Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #2
अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #2
अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #2
Ebook141 pages47 minutes

अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #2

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

'अजब मुलांच्या गजब गोष्टी' या बालकथांचे हे दुसरे पुस्तक आहे.

यातील मुले अगदी खर्‍या  अर्थाने अजब आहेत आणि त्यांच्या कथाही गजब आहेत.

 

 १. अनोखी दुर्बिण : चेतन एक शहरी मुलगा आहे व समुद्रकिनारी फिरायला गेला असता समुद्रकिनार्‍यावर त्याला एक दुर्बिण सापडते. ती दुर्बिण थोडी अनोखी आहे. तिच्या मदतीने चेतन व त्याचा मित्र गगन काय काय अनुभवतात व काय करामती करतात हे या पुस्तकात तुम्हांला वाचायला मिळेल.

 

 २. सप्तमची गोष्ट : सातव्या मुलाचा सातवा मुलगा असलेला सप्तम नावाचा मुलगा अजब आहे. त्याला वारा, पशु-पक्षी व माशांची भाषा कळते. या त्याच्या विशेषतेमुळे त्याला काय अनुभव येतात व त्याचे भाग्य कसे उजळते या कथेत वाचता येईल.

 

 ३. पांढरी मांजर : ही पांढरी चिनी मातीची छोटी मांजर मानवच्या घरात पिढ्या न पिढ्या  कपाटात असते. मानव तिला बाहेर काढतो व ती त्याच्या आवडीची बनते. त्यानंतर ती मांजर त्याच्याशी बोलू लागते. काही जादुही करते. एवढेच नाही तर त्यांचे घरही वाचवते. ते कसे हे या गोष्टीत वाचा.

Languageमराठी
Release dateNov 5, 2020
ISBN9781393880219
अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #2

Related to अजब मुलांच्या गजब गोष्टी

Titles in the series (2)

View More

Related ebooks

Reviews for अजब मुलांच्या गजब गोष्टी

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    अजब मुलांच्या गजब गोष्टी - स्नेहल जी

    ©प्रताधिकार (CopyRight)

    ©२०२० स्नेहल घाटगे & डॉ. प्रतीक घाटगे (legal successor)

    या पुस्तकातील लिखाणाचे सर्व प्रताधिकार हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत. यातील मजकूर, मूळ, खंडित अथवा संक्षिप्त अशा कोणत्याही स्वरूपात प्रसिद्ध करता येणार नाही. तसेच लेखिकेच्या पूर्व परवानगीशिवाय तो संपूर्ण, खंडित अथवा संक्षिप्त स्वरूपात कुठल्याही इतर भाषेत अनुवादित अथवा रुपांतरीत करता येणार नाही.

    प्रकाशक:  शब्दविश्व प्रकाशन, नवी मुंबई.

    संपर्क : shabdavishwa@gmail.com

    प्रथमावृत्ती नोव्हेंबर २०२०

    अस्वीकृती (Disclaimer)

    या पुस्तकातील कथा पूर्णता काल्पनिक आहेत. त्यांना सत्याचा बिलकुल आधार नाही. केवळ मनोरंजनात्मक हेतूने केलेले हे कल्पित लेखन आहे. यातील घटनांचे वा पात्रांचे प्रत्यक्षातील घटनांशी वा कोणा मृत वा जिवीत व्यक्तींशी काही साधर्म्य आढळलेच, तर तो केवळ विरळा योगायोग समजावा...

    ~~~~~

    या पुस्तकातील सर्व कथा जरी काल्पनिक असल्या, तरी कथांमध्ये उल्लेख आलेल्या शास्त्रीय वा इतरही काही गोष्टींचे स्पष्टीकरण तळटीपांमध्ये दिले आहे. उल्लेखासमोर दिलेल्या आकड्यांवर टिचकी मारून त्या टळटीपा वाचता येतात. बालवाचकांनी त्या अवश्य वाचाव्यात, जेणेकरुन मनोरंजनाबरोबरच ज्ञानवर्धनही होईल.

    अनुक्रम

    अनोखी दुर्बीण

    भाग एक

    भाग दोन

    सप्तमची गोष्ट

    पांढरी मांजर

    अनोखी दुर्बीण

    भाग एक

    बोट पहिल्यांदा समुद्रावर दिसली तेव्हा ती खूप गटांगळ्या घेत होती.

    A drawing of a face Description automatically generated

    तिचा रंग विलक्षण होता आणि तिची शीडं आणि डोलकाठ्याही काहीतरी अनोख्या अपरिचित दिसत होत्या. एखाद्या रंगवलेल्या चित्रातील सोनेरी बोटीसारखी ती दिसत होती.

    मी अशी बोट कधी पाहिली नाही. किनार्‍यावरचा एक वृद्ध गृहस्थ म्हणाला.

    दुपार टळून गेलेली होती आणि आकाश करड्या रंगाचे दिसत होते. गडद करडे ढग उंटांच्या कळपांप्रमाणे घाईघाईने आकाशात फिरत होते. समुद्राच्या लाटा जांभळ्या आणि निळ्या रंगाच्या होत्या आणि पश्चिमेला अनैसर्गिकपणे दिसणारा एक हिरवा प्रकाश एवढेच सूर्यास्ताचे चिन्ह होते.

