Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

योद्धा: संताजी जगनाडे महाराज एक योद्धा
योद्धा: संताजी जगनाडे महाराज एक योद्धा
योद्धा: संताजी जगनाडे महाराज एक योद्धा
Ebook377 pages2 hours

योद्धा: संताजी जगनाडे महाराज एक योद्धा

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

श्री. संत संताजी जगनाडे यांच्या जीवनचरित्रावरील जगातील पहिलीच कादंबरी


अजूनही संताजी त्यांचे चमत्कार, वारकरी संप्रदाय व देव, देवळांची भक्ती किंवा अंधश्रद्धात्मक मांडणीही मी अनेक साहित्य लेखकांच्या हस्ते साकार झालेली बघितली. आमचे संताजी महाराज हे मुळीच तसे नव्हते. हे संदर्भ साधनांच्या थोड्याशा निष्कर्षावरून सिद्ध होते. प्रयत्नवादी व विज्ञानवादी दृष्टिकोन असलेले संताजी आज मान्य करणे काळाची गरज आहे. तरच खरी संताजीची प्रेरणा आदर्श जपत आपला समाजविकास हेतू, कार्य सफल करू शकतो अन्यथा नाही आणि म्हणूनच ही संताजीची कादंबरी साकार करतांना मी बहुजनवादी विचारांचा परामर्श घेत संदर्भ जुळवत अत्यंत इतिहास क्लिष्ट न करता संताजीचे छोटे-मोठे प्रसंग घटना अगदी कल्पनारम्य रंगवित ही कादंबरी साकार केलेली आहे. त्यामुळे ही वाचनीय आहे, एकाच बैठकीत वाचावी व आवडेल अशीच आहे.

Languageहिन्दी
PublisherPencil
Release dateJul 15, 2021
ISBN9789354583117
योद्धा: संताजी जगनाडे महाराज एक योद्धा

Related to योद्धा

Related ebooks

Reviews for योद्धा

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    योद्धा - संजय व्ही.येरणे

    योद्धा

    संताजी जगनाडे महाराज एक योद्धा

    BY

    संजय व्ही.येरणे


    pencil-logo

    ISBN 9789354583117

    © संजय व्ही.येरणे 2021

    Published in India 2021 by Pencil

    A brand of

    One Point Six Technologies Pvt. Ltd.

    123, Building J2, Shram Seva Premises,

    Wadala Truck Terminal, Wadala (E)

    Mumbai 400037, Maharashtra, INDIA

    E connect@thepencilapp.com

    W www.thepencilapp.com

    All rights reserved worldwide

    No part of this publication may be reproduced, stored in or introduced into a retrieval system, or transmitted, in any form, or by any means (electronic, mechanical, photocopying, recording or otherwise), without the prior written permission of the Publisher. Any person who commits an unauthorized act in relation to this publication can be liable to criminal prosecution and civil claims for damages.

    DISCLAIMER: The opinions expressed in this book are those of the authors and do not purport to reflect the views of the Publisher.

    Author biography

    संजय येरणे यांचा साहित्यविषयक परिचय :

    नाव: संजय विस्तारी येरणे.

    पत्ता: ‘येणू भिकाजी’ सदन, वार्ड नं. 6, शिवाजी चैक,

    मु. पो. तह. नागभीड. जि. चंद्रपूर. पिन 441205,

    संपर्क - 9404121098.

    शिक्षण: एम. ए. (मराठी, समाज, डॉ. आंबेडकर थॉटस्) डी. एड, डी. एस. एम.

    जन्म:  19 नोव्हेंबर 1976

    व्यवसाय : प्राथमिक शिक्षक, नागभीड. जि. चंद्रपूर

    साहित्यविशेष कार्य:

    1) लेखक, कथाकार, कादंबरीकार, कवी, संपादक, प्रकाशक, प्रवक्ते.

    2) अनेक वाड्.मयीन नियतकालिकांतून, वृत्तपत्रातून लेख, कथा, कविता, ललित लेखन, स्फुट लेखन प्रसिद्ध.

    3) संस्थापक-अध्यक्ष: भरारी साहित्य शिक्षण कला सेवा संस्था.

    4) ‘मी संताजी बोलतोय’ व ‘संताजीची सावली यमुना’ या एकपात्री प्रयोगाचे लेखन व आयोजन, सादरीकरण.

