Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

सर्वस्पर्शी प्रतिभावंत: संजय येरणे यांच्या समग्र साहित्यावरील आस्वादग्रंथ
सर्वस्पर्शी प्रतिभावंत: संजय येरणे यांच्या समग्र साहित्यावरील आस्वादग्रंथ
सर्वस्पर्शी प्रतिभावंत: संजय येरणे यांच्या समग्र साहित्यावरील आस्वादग्रंथ
Ebook359 pages2 hours

सर्वस्पर्शी प्रतिभावंत: संजय येरणे यांच्या समग्र साहित्यावरील आस्वादग्रंथ

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

साहित्यिक संजय येरणे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि वाड्.मयीन कार्याचा आढावा घेणारा ‘सर्वस्पर्शी प्रतिभावंत’ हा ग्रंथ. आस्वादक समीक्षा, मुलाखत यासह येरणे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक अज्ञात पैलू या पुस्तकातून आपल्या समोर येतात. अशा धाटणीची अनेक पुस्तके किंवा गौरवग्रंथ मराठीत सातत्याने प्रकाशित होत असले तरीही हे पुस्तक याहून वेगळे आहे. पुनाराम निकुरे यांनी यात अस्तित्ववादी समीक्षेला वाव देत उपयोजित समीक्षेची मांडणी, सर्वांगीण सखोल चिकित्सक दृष्टीने आपली भूमिका मांडली आहे. खरेतर यामुळे साहित्याची उंची व परिणामकारकता दर्शवित रसिक,साहित्य अभ्यासक यांनाही मार्गदर्शनपर ठरणारा हा ग्रंथ होय. निकुरे हे साहित्य कलाकृतीकडे सर्व बाजूंनी त्रयस्थपणे बघत आकलन, अर्थ निर्णयन, अन्वयन, आस्वादन व मूल्यमापन या सर्वांग भूमिकेतून विचारप्रेरित होत, साहित्यातील सौंदर्याचे रसपान करायला लावतात.

Languageहिन्दी
PublisherPencil
Release dateAug 10, 2021
ISBN9789354585739
सर्वस्पर्शी प्रतिभावंत: संजय येरणे यांच्या समग्र साहित्यावरील आस्वादग्रंथ

Related to सर्वस्पर्शी प्रतिभावंत

Related ebooks

Reviews for सर्वस्पर्शी प्रतिभावंत

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    सर्वस्पर्शी प्रतिभावंत - पुनाराम वा. निकुरे

    सर्वस्पर्शी प्रतिभावंत

    संजय येरणे यांच्या समग्र साहित्यावरील आस्वादग्रंथ

    BY

    पुनाराम वा. निकुरे


    pencil-logo

    ISBN 9789354585739

    © पुनाराम वा. निकुरे 2021

    Published in India 2021 by Pencil

    A brand of

    One Point Six Technologies Pvt. Ltd.

    123, Building J2, Shram Seva Premises,

    Wadala Truck Terminal, Wadala (E)

    Mumbai 400037, Maharashtra, INDIA

    E connect@thepencilapp.com

    W www.thepencilapp.com

    All rights reserved worldwide

    No part of this publication may be reproduced, stored in or introduced into a retrieval system, or transmitted, in any form, or by any means (electronic, mechanical, photocopying, recording or otherwise), without the prior written permission of the Publisher. Any person who commits an unauthorized act in relation to this publication can be liable to criminal prosecution and civil claims for damages.

    DISCLAIMER: The opinions expressed in this book are those of the authors and do not purport to reflect the views of the Publisher.

    Author biography

    पुनाराम निकुरे यांचा परिचय

    नाव: पुनाराम वारलुजी निकुरे

    पत्ता: ‘निकुंज’ शिक्षक कॉलनी, वार्ड नं ७,

    मु. पो. तळोधी (बा) तह. नागभीड.

    जि. चंद्रपूर पिन ४४१२२१ संपर्क ९४०४१२११४०.

    शिक्षण: एम. ए. (राज्यशास्त्र) बी. एड.

    जन्म: १२ मार्च १९६५.

    व्यवसाय:  माध्यमिक शिक्षक, सिंदेवाही, जि. चंद्रपूर.

    प्रकाशित साहित्य:

    १) ‘देव देवळे आणि यज्ञ’ (वैचारिक ग्रंथ) भरारी प्रकाशन, नागभीड २०११.

