ शकतील काय? त्याचे उत्तर म्हणजे एक ठळक ‘नाही!’ मग आपले पाप कशाने धुतले जाईल?काहीच नाही, पण येशू ख्रिस्ताचे रक्त! केवळ येशूच्या रक्तामध्ये आपली पापे धुऊन काढून आपल्याला तारण देण्याचे सामर्थ्य आहे. ह्या अत्यंत महत्वाच्या पुस्तकात, येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या बद्दल अगदी महत्वाचे सत्य तुम्हाला समजतील. येशूचे रक्त कशा प्रकारे जीवन देते आणि त्याने कसे महत्व संपादन केले हे देखील तुम्हाला

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354165
रक्तातील सामर्थ्य
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to रक्तातील सामर्थ्य

Related ebooks

Reviews for रक्तातील सामर्थ्य

Rating: 5 out of 5 stars
5/5

1 rating0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    रक्तातील सामर्थ्य - Dag Heward-Mills

    अध्याय १

    येशू ख्रिस्ताचे शब्द आणि रक्त

    येशू ख्रिस्तापासून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. येशू ख्रिस्ताबद्दल बर्याच गोष्टींचा अभ्यास आपण करू शकतो ! त्याचे जीवन, त्याचे कुटुंब, त्याची यशप्राप्ती त्याचे सेवाकार्य, त्याचे प्रवास, त्याचे ध्येय आणि त्याची नेतृत्व शैली ह्या सर्वांचा आपण अभ्यास करू शकतो. पण येशू ख्रिस्ताच्या बद्दल सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी म्हणजे त्याचे शब्द आणि त्याचे रक्त.

    अनमोल शब्द

    येशूचे शब्द महत्वाचे आहेत कारण ते आपल्याला देवाचे सर्व सत्य आणि ज्ञान ह्याबद्दल शिकवतात.

    सर्व मानवी शब्दांच्या वर आपण येशूच्या शब्दांना ठेवणे पुरेसे आहे. आज, सर्व शास्त्रवचनापासून येशूचे शब्द तर लाल अक्षरात वेगळे केले गेले आहेत.

    आधी, ख्रिस्ताचे सुंदर शब्द हे कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता उर्वरित शास्त्रवचनाशी मिसळले जात होते. आधुनिक पवित्र शास्त्रात, येशूला ते सन्मानित शब्द प्रदान केले जातात. लाल अक्षरी पवित्र शास्त्रात, येशूचे शब्द तर त्याच्या स्वतःच्या वर्गात; कोणत्याही प्रकारे समान न बनता ठेवलेले आहेत.

    मंडळीच्या सुधारणेच्या स्तरात, कॅल्वरीच्या ख्रिस्ताच्या कार्यावर लोकांनी लक्ष केंद्रित केले. आधी तर, ख्रिस्ताचे व्यक्तिमत्व लक्ष केंद्रित करण्याचे ध्येय होते. नंतरच्या वर्षात, त्याच्या सुरुवातीच्या जीवनाचे तपशील जे गाईच्या गोठ्यातून वधस्तंभ पर्यंत होते ते तर अभ्यासाचे केंद्र बनले. आज, आपण देखील येशू ख्रिस्ताच्या रक्तावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

    सौभाग्याने, येशूच्या रक्ताचे अलौकिक मोल तर आज देखील जाणले जाते. येशूच्या रक्ताला त्याला ते सन्मानास योग्य व ठळक महत्व आहे ते दिले जात आहे.

    अनमोल रक्त

    येशूच्या शब्दांनी आपली पापे धुतली जाऊ शकत नाही. आपल्या दुष्त्तेपासून आणि पापी परिस्थितीपासून धुऊन काढण्यासाठी आपल्याला येशूचे रक्त हवे आहे जेणेकरून आपली नावे जीवनी पुस्तकात लिहिली जाऊ शकतात. येशू कितीही बोलला, त्याने उपदेश दिला आणि शिकवले तरीही, त्याच्या रक्ताच्या सामर्थ्याने आपल्याला सोडवण्याची गरज आहे. रक्त सांडल्याशिवाय, पापविमोचन नाही! आपल्या पापांना झाकून टाकावे म्हणून रक्त सांडण्याची आवश्यकता आहे.

