Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

Swapna Sutra - Gupt Asleli Shetra Samjun Ghene
Swapna Sutra - Gupt Asleli Shetra Samjun Ghene
Swapna Sutra - Gupt Asleli Shetra Samjun Ghene
Ebook443 pages2 hours

Swapna Sutra - Gupt Asleli Shetra Samjun Ghene

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

Why do we dream that we're falling? Why do we dream about death? Why do our ancestors sometimes visit us in our dreams? And is there any meaning to the dreams we have?
Dream Sutra – Perceiving Hidden Realms chronicles the experiences of many people who were helped and healed, guided and communicated with, by the dreamer within themselves.
This anecdotal book aims to help us better understand our dreams and so that we may use that understanding to learn more about ourselves.

 

This book is the Marathi version of Dream Sutra - Perceiving Hidden Realms

Languageमराठी
Release dateMay 19, 2022
ISBN9788193895276
Swapna Sutra - Gupt Asleli Shetra Samjun Ghene

Related to Swapna Sutra - Gupt Asleli Shetra Samjun Ghene

Related ebooks

Reviews for Swapna Sutra - Gupt Asleli Shetra Samjun Ghene

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    Swapna Sutra - Gupt Asleli Shetra Samjun Ghene - Hingori

    स्वप्न सूत्रस्वप्न सूत्र

    स्वप्नांचं क्षेत्र तर्काला आह्वान देतं. तत्त्वज्ञानी, शास्त्रज्ञ आणि अध्यात्मवादी हे स्वप्नावस्था जाणण्याकरता हजारों वर्षं सारख्याच प्रकारची धडपड करत आलेत. कित्येक शब्दकोशांनी दैनंदिन वापरातल्या शब्दसंग्रहाच्या अंतर्गत स्वप्नांच्या अर्थाची उकल करायचा प्रयत्न केलाय. परंतु, आजपर्यंत, हा निव्वळ एक उत्तमातला उत्तम प्रयत्न म्हणून राहिलाय. म्हणून हे पुस्तक लिहिलंय.

    या पुस्तकाचा एक खास विशेष म्हणजे हे पुस्तक एक संग्रह आहे व अशा अनेक लोकांचा संयुक्त प्रयत्न आहे ज्यांना आध्यात्मिक विकासात सामुदायिक स्वारस्य आहे आणि ज्यांचे गुरू समान आहेत - असे गुरू जे एक अतिशय समर्थ आणि सिध्द मार्गदर्शक असून ज्यांनी आपल्या मर्जीनुसार अंतराळ प्रवासाचा अनुभव घेतला (मी हे पुष्कळ प्रसंगी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय), जे बऱ्याचदा, सूचना नि संदेश देत आणि आपल्या शिष्यांशी व भक्तांशी त्यांच्या स्वप्नांमध्ये संवाद साधत.

    गुरूंबरोबर घालवलेल्या एका दशकातला काही भाग त्यांच्या घरात पाहुणा म्हणून राहिल्यामुळे, मला त्यांना अनेक स्वप्नांबद्दलचं स्पष्टीकरण विचारण्याची संधी मिळाली. त्यांच्या खोलीत नि घरात अकारण वावरत असताना, इतर लोकांच्या स्वप्नांचं स्पष्टीकरण आडून ऐकण्याचा लाभ सुध्दा मला झाला.

    या पुस्तकातली माहिती पुरेशी व्यापक आहे असं मला नाही वाटत. पण एक गोष्ट मात्र निश्चित की तुम्हाला इतरत्र आढळेल त्यापेक्षा या पुस्तकात खूप जास्त आहे. माझी सहलेखिका हानाह हिनं जवळजवळ १००हून अधिक लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मी जवळजवळ दिलगिरी व्यक्त करतो की हानाहची भावना व विचार अभिव्यक्त करायची पध्दत दुर्दैवानं माझ्यापेक्षा अधिक चांगली ओघवती आहे. पण मी आश्वासन देतो की भावी पुस्तकांमध्ये मी माझ्या नेहमीच्या संभाषणात्मक लिखाणाच्या मूळ शैलीवर परत येईन. या मधल्या काळात, तुम्ही हानाहची वाक्पटुता आणि तिच्या फक्त मुलाखत घेण्याच्याच नाहीत, तर माझ्या कैक आध्यात्मिक सहकाऱ्यांची आणि तिच्या इतर पीडित व्यक्तींची कसून चौकशी करण्याच्या अथक परिश्रमांचा जरूर आनंद घ्या.