    २) ‘जागल’ कवितासंग्रह प्रातिनिधिक, भरारी प्रकाशन, नागभीड २०११.

    ३) ‘प्रचिती’ पंचोळी नवकाव्य प्रकार, भरारी प्रकाशन, नागभीड २०१५.

    ४) ‘टाहो’ कथासंग्रह, शॉपीझेन प्रकाशन, २०२१.

    ५)  ‘सर्वस्पर्शी प्रतिभावंत’, पेन्सील प्रकाशन, २०२१.

    प्रकाशनाच्या वाटेवर :

    १) कवितासंग्रह ‘राहुनच गेलं’

    साहित्यविशेष :

    लेखक, कथाकार, कवी, वक्ता, समीक्षक, मुद्रितशोधक म्हणून परिचित.

    अनेक वाड्ःमयीन नियतकालिकातून, वृत्तपत्रातून लेख, कथा, कविता प्रसिद्ध.

    सामाजिक कार्य, साहित्यसंमेलन, कवीसंमेलन आयोजन, नवोदितांना साहित्यविषयक मार्गदर्शन,

    संमेलन काव्यवाचन, शैक्षणिक मार्गदर्शन.

    पुरस्कार :

    0 साने गुरूजी राज्यस्तरीय समाजरत्न स्फूर्ती पुरस्कार, २०१० चंद्रपूर.

    0 महात्मा जोतीराव फुले जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार, २०११ बल्लारपूर.

    0 साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार, २०१३ बुलढाणा.

    0 शिव गौरव उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, २०१८ चंद्रपूर.

    Contents

    प्रस्तावना

    मनोगत

    संजय येरणे यांचे प्रकाशित साहित्य

    विभाग १- साहित्यिक ओळख, लेखकाच्या अंतरंगातून, ध्येयवादी शिक्षक, एक वक्ते, साहित्यशैली.

    विभाग २- साहित्यप्रवास - काटेरी निवडुंग

    एक कवीपिंड- जागल (कविता)

    बालकथासंग्रह- ‘एक आहे अनिकेत’

    साहित्यकार्यात तत्पर संपादक-

    कथासंग्रह -‘डफरं','डमरू'

    वैचारिक ग्रंथ-

    कादंबरी

    समीक्षा, निरीक्षणे

    इतर निवडक प्रतिक्रिया

    संजय येरणे यांच्याशी दिलखुलास बातचीत

    संजय येरणे यांचा साहित्यविषयक परिचय

    प्रस्तावना

    ज्योतिने तेजाची आरती

    साहित्यिक संजय येरणे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि वाड्.मयीन कार्याचा आढावा घेणारा ‘सर्वस्पर्शी प्रतिभावंत’ हा ग्रंथ. आस्वादक समीक्षा, मुलाखत यासह येरणे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक अज्ञात पैलू या पुस्तकातून आपल्या समोर येतात. अशा धाटणीची अनेक पुस्तके किंवा गौरवग्रंथ मराठीत सातत्याने प्रकाशित होत असले तरीही हे पुस्तक याहून वेगळे आहे. अशा स्वरूपाचे ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी बहुधा काहीतरी निमित्त असते. हीरक महोत्सव, अमृत महोत्सव असा आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा किंवा एखाद्या मोठया यशाचे निमित्त यासाठी योजले जाते. मात्र असे कोणतेही औपचारिक कारण नसतांना हा ग्रंथ प्रकाशित होतोय हे मला अधिक महत्त्वाचे वाटते. पुनाराम निकुरे यांना अशा प्रकारचा ग्रंथ प्रकाशित व्हावा असे अंतःस्फूर्तीने वाटले आणि या कल्पनेला पुस्तक रूपाने मूर्त स्वरूप आले. एखाद्या साहित्यिकाला दुसऱ्या साहित्यिकाचा निरपेक्ष, निर्मळ मनाने गौरव करावा असे वाटणे हे दुर्मिळ होत चालले आहे. वि.स. खांडेकरांनी कुसुमाग्रजांचा पहिला कविता संग्रह स्वखर्चाने प्रकाशित करणे किंवा कुसुमाग्रजांनी आरती प्रभूंच्या पहिल्या संग्रहासाठी प्रकाशकाला शब्द टाकणे हे आदर्श साहित्यस्नेही वातावरण केव्हाच इतिहास जमा झाले आहे. म्हणूनच या आस्वाद ग्रंथासाठी ज्येष्ठ साहित्यिक संजय येरणे गौरवमूर्ती म्हणून जितके अभिनंदनास पात्र आहेत, तितकेच पुनाराम निकुरेसुद्धा गौरवास पात्र आहेत. सद्गुण गौरवण्यासाठी लागणारी प्रांजळ दिलदारी पुनाराम निकुरे यांनी दाखवली ही गोष्ट सुद्धा दुर्मिळ आणि आवर्जून दखल घ्यावी अशीच आहे.

