Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

हिप्नॉटीझम - संमोहनातून अंतर्मनाकडे
हिप्नॉटीझम - संमोहनातून अंतर्मनाकडे
हिप्नॉटीझम - संमोहनातून अंतर्मनाकडे
Ebook652 pages4 hours

हिप्नॉटीझम - संमोहनातून अंतर्मनाकडे

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

About the book:
लेखक १) डॉ. दीपक केळकर डी.पी.एम (बंगलोर), एम.एन.ए.एम.एस.(डी.एन.बी.), एम.डी.(चंदीगड)
About the author:
लेखक
१)            डॉ. दीपक केळकर
                डी.पी.एम (बंगलोर),
                एम.एन.ए.एम.एस.(डी.एन.बी.),
                एम.डी.(चंदीगड)
२)            डॉ. अमोल केळकर
                एम.बी.बी.एस.(नागपुर),
                एम. डी. (मुंबई )
३)            डॉ. राधिका केळकर
                एम.बी.बी.एस. (नागपुर)
                डी.पी.एम. (नाशिक)
                एम. डी (२)
                मनोविकार,सेक्सरोग,संमोहन आणि व्यसनमुक्ति तज्ञ
                केळकर हॉस्पीटल कॉम्प्लेक्स, रामदास पेठ,                                               अकोला (महाराष्ट्र) ४४४००१
                

LanguageEnglish
PublisherPencil
Release dateNov 16, 2021
ISBN9789354588723
हिप्नॉटीझम - संमोहनातून अंतर्मनाकडे

Related to हिप्नॉटीझम - संमोहनातून अंतर्मनाकडे

Related ebooks

Psychology For You

View More

Related articles

Reviews for हिप्नॉटीझम - संमोहनातून अंतर्मनाकडे

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    हिप्नॉटीझम - संमोहनातून अंतर्मनाकडे - Dr. Deepak Kelkar

    हिप्नॉटीझम - संमोहनातून अंतर्मनाकडे

    BY

    Dr. Deepak Kelkar


    pencil-logo

    ISBN 9789354588723

    © Dr. Deepak Kelkar 2021

    Published in India 2021 by Pencil

    A brand of

    One Point Six Technologies Pvt. Ltd.

    123, Building J2, Shram Seva Premises,

    Wadala Truck Terminal, Wadala (E)

    Mumbai 400037, Maharashtra, INDIA

    E connect@thepencilapp.com

    W www.thepencilapp.com

    All rights reserved worldwide

    No part of this publication may be reproduced, stored in or introduced into a retrieval system, or transmitted, in any form, or by any means (electronic, mechanical, photocopying, recording or otherwise), without the prior written permission of the Publisher. Any person who commits an unauthorized act in relation to this publication can be liable to criminal prosecution and civil claims for damages.

    DISCLAIMER: The opinions expressed in this book are those of the authors and do not purport to reflect the views of the Publisher.

    Author biography

    लेखक

    १)            डॉ. दीपक केळकर

    डी.पी.एम (बंगलोर),

    एम.एन.ए.एम.एस.(डी.एन.बी.),

    एम.डी.(चंदीगड)

    २)            डॉ. अमोल केळकर

    एम.बी.बी.एस.(नागपुर),

    एम. डी. (मुंबई )

    ३)            डॉ. राधिका केळकर

    एम.बी.बी.एस. (नागपुर)

    डी.पी.एम. (नाशिक)

    एम. डी (२)

    मनोविकार,सेक्सरोग,संमोहन आणि व्यसनमुक्ति तज्ञ

    केळकर हॉस्पीटल कॉम्प्लेक्स, रामदास पेठ,                                               अकोला (महाराष्ट्र) ४४४००१

    फोन : ०७२४ - २४३४४२९ / ९८२२५७०१०१

    मनोगत ........

    हिप्नॉटिझम : ‘संमोहनातून मन:शांतीकडे’ या पुस्तकाची तिसरी आवृत्ती वाचकांच्या हाती देण्यात मला अत्यंत आनंद होत आहे. मनोविकारतज्ञ म्हणून मागील ३४ वर्ष प्रॅक्टीस करीत असतांना अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामात जेंव्हा पडलो तेंव्हा असे जाणवले की जनमानसातील अंधश्रध्दा दूर करण्याकरीता संमोहन हे एक प्रभावी माध्यम आहे. तसेच सर्वसामान्यांना  मनोविकारांबद्दल माहिती व्हावी, कोणकोणते मनोविकार आहेत? त्यांची लक्षणे कोणती? त्यावर कसा उपचार होऊ शकतो? याबद्दची माहिती संमोहन शास्त्राद्वारे चांगली देता येवु शकते असे माझे ठाम मत झाले.

    नुसत्याच अंधश्रध्दा निर्मूलनाच्या व्याख्यानाला विंâवा मनोविकाराबद्दलची माहीती देण्याकरीता असलेल्या व्याख्यानाला मी जर गेलो तर श्रोत्यांमध्ये आयोजकांशिवाय मोजुन १० लोक तरी येतील विंâवा नाही याबद्दल मी साशंक होतो म्हणुन या व्याख्यानाच्या वेळेस संमोहनावरील कार्यक्रम दाखवुन व्याख्यान कसे रंगवता येईल याबद्दल मी वारंवार विचार करायचो. पुढे पुढे असे कळायला लागले की संमोहनाच्या कार्यक्रमात श्रोत्यांना तीन तीन तास खिळवुन ठेवण्याचे सामथ्र्य आहे म्हणुन मी संमोहनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातुन अंधश्रध्दा निर्मूलन आणि मानसशास्त्राचे लोकशिक्षण असा कार्यक्रम करु लागलो. संमोहनाची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करुन आतापर्यंत हजारो विद्याथ्र्यांना स्वसंमोहनाचे आणि परसंमोहनाचे शिक्षण दिले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश, पुणे, मुंबई अशा अनेक शहरांमध्ये संमोहनाचे कार्यक्रम आणि व्याख्याना करीता जाण्याचा योग आला. प्रत्येक कार्यक्रमानंतर सर्व लोकांचा एकच प्रश्न असायचा की आम्हाला संमोहनावरील तुमचे पुस्तक विंâवा वॅâसेट द्या. मराठी भाषेतील संमोहनावरील पुस्तकांची तपासणी केली असता बोटावर मोजण्याइतकी सुध्दा पुस्तके शास्त्रशुध्द पध्दतीने लिहिलेली नाहीत. बाकी पुस्तकांमध्ये संमोहनावरील अशास्त्रीय माहिती जास्त असुन अध्यात्मावर जास्त जोर असतो, म्हणुन संमोहनावरील पुस्तकातुन शास्त्रीय माहिती लिहीण्याचे ठरविले आणि हा पुस्तक लेखनाचा प्रपंच चालु केला.

