Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

College Days: Freshman To Sophomore कॉलेज डेज : फ्रेशमन टू सोफोमोअर
College Days: Freshman To Sophomore कॉलेज डेज : फ्रेशमन टू सोफोमोअर
College Days: Freshman To Sophomore कॉलेज डेज : फ्रेशमन टू सोफोमोअर
Ebook536 pages5 hours

College Days: Freshman To Sophomore कॉलेज डेज : फ्रेशमन टू सोफोमोअर

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

Funny light blistering aromatic moments of college life written by young author. experience of engineering students described in the fresh & light language of today's youth.
इंजिनीयरिंग कोलेज मधील आयुष्य त्यातील मजेशीर, हलके, धुंद, सुखद क्षण एका तरुण लेखकाच्या लेखणीतून

Languageमराठी
Release dateJul 31, 2015
ISBN9789381659168
College Days: Freshman To Sophomore कॉलेज डेज : फ्रेशमन टू सोफोमोअर

Related to College Days

Related ebooks

Reviews for College Days

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    College Days - Aditya Deshpande

    College Days Cover.jpg

    ISBN- 978-93-81659-16-8

    लेखक

    आदित्य देशपांडे

    daditya43@gmail.com | +९१९६१९३०५०२४

    © आदित्य देशपांडे - २०१५

    प्रकाशक

    सुनिता दांडेकर,

    सुकृत प्रकाशन

    ८४ शुक्रवार पेठ,

    प्रभुकृपा सोसायटी,

    पुणे - ४११००२

    दूरध्वनी: +९१ २० २४४५१५८४

    विपत्र: info@sukrutprakashan.com

    प्रथम आवृत्ती जुलै २०१५

    मांडणी

    प्रशांत दांडेकर

    मुखपृष्ठ

    अभय जोशी, पुणे

    पुस्तकातील सर्व मजकूराचे हक्क सुरक्षित आहेत. त्यातील मजकूर अथवा कुठल्याही भागाचे प्रकाशकाच्या लेखी परवानगीशिवाय प्रकाशन, पुनर्निर्मिती, संगणकीय प्रणालीद्वारे जतन वा इतर कश्याही प्रकारे वापर केला जाऊ शकत नाही.

    ----------

    All Rights Reserved. No part of this publication may be reproduced, stored, retrived by computer system in any forms by any means without prior written consent of publisher and licence holder.

    ----------

    ज्यांनी मला उत्तमोत्तम साहित्याची ओळख करून दिली, त्याची आवड लावली आणि मला हवं ते पुस्तक कधीही विकत घेण्याची मुभा दिली त्या माझ्या आई-वडिलांस अत्यंत आपुलकीने. तुमच्याशिवाय हा क्षण आयुष्यात आलाच नसता...

    मनोगत

    ‘शाळेतल्या निबंध आणि प्रश्नोत्तरांपेक्षा वेगळं, स्वतःचं असं काही लिहावं’ असं मला अगदी लहानपणापासून वाटत आलंय. पण ‘काय लिहावं?’ हा प्रश्न बहुतेक वेळा अनुत्तरीतच राहिला. जरा काही विचार करायला बसलं की ज्या गोष्टी आधीच वाचलेल्या आणि मनापासून आवडलेल्या असायच्या त्याच डोक्यात घोळायच्या. शिवाय मला घरच्यांनी अगदी लहानपणापासून वाचनाची आवड लावल्याने अशा गोष्टींची काहीच कमी नव्हती. आपलं असं काहीसं लिहायचं म्हणजे ते नवीन, अगदी स्वतःचं असायला हवं आणि असं काहीतरी लिहिणे म्हणजे काय अवघड चीज आहे, हे मी जसजसा लिहायचा प्रयत्न केला तसतसं माझ्या चांगलंच प्रत्ययास आलं. या प्रयत्नांतून मला लेखकांबद्दल अत्यंत आदर वाटायला लागला, आपण सहजगत्या, चवीने वाचत असलेल्या कथा लिहिताना लेखकाला किती त्रास सहन करावा लागत असेल याची चांगलीच जाण आली. आपणही काहीतरी लिहित सुटलं पाहिजे असं उगाच आपलं मला वाटलं आणि या निश्चयातून मी अनेक बंडल लघुकथा लिहण्याचा किंवा त्यांवर नुसता विचार करायचा तरी अगदी प्रयत्न मनापासून केला. यातल्या काही कथा कागदावर उमटल्या (आणि नंतर सरळ केराच्या टोपलीत गेल्या) तर काही फक्त मनातच राहिल्या. एवढं असलं तरी मी खूप मेहनत करून काही लिहितोय असं काही कधी झालं नाही. कारण लिहीलेलं कुणालातरी वाचायला द्यावं असं मला का कुणास ठाऊक मुळीच वाटलं नाही. माझ्या कथा जेमतेम पानभर असायच्या आणि त्यातली पात्रं मी आधीच वाचलेल्या कुठल्यातरी गोष्टी सारखी असायची. कित्येक कागद मी हरवले आणि टरकावले. क्वचित जाळले सुद्धा. कदाचित कुणाला ते आवडणार नाही ही लेखकांची नेहमीची भीती त्याला कारणीभूत असावी. कारण काय असेल ते असो, पण मी लिहिलेलं फारसं कधी कुणाला दाखवलंच नाही.

