Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

यमुना: संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना
यमुना: संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना
यमुना: संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना
Ebook439 pages3 hours

यमुना: संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

शब्दांचे सामर्थ्य अधोरेखित करणाऱ्या संतसूर्य संताजीच्या पत्नी 'यमुना' यांच्या जीवनचरित्रावरील जगातील पहिलीच कादंबरी


संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना


‘यमुना’ ही संताजीची पत्नी. मात्र कुठल्याही अभ्यासात, इतिहासात, प्रवचनात पुराणात किंवा तंत्रसाधनात साहित्यिकांनी तिची नावापुरतीच नोंद घेतली दिसते आहे. मात्र मी ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ कादंबरी लिहितांना ही यमुना माझ्या डोळ्यासमोर तरळत होती. समाजासाठी ही कारूण्यमूर्ती आहे. ती साहित्यात यावी ही इच्छा, मलाही साहित्याप्रति आस्था असल्याने व यमुनेच्या माध्यमातून नवा विषय व एक नावीन्यपूर्ण कल्पक प्रयोग करण्याचा प्रयत्न.... ‘यमुना’ ही कादंबरी म्हणजेच समाजाला मिळणारा ऐतिहासिक वारसा होय. यमुना जशी मला दिसायची, मनात तिचे पात्रं जसे रूंजन घालायचे, अस्वस्थ करायचे, तसेच केलेले हे शब्दांकण होय. निश्चितच ही यमुना सर्वांना आवडेल ...

Languageहिन्दी
PublisherPencil
Release dateJul 15, 2021
ISBN9789354583438
यमुना: संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना

Related to यमुना

Related ebooks

Reviews for यमुना

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    यमुना - संजय वि. येरणे

    यमुना

    संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना

    BY

    संजय वि. येरणे


    pencil-logo

    ISBN 9789354583438

    © संजय वि. येरणे 2021

    Published in India 2021 by Pencil

    A brand of

    One Point Six Technologies Pvt. Ltd.

    123, Building J2, Shram Seva Premises,

    Wadala Truck Terminal, Wadala (E)

    Mumbai 400037, Maharashtra, INDIA

    E connect@thepencilapp.com

    W www.thepencilapp.com

    All rights reserved worldwide

    No part of this publication may be reproduced, stored in or introduced into a retrieval system, or transmitted, in any form, or by any means (electronic, mechanical, photocopying, recording or otherwise), without the prior written permission of the Publisher. Any person who commits an unauthorized act in relation to this publication can be liable to criminal prosecution and civil claims for damages.

    DISCLAIMER: The opinions expressed in this book are those of the authors and do not purport to reflect the views of the Publisher.

    Author biography

    : संजय येरणे यांचा साहित्यविषयक परिचय :

    नाव: संजय विस्तारी येरणे.

    पत्ता: ‘येणू भिकाजी’ सदन, वार्ड नं. 6, शिवाजी चैक,

    मु. पो. तह. नागभीड. जि. चंद्रपूर. पिन 441205,

    संपर्क - 9404121098.

    शिक्षण: एम. ए. (मराठी, समाज, डॉ. आंबेडकर थॉटस्) डी. एड, डी. एस. एम.

    जन्म:  19 नोव्हेंबर 1976

    व्यवसाय : प्राथमिक शिक्षक, नागभीड. जि. चंद्रपूर

    साहित्यविशेष कार्य:

    1) लेखक, कथाकार, कादंबरीकार, कवी, संपादक, प्रकाशक, प्रवक्ते.

    2) अनेक वाड्.मयीन नियतकालिकांतून, वृत्तपत्रातून लेख, कथा, कविता, ललित लेखन, स्फुट लेखन प्रसिद्ध.

    3) संस्थापक-अध्यक्ष: भरारी साहित्य शिक्षण कला सेवा संस्था.

    4) ‘मी संताजी बोलतोय’ व ‘संताजीची सावली यमुना’ या एकपात्री प्रयोगाचे लेखन व आयोजन, सादरीकरण.

