Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

दाहक अपराध - प्रकरण १
दाहक अपराध - प्रकरण १
दाहक अपराध - प्रकरण १
Ebook66 pages26 minutes

दाहक अपराध - प्रकरण १

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

जोहान बोज नावाच्या मध्य आणि पश्चिम ज्युटलॅंड भागात काम करणार्‍या पोलिस अधिकार्‍याचा मार्च महिन्यातील एका अपरात्री भरधाव कारने धक्का दिल्यामुळे मृत्यु होतो. गुन्ह्याच्या जागेवर येऊन प्राथमिक तपास करणारी व्यक्ती म्हणजे त्याचा बॉस ॲक्सेल बोर्ग याला ही निर्घृणपणे केलेली हत्या असल्याचा संशय येतो. जोहान बोजचा नऊ वर्षाच्या मुलगा ती कार आपण पाहिल्याचे आणि त्या कारच्या ड्रायव्हरने पोलिसाचा गणवेश घातला असल्याचे सांगतो. हा फक्त मुलाच्या विचित्र कल्पनाशक्तीचा खेळ असेल का? जेव्हा पेट्रोल पंपावरील व्हिडीओ फूटेजवरून त्याचा मुलगा खरं बोलतोय हे नक्की होतं तेव्हा स्वतंत्र पोलिस तक्रार आयोगाच्या रोलॅन्डो बेनितो या गुन्हे निरिक्षकाकडे ही केस सोपवली जाते. या धडकी भरवणार्‍या हत्येमागे जोहानच्या एखाद्या सहकार्‍याचा हात असू शकतो का?
Languageमराठी
PublisherSAGA Egmont
Release dateNov 26, 2019
ISBN9788726232158
दाहक अपराध - प्रकरण १

Read more from – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन

Related to दाहक अपराध - प्रकरण १

Related ebooks

Reviews for दाहक अपराध - प्रकरण १

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    दाहक अपराध - प्रकरण १ - – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन

    purchaser.

    दाहक अपराध

    प्रकरण १

    त्याने कारचं इंजिन बंद केलं आणि गॅरेजमधे शांतता पसरली. त्याला लागलेल्या धापेचा आवाज ती शांतता पोखरत होता.

    गाडीच्या दिव्यांच्या उजेडामुळे त्याच्या कामाच्या टेबलवर प्रकाश पसरला. तिथे सगळा पसारा तसाच पडला होता.बहुतेक लुकासने परत त्याच्या पक्षीघराचं बांधकाम करून आवराआवर केली नव्हती. सगळीकडे लाकडाच्या तुसांचा धुरळा होता आणि भिंतीवरच्या अवजारांमधून करवत गायब झालेली दिसत होती. त्याच्या मुलाने पुन्हा एकदा हातातलं काम अर्धवट सोडलं होतं. पण टी.व्ही.आणि कॉम्प्युटरसमोर वेळ वाया घालवण्यापेक्षा त्याने निदान काहीतरी करायचा प्रयत्न केलेला बघून त्याला हायसं वाटलं. नऊ वर्षांच्या मुलांमध्ये कसं कायम एक सळसळतं चैतन्य दिसायला हवं, पण त्याला खेळही आवडायचे नाहीत. तो मियासारखा नव्हता. ती आठवड्यातून दोनदा हॅंडबॉलचा सराव करायला जात असे. अर्थात ती त्याच्याहून थोडी मोठी होती, त्यामुळे जसजसा मोठा होईल तशा त्याच्याही सवयी बदलतील अशी त्याला आशा होती.

    त्याच्या बोटांमधलं कौशल्य आणि त्याची नीटनेटकेपणाची आवड त्याच्या मुलामध्ये न उतरलेली बघून त्याला अपार खिन्नता आली. सगळ्या अवजारांचा आराखडा किंवा बाह्यरेखा त्या दोघांनी भितींवर एकत्रितपणे चितारल्या होत्या, त्यामुळे भिंतीवरची करवतीची जागा ओळखणं अजिबात कठीण नव्हतं. त्याच्या पोटात कालवाकालव झाली आणि छातीत धडधडायला लागलं.

    राग आणि चिडचिड शांत करण्यासाठी स्टीअरिंग व्हीलवर हात ठेवून डोकं सीटला टेकवून तो काही काळ तसाच सुन्न बसून राहिला. प्रश्न ना करवतीचा होता, ना पसार्‍याचा ना लुकासचा.

    त्याला आलेलं वैफल्य आणि त्याने निवडलेले चुकीचे पर्याय हे सगळ्या समस्येचं मूळ होतं. त्याने स्वतःला सावरून वेळीच सगळं ॲलिसला सांगितलं असतं, तर त्यावेळी ते सगळं घडलंच नसतं. तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकतेय याचा अंदाज त्याला यायला लागला होता. जेव्हाजेव्हा तो उशिरापर्यंत काम करत बसे किंवा त्याला कॉन्फरन्ससाठी देशाबाहेर जावं लागे, तेव्हा तिच्या मनातला संशय जास्तच बळावलेला त्याला जाणवायचा. तिला सगळं कळलं होतं पण तिने अद्याप तोंड उघडलं नव्हतं. खरंच तिचं त्याच्यावर ‘इतकं’ प्रेम होतं की, त्याच्यापेक्षा अजून चांगला तिला कुणी मिळू शकत नाही असं तिला वाटत होतं? ती दिसायला सुंदर होती त्यामुळे तिला तिच्या आवडीनुसार कुणीही मिळू शकला असता.

    त्याने डोळे उघडले आणि तो अंधारात बघत राहिला. परपुरुषाबरोबर ॲलिस या केवळ विचारानेदेखील त्याच्या डोक्यात मत्सराची तिडिक उठली. आपण किती नीच माणूस आहोत हे त्याला स्वतःला जाणवायला हा एक विचार पुरेसा होता. घरासमोरून जाताना त्याला दिवे बंद दिसले, याचा अर्थ ॲलिस आणि मुलं झोपली होती, त्यामुळे त्याला उगीचच हायसं वाटलं. पण ना त्याला हायसं वाटून घ्यायचा अधिकार होता ना मत्सर वाटून घ्यायचा. अर्थात ते सगळेजण झोपले होते. मुलांना सकाळी लवकर उठून

    Enjoying the preview?
    Page 1 of 1