    बरेच लोक विचारतात की तुम्हाला संमोहन कसं काय येतं? तुम्हाला याचा काय उपयोग? तुम्ही कोठुन शिकलात? इत्यादी. नागपुरहुन एम. बी. बी. एस. केल्यानंतर मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणुन मी बंगलोरहुन डी. पी. एम. ही पदविका, चंदीगडहुन एम. डी. ही पदवी तसेच एम. एन.ए.एम.एस. ही नॅशनल बोर्डाची पदवी सुध्दा घेतली. या सर्व अभ्यासक्रमात  संमोहन उपचार हा एक उपचाराचा भाग होता. मानसिक आजार संमोहन उपचाराने कसे ठीक होऊ शकतात हे शिकल्यामुळे मानसिक समस्यांवर उपचार सुरु केला.

    मागील ३४ वर्षापासुन आतापर्यंत अनेक प्रयोग आणि प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातुन अंधश्रध्दा निर्मुलनाचे काम केले. संमोहनावरील अशास्त्रीय माहितीची पुस्तके मानसशास्त्राची वैद्यकिय पदवी नसणाNयांनी लिहीलेली पाहुन मानसशास्त्रज्ञाने संमोहनावर एक शास्त्रीय पुस्तक लिहावे असा आग्रह माझ्या डॉक्टर मित्रांनी केला म्हणुन संमोहनातुन अंतर्मनाकडे हे पहिले पुस्तक लिहीले.

    संमोहनातुन अंतर्मनाकडे हे पुस्तक २१ वर्षापुर्वी प्रकाशित केले. ते पुस्तक वाचकांना फारच आवडले. संमोहनाचा दैनंदिन व्यवहारात कसा उपयोग करुन घ्यावा, दैनंदिन व्यवहारात स्वयंसूचना कशा द्याव्यात, धंद्यामध्ये संमोहनाचा वापर करुन यश कसे मिळवावे, स्मरणशक्ती, बुध्दीमत्तेचा विकास, आनंद, मन:शांती, ताणतणावमुक्ती, दैनंदिन जीवनातील चिंता, महत्वाकांक्षा, इच्छाशक्ती इत्यादींमध्ये संमोहनाचा उपयोग कसा करुन घेता येऊ शकतो याविषयीचे प्रश्न पुस्तक वाचल्यानंतर वाचकांनी केलेत.

    वरील विषयांची वाचकांची जिज्ञासा पूर्ण करण्याच्या हेतुने पहील्या पुस्तकात काही बदल करुन आणि वरील विषयांची भर टावूâन संमोहनातून मन:शांतीकडे हे पुस्तक लिहीले आहे. मनोविकार तज्ञ म्हणुन प्रॅक्टीस करीत असल्यामुळे तसेच राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रिय सहभाग असल्यामुळे दुसरे पुस्तक लिहीण्यास विलंब झाला. या पुस्तकामध्ये संमोहना बरोबरच वैयक्तिक विचारसरणी, व्यक्तीमत्व विकास आणि दैनंदिन जीवन यामध्ये संमोहनाचा उपयोग कसा करुन घ्यावा हे सुध्दा प्रामुख्याने लिहीले आहे.

    संमोहनप्रिय सुशिक्षीत वाचक वर्गाने टीकात्मक अभिप्राय आणि लिखाणातील त्रुटी जरुर कळवाव्यात म्हणजे पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल.

    प्रचंड भ्रष्टाचार, अनिती, बेरोजगारी, व्यसनाधिनता, दैनंदिन ताणतणाव, रोजच्या जीवनमानात घडणारा संघर्ष, महागाई, आर्थिक कुचंबणा यामुळे आपले जीवन अस्थिर आणि अशांत बनलेले आहे. अशा वेळेस ‘संमोहनातुन मन:शांतीकडे’ या पुस्तकातुन शरीराची आणि मनाची शांती मिळविण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आयुष्यमान आणि जीवनाचा दर्जा नक्कीच वाढवता येईल.

    एकदोनदा पुस्तक वाचुन संमोहन विषय कठीण आहे म्हणुन नाद सोडुन देणे चुकीचे होईल. एखाद्या पोथीप्रमाणे हे पुस्तक वारंवार वाचुन संमोहनाच्या प्रत्येक पायNयांचा अभ्यास करुन रोज संमोहनाचा सराव करणे आवश्यक आणि उपयुक्त ठरेल. माणसाच्या अंतर्मनाची खरी ओळख व्हावी, अंतर्मनाच्या अफाट शक्तीचा वापर करणे प्रत्येकास शिकता यावे जेणेकरुन आपला सर्वांगीण विकास होईल या जाणीवेने ‘संमोहनातुन मन:शांतीकडे’ हे पुस्तक संमोहन जिज्ञासु सुज्ञ वाचकांना सुपूर्द करीत आहे.