    5) भरारी साहित्य संघ, ज. तु. साहित्य परिषद चंद्रपूर, अंकुर साहित्य संघ जिल्हासचिव चंद्रपूर, विदर्भ साहित्य संघ शाखा नागभीड द्वारा साहित्य कार्य व अनेक संस्था व संघटनांचा पदाधिकारी. समाजसेवा, बहुजन चळवळीचे कार्य, साहित्यसंमेलन आयोजन, कवीसंमेलन आयोजन, नवोदितांना साहित्य मार्गदर्शन, शैक्षणिक चळवळ व संघटनात्मक कार्य, अनेक संमेलनात कविता वाचन, कथा सादरीकरण, शैक्षणिक मार्गदर्शन व प्रबोधन.

    6) विद्याथ्र्याकरिता प्रयोगात्मक ‘इंग्रजी रिडींग पॅटर्न’ ची निर्मिती व पुस्तक रूपाने प्रकाशन करून अनेक शाळात इंग्रजी कमी वेळात व कमी श्रमात वाचता येणे याविषयी प्रात्यक्षिक सादर व व्याख्यान मार्गदर्शन करणे.

    7) विविध विषयावर व्याख्याता म्हणून सादरीकरण. संताजी जगनाडे महाराजांच्या जीवनचरित्राचे अभ्यासक, प्रवक्ते.

    पुरस्कार:

    महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड, विशेष राष्ट्रीय पुरस्कार 2018, विदर्भ युवा गौरव सन्मान, शिक्षण गौरव सन्मान, कर्मवीर भाऊराव पाटील सन्मान,  अंतरंग सन्मान, म. फुले राज्यस्तरीय शिक्षक सन्मान, बौद्धसमाज पंचकमेटी सन्मान, सर्वज्ञ साहित्यरत्न पुरस्कार, विविध साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक संस्थाकडून सन्मानित.

    Contents

    1.   घोड्यावर...

    2 .  पुण्यापासनं...

    3. मराठी मुलखात

    4. सुलतानशाहीनं आता

    5. संतूला बरीचशी..

    6. संताजीचं वय..

    7. विठोबा खेडला..

    8. तुकाराम महाराजांचं

    9. विठोबाच्या तेलघाणीचा

    10. संताजी तुकारामाची

    11. संताजीचं मन

    12. विजापूरच्या आदिलशहाचा

    13. संताजी तुकारामासवे

    14. वयाच्या पंचविसाव्या

    15. काही वर्षे लोटली

    16. सोळाशे अठ्ठावणचं साल

    17. संताजीला शिवरायांचे शौर्य

    18. संताजीला कळून चुकले

    19. संताजीचा व्यापार

    20. संताजीचा बाळोजी

    21. चाकण परिसरात

    22. सर्वत्र शोककळा पसरली

    23. संताजी महाराजाचं वय

    संक्षिप्त जीवनपट -

    Preface

    मी संताजी ... का लिहिली ?

    ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ संताजीचं चरित्र उलघडणारी ऐतिहासिक, सामाजिक, चरित्रात्मक पहिलीच कादंबरी मी माझ्या तेली समाजास नव्हे तर समस्त भारतीयांना अर्पण करतांना मला निश्चितच आनंद होत आहे कारण आजतागायत संताजीवर जे काही चरित्रात्मक पुस्तके इतर लेखकांच्यावतीने साकार झालीत ती अल्पपृष्ठांची होती. संताजीचे जीवनपट साकारणारं साहित्य तसं थोडक्यातच. चर्चेअंती कळलं की संताजीवर अजूनही कांदबरी व चित्रपट नाहीच. चित्रपट तर मी काढू शकणार नाही परंतु आजतागायत बहुतांश संतावर चित्रपट, कादंबरी निघालेल्या आहेत. मात्र संताजीला आदराने नमन करणारा समाज एवढा विपूल प्रमाणात आहे. त्यात लेखकही भरपूर आहेत परंतु पाहिजे त्या प्रमाणात संताजीच्या वाड्.मयाला स्पर्श झालेला नाही ही खंत होतीच. याच हेतूने मी चरित्रात्मक कादंबरी साकारण्याचा प्रयत्न केला व ही संताजीवरील पहिली कादंबरी संताजीच्या प्रेरणेतून व त्यांच्या विचारांच्या आदर्शातून साकार करण्याचे मी प्रयत्न केले.