    5) भरारी साहित्य संघ, ज. तु. साहित्य परिषद चंद्रपूर, अंकुर साहित्य संघ जिल्हासचिव चंद्रपूर, विदर्भ साहित्य संघ शाखा नागभीड द्वारा साहित्य कार्य व अनेक संस्था व संघटनांचा पदाधिकारी. समाजसेवा, बहुजन चळवळीचे कार्य, साहित्यसंमेलन आयोजन, कवीसंमेलन आयोजन, नवोदितांना साहित्य मार्गदर्शन, शैक्षणिक चळवळ व संघटनात्मक कार्य, अनेक संमेलनात कविता वाचन, कथा सादरीकरण, शैक्षणिक मार्गदर्शन व प्रबोधन.

    6) विद्यार्थ्याकरिता प्रयोगात्मक ‘इंग्रजी रिडींग पॅटर्न’ ची निर्मिती व पुस्तक रूपाने प्रकाशन करून अनेक शाळात इंग्रजी कमी वेळात व कमी श्रमात वाचता येणे याविषयी प्रात्यक्षिक सादर व व्याख्यान मार्गदर्शन करणे.

    7) विविध विषयावर व्याख्याता म्हणून सादरीकरण. संताजी जगनाडे महाराजांच्या जीवनचरित्राचे अभ्यासक, प्रवक्ते.

    Contents

    ‘यमुना’ एका कारूण्यमूर्तीचा सुपरिमल

    Epigraph

    अर्पण

    आपल्या पतीच्या पाठीशी,

    खंबीरपणे उभे राहात

    सावली बनून जगणाऱ्या

    समस्त भारतीय स्त्रीयांना,

    अशा ‘यमुनांना...’

    आणि

    संताजी जगनाडे महाराज यांची

    अस्सल विचारधारा स्वीकारत

    कार्य करणाऱ्या सर्व मानवांना...

    - विठ्ठलाचरणी -

    ।। जय संताजी, जय यमुना ।।

    Preface

    माझी मनभूमिका

    ‘यमुना’ संत संताजी जगनाडे महाराजांची पत्नी, एवढीच आणि फक्त हीच ओळख. मात्र अजूनही समाजातील स्त्रियांनाच नव्हे तर पुरूषांनाही ‘यमुना’ हे नावही ठावूक नाही ही शोकांतिकाच.

    आपल्या वारकरी संप्रदायात, भागवतधर्मात भक्ती, अभंग तथा विद्वतेनं संतपद मिळविणारे जगदगुरू संताजी जगनाडे महाराज हे चरित्र आता रूढ झाले. पण संताजी विषयीची आस्था व प्रेरणापुरूष म्हणून जी जाणीव हवी होती ती तोकडीच वाटते. संतांना जातीप्रथेत बांधल्या गेल्यानेही संताजी मराठी भाषिकांपुरतेच सिमित राहिलेत असेही निदर्शनास आले. मात्र तुकारामांचे सहलेखक म्हणून असलेली तोंडओळख यापलीकडेही संताजी हे युगपुरूष होते. मानवतेच्या कल्याणासाठी झिजणारे मार्गस्थ होते. हे लक्षात घ्यायला आता वेळ लागणार नाही. संताजीवरील उपलब्ध साहित्य हे मोजकेच व अल्पपृष्ठांचे. यातूनच संताजी जगनाडे यांचं विस्तृत चरित्र कादंबरीत बांधून ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ ही कादंबरी मी पूर्ण केली त्याला वर्ष लोटलं. कादंबरी खूप गाजली, तेवढीच प्रसिद्धीस पावली मात्र संताजी घरोघरी पूजला जावा, पुस्तकरूपाने तो घरी देव्हाऱ्यात यावा ही दुर्दम्य इच्छा अपुरीच ठरली. त्याला कारणही तसंच, समाजात वाचनाची आवड नाही किंवा पुस्तक विकत घेण्याची अनास्था, दुसरे कारण समाज फक्त राजकीय दृष्ट्या प्रलोभन बघणारा...