    प्रस्तुत पुस्तकातील कथा मात्र मी अगदी नेटाने वर्ष-दीड वर्ष लिहायचा कसून प्रयत्न करतोय. याची सुरुवात कशी झाली हे आठवलं की माझं मलाच नवल वाटतं. सप्टेंबर मधल्या एका शनिवारच्या त्या दमट-उष्ण आणि कंटाळवाण्या दुपारी मी सोफ्यावर रामदेव बाबांसारख्या विचित्र स्थितीत आडवा पडलो होतो. डाव्या पायाखाली मी आईचे आवडते अभ्रे घातलेल्या दोन उश्या दाबून धरल्या होत्या. उजवा पाय वर दुमडला होता. देह एका बाजूला अर्धवट कलंडला होता. कपाळावर घाम साचला होता. पंखा किरकिर आवाज करत गरम हवा अंगावर फेकत होता. एकंदरीत मुंबईची ती एक भुक्कड दुपार होती. महत्त्वाची एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे माझ्या हातात वुडहाऊसचं एक पुस्तक होतं. हा अचाट लेखक मला अफाट आवडतो आणि त्याला त्याने इंग्रजी भाषेचा अत्यंत सुंदर वापर करून निर्माण केलेली कॉमेडी हे एकच कारण नव्हे. दुसरं महत्त्वाचं कारण हे की त्याच्या कथा अगदी ‘लाईट’ असतात. वुडहाऊसच्या कुठल्याही कथेत किंवा लघुकथेत मंगळावरचे जीव उगाच आपला पृथ्वीचा विनाश करायला उठलेत किंवा कुठल्यातरी भुताळी हवेलीत खुनांवर खून होतायत आणि मग नायक असलेला निडर गुप्तहेर एकट्याच्या जोरावर या भुताळी हवेलीच्या तळघरातून चाललेल्या ड्रग्स किंवा सोन्याच्या तस्करीचा शोध लावून टोळीच्या म्होरक्याला गोळ्या घालून ठार करतो आणि त्याच म्होरक्याच्या सुंदर (पण निरागस, जिला आपल्या बापाचा ‘असली’ चेहरा हिरो आल्यावर कळतो) मुलीशी लग्न कसा करतो असं काहीच होत नाही. कित्येक प्रसिद्ध पुस्तकांमधील घटना इतक्या मोठ्या प्रमाणावरच्या असतात की मूळ कथानकाच्या आणि इतर पात्रांच्या भौतिक आणि भावनिक आयुष्यापेक्षा ‘आता मानवतेचा संहार होणार का नाही?’ अशा कुठल्यातरी प्रश्नाकडे वाचकांचं मन आकर्षित केलं जातं. अर्थात असल्या गोष्टींना माझा फारसा विरोध नाही म्हणा. जेम्स बाँड मीसुद्धा अगदी चवीने वाचतो. पण वुडहाऊसनी मला एक गोष्ट शिकवली. उत्कृष्ट कथा निर्मिती करण्यासाठी त्यातल्या घटना दिव्य भव्य किंवा जागतिक स्तरावरच्या असल्याच पाहिजे असं मुळीच नाही. साध्यातल्या साध्या प्रसंगांतून सुद्धा कथेसाठी एक उत्तम मंच उभा राहू शकतो. साध्यातली साधी संभाषणं सुद्धा सारखी वाचावीशी वाटू शकतात, कथेतल्या पात्रांचा अपघात होऊन ती मेली नाहीत तरी चालेल, त्यांचा खून करण्यात आला नाही तर उत्तमच, विमानांची अपहरणं झालीच पाहिजेत किंवा चक्रीवादळ आणि भूकंपांमुळे शहरं उध्वस्थ झालीच पाहिजेत असा काही नियम नव्हे. पुस्तकाच्या अखेरीस आयुष्य कसं व्यतीत करावं याबद्दल तत्त्वज्ञान लिहलं नाही तरी वाचक सुखावू शकतो. पात्रांमध्ये शुल्लक वाटणाऱ्या गोष्टीवरून एक साधा गैरसमज जरी झाला तरी त्यावर दोन-अडीचशे पानांची अप्रतिम गोष्ट लिहिता येऊ शकते हे प्रत्यक्षात बघून आणि वाचून मी तरी गार पडलो.