    या पाच-सहा वर्षात अनेक गावखेड्यात समाजमंडळे सक्रिय कार्यरत झाली आहेत. गावोगावी संताजी जन्मदिन, पुण्यतिथी महोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे. संताजीची प्रेरणा व आदर्श जपणारा समाज निर्माण होतो आहे. मात्र खंत ती ही की संताजी हे तुकारामांच्या विचारांचे अनुसरण करणारे होते. त्यांचा कालखंड बघू जाता ते वैदिक प्रवाहाच्या विरोधी भूमिका वटविणारे, शोषित समाजाला प्रबोधनाची आस देणारे, समाजसापेक्ष जीवनाची दिशा देणारे खरे लढणारे संत होते. अर्थात ते ‘योद्धा’ होते हे मान्यच केल्या जात नाही.

    अजूनही संताजी त्यांचे चमत्कार, वारकरी संप्रदाय व देव, देवळांची भक्ती किंवा अंधश्रद्धात्मक मांडणीही मी अनेक साहित्य लेखकांच्या हस्ते साकार झालेली बघितली. आमचे संताजी महाराज हे मुळीच तसे नव्हते. हे संदर्भ साधनांच्या थोड्याशा निष्कर्षावरून सिद्ध होते. प्रयत्नवादी व विज्ञानवादी दृष्टिकोन असलेले संताजी आज मान्य करणे काळाची गरज आहे. तरच खरी संताजीची प्रेरणा आदर्श जपत आपला समाजविकास हेतू, कार्य सफल करू शकतो अन्यथा नाही आणि म्हणूनच ही संताजीची कादंबरी साकार करतांना मी बहुजनवादी विचारांचा परामर्श घेत संदर्भ जुळवत अत्यंत इतिहास क्लिष्ट न करता संताजीचे छोटे-मोठे प्रसंग घटना अगदी कल्पनारम्य रंगवित ही कादंबरी साकार केलेली आहे. त्यामुळे ही वाचनीय आहे, एकाच बैठकीत वाचावी व आवडेल अशीच आहे.

    अनेक नवे संदर्भ व संताजीचा शिवकाल यांचं साधम्र्य साधत संशोधन स्वरूपी मांडतोय याला सर्वस्व आधार आहे.

    कुठेही कल्पनातिरेक न करता जीवनचरित्राला न्याय द्यावा हीच भूमिका आहे. मात्र हे सगळं करतांना बहुजन दृष्टिकोन समोर ठेवून याकडे सकारात्मक बघितलं तर कळेल अन्यथा वैदिक रीतिपरंपरा मान्य करीत याकडे बघितलं तर ही कादंबरी आपणास अयोग्यच भासेल. असो हा वाचकांचा ज्यांचा त्यांचा प्रश्न ?

    कादंबरीत काय लिहिलं आणि ती किती सुदंर आहे वा कशी आहे हे सगळं वाचकांना अंतरंगात रसिकमग्न झाल्यावर कळेल व अभिप्रायही मिळेल. अंतरंगातील बाबीवर लिहिणे यादृष्टीने टाळणेच महत्त्वाचे ठरते.

     या कादंबरी प्रकाशन निमित्य मा. हरिश्चंद्र मेहर, मा. डॉ. श्रीकृष्ण देव्हारे नागभीड, यांचेही परीक्षण सूचना मला अत्यंत मोलाच्या ठरल्यात. त्यांच्याही सहकार्याचा मी ऋणी असेन कारण यांच्या सहकार्य व प्रेरणेनेच मी या विषयाला न्याय देवू शकलो आहे. तसेच विदर्भ तेली समाज महासंघ शाखा नागभीडचेही सहकार्य लाभलेले आहे.

    या कादंबरी निर्मितीत माझे ज्येष्ठ साहित्यबंधू पुनाराम निकुरे सर यांचेही मला अक्षर तपासणी ते चर्चात्मक मार्गदर्शन असे अथक सहकार्य मिळाले आहे. त्यांच्या सहकार्यानेच माझी साहित्यसेवा फुलते आहे परंतु मोठ्या बंधूचे आभार न मानता त्यांच्या ऋणातच राहणे योग्य ठरेल.