    आपला संत आपणच आकाशाएवढा करायला हवा. पण भारतीयांचे मने व्यापणारा संत आमच्या मनमेंदूत छोटा राहू नये ही खंत...

    ‘यमुना’ ही संताजीची पत्नी. मात्र कुठल्याही अभ्यासात, इतिहासात, प्रवचनात पुराणात किंवा तंत्रसाधनात साहित्यिकांनी तिची नावापुरतीच नोंद घेतली दिसते आहे. मात्र मी ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ कादंबरी लिहितांना ही यमुना माझ्या डोळ्यासमोर तरळत होती. समाजासाठी ही कारूण्यमूर्ती आहे. ती साहित्यात यावी ही इच्छा, मलाही साहित्याप्रति आस्था असल्याने व यमुनेच्या माध्यमातून नवा विषय व एक नावीन्यपूर्ण कल्पक प्रयोग करण्याचा मार्ग मिळाल्याने मी यमुनेविषयी विचार करू लागलो.

    संताजी सारखा संतसूर्य तथा क्रांतीसूर्य, तेजस्वी युगपुरूषाची ‘यमुना’ त्यांचेसोबत आजीवन सहवास करतांना, ती तिच्या आयुष्यातील क्षण कशी जगली असेल याचाही विचार यायचा.

    गौतमाची यशोधरा, शहाजीची जिजाऊ, महात्मा फुल्यांची सावित्री, बाबासाहेबांची रमाई याप्रमाणेच संताजीची यमुना साहित्यात यावी असंच वाटायचं. यमुना एकसंताजीच्या महत्तम कार्याची भागीदार होती. पण तिचं जीवन अंधारागत राहिलं. प्रत्येक पुरूषाला घडवण्यात एका स्त्रिचा हात असतो. संताजीच्याही आयुष्यातील हा वाटा यमुने प्रति अगदी आदराचा होता तेवढाच समाजाप्रति वंदनीय आहे असे मनोमन वाटते.

    संताजी महाराजांच्या जन्मापासून ते मरणापर्यंत संताजीचे कर्तृत्व खडानखडा वाढत असतांना यमुना प्रत्येक जीवनप्रसंगात्मक घटनेची साक्षीदार होती. एवढंच नव्हे तर संताजी आणि यमुनेचं रूपही एकच होतं. यमुनेचं संताजीप्रति झिजणं, सोसणं, विरहात्मक जगणं, कुटुंबियाप्रति आदराचं वागणं, गावातलं अगदी प्रमुखतेचं स्थान, माणुसकी तत्त्वाला निपजणं, रयतेच्या कल्याणासाठी चक्रेश्वराला साखळं घालणं, सारं काही जगणं तिचं आम्हाला दिसायला हवं होतं. पण कुण्याही साहित्यिकांच्या ते लक्षात आलं नाही. संताजीच्या विचारांचा प्रसार वृक्षाच्या डेरेदार फांद्यागत बहरला परंतु त्यामागे उभ्या असलेल्या यमुनेच्या वैचारिकतेचा प्रसार मात्र अजूनही खुंटलेलाच राहिला. एकंदरीत ‘यमुना’ हे दुर्लक्षित, उपेक्षित असं पात्रं. कुटुंबाला, समाजाला आणि संताजीलाही प्राणपणानं जपणारी यमुना आम्हाला दिसू नये हीच शोकांतिका दूर सारण्यास्तव आणि अगदी संताजीच्या बगलेलाच आता तिचं तैलचित्र लावून तिला पूजण्यास्तव, तिची आदर्श प्रेरणा या जगातील सर्व स्त्रियांना मिळण्यास्तव हे यमुनेचं प्रकटण आहे.