    स्वप्न सूत्र

    प्रकरण

    स्वप्नं ही सुखांना आणि दुःखांना प्रेरणा देऊ शकतात, संदेश पुरवतात नि ताकीदही देऊ शकतात. योगी, संत व मुनी यांनी स्वप्नांचा संपर्काची साधनं म्हणून उपयोग करून घेऊ शकतात.

    सर्वच धर्मांतील प्राचीन ग्रंथांनी स्वप्नांच्या द्रष्टेपणाची शक्ती सोदाहरण दर्शवल्ये. स्वप्नं ही न बोलावता येतात आणि ती सर्वांनाच पडतात - वय झालं नि शारीरिक व्यंग असलं तरीही. तर मग, ही स्वप्नं म्हणजे आहेत तरी काय? ती काय काहीजणांसाठी फक्त प्रेरणा आणि इतरांसाठी तीव्र इच्छा असतात का ? का ती आपल्या मनाचं अन्वेषण असतात ?

    स्वप्नांचा विषय सुध्दा सृष्टिनिर्मितिइतका प्राचीन असल्यामुळे, त्या संबंधीच्या चर्चेचा कालावधी देखील कदाचित १२००० वर्षं किंवा --३२००० वर्षांपर्यंत पसरलेला आहे.

    अधिक खोलात जाऊन शोध घेण्याकरता नि या गूढ विषयासंबंधीचं आपलं आकलन वाढवण्याकरता, चला तर मग, स्वप्नांच्या जगतात एक भरारी घेऊन येऊ या.

    स्वप्नं, दृष्टांत आणि शरीराबाहेर सूक्ष्म शरीराचे अनुभव

    सोप्या शब्दांत व्याख्या करायची तर, स्वप्नं म्हणजे विचार, प्रतिमा आणि संवेदना यांच्या मालिका असतात ज्या माणसाच्या मनात झोपेच्या दरम्यान उद्भवतात.

    जर स्वप्नं ही झोपेच्या दरम्यान पडतात, तर मग दृष्टांत म्हणजे काय? अनेक लोक ‘स्वप्नं’ नि ‘दृष्टांत’ या संज्ञांचा अदलाबदल करून वापर करतात. दृष्टांत म्हणजे सुध्दा विचार, प्रतिमा आणि संवेदना यांच्या मालिका असतात. पण त्या प्रकट होतात झोपेच्या उंबरठ्यावर- ‘अर्धवट जाग्या’ आणि ‘अर्धवट झोपलेल्या’ अवस्थेत. काही विलक्षण परिस्थितींमध्ये दृष्टांत हे जागृत अवस्थेत देखील होऊ शकतात, पुष्कळ वेळा डोळे जेव्हा बंद असतात तेव्हा, आणि दुर्मिळ परिस्थितींमध्ये जेव्हा डोळे उघडे असतात तेव्हा. एकतर ध्यानात असताना किंवा नैसर्गिक भावसमाधीत असताना लोकांना दृष्टांत होतात. जेव्हा नशील्या पदार्थांचा व मन:स्थितीत फेरबदल करणाऱ्या औषधी द्रव्यांचा वापर करून भावसमाधी प्रेरित केली जाते, तेव्हा दृष्टांतासारखे आभास सुध्दा होऊ शकतात.

    गाढ झोपेच्या अवस्थेत शरीराबाहेर सूक्ष्म शरीराचे अनुभव म्हणून सुध्दा प्रतिमा, विचार नि संवेदना उद्भवू शकतात. हे अनुभव असे असतात की ज्यांत तुम्हाला तुमच्या शरीराबाहेर पडण्याची जाणीव होते. ज्यावेळी तुम्ही तुमच्या शरीराच्या बाहेर असता त्यावेळी, पुष्कळदा, तुम्ही तुमचं शरीर झोपलेलं बघता. तुमच्या शरीराचा जो भाग बाहेर असतो, तो छतांमधून आणि भिंतींमधून आरपार जाऊ शकतो आणि इतर वेळी पाहिलेल्या आणि न पाहिलेल्या ठिकाणांपर्यंत अति उंचावरून उडू शकतो. तुम्ही वस्तूंना स्पर्श करू शकता नि त्यांना हलवू देखील शकता आणि काही दुर्मिळ परिस्थितींत, तुम्ही त्यांना तुमच्या भौतिक जगतात परत आणू शकता ! मला नेमकं काय म्हणायचंय ते समजण्यासाठी या पुस्तकातली दाखले तुम्हाला मदत करतील.

