Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

अजब मुलांच्या गजब गोष्टी: अनोखी दुर्बिण व इतर गोष्टी
अजब मुलांच्या गजब गोष्टी: अनोखी दुर्बिण व इतर गोष्टी
अजब मुलांच्या गजब गोष्टी: अनोखी दुर्बिण व इतर गोष्टी
Ebook180 pages58 minutes

अजब मुलांच्या गजब गोष्टी: अनोखी दुर्बिण व इतर गोष्टी

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

अजब मुलांच्या गजब गोष्टी' या किशोरकथा मालिकेतील हे दुसरे पुस्तक आहे.
यातील मुले अगदी खर्‍या अर्थाने अजब आहेत आणि त्यांच्या कथाही गजब आहेत.

१. अनोखी दुर्बीण : चेतन एक शहरी मुलगा आहे व समुद्रकिनारी फिरायला गेला असता समुद्रकिनार्‍यावर त्याला एक दुर्बीण सापडते. ती दुर्बीण थोडी अनोखी आहे. तिच्या मदतीने चेतन व त्याचा मित्र गगन काय काय अनुभवतात व काय करामती करतात हे या पुस्तकात तुम्हांला वाचायला मिळेल.

२. सप्तमची गोष्ट : सातव्या मुलाचा सातवा मुलगा असलेला सप्तम नावाचा मुलगा अजब आहे. त्याला वारा, पशु-पक्षी व माशांची भाषा कळते. या त्याच्या विशेषतेमुळे त्याला काय अनुभव येतात व त्याचे भाग्य कसे उजळते या कथेत वाचता येईल.

३. पांढरी मांजर : ही पांढरी चिनी मातीची छोटी मांजर मानवच्या घरात पिढ्या न पिढ्या कपाटात असते. मानव तिला बाहेर काढतो व ती त्याच्या आवडीची बनते. त्यानंतर ती मांजर त्याच्याशी बोलू लागते. काही जादुही करते. एवढेच नाही तर त्यांचे घरही वाचवते. ते कसे हे या गोष्टीत वाचा.

अजब मुलांच्या गजब गोष्टी' या किशोरकथा मालिकेतील पहिले पुस्तक ‘निल्लुच्या गोष्टी’ वाचण्यास विसरू नका.

Languageमराठी
Release dateNov 23, 2021
ISBN9781005532161
अजब मुलांच्या गजब गोष्टी: अनोखी दुर्बिण व इतर गोष्टी
Author

स्नेहल घाटगे

Dr. Snehal Ghatage, is a qualified MD physician and worked as Professor of Medicine in reputed Grant Medical College and Sir J. J. group Hospitals in Mumbai, India for long time.Since she likes to write, she now has decided to devote all her time to writing.She has published her first writings about `Health and Nutrition’ on her blog www.docindia.wordpress.com/She started writing fiction in her native language Marathi since 2010. One children book "Nillu And Billu : निल्लु आणि बिल्लु’ is already published on Smashwords.com a year ago. https://www.smashwords.com/books/view/350889Her first Marathi novel कायापालट is published in print on 25th August 2014. Now she had made it available in e-book format on Smashwords.com : https://www.smashwords.com/books/view/471394अज्ञातवास’, a story with medical background of a person living incognito is her second e-published novel. She has also written, a biographical book , ’आद्यकर्मी इलिजाबेथ’ about Dr. Elizabeth Blackwell, a nineteenth century woman pioneer in the history of medicine. which will soon be published both in print and e-book formats.Dr. Snehal Ghatage lives in India.

Related to अजब मुलांच्या गजब गोष्टी

Related ebooks

Reviews for अजब मुलांच्या गजब गोष्टी

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    अजब मुलांच्या गजब गोष्टी - स्नेहल घाटगे

    अनुक्रम

    प्रताधिकार

    अनोखी दुर्बीण

    भाग एक

    भाग दोन

    सप्तमची गोष्ट

    पांढरी मांजर

    प्रिय वाचक

    लेखिका परिचय

    प्रकाशित पुस्तके

    आगामी पुस्तके

    ©प्रताधिकार / Copyright

    ©स्नेहल घाटगे & डॉ. प्रतीक घाटगे

    या पुस्तकाचे सर्व प्रताधिकार हक्कA उपरिनिर्दिष्ट प्रताधिकारधारकांच्या स्वाधीन आहेत

    प्रकाशक

    शब्दविश्व प्रकाशन, नवी मुंबई.

    shabdavishwa@gmail.com

    प्रथमावृत्ती नोव्हेंबर २०२०

    अस्वीकृती (Disclaimer)

    या पुस्तकातील कथा पूर्णता काल्पनिक आहेत. केवळ मनोरंजनात्मक हेतूने केलेले हे कल्पित लेखन आहे. यातील घटनांचे वा पात्रांचे प्रत्यक्षातील घटनांशी वा कोणा मृत वा जिवीत व्यक्तींशी काही साधर्म्य आढळलेच, तर तो केवळ विरळा योगायोग समजावा...