    यमुनेप्रति मी कित्येक दिवस-रात्र लेखनात्मक विचार करीत अस्वस्थ होवून जगलोय. जणू यमुनामाता मला साद घालित होती. ‘मला संताजीच्या विचारपीठावर साहित्यात स्थान दे!’ अशीच म्हणत राहिली.

    ‘यमुना’ आठवतांना माझे डोळे पाणावले जायचे. संताजीबद्दल असलेला आदर तेवढाच यमुनेप्रति एक मुलगी, माता, आई आणि संताजीची पत्नी या रूपाने डोळ्यासमोर तरळत राहिली. मी अनेक प्रश्नात गुंतत यमुनेला या बंदिस्त संतकालखंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे.

    ‘यमुना’ लिहितांना, ‘कहाणे घराण्यातील खेड येथील यमुना वयाच्या सातव्या वर्षी सदुंबरेत संताजीसोबत लग्न होवून आली.’ एवढीच ती नोंद मी बघितली होती. तिच्याबाबत शोधूनही काही संदर्भ मिळेना. तिचं जन्मापासून ते अखेरपर्यंत जगणं, वागणं, राहणं सारं काही रितंच होतं. एवढंच काय तर घराण्यातील व्यक्तीचे नावे, पात्र, बहीण, भावंडे, नातलग याबाबतही काहीच नाही. तिचं संताजीसवे विठ्ठल-रूक्मिणी  सारखं जगणं... फक्त विरहाचं असावं हाच कयास होता. एवढेच इमले रचता येत होते. यमुना संताजीच्या अखेरपर्यंत होती काय? नंतर ती कशी जगली? कुठं जगली? मुलाबाळाचं काय झालं? संताजीच्या गाथेचं काय झालं? तिचा अंत कुठे नि कसाझाला? एक ना अनेक भंडावून सोडणारे प्रश्न...

    तुकाराम महाराजापेक्षाही जास्त वर्षे आयुष्य जगून सदोदीत या मनुवाद्याशी झुंज देत अभंग निर्मिती करणारा संत संताजी निश्चितच जगद्गुरू म्हणून प्रसिद्ध व्हायला हवा होता. एवढंच नव्हे तर ते संत शिरोमणी होते, तुकारामांचे साहित्य त्यांनी जीवापाड जपले. ते आजही अभंगरचनेच्या रूपाने का असेना आपणास प्राप्त झाले आहेत. गाथेच्या रूपाने ते प्रकाशित आहेत. मात्र संताजीनेही अनेक गावोगाव प्रबोधन-कीर्तन केले. शिवाजी, संभाजी राजे अशा झुंझार छत्रपती वीरांची त्यांना साथ लाभली. त्यामुळेच ते फार फार उंच स्थानी कीर्तीवंत झालेत. मात्र हे मनुवाद्यांना खटकले आणि त्या लोकांनी त्यांना संपविले तसेच संताजीच्या मृत्यूनंतर त्यांचं अफाट साहित्य अभंग, नाव, कीर्ती सारं काही धुळीस मिळवलं होतं हे नक्की... या प्रसंगाचीही यमुना साक्षीदार असावी आणि म्हणूनच एवढ्या महान विभूतीच्या सहचारिणीला जातीव्यवस्थेच्या कक्षेत बांधत उपेक्षित राखल्या गेलं. नव्हे तर तिचा नामोल्लेखही संपविण्यात आला आणि अभंग दाखल्यावरून सहजच ती दूर गेली...  

    असेच विचारांचे प्रस्थ मनात कवडसे घेवून येत आणि मी संताजीच्या साकार चरित्र कादंबरीचा धागा पकडीत ही ‘यमुना’ साकारली आहे.

    ‘यमुना’ मी झपाटल्यागत विचार करीत लेखनीबद्ध केली. तिचे जीवन, घटना, प्रसंग, बालपण, विरहाचं जगणं, संताजीप्रति आदर, संताजीचं मूल्य ते जीवन हे सारं काही माझ्या मनातील आदरयुक्त कल्पनेचा थरार होय. या यमुनेरूपी लेखनाला संताजी व यमुनेला एका रथाच्या दोन समान चाकात गुंफण्याचा हा अल्पसा प्रयत्न केला आहे.

