Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #1
अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #1
अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #1
Ebook141 pages51 minutes

अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #1

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

निलेश नावाच्या एका व्रात्य शाळकरी मुलाच्या खोडकरपणामुळे त्याच्यावर काय प्रसंग ओढवतात, हे यातील तीन गोष्टींमध्ये वाचता येईल.

 

१. निल्लु आणि बिल्लु : थोडासा क्रूर व खोडकर शाळकरी मुलगा निलेश उर्फ निल्लु आपल्या पाळीव मांजराला 'बिल्लु'ला क्रूरपणे वागवत असतो. त्यामुळे त्याचे पप्पा त्याला डॉ. कानपिळेंच्या सुधारशाळेत पाठविण्याचे ठरवितात. अचानक त्याच्या आयुष्यात एक विचित्र घटना घडते, ज्यामुळे त्याचे आयुष्य बदलून जाते. त्याचे आयुष्य बदलून टाकणारी ती विचित्र घटना काय? ते जाणण्यासाठी वाचा ही कथा...

 

 २. बिल्लु आणि रोहू : निलेशच्या काही दोष नसताना त्याच्यावर चोरीचा आळ येतो आणि हरवलेली वस्तू शोधण्याच्या प्रयत्नात तो एका तलावात पडतो. त्यानंतर त्याला काय अनुभव येतो हे या कथेत वाचता येईल.

 

 ३. निल्लु आणि आग : निलेशला त्याचे नातेवाईक भीत्रा व नेभळट समजतात. पण तो तसा आहे का? हे या कथेत वाचता येईल.

 

 

Languageमराठी
Release dateOct 29, 2020
ISBN9781393676812
अजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #1

Related to अजब मुलांच्या गजब गोष्टी

Titles in the series (2)

View More

Related ebooks

Reviews for अजब मुलांच्या गजब गोष्टी

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    अजब मुलांच्या गजब गोष्टी - स्नेहल जी

    A picture containing drawing Description automatically generated

    अजब मुलांच्या गजब गोष्टी

    बालकथा #पुस्तक एक

    निलेशच्या गोष्टी

    लेखिका : स्नेहल जी (Snehal G)

    ©प्रताधिकार (CopyRight)

    ©२०२० स्नेहल घाटगे & डॉ. प्रतीक घाटगे (legal successor)

    या पुस्तकातील लिखाणाचे सर्व प्रताधिकार हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत. यातील मजकूर, मूळ, खंडित अथवा संक्षिप्त अशा कोणत्याही स्वरूपात प्रसिद्ध करता येणार नाही. तसेच लेखिकेच्या पूर्व परवानगीशिवाय तो संपूर्ण, खंडित अथवा संक्षिप्त स्वरूपात कुठल्याही इतर भाषेत अनुवादित अथवा रुपांतरीत करता येणार नाही.

    प्रकाशक: शब्दविश्व प्रकाशन, नवी मुंबई.

    संपर्क : shabdavishwa@gmail.com

    प्रथमावृत्ती नोव्हेंबर २०२०

    अस्वीकृती (Disclaimer)

    या पुस्तकातील कथा पूर्णता काल्पनिक आहेत. त्यांना सत्याचा बिलकुल आधार नाही. केवळ मनोरंजनात्मक हेतूने केलेले हे कल्पित लेखन आहे. यातील घटनांचे वा पात्रांचे प्रत्यक्षातील घटनांशी वा कोणा मृत वा जिवीत व्यक्तींशी काही साधर्म्य आढळलेच, तर तो केवळ विरळा योगायोग समजावा...

    या पुस्तकातील सर्व कथा जरी काल्पनिक असल्या, तरी कथांमध्ये उल्लेख आलेल्या शास्त्रीय वा इतरही काही गोष्टींचे स्पष्टीकरण तळटीपांमध्ये दिले आहे. उल्लेखासमोर दिलेल्या आकड्यांवर टिचकी मारून त्या टळटीपा वाचता येतात. बालवाचकांनी त्या अवश्य वाचाव्यात, जेणेकरुन मनोरंजनाबरोबरच ज्ञानवर्धनही होईल.

    अनुक्रम

    निल्लु आणि बिल्लु

    निल्लु आणि रोहू

    निल्लु आणि आग

    निल्लु आणि बिल्लु

    A picture containing food Description automatically generated निलेशला तुम्ही ओळखत नाही हे मला माहीत आहे. निदान मी ज्याच्या गोष्टी सांगणार आहे, त्या निलेशला तरी निश्चित नाही; पण आता त्याच्या गोष्टी वाचल्यावर मात्र तुम्हीही त्याला ओळखू लागाल.

    निलेश तुमच्या वयाचा एक शाळकरी मुलगा आहे, ज्याला त्याचे मित्र व घरातले ‘निल्लु’ या लाडक्या नावाने हाक मारतात.

    तुम्ही केस तर खूपवेळा कापून घेतले असतील आणि त्यावेळी तुम्हांला दुखलेही नसेल. कारण केस कापून घेणे ही तशी जास्त दुखणारी गोष्ट नाही. तुम्ही आपल्या पप्पांना मिशा कापतानाही पाहिले असेल. मिशा कापतानाही दुखत नाही.