    त्या दुपारीच, तिथल्या तिथे, तसल्या उशी दाबून धरलेल्या त्या विचित्र अवस्थेत आपणही अगदी साध्या वाटणाऱ्या प्रसंगातून वाचाव्याशा वाटतील अशा गोष्टी लिहायचा जाम प्रयत्न केलाच पाहिजे असा मी निश्चय केला आणि त्याच क्षणी मी एक बॉलपेन आणि माझी अर्धी भरलेली अप्लाईड केमिस्ट्रीची (माझ्या केमिस्ट्रीच्या कुठल्याच वह्या कधीच पूर्ण भरल्या नाहीत) वही घेऊन टेबलावर बसकण मारली. खूप लिहायचं होतं. हातातलं पेन शिवशिवत होतं. कसलं काय? काही म्हणजे काहीच सुचलं नाही. खरंतर सध्या, दैनंदिन घटनांना मुळीच तोटा नाही. पण कुठल्याच साध्या प्रसंगाचं कथा वाटणाऱ्या कशातच रुपांतर माझ्याच्याने अगदीच होईना. ‘पात्र निर्मिती’ या प्रकारचा तर गंधही नव्हता. तीन दिवसांच्या विचारांती माझ्या टाळक्यात एक छोटीशी का होईना पण ट्यूब पेटली. माझं कॉलेज आयुष्य हा मंच धरून त्यावर कथा तयार केल्या तर? घटना साध्याच होत्या, माझ्या अनेक मित्रांचे स्वभाव, त्यांच्या अंगातल्या ना ना कळा मला उत्तम परिचित होत्या आणि कॉलेजचा, वर्गांचा कोपरान कोपरा मला ठाऊक होता. आश्चर्य म्हणजे एकदा स्टेज ठरल्यावर एकावर एक गोष्टी पटापट सुचायला लागल्या. आणि हो, यात एक मुद्दा मी आताच स्पष्ट करतो. हे पुस्तक म्हणजे माझं आत्मचरित्र किंवा सुखद-दुःखद किंवा कसल्याच आठवणी अजिबात नाहीत. पुस्तकातील बहुतेक पात्रं काल्पनिक आहेत. नावं खरी नाहीत, प्रसंग सुद्धा काही अपवाद वगळले तर खरे नाहीत. एकूण जरा विचित्रच प्रकार आहे म्हणा. गंमत म्हणजे मी या कथा लिहायला घेतल्या तेव्हा माझं इंजिनिअरींगचं तिसरं वर्ष सुरू होतं. अजूनही माझी डिग्री पूर्ण व्हायला सात आठ महिने उरलेत. म्हणूनच हे पुस्तक काही माझ्या इंजिनिअरींगच्या आयुष्याची गाथा वगैरे प्रकार मुळीच नाही. इंजिनिअरींगच्या विश्वाबद्दल ही इथे फारशी माहिती मिळणार नाही.

    आधीच म्हटल्याप्रमाणे मी या गोष्टींमध्ये मोठे अपघात (आणि मग नायकाची आणि आजकाल नायिकांची अर्धवट पुसली गेलेली स्मरणशक्ती), जगातल्या किंवा परग्रहावरच्या दुष्ट शक्ती, विनाश, अघोरी मृत्यू यातलं काहीच घातलेलं नाही. म्हणूनच तशी अपेक्षा ठेवणाऱ्या वाचकांनी इथेच हे पुस्तक मिटून ते कपाटात घालावं किंवा गिफ्ट रॅप करून कुणाच्यातरी वाढदिवसाला भेट म्हणून बेमालूम देऊन टाकावं. कौटुंबिक रडगाणी ( ‘डायव्होर्स आणि तत्सम’, ज्याची हिंदुस्थानात अजिबात कमी नाही) वाचू इच्छिणाऱ्यांनी ही इथून पुढे जाण्यात राम आहे असं मानू नये.

