Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग १
आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग १
आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग १
Ebook676 pages4 hours

आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग १

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

हे पुस्तक म्हणजे दैनिक प्रत्यक्ष मधून 'चालता बोलता इतिहास' या मालिकेत प्रकाशित झालेल्या लेखांचा चिरंतन असा संग्रह आहे. या पुस्तकात प्रख्यात संगीतकार प्यारेलाल शर्मा, ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर, प्रसिध्द रेडिओ संचालक अमीन सयानी, अनेक सुपरस्टार्सना प्रभावीपणे सादर करणारे नामवंत मेकअप आर्टिस्ट पंढरीनाथ जुकर, नाट्यसंगीत गायिका आणि नाट्य अभिनेत्री जयमालाबाई शिलेदार आणि प्रचंड गाजलेल्या पटकथा आणि संवाद लेखक सलीम खान यांच्या जीवनकथांचा प्रवास मांडलेला आहे.

Languageमराठी
Release dateMay 8, 2019
ISBN9781393024057
आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग १

Related to आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग १

Related ebooks

Reviews for आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग १

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग १ - Jitendra Rangankar

    ◆◆◆

    प्रथम आवृत्ती

    प्रकाशक :

    लोटस पब्लिकेशन्स प्रा. लि., ७०१, लिंक अपार्टमेंट, खारी व्हिलेज, ओल्ड खार (प.), मुंबई-४०००५२

    © २०१९. या पुस्तकाचे सर्व हक्क प्रकाशकांच्या स्वाधीन राहतील.

    हे पुस्तक अथवा त्याचा कोणताही भाग कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित, पुनर्प्रकाशित, उद्धृत, संशोधित, भाषांतरित करण्यासाठी अथवा कोणत्याही स्वरूपात संगणकीय, छायाचित्र वा अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे (इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, डिजिटल, ऑप्टिकल वा अन्य कोणत्याही पद्धतीने) संग्रहित करण्यासाठी प्रकाशकाची लेखी पूर्वसंमती असणे अनिवार्य आहे. याचे उल्लंघन करणार्‍यावर कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

    ISBN No.      :      9788193408049

    ◆◆◆

    प्रस्तावना

    ऐकल्याशिवाय बोलता येत नाही. 

    यश जाणल्याखेरीज यशस्वी होता येत नाही. 

    प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे जवळून बघण्यासाठी व जाणण्यासाठी... 

    येत आहे - दैनिक ‘प्रत्यक्ष’ 

    दैनिक ‘प्रत्यक्ष’ची सुरूवात होण्याच्या काही आठवडे आधी या येऊ घातलेल्या वर्तमानपत्राची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्यातल्या या वाक्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. १५ डिसेंबर २००५ रोजी दैनिक ‘प्रत्यक्ष’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. या पाहिल्या अंकात ‘चालता बोलता इतिहास’ नावाचं सदर देण्यात आलं होतं आणि यातली पहिली लेखमाला होती, विख्यात सिनेसंगीतकार प्यारेलाल शर्मा यांची. 

    पहिल्या अंकापासूनच ‘चालता बोलता इतिहास’ला वाचकांनी उचलून धरलं. पुढे या सदरातून विविध क्षेत्रात प्रचंड कर्तृत्त्व गाजविणारी ‘उत्तुंग व्यक्तिमत्त्व’ वाचकांना भेट देत राहिली. कित्येक वर्षे उलटल्यानंतरही या सदरातल्या लेखमाला नव्याने वाचण्याची इच्छा आहे, असे सांगणार्‍या वाचकांशी भेट होत राहिली. आपल्या नातलग किंवा मित्रांनाही ती लेखमाला वाचायची आहे. त्यासाठी जुने अंक मिळतील का? अशी विचारणा त्यांच्याकडून होत असे. 

    वाचकांकडून केली जाणारी जुन्या अंकांची मागणी, वर्तमानपत्रात कार्यरत असणार्‍यांसमोरच्या खडतर आव्हानांपैकी एक मानलं जातं. त्यामुळे लवकरच या लेखमालांचं पुस्तक प्रकाशित होणार आहे, असं सांगून आपली सुटका करून घेणं भाग होतं. पण ही मागणी वाढत गेली आणि पुस्तक प्रकाशित करणं अनिवार्य आहे, याची जाणीव झाली. 

    ‘आधुनिक इतिहासाचे मानबिंदू’च्या दोन्ही भागांची इंटरनेट आवृत्ती प्रकाशित करीत असताना, बर्‍याच वर्षांपासून प्रलंबित असलेली वाचकांची मागणी पूर्ण होत आहे. यामुळे ‘त्या’ उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची पुन्हा एकदा आणि एकत्र भेट घेण्याची संधी वाचकांना मिळत आहे, यासारखी दुसरी समाधानाची बाब नाही. 

    मात्र ही पुस्तके प्रकाशित करीत असताना, एक गोष्ट आवर्जुन सांगायला हवी. काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या या लेखमाला विशेष बदल न करता, त्याच स्वरुपात वाचकांसमोर मांडण्यात आल्या आहेत. यातले स्थळकाळाचे संदर्भही तसेच ठेवण्यात आले आहेत. सुजाण वाचक याची नक्कीच नोंद घेतील. 

