Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

दाहक अपराध - प्रकरण ४
दाहक अपराध - प्रकरण ४
दाहक अपराध - प्रकरण ४
Ebook65 pages26 minutes

दाहक अपराध - प्रकरण ४

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

मध्य आणि पश्चिम ज्युटलॅंड भागात काम करणार्‍या जोहान बोज या पोलिस अधिकार्‍याचा मार्च महिन्यातील एका अपरात्री भरधाव कारने धक्का दिल्यामुळे मृत्यु होतो. गुन्ह्याच्या जागेवर येऊन पहिला तपास करणारी व्यक्ती असते त्याचा बॉस ॲलेक्स बोर्ग. ही फक्त एक सामान्य अपघाताची केस नसून निर्घृणपणे केलेली हत्या आहे हे त्याच्या तिथे पोचल्यावर त्वरित लक्षात येते. बोजच्या नऊ वर्षाच्या मुलाच्या मते धक्का दिलेल्या कारमधील व्यक्तीने पोलिसांचा गणवेश घातलेला त्याने पाहिलेला असतो. हे त्याच्या धक्का बसलेल्या मनस्थितीतील कल्पनेचे खेळ असू शकतात का? पण पेट्रोल पंपावरील व्हिडीओ फूटेजवरून मुलगा खरं बोलतोय हे नक्की होतं. त्या भयानक रात्री ती कार चालवणार्‍या माणसाने पोलिसांचाच गणवेश घातलेला असतो. पोलिस तक्रार आयोगातील गुन्हे निरिक्षक रोलॅन्डो बेनितो याची या केसच्या कामावर नेमणूक करण्यात येते. इतकं भयानक कृत्य करण्यामागे जोहान बोजच्या कुठल्या सहकार्‍याचा नक्की काय हेतू असावा? पूर्व ज्युटलॅंडमधील टी.व्ही.२ या चॅनेलवरील महिला पत्रकार ॲन लार्सन हिची या केसच्या तपासासाठी मदत घ्यायची रोलॅन्डो बेनितो ठरवतो. काही वर्षांपूर्वी एका आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या स्थानिक कुटुंबाच्या घटनेशी याचा काही संबंध असेल का हे पहायचं ते ठरवतात. नक्की ती आग म्हणजे केवळ अपघातच होत का? वरवर वाटतंय त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळा हेतू या हत्येमागे असावा असा संशय ॲन आणि रोलॅन्डोला असतो. गुन्हेगाराने पुन्हा असंच काहीतरी कृत्य करण्याच्या आधी त्याला पकडण्यासाठी शोध सुरू होतो.
Languageमराठी
PublisherSAGA Egmont
Release dateNov 26, 2019
ISBN9788726232127
दाहक अपराध - प्रकरण ४

Read more from – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन

Related to दाहक अपराध - प्रकरण ४

Related ebooks

Reviews for दाहक अपराध - प्रकरण ४

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    दाहक अपराध - प्रकरण ४ - – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन

    purchaser.

    दाहक अपराध

    प्रकरण ४

    रोलॅन्ड बेनितोने आपल्या डेस्कवरचा दिवा सुरु केला. खोलीत बाकी ठिकाणी काळोख होता त्यामुळे त्याच्या डेस्कवरच्या पांढर्‍या कागदावर प्रकाश पसरला. बराच उशीर झाला होता. त्याचे डोळे चुरचुरत होते आणि त्याने स्वतःलाच शंभराव्यांदा बजावलं की अहवाल तसाच ठेवून घरी निघ, पण अगदी शेवटचं एक पान राहिलं होतं.

    वाचताना त्यालाच वाईट वाटत होतं- गॅस स्फोटामुळे उध्वस्त झालेलं एक कुटुंब, एक १५ वर्षांची मुलगी शाळेतून आल्यावर तिच्या घराला आग लागलेली बघते,तिला जेमतेम तिच्या भावाला वाचवायला वेळ मिळतो,मात्र तिची आई जेनेट लूका हिचा या आगीत अंत होतो. जर जोहान बोजचं या बाईवर खरंच प्रेम असेल तर त्याला हा अहवाल वाचताना किती त्रास झाला असेल. पण केस निकाली काढण्यात आली होती तर तो हा अहवाल का वाचत होता? त्याची काहीच गरज नव्हती. हा जुना अहवाल हे त्याच्या हत्येमागचं कारण असेल का? रोलॅन्डच्या डोक्यातून हा विचार जाईना. त्याला माहीत होतं की ही केस त्याला सोडवायची नाही. कार कोण चालवत होतं एवढंच शोधून काढण्याचं काम त्याला दिलं गेलं होतं. त्याच्या तपासाचा हेतु इतकाच होता.

    करिना घरी गेली तेव्हा तो स्वतःहूनच रिपोर्ट वाचायला मागे थांबला होता. त्याला हे बघायचं होतं की जोहानच्या हाती काही धागेदोरे लागले होते असं या अहवालातून ध्वनित होतं आहे का? कदाचित गॅस स्फोट हा अपघात नसून घातपात असू शकतो जोहानला काही माहिती मिळाली असल्याची त्याच्या खुन्याला कल्पना असेल का? कदाचित त्याच्याच सहकार्‍याने हे केलं असेल? पण पोलिसांच्या किंवा फॉरेन्सिक खात्याच्या अहवालातदेखील तसं ध्वनित करणारं काहीच नव्हतं. जेनेट लूका हिचा गॅसच्या स्फोटामध्ये मृत्यु झाला इतकीच नोंद होती.

    रोलॅन्डने अहवाल बंद केला आणि तो खुर्चीत मागे रेलून बसला. जेव्हा त्याने टेबलावरचा दिवा बंद केला तेव्हा त्याच्या डोळ्याला सवय होईपर्यंत एकदम त्याला आजुबाजुच्या काळोखाने घेरुन टाकलं आणि मग काही क्षणात हलकेच रस्त्यावरचा उजेड त्याच्या डोळ्यात शिरला.

    मध्य स्टेशनचा भाग असलेल्या जुन्या पोस्ट आणि तार खात्याच्या इमारतीमध्ये स्वतंत्र पोलीस तक्रार आयोगाचं कार्यालय होतं. सगळे घरी निघून गेले होते आणि आपणही आता घरी गेलं पाहिजे असं त्याला वाटलं. म्हणजे कदाचित त्याला झोपायच्या आधी आयरिनशी थोड्या गप्पा मारत एखादा ग्लास बारोलो वाईन प्यायला वेळ मिळाला असता. उद्या त्याला आणि करिनाला सिल्गबो इथे जायचं होतं. सिल्गबो मधल्या शेवटच्या काही अधिकार्‍यांची चौकशी अजून बाकी होती. त्यांचं आज सगळ्यांशी बोलणं झालं नव्हतं आणि जोहानचा ज्या कारच्या धक्क्याने मृत्यु झाला तशाच प्रकारची कार असलेला एक जण नेमका आज रजेवर होता. पण तो

    Enjoying the preview?
    Page 1 of 1