    यमुनेप्रति कादंबरी लेखन हा रचनात्मक दृष्ट्या नवा कल्पक प्रयोग होय.

    यमुना जशी मला दिसायची, मनात तिचे पात्रं जसे रूंजन घालायचे, अस्वस्थ करायचे, तसेच केलेले हे शब्दांकण होय. निश्चितच ही यमुना सर्वांना आवडेल एवढंच नव्हे तर ती संताजीसह पूजल्या जाणार. समाजातील स्त्रियांनाही यातून नवे कल्पनादर्श मिळतील या हेतूने.....

    यमुना वाहत्या प्रवाहाची धार

    संताजीच्या मृदंगाची तार

    सावली ज्ञानसूर्याची ती

    जगली जगद्वंद माता म्हणूनी !!

    ऋणनिर्देश:

    ‘यमुना’ ही संताजी जगनाडे महाराजांच्या पत्नी यमुना यांच्या संत वृत्तीवरील जीवनचरित्रात्मक कादंबरी लिहिण्याचा संकल्प अनपेक्षितपणे ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ ही कादंबरी लिहितांना मनात अंकुरलेला एक कोंब. मात्र त्यात अनंत अडचणी दिसू लागल्यात. तेव्हा मा. हरिश्चंद्र मेहेर सर व डॉ. श्रीकृष्ण देव्हारे सर यांच्याशी चर्चा केली. तेव्हा तुम्ही हे काम निष्ठेने आणि परिणामकारक कराल असा विश्वास दर्शविला. त्यांच्या प्रबलनामुळे खरे तर ही कादंबरी पूर्णतः साकार झालेली आहे. एवढेच नव्हे तर माझे जेष्ठ साहित्यबंधू मा. पुनाराम निकुरे सर यांच्या चर्चा व मार्गदर्शन, तपासणी यातून माझं साहित्य आपणापर्यंत येते आहे. या तिन्ही सहद्यी आप्तांचे मी आभार न मानता त्यांच्या ऋणातच राहणे पसंत करतोय.

    ‘यमुना’ ही कादंबरी म्हणजेच समाजाला मिळणारा ऐतिहासिक वारसा होय. मी मनोगतात म्हटल्याप्रमाणे ‘यमुना’ या विषयावर आजतागायत कुणीही साधी ओळही साकारली नाही. तिचे संदर्भ तर मुळातच नाही. तरीपण समाजओढीने मी चिंतनात्मक विचार करीत या विषयाला सामोर जातो आहे. ही कादंबरी लिहितांना खरे तर मला ज्या ध्यानसाधनेची गरज होती त्या ध्यानबैठकीत बसतांना माझे इवले-इवले पाखरं याकडे अगदी कटाक्षाने लक्ष देवून मला लिहिते होण्यास, मनाने मदत करणारी पत्नी सौ. संगीता हीचेही योगदान फार मोठे आहे. एवढंच नव्हे तर लिहिलेले प्रकरण तिच्या समोर वाचून त्यातून वाक्य सुधारणा. तिला आवडले की नाही, समजले की नाही, असे विचारतच ही कादंबरी पूर्णत्वास आलेली आहे. यामुळेच पत्नी सौ. संगीता, माझे त्रिनेत्र चि. पार्थ, शिव, काव्य यांचेही मिळणारे सहकार्य ऋणनिर्देशात करणे मला क्रमप्राप्त वाटते आहे.

    पुणे येथील तेली मासिकचे संपादक मा. मोहन देशमाने सर यांचेशी व मा. दिनकर काळे सर पनवेल, मुंबई यांचेशी माझी ओळख अलीकडचीच. निमित्त होतं ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ या कादंबरीचं प्रकाशनानंतर त्यांच्या हातात जाणे आणि त्यांनी मला कादंबरी वाचून पुढील यमुना कादंबरी लेखनास दिलेले अमोल सहकार्य. फार लांबवर राहूनही सातत्याने फोनवर चर्चा करून मला प्रेरणा देणारे हे दोन सहृदयी जर याप्रसंगी नसते तर कदाचित ही ‘यमुना’ यायला विलंबच झाले असते. अशा सहकार्य व्यक्तींचे ऋणनिर्देश करीत मी त्यांच्या हृदयातच राहू इच्छितो.