    वाचकांच्याच मागणीमुळे प्रकाशित झालेल्या या पुस्तकासाठी खरेतर वाचकांचेच मनःपूर्वक आभार व्यक्त करणे श्रेयस्कर ठरेल. ‘आधुनिक इतिहासाचे मानबिंदू’चा पहिला व दुसरा भाग प्रकाशित करीत असताना, यामागे असलेली वाचकांची भूमिका कधीही विसरता येणार नाही.

    - जितेंद्र रांगणकर

    संपादक, दै.‘प्रत्यक्ष‘

    ◆◆◆

    संगीतकार प्यारेलाल

    ◆◆◆

    कला असो की क्रीडा, साहित्य असो कि व्यवसाय अशा नानाविध क्षेत्रात प्रदीर्घ काळाचा इतिहास अनुभवलेल्या व्यक्ती आपल्यात वावरत असतात. या व्यक्तींच्या इतिहासातील आठवणी, त्यांचा अनुभव पुढच्या पिढीला मिळावा म्हणून या सदराचे प्रयोजन. वर्षानुवर्षे अप्रतिम संगीताचा नजराणा देणार्‍या लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडगोळीपैकी प्यारेलाल मितभाषी म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या संगीतमय कारकिर्दीत केवळ संगीताने आपल्या लाखो चाहत्यांशी संवाद साधणारा हा सुरांचा साधक शब्दांच्या माध्यमातून आपलं मनोगत ‘प्रत्यक्ष’मधून करणार आहे. चालता बोलता इतिहास या सदरातून.

    ◆◆◆

    प्रत्येक श्‍वासात, प्रत्येक हृदयात संगीत आहेच

    (दि.१५ डिसेंबर, २००५)

    मला अनेकांनी हा प्रश्‍न विचारला, अजूनही विचारतात - ‘संगीत एखाद्याच्या रक्तात असतं की ते शिकून आत्मसात करता येतं?’ या प्रश्‍नाला मी दिलेल्या उत्तराने प्रश्‍नकर्ते आश्‍चर्यचकीत होतात. माझं उत्तर असतं, ‘संगीत रक्तात असतं हे खरं आहे, पण ते एखाद्या भाग्यवंताच्या नाही, सगळ्यांच्याच....अगदी प्रत्येक मानवाच्या रक्तात असतं. त्या करुणाघन विधात्याने तशी रचनाच करून ठेवली आहे.’ या साध्या वाटणार्‍या माझ्या उत्तराने लोक गोंधळून जातात कारण संगीतक्षेत्रातल्या इतर कुणाकडून त्यांना असं उत्तर मिळालेलं नसतं.

    संगीत हे प्रत्येकाला जन्माबरोबर वारसाहक्काने मिळालेलं वरदान आहे. अगदी पहिल्या श्‍वासाबरोबर बाळाच्या हृदयाचे ठोके सुरू होतात. हा पहिला ताल. याला स्वतंत्र असा नाद आहे. म्हणजेच हे संगीत आहे. आता मला सांगा, या संगीताच्या वरदानापासून परमेश्‍वराने आपल्यापैकी कुणालाही वंचित ठेवलंय का? अर्थातच नाही. आपल्या हृदयात संगीत आहे, श्‍वासातही संगीत आहे. इतकंच कशाला, आपल्या शरीरभर पसरलेल्या नसा, वाहिन्या एखाद्या तंतुवाद्याच्या तारांची आठवण करून देतात. आपण जे बोलतो त्यामध्येही संगीत असतं आणि हे संगीत प्रत्येकाचं स्वतंत्र असतं. जरा आपल्या संवादाचा शांतपणे विचार करून पहा. आपल्या बोलण्यालाही एक नाद असतो. निश्‍चित अशी लय असते. अर्थात, आपल्या रोजच्या बोलण्यातही संगीत असतं. म्हणूनच म्हणतो की संगीताचं ईश्‍वरी वरदान सार्‍या मानवजातीला लाभलेलं आहे. फक्त काहीजण या ईश्‍वरदत्त देणगीला साधनेची जोड देतात आणि गायक किंवा संगीतकार होऊन जगासमोर येतात.

    प्राचीन काळी आपल्या देशात संगीताची खरेदी-विक्री होत नव्हती. परमेश्‍वराची आराधना करणारी कला म्हणून संगीताकडे पाहिलं जायचं. सूरदास, त्यागराज, नामदेव, तुकाराम ही सारी संतमंडळी संगीताच्या माध्यमातून ईश्‍वराची भक्ती करत होती. बर्‍याच वर्षांपूूर्वी ‘संत ज्ञानेश्‍वर’ चित्रपटाचं संगीत करण्याची संधी आम्हाला मिळाली. या चित्रपटाला संगीत देण्याआधी मी आणि लक्ष्मीकांतजी काही मंडळींसह आळंदीला माऊलीच्या दर्शनासाठी गेलो. रांगेत उभं राहून माऊलीच्या समाधीचं दर्शन घेतलं. इथेच एक बाई जात्यावर दळताना गाणं गात होती. तिचं दळण आणि गाणं जणू एकजीव होऊन गेलं होतं. त्या ओव्या कानावर पडल्यापडल्या त्याची धून मी पकडली. लक्ष्मीजींनाही ऐकवली. त्याच्यावर आम्ही ‘संत ज्ञानेश्‍वर’मधलं गाणं बांधलं, ‘ज्योत से ज्योत जलाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो.’ ‘भैरवी’ रागात बांधलेल हे गाणं लतादीदींनी गायलं होतं. आजही हे गाणं अतिशय लोकप्रिय आहे. खुद्द लतादीदींनी या गाण्याची सुरावट अप्रतिम असल्याचं सांगून आमचं कौतुक केलं होतं. त्या बाईच्या जात्यावरच्या ओव्यांची कमाल इथेच थांबली नाही. संत ज्ञानेश्‍वरशिवाय आणखी एकदा या सुरावटीचा आम्ही वापर केला होता. स्वर्गीय राजकपूरजींच्या ‘प्रेमरोग’ चित्रपटासाठी. या चित्रपटातली नायिका पद्मिनी कोल्हापुरेचं लग्न ठरल्यानंतर ती उत्साहानं सासरी जाण्याची तयारी करते, त्यावेळी राजजींना अल्लड तरुणीच्या भावावस्थेचं वर्णन करणारं गाणं हवं होतं. त्यासाठी आम्ही ही जात्याची धून थोड्या फरकानं नव्या रुपड्यासह पेश केली, ‘ये गलियाँ ये चौबारा, यहाँ आना ना दोबारा. अब हम तो भये परदेसी के तेरा यहाँ कोई नही.’