    स्वप्नांच्या श्रेणी

    प्राणी आणि मानव दोघांनाही स्वप्न पडतं. काहींना रंगीत, तर काहींना कृष्ण-धवल स्वप्न पडतं. काही स्वप्नं ही स्मृतीत साठवली जातात, तर इतर स्वप्नं ही सहजपणे विस्मृतीत जातात.

    स्वप्नांच्या श्रेणी ठरवून स्वप्नांच्या जगताचं विश्लेषण करू या, जेणेकरून, सरतेशेवटी, तुम्हाला तुमच्या स्वत:च्या स्वप्नांची यादी व सूची तयार करायचा शक्य तेवढा उत्तमातला उत्तम प्रयत्न करता येईल.

    जी स्वप्नं जाग्रत् अवस्थेत नोंदवल्या गेलेल्या विशिष्ट संस्कारांना स्वप्नावस्थेत संपवायची अनुमती देतात, अशा स्वप्नांचं आपण सुरवातीला विश्लेषण करू या.

    काही वर्षांपूर्वी, मला एकामागोमाग एक अशी दोन कार-अपघातांची स्वप्नं पडली. माझ्या स्वप्नांतील दोन्ही अपघातांमध्ये ज्या कारचं नुकसान झालं होतं, त्या कारमध्ये मी होतो. मी कारमध्ये अडकून पडण्यापासून ते दुर्घटनेच्या स्थळी जमलेल्या लोकांनी मला त्यातून सोडवेपर्यंतच्या सर्व संवेदना मला जाणवत होत्या. अपघात झालेल्या कारमध्ये असणं नि सर्व संवेदना एकदा नाही तर दोनदा अनुभवणं किती भीतिदायक असतं याची कल्पना करा ! ते सर्व भावनिक दृष्ट्या भयावह होतं, परंतु जेव्हा मी जागा झालो, तेव्हा मी जिवंत आहे याबद्दल मला कृतज्ञता वाटल्याचं आठवतंय मला. माझ्या मनात जो पहिला विचार वेगानं आला तो म्हणजे - मी माझं कर्म संपुष्टात आणलं होतं आणि कार-अपघाताच्या द्वारा मला होऊ घातलेली कोणतीही शारीरिक दुखापत टाळली गेली होती.

    अर्थातच, दुसऱ्या दिवशी, अत्यंत काळजीपूर्वक कार चालवण्यात यामुळे काही अटकाव आला नाही. बाक आणि वळणांच्या बाबतीत मी भलताच सावध झालो होतो आणि दोनपैकी एका स्वप्नात जे अपघाताचं ठिकाण मी पाहिलं होतं त्या परिसरातनं जाताना मी जवळजवळ धीम्या गतीनं कार चालवली. रस्त्याच्या त्या भागातनं मी दररोज ऑफीसला जायचो. अपेक्षेप्रमाणे काहीच घडलं नाही. माझं दैव फळलं होतं, पण एका समांतर अस्तित्वात. गुरूंच्या कृपेनं वगळण्याचं नाही, तर परिवर्तनाचं बटण दाबलं होतं.

    आपल्यापैकी पुष्कळांनी स्वप्नात आपल्या प्रिय व्यक्तींना किंवा आपल्याला स्वत:ला मरणाच्या शेवटच्या घटका मोजताना पाहिलेलं असतं.

    ही लोकप्रिय समजूत आहे की स्वप्नात आपल्या प्रिय व्यक्तीचं मरण बघणं म्हणजे त्या व्यक्तीची आयुर्मयादा वाढणं. बहुतेकांच्या बाबतीत हे सत्य आहे. अशा स्वप्नाचा गर्भित अर्थ हा आहे की मृत्यू घडला परंतु दुसऱ्या वास्तवतेच्या क्षेत्रात. अशा रीतीनं स्वप्नावस्थेत मृत्यू घडण्यामुळे त्या माणसाच्या शारीरिक अवस्थेतील मृत्यू वस्तुत: घडून येण्याची शक्यता बाजूला सरली. जाणून घ्यायचा मुद्दा हा की स्वप्नावस्था ही समांतर वास्तवाची अवस्था आहे. म्हणूनच, आपल्याकडे स्वपनलोक ही संकल्पना आहे जिचा अर्थ आहे ‘स्वप्न-लोक’.