    प्रवाही शैली असणारा प्रतिथयश साहित्यिक म्हणून संजय येरणे महाराष्ट्राला माहीत आहेत. त्यांच्या पुस्तकांचे हिंदी, इंग्रजीत झालेले अनुवाद लक्षात घेतले तर देशात आणि परदेशातही साहित्यिक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. साहित्य आणि कलेची कसलीही आनुवंशिक पार्श्वभूमी नसलेला हा साहित्यिक आज असणाऱ्या टप्प्यावर कठोर परिश्रमाने पोहोचला आहे. काही काही बीज इतकं जोमदार असतं की कातळावर पडलं तरीही त्या प्रतिकूल वातावरणातही जोमदारपणे वाढतं. संजय येरणे हे असेच जोमदार बी आहे. वाचन, चिंतन, मनन यातून स्वतःलाच छिन्नीने घडवणारा हा अवलिया आहे. हजारो निवडक पुस्तकांचा स्वतःचा संग्रह असणारा हा आदर्श वाचक आहे. उत्तम वाचक हा उद्याचा साहित्यिक असतो म्हणतात. या म्हणीचे प्रत्यंतर येरणे यांच्या वाड्.मयीन कार्याकडे पाहिल्यावर येते.

    दलित, शोषित, वंचितांच्या व्यथा, वेदना मांडणारा आणि वैचारिक, पुरोगामी विचार वारसा जपत, तर्काधिष्ठित साहित्य प्रसवणारा साहित्यिक अशी येरणे यांची ओळख आहे. रोखठोक, स्पष्ट आणि निर्भीड आणि कोणतेही लांगुलचालन न करता ‘अरे ला कारे करीत’ तरीही आपल्या मार्गावर नाकासमोर क्रमण करणारा हा साहित्यिक आहे. ‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता।।’ असा स्वाभिमानी तर्कसंगत बाणा ही त्यांची ओळख. बुद्ध तत्त्वज्ञान आणि आंबेडकरी सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून त्यांचा पिंड घडला आहे. साहित्यिकांचा पिंड साहित्यातून प्रतिबिंबित होत असतो. ‘डफरं’, ‘डमरू’ या सारखे सामाजिक प्रश्न ताकदीने मांडणाऱ्या आणि मानवी वृत्ती प्रवृत्तीचा निर्भीडपणे अचूक वेध घेणाऱ्या कथाकाराचे व्यक्तिमत्त्व या दोन कथा संग्रहांमधून पुरेसे प्रतिबिंबित झाले आहे, असे म्हणायला फार मोठा वाव आहे.

    विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला खतपाणी घालणारे लेखन-वाचन प्रकल्प राबवणे, ‘एक आहे अनिकेत’ सारखी आदर्श विद्यार्थ्यांची चरित्रकथा रेखाटने किंवा ‘इंग्लिश रिडींग पॅटर्न’ सारख्या उपक्रम वजा पुस्तकाची निर्मिती यातून विद्यार्थी हितासाठी धडपडणारा शिक्षक संजय येरणेंच्या रूपात आपल्याला सापडतो. असा शिक्षक लाभणे हे विद्यार्थ्यांचे भाग्य असते. संजय येरणे हे उपक्रमशील शिक्षक म्हणूनही आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत.