    कादंबरी लेखनातील परीश्रम व चिंतनात्मक एकांतवास कालखंड आठवतांना माझी कौटुंबिक परिस्थिती बघू जाता मला माझ्या सौ. संगीताने दिलेले सहकार्य व वेळ तसेच पार्थ, शिव, काव्य या तिनही मुलांचे राग, लोभ यासह केलेला सांभाळ बघू जाता माझी पत्नी मला संताजीची यमुनाच भासते आहे. संताजीसाठी झिजणारी यमुना व या संजयासाठी उभी राहणारी संगीता.... काय घरच्यांच आभार मानावं ?

    माझे भरारी प्रकाशन मित्र बंडू कत्रोजवार हा साहित्याची भरारी घडवणारा पडदयामागील खरा कलावंत आहे. त्याच्यामुळेच मी साहित्यश्रेत्रात मानाने उभा राहिलो आहे. त्याचं आभार तर नव्हेच...! पण सांगावसं वाटतं अगदी अनाथासारखं दुसऱ्याच्या भाकर तुकड्यावर जगतांना त्याने केलेला संघर्ष व आठआठ दिवस उपाशी राहात ब्रेड विकून ब्रेडचा भूरका चहा-पाण्यात बुडवून काढलेले दिवस याचा साक्षीदार मी आहे. दोघेंही थोड्याफार फरकाने असेच जगलोत. दोघांचेही जग सारखेच होते. जीवनातील साम्य तर विचारूच नये.... आज तू नाहीस......

    बंडू तुला देण्यासारखं तरी काय असेल बरे ! अरे, आभारानं तुझं नि माझंही पोट भरणार नाही याचीही मला जाणीव आहे. असो... आपल्या जन्मण्यातच आपल्या जगण्याचे संदर्भ आहेत. तू आणि मी तरी काय करू शकणार... समाजाचेही असेच... हे विषयांतर नव्हे ! हे जाणूनबुजून लिहितोय कारण आज माझा समाज अशा विदारक जगण्यातील क्षणांचा वाटेकरी आहे. हे मला ठावूक आहे.  माझा समाज खूप उन्नत झाला हे फक्त म्हणायला बरं वाटते. पण या उपाश्यापोटी तडपणाऱ्या चुलीकडे, समस्याग्रस्त बांधवांकडे कधी तरी बघू काय? कदाचित ही कादंबरी त्यातील आशय, स्वरूप या बाबीला प्रेरणा देईल असे मनोमन वाटते.

    मुद्रण, बायंडींग यांचेही आभार मानणे कर्तव्यच आहे.

    मुखपृष्ठकार माझे कवीमित्र बंसी कोठेवार पळसगाव (जाट) यांनी संताजीचे उत्तम असे चित्र स्वकल्पनेने ‘योद्धा’ ही संकल्पना लक्षात घेवून रेखाटन केले यातील नावीन्यपूर्णता बघता त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच असेल. समाजानेही त्यांचे हे मुखपृष्ठ मान्य करावे ही अपेक्षा आहे.

    कादंबरीत पृष्ठमर्यादा ठेवूनच लेखन झालेले आहे. काही बाबींची उणीव व कमतरता जाणवल्यास ती माझ्या स्वअभ्यासाची व लेखनशैलीची कमतरता आहे हे मी अगोदरच मान्य करतो. मी संताजीच्या अभ्यासकार्यात नवोदित लेखक आहे. तरीपण मी डोंगराऐवढे श्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चुका होणं स्वाभाविक आहेत. पुढे निदर्शनास आणून दिल्यास सुधारल्या जातील.

    एवढच नव्हे तर समाजातील सर्वांनी एकत्र येवून संताजी इतिहास संशोधन मंडळ नेमावे, राज्यभर संताजी साहित्य संमेलन व्हावेत असेही वाटते. पुढे यातूनच संताजीच्या कार्याचा प्रचार-प्रसार होवू शकतो तसे नवे ते साहित्य निर्माण होवू शकते. माझे यापरीने पुढेही प्रयत्न सुरू राहणार असून लवकरच मी संताजीच्या नव्या विषयाला समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