    आता इतक्या गोष्टी नसताना मग पुस्तक लिहिलंच का किंवा त्याचा उद्देश काय असा प्रश्न चिकित्सक वाचकांना पडणे नैसर्गिक आहे. वाचून झाल्यावर हे पुस्तक वाचलंच नसतं तर जास्त बरं झालं असतं असं वाचकांना वाटू न देणे आणि जमल्यास त्यांच्या घाई गडबडीच्या आयुष्यात थोड्या निखळ आनंदाची भर घालणे हा पुस्तकाचा सरळ साधा उद्देश आहे. यापेक्षा माझे कसलेही मोठे उदात्त हेतू नाहीत. या कथा वाचून तुम्ही किती हसाल हे माहीत नाही, पण हसाल हे नक्की!

    माझ्या लिखाणाचा प्रवास अत्यंत सुखदायी होता. कित्येकदा एक सबंध आठवडा मला साधी दहा वाक्यही सुचायची नाहीत तर कधीकधी मी पिसाटल्यासारखा चार चार तास लिहित बसायचो. एक मात्र नक्की. थोडसं जरी लिखाण झालं तरी मनाला एकदम प्रसन्न वाटायचं. आपण कागदावर उतरवायच्या आधी ही गोष्ट (भलेही बंडल का असेना) अस्तित्वात नव्हती, कुणालाही ती वाचता आली नसती पण आपण जरा कष्ट केल्यावर निदान काही लोकांचा थोडा वेळ तरी आनंदात जाणार आहे हा विचारच एक वेगळं समाधान देऊन गेला. लिखाण करणं साहसी वाटू लागलं. माझ्या वाचकांना मला कसलाही संदेश द्यायचा नाहीये. एक अपवाद वगळता. किती काहीही झालं, आयुष्यात कितीही गडबड असली तरी वाचनाकडे पाठ फिरवू नका. अनुभवा प्रमाणेच वाचनही आपल्याला जगण्याची ऊर्मी देतं. मला लिहण्याची ऊर्मी वाचनातूनच मिळाली. आपण वाचत असलेल्या बहुतेक कथा काल्पनिक असल्या तरी त्या माणसांच्याच असतात, आपल्याच असतात.

    खूप शुभेच्छा,

    आदित्य.

    आभार

    सगळ्यात आधी मला घरच्यांचे आभार मानायचेत. हे पुस्तक मी लिहायला घेतलं तेव्हा मी इंजिनिअरींगच्या तिसऱ्या वर्षात नुकताच शिरत होतो. जोरदार अभ्यास असायचा. अशा परिस्थितीत आपला कुलदीपक इंजिनिअरिंग नीट करायचं सोडून उगाच रात्र रात्र ‘मनोरंजक कथा’ नी ‘चुटकुले’ वगैरे लिहिण्याच्या भानगडीत पडलाय असं कळल्यावर बऱ्याच जबाबदार पालकांनी त्याला चांगला सोलून काढला असता. मी त्यांना दोष देत नाही. या भीतिपोटी म्हणा किंवा माझं लिखाण गुप्त ठेवण्याच्या सवयीमुळे म्हणा, बरेच दिवस मी काहीतरी लिहितोय हे मुळी घरच्यांना सांगितलंच नाही. कित्येकदा मी परीक्षेच्या आदल्या रात्री लिहित बसे. पण चुकून एकदा माझी वही आमच्या मातोश्रींच्या हाती अगदी साखरेच्या डब्यासारखी लागली आणि माझं पितळ उघडं पडलं. हे कळल्यावर उलट त्यांनी मला हा प्रोजेक्ट पूर्णत्वास नेण्यासाठी जोरदार पाठिंबा दिला. अधूनमधून त्यांच्या प्रीतीक्रिया दिल्या. शेवटी शेवटी मला तर लिखाण करून ते दुरुस्त वगैरे करण्याचा वीट आला होता. त्यावेळी तर आई मला चक्क ओरडायची. ‘घरभर घिरट्या घालण्यापेक्षा बस एका जागेवर शांत आणि पूर्ण कर ते’ असल्या शब्दात ती मला लिहायला लावायची. माझ्या बहिणीने सुद्धा तिच्या आर्किटेक्चरच्या अतिशय वेळखाऊ असणाऱ्या अभ्यासातून माझ्या गोष्टींसाठी वेळ दिला. या सगळ्या मुळेच मला हा प्रोजेक्ट पूर्ण करणं शक्य झालं. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच.

    सुकृत प्रकाशनाच्या सुनीता दांडेकरांनी माझ्यासारख्या नवीन लेखकाला दिलेल्या पाठींब्याशिवाय हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचलंच नसतं. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

    अनुक्रमणिका

    पहिल्या दिवशी काय झालं?