    

    संमोहनाचा उगम :-

    आजचे धकाधकीचे जीवन जगत असतांना प्रत्येकजण सुख, आनंद, मन:शांती मिळविण्याकरिता धडपडत असतो. ह्या विश्वातील प्रत्येकजण सुख, आनंद विंâवा मन:शांती मिळविण्यामागे धावत असतो. बहुतांश लोकांना असं वाटतं आपण श्रीमंत असलो तर आपल्याला सर्व काही विकत घेणे शक्य आहे. म्हणुन लोवंâ पैश्यांच्या मागे धावत असतात. सकाळी झोपेतुन उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली प्रत्येक कृती ही आनंद मिळण्याकरीताच केलेली असते. एखाद्या गरीब माणसाला आपण दान दिले तर तो माणुस गरीब आहे, त्याला खायची विंवंचना आहे म्हणून नव्हे तर अशा गरीबाला दान करुन मला पुण्य मिळेल, स्वर्गात जायला मिळेल ह्या करिता आपण ते करीत असतो. मरण पावल्या नंतर सुध्दा आपल्याला सुख मिळायला हवे अशी आपली इच्छा असते. आपल्या प्रत्येक कृतीत आनंद मिळविण्याचा विंâवा दु:खा पासुन / वेदनेपासुन दूर जाण्याचा उद्देश असतो असे म्हणण्यास हरकत नाही.

    माणुस खNया अर्थाने सुखी आहे का? संत समर्थ रामदासांनी ३७५ वर्षापुर्वी लिहून ठेवले होते की,

    ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे ?

    विचारी मना तूची शोधुन पाहे!’

    ह्या जन्मामध्ये सुख, समाधान आणि शांती मिळवून पुढील जन्मात सुध्दा स्वर्ग मिळावा म्हणून आज प्रत्येक जण अध्यात्माकडे ओढला जात आहे. अध्यात्म म्हणजे काहीतरी गुढ शक्ती असून त्याला आपण खNया अर्थाने समजू शकत नाही असे आपल्याला वाटते. आत्म्याचा, परमात्म्याचा शोध घेत आणि अध्यात्माचे गुढ उकलून दाखविण्याNया व्यक्तीचा शोध घेत लोवंâ हिंडत असतात. अशा वेळेस त्यांना दिसतो एक अध्यात्मीक पुरुष, गुरु, महाराज, बाबा, साधु विंâवा संत. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अध्यात्मात आहे, म्हणजे या महाराजाकडे आहे असे त्यांना वाटते.

    त्या महाराजांचा आर्शिवाद घेतला. त्यांचे दोन शब्द ऐकलेत तर आपलं भलं होईल, ते सांगतात तसे केले तर आपल्याला नक्कीच या जन्म मरणाच्या पेâNयातून आपल्याला मुक्ती मिळेल असे लोकांना वाटत असतं. त्या महाराजांनी आपल्या सभोवताल एक वलय निर्माण केलेलं असतं त्याकडे लोवंâ आकर्शित होतात.

    ५० ते ५५ टक्के रोग हे मानसिक स्वरुपांचे असतात. आपला स्वत:चा रोग दूर करण्याकरिता जर एखादी व्यक्ती महाराजांकडे गेली तर ते महाराज आशिर्वाद, अंगारा देऊन, व्रतवैकल्ये, पुजापाठ सांगुन ‘‘तु चांगला होशील’’ अशी जबरदस्त सुचना देऊन तो रोग दुर करतात. या ५० ते ५५ टक्के आजारांमध्ये कोणत्याही प्रकारच्या औषधांची गरज नसते. मला बाबांनी आशीर्वाद दिला, अंगारा दिला, आता मी निश्चितच बरा होणार असे समजुन ती व्यक्ती त्या महाराजांकडून परत येते. घरातील भांडण असो, परीक्षेत पास होणे, नोकरी लागणे, नोकरीत बढती मिळणे विंâवा अशा अनेक समस्यांतुन बाबांच्या आशिर्वादाने आपली सुटका झालेली आहे असं आपल्याला वाटते. जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण, रोग निवारण, ईश्वराचे दर्शन तसेच पुढील जन्मी स्वर्ग अशा सर्व प्रश्नांची उत्तरे त्या महाराजांकडून मिळत असतात. त्यामुळे आपोआपच त्या महाराजाभोवती त्याचं स्वतःच एक वलय तयार होतं. आपण कोणीतरी एक चमत्कारी व्यक्ती आहोत, आपल्याला देवानं काहीतरी विशेष प्रदान केलेलं आहे, असा आभास निर्माण करुन हे महाराज स्वतःला गुरु म्हणवून घेतात. खरं म्हणजे महाराज भक्तांना सूचना देतात, त्या सूचनांचा प्रभाव सजेस्टीबल व्यक्तीमध्ये फार चांगला होतो. त्यामुळे आपल्या अडीअडचणी विंâवा रोग निवारण्याचं काम त्या महाराजांकडून झालं आहे असं शिष्याला वाटतं. एकदा का त्या महाराजाला आपला गुरु मानुन, गुरु शिष्य नाते निर्माण झाले की मग १०० टक्के सुचना स्विकारल्या जातात. पुढे समाजामध्ये हे महाराज त्या सूचनांचा दुरुप्रयोग करुन स्वतःचा फायदा करवून घेतात. हे महाराज अशारितीने संमोहनच करीत असतात. गेल्या शेकडो वर्षांपासुन भारतात संमोहन अशा प्रकारे चालु आहे.

    वरील सर्व प्रकारांमुळे संमोहनाबद्दल बरेच गैरसमज पसरविले गेलेत. गैरसमजुतीमुळे व संमोहना बद्दलच्या अफवांमुळे संमोहन उपचार करुन घेण्याकरीता कोणीही व्यक्ती लवकर तयार होत नाहीत. संमोहनाबद्दलच्या गैरसमजुती सविस्तरपणे पुस्तकात पुढे नमुद केल्या आहेत.

    संमोहन हे मानवी मनाच्या शक्तीचे, गूढतेचे उकल करुन सांगणारे शास्त्र आहे. जगातील सर्वच पुढारलेल्या देशात मानसिक आजार, व्यक्तीमत्व विकास, क्रिडा, खेळ, कला, ज्ञान, विज्ञान इत्यादी सर्वच क्षेत्रात संमोहनाचा वापर केला जातो.

