Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

ऑर्फिअस, जी ए आणि मी
ऑर्फिअस, जी ए आणि मी
ऑर्फिअस, जी ए आणि मी
Ebook46 pages17 minutes

ऑर्फिअस, जी ए आणि मी

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

ऑर्फिअस ही मूळची ग्रीक पुराणकथा. ती जिथे संपते तिथून जी ए आपली कथा चालू करतात. ऑर्फिअसच्या कथेच्या शोकांतिकेच्या मागील स्वतःची कारणमीमांसा मांडतात. पण ज्याप्रमाणे ऑर्फिअसची कथा गूढ आणि वेगवेगळ्या कारणांची शक्यता ठेवते, त्याप्रमाणे जी एंची कथा देखील वेगवेगळ्या आकलनाची शक्यता ठेवते. अनेकांना तिचे अनेक अर्थ जाणवतात. या असंख्य आकलनांपैकी माझे एक आकलन या चार प्रकरणात देण्याचा प्रयत्न केला आहे.

Languageमराठी
PublisherAnand More
Release dateMar 15, 2016
ISBN9781310264313
ऑर्फिअस, जी ए आणि मी

Related to ऑर्फिअस, जी ए आणि मी

Related ebooks

Reviews for ऑर्फिअस, जी ए आणि मी

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    ऑर्फिअस, जी ए आणि मी - Anand More

    ऑर्फिअस, जी ए आणि मी

    भाग १ - मूळ कथा

    1852-1127-large.jpg

    सध्या जी ए कुलकर्णी काढलेत पुन्हा वाचायला. आज पिंगळावेळ काढलं होतं. ऑर्फिअस, स्वामी आणि यात्रिक या त्यातल्या माझ्या आवडत्या कथा. ऑर्फिअस तर नेहमी हलवून सोडते. ऑर्फिअसची माझी ओळख झाली ती सातवी की आठवी मधल्या इंग्रजीच्या धड्यामुळे. Orpheus and Euridice. बर्वे बाई होत्या शाळेत इंग्रजीला आणि क्लासला ऐनापुरे बाई. छान शिकवायच्या  दोघी. हा धडा काही फारसा आवडला नव्हता, पण त्यातल्या ऑर्फिअसची देवाने केलेली कोंडी मनात कुठेतरी बोचली होती.  ग्रीक शोकांतिकेची  पहिलीच भेट आणि तितकीशी न आवडलेली.

    कथा एकदम साधी.

    एक होता ऑर्फिअस. उमदा ग्रीक तरूण संगीतविशारद. ग्रीकांचं लायेर नावाचं वाद्य वाजवण्यात तज्ञ. संगीताचा देव अपोलोने त्याला आपले सोनेरी लायेर दिलेले होते.

    त्याच्या संगीतात असली जादू कि हिंस्त्र प्राणी आपला मूळ स्वभाव विसरून एकचित्त होऊन त्याचं संगीत ऐकत बसायचे. पशु, पक्षी, झाडे, वेली सगळेच गुंग व्हायचे इतकेच काय अगदी वारा सुद्धा शांत व्हायचा, ऊन शीतल व्हायचे, फुलं फुलायची, फळं फळायची वगैरे वगैरे. असले मंत्रमुग्ध करणारे सूर त्याच्या लायेर मधून निघायचे.

    या ऑर्फिअस चं लग्न  ठरतं मग एका सुंदर तरुणीशी, युरीडीसी तिचं नाव. लावण्यवती आणि नाजूक वगैरे असलेली युरीडीसी आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या कलेमुळे प्रचंड  खूष असते आणि ऑर्फ़िअस, यौवनाने मुसमुसलेल्या आपल्या सुंदर वाग्दत्त वधू बरोबरच्या भावी सहजीवनाची सुंदर स्वप्ने पहात असतो.

    लग्नाच्या दिवशी अरीस्टौस नावाचा देव युरीडीसीचा पाठलाग करतो आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी युरीडीसी गवतातून धावत जाताना तिला एक विषारी साप चावतो. एक निरीक्षण आहे, की बऱ्याच गोष्टींमध्ये नायकाला

    Enjoying the preview?
    Page 1 of 1