    क्लास ऑफ २०१४

    टेस्ट क्रमांक एक

    प्रोग्रॅमिंग, कागद आणि फडके

    हॉस्टेल

    जेम्स

    रजनी

    दामलेची गर्लफ्रेंड क्रमांक दोन

    फेसेस

    चिरमुल्याच्या घरात

    स्टार गेझिंग

    व्होडका

    पहिल्या दिवशी काय झालं?

    आयुष्यात आपण अनेक गोष्टी अशा करत असतो की ज्याचं सुरुवातीला काही फारसं महत्त्व वाटतच नाही. त्या गोष्टी करण्यातून आपल्या आयुष्याला काही कलाटणी वगैरे मिळेल असं मुळीच वाटत नाही. वर वरून त्या साध्याच वाटतात. ट्रेनमधून रोज प्रवास करणं, ऑफिसात जाणं, दुकानातून वस्तू विकत आणणं इत्यादी कुठल्याही सध्या वाटणाऱ्या गोष्टींतून आपल्याला फारशी काही अपेक्षा नसते. पण कधीकधी मात्र या साध्या गोष्टी करताना आयुष्य पार कुठच्या कुठे बदलून जातं. असं काही झाल्यावर मग आपण त्या गोष्टीचा, त्या मोक्याच्या वेळी आपण घेतलेल्या निर्णयाचा विचार करत राहतो. कित्येक वेळा आयुष्यभरासाठी. मी रस्ता ओलांडला नसता तर?......माझा मुलगा अमेरिकेला गेलाच नसता तर?...त्या वेळी मी जराशी रिस्क घेतली असती तर?......मी लग्नच केलं नसतं तर(!!)?.....

    माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला एक प्रश्न सतावतो....मी सेंट मार्क्स कॉलेजमधे पाय ठेवला नसता तर?....................

    एक गोष्ट नक्की झाली असती. मी हे पुस्तक लिहिलं नसतं.

    या कॉलेजमधे शिरल्यावर मला इतके विचित्र आणि अफाट अनुभव आले की खरं सांगायचं तर त्यावर मी अजून दोन खंड लिहू शकेन.

    इंजिनिअरिंग म्हटलं की भारतातल्या सर्वोत्कृष्ट संस्था म्हणजे अर्थात आयआयटीची किंवा एनआयटीची कॉलेज. पण इथे प्रवेश मिळणं म्हणजे कर्मकठीण प्रकार असतो. फारच थोड्या लोकांना त्या प्रवेशपरीक्षा पास करणं जमतं. अशा काही मोजक्या सर्वोत्कृष्ट संस्था सोडल्या की मग बहुतेक मुंबई विद्यापीठाचा नंबर लागतो. सेंट मार्क्स कॉलेज इंजिनिअरिंग क्षेत्रातलं मुंबईतलं एक चांगल्यापैकी कॉलेज मानलं जाई.

    इथल्या विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर अमीर खानच्या ‘3 इडियट्स’ सिनेमातला एक किस्सा आठवतो. सिनेमातल्या सर्वोच्च इंजिनिअरिंग कॉलेजचा मुख्याध्यापक अर्थात बोमन इराणी उर्फ व्हायरस, नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला एक लेक्चर देऊन आयुष्यात सतत कराव्या लागणाऱ्या ‘रेस’बद्दल भाषण ठोकतो. त्या कॉलेजात प्रवेश न मिळवू शकलेल्या, रेसमधे हरलेल्या अभागी जीवांची तुलना कोकिळेच्या पिलांनी जन्माला आल्याबरोबर आपल्याच घरट्यात असलेल्या इतर अंड्यांना ढकलून फोडण्याशी करतो. यातले काही अभागी जीव किंवा ती फुटलेली अंडी म्हणजे सेंट मार्क्सचे विद्यार्थी होत.

    सेंट मार्क्सचं क्राऊड एकदम मिक्स होतं. म्हणजे इथे काही प्रचंड हुशार विद्यार्थी होते, काही ठीकठाक होते आणि काही बेक्कार, ‘प्रगती हवी’ असा शेरा असणारे होते. सेंट मार्क्सचं एक वैशिष्ट्य असं की इथे मैदानी खेळांना खूप महत्त्व दिलं जाई आणि कुठल्याही खेळात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेल्यांसाठी खास राखीव जागा असत. कॉलेजला स्वतःची हॉस्टेल असल्यामुळे अगदी जम्मू किंवा मिझोरामहूनसुद्धा विद्यार्थी येत. एकूण इथे जैविक विविधता अगदी भरपूर असायची.

    सेंट मार्क्स कॉन्व्हेंट होतं आणि अर्थातच इथले नियम बऱ्यापैकी कडक होते. इथे वावरल्यावर काही दिवसातच मला कळून चुकलं की इथल्या पेक्षा कडक नियम फक्त ब्रिटन मधल्या प्रसिद्ध ‘ईटन’मधेच असावेत.

