Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

दाहक अपराध - प्रकरण ३
दाहक अपराध - प्रकरण ३
दाहक अपराध - प्रकरण ३
Ebook64 pages26 minutes

दाहक अपराध - प्रकरण ३

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

मध्य आणि पश्चिम ज्युटलॅंड भागात काम करणार्‍या जोहान बोज या पोलिस अधिकार्‍याचा मार्च महिन्यातील एका अपरात्री भरधाव कारने धक्का दिल्यामुळे मृत्यु होतो. गुन्ह्याच्या जागेवर येऊन पहिला तपास करणारी व्यक्ती असते त्याचा बॉस ॲलेक्स बोर्ग. ही फक्त एक सामान्य अपघाताची केस नसून निर्घृणपणे केलेली हत्या आहे हे त्याच्या तिथे पोचल्यावर त्वरित लक्षात येते. बोजच्या नऊ वर्षाच्या मुलाच्या मते धक्का दिलेल्या कारमधील व्यक्तीने पोलिसांचा गणवेश घातलेला त्याने पाहिलेला असतो. हे त्याच्या धक्का बसलेल्या मनस्थितीतील कल्पनेचे खेळ असू शकतात का? पण पेट्रोल पंपावरील व्हिडीओ फूटेजवरून मुलगा खरं बोलतोय हे नक्की होतं. त्या भयानक रात्री ती कार चालवणार्‍या माणसाने पोलिसांचाच गणवेश घातलेला असतो. पोलिस तक्रार आयोगातील गुन्हे निरिक्षक रोलॅन्डो बेनितो याची या केसच्या कामावर नेमणूक करण्यात येते. इतकं भयानक कृत्य करण्यामागे जोहान बोजच्या कुठल्या सहकार्‍याचा नक्की काय हेतू असावा? पूर्व ज्युटलॅंडमधील टी.व्ही.२ या चॅनेलवरील महिला पत्रकार ॲन लार्सन हिची या केसच्या तपासासाठी मदत घ्यायची रोलॅन्डो बेनितो ठरवतो. काही वर्षांपूर्वी एका आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या स्थानिक कुटुंबाच्या घटनेशी याचा काही संबंध असेल का हे पहायचं ते ठरवतात. नक्की ती आग म्हणजे केवळ अपघातच होत का? वरवर वाटतंय त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळा हेतू या हत्येमागे असावा असा संशय ॲन आणि रोलॅन्डोला असतो. गुन्हेगाराने पुन्हा असंच काहीतरी कृत्य करण्याच्या आधी त्याला पकडण्यासाठी शोध सुरू होतो.
Languageमराठी
PublisherSAGA Egmont
Release dateNov 26, 2019
ISBN9788726232134
दाहक अपराध - प्रकरण ३

Read more from – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन

Related to दाहक अपराध - प्रकरण ३

Related ebooks

Reviews for दाहक अपराध - प्रकरण ३

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    दाहक अपराध - प्रकरण ३ - – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन

    purchaser.

    दाहक अपराध

    प्रकरण ३

    ॲन लार्सनने मिटिंग रुममध्ये आणलेल्या कॉफीच्या कपाने आपले हात गरम केले. आज परत बर्फाने सगळा निसर्ग गोठला होता आणि वारा पण होता. पूर्व ज्युटलॅंडच्या टी.व्ही.डेस्कला पोचेपर्यंत कारमध्ये ती गारठून गेली होती.

    सुप्रभात. बापरे प्रचंड थंडी आहे आज! वसंत ऋतु लवकर येऊ दे बाबा! तिने आपल्या सहकार्‍यांना अभिवादन केलं आणि तिची होस्ट युट थॉमसन हिच्या शेजारी बसण्याआधी ती थंडीने थरथरली. माझी बोटं थंडीमुळे आखडली आहेत,ती म्हणाली.

    तुझ्या कारमधे हिटर नाहीये?फोटोग्राफरने तिला विचारलं. ते त्याला फ्लॅश म्हणत असत कारण त्याचं नाव मायकल फ्लॅशर असं होतं. त्याने चमकून जाऊन तिला विचारलं.

    तो खराब झालाय.

    असं नाही वाटत तुला आता नवीन गाडी घ्यायची गरज आहे? ती आता गंजलेली दिसायला लागलीय, तुझी जुनी -

    लदा,युट तिच्या गाडीला अजून काहीतरी नावं ठेवायच्या आत ॲनने तिचं वाक्य पूर्ण केलं.

    असंही ऑफिसच्या अंतरापेक्षा जास्त वेळ ती कार गरम व्हायला लागतो,तिची दुसरी सहकारी नोआ मरी हसत म्हणाली.

    तिला क्रीडाप्रकारांची प्रचंड आवड होती आणि सर्वसाधारणणे ती रोज क्रीडाक्षेत्रातल्या बातम्या गोळा करत असे. काहीही हवामान असलं तरी ती नेहमी सायकलनेच सगळीकडे फिरत असे,हॅलडूम या इतक्या दुरच्या गावात राहूनदेखील. उन्हाळ्यामध्ये तर कधी कधी रनिंग करतही ती कामावर येत असे.

    रानस रोडवरुन सरळ तर आहे,हे ती इतक्या सहजपणे म्हणत असली तरी ते अंतर १८ किलोमीटर इतकं होतं म्हणजे ॲन कारने ऑफिसला यायची त्याच्या दुप्पट. पण तुम्ही जर मॅरेथॉन्स आणि ट्रायथ्लॉन्स धावलेले असाल तर हे अंतर म्हणजे तिच्यासाठी फिरायला जाण्यासारखं होतं.

    सुप्रभात,वृत्त व्यवस्थापक म्हणाले. तेदेखील आपला कप घेऊन आले होते. वृत्त टीमचा सगळ्यात कॉफीबाज असणारा माणूस आता कॉफी सोडून पुका-चहा प्यायला लागला होता - त्यांच्या बायकोची कल्पना असावी, तिने अंदाज बांधला आणि पुदिन्याचा एक सुरेख सुगंध तिथलं वातावरण भारुन उरला.

    सिल्गबोमध्ये काल रात्री झालेल्या पोलीस ऑफिसरच्या निर्घृण हत्येबद्दल तुम्ही ऐकलंच असेल,असं मी समजतो, असं म्हणत त्यांनी वर्तमानपत्र टेबलवर भिरकावलं.

    "म्हणजे ती हत्याच होती तर?" असं म्हणत युटने पेपर ओढून घेतला.

    आपल्या गाडीचा धक्का लागलेला माणूस नक्की मेलाय ना याची खात्री करायला जर तुम्ही त्याच जागी परत जात असाल,तर मी तरी त्याला नक्कीच हत्या म्हणेन, फ्लॅश म्हणाला. त्याने तोंडात नाश्ता करण्यासाठी ब्रेड आणि बटरचा बोकाणा भरलेला होता.

    वृत व्यवस्थापकांनी संमतीदर्शक मान हलवली.

    अगदी बरोबर! त्यांनी ॲनकडे पाहिलं. या केसची बातमी तुला करायची आहे".

    ॲनने अधिरपणे होकार दिला.

    "गुन्हा घडला त्या जागेजवळच्या पेट्रोल पंपावरच्या सी सी टीव्ही कॅमेर्‍यामध्ये एक कार पुन्हा वळून

    Enjoying the preview?
    Page 1 of 1