    डॉ. मेस्मर -

    संमोहनालाच मेस्मेरिझम, हिप्नॉटिझम, ट्रांस, मोहीनीविद्या, वशीकरण विद्या, त्राटक विद्या अशी बरीच नांवे आहेत. डॉ. अ‍ॅटेन मेस्मर हे अठराव्या शतकांत एक प्रसिध्द डॉक्टर होऊन गेलेत. डॉ. मेस्मर हयांचा जन्म ५ मे १७३४ रोजी ऑस्ट्रीयातील इझनांग नावाच्या लहान खेडयात झाला. इसवी सन १७६६ मध्ये त्यांना वैद्यकीय पदवी मिळाली. त्यावेळेस फादर हेल हयांचे लोहचुंबकाच्या सहाय्याने व्याधी निवारण्याचे प्रयोग पाहून डॉ. मेस्मर फारच प्रभावित झाले. त्यांनी लोहचुंबक आणि व्याधी निवारण शास्त्राचा सखोल अभ्यास सुरु केला. त्यांनी असे प्रतिपादन केले कि आपल्या शरीरात एक चुंबकीय तत्व असून आपल्या सभोवतालच्या वातावरणात सुध्दा चुंबकीय तत्व आहे, ज्याला वैश्विक चुंबकीय तत्व हे नांव त्यांनी दिलं. डॉ.मेस्मर ह्यांनी सांगतीले की मनुष्याच्या शरीरातील चुंबकीय तत्व आणि वैश्विक चुंबकीय तत्व ह्यांचं जर असंतुलन झालं तर मनुष्याला शारीरीक व्याधी होतात. डॉ. मेस्मर एक एबोनाईटचा दांडा हातामध्ये घेऊन रुग्णाच्या शरीरावरुन फिरवायचे. त्यांचे म्हणणे असे होते की एबोनाईटचा दांडा शरीरावरुन फिरविल्यामुळे वैश्विक चुंबकीय तत्व आणि रुग्णाचे शारीरीक चुंबकीय तत्व ह्यांचं असंतुलन दुर होऊन समतोल साधल्या जातो आणि त्यामुळे शारीरीक व्याधी दुर होते.

    त्या काळात एका मोठ्या हॉलमध्ये त्यांचे अनेक रुग्ण बसलेले असायचे. मोठमोठी वाद्ये त्या हॉल मध्ये वाजत असायची. वैश्विक चुंबकीय तत्वाने भारलेला एबोनाईटचा दांडा हातामध्ये घेऊन डॉ. मेस्मर नाटकी ढंगाने त्या हॉल मध्ये प्रवेश करुन हा दांडा प्रत्येकाच्या अंगावरुन क्रमाक्रमाने फिरवायचे. दांडा अंगावरुन फिरवला की लोकांना  एक वेगळीच अनुभुती येऊन रुग्ण बरे व्हायचे. ह्यालाच डॉ. मेस्मर यांनी अ‍ॅनिमल मॅग्नेटीझम हे नांव दिले. खरं म्हणजे एबोनाईटचा दांडा अंगावरुन फिरवल्याने चांगले झालेले लोवंâ हे त्यांचा या उपचारावर विश्वास असल्यामुळे चांगले व्हायचे. दुरुस्त झालेले रोगी हे त्या ५५ टक्के मधील असायचे की ज्यांना मानसिक ताणामुळे शारिरीक आजार झालेला आहे. गंभीर स्वरुपाचे, चांगले न होणारे रोगी मात्र आपल्या नशिबालाच दोष देत स्वस्थ बसत असत.

    डॉ. मेस्मर ह्यांच्या ह्या रोग निवारणाच्या प्रयोगाला दिवसेंदिवस खुप गर्दी व्हायला लागली. त्या हॉलमधील गर्दीतुन एबोनाईटचा दांडा फिरवण्याकरीता चालणे सुध्दा डॉ. मेस्मर ह्यांना कठीण होत असे. चालतांना डॉ. मेस्मर ह्यांचा पाय जरी कुणाला लागला तरी तो रोगी चांगला होत असे. ह्यामुळे डॉ. अँटेन मेस्मर ह्यांना असं वाटायला लागलं की ज्या अर्थी हे रोगी माझ्या पदस्पर्शाने सुध्दा चांगले होतात त्या अर्थी ही चुंबकीय शक्ती माझ्या शरीरात सुध्दा असली पाहिजे ज्यामुळे ह्या रोग्यांच्या शरीरामधील चुंबकीय शक्तीचा असमतोलपणा दुर होवून ते बरे होतात. पुढे डॉ. मेस्मर यांनी एबोनाईटचा दांडा पेâवूâन देऊन, स्वत:च्या हस्तस्पर्शाने लोकांचे आजार दुर करावयास सुरवात केली. एकदा डॉ. मेस्मर ह्यांनी फॉलीन ऑस्टर्लिन नावाच्या एका तरुणीच्या शरीराच्या आजारी भागांवर विशेष तयार केलेला लोहचुंबक ठेऊन तिचा फिटचा आजार बरा केला. लोहचुंबकाच्या सहाय्याने रोग बरा करण्याची पध्दत आणि त्यात आलेल्या डॉ. मेस्मर ह्यांच्या यशाची किर्ती हां हां म्हणता संपूर्ण ऑस्ट्रीयात पसरली. १७७५ मध्ये डॉ. मेस्मर ह्यांनी असे विधान केले की लोहचुंबकाचा उपयोग न करता त्यांच्या स्वत:च्या हाताचा विशिष्ट पध्दतीने रोग्याला स्पर्श होताच रोग बरा होतो. आपल्या स्वत:च्या हातातुन स्त्रवणाNया ह्या शक्तीला त्यांनी अ‍ॅनिमल मॅग्नेटिझम असे नांव दिले. लोकांच्या झुंडीच्या झुंडी डॉ. मेस्मर ह्यांच्याकडे येऊ लागल्या. डॉ. मेस्मर ह्यांची किर्ती हां हां म्हणता संपूर्ण ऑस्ट्रियात पसरली.