    मला तिच्यासारखी दुसरी कधी दिसली नाही. गॉगल घालून समुद्रकिनार्‍यावर फिरत असलेला एक तरुण म्हणाला. एका लहान मुलाला बुडण्यापासून वाचविल्याबद्दल त्या वृद्ध गृहस्थाने त्याला तो गॉगल दिला होता.

    ती कुठून आली आहे व कोणत्या बंदरात अशा बांधणीच्या बोटी बनवतात, हे जो मला सांगेल त्याला मी शंभर रुपये देईन. आतापर्यंत तेथे जमू लागलेल्या लोकांच्या गर्दीला उद्देशून एक मध्यमवयीन गृहस्थ म्हणाला.

    अरेरे! आपल्या गॉगलखालून तो तरुण उद्गारला, ती जाते आहे. आणि ती गेली.

    तिचं नाकाड अचानक पाण्याखाली गेलं आणि पावसानंतरच्या पाणबदकासारखी ती तिरकी उभी राहिली. मग हळूहळू, घाई न करता, पण तिचा एक निश्चित उद्देश असल्याप्रमाणे क्षणार्धात ती बुडाली आणि ती जिथे होती ती जागा राखाडी रंगाच्या लाटांनी पुसून टाकली.

    आता मला आशा आहे की, मी तुम्हांला या बोटीबद्दल आणखी काही सांगावं अशी अपेक्षा तुम्ही करणार नाही – कारण अजून काही सांगायचं नाहीये. ती कोणत्या देशातून आली होती, ती कोणत्या बंदरात जाणार होती, तिच्यात कोणता माल होता आणि तिचे खलाशी कोणती भाषा बोलत होते – या सगळ्या गोष्टी गुपित आहेत. आणि ते एक बोटीसोबतच मृत झालेले रहस्य आहे, जे कोणालाच माहीत नाही. इतर कोणतीही रहस्ये माझ्यासाठी मृत गुपिते नाहीत. मलाही हे खरोखरच माहीत नाही, कारण ते माहीत असते, तर मी तुम्हांला ते ताबडतोब सांगितले असते. कारण निदान माझ्याकडे तुमच्यापासून लपविण्यासाठी इतर कोणतीही गुपिते नाहीत.

    जेव्हा जहाजे समुद्रात बुडतात, तेव्हा त्यांतील वस्तू जवळच्या खाडीच्या वाळूवर किनार्‍याला लागतात, जसे – दोरखंडात अडकलेले लाकडाचे ओंडके, तुटलेले फर्निचर, पिंपे ज्यामध्ये खलाशांसाठीची दारू आणि बिस्किटे इत्यादी गोष्टी असतात. आणि कधीकधी आपण बोलू शकणार नाही अशा दुःखद गोष्टीही असतात.

    आता, जर तुम्ही समुद्रकिनारी राहत असाल आणि मोठे असाल, तर तुम्हांला माहीत आहे की, जर समुद्रकिनाऱ्यावर तुम्हांला काही सापडले, (मला शंख, शिंपले, स्टारफिश किंवा जेलीफिश किंवा समुद्री उंदीर किंवा इतर काही समुद्री वस्तू म्हणायचे नाही, पण तुम्हांला खरोखरच स्वत:कडे ठेवायला आवडेल अशी जहाजातील काहीही वस्तू) तर ते किनार्‍यावरील तटरक्षकाकडे नेऊन त्यांना ‘मला हे सापडले आहे,’ असे कळविणे हे तुमचे कर्तव्य आहे. मग तटरक्षक दल ते योग्य प्राधिकरणाकडे पाठवेल आणि आजकाल, तुम्हांला जे काही सापडले आहे त्याच्या एक तृतीयांश किंमतीचे बक्षीस मिळेल.

    पण कोणत्याही गोष्टीच्या किंमतीच्या एक तृतियांश म्हणा की, दोन तृतीयांश बक्षिस, हे त्याच्या मूल्याच्या तीन तृतीयांश एवढे मूल्य नाही.

    आणि जर तुम्ही मोठे नसाल आणि समुद्राजवळ राहत नसाल व एका चांगल्या छोट्याशा उपनगरातील एका छोट्याशा बंगल्यात, जिथे सर्व फर्निचर नवीन आहे आणि नोकरचाकर आहेत, तर तुम्हाला तुमच्या या कर्तव्याबद्दल काहीही माहीत असणार नाही. आणि अशावेळी जर समुद्राकिनार्‍यावर तुम्हांला हवी असलेली वस्तू सापडली तर, जास्तकरून तुम्हांला तुमच्या कर्तव्याबद्दल काहीही माहीत असणार नाही.

    चेतन मोठा नव्हता आणि तो समुद्रकिनारी राहत नव्हता. त्याचे वडील सैन्यात असल्याने तो मावशीसोबत तिच्या शहरातील बंगल्यात राहात होता आणि फक्त सुट्टीसाठी तो मावशीबरोबर समुद्रकिनारी फिरायला आला होता. त्यामुळे

    Enjoying the preview?
    Page 1 of 1