    या पुस्तकातील सर्व कथा जरी काल्पनिक असल्या, तरी कथांमध्ये उल्लेख आलेल्या शास्त्रीय वा इतरही काही गोष्टींचे स्पष्टीकरण तळटीपांमध्ये दिले आहे. उल्लेखासमोर दिलेल्या आकड्यांवर टिचकी मारून त्या टळटीपा वाचता येतात. बालवाचकांनी त्या अवश्य वाचाव्यात, जेणेकरुन मनोरंजनाबरोबरच ज्ञानवर्धनही होईल.

    अनोखी दुर्बीण

    भाग एक

    बोट पहिल्यांदा समुद्रावर दिसली तेव्हा ती खूप गटांगळ्या घेत होती.

    तिचा रंग विलक्षण होता आणि तिची शीडं आणि डोलकाठ्याही काहीतरी अनोख्या अपरिचित दिसत होत्या. एखाद्या रंगवलेल्या चित्रातील सोनेरी बोटीसारखी ती दिसत होती.

    मी अशी बोट कधी पाहिली नाही. किनार्‍यावरचा एक वृद्ध गृहस्थ म्हणाला.

    दुपार टळून गेलेली होती आणि आकाश करड्या रंगाचे दिसत होते. गडद करडे ढग उंटांच्या कळपांप्रमाणे घाईघाईने आकाशात फिरत होते. समुद्राच्या लाटा जांभळ्या आणि निळ्या रंगाच्या होत्या आणि पश्चिमेला अनैसर्गिकपणे दिसणारा एक हिरवा प्रकाश एवढेच सूर्यास्ताचे चिन्ह होते.

    मला तिच्यासारखी दुसरी कधी दिसली नाही. गॉगल घालून समुद्रकिनार्‍यावर फिरत असलेला एक तरुण म्हणाला. एका लहान मुलाला बुडण्यापासून वाचविल्याबद्दल त्या वृद्ध गृहस्थाने त्याला तो गॉगल दिला होता.

    ती कुठून आली आहे व कोणत्या बंदरात अशा बांधणीच्या बोटी बनवतात, हे जो मला सांगेल त्याला मी शंभर रुपये देईन. आतापर्यंत तेथे जमू लागलेल्या लोकांच्या गर्दीला उद्देशून एक मध्यमवयीन गृहस्थ म्हणाला.

    अरेरे! आपल्या गॉगलखालून तो तरुण उद्गारला, ती जाते आहे. आणि ती गेली.

    तिचं नाकाड अचानक पाण्याखाली गेलं आणि पावसानंतरच्या पाणबदकासारखी ती तिरकी उभी राहिली. मग हळूहळू, घाई न करता, पण तिचा एक निश्चित उद्देश असल्याप्रमाणे क्षणार्धात ती बुडाली आणि ती जिथे होती ती जागा राखाडी रंगाच्या लाटांनी पुसून टाकली.

    आता मला आशा आहे की, मी तुम्हांला या बोटीबद्दल आणखी काही सांगावं अशी अपेक्षा तुम्ही करणार नाही – कारण अजून काही सांगायचं नाहीये. ती कोणत्या देशातून आली होती, ती कोणत्या बंदरात जाणार होती, तिच्यात कोणता माल होता आणि तिचे खलाशी कोणती भाषा बोलत होते – या सगळ्या गोष्टी गुपित आहेत. आणि ते एक बोटीसोबतच मृत झालेले रहस्य आहे, जे कोणालाच माहीत नाही. इतर कोणतीही रहस्ये माझ्यासाठी मृत गुपिते नाहीत. मलाही हे खरोखरच माहीत नाही, कारण ते माहीत असते, तर मी तुम्हांला ते ताबडतोब सांगितले असते. कारण निदान माझ्याकडे तुमच्यापासून लपविण्यासाठी इतर कोणतीही गुपिते नाहीत.

    जेव्हा जहाजे समुद्रात बुडतात, तेव्हा त्यांतील वस्तू जवळच्या खाडीच्या वाळूवर किनार्‍याला लागतात, जसे – दोरखंडात अडकलेले लाकडाचे ओंडके, तुटलेले फर्निचर, पिंपे ज्यामध्ये खलाशांसाठीची दारू आणि बिस्किटे इत्यादी गोष्टी असतात. आणि कधीकधी आपण बोलू शकणार नाही अशा दुःखद गोष्टीही असतात.