    कु. मेरी पॅरॅडिस नावाची पियानो वाजविणारी मुलगी वयाच्या चवथ्या वर्षापासून आंधळी होती. मेरीचे वडील ऑस्ट्रियाच्या राणीकडे सचिव होते. मुलीच्या आंधळेपणामुळे तिच्या पालन पोषणाकरीता ऑस्ट्रियाच्या राणीकडून तिच्या वडीलांना विशेष मानधन मिळत असे. ह्या मुलीला डॉ. मेस्मर ह्यांनी अ‍ॅनिमल मॅग्नेटिझमच्या सहाय्याने दृष्टी प्रदान केली. वैज्ञानिक परिभाषेत सांगायचे म्हणजे तिला हिस्टेरिकल आंधळेपणा होता. डॉ. मेस्मर ह्यांनी तो दुर केला. मेरी चांगली झाल्यावर तिच्या वडीलांनी तिला घरी आणले. मुलीला दिसू लागल्यामुळे त्यांच्या मुलीकरीता मिळणारे विशेष मानधन बंद झाले. घरातील असंतोषाच्या वातावरणामुळे आणि मानधन बंद झाल्यामुळे तिच्यावर परत मानसिक दडपण आले, ती पुन्हा आंधळी बनली.

    समव्यवसायी बंधूनी डॉ. मेस्मर ह्यांच्या विरोधात टिकेचे वादळ उठविले. वैद्यकिय व्यावसायिकांनी सरकारवर दबाव आणून डॉ. मेस्मर ह्यांच्या ह्या व्याधी निवारण्याच्या अ‍ॅनिमल मॅग्नेटिझमवर एक चौकशी समिती गठीत केली. ह्या चौकशी समितीतील डॉक्टरांनी असा अहवाल दिला की डॉ. मेस्मर ह्यांच्या ह्या प्रयोगातून रोगमुक्ती मिळत नाही, डॉ. मेस्मर हा फसवेगिरी करतो. ह्यामुळे सरकारतर्पेâ डॉ. मेस्मर ह्यांची ऑस्ट्रीयातुन हकालपट्टी झाली. मुलीला दृष्टी आल्यामुळे डॉ. मेस्मर यांना जेवढी ख्याती मिळाली तेवढीच टिका नंतर पुन्हा आंधळेपणा आल्यामुळे त्यांच्यावर झाली. या मानहानीमुळे डॉ. मेस्मर व्हिएन्ना  सोडून १७७८ साली पॅरिसमध्ये स्थायिक झाले.

    पॅरिस शहरातही डॉ. मेस्मर यांनी अफाट संपत्ती आणि लोकप्रियता मिळविली. डॉ. मेस्मर यांनी त्यांच्या स्वत:च्या शरीरातच चुंबकशक्ती असून फक्त हस्तस्पर्शाने (विंâवा लोहचुंबकाने) ते रोग निवारण करतात असे विधान कायम ठेवले आणि फक्त हस्तस्पर्शाने रोग निवारण सुरु ठेवले. सन १७७९ मध्ये  त्यांनी या विषयावर अ‍ॅनिमल मॅग्नेटिझम ह्या नावाने पुस्तक प्रसिध्द केले. पॅरिसमध्येही प्रâान्सचा राजा सोळावा लुई याने सरकारतर्पेâ मेस्मेरिझमवर चौकशी समिती नेमली. या समितीचा निर्णयही डॉ. मेस्मर विरोधातच गेला. डॉ. मेस्मर निराश अवस्थेत पॅरिस सोडून स्वित्झर्लंड मधील मिस्बर्ग या गावी स्थायीक झाले. तेथेच ५ मार्च १७८५ रोजी वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी त्यांचा मृत्यु झाला.

    डॉ. मेस्मर यांनी आपल्या आयुष्यात औषधपाणी न देता हस्तस्पर्शाने विंâवा लोहचुंबकाच्या स्पर्शाने हजारो लोकांना रोगमुक्त केले. अफाट लोकप्रियता आणि प्रचंड संपत्ती जमा करीत संपूर्ण युरोपमध्ये खळबळ माजविली. मेस्मेरिझमला इतका प्रचंड विरोध होऊन सुध्दा डॉ. मेस्मर यांनी व्याधी निवारण्याचे काम करुन आपले संशोधन सुरुच ठेवले होते. विरोध होऊन सुध्दा डॉ. मेस्मर यांना मेस्मेरीझम ह्या विषयात अभूतपूर्व यशही मिळाले होते.

    डॉ. मेस्मर यांचा शिष्य मार्वâविस द प्युसीगर यांनी मेस्मेरिझमवर बरेच प्रयोग करुन मेस्मेरिझमचा प्रचार व प्रसार करुन वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अनुषंगाने मेस्मेरिझममध्ये  क्रांतीकारक बदल केलेत. एव्हाना मेस्मेरिझम अमेरिकेसह सर्व पाश्चिमात्य देशात प्रसिध्द पावले होते.

    चेतन निद्रा (ल्युसीड स्लीप)

    डॉ. मेस्मर यांच्या काळात अ‍ॅबे पेâरिया नावाचे खिश्चन धर्म प्रसारक गोव्यात अ‍ॅनिमल मॅग्नेटिझमच्या सहाय्याने रोग निवारण्याचे काम करीत होते. अ‍ॅबे पेâरिया यांचा जन्म गोव्यातील कांदोली या गावी १७५६ साली झाला. या खिश्चन धर्म प्रसारकाने अ‍ॅनिमल मॅग्नेटिझमचे प्रयोग रोग निवारण्याकरीता करुन हजारो लोकांना लोहचुंबकाच्या स्पर्शाने रोगमुक्त केले. पुढे त्यांनी लोहचुंबकाचा प्रयोग टाळून शरीर शिथील करणे, गुंगी आणणे, सूचना देणे या माध्यमातुन रोग बरे करण्यास सुरुवात केली. डॉक्टर आणि रोगी यांच्यातील संबंधावर त्यांनी विशेष भर दिला. अ‍ॅनिमल मॅग्नेटिझमला त्यांनी चेतन निद्रा (ल्युसीड स्लीप) असे नांव दिले. हिप्नॉटिझमच्या पुढील संशोधनाकरीता अ‍ॅबेपेâरिया यांच्या चेतन निद्रा या उपचाराच्या प्रकाराचा बराच उपयोग झाला. अ‍ॅबेपेâरियांचा भव्य पुतळा सध्या गोव्यात पणजी येथे सचिवालयासमोर आहे. एका स्त्रीवर अ‍ॅबेपेâरिया आपल्या हस्तस्पर्शाव्दारे संमोहन करीत आहेत अशा अर्थाचा तो पुतळा आहे.