    फुले दांपत्य, छत्रपती शाहू महाराज, तुकाराम महाराज यांच्या विचारसरणीचा फार मोठा प्रभाव त्यांच्या विचारव्यूहावर असल्याचे आपल्याला जाणवते. या महामानवांच्या विचारांना त्यांनी आपल्या कथांमधून वाचका सन्मुख करण्याचे कार्य पुनःपुन्हा केले आहे. परिसरातील मातीशी त्यांचे अतूट नाते आहे. म्हणूनच त्यांच्या वाड्.मयात परिसरातील झाडी बोलीचा वापर मोठया प्रमाणावर झालेला दिसतो. त्याचप्रमाणे साहित्यिक, सांस्कृतिक वातावरणासाठी साहित्य संमेलने, कवी संमेलने, शैक्षणिक उपक्रम, विविध स्पर्धा, पुरस्कार, मार्गदर्शन, प्रकाशन समारंभ असे कार्यक्रम घडवून आणले आहेत. ‘भरारी साहित्य, शिक्षण, कला सेवा संस्था, नागभीड’ या संस्थेची स्थापना हे सुद्धा महत्त्वाचे कार्य आहे.

     अनेक साहित्य प्रकार हाताळणारी त्यांची प्रतिभा सर्वस्पर्शी आहे. एक उत्तम वक्ता म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. ‘मी संताजी बोलतोय’ या एकपात्री कथननाटयाचे अनेक प्रयोग त्यांनी केले आहेत. ‘बयरी’ या कादंबरीमध्ये सामाजिक प्रश्नांची मांडणी करून ते वाचकांना विचारप्रवृत्त करतात. तर ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ आणि ‘यमुना’ या दोन चरित्रात्मक कादंबऱ्यांमध्ये कल्पिताचा आधार घेऊन त्यांनी केलेली मांडणी थक्क करणारी. ३५० वर्षांचा पट ओलांडून इतिहासात संचार करणारी त्याची कल्पक ‘संजयी’ दृष्टी आपल्याला अचंबित करते. महाभारतातल्या दूरदृष्टी असणाऱ्या संजयची आठवण व्हावी अशी दिक्कालातून पाहणारी दृष्टी येरणेंना लाभली आहे की काय असे वाटते. संताजी जगनाडे आणि त्यांची पत्नी यमुना यांच्यावरच्या या दोन चरित्रात्मक कादंबऱ्या साकारतांना संदर्भाची वा न वा त्यांना जाणवली असेल. या दोनही व्यक्तिमत्त्वाचा तुटक तुटक आणि अगदी त्रोटक दोन चार ओळीत संपणारा इतिहासच यापूर्वी नोंदलेला आहे. आपल्याकडे सामाजिक इतिहास लिहायची परंपरा कधीच नव्हती. राजे-रजवाडे, राजपरिवार, लढाया यालाच फक्त इतिहास समजला जातो आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे इतिहास ज्यांनी घडविला त्यांनी लिहिला नाही आणि ज्यांनी लिहिला त्यांनी घडविला नाही. त्यामुळे विकृत, सोयीचा, पूर्वग्रहदूषित इतिहास आपल्या पदरात पडला. अशा परिस्थितीत इतिहासाचे हाती लागलेले तुकडे कल्पिताने सांधून सलग कथानक तयार करणे हे फारच कौशल्याचे काम असते. संताजी आणि यमुना यांच्या जीवनावरच्या कादंबऱ्या लिहितांना हे शिवधनुष्य येरणे यांनी लिलया पेलले आहे.

    साहित्यिक साहित्यातून रसिकांना भेटत असतो. त्यांचा परिचय घडत असतो मात्र तो माणूस म्हणून कसा आहे याबद्दल रसिकांच्या मनात उत्सुकता असते. ‘कवी तो आहे कसा आननी’ याबद्दल रसिकांना असलेली जिज्ञासा या ग्रंथातून काही अंशी शमवली जाऊ शकते. संजय येरणे यांच्या व्यक्ती आणि वाड्.मय या दोन्ही पैलूंना पुरेसा न्याय देण्यात पुनाराम निकुरे यशस्वी झाले आहेत. दिव्याने दिवा पेटावा तसा येरणे यांच्या साहित्य साधनेतून हे पुस्तक निर्माण करण्याची प्रेरणा निकुरे यांना लाभली आणि निकुरे यांचे हे काम बघून याहून अधिक जोमाने लिहिण्याची प्रेरणा येरणे यांना मिळेल. दोघांनाही भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन थांबतो.