    पहिल्या दिवशी मी सेंट मार्क्सच्या मुख्य दरवाज्यापाशीच अडवलो गेलो. मी गेटच्या आत शिरणार तसा एक धिप्पाड माणूस माझ्या एकदम समोर आला. त्याच्या फिकट निळ्या युनिफॉर्म वरून बहुधा हा गेटचा पहारेकरी असावा इतका मी आपला बरोबर अंदाज बांधला. हा माणूस इतका धिप्पाड आणि राकट दिसत होता की त्याने मला एखादी मुस्काटात भडकावली असती तर माझे कमीत कमी तीन दात कवळी सारखे अलगद माझ्या हाती आले असते.

    ‘आय.डी किधर है तुम्हारा?’ उलट तपासणीचा कडक सूर लावत त्याने सवाल केला. आता कॉलेजचा पहिला दिवस असल्याने माझ्याकडे आय.डी कुठून येणार? पण मी इतका दचकलो होतो की त्याला तसं सांगायच्या ऐवजी मी आपला येडपटासारखा शर्टाचे आणि पँटचे खिसे नसलेल्या आय.डीसाठी कसून तपासू लागलो.

    ‘बिगर आय.डी के घुसता कैसे तुम अंदर? हैं....कहां है आय.डी?’ त्या शिपायाने असा काही आवाज चढवला की मी म्हणजे जणू राष्ट्रपती भवनात तोफ घेऊन गुपचूप घुसत होतो. शेवटी मी त्याला धीर करून सांगितलं की मी एक फ्रेशर आहे आणि माझ्याकडे आय.डी वगैरे काही नाही.

    ‘अँ? नया बाईच? काय रे कैलास, नया बच्चा आजसे आना शुरू है क्या?’

    कैलास हा मुख्य गेटचा शिपाई क्रमांक दोन ढोलीतून घुबड बाहेर यावं तसा समोरच्या धिप्पाडामागून पुढे आला. इतका वेळ हा तिथेच मागे उभा होता आणि मला दिसलाच नाही. त्याला बघितल्यावर मला याचं कारण ध्यानी आलं. कैलास या शिपायाच्या फक्त नावातच कैलास होतं. जेमतेम पाच फुटी असलेल्या या मानवाचा देह इतका फुसका होता की उलट दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याचाही त्याला त्रास होताना दिसला. नाझींच्या छळछावण्यांमधले उपाशी कैदीही त्याच्यापुढे सुधृढ वाटावेत.

    धिप्पाड शिपायाच्या प्रश्नावर त्याला काहीतरी बोलायचं होतं पण तेही करताना त्याला त्रास होताना दिसला. थोडा विचार करून, काहीतरी आठवल्यासारखं करून आणि धिप्पाडाला एका बोटानी एक सेकंद गप्प राहण्याची खूण करून त्याने गेटच्या कोपऱ्यात लावलेल्या तगरीखाली तोंडात दाबून धरलेल्या पानाची पिचकारी सोडली आणि पाच शब्द उच्चारले,

    ‘हम तुमको बताना भूल गया...’

    हे वाक्य बहुधा धिप्पाडानी तीस हजाराव्यांदा ऐकलं असावं. कारण कैलासच्या या उत्तरावर धिप्पाडानी त्याच्याकडे अशी कडवट नजर टाकली की ‘सांगायचं वेळेवर विसरणे’ हा कैलासचा गुणधर्म असावा आणि असंच चालू राहिलं तर एक दिवस मागून बिबळ्या आला तरी कैलास त्याला दहा मिनिटं उशीराच सांगणार याची त्याला खात्री वाटत असावी. कैलासने तोंड फिरवलं आणि तो परत धिप्पाडाच्या मागे गेला. धिप्पाडाला जरा शरमल्यासारखं झालं आणि त्याने माझी माफी मागून मला आत जाऊ दिलं.

    ‘जाव अंदर....वैसेभी स्टुडंट्स के सिवा यहा कौन गधा आना चाहेगा?’ मी घाईघाईने आत जाताना तो म्हणाला. या निरर्थक वाटणाऱ्या वाक्याचा अर्थ किती गहन आहे याची प्रचीती मला तीन आठवड्यानंतर आली.

