Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

दाहक अपराध - प्रकरण २
दाहक अपराध - प्रकरण २
दाहक अपराध - प्रकरण २
Ebook63 pages26 minutes

दाहक अपराध - प्रकरण २

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

मध्य आणि पश्चिम ज्युटलॅंड भागात काम करणार्‍या जोहान बोज या पोलिस अधिकार्‍याचा मार्च महिन्यातील एका अपरात्री भरधाव कारने धक्का दिल्यामुळे मृत्यु होतो. गुन्ह्याच्या जागेवर येऊन पहिला तपास करणारी व्यक्ती असते त्याचा बॉस ॲलेक्स बोर्ग. ही फक्त एक सामान्य अपघाताची केस नसून निर्घृणपणे केलेली हत्या आहे हे त्याच्या तिथे पोचल्यावर त्वरित लक्षात येते. बोजच्या नऊ वर्षाच्या मुलाच्या मते धक्का दिलेल्या कारमधील व्यक्तीने पोलिसांचा गणवेश घातलेला त्याने पाहिलेला असतो. हे त्याच्या धक्का बसलेल्या मनस्थितीतील कल्पनेचे खेळ असू शकतात का? पण पेट्रोल पंपावरील व्हिडीओ फूटेजवरून मुलगा खरं बोलतोय हे नक्की होतं. त्या भयानक रात्री ती कार चालवणार्‍या माणसाने पोलिसांचाच गणवेश घातलेला असतो. पोलिस तक्रार आयोगातील गुन्हे निरिक्षक रोलॅन्डो बेनितो याची या केसच्या कामावर नेमणूक करण्यात येते. इतकं भयानक कृत्य करण्यामागे जोहान बोजच्या कुठल्या सहकार्‍याचा नक्की काय हेतू असावा? पूर्व ज्युटलॅंडमधील टी.व्ही.२ या चॅनेलवरील महिला पत्रकार ॲन लार्सन हिची या केसच्या तपासासाठी मदत घ्यायची रोलॅन्डो बेनितो ठरवतो. काही वर्षांपूर्वी एका आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या स्थानिक कुटुंबाच्या घटनेशी याचा काही संबंध असेल का हे पहायचं ते ठरवतात. नक्की ती आग म्हणजे केवळ अपघातच होत का? वरवर वाटतंय त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळा हेतू या हत्येमागे असावा असा संशय ॲन आणि रोलॅन्डोला असतो. गुन्हेगाराने पुन्हा असंच काहीतरी कृत्य करण्याच्या आधी त्याला पकडण्यासाठी शोध सुरू होतो.
Languageमराठी
PublisherSAGA Egmont
Release dateNov 26, 2019
ISBN9788726232141
दाहक अपराध - प्रकरण २

Read more from – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन

Related to दाहक अपराध - प्रकरण २

Related ebooks

Reviews for दाहक अपराध - प्रकरण २

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    दाहक अपराध - प्रकरण २ - – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन

    purchaser.

    दाहक अपराध

    प्रकरण २

    २४ लिबेरो डायपर्स,- मऊ, ऑरगॅनिक हिप बेबीफूड - बनाना आणि राईस पुडींग, १२ ऑरगॅनिक अंडी,आणि २० ग्रीन किंग सिगरेट्सचं पाकीट.या सामानाच्या यादीवरून ही व्हिनस रोडवरची लिस असल्याची तिला शंका आली. तिने नुकताच एका मुलाला जन्म दिला होता आणि ती कायम ऑरगॅनिक अन्नपदार्थ खात असल्यामुळे निरोगी होती. सिगरेट्स तिच्या नवर्‍यासाठी होत्या. तो अगदी क्वचितच खरेदीसाठी यायचा. तिला वर बघायची पण गरज पडली नाही;ऑरेन्ज ब्लॉसम या सेंटच्या वासाने लगेच तिची ओळख पटवली.

    याचे १७९.९५ क्रोनर्स झाले.

    तू सरळ १८० असं का सांगत नाहीस? लिस कुरकुरत म्हणाली. तिने स्लॉटमध्ये कार्ड टाकलं आणि मागच्या माणसाला दिसू नये म्हणून हाताचा आडोसा करत कोड टाईप केला. तिचं चमकणारं त्वचेच्या रंगाचं नेलपॉलिश बघून लिव्ह लुकाला वाटलं बहुतेक हेदेखील ऑरगॅनिक असावं.

    तिने पुढच्या माणसाने घेतलेल्या गोष्टी स्कॅन करायला सुरुवात केली. पेलिकरचे कोल्ड कट्स,काअरगार्डनचा बटरचा खोका,कार्ल्सबर्गचा ६ चा पॅक,स्ट्रॅन्सची लिव्हर पेट, डॅन गामला फॅब्रिकची जॅमची बॉटल आणि विसकसचे मांजरीचे खाणे......सगळे अगदी खास डॅनिश ब्रॅंड्स. सगळा हिशोब करत वर न बघताच तिने किंमतीचा एकूण आकडा सांगितला. म्हातारा वर्नर नेहमी कॅशच वापरत असे क्रेडीट कार्ड वापरले पाहिजे किंवा वृद्ध लोकांनीही आता कॉम्युटर शिकला पाहिजे वगैरे अशा मूर्ख कल्पनांना त्याने कधीच भीक घातली नव्हती. ते कसे वापरायचे हे अजून नीटसं सरकारला पण कळलं नाही आहे, तो म्हणाला.

    लोकांबद्दलचा अंदाज किती सहज बांधता येतो. त्यांच्या सवयीच तो अंदाज दाखवून देतात. त्यांच्या कचर्‍यावरून बांधता येतो तितकाच अंदाज त्यांनी खरेदी केलेल्या वस्तुंवरुनही बांधता येतो. ही सगळी ब्रॅन्ड्सची नावं तिच्या डोक्यात नोंदली जात असत कारण त्यालाही काहीतरी अर्थ होता. काही ब्रॅन्डसनी स्वस्तात पदार्थ किंवा वस्तू बनवल्या होत्या तर काहींचा गुणवत्तेवर जास्त भर होता. महागड्या ब्रॅन्डसच्या वस्तु खरेदी करणारे लोक सहसा खूप शिक्षण घेतलेले,चांगली नोकरी असणारे आणि जास्त कमावणारे असत. किंवा त्यामुळे त्यांच्या महिन्याच्या अंदाजपत्रकात फारसा फरक पडत नसे. कॉन्डम्स खरेदी करताना लाजेने लाल होणारे तरुणांचे चेहरे बघून तिला मजा वाटत असे. शक्यतो ते अशी खरेदी कॅन्डी बॅग किंवा अशाच कशाच्यातरी खाली लपवून करत असत. नंतर ते तरुण दुकानात येणं बंद झालं. एकतर त्यांनी कॉन्डम्स वापरणं तरी बंद केलं असावं किंवा तिच्या नजरेला नजर द्यावी लागू नये म्हणून त्यांनी ते ऑनलाईन खरेदी करणं सुरू केलं असावं. ती त्यांना नेहमी एक तर डोळे मिचकावून किंवा मजा करा असं सांगून चिडवत असे. संभोग करणे यात इतकं कावरंबावरं होण्यासारखं काय हे तिला कळत नसे. किंवा कॉन्डम वापरतोय हे

    Enjoying the preview?
    Page 1 of 1