    मेस्मेरिझम या शास्त्राचे सुरुवातीचे नांव अ‍ॅनिमल मॅग्नेटिझम असे डॉ. मेस्मर यांनीच ठेवले होते. डॉ. मेस्मर यांच्या शिष्यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मेस्मेरिझम हे नांव या शास्त्राला दिले. पुढे मेस्मेरिझम हेच नांव प्रचलित झाले. जनसामान्यात अजुनही मेस्मेरिझम हे नांव वापरले जाते. मेस्मेरिझम म्हणजे काहीतरी गुढ असा समज आजही लोकांमध्ये आढळतो.

    हिप्नॉस (निद्रा देवता )

    डॉ. जेम्स ब्रेड या नामांकित सर्जनने मेस्मेरिझमवर बराच अभ्यास आणि संशोधन केले. त्यांचा जन्म  स्कॉटलंडमध्ये १७९५ साली झाला. १८४१ मध्ये डॉ. जेम्स ब्रेड यांनी मँचेस्टर येथे डॉ. चाल्र्सला फॉन्टन यांचे मेस्मेरिझमचे प्रयोग पाहिले. मेस्मेराईज्ड झालेल्या व्यक्तींच्या बधीर केलेल्या अवयवांवर सुया खुपसून स्वत: पाहिल्या. त्या व्यक्तींना जेंव्हा अजिबात वेदना झाल्या नाहीत तेंव्हा ते चकीत झाले. त्यांनी मेस्मेरिझमवर अभ्यास आणि संशोधन करुन शेकडो लोकांवर स्वत: शास्त्रीय प्रयोग केलेत. डॉ. ब्रेड यांनी १८४३ साली ‘न्युरोप्नॉलॉजी ऑफ दी रॅशनल ऑफ स्लीप वंâसिडर्ड इन रिलेशन विथ अ‍ॅनिमल मॅग्नेटिझम’ हे पुस्तक प्रकाशित केले. डॉ. जेम्स ब्रेड यांच्या मते मेस्मेरिझम म्हणजे एक कृत्रिम निद्रा होय. डॉ. जेम्स ब्रेड यांनी १८४३ साली मेस्मेरिझम हे नांव बदलुन या शास्त्राला ‘हिप्नॉटिझम’ हे नांव ठेवले. ग्रीस मध्ये हिप्नॉस या नावांचा झोपेचा अधिपती देव आहे. त्यांच्या नांवावरुन त्यांनी मेस्मेरिझमला हिप्नॉटिझम हे नांव दिले. हिप्नॉस या शब्दावरुन हिप्नॉसिस हा इंग्रजी शब्द बनलेला आहे. हिप्नॉसिस याचा अर्थ एक प्रकारची कृत्रिम निद्रा. अ‍ॅबे पेâरिया यांच्या संशोधनाप्रमाणेच डॉ. जेम्स ब्रेड यांनी सुध्दा बरेच संशोधन केले. कोणत्याही एका वस्तुवर नजर  स्थिर करुन संमोहन करता येते हा सिध्दांत त्यांनी मांडला. डॉ. जेम्स ब्रेड यांचा मृत्यु १८६० साली झाला.

    डॉ. सिग्मंड प्रâाईड संमोहनाचे पहिले विद्यार्थी होते. डॉ. लिबाल्ट, डॉ. ऑगस्ट फॉरेल, डॉ. शारको, डॉ. जानेट, डॉ. जोसेफ ब्रुअर इत्यादींनी संमोहनावर नवनवे संशोधन आणि प्रयोग करुन या शास्त्रामध्ये बरीच भर टाकली.

    १८६० साली डॉ. लिबाल्ट यांनी प्रâान्स येथील नॅन्सी येथे, प्रोपेâसर शारको (इ.१८२५ ते १८९३) यांनी पॅरिस येथे हिप्नॉटिझमसाठी विशेष कार्यशाळा स्थापन करुन शेकडो लोकांवर संमोहन उपचार केलेत. डॉ. शारको यांनी पॅरिस येथील सॅल

    पॅट्रीयेर हॉस्पीटल मध्ये मज्जाशास्त्रज्ञ म्हणून काम करीत असतांना संमोहनाच्या तीन अवस्था असतात असा सिध्दांत मांडून प्रथम, मध्यम, आणि प्रगाढ निद्रावस्था अशा तीन भागात संमोहन अवस्थेची विभागणी केली.

    मानसशास्त्राचे पितामह डॉ. सिग्मंड प्रâाईड यांनी शारको यांच्या सॅल पॅट्रीयेर हॉस्पीटलमध्ये बराच अनुभव घेतला. तसेच नॅन्सी स्कुल ऑफ हिप्नॉटिझम या संमोहन शिकविणाNया संस्थेचे डॉ. लिबाल्ट आणि डॉ. बर्नहाईम यांचेकडे संमोहनाचे प्रशिक्षण घेतले. डॉ. प्रâाईड (१८५६-१९४९) डॉ. ब्रुएर, डॉ. एडलर, डॉ. युग या नामवंत मानसशास्त्रज्ञांनी संमोहनावर बरेच संशोधन करुन या शास्त्राचा विकास केला.