    गेट ओलांडून मी कॉलेजच्या मुख्य पटांगणात जसा आलो तसं मला विद्यार्थी अगदी शिस्तबद्ध रांगांमधे उभे असलेले दिसले. ‘आता हा काय प्रकार आहे?’ या मनात आलेल्या प्रश्नावर मी जरा विचार करणार तोच मला एका जवळ उभ्या असलेल्या शिक्षकाने शेवटच्या ओळीत उभं राहण्याची खूण केली. बहुधा कवायत होणार होती.

    पण सुदैवाने नाही झाली. सेंट मार्क्समधे रोज सकाळची पंधरा मिनिटं प्रार्थनेसाठी राखून ठेवण्यात येत. अगदी रोज. हिवाळा, पावसाळा काहीही असो. या प्रकारात पहिली पाच मिनिटं शांतता पाळण्यात येई. दिवसाची सुरुवात शांततेत पाच मिनिटं मनन करून व्हावी असा उदात्त हेतू यामागे असला तरीही नव्वद टक्के उभे असलेले, चौदा तास एकमेकांपासून लांब, आपापल्या घरी राहिलेले अतृप्त आत्मे एकमेकांशी मागच्या चौदा तासांत त्यांच्या जीवनात काय गोष्टी घडल्या (ज्या काही अपवाद वगळता तद्दन भंपक असत), त्यावर तावातावानी बोलण्यासाठी इतके आतुर झालेले असत की त्यांना ही शांतता नकोशी वाटे. हा काळ स्मशानात काढल्यासारखा वाटे. या शांततेच्या कालखंडात कुजबुजायचा प्रयत्न करणाऱ्याला देखरेख करणारे शिक्षक लगेच कॉलरला धरून वेगळं काढत.

    पाच मिनिटांची शांतता पाळल्यावर मग प्रार्थना घेण्यासाठी उभे असलेली चार मुलं दिनविशेषापासून सुरुवात करत. ‘टुडे इज द वन ट्वेंटी सेवन्थ डे ऑफ ग्रेगोरियन कॅलेंडर. देअर आर टू थर्टी एट डेज रीमेनिंग फॉर द एंड ऑफ धिस इअर....’ अशी ती भयाण सुरुवात असायची. हे नेहमीचं वाक्य म्हटल्यावर मग मागच्या पाच हजार वर्षांत आजच्या दिवशी काय विशेष झालं याचा लांबलचक पाढा वाचण्यात येई. हा प्रकार कुणीच चुकूनही ऐकल्यासारखं करायचं नाही. मग बातम्या वाचल्या जायच्या. जागतिक घडामोडींऐवजी यात लोकल बातम्यांवरच भर देण्यात येई. याचं कारण मला आजतागायत उमजलेलं नाही. तीन-चतुर्थांश वेळा या बातम्यांना काहीसुद्धा अर्थ नसे. याचे काही नमुने मला आठवतात- १. सेक्टर चारमधल्या दाते ज्वेलर्सचं दुकान दोन भामट्यांनी मागच्या भिंतीला साधारण एकशे चार सेंटिमीटरचं भगदाड पाडून साफ केलं (हे भगदाड पुढचे काही दिवस शहरातला एक टुरिस्ट स्पॉट झाला होता. मीही बघून आलो. ‘भगदाड’ शब्दाला लाजवेल असं काम त्या ठगांनी केलं होतं.) २. चंदू सापळे या चिडक्या हवालदाराने इन्स्पेक्शनच्या वेळी त्याच्या वरिष्ठ असलेल्या इन्स्पेक्टर वांगे यांना कमिशनर लांडगे यांच्यासमोर थोबाडीत मारली. त्यामागचे हेतू अजून उघडे झालेले नाहीत... ३. मेमोरियल हॉस्पिटलमधे सर्जन असलेले डॉक्टर कोल्हे हे गेल्या अडीच वर्षांपासून गैरमार्गाने (अर्थात पेशंटला न कळवता) किडनी विकण्याच्या धंद्यात सामील असल्याची सनसनाटी घटना समोर आली आहे. असं आजपर्यंत फक्त हॉलीवूडच्या सिनेमांत पाहिलं होतं (म्हणजे काय? भारतातल्या लोकांना किडन्या नाहीत की काय?), ४. लाचखोर नगरसेविका पतीसह अटकेत, इत्यादी इत्यादी. अशा लोकल बातम्यांनी उबग आल्यावर मग मधेच ‘भारतीय हॉकी टीमची इंग्लडमधे धूळधाण’ अशा आशयाची एखादी बातमी यायची. असल्या बातम्यांवर बहुधा टाळ्या वाजवल्या जायच्या. शेवटी राष्ट्रगीतानी प्रार्थनेचा एकदाचा शेवट होई. हा प्रकार सगळ्याच विद्यार्थ्यांना न आवडण्याचं मुख्य कारण होतं-घाम! असं शिस्तबद्धरीत्या जवळपास साडेआठशे लोकांच्या मधे पाच मिनिटं जरी उभं राहिलं तरी अगदी घामाघूम व्हायला होई आणि मग अनेकदा विद्यार्थ्यांनी जाहिरातीत बघून घेतलेल्या आणि भरमसाठ मारलेल्या बॉडी स्प्रेचे वास या घामाच्या वासात मिसळून तिसरा असा वास निर्माण होई की ज्याचं वर्णन करायला ‘भयानक’ या शब्दावाचून मार्ग नाही.