    मा. प्रा. रमेश पिसे नागपूर, यांचेशी ओळख झाली. त्यांनी मला विदर्भ तेली समाज शाखांच्या अन्य गावागावातील कार्यक्रमात आदराने स्थान दिला. एवढेच नव्हे तर माझ्या कार्याचा उल्लेख निर्देश करून त्यांनी मला अपार स्नेह दिला. त्यांचेही प्रबलन मला ही यमुना साकारतांना मिळाले. त्यांना आभाराशिवाय काय देवू शकतो बरे!

    माझे बंधू तथा प्रकाशकमित्र बंडू कत्रोजवार, नागपूर यांच्या सहकार्याने यमुनेला पुस्तकरूपात सहज बांधता आले. माझं साहित्य हे जनमाणसात पोहचवण्याचे कार्य नित्यनेमाने करणाऱ्या या बंधूचे अनंत आभार. तसेच मला सदोदित साहित्यविषयक मार्गदर्शन करणारे माझे जेष्ठ साहित्य बंधू मा. पुनाराम निकुरे तळोधी. हे यमुनेवर अनंत चर्चा करून, कादंबरीचे सखोल परीक्षण करून ही स्थळप्रत शुद्धतेने आपणापर्यंत पोहचवण्याचे कार्य त्यांचेच. तथा या यमुनाचे मुखपृष्ठ रेखाटन करणारे सहृदयी कवीमित्र, चित्रकार मा. बंसी कोठेवार यांचेही या प्रसंगी आभार मानणे माझं कर्तव्य आहे.

    ही कादंबरी साकारतांना प्रकाशनपूर्व मदत करणारे आमच्या गावचे संघटन म्हणजेच विदर्भ तेली समाज महासंघ शाखा नागभीड, संताजी भजन मंडळ नवखळा, संताजी साहित्य व कला विषयक प्रसार करणारे संताजी फाउंडेशन नवखळा-नागभीड, भरारी साहित्य शिक्षण कला सेवा संस्था नागभीड, म. रा. प्रातिक तैलीक सभा यांचा ऋणी आहे.

    आणखी बरीच मंडळीचे नाव आहेत ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मला मदत केली. माझ्या साहित्यावर अपार स्नेह दर्शविला. फोन संपर्काने मला शुभेच्छा दिल्यात. आदर सन्मान केला त्या समस्त स्नेही सृजनांचे, समस्त बहुजनवादी संघटनांचे त्यांतील स्नेही मंडळीचेही याप्रसंगी नावाचा मोह टाळत सर्व सहृदयी, आप्त, शिक्षकमित्र, यांचेही अनंत आभार.

    खरे तर एकच मनोमन वाटते आहे. समाजस्नेहींनी व साहित्यिकांनी या माझ्या लेखनाला घराघरापर्यंत पोहचवावे, त्याकरिता सहकार्य करावे ही अपेक्षा.....

    लेखक

    संजय वि. येरणे

    नागभीड, 9404121098

    ‘यमुना’ एका कारूण्यमूर्तीचा सुपरिमल

    एक

    मंदिरातून पांडुरंग हात कंबरेवर ठेवून कडूलिंबाच्या झाडाच्या सावलीत सुरू असलेला बाहुला-बाहुलीचा खेळ बघत होता. पांडुरंगाला यमुनेच्या बाहुलीला बघून आपल्या रूक्माईची आठवण झाली. मात्र पांडुरंगाने इकडे-तिकडे नजर भिरकाविली. त्याला रूक्मिणी कुठेही दिसेना. मात्र रूक्मिणीच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करीत खेळात रंगलेल्या चार पोरीचं जगावेगळं बडबडणं आणि खेळणं बघण्यात तो गुंग झाला होता.