    कादंबरीच्या आगमनापूर्वीच प्रचंड चर्चा व उत्सूकता प्रसारमाध्यमाद्वारा झालेली आहे. चांगल्या, वाईट चर्चाही झाल्यात त्यात अत्यंत बारकाईने सुधारणा करूनच ही आवृत्ती साकार झालेली आहे. यातून संताजीचं जीवनचरित्र कादंबरीरूपाने कथासूत्रात बांधलेलं आहे. निव्वळ इतिहास न सांगता त्यांच्या जीवनचरित्राला रंजक स्पर्श करीत झालेलं लेखन आपणास निश्चितच आवडेल अशी मला खात्री आहे. यातून जे काही चांगलं मिळेल ती संताजीची प्रेरणा आहे. चुकलं ती माझी स्वचूक आहे. कथानकातील कालखंडही मी सोबत नमूद केला असल्याने वाचकास इतिहास कालखंड निश्चित लक्षात येईल. व प्रसंग समजण्यास सोपे जाणार आहे.

    एवढ्याशा कादंबरीने मी संताजी परिपूर्ण साकार केले असे मुळीच समजू नये परंतु जे यातून मांडण्यात आलं ते संताजीच्या प्रेरणा व आदर्शाची रूजवणूक होण्यास्तव व एक सृजनशील विचारांचा वारसा जपण्यास्तव ही निर्मिती आहे.

    जय संताजी !

     संजय विस्तारी येरणे.

    नागभीड. जि. चंद्रपूर   

    9421783528

    1.   घोड्यावर...

    घोड्यावर मांड घालून हातात तलवार, पाठीवर ढाल असलेले दहा-वीस घोडेस्वार टपाटप ... थबडक ... थबडक ... आवाज करीत गावाच्या अरूंद अशा खडकाळ रस्त्यातून अनपेक्षितपणे येत पसार झाले.

    गावातील बाया माणसं रस्त्याच्या कडेला खाली मान घालून उभी राहिली होती. कित्येक लोकं जीव वाचविण्याच्या प्रयत्नात हातची काम बाजूला टाकत लपून बसली. सगळी गावातील मंडळी आता घाबरली. होय ! असे अनेकदा व्हायचे, चौफेर सुलतानशाहीचं आक्रमण व्हायचं. सरदार, सेनापती वाटेल त्या गावाची लूट करीत समोर जात होती.

    ‘बरं झालं बाई ! गेलं वं ते....’

    वाड्यातील हौदावर पाणी भरणाऱ्या मथाबाईनं सोनाबाईला म्हटलं.

    ‘हो गं बाई ! मले वाटलं का आता आपल्या चाकणातच धुडगूस घालतेत की काय ?’

    सोनाबाईचा चेहरा असा गंभीरपणे पडला. घोड्यांच्या टापांनी रस्त्यांची धूळ सगळी अंगावर आणि पाण्यात गेली. सगळीकडे गुलालासारखं लाललाल रंग पसरला होता.

    ‘काय भेटत असेल व रयतेची लूट करून ? सोताला मोठे राजे समजतेत तं. आनं पोटापाण्याची भाकरही हिसकावून घेतेत. किडे पडून मरोत बेटे .... !’

    मथाबाईचा रागाचा पारा भडकला. तिनं माठातलं पाणी फेकलं. पुन्हा विहिरीतून पाणी काढलं. सोनाबाईनं हाताचा आधार देत मथाबाईच्या डोक्यावर माठ ठेवलं होतं. ती वाड्याच्या दिशेनं चालू लागली होती.

    मथाबाईला चालतांना थकवा जाणवू लागला. घरचं काम म्हणून ती आनंदानं करीत होती. मथाबाईची सासू गिरीजानं तिचा उतरलेला चेहरा पाहून तिला हळूच म्हटलं.

    ‘काय गं मथा, काय झालं असं. बरं नाही का ?’

    ‘नाही, थोडसं अंगपाय दुखायला आलं, पण आता बरं वाटतं बघा......’

    ‘एवढे सारे घरगडी माणसं असतांना कशाला गेलीस हौदावरून पाणी आणायला ? अशा दिवसात असं जड काम करायचं नसतं !’

    मथा सासूच्या बोलण्याला स्मित हसत नि पदराने तोंड पुसत माजघरात निघून गेली. मथाला आता दिवस गेले होते. जगनाडे घराण्यात सोन्याचा दिन लवकरच येणार होता. घराण्यात आनंदाचं वातावरण तयार झालं होतं.