    आता, जर तुम्ही समुद्रकिनारी राहत असाल आणि मोठे असाल, तर तुम्हांला माहीत आहे की, जर समुद्रकिनाऱ्यावर तुम्हांला काही सापडले, (मला शंख, शिंपले, स्टारफिश किंवा जेलीफिश किंवा समुद्री उंदीर किंवा इतर काही समुद्री वस्तू म्हणायचे नाही, पण तुम्हांला खरोखरच स्वत:कडे ठेवायला आवडेल अशी जहाजातील काहीही वस्तू) तर ते किनार्‍यावरील तटरक्षकाकडे नेऊन त्यांना ‘मला हे सापडले आहे,’ असे कळविणे हे तुमचे कर्तव्य आहे. मग तटरक्षक दल ते योग्य प्राधिकरणाकडे पाठवेल आणि आजकाल, तुम्हांला जे काही सापडले आहे त्याच्या एक तृतीयांश किंमतीचे बक्षीस मिळेल.

    पण कोणत्याही गोष्टीच्या किंमतीच्या एक तृतियांश म्हणा की, दोन तृतीयांश बक्षिस, हे त्याच्या मूल्याच्या तीन तृतीयांश एवढे मूल्य नाही.

    आणि जर तुम्ही मोठे नसाल आणि समुद्राजवळ राहत नसाल व एका चांगल्या छोट्याशा उपनगरातील एका छोट्याशा बंगल्यात, जिथे सर्व फर्निचर नवीन आहे आणि नोकरचाकर आहेत, तर तुम्हाला तुमच्या या कर्तव्याबद्दल काहीही माहीत असणार नाही. आणि अशावेळी जर समुद्राकिनार्‍यावर तुम्हांला हवी असलेली वस्तू सापडली तर, जास्तकरून तुम्हांला तुमच्या कर्तव्याबद्दल काहीही माहीत असणार नाही.

    चेतन मोठा नव्हता आणि तो समुद्रकिनारी राहत नव्हता. त्याचे वडील सैन्यात असल्याने तो मावशीसोबत तिच्या शहरातील बंगल्यात राहात होता आणि फक्त सुट्टीसाठी तो मावशीबरोबर समुद्रकिनारी फिरायला आला होता. त्यामुळे त्याला काही नियम माहीत नव्हते आणि त्याला समुद्रकिनारी जे सापडले ते सगळं त्यानं ठेवून घेतलं.

    पण तो व त्याची मावशी, समुद्रकिनारी ज्या निवासस्थानांमध्ये राहात होते, तेथल्या मालकिणीने त्या सगळ्या वस्तू एका बादलीत भरून त्या कचर्‍याच्या कुंडीत फेकून दिल्या.

    चेतन एक शांत आणि चिकाटीचा लहान मुलगा असल्यामुळे तो रडला नाही किंवा तक्रार केली नाही, पण नम्रपणे आपल्या खजिन्याचा पाठलाग करीत तो कचर्‍याच्या डब्याशी गेला. तेथे एक डुक्कर आनंदाने मृत समुद्री उंदीर खात होता, जितक्या चवीने आणि सहजपणे आपण मासे खातो.

    आणि त्याला पहिली गोष्ट सापडली ती म्हणजे आत गुलाबी, हिरवा आणि निळा असलेला, कालव्याचा शिंपला आणि दुसरा जुना बूट होता – खरोखरच खूप जुना होता आणि तिसरी ‘ती’ होती.

    ‘ती’ एक चामड्याची जुनी पेटी होती.

    त्यावर माणसांच्या, प्राण्यांच्या आणि चेतनला वाचता येत नसलेल्या शब्दांच्या विचित्र छोट्या छोट्या आकृती कोरलेल्या होत्या. ती आयताकृती होती आणि त्याची चावी नव्हती, पण एक प्रकारची चामड्याची कडी होती. आणि कुतूहलाची गोष्ट म्हणजे ती पेटी, बुटाच्या लेससारख्या दोरीने बांधलेली होती.

    चेतनने ती पेटी उघडली. आत अनेक गोष्टी होत्या: विचित्र दिसणारी उपकरणं, जी साधारण त्याला शाळेत बक्षीस मिळालेल्या आवडत्या कंपास पेटीतील उपकरणांसारखी होती. तर काही त्याने यापूर्वी कधीही पाहिली नव्हती.

    Enjoying the preview?
    Page 1 of 1