Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

दाहक अपराध - प्रकरण ५
दाहक अपराध - प्रकरण ५
दाहक अपराध - प्रकरण ५
Ebook65 pages26 minutes

दाहक अपराध - प्रकरण ५

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

मध्य आणि पश्चिम ज्युटलॅंड भागात काम करणार्‍या जोहान बोज या पोलिस अधिकार्‍याचा मार्च महिन्यातील एका अपरात्री भरधाव कारने धक्का दिल्यामुळे मृत्यु होतो. गुन्ह्याच्या जागेवर येऊन पहिला तपास करणारी व्यक्ती असते त्याचा बॉस ॲलेक्स बोर्ग. ही फक्त एक सामान्य अपघाताची केस नसून निर्घृणपणे केलेली हत्या आहे हे त्याच्या तिथे पोचल्यावर त्वरित लक्षात येते. बोजच्या नऊ वर्षाच्या मुलाच्या मते धक्का दिलेल्या कारमधील व्यक्तीने पोलिसांचा गणवेश घातलेला त्याने पाहिलेला असतो. हे त्याच्या धक्का बसलेल्या मनस्थितीतील कल्पनेचे खेळ असू शकतात का? पण पेट्रोल पंपावरील व्हिडीओ फूटेजवरून मुलगा खरं बोलतोय हे नक्की होतं. त्या भयानक रात्री ती कार चालवणार्‍या माणसाने पोलिसांचाच गणवेश घातलेला असतो. पोलिस तक्रार आयोगातील गुन्हे निरिक्षक रोलॅन्डो बेनितो याची या केसच्या कामावर नेमणूक करण्यात येते. इतकं भयानक कृत्य करण्यामागे जोहान बोजच्या कुठल्या सहकार्‍याचा नक्की काय हेतू असावा? पूर्व ज्युटलॅंडमधील टी.व्ही.२ या चॅनेलवरील महिला पत्रकार ॲन लार्सन हिची या केसच्या तपासासाठी मदत घ्यायची रोलॅन्डो बेनितो ठरवतो. काही वर्षांपूर्वी एका आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या स्थानिक कुटुंबाच्या घटनेशी याचा काही संबंध असेल का हे पहायचं ते ठरवतात. नक्की ती आग म्हणजे केवळ अपघातच होत का? वरवर वाटतंय त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळा हेतू या हत्येमागे असावा असा संशय ॲन आणि रोलॅन्डोला असतो. गुन्हेगाराने पुन्हा असंच काहीतरी कृत्य करण्याच्या आधी त्याला पकडण्यासाठी शोध सुरू होतो.
Languageमराठी
PublisherSAGA Egmont
Release dateNov 26, 2019
ISBN9788726232110
दाहक अपराध - प्रकरण ५

Read more from – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन

Related to दाहक अपराध - प्रकरण ५

Related ebooks

Reviews for दाहक अपराध - प्रकरण ५

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    दाहक अपराध - प्रकरण ५ - – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन

    purchaser.

    दाहक अपराध

    प्रकरण ५

    आजुबाजूची गरमी वाढत होती. आगीच्या उष्णतेमुळे अंगावर आलेले फोड जेव्हा फुटून डंख मारल्यासारख्या वेदना होत होत्या. तिने जळजळणार्‍या डोळ्यांनी हातांकडे पाहिलं आणि तिला जाणवलं आजुबाजुची त्वचा वितळल्यामुळे हाताचं मास आणि हाडं दिसायला लागली होती. तिने आईच्या किंकाळ्या ऐकल्या; इतक्या आर्त किंकाळया की त्यामुळे तिच्या मेंदुमध्ये कुणीतरी पोखरतंय असा तिला भास होऊ लागला. जमिनीला खिळून राहिल्यासारखे तिचे पाय घट्ट रुतुन बसले. मग तिने त्याला पाहिलं.

    विलास. तो आगीकडे अशा प्रकारे चालत जात होता जसं काय त्या आगीपासून त्याला काहीच हानी होणार नव्हती. जोरात ओरडून तिला त्याला सांगावंसं वाटत होतं की दूर हो,इथे राहू नकोस, कोपेनहॅगनला परत जा आणि तिथेच रहा, पण तिचा घसा आणि पोटही जळल्यासारखं झालं होतं. तिच्या तोंडून बोलतानाही ड्रॅगन असल्यासारख्या ज्वाळाच बाहेर पडत होत्या. अचानक तिला आगीच्या ज्वाळांनी वेढून टाकलं. तिने खूप धडपड करत, त्यातून बाहेर पडायचा आटोकाट प्रयत्न केला पण तिला आजुबाजुला काही आधारच सापडत नव्हता. ती विलासला हाका मारत होती,आईला हाका मारत होती, पण ती तिथे एकटीच होती आणि त्या भेदक डोळे व भस्म करणारी जीभ असलेल्या आगरूपी अक्राळविक्राळ राक्षसाने तिला वेढून टाकलं होतं. तो पाहतापाहता तिच्यापर्यंत पोचला आणि त्याने तिला कणाकणाने जाळायला सुरुवात केली. ती किंचाळत राहिली.

    धसका बसलेल्या अवस्थेत लिव्ह पलंगावर बसून होती. किंकाळीमुळे तिला जाग आली होती. ते स्वप्न होतं हे लक्षात येईपर्यंत तिचं कपाळ घामाने डबडबलं होतं आणि तो पुसताना तिचे हातही ओले झाले होते.

    बाहेर काळोख होता आणि तिच्या डिजिटल घड्याळामधले लाल रंगाचे आकडे १:३५ अशी वेळ दाखवत होते. हळुहळू तिचा श्वास पूर्ववत झाला. ते फक्त स्वप्न होतं,खर्‍यासारखं वाटलं तरी स्वप्नच होतं.

    तिला तशी भयानक स्वप्न पडायला पुन्हा एकदा सुरुवात झाली होती. तो त्याचा दोष होता : जोहान बोज. ती घामेजलेल्या चादरीवरच पुन्हा आडवी झाली. तिचं पांघरुण जमिनीवर पडलं होतं पण तिला उकडत होतं त्यामुळे ते तिने तिथेच पडू दिलं. ती घाबरलेल्या अवस्थेतच आढ्याकडे बघत पडून राहिली,जणू काही डोळे मिटले तर ते स्वप्न पुन्हा दिसेल याची तिला भिती वाटत होती.

    जेव्हा गजर झाला तेव्हा तिला जाणवलं की आपल्याला बहुतेक परत झोप लागली असावी कारण जाग आल्यामुळे तिला आश्चर्य वाटलं. ती धडपडत उठली आणि उठताना जमिनीवर पांघरुणामध्ये पाय अडकून पडता पडता वाचली. गजराचं घड्याळ तिने मुद्दाम समोरच्या फळीवर ठेवलं होतं जेणेकरुन तिला ते बंद करण्यासाठी उठावं लागेल. नाहीतर गजर बंद करुन ती पुन्हा झोपून गेली असती.

    तिने इतक्या लवकरचा गजर कशाला

    Enjoying the preview?
    Page 1 of 1