    अरुण इंगवले,

    प्रसिद्ध साहित्यिक,

    (आबूट घेऱ्यातील सूर्य )

    चिपळूण, जि. रत्नागिरी

     मोबा. ९४२२३९५६६८

    मनोगत

    संजय येरणे चंद्रपूर जिल्हयातील, नागभीड येथील साहित्यक्षेत्रातील अष्टपैलू व व्यासंगी व्यक्तिमत्त्व. घरी कोणताही वाड्.मयीन वारसा लाभलेला नसतांना, नागभीड परिसरात सांप्रत स्थितीत, आघाडीचे साहित्यिक म्हणून प्रकाशझोतात आहेत. ते कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चारोळीकार, समीक्षक, संपादक, कवी, लेखक, बालसाहित्यिक अशा साहित्यप्रकारात विविधांगी लेखन करून प्रभुत्व मिळवून अग्रगण्य साहित्यिक म्हणून आपली नाममुद्रा प्राप्त केली. साहित्यप्रांतात माझ्या सारख्या नवख्या लेखकाने त्यांच्या साहित्यावर भाष्य करणं, हा भार पेलनं, जरा अवघडच आहे. तरीपण मी त्यांचे संपूर्ण साहित्य अभ्यासून त्यावर आपले मत प्रकट करण्याचा प्रयत्न केला आहे. ते कितपत वाचकांच्या पसंतीस उतरेल हे वाचकच ठरवतील. मी आपल्या बौद्धिक सामर्थ्यानुसार ‘सर्वस्पर्शी प्रतिभावंत’ हा ग्रंथ लेखनीबद्ध करीत वाचकांच्या हाती सोपवित आहे.

    संजय येरणे यांच्या समग्र साहित्यावरील आस्वादग्रंथ ‘सर्वस्पर्शी प्रतिभावंत’ हया ग्रंथामागील माझा हेतू स्पष्ट आहे. मी मुद्रितशोधक असल्याने त्यांचे संपूर्ण साहित्य मी वारंवार वाचन, मंथन केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्याविषयी माझ्या मनात असलेली गोडी, मी वाचक, रसिक असल्याने झालेले चिंतन, मनन लेखनीबद्ध करून आस्वादक समीक्षणात्मक भूमिका मांडावी असे विचार बरेच दिवस मनात रेंगाळत असायचे. हया ग्रंथाच्या रूपाने ही आस्वादकता आपणा पर्यंत सर्वत्र दूरवर पोहचवावी, त्यांच्या साहित्यिक सेवेचे चीज व्हावे, असा उद्देश ठेवून माझ्या मनाला जे-जे भावलं, जसं वाटलं, पटलं, सुचलं तसंच शब्दात मांडतोय.

    मी कुणीही गणमान्य समीक्षक नाही तरीपण त्यांच्या साहित्यावर केलेलं विवेचन माझं वैयक्तिक असलं तरी त्यांचे साहित्य सर्व अंगानी, साहित्यिक मूल्यांनी, रसरसित ठासून भरलेले आहे असं मला वाटतंय.

    प्रस्तुत ग्रंथ अगदी अल्पपृष्ठ मर्यादा लक्षात घेत, अनेक मर्यादांची जाणीव ठेवीत तीन विभागात विभागले आहे. प्रथम विभागात ‘ओळख’ या प्रकरणात त्यांच्याशी ओळखीची परिणिती, माझी साहित्यबाग फुलविण्यास कशी समर्थ ठरली याचे विवेचन केले आहे. ‘लेखकाच्या अंतरंगातून’ या प्रकरणात त्यांची जडणघडण, बालपण व जीवनातील संघर्ष याचा आढावा घेतला आहे. ‘ध्येयवादी शिक्षक’ या प्रकरणात त्यांची साहित्यसेवा, ध्येयपूर्तीकरिता केलेल्या कार्याची ओळख दर्शविलेली आहे. ‘वक्ते’ या प्रकरणात त्यांची वैचारिक समज व त्यातून निर्माण झालेली वक्तृत्वशैली याचे विवेचन व ‘साहित्यशैली’ यात त्यांच्या लेखनीत रमणाऱ्या वाचकांच्या उत्कृष्ट अभिप्रायाच्या माध्यमातून साहित्यशैलीचा आढावा सादर केला आहे.

    सदर ग्रंथ गुंफतांना त्यांचे आजवर प्रकाशित समग्र साहित्यप्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक पुष्पाला समर्पक शीर्षक देत आशयात्मक व स्पष्टीकरणात्मक मत प्रकट करीत दुसऱ्या विभागात साहित्यप्रवास या घटकाद्वारे विस्तृत भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. यात काही उणिवाही, समोरचे साहित्य निकोप होण्याच्या दृष्टीने निदर्शनास आणल्या आहेत.