    भिवाशेठ वाड्याच्या बैठकीतील पाळण्यावर अगदी चिंतातूर होत विचार करीत बसले होते. अलीकडूनच विठोबा झपाझप पावले टाकत घरात आले. ओसरीच्या समोर पायातील वहाण काढत धोतराच्या शेल्याला हाताने सरकावित डोक्यावरील पगडी काढून ठेवली. विठोबाचं आगमण झालं या चाहूलीने मथा घरातून बाहेर आली  पण विठोबाचं तिच्याकडे लक्ष गेलं नाही.

    ‘असं काय झालं जी ?’ मथानं विठोबाला विचारलं.

    ‘अहं ! काही नाही. पाणी घे जरा.’

    ‘पाणी’ म्हणताच मथाबाई घरात वळली. तिलाही मघाशी घडलेला प्रसंग आठवला होता. परक्या सुलतानी राजवटीनं रयतेचे चालविलेले शोषण आठवले. आज पुन्हा या कुटील घोडेस्वारीच्या आगमणाने विठोबानं आपली तेलघाणी बंद केली होती. गावात सगळीकडे सामसूम पसरली होती. विठोबाचंही मन आता या वाढलेल्या फिरंगीवृत्तीच्या  त्रासानं चिंतातूर झाले होते. आता यापासून सुटायचं कसं हाच एक प्रश्न सर्वांना पडत होता.

    ‘तेल घाणी बंद केलीस काय रं ?’ भिवाशेठनं आपल्या मुलाला विठोबाला विचारलं.

    ‘हो जी !’

    ‘कुणाकडं गेलेत रं लूट करायला ?’

    ‘गेलेत की पुण्याच्या दिशेनं, कुठं गेले ते कुणास ठावूक ?’

     भिवाशेठ आणि विठोबा बापलेक दोघेही बसून बोलत होती. मथाबाईनं पाणी दिलं. घशाला जणू या आक्रमणशाहीच्या धाकानं कोरड पडल्यागत विठोबा ढसाढसा पाणी पिऊ लागला.

    ‘अरे, हळू पी. ठसका लागेल ना !’ त्याची आई त्याला म्हणाली.

    ‘आई, या परक्या लोकांच्या जाचापेक्षा दुसरा कोणता मोठा ठसका आहे का गं ?’

    मथाबाई आपल्या नवऱ्याचं चाणाक्ष उत्तर पाहून हसली. तिला आपला नवरा गावाला संकटातून तारण्यास्तव विचार करतो. रयतेचं भलं व्हावं, सुखानं दोन घास खायला मिळावे असं त्याला मनोमन वाटतं या जाणिवेने ती अंतरंगातून फुलून गेली. तसं पाहता भिवाशेठचं हे सधन कुटुंब होतं. गावात भिवाशेठला चांगला मानसन्मान मिळायचा. या मध्यवर्ती गावातून आजूबाजूला जाणाऱ्या खेड्यातील रस्त्यामुळे इथं भरणारी बाजारपेठ व त्यातून भिवाशेठ व मुलगा विठोबाला या पंचक्रोशीतील सारेच लोक ओळखायचे. तेलघाणीच्या व्यवसायामुळं का असेना त्यांचा परिचय वाढला होता. भिवाशेठने बऱ्यापैकी जमीन कसायला काढली होती. दूधदुभतं, शेळया  मेंढ्या, गायी-बैलं, वासरं त्यांच्याकडे भरपूर होती. आता शेती आणि घरगुती कामाकडे तेवढं भिवाशेठ मजूराकरवी लक्ष दयायचा आणि विठोबा मात्र तेलघाणीच्या कामात अगदी तल्लीन होवून गढून जायचा.

    दुपारचं ऊन आता डोक्यावर येणार होतं. सकाळच्या हया धावपळीनं सगळयाची मनं विषण्ण झाली होती. गावातील चार-पाच ग्रामस्थ चिंतन, विचार करायला  भिवाशेठकडे आली. विठोबानं मात्र त्यांना दिलासा दिला होता.

    ‘आता कसं व्हायचं जी आपलं ?’ एकानं विचारलं.

    ‘पांडुरंग, पांडुरंग

    Enjoying the preview?
    Page 1 of 1