    तरीही, एक धोक्याची सूचना. स्वप्नात घडणारी प्रत्येक गोष्ट खरोखर आपल्या भौतिक जन्मांमध्ये टाळली जाणं गरजेचं नाही. कारण काही स्वप्नं ही धोक्याची पूर्वसूचना देणारी असतात. मला माहीत्ये की हे सगळं गोंधळात टाकण्यासारखं वाटतंय. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ज्यांना अशी धोक्याची पूर्वसूचना देणारी स्वप्नं पडायची सवय झालेली असते, त्यांच्या बाबतीत, स्वप्नावस्थेत ती गोष्ट पूर्ण होतेच असं नाही. (याबाबतीत अधिक खुलासा पुढील प्रकरणात)

    १९९४ च्या वसंत ऋतूत एका पहाटेच्या प्रहरांमध्ये नीनाला स्वन्न पडलं की तिची आई आजारी पडल्ये. तिनं तिच्या आईला बिछान्यावर पहुडलेलं पाहिलं. ती पांढुरकी दिसत होती. तिच्या आईच्या बिछान्याशेजारी बसलेली तिची मावशी नीनाला ‘तुझ्या आईची अवस्था गंभीर आहे’ असं सांगत ओक्साबोक्शी स्फुंदत रडत होती.

    ‘ मला आठवतंय की माझी मावशी बडबडतच होती. माझं मात्र फारसं लक्ष नव्हतं तिच्या बोलण्याकडे. आश्चर्य म्हणजे, या स्वप्नात मला जाणीव होती मी स्वप्न बघत्ये याची. पण माझी मानसिक अवस्था ही एवढी भीतिदायक होती आणि तणाव इतका स्पष्टपणे जाणवणारा होता की इतक्या वर्षांनंतर सुध्दा मला ते स्वप्न स्पष्टपणे आठवतंय.’

    फोन सतत वाजत राहिल्यामुळे नीनाची झोपमोड झाली. नीनाच्या मावस बहिणीनं तिला फोनवर सांगितलं की त्या सकाळी नीनाची आई उठली हे लक्षात येत की तिचा आवाजच गेलाय. ‘आईनं बोलायचा प्रयत्न करूनही तिच्या तोंडातनं कुठलाच आवाज येत नव्हता, अगदी कुजबुजणं सुध्दा नाही!’

    नीनाची आई जिवंत होती, पण एकही शब्द उच्चारू शकत नव्हती की आवाज काढू शकत नव्हती. आवाज जाण्याची किंवा आणखी १५ दिवसांनी तो आवाज परत येण्याची कारणमीमांसा देणं ना तिच्या आईला शक्य नव्हतं ना डॉक्टरांना ! नीनाचं स्वप्न नि प्रत्यक्षातील घटना यांचा काही परस्पर संबंध होता का ? असेल कदाचित.

    स्वप्नांच्या वर्गीकरणाची पुढची पातळी ही धोक्याची पूर्वसूचना देणाऱ्या स्वप्नांची आहे. ही स्वप्नं आपल्याला आपल्या भविष्याच्या खुणा देतात, अजून न घडलेल्या घटनेची ती जवळजवळ सूचक असतात.

    दीपांशूनं या वर्गीकरणात मोडणाऱ्या एका स्वप्नाबद्दल मला सांगितलं. त्याच्या विवाहाला २००८ साली एक वर्ष पूर्ण झालं. त्या साली दीपांशूनं एकदा झोपेत किंचित करड्या रंगाचा, प्रचंड मोठ्या आकाराचा एक त्रिकोण बघितला. तो त्रिकोण एवढा मोठा होता की त्याला वाटलं की ‘त्या आकारमानापुढे तो स्वत: एका मुंगीसारखा भासत’ होता. या स्वप्नात त्या त्रिकोणी आकृतीनं दीपांशूच्या हातात एक बाळ सोपवण्यासाठी आपले बाहू पसरले. ज्यावेळी दीपांशू ते बाळ स्वीकारण्याकरता पुढे सरसावला, त्यावेळी त्यानं आसामी भाषेत आवाज ऐकला, ‘ही तुझी मुलगी आहे. तिचं नाव आहे आनोया .’

