Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

दाहक अपराध - प्रकरण ६
दाहक अपराध - प्रकरण ६
दाहक अपराध - प्रकरण ६
Ebook64 pages25 minutes

दाहक अपराध - प्रकरण ६

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

मध्य आणि पश्चिम ज्युटलॅंड भागात काम करणार्‍या जोहान बोज या पोलिस अधिकार्‍याचा मार्च महिन्यातील एका अपरात्री भरधाव कारने धक्का दिल्यामुळे मृत्यु होतो. गुन्ह्याच्या जागेवर येऊन पहिला तपास करणारी व्यक्ती असते त्याचा बॉस ॲलेक्स बोर्ग. ही फक्त एक सामान्य अपघाताची केस नसून निर्घृणपणे केलेली हत्या आहे हे त्याच्या तिथे पोचल्यावर त्वरित लक्षात येते. बोजच्या नऊ वर्षाच्या मुलाच्या मते धक्का दिलेल्या कारमधील व्यक्तीने पोलिसांचा गणवेश घातलेला त्याने पाहिलेला असतो. हे त्याच्या धक्का बसलेल्या मनस्थितीतील कल्पनेचे खेळ असू शकतात का? पण पेट्रोल पंपावरील व्हिडीओ फूटेजवरून मुलगा खरं बोलतोय हे नक्की होतं. त्या भयानक रात्री ती कार चालवणार्‍या माणसाने पोलिसांचाच गणवेश घातलेला असतो. पोलिस तक्रार आयोगातील गुन्हे निरिक्षक रोलॅन्डो बेनितो याची या केसच्या कामावर नेमणूक करण्यात येते. इतकं भयानक कृत्य करण्यामागे जोहान बोजच्या कुठल्या सहकार्‍याचा नक्की काय हेतू असावा? पूर्व ज्युटलॅंडमधील टी.व्ही.२ या चॅनेलवरील महिला पत्रकार ॲन लार्सन हिची या केसच्या तपासासाठी मदत घ्यायची रोलॅन्डो बेनितो ठरवतो. काही वर्षांपूर्वी एका आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या स्थानिक कुटुंबाच्या घटनेशी याचा काही संबंध असेल का हे पहायचं ते ठरवतात. नक्की ती आग म्हणजे केवळ अपघातच होत का? वरवर वाटतंय त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळा हेतू या हत्येमागे असावा असा संशय ॲन आणि रोलॅन्डोला असतो. गुन्हेगाराने पुन्हा असंच काहीतरी कृत्य करण्याच्या आधी त्याला पकडण्यासाठी शोध सुरू होतो.
Languageमराठी
PublisherSAGA Egmont
Release dateNov 26, 2019
ISBN9788726232103
दाहक अपराध - प्रकरण ६

Read more from – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन

Related to दाहक अपराध - प्रकरण ६

Related ebooks

Reviews for दाहक अपराध - प्रकरण ६

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    दाहक अपराध - प्रकरण ६ - – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन

    purchaser.

    दाहक अपराध

    प्रकरण ६

    वृत्त व्यवस्थापक खुर्चीला मागे टेकून चष्म्याची एक काडी चावत बसला होता. तो खुर्ची मागेपुढे करत ॲन लार्सनने केलेले सादरीकरण ऐकत होता.

    जेव्हा त्याला तिच्या पेलोपला आणि रानसला जाऊन एकटीच लिव्ह लुकला भेटण्याचा गोष्टीबद्दल कळलं तेव्हा त्याला ते फारसं पसंत पडलं नव्हतं. पण तिने जेव्हा त्याला सांगितलं की आता माझ्या मदतीमुळे केसचा निकाल लागेल आणि रोलॅन्ड बेनितोला मी फक्त आपल्या चॅनेलसाठी विशेष मुलाखत द्यायला लावेन तेव्हा त्याचा राग थोडा शांत झाला होता. खुर्ची सरळ करत त्याने चष्मा परत त्याने डोळयावर चढवला.

    हे कर तू,ॲन! हे जबरदस्त आहे. ही बातमी फक्त आपल्याकडे आहे! मला ही ७:३० च्या बुलेटीनमध्ये हवी आहे. आणि हो कालचं म्युझिमयमधलं शुटींग पण मस्त झालंय. आपल्याला आज त्याच्या उद्घाटनाची पण बातमी करायची आहे,लक्षात आहे ना? ती त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडताना त्याने ओरडून तिला आठवण करुन दिली.

    खुन्याचं नाव जाहीर करणारी बातमी आपण देऊ आणि मी रोलॅन्ड बेनितो बरोबर मुलाखत मिळवून देईन हे बॉसला पटवण्यात तिने मोठा जुगार खेळला होता. ते पण त्याच्या खास मुलाखतीचं वचन. पण तिने काल ओक नर्सिंग होममध्ये जे सत्य शोधून काढलं आहे ते त्याला सांगितल्यावर ती काही अगदीच अशक्य कोटीतील गोष्ट नव्हती. तिला आता फक्त काही गोष्टी तपासून पहायच्या होत्या.

    लिव्ह लुकाच्या वागण्याचा तिला धक्का बसला होता पण तिच्या भावाने त्या स्क्रीनवर जे लिहून दाखवलं,त्यापेक्षा कमीच. त्याच्या मेंदुमध्ये काहीही बिघाड झाला नव्हता. याची तिला खात्री झाली.

    मानसिक धसका या विषयाचा खास अभ्यास असलेल्या मानसोपचार तज्ञांशी बोलण्यापासून तिने आपल्या दिवसाची सुरुवात केली होती. मानसिक धसका म्हणजे एखाद्या घटनेमुळे मानवी मेंदुवर प्रचंड ताण येऊन त्याचे शारिरीक आणि मानसिक परिणाम दिसू शकतात. नेहमीच्या ताणापेक्षा ही लक्षणं खूप तीव्र असतात. यामुळे तुमची वाचा जाऊ शकते किंवा शारीरीक हालचाली बंद पडू शकतात. स्मृतिभ्रंशही होऊ शकतो ज्यामध्ये त्या विशिष्ट घटनेशी संबंधित सगळ्या आठवणी दाबल्या जातात. जर वेळेत उपचार केले गेले नाहीत तर त्यातून पुढे निद्रानाश,चिडचिड,संतापी स्वभाव किंवा इतर अनेक शारीरीक व्याधी देखील जडू शकतात.

    अर्थात,विलासच्या मेंदुत त्या घटनेच्या आठवणी दाबल्या गेल्या होत्या. जरी तिलाच आधी वाटत होतं की विलासनेच जोहान बोजला मारलं असावं तरीदेखील आता त्याने ॲनला जे सांगितलं ते खरंच असणार याबद्दल तिला जराही शंका नव्हती. लिव्ह लुकाची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी होती. विलासने डीलीट करण्याआधी तिने स्क्रीनवर नक्की काय काय वाचलं असेल?

    पण दोन्ही भावंडांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता हे मात्र

    Enjoying the preview?
    Page 1 of 1