    विचार करा, जात्यावर बसून गाणार्‍या त्या बाईनं संगीताचं शिक्षण घेतलं नसेलच. तरीही एका संगीतकाराला मोहवून टाकणारी लकेर तिच्या गळ्यातून कशी काय उमटली? त्या गाण्यात इतकं सौंदर्य कुठून आलं? मला वाटतं, ती बाई देवासाठी गात होती म्हणून तिचं गाणं माझ्या हृदयाला भिडलं असावं. संतमंडळी देवासाठी अभंग गात. तानसेनसारखे मोठे गवईही ईश्‍वरभक्त होते. या परंपरेतल्या एका व्यक्तीला मला फार जवळून पाहता आलं. ती व्यक्ती म्हणजे माझे वडील, पं. रामप्रसाद शर्मा. मी त्यांना ‘संत रामप्रसाद शर्मा’ म्हणेन. यांनी हजारो शिष्यांना संगीत शिकवलं. आपल्या शागीर्द-शिष्यांमध्ये ते कायम रमलेले. अगदी गॅरेजमध्ये काम करणार्‍या चुणचुणीत मुलांमधूनही त्यांनी अव्वल दर्जाचे व्हायोलिनवादक तयार केले. याचं कारण त्यांची जिद्द. एका अँग्लो-इंडियन व्हायोलिनवादकाने - ‘भारतीयांना व्हायोलिन वाजवता येणं शक्य नाही’ अशी दर्पोक्ती त्यांच्याजवळ केली होती. त्याने ते पेटून उठले. ‘देशी तरुणांमधून मी उत्कृष्ठ व्हायोलिनवादक तयार करीन’ असं त्या उन्मत्त अँग्लोइंडियनला माझ्या वडिलांनी सुनावलं....आणि जिद्दीने आपले शब्द खरे करून दाखवले.

    आपल्या विद्यार्थ्यांकडे त्यांनी कधीही फी मागितली नाही. आयुष्यात कधीही रुपया पैशांचा विचार केला नाही. याबद्दल एक किस्सा ऐकण्यासारखा आहे. सी. रामचंद्र त्याकाळचे विख्यात संगीतकार. आम्ही त्यांना ‘अण्णा’ म्हणायचो. अण्णांनी आम्हाला मद्रासमध्ये एका चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी पाठवलं. त्यावेळी मद्रासला जाण्यासाठी दोन दिवस लागायचे.

    निघताना लक्ष्मीजींजवळ ५५ रुपये आणि माझ्याजवळ अवघा दीड रुपया....पण परतीच्या प्रवासात आमच्याकडे प्रत्येकी ८५०० रुपये होते! हा आमच्या तिथल्या कामाचा मोबदला होता.

    स्टेशनवरून उतरल्यावर घरी जाण्याआधी मी बँकेत गेलो. साडेआठ हजाराच्या शंभरच्या नोटांची दहा-पाच रुपयांची मोड बनवली व नोटांची गलेलठ्ठ बंडलं घरी घेऊन गेलो. वडिलांना हे पैसे दाखवले. पुढे या पैशातून वडिलांसाठी ८५० रुपयांची नवग्रहांची अंगठी विकत घेतली. दोन दिवसांनी ती अंगठी मला त्यांच्या एका शिष्याच्या हातात दिसली. मी वडिलांवर खूप चिडलो. ‘तुम्ही आयुष्यात कुणाला अशी भेट दिली नसेल. म्हणून तुम्हाला त्याची किंमत कळत नाही’ असं रागाच्या भरात मी बोलून गेलो. असे माझे वडील. संगीत सोडून त्यांना बाकी कशाशीही देणंघेणं नव्हतं.

    माझं कुटुंब मोठं. मला सहा भाऊ, दोन बहिणी. वयाच्या सोळाव्या वर्षी मला कळलं की जिला मी ‘आई’ म्हणतो, ती माझी जन्मदात्री नाही. माझी आई माझ्या लहानपणीच दगावली. वडिलांनी दुसरं लग्न केलं. पण माझ्या या मातेनं माझ्यावर खर्‍या आईएवढंच प्रेम केलं.