    यमुने, झाली की नाही तुझी भात भाजी....? मैत्रिणीने यमुनेला म्हटलं.

    हं! झालं ग स्वयंपाक, चला आता बाहुला-बाहुलीचं लग्न लावूया, नंतर सगळ्याना जेवण देवू.

    यमुना मनातल्या मनातच हसली. तिने बाहुल्याला छान सजवलं होतं. या विस्तिर्ण झाडाच्या मोहक सावलीत ती आपल्या मैत्रिणी सोबत दररोजच हा खेळ खेळायची. दररोज एकच खेळ... बाहुला-बाहुलीचं लग्न. त्यात घरातील पोहे, तेल, गहू आणायचे. भात-भाजी म्हणून प्रसाद वाटायचा. अक्षता म्हणून फुलं टाकायची. संपलं लग्न...

    मागेहून यमुनेच्या आईचा आवाज आला. तिचे लक्ष तिकडे गेले. ती दीड-दोन प्रहरापासून आंघोळ न करताच सकाळपासून हा खेळ खेळण्यात दंग झाली होती.

    येते ग येते, आली... यमुनेचा आवाज ऐकून यमुनेच्या आईला मीराबाईला हायसं वाटलं.

    ये पटकन.... अग तात्या बाजारात जाणार आहेत तू नाही का जाणार त्यांचेसोबत? वाट बघत आहेत ना तुझी...

    आईच्या वाक्यांनी तिला बाजाराच्या गावी जायचं असल्याची आठवण झाली. तात्यांनी रात्रोलाच तिला पोलका घेवून द्यायचं कबूल केलं होतं.

    अग... मी नाही खेळत जा... तुम्हीच खेळा... मी जाते... तात्या की नाही आज मला नवा छान पोलका घेवून देणार आहेत. असं म्हणीतच तिने बाहुल्याला तिथंच टाकलं नि वाड्याच्या दिशेने आईकडे पळाली. तिच्या मैत्रिणी तिच्याकडे बघतच राहिल्यात. मात्र यमुनेला नवे कपडे मिळण्याच्या आनंदात तिचं उगामुगाचं लग्नजेवण तसंच राहिलं होतं. याचेही भान तिला उरलं नाही.

    तात्याजी कहाणे पुणे परगण्यातील खेड येथील प्रतिष्ठित वाण्याचे व्यापारी होते.

    गावात त्यांचं चांगलं वजन होतं. एक सावकार म्हणून नव्हे तर सर्व गोरगरिबाना कामे देणारा, अडल्या-नडल्यांना मदत करणारा, प्रामाणिकपणे वस्तू विकून खरा व्यवहार करणारा व्यापारी म्हणून त्यांची ख्याती होती. नेटका प्रपंच करीत चार पैसे गोळा करणे आणि ते कुटुंबाला वापरणे हीच त्यांच्या वडिलांची शिकवण त्यांनी अंगीकारली होती.

    तात्याला ही यमुना व माधव हे दोनच मुले. माधव मोठा व यमुना ही लहान. यमुनेवर सर्व कुटुंबाचाच लळा. यमुना पहायला गोरीगोमटी, सालस, हुशार आणि चंटपणे बोलणारी, आईवडिलाचं सारं काही निमुटपणे ऐकून घेत विचार करणारी ही मुलगी. अगदी सहा वर्षापासून ती लाडातच वाढली होती. तिच्या आई मीराबाईने उत्तम संस्कार करीत समंजसपणा दिला होता. ना राग, ना लोभ असाच तिचा स्वभाव होता.