    स्वयंसूचना -

    स्वयंसूचनेची खरी ओळख एमिल कुएं यांनी जगाला करुन दिली. त्यांना स्वयंसूचनेचे भिष्मपितामह मानले जाते. इ.स.१९१० साली प्रâान्समध्ये एमिल वूâए यांनी स्वयंसूचना तंत्राने रोग निवारण्याचे काम सुरु केले. एमिल कुएं हे डॉक्टर विंâवा मानसशास्त्रज्ञ नव्हते. परंतु त्यांनी स्वयंसूचनेच्या पध्दतीवर अथक संशोधन करुन, मानव जातीला उपचाराचे एक नवीन दालन उघडे करुन दिले. ठदर दिवशी प्रत्येक बाबतीत माझ्या जीवनात सुधारणा घडून येत जाईल आणि मी अधिकाधिक चांगला होत जाईल. (Eन्ीब् ्aब् ग्ह ान्ीब् ैaब् घ् aस् ांम्दस्ग्र्हु ाूूंी  ाूूंी)ठ  हे एमिल कुएंचे वाक्य एखाद्या मंत्रासारखे वापरुन लक्षावधी स्त्री पुरुषांना आनंदी जीवन जगण्याची एक नवीन दिशा मिळाली. जीवनात निराशा विंâवा चिंता वाटणाNया स्त्री, पुरुषांना एमिल कुएंचे हे वाक्य अमृतासारखे वाटायचे, त्यामुळे लोकांना जणु काही पुनरुज्जीवन मिळाले. त्या काळातील डॉक्टर मंडळींना एमिल कुएंच यश न पहावल्या गेल्यामुळे त्यांनी त्यांचा भरपूर अपप्रचार केला. एमिल कुए यांच्या ‘‘प्रॅक्टीस ऑफ ऑटो सजेशन्स’’ या पुस्तकाच्या एक लाखाच्यावर प्रती एक दोन महिन्यात विकल्या गेल्यात. पुढे त्यांनी ‘‘माय मेथड’’ ‘‘सेल्फ मास्टरी’’ ही पुस्तके लिहीलीत आणि ती सुध्दा खुप गाजली.

    डॉ. विलीयम ब्राऊन यांनी स्वयंसूचनेवर लिहीलेले ‘‘ सजेशन्स अ‍ॅन्ड मेंटल अ‍ॅनालिसीस’’ हे पुस्तक बरेच लोकप्रिय झाले. जगातील सर्वच प्रगत देशात स्वयंसूचनेचा, आणि संमोहनाचा वापर करुन हजारो लोक आपले दैनंदिन जीवन सुखी आणि आनंदी करुन अंतर्मनाची शक्ती विकसित करीत आहेत. इंग्लंडमध्ये इ. स. १९४८ साली ‘‘ब्रिटीश सोसायटी ऑफ मेडिकल हिप्नॉटिस्ट’’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. इ. स. १९७३ साली अमेरिकेत फिलाडेल्फीया येथे इंटरनॅशनल सोसायटी ऑफ हिप्नॉटिस्ट या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतात सुध्दा मुंबई, अहमदाबाद आणि हैद्राबाद येथे हिप्नॉटिझमचे संशोधन आणि अभ्यास करण्याकरीता संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत.

    संमोहनाची व्याख्या

    शरीर आणि मन शिथील करुन सूचना ग्रहण करण्याची क्षमता वाढविणे म्हणजेच संमोहन होय. संमोहनामध्ये बाह्यमनाला बाजुला सारुन अंतर्मनाशी संवाद साधता येतो. सुप्रसिध्द मानसशास्त्रज्ञ डॉ. सिग्मंड प्रâाईड यांनी संमोहनाची व्याख्या पुढील प्रमाणे दिलेली आहे. ‘‘अंतर्मनाच्या सहाय्याने एक विंâवा अधिक कल्पनांवर लक्ष वेंâद्रीत करुन त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे म्हणजेच संमोहन होय’’

    संपुर्ण शरीर आणि बाह्यमन शिथील करुन सुचना ग्रहण करण्याची अंतर्मनाची क्षमता वाढविणे ह्याला संमोहन असे म्हणतात.

    बाह्यमन (काँशस माइंड) ताबडतोब सुचना स्विकारीत नाही. बाह्यमनाला सर्व गोष्टींची जाणीव असून सुध्दा एखादी गोष्ट अंतर्मनात पक्की जाऊन बसली की त्याचा परिणाम व्यक्तिच्या स्वभावावर तसेच त्यांच्या वागणुकीवर दिसतो. उदा-बाह्यमनाला हे माहीत आहे की सिगारेटच्या व्यसनामुळे शरीरावर, विशेषत: पुâफ्पुâसावर दुष्परिणाम होतात. आपण जर त्या व्यक्तिला सांगीतले की, सिगारेट पिऊ नकोस, सिगारेटचं व्यसन घातक आहे’’ तर तो माणूस म्हणेल ‘‘ ह्यात तुम्ही काय नवीन सांगता आहात? हे मला माहीत आहे !’’ त्यामुळे त्याच्या बाह्यमनाला सुचना देऊन सिगारेटचं व्यसन सुटत नाही. ही सुचना जर त्यांच्या अंतर्मनाला वारंवार दिली तर त्याचं सिगारेटचं व्यसन दिवसेंदिवस कमीकमी होत जाऊन नंतर सुटतं. संमोहनामध्ये हेच घडतं. संमोहनाच्या प्रक्रियेत बाह्यमन बाजुला सारलं जाऊन थेट अंतर्मनाशी संवाद साधता येतो.

    अंतर्मनाची सुचना ग्रहण करण्याची क्षमता खूप अधिक असते. अंतर्मन बाह्यमनावर कसा प्रभाव पाडतं हे खालील उदाहरणावरुन स्पष्ट होईल-

    रात्री झोपण्याच्या वेळेस आपल्या जागृत मनाने अंतर्मनाला ‘‘उद्या सकाळी मला ५ वाजता जाग येईल’’अशी सुचना वारंवार दिली तर अंतर्मन ती सुचना स्विकारतं आणि सकाळी ५ वाजता अंतर्मन आपल्या बाह्यमनाला जागं करतं. कदाचित सुरुवातीला ५:१५ विंâवा ४:४५ वाजता जाग येईल पण नंतर सवयीनुसार ५ वाजताच जाग येईल. अतिमहत्वाच्या कामानिमित्य सकाळी उठून ६ वाजताची रेल्वे पकडायची असल्यास आपल्याला ५ वाजताच जाग येते हा प्रत्येकाचा अनुभव आहे. अंतर्मन झोपत नाही, अंतर्मन दिलेल्या सुचनेनुरुप तंतोतंत काम करतं हे वरील उदाहरणावरुन स्पष्ट होईल. प्रत्येकाचेच मन कमी अधिक प्रमाणात वातावरणातील सुचना ग्रहण करतं हे वरील उदाहरणावरुन स्पष्ट होतं. आपले बाह्यमन वातावरणातील सुचना ग्रहण करुन त्या अंतर्मनात टाकत असते. अंतर्मन हे जमा झालेल्या माहीतीच्या आधारे काम कसे करावे हे बाह्य मनाला सांगत असतं.