    माझं कुटुंब आई-वडील-बहीण-भाऊ एवढंच मर्यादित; पण वडिलांचे सगे-सोयरे अनेक, त्यांचं कुटुंब फार फार मोठं. आजही चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात ८० टक्के लोक पं. रामप्रसाद शर्मांचे शिष्य सापडतील. कुणी व्हायोलिनवादक असेल, कुणी गिटारवादक, तर कुणी ड्रमप्लेअर. त्यांचं हे कर्तृत्व जगासमोर यावं म्हणून त्यांच्या नावे एखादी स्पर्धा सुरू करा, असा आग्रह बरेचजण करतात. मी त्यांचं ऐकत नाही. अशा कुठल्यातरी स्पर्धेमुळे त्यांचं नाव टिकून राहील, असं मला वाटत नाही. मुळात स्पर्धा, जय, पराजय या गोष्टींना मी अवास्तव महत्त्व देत नाही.

    आठवण झाली म्हणून सांगतो. १९६३ साली ‘संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ याचा एक चित्रपट स्पर्धेत होता. मात्र त्या चित्रपटाबद्दल सांगण्याआधी मी आमच्या स्पर्धक चित्रपट आणि संगीतकारांविषयी सांगतो. स्पर्धकांमध्ये - राजकपूर-वैजंयतीमाला-राजेंद्रकुमार यांचा ‘संगम’, याचे संगीतकार होते शंकर-जयकिशन; मनोजकुमार-साधना यांचा ‘वो कौन थी’, संगीतदिग्दर्शक मदनमोहन; आणि फिल्मफेअरच्या या स्पर्धेतला तिसरा चित्रपट होता - ‘दोस्ती’, याचं संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल नावाच्या दोन नवख्या मुलांनी दिलं होतं. चित्रपटाचे हिरो होते, एक लंगडा आणि एक आंधळा! या चित्रपटाच्या संगिताला फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळाले.

    हे आमचं पहिलं अ‍ॅवॉर्ड. त्याकाळीही ‘अशी अ‍ॅवॉर्ड्स पैसे देऊन विकत घेतली जातात’ असे आरोप होत असत. ‘दोस्ती’नंतर आम्हाला सलग तीन वर्ष ‘फिल्मफेअर’ मिळालं. पण त्यासाठी आम्हाला एकदाही पैसे द्यावे लागले नाहीत ही सर्वात आनंदाची गोष्ट.

    मिळालेलं यश टिकवणं सर्वात महत्वाचं. लक्ष्मीजींनी आणि मी तेही करून दाखवलं. आजच्या पिढीतले अनेक संगीतकार माझ्याशी आदराने बोलतात. ‘तुमच्यासारखं संगीत आम्ही देऊ शकणार नाही’ म्हणून कबुली देतात. आमच्या काळीही दिग्गज संगीतकार होते. आम्ही त्यांचा आदर करायचो. पण त्यांच्या दर्जाचं संगीत देणं आम्हाला जमणार नाही हे आम्ही कधीही मान्य केलं नसतं. आपल्या कर्तृत्वाबद्दल घमेंड नको, पण अभिमान हवाच. हा अभिमान टिकवण्यासाठी आम्ही प्रचंड परिश्रम घेतले. आजकालची मुलंही खूप काम करतात, पण पैसे मिळतील तर! आमचं नेमकं उलटं होतं. आम्ही अथक परिश्रम करायचो, त्यामुळे आम्हाला संंधी मिळायची. नंतर लोकप्रियता आणि पैसा. आत्ताचं गणित वेगळं आहे. एखाद दुसर्‍या स्पर्धेतून विजय मिळवून मुलं पैसा आणि प्रसिद्धी मिळवतात. पण संगीताचं काय, याचा कुणीही विचार करत नाही. टीव्ही वाहिन्यांवरच्या अनेक स्पर्धांसाठी मला परीक्षक म्हणून बोलावणं येतं. मी अशा स्पर्धांना कधीही जात नाही. स्पर्धा कशाला, मागे ‘फिल्मफेअर’वाले मला ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’ अर्थात ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करणार होते, अमिताभ बच्चनच्या हस्ते. पण मी हा पुरस्कार नाकारला. अजूनही मला संगीतात बरंच काही करायचं आहे. माझे सहकारी लक्ष्मीजी आज लौकिकार्थाने हयात नाहीत. पण त्यांचं अस्तित्व अजूनही माझ्यासोबत असल्याची जाणीव मला होते.

    नियतीने अनेकवेळा पहिल्यावहिल्या सन्मानांसाठी आमची निवड केली. भारतातली पहिली गोल्डन डिस्क मिळवण्याचा बहुमान ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल’च्या नावावर. पहिलं ‘स्क्रीन अ‍ॅवॉर्ड’ ‘लक्ष्मी-प्यारे’ जोडगोळीने पटकावलं. आत्ता ‘दै. प्रत्यक्ष’च्या पहिल्या अंकातल्या ‘चालता बोलता इतिहास’मधून तुमच्याशी हितगुज करण्याची संधीही ‘प्यारेलाल’ला मिळतेय. या संधीचा पुरेपूर लाभ उचलायचा असं मी ठरवलंय. या निमित्ताने मी तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहे. जुन्या आठवणी सांगणार आहे. माझ्यासोबत तुम्हालाही त्या काळात घेऊन जाईन. ही सफर मला ताजतवानं करेल आणि खात्रीनं सांगतो, तुम्हालाही या सफरीत बरच काही गवसेल.