    एवढेच नव्हे तर त्यांचे साहित्य कसे समाजोपयोगी, वास्तववादी, सर्वसामान्यांना जीवन जगण्यास सुकर करणारं आहे याचे महत्त्व विशद करून, साहित्यिकाचं अष्टपैलूत्व वाचकांच्या नजरेस आणून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.

    सदर ग्रंथाची मांडणी करतांना अनामिक भीतीही मला वाटत होती. कारण याकरिता जी चिकित्सक दृष्टी हवी ती माझ्यात पुरेशी आहे काय? जे लिहिलं ते सर्व रसिक जनांना मान्य होईल काय? अशी शंकेची पालही मनात चुकचुकत असायची. मी मांडलेली ही भूमिका योग्य, अयोग्य हे मी सुजाण रसिकांच्या सेवेत सोपवितो, यात जी उणीव असेल ती माझ्या स्वतःच्या अभ्यासाची उणीव समजावी मात्र यातून जर काही चांगलं मिळेल ती एक माझी साहित्यसेवा असेल. आपल्या स्वागताच्या अपेक्षेत...

    या ग्रंथाद्वारे नवोदित लेखक, वाचक, रसिक, अभ्यासक यांना निश्चितच मदत होईल व संजय येरणे यांच्या साहित्याची लय वाढण्यास मदत होईल ही अपेक्षा तेवढाच विश्वास आहे.

    माझ्या साहित्यसंपदेविषयी थोडेसे, प्रस्तुत ग्रंथ रूपाने येणारे माझे साहित्यातील हे चौथे पुस्तक होय. कथा, कविता, पंचोळी, वैचारिक लेखन, परिक्षण भूमिका अशा साहित्यप्रकारावर रसिकांनी मला स्नेहच दिला आहे. पुढेही असेच लेखनास प्रोत्साहन मिळावे या अपेक्षेतूनच सदर ग्रंथ आपल्या समोर ठेवीत आहे. मी आपल्या स्वागताच्या अपेक्षेत तेवढाच सूचना व अभिप्रायांच्या प्रतिक्षेत असेन!

    सदर ग्रंथ साकारतांना या ग्रंथाला संजय येरणे सरांनी मान्यता व प्रेरणा देवून मार्गदर्शकाचीही भूमिका वठविली याबद्दल सदैव त्यांच्या ऋणात राहणेच पसंत करेन. तसेच ‘आबूट घेऱ्यातला सूर्य’ या बहुचर्चित काव्यसंग्रहाचे कवी आणि पुणे येथे झालेल्या दुसऱ्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. अरुण इंगवले सर, चिपळूण, जि. रत्नागिरी यांनी मला या ग्रंथाकरिता प्रस्तावनापर शुभेच्छा दिल्यात त्यांचे आभार, तेवढाच आनंदही व्दीगुणीत होतोय. तसेच ‘जिव्हाळा’ मित्रमंडळ, माझी पत्नी सरिता आणि दीपा, प्रतिभा, रोहित या माझ्या मुलांचेही सहकार्य, प्रकाशक, मुखपृष्ठकार, बांधणी, अक्षरजुळवणी, मुद्रण, या सर्वांचे सहकार्य लाभले याबाबत त्यांचेही अनंत आभार मानणे माझे कर्तव्यच आहे.

    प्रस्तुत ग्रंथ मा. संजय येरणे आणि त्यांच्या पत्नी सौ. संगीता यांना सविनय सादर....

    पुनाराम वा. निकुरे

    समीक्षक

     मो. ९४०४१२११४०

    संजय येरणे यांचे प्रकाशित साहित्य

    कादंबरी :

    १) ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ भरारी प्रकाशन, नागभीड, डिसे. २०१६.

    २) ‘बयरी’  पेन्सील प्रकाशन,  जाने, २०१७.

    ३) ‘यमुना’ भरारी प्रकाशन, नागभीड, डिसे. २०१७.

    ४) ‘वॉरीयर्स’  इंग्रजी आवृत्ती प्रकाशित, डिसे.२०१९     

    कथासंग्रह :

    १) ‘डफरं’ मायबोली प्रकाशन,

    Enjoying the preview?
    Page 1 of 1