    दीपांशूला आठवतंय की जेव्हा त्यानं बाळाला आपल्या हातांमध्ये घेतलं तेव्हा तो अवाक् झाला होता. या स्वप्नामुळे गोंधळून गेलेला दीपांशू धक्का बसलेल्या अवस्थेतच जागा झाला. त्याच्या पत्नीनं नि त्यानं अजून तरी बाळाला जन्म द्यायचा विचार केलेला नव्हता. तर मग हे काय होतं? बेचैन होऊन, दीपांशूनं या स्वप्नाचा अर्थ जाणून घेण्याकरता इंटरनेट ढुंढाळलं. तेव्हा त्याला शोध लागला की ‘आनोया’ हा एक हिब्रू शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे ‘ईश्वराचं उत्तर’.

    या स्वप्नानंतर तीन वर्षांनी, दीपांशूला मुलगी झाली. ओळखा बघू त्यानं तिचं नाव काय ठेवलं असेल? ‘ जेव्हा माझी मुलगी जन्माला आली, तेव्हा तिला कुठल्या नावानं हाक मारायची हे मला आणि माझ्या पत्नीला आपसुकच ठाऊक होतं. मला ती मुलगी स्वप्नात भेट म्हणून मिळालेली होती. मला बाळाच्या नावाचा तंतोतंत उच्चार आठवला आणि त्यानुसार, मी तिचं नाव ‘आनोयाह’ ठेवलं.’

    त्रिकोण किंवा त्रिकोणासारख्या दिसणाऱ्या आकृतींच्या प्रतीकात्मकतेची चाड मला नाही असं नाही. पण तिचा नेमका काय अर्थ काढायचा याची मला खात्री नाही. माझ्या आध्यात्मिक सहकाऱ्यांपैकी उध्दव व जैन साहेब या गुरुदेवांच्या दोन्हीही शिष्यांनी मागील कैक वर्षांमध्ये त्यांच्या जाग्रत् अवस्थेत त्रिकोण बघितलेत.

    स्वप्न सूत्र

    उध्दवला त्या आकृत्या म्हणजे बलशाली शक्ती आहेत हे माहीत असूनही, खिडकीतनं त्याच्या खोलीत येणाऱ्या दोन त्रिकोणांना बघून तो क्षणभर स्तंभित झाला. दुसरीकडे, जैन साहेबांनी सुध्दा तशाच प्रकारचे त्रिकोण पाहिल्यावर, त्यांना वाटलं की देवतांच्या दर्शनरूपात त्यांच्यावर कृपा झाल्ये.

    स्वप्नांचा दुसरा वर्ग म्हणजे तात्कालिक किंवा निरर्थक स्वप्नं. ही स्वप्नं विशेषत: अत्यंत सर्वसामान्य प्रकारची असतात. साठवलेले विचार आणि संभाषणं ही अशा प्रकारच्या स्वप्नांमध्ये एखाद्या तलावातल्या बुडबुड्यांप्रमाणे वर येतात आणि विचित्र मार्गांनी एकमेकांशी जोडलेली असतात. एकमेकांमध्ये गुंफलेलं परंतु असंबध्द स्वप्न तयार करण्याकरता वर्तमान आणि गत जन्मांमधली अनेक निरीक्षणं, विचार आणि संस्कार हे एकमेकांमध्ये मिसळून जाऊ शकतात. तात्पर्य एवढंच की या स्वप्नांना अशा काही साठवलेली स्मृती चालना देते की जी स्वप्नावस्थेत कहाणी म्हणून प्रकट होते.

    देविनाचं स्वप्न तपासून पाहू या. ‘काल रात्री, मला स्वप्न पडलं की माश्यांच्या तलावातल्या माश्यांना मी खायला घालत होते. मी उशीरा खायला दिल्यामुळे मासे केवढे तरी रागावले होते. त्या माश्यांबरोबर एक सिंह पोहत होता. माश्यांचा एक मोठा समूह सिंहाच्या शेपटीभोवती गोळा झाला होता. त्यामुळे तो सिंह राजाला शोभेसा दिसत होता.

    उठल्यावर मला जाणवलं की आदल्या रात्री मी माश्यांना खायला द्यायला विसरले होते. कारण मुलं आणि मी द लायन किंग हा चित्रपट बघायला गेलो होतो. घरी परत येईपर्यंत उशीर झाला होता आणि मी अतिशय दमले होते. त्यामुळे मी स्वत:शीच म्हटलं की मी माश्यांना उद्या सकाळी खायला घालीन. मला थोडंच माहीत होतं की सिंह आणि मासे त्या रात्री माझ्या स्वप्नात रुबाबदारपणे प्रवेश करतील !’