    (क्रमश:)

    ◆◆◆

    ट्रेंड नाही, अभिजात संगीतच टिकून राहतं

    (दि. २१ डिसेंबर, २००५)

    आजकाल जुन्या गाण्याचं रिमिक्स केलं जातं. जुन्याजाणत्या लोकांना हे मान्य नाही. ते रिमिक्सवर सडकून टीका करताना दिसतात. मला विचाराल, तर रिमिक्स इतकं वाईट नाही. त्याने मूळ संगीताची हानी होईल असं निदान मला तरी वाटत नाही. अभिजात संगीत हे चिरंतन टिकून राहतं. संगीतातले ‘रिमिक्स’सारखे ट्रेंड काही काळ लोकप्रिय होतात. नंतर लोक पुन्हा अभिजात संगीताकडेच वळतात. एक उदाहरण देतो. देवआनंद साहेबांचा ‘प्रेम पुजारी’ आठवतोय? या चित्रपटात एक गाणं होतं, ‘रंगीला रे... तेरे रंग मे, यूँ रंगा है, मेरा मन’ हे गाणं तुम्हाला नक्कीच आठवत असेल. हे गाणं बरंच जुनं आहे, नाही का?

    आता अगदी अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या अमिर खानच्या ‘रंगीला’ चित्रपटातलं एक गाणं आठवण्याचा प्रयत्न करा. गाणं होतं ‘हो जा रंगीला...’ आठवतंंय का? माझी खात्री आहे, जुनपुराणं ‘रंगीला रे...’ गाणं त्याच्या विशिष्ट सुरावटीसह तुमच्या स्मरणात अगदी सहजपणे राहिलेलं असेल. आत्ताचं ‘हो जा रंगीला...’ कदाचित तुम्हाला आठवणारही नाही.

    हे फक्त चाळीशी-पन्नाशी उलटलेल्यांच्या बाबतीतच होतं असं नाही. आत्ताच्या तरुणांशीही मी जेव्हा बोलतो, तेव्हा त्यांनाही ‘प्रेम पुजारी’मधलं ‘रंगीला रे...’ चटकन आठवतं. ए.आर. रेहमानचं ‘हो जा रंगीला...’ आठवण्यासाठी वेळ लागतो. काहीजणांना या गाण्याची चाल आठवतही नाही. हा अभिजात संगीतातला आणि ट्रेंडमधला फरक आहे.

    म्हणूनच ‘रिमिक्स मूळ संगीताला संपवेल’ ही भीती निराधार आहे असं मला वाटतं. हां, एक मात्र खरं, यात गाणारे गायक कच्चे असतात, अर्धवट असतात. अशा गाण्यांमुळे लवकर प्रसिद्धी-पैसा मिळाल्यामुळे त्यांचा विकास खुंटतो, या गोष्टी मान्य करायला हव्यात. पण रिमिक्समुळे बरेच जण पोटापाण्याला लागले आहेत, त्यामुळे मी काही रिमिक्सला फारसा विरोध करत नाही.

    आमच्या पिढीतले लोक रिमिक्सबरोबरच सध्याच्या चित्रपटांवरही नाराज असतात. त्यांना आत्ताचे अश्‍लील चित्रपट पाहवत नाहीत. असे चित्रपट बनवणार्‍यांना ते शिव्याशाप देतात. मलाही आत्ताचे चित्रपट आवडत नाहीत. पण अशा अश्‍लील चित्रपटांचं उगमस्थान आत्ताच्या प्रेक्षकांमध्ये आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. असे चित्रपट पाहणारे आहेत, म्हणून बनवणारे आहेत. चांगला चित्रपट चालत नाही म्हणून चांगले चित्रपट बनत नाहीत. मग आपण दोष कुणाला द्यायचा? वाईट चित्रपट बनवणार्‍यांना की ते पाहणार्‍यांना?

    एकदोन स्पर्धा जिंकून मोठं होणार्‍या मंडळींना पाहिलं की मला आमचं धोरण अगदी उर्दू भाषेसारखं वाटतं. उजवीकडून डावीकडे. आम्ही पहिल्यांदा खूप मेहनत करायचो, त्यानंतर आम्हाला संधी मिळायची, नंंतर पैसा आणि प्रसिद्धी. या मंडळींना आधी संधी, पैसा मिळतो, नंतर कदाचित ते मेहनत करतील.

    लक्ष्मीकांतजी आणि मी प्रत्येक चित्रपटासाठी प्रचंड मेहनत करायचो. चित्रपटाचं कथानक, दिग्दर्शकाची शैली याप्रमाणं आम्ही संगीत द्यायचा प्रयत्न करायचो. त्यासाठी वाट्टेल तितके कष्ट उपसण्याची आमची तयारी होती. राजकपूरजींच्या चित्रपटासाठी आमचं संगीत वेगळं असायचं, तर एखाद्या मसालापटासाठी आमचं संगीत निराळं असेल याबाबत आम्ही दक्ष होतो.

    राजकपूर चित्रपटसृष्टीतलं बुलंद व्यक्तिमत्व. हा माणूस म्हणजे चित्रपटनिर्मितीची चालती-बोलती संस्था. ‘बॉबी’ चित्रपटासाठी आम्ही पार्श्वसंगीत तयार करत होतो. त्यात प्राणसाहेब आणि प्रेमनाथ यांच्या भांडणाचं एक दृश्य होतं. याचं पार्श्वसंगीत आम्ही केलं. राजजींना ते इतकं आवडलं की त्यांनी या दोन्ही व्यक्तिरेखांचं भांडण विकोपाला जाताना संवादाचा वापर केलाच नाही. त्याऐवजी आम्ही दिलेलं पार्श्वसंगीत लाऊड केलं. यामुळे प्राणसाहेब आणि प्रेमनाथजींच्या भांडणाचा, संवादापेक्षाही अधिक प्रभावी फील या सीनमध्ये आला.