    तात्यांचा एैसपैस असा भला मोठा वाडा. सभोवताल भलं मोठं अंगण, बाजूलाच असलेली परसबाग, त्यात अनेक प्रकारची फुलझाडं व फळझाडे होती. यमुना बहुताऊंशी इथ्ंच मैत्रिणीसोबत खेळत बसायची. मात्र पावसाचे दिवस असल्याने आज ती वाड्यासमोर चौकातील पांडुरंग मंदिराच्या बाजूलाच असलेल्या कडूलिंबाच्या झाडाच्या सावलीत खेळण्यास गेली होती.

    मीराबाईचा स्वभाव शांत होता. ती तात्यांना फार समजून घेत त्यांच्या व्यापारात हातभार लावायची. घरची सर्व शेतीचे काम व शेतकामगारावर लक्ष बहुताऊंशी तीच ठेवायची. तिला घरकामात मदत करणारी एक स्त्री होती नंदाबाई. ही गावचीच, तिचा नवरा वारल्यानंतर तिची आभाळ होवू नये म्हणून तात्यांच्या घरात नेहमीकरिताच ती कामाला राहिली. तात्या तिला मुलीसारखीच समजायचे. मीराबाईनेही तिला मुलीसारखंच जपलं होतं. फरक एवढाच की, ती फक्त घरातील सगळे कामं करायची. मात्र त्यात ती समाधानी होती.

    तात्या ओसरीतील पाळण्यावर बसून शेतीच्या कामाची कामकऱ्याना विभागणी सांगित होते. यमुना अगदी धावतच वाड्याच्या ओसरीत धापा टाकत आली.

    तात्या गेले का ग नंदाबाई? यमुनेनं अगदी लांडग्यानं मागे लागावं नि धावतपळत सुटतांना घाबरट आवाज काढावं असाच नंदाबाईला प्रश्न केला. नंदाबाई तिच्या खेळण्यातील अवताराकडे बघून स्मित हसली.

    वेधंळी ग तू ... कसा अवतार केलाय बघ. अंगाला माती लागलेली. कपडेही मळलेले. आंघोळही नाही... सारखं नवरा-नवरीचा खेळ. थांब आता तुला नवराच पाहून देते.

    तात्या ही आली जी...!

    यमुनेचं लक्ष ओसरीत गेलं तिच्या मनाला समाधान वाटलं. तात्या आपल्याला सोडून गेले नाहीत यामुळे तिला बरंही वाटलं.

    तात्या, थांबा जी. मी येते हं...! आता आले तयार होवून...

    आली का ग यमू? तिच्या आईने स्वयंपाक घरातूनच हाक दिली.

    आली जी.... आताच... नंदाबाईने म्हटलं.

    अग आटोप तिची तयारी... मीराबाईने नंदाला सुचविलं.

    नंदाबाईने यमुनेचे कपडे काढले. तिला स्नान घरात नेवून आंघोळ घालून दिली. नवे कपडे लावून दिले. डोक्याला तेल लावीत दोन फुलांची वेणी करून दिली.

    अग होईल ना! किती वेळ लावते आहेस. यमुनेला जायची घाई झाली होती.

    झालं ग! चल आता जेवून घे थोडसं... पाच मैलावर जायचं आहे. बरं का. सांजेलाच घरी येणार व्हयं तू. तात्यांना त्रास देवू नकोस. हं! आज माधव नाही येणार बरं का? तेव्हा कुठेही एकटी भटकू नकोस. तात्यांना त्यांचे काम करू द्यायचं. आमच्या नवरीला नाही का छान पोलका मिळणार आज. नंदाबाईनं लाडीक स्वरात तिचा लाड करीत गाल पकडत म्हटलं.

    खरंही होतं. नंदाला एकच दुःख होतं. तिला स्वतःचे मूल नव्हते. सासरी गेल्यावर वर्षभरातच तिचा नवरा आजाराने वारला होता. तद्नंतर ती माहेरी आली. घरची परिस्थिती बेताची. आईवडीलही पुढे गेले. बिचारी निराधार. एकदा लग्न झाल्यावर दुसरं लग्नही करता येत नव्हतं. कारण

    Enjoying the preview?
    Page 1 of 1