    पण, तुम्ही कोणाला गोल वाटीसारख्या आकाराचे कडक बूट घालून चाललेले पाहिले आहे? नाही ना? कारण पाहणार्‍यासाठी ही गोष्ट कितीही मजेशीर असली, तरी गोल लाकडी बूट घालून चालण्याचा प्रयत्न करणे ही स्वत:साठी नक्कीच दुखणारी गोष्ट आहे.

    तसेच तुमच्या त्वचेवर जर मऊ लोकरीचे छानसे जाड आवरण असेल आणि त्यासकट जर कोणी तुम्हांला पोहायला लावले, तर असे पोहणेही अत्यंत त्रासदायक आहे. आणि जर तुम्हांला शेपटी असेल, तर तो सर्वस्वी तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे; पण त्या शेपटीला जर कोणी एखादा रिकामा पत्र्याचा डबा बांधेल, तर तुम्हांला ते कदाचित आवडणार नाही, हेही समजू शकते.

    तरीही शेपटी असणारा व त्याला रिकामा डबा बांधणारा, या दोघांचे दृष्टिकोन समजणे पाहणार्‍या तिसर्‍याला मात्र अवघड जाते. तर आता तुम्ही ही गोष्ट वाचली की, तुम्हांला त्या दोघांचे दृष्टिकोन समजणे सोपे जाईल.

    हातात कात्री धरलेल्या निलेश उर्फ निल्लुच्या दृष्टीने बिल्लुराजाच्या मिशा कापून त्या एक इंचाने कमी करणे ही जगातली अत्यंत नैसर्गिक गोष्ट होती. कारण खेळ किंवा जगण्याच्या रोजच्या गंभीर प्रयत्नांमध्ये बिल्लुराजाला या मिशा किती उपयोगी आहेत, हे निलेशला बिलकूल माहीत नव्हते.

    तसेच रंगपंचमीच्या वेळी बिल्लुराजाला रंगीत पाण्याने भरलेल्या मोठ्या पिपात फेकणे हा सुद्धा निलेशसाठी एक मनोरंजक खेळ होता.

    अर्थात बिल्लुराजाने हे एकदाच घडू दिले होते. बिल्लुराजाच्या नख्यांना शेंगाची रिकामी जाड टरफले चिकटवून त्याला चालायला लावणे हाही निलेशसाठी खेळच होता.

    पण अरेच्या! तुम्ही बिल्लुराजाला नक्कीच ओळखत नाही. बिल्लुराजा हा सर्वांचा आवडता बोका होता.

    A drawing of a map Description automatically generated

    निलेश उर्फ निल्लु जसा एक हुशार व धोरणी मुलगा होता, तसा बिल्लुराजा – कोणी जास्तच त्रास दिला नाही तर – साधारणत: मुका सहनशील प्राणी होता.

    पण बिल्लुराजाच्या शेपटी व मागच्या पायांना निलेशने बांधलेला रिकामा पत्र्याचा डबा आवाज करणारा होता आणि अशा अवस्थेत पायर्‍यांवरून, जिन्याच्या कठड्यावरून किंवा घरातील टेबल-खुर्च्यांच्या पायांना अडखळत चालण्याने मोठा आवाज तर होणारच होता. जणू काय हा आवाज सूडाचा आवाज होता. त्यामुळेच स्वत:ला होत असणार्‍या त्रासामुळे बिल्लुराजानेही आवाज केला.

    आणि यावेळी घरातील माणसांना त्याचा आवाज ऐकू गेला. मग घरातील सर्वजण बिचारा बोका!चा सार्वजनिक ओरडा करीत बिल्लुराजाच्या मागे पळाले. शेवटी लती नोकराणीच्या पलंगाखालून बिल्लुराजाला पकडले गेले. त्याच्या शेपटीला बांधलेला पत्र्याचा डबा सोडविताना शेपटी व डबा शांत राहिले; पण बिल्लुराजा मात्र शांत नाही राहिला. तो लढला. त्याने बोचकारे काढले आणि चावलाही. पुढचे काही आठवडे लतीने त्या जखमा अंगावर वागवल्या.

    सगळे शांत झाल्यावर निलेशला शोधले गेले. अर्थातच सुरुवातीला इकडेतिकडे शोधण्यात वेळ गेल्यानंतर तो जिन्याखाली अडगळीच्या कपाटात सापडला.

    अरे निलेश! आई तर जवळजवळ हुंदके देत होती, असे कसे करतोस? तुझे पप्पा काय म्हणतील?

    पप्पा काय म्हणतील किंवा करतील हे आपल्याला माहीत आहे असे निलेशला वाटले.

    मुक्या प्राण्यांशी असे दुष्ट व क्रूर वागणे चुकीचे आहे, हे तुला माहीत नाही का? आई पुढे म्हणाली.

    मला त्याच्याशी दुष्ट वागायचे नव्हते. निलेश म्हणाला आणि खरी गोष्ट अशी होती की, तो खरेच बोलत होता. त्याने बिल्लुराजाकडे

    Enjoying the preview?
    Page 1 of 1