    राजजींचा माझ्यावर फार लोभ होता. एक दिवस लक्ष्मीकांतजींना राजजी म्हणाले, ‘लक्ष्मी, ये तुमने बहोत अच्छा काम किया, प्यारे को बाहर नहीं जाने दिया’. मी स्वच्छंदी, लहरी माणूस, चित्रपटसंगीताचं क्षेत्र सोडून जाईन, असं राजजींना वाटत होतं. मला जाऊ दिलं नाही याचं श्रेय ते लक्ष्मीकांतजींना देत.

    ‘संगीतकार प्यारेलाल’ होण्याआधीपासून राजकपूरजींचा माझ्यावर विशेष लोभ होता. ज्येष्ठ संगीतकार शंकरजी, मी आणि लक्ष्मीकांतजी बरोबर राजकपूरजींचा एक फोटो या सदरात देत आहे. हा फोटो काढण्यापूर्वी राजजींपासून लांब उभा होतो. त्यांनी माझ्या हाताला पकडून मला आपल्याजवळ उभं केलं. हा फोटो माझ्या संग्रही ठेवलेला आहे. आम्ही घेतलेल्या परिश्रमाची राजकपूरजींसारख्या दिग्गजांकडून अशीही दाद मिळाली होती, ही भावना आजही मनाला मोहरून टाकते.

    (क्रमश:)

    ◆◆◆

    व्हायोलिन आणि मेंडोलिन

    (दि. २८ डिसेंबर, २००५)

    यशस्वी संगीतकार होण्याचं स्वप्न मी कधी पाहिलं नव्हतं. व्हायोलिन हे माझं अतिशय आवडतं वाद्य. मोठ्ठा व्हायोलिनवादक म्हणून भारतातच नाही, अवघ्या जगात नाव कमवावं, हे माझं ध्येय. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट उपसायची माझी तयारी होती. त्याकाळचे विख्यात व्हायोलिनपटू यहुदी मेनहीन हे माझे गुरु. दिवसातले अठरा-अठरा तास मी व्हायोलिनवर प्रॅक्टिस करायचो. आपण ठरवतो एक अन् आयुष्य वेगळीच दिशा पकडतं, असं बर्‍याचजणांच्या बाबतीत होतं. माझ्याही बाबतीत असंच घडलं. व्हायोलिनपटू बनण्याच्या ऐवजी मी संगीतकार बनलो.

    माझ्या नावापुढे ‘संगीतकार’ बिरुद लागलं याचं संपूर्ण श्रेय लक्ष्मीकांतजींचं. आम्हा दोघांची जोडी कशी जमली? हा प्रश्‍न आम्हाला अनेकवार विचारण्यात आला. या लेखमालेत त्याविषयी मी लिहिणारच आहे. पण त्याआधी मला माझ्या पूर्वायुष्यातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत.

    दादरच्या किर्ती महाविद्यालयाच्या समोर ‘अहमद मॅन्शन’ नावाची इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आम्ही राहायचो. लहानपणापासून मी स्वच्छंदी स्वभावाचा. रमत-गमत दिवस घालवणारा. बांद्र्याच्या ‘सेंट मायकल नाईट स्कूल’चा मी विद्यार्थी. माझ्या वयाची आजूबाजूची मुलं दिवसा शाळेत जायची. मी दिवसभर संगीत, क्रिकेट हे माझे शौक पूर्ण झाले की मग संध्याकाळच्या वेळी शाळेत जायला निघायचो.

    माझा शाळेतला प्रवासही आगळावेगळा. जवळच्या समुद्रकिनार्‍यावरून चालत चालत मी शाळेत जात असे. खिश्यात एक आणा असला तर त्याचे चणे घ्यायचे, ते चणे खात खात पायी प्रवास व्हायचा. पैसे नसले तर कधी मन खट्टू व्हायचं नाही. त्याच उत्साहाने मी शाळेपर्यंत जात असे.

    थोडंसं विषयांतर करतो, आजही माझा स्वभाव फारसा बदलेला नाही. लक्ष्मीजी आणि माझं ‘पारसमणी’ नंतर नाव झालं. आम्हाला चित्रपट मिळू लागले. हातात पैसे आले. लक्ष्मीजींनी बंगला बांधला, त्याचं नाव ‘पारसमणी’ ठेवलं. मीही बंगल्याचा विचार करीत होतो. ह्याच दरम्यान एकदा कवी प्रदीप मला भेटले. खांद्यावर हात टाकून त्यांनी मला सल्ला दिला, ‘कितीही पैसा हाती आला ना, तरी आपलं राहणीमान चटकन बदलू नकोस. पुढे कदाचित पैसा येणारही नाही. त्यावेळी काय करशील? म्हणूनच आहेस त्या स्थितीत मौजमजेत रहा. आयुष्यभर सुखी राहशील.’ प्रदीपजी फार मोठे कवी, त्यांचा हा सल्ला माझ्या सदैव स्मरणात राहिला. मी बंगल्याचा विचार सोडून दिला. आजही मी फ्लॅटमध्ये मजेत राहतो आहे.