    आपल्या पापांची किमत कोण मोजणार?

    येशू ख्रिस्ताच्य शिकवणीत देवाचा उपदेश आणि त्याचे ज्ञान आढळते हे सत्य आहे. पण आपल्या पापांची किमत कोण मोजणार? नरकातून सुटका होण्यासाठी ती किमत आपल्यासाठी कोण मोजणार? येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपला उद्धार होऊन (आपण विकत घेतलो आहोत).येशूच्या शब्दांनी नाही तर त्याच्या रक्ताने आपला उद्धार झाला आहे. बैल आणि बकऱ्या ह्यांच्या रक्ताने नाही तर येशूच्या रक्ताने आपला उद्धार झाला आहे.

    उपदेश देण्याचे थांबवा आणि रक्ताला वाहू द्या

    तेहतीस वर्षी येशूने उपदेश देण्याचे थांबवून वधस्तंभाकडे का आगेकूच केली? इतर देशांमध्ये त्याने त्याचे उपदेश देण्याचे व वचन शिकवण्याचे कार्य कार्याचे का चालू ठेवले नाही? तो सिरीया, लेबनोन, इंग्लंड, जर्मनी, इराक, पर्शिया, भारत आणि आफ्रिका ह्या देशात जाऊ शकला नसता काय? निश्चितच तो जाऊ शकला असता! वधस्तंभावर येशूने त्याचे जीवन दिले तेव्हा तो केवळ तेहतीस वर्षांचा होता. जर तो चाळीस वर्ष जगला असता तर, किंवा ऐयंशी वर्ष, तो तर संपूर्ण जगात प्रवास करू शकला असता.

    जेव्हा भारतात मी चेन्नईला भेट दिली, शंका घेणारा, संत थोमा ह्याच्या स्मरणार्थ स्थापित एक मंडळी मी पाहिली. येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेशितांपैकी थोमा एक प्रेषित होता. असे दिसते की, प्रेषित थोमाने भारतात प्रवास करून तिकडे सेवा केली होती. तिकडे तो रक्तसाक्षी बनला, आणि त्याच्या स्मरणार्थ तिकडे एक मंडळी बांधण्यात आली. जर थोमा, जो येशुबरोबर जगला आणि चालत राहिला तो जर भारतात प्रवास करून येऊ शकला तर तसेच येशू देखील भारतात प्रवास करून येऊ शकला असता. जगभर सर्वत्र येशू ख्रिस्त प्रवास करून त्याच्या राज्याचा सुवार्तेचा उपदेश देण्याची क्षमता त्याच्यात होती.

    येशू ख्रिस्ताने अचानक उपदेश द्यायचे थांबवले आणि तो यरुशलेम इकडे जाण्यास मार्ग तयार करू लागला जिकडे त्याला पकडून, त्याची हाल करून त्याला ठार मारणार होते. येशू म्हंटला, ’माझे आयुष्य कोणीही माझ्याकडून घेऊ शकत नाही. मी ते माझ्यासाठी सोपवत आहे.’ येशूने ते का केले? तो योग्य रीतीने विचार करत होता का?

    वधस्तंभ का ?

    येशूला वधस्तंभावर जाण्याची जाणीवपूर्ण तयारी आणि इच्छा का होती जिकडे दुष्ट लोक त्याला ठार मारणार होते? तो असा मार्ग होता ज्याद्वारे येशूने संपूर्ण मानवजातीच्या पापांसाठी त्याचे रक्त सांडण्याची योजना होती. येशूने जर त्याचे रक्त आपल्यासाठी सांडले नसते तर, त्याचा उपदेश सरल्याशिवाय त्याचे सेवाकार्य टिकले असते. आज, येशूच्या सांडलेल्या रक्ताचे सामर्थ्य अजूनही कार्यरत आहे. सर्वोच्च पर्वत आणि जगातील सगळ्यात खोलवर दरीपर्यंत ते पोहोचते. येशूच्या रक्तामुळे त्याच्या मृत्युच्या दोन हजार वर्षाच्या नंतर देखील देवाच्या तारणाच्या सामर्थ्याची मोकळीक झाली. म्हणूनच

    Enjoying the preview?
    Page 1 of 1