    या अनुभवावर आधारित जर एखादी गोष्ट मानणं असेल, तर मग मुलांना आणि ज्यांना घाबरवणं सोपं आहे अशा मोठ्या माणसांना भीतिदायक चित्रपट पाहिल्यावर दु:स्वप्नं का पडतात हे आपण समजू शकतो. बऱ्याचदा, पोट जड झाल्यामुळे आणि कदाचित अपचन झाल्यामुळे निरर्थक स्वप्नं पडू शकतात.

    तात्कालिक किंवा निरर्थक स्वप्नांमधला अर्थ शोधायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला ती समजोत किंवा न समजोत, ती येत रहातील. त्यांचा फक्त आनंद घ्या. कारण तुमच्या स्मृतीची किंवा संस्कारांची बीजं जाळून टाकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे त्यांना किंमत असते.

    स्वप्नांचा पुढचा एक वर्ग म्हणजे दृष्टांत. दृष्टांत हे देवता आणि संतांबद्दल असू शकतात किंवा त्यांमधनं तुम्हाला संदेश,मंत्र, आशीर्वाद व धोक्याच्या सूचना मिळू शकतात. तुमचं मन संचार करतं, (भुताच्या रूपात अस्तित्वात रहाणारी) मृत माणसं दृष्टिगोचर होतात आणि चर्मचक्षूंनी जे बघता येत नाहीत असे प्रसंग तुम्ही बघू शकता.

    माझ्या अनेक दृष्टांतांपैकी एकात मी राम, लक्ष्मण व सीता या तीन देवतांना भेटलो. मी अशा ठिकाणी होतो की जिथं त्या तिघांचं दर्शन घेण्यासाठी किमान शंभरएक लोक तरी रांगेत उभे होते. रांगेत माझ्यापुढे उभ्या असलेल्या माझ्या आध्यात्मिक सहकाऱ्याला मी ओळखलं. त्याला मात्र माझ्या अस्तित्वाची दखल नव्हती. रांग हळूहळू पुढे सरकत होती. कारण जवळजवळ प्रत्येकालाच त्या देवतांशी काही ना काही चर्चा करायची होती. सरतेशेवटी, जेव्हा माझी पाळी आली, तेव्हा माझं मलाच आश्चर्य वाटलं.

    मला काय हवंय असं जेव्हा रामानं मला विचारलं, तेव्हा मी सांगितलं की मला काहीच नकोय. मी फक्त त्या तिघांना शुभेच्छा देऊ इच्छितो. सीतेनं मोठ्यानं हसत मला धन्यवाद दिले. रामानं व लक्ष्मणानं देखील माझी दखल घेतली, पण उपरोधात्मक हसत. मी जेव्हा सकाळी जागा झालो, तेव्हा मला फार मोठा धक्का बसला होता ! मी काय करत होतो? मी कोण होतो? लक्षावधी लोक ज्याला देव मानतात अशा रामाला शुभेच्छा देणारा एक श्रीयुत सामान्य?

    स्वप्नांच्या दुसऱ्या एका प्रकारात देवता, संतजन आणि इतर सामर्थ्यशाली आत्म्यांच्या एकत्रित सहभागाचा अंतर्भाव असतो. ते एकत्रितपणे अशा लोकांना भेटतात की जे त्यांना मनापासून भेटू इच्छितात किंवा ज्यांना त्यांच्या मदतीची गरज असते.

    काही वर्षांपूर्वी, माझी बहीण सपना महाराष्ट्राच्या अगदी आंतरिक भागात असलेल्या शिरडीच्या साईंच्या समाधीला भेट द्यायचा हट्ट धरून बसली होती. अनेक वेळा ती अशी तक्रार करायची की जेव्हा केव्हा ती मुंबई ते शिरडी असा ६तासांचा प्रवास करायचा बेत करायची, तेव्हा काही ना काही कारण टपकायचं नि तिला तिचा दौरा रद्द करावा लागायचा. जेव्हा प्रत्येक वेळी ती आपलं गाऱ्हाणं गायची, तेव्हा त्याची सांगता मी तिला साईंच्या समाधीस्थळाला घेऊन जावं अशी गळ घालण्यात व्हायची.

    तिच्या पिच्छा पुरवण्याच्या चिकाटीला कंटाळून, मी तिला थंडपणे सांगितलं की मी साईंना तिच्या घरी यायची विनंती करीन. माझ्या अभिप्रायाला उर्मटपणाचा गंध

    Enjoying the preview?
    Page 1 of 1