    अप्रतिम काव्य आहे ना! असो....मी या विषयावर बोलायला लागलो की भरकटत जाईन.

    तर माझ्या शालेय जीवनातला अत्यंत महत्त्वाचा प्रसंग म्हणजे तीन रुपये मासिक फी भरली नाही म्हणून मला शाळेतून काढून टाकलं गेलं. मी अतिशय चिडलो. नंतर या शाळेत पाऊल ठेवलं नाही. नंतरचा वेळ संगीत आणि क्रिकेटच्या मागे जाऊ लागला. त्यावेळी किर्ती कॉलेजच्या बाजूला ‘फेमस स्टुडिओ’ होता. इथे त्या काळचे हिंदीतले बरेच कलाकार यायचे. तिथे खेळणार्‍या आम्हां मुलांमध्ये क्रिकेट खेळायचे.

    यांत लक्ष्मीकांतजीही सामील व्हायचे. लक्ष्मीजी त्यावेळी हुस्नलालजींकडे संगीताचे धडे गिरवायचे. नव्या मंडळींसाठी सांगतो, हुस्नलाल हे त्याकाळचे विख्यात संगीतकार. लक्ष्मीजी मेंडोलिन वाजवायचे. आपल्या वादनाने ते समोरच्याला जागच्या जागी खिळवून ठेवायचे. आम्ही समवयस्क. एकत्र खेळणारे. हळूहळू आमची दोस्ती वाढू लागली. अर्थात ‘संगीत’ हा आम्हां दोघांमधला अविभाज्य घटक होता, हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको.

    दोघांमध्ये खूप गप्पाटप्पा, चर्चा व्हायच्या. शिवाजी पार्कच्या सेनाभवन जवळच्या हॉटेलमध्ये कटलेट छान मिळायचं. ते खात, चहा पीत आमच्या गप्पांना उधाण यायचं. पुढच्या काळात दोस्ती वाढत गेली, वाढत गेली आणि वाढतच राहिली. कदाचित तुम्हाला खोटं वाटेल, पण नंतरच्या काळात आम्हां दोघांना संवाद साधण्यासाठी बोलण्याची आवश्यकता उरली नव्हती. मी लक्ष्मीजींकडे दृष्टीक्षेप टाकला, तरी मला काय म्हणायचंय ते त्यांना कळत असे. त्यांनी माझ्याकडे पाहिलं की त्यांच्या मनात काय चाललं आहे हे मला उमगत असे.

    अशा लक्ष्मीजींच्या, या ‘प्यारे’शी जुळलेल्या जोडीबद्दल आणि पहिल्या चित्रपटाबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन. व्हायोलिन आणि मेंडोलिनचे सूर एकजीव कधी झाले याबद्दल तुम्हाला कुतूहल असेलच ना?

    (क्रमश:)

    ◆◆◆

    यशाचा अरुंद मार्ग

    (दि. ४ जानेवारी, २००६)

    ‘पारसमणी’ हा आम्ही संगीत दिलेला पहिला चित्रपट असं अनेकांना वाटतं. पण तसं नाही. १९६० साली आलेला ‘हम तुम और वो’ हा आम्ही केलेला पहिला चित्रपट. त्यानंतर १९६२ साली आम्ही ‘छैला बाबू’ या चित्रपटाला संगीत दिलं. या चित्रपटानंतर आमच्याकडे ‘पारसमणी’ आला. खरंतर ‘पारसमणी’सारख्या चित्रपटांना ‘सी-ग्रेड चित्रपट’ म्हणतात. पण मिळणारं काम छोटं की मोठं, त्यातून किती पैसे-प्रसिद्धी मिळेल, याची फिकीर आम्ही करत नव्हतो. काम करण्याची संधी मिळाली की झालं, आपलं सर्वस्व ओतून आलेल्या संधीचं सोनं करायचं, ही आमची शिस्त. आयुष्यात ही शिस्तच कामाला आली. म्हणूनच दीर्घकाळ आमची जोडी लोकांसमोर राहिली.

    संगीतकार होण्याआधी आम्ही त्या काळच्या बड्या संगीतदिग्दर्शकांबरोबर काम केलं. नौशाद, रवी, मदनमोहन, कल्याणजी-आनंदजी आदी त्याकाळच्या सर्वच लोकप्रिय संगीतकारांचे साहाय्यक म्हणून आम्ही काम केलं. या सर्वांच्या काम करण्याच्या पद्धती आम्ही दोघांनी जवळून पाहिल्या होत्या. त्यांच्याबद्दल आम्हाला जबरदस्त आदर होता. आजही आहे. नौशादसाहेबांनी शंभर चित्रपटही केलेले नाहीत. पण त्यांनी केलेलं काम चिरकाळ टिकून राहणारं आहे.

    ‘पारसमणी’नंतर संगीतकार म्हणून आम्ही नावारूपाला आलो. जे आमच्यासाठी आदर्श होते, अशा मंडळींशी आम्हाला व्यावसायिक स्पर्धा करावी लागणार होती. स्वतःचं असं स्थान चित्रपटसृष्टीत निर्माण करावं लागणार होतं. यावेळी लक्ष्मीजी आणि माझ्यात या विषयावर संवाद व्हायचा. एक दिवस लक्ष्मीजी मला म्हणाले, ‘प्यारे, यशाच्या शिखराचा मार्ग अतिशय अरुंद असतो. यातून फार जपून मार्ग काढावा लागतो. आपल्या दोघांच्या मार्गात फार मोठी माणसं उभी आहेत. शंकर-जयकिशन, एस.डी. बर्मन, कल्याणजी-आनंदजी, मदनमोहन ... या सर्वांपासून वेगळं असं काहीतरी आपल्याला करून दाखवायचं आहे.’