    रांगेतून वर्गात जाताना बाजूलाच गस्त घालत असलेल्या शिक्षकांकडून आय.डी परत चेक केला जाई. तो कायम गळ्यात घातलाच गेला पाहिजे असा सेंट मार्क्सचा कट्टर नियम होता. खिशात ठेवून भागायचं नाही. जर कुठल्याही शिक्षकांनी तुम्हाला उघड्या गळ्यासकट पाहिलं की मग पुढे ते जाम त्रास देत. प्रार्थनेच्या वेळी असं झालं तर तुम्हाला लगेच बाजूला काढलं जाई आणि एका चोपडीत तुमचं नाव लिहून घेतलं जाई. पुढच्या वेळी तुम्ही असं मागच्या वेळी कधी केलं होतं हे तुम्हाला सुनावण्यात येई. जरा दोन्ही वेळांच्या मधे पंधरा दिवसांपेक्षा कमी वेळ असेल तर तुम्हाला कॉलेज सुटल्यावर एका वर्गातल्या दोन पंख्यांची साफसफाईचं काम सोपवण्यात येई. याचीही नोंद त्या चोपडीत तुमच्या नावापुढे होई. विकृत आणि भयंकर प्रकार वाटतो पण आम्ही तो सहन केलाय. असला प्रकार असताना अर्थातच शंकर आपल्या गळ्यातल्या नागोबाची जेवढी काळजी घेत नसेल तेवढी आम्ही त्या आय.डीची घ्यायचो. .

    मी माझ्या वर्गात लेक्चर सुरु व्हायच्या दहा मिनिटं आधी गेलो ही कदाचित माझ्या आयुष्यातली मोठी चूक होती. मी वीस मिनिटं आधी जायला हवं होतं. वर्ग जरा रिकामा असताना. म्हणजे कुठे बसायचं हे मला ठरवता आलं असतं. पण ते माझ्या नशिबी नव्हतं म्हणायचं. मी गेलो तेव्हा वर्ग पूर्ण भरला होता. इंजिनियरिंगचा पहिला दिवस असाच अतिउत्साही आत्म्यांनी भरलेला असतो. मला बसायला जागाच मिळेना. फक्त पहिल्या रांगेत शेवटच्या बेंचवर एक जागा रिकामी होती. एक मुलगा तिथे आधीच बसला होता. इथे नमूद करायला हवं की कुठल्याही जागेवर बसण्याच्या दोन पद्धती असतात-एक म्हणजे अर्थात बसणे आणि दुसरं म्हणजे विराजमान होणे. त्या बसलेल्या मुलाने दुसरी पद्धत अवलंबली होती. तो मस्त बाजूलाच असलेल्या भिंतीला टेकून बेंचवर आडवा पाय टाकून बसला होता. त्याच्या उजव्या हातात अर्थी संपलेली फ्रुटीची बाटली होती. त्याने माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं आणि फ्रुटीचा एक सिप मारला.

    ‘मे आय सीट?’ जरा कणखर आवाजात मी माझं इंग्रजी पाजळलं.

    ‘बाय ऑल मीन्स..’ आपलं बूड जराही न हलवता फ्रुटीचा अजून एक सिप मारत तो थंडपणे म्हणाला. मी आपला चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव आणून तसाच उभा राहिलो. त्याने परत एकदा माझ्याकडे बघत स्मित केलं आणि फ्रुटीचा अजून एक सिप मारला. आता मात्र अतीच होत होतं.

    ‘अहम..अहम..’

    हे ऐकून मात्र त्याची ट्यूब पेटल्यासारखी वाटली आणि त्याने ‘ओह..सॉरी..’ हे ‘अहम..अहम’ वर असणारं नेहमीचं उत्तर देऊन आपला पाय मोकळ्या जागेवरून काढला आणि मला बसायला जागा करून दिली. मी बॅग ठेवून टेकतो न टेकतो तोच त्याने त्याचा चेहरा एकदम

    Enjoying the preview?
    Page 1 of 1