    सूचनेचा प्रभाव :- तीन चार मित्रांनी मिळून त्यांच्या एका मित्राला आजारी बनवायचे ठरवलं तर तो खरोखरच आजारी कसा पडू शकतो हे खालील प्रयोग केल्यास नीट समजू शकेल. ज्याला आजारी बनवायचे आहे त्याचं नाव समजा  ‘राजू’ आहे. पहिल्या मित्राला ‘अनिल’ ला ‘राजू’ भेटला असता अनिलने राजूला म्हणायचे ‘‘कारे ! तुझा चेहरा उतरलेला दिसतो आहे, काही झाले आहे काय?’ राजुला काहीच झाले नसल्यामुळे तो ‘नाही’ असे उत्तर देऊन पुढे जायला लागेल. परंतु अनिल चा प्रश्न मात्र त्याच्या अंतर्मनात कुठेतरी जाऊन पोहचलेला असेल. नंतर ‘बबनला’’ जेंव्हा ‘राजू’ भेटेल तेंव्हा बबनने म्हणायचे ‘कारे ! तु आजारी दिसतो आहे. तब्येत ठीक आहे ना?’ पुन्हा राजू अर्थातच ‘नाही’ असे उत्तर देईल. पण तो प्रश्न देखील राजू च्या अंतर्मनात गेलेला असेल. पुढे गेल्यावर ‘‘कृष्णा’’ ने सुध्दा ‘राजू’  ला वरील प्रमाणे प्रश्न विचारावा. त्यालाही अर्थातच राजू ‘नाही’ असे उत्तर देईल. पण राजुच्या मनाला मात्र असे वाटेल की आपण नक्कीच आजारी असल्यामुळे मला सर्व असे विचारत आहेत. या गोष्टीवर ‘राजू’ विचार करावयास लागतो. पुढे गेल्यानंतर ‘दिलीप’ ने सुध्दा राजूला वरिल प्रमाणे असाच प्रश्न तब्येती विषयी विचारायचा, आता मात्र ‘राजू’ ची नक्कीच खात्री होते की आपण आजारी असल्यामुळे आपल्याला सर्व मित्र असे म्हणत आहेत. तो सरळ घरी जाऊन मी आजारी आहे असे समजून झोपून जाईल आणि खरोखरच आजारी पडेल. राजुच्या अंतर्मनात अश्या सुचना वारंवार गेल्यामुळे आपण आजारी आहोत असा पक्का विश्वास राजूला होतो आणि त्याचं अंतर्मन बाह्यमनाला घरी जाऊन झोपण्यास सांगतं. ह्याचाच अर्थ असा की थेट अंतर्मनाला वारंवार सुचना देऊन स्वभावामध्ये, वागण्यामध्ये तसेच संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवून आणता येतात. संमोहन अवस्थेत अंतर्मनाशी संवाद साधल्यामुळे आणि अंतर्मनाची सुचना ग्रहण करण्याची क्षमता जास्त असल्यामुळे संमोहनतज्ञाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत आणि ताबडतोब पालन केल्या जाते. संमोहनाची अवस्था म्हणजे जागृत विंâवा नैसर्गिक झोपेची अवस्था सोडून तिसरीच अवस्था आहे की ज्यामध्ये अंतर्मन पुर्णपणे सक्रिय होऊन शरिराचा ताबा घेऊन कार्य करावयाला लागतं.

    वरील उदाहरणात सर्व मित्रांनी राजूच्या बाह्यमनाला ‘तु आजारी आहेस’ अशा सुचना वारंवार दिल्या. बाह्यमनातुन त्या सूचना अंतर्मनात पोहोचल्यावर राजूला वाटायला लागलं की खरंच आपण आजारी आहोत. जागृत अवस्थेत बाह्यमनाशी संवाद साधला जातो आणि सुचना वारंवार द्याव्या लागतात. संमोहन अवस्थेत अंतर्मनाशी संवाद साधल्या जाऊन थेट अंतर्मनाला सूचना दिल्यामुळे वारंवार सूचना देण्याची गरज पडत नाही, एक विंâवा दोन सूचना सुध्दा प्रभावी होतात.

    माणसाचे अंतर्मन हे बाह्यमनापेक्षा नऊपट मोठे असते. अंतर्मनामध्ये अनेक वर्षांच्या जुन्या भावना, विचार, वागण्याची पध्दत इत्यादी सर्व साठवल्या गेलेले असते. संमोहनामध्ये अंतर्मनाशी संवाद साधुन अंतर्मनामध्ये असलेल्या प्रचंड ताकदीचा उपयोग करुन घेता येऊ शकतो. आपण आपल्यामध्ये असलेल्या शारिरीक आणि मानसिक क्षमतेपैकी फक्त १० टक्के वापरत असतो. उरलेली ९० टक्के क्षमता ही अंतर्मनाची असते. तिचा उपयोग आपण नेहमी करत नाही. अंतर्मनातील ९० टक्के क्षमतेचा उपयोग कसा करुन घ्यावा, ती कशी वापरावी हे संमोहनात शिकता येतं. बाह्यमनाची १० टक्के क्षमता आणि अंतर्मनाची ९० टक्के क्षमता अशा आपल्यामध्ये असलेल्या १०० टक्के ताकदीचा उपयोग

    Enjoying the preview?
    Page 1 of 1