    लक्ष्मीजींचे शब्द मी कधीही विसरू शकलो नाही. मागे एकदा सांगितलेली गोष्ट नव्याने सांगण्याचा मोह मला आवरत नाही. आज बरेच तरुण संगीतकार मला भेटतात. माझ्याशी आदराने वागतात. माझंही या मुलांवर प्रेम आहे. पण, ही मुलं जेव्हा - ‘तुमच्यासारखं काम करणं आम्हाला जमणार नाही’ असं सांगतात, ते मात्र मला आवडत नाही. आमच्या काळीही बुज़ुर्ग संगीतकार होते. तुम्ही जसा माझा आदर करता, तसंच आम्हीही या मंडळींना आदर, प्रेम देत होतो. पण त्यांच्यासारखं संगीत देणं आम्हाला जमणार नाही, हे आम्ही कधीही मान्य केलं नसतं; किंबहुना ‘त्यांच्याहून चांगलं, वेगळं संगीत द्यायचा आम्ही प्रयत्न करणं म्हणजेच त्यांच्याबद्दल खराखुरा आदर व्यक्त करणं’ असं आम्हाला वाटायचं. म्हणूनच अतिशय अस्थिर व्यवसायात आम्ही स्थिर राहू शकलो.

    यात लक्ष्मीजींचा फार मोठा वाटा आहे, हे कधीही विसरता येण्याजोगं नाही. आज लक्ष्मीजी हयात नाहीत. पण मी तसं मानत नाही. कुठल्याही बैठकीत बसताना अजूनही मी माझ्या उजव्या हाताच्या बाजूला विशेष कुणाला बसूू देत नाही. कारण लक्ष्मीजी माझ्याबरोबर आहेत, अशीच माझी श्रध्दा आहे. अशा लक्ष्मीजींच्या गोष्टी, ज्या मी कधीही कुणालाही सांगितल्या नव्हत्या, त्या इथे तुमच्यासमोर मांडणार आहे. ही आहे ‘मला कधीही नाही न म्हणणार्‍या’ माणसाची गोष्ट!

    (क्रमश:)

    ◆◆◆

    जय लक्ष्मीकांतम्...

    (दि. ११ जानेवारी, २००६)

    शिवाजी पार्कच्या शेट्टी हॉटेलमध्ये पॅटीस फार छान मिळायचं. मी आणि लक्ष्मीजी नेहमी तिथे जायचो. पॅटीस, बटाटेवडे वगैरे हादडायचो. शिवाजीपार्क मैदानाच्या कट्ट्यावर बसून गप्पा छाटायचो. लक्ष्मीजींच्या आग्रहाखातर, मी परदेशात न जाता इथेच संगीतकार म्हणून काम करीत रहायचं ठरवलं होतं. ‘सिंदबाद’ नावाचा चित्रपट आम्हाला मिळणार होता, त्यासंबधी प्राथमिक बोलणीही सुरू झाली होती.

    आम्ही पहिल्याच चित्रपटासाठी जोरदार तयारी केली. पण ‘सिंदबाद’चे नायक अजितजींचा आम्हा  नवख्या मुलांवर विश्‍वास नव्हता. हा चित्रपट आमच्या हातून गेला. प्रत्येक भारतीय माणसाच्या कानावर एक गोष्ट सातत्याने आदळत असते - ‘आपण केलेले सत्कर्म, परिश्रम कधीही वाया जात नाही. योग्यवेळी त्याचं फळ मिळतंच.’ आम्हालाही ‘सिंदबाद’साठी केलेल्या कष्टाचं फळ मिळालं. ‘पारसमणी’ चित्रपटात आम्ही ‘सिंदबाद’साठी केलेली गाणी वापरली. ही गाणी तुफान लोकप्रिय ठरली.

    ‘हसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फें रंग सुनहरा’, ‘वो जब याद आये’ ही सारी गाणी त्यावेळच्या ‘बिनाका टॉप-१०’ या गाजलेल्या रेडिओ संगीताच्या कार्यक्रमात वारंवार वाजत राहिली. ‘वो जब याद आये’ ला टॉप रँकिंग मिळालं होतं. या यशानं आम्ही हरखून गेलो असं कदाचित तुम्हाला वाटत असेल. तसं काहीही नव्हतं. चित्रपटसृष्टीत मिळणारं यशही तुमच्या टेन्शनमध्ये भर घालीत असतं. एका चित्रपटातलं संगीत हिट झालं, पुढे काय? किंवा एका चित्रपटातलं संगीत फ्लॉप गेलं, पुढे काय? असे प्रश्‍न तुम्हाला या क्षेत्रात वारंवार पडत असतात. त्यामुळे मिळालेल्या यशानं आमच्या डोक्यात हवा गेली नाही.

    यश डोक्यात गेलं नाही, त्याचं आणखी एक कारण असावं असं मला वाटतं. मी साधारण कुटुंबात जन्माला आलो, तरीही भविष्यात गाडी, बंगला, पैसाअडका सर्व काही मला मिळणारच याची मला खात्री होती.

    Enjoying the preview?
    Page 1 of 1