Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग २
आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग २
आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग २
Ebook473 pages2 hours

आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग २

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

हे पुस्तक म्हणजे दैनिक प्रत्यक्ष मधून 'चालता बोलता इतिहास' या मालिकेत प्रकाशित झालेल्या लेखांचा चिरंतन असा संग्रह आहे. ज्येष्ठ, अभिनव उद्योजक प्रभाकर देवधर, महाराष्ट्रातील सहकारी चळवळीतील आदरणीय व्यक्तिमत्व बाळासाहेब विखे-पाटील, ज्येष्ठ सामाजिक नेत्या मृणालताई गोरे, पुस्तक प्रकाशक अनिल फडके, वृत्तपत्र आणि वितरण संस्थेचे मालक मुरलीधर शिंगोटे या व्यक्तींच्या जीवनातील लक्षवेधी कामगिरीचा वेध या पुस्तकात घेतला आहे.

Languageमराठी
Release dateMay 8, 2019
ISBN9781393549574
आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग २

Related to आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग २

Related ebooks

Reviews for आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग २

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    आधुनिक इतिहासाचे मानबिंदू - भाग २ - Jitendra Rangankar

    प्रस्तावना

    ऐकल्याशिवाय बोलता येत नाही.

    यश जाणल्याखेरीज यशस्वी होता येत नाही.

    प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे जवळून

    बघण्यासाठी व जाणण्यासाठी...

    येत आहे - दैनिक ‘प्रत्यक्ष’

    दैनिक ‘प्रत्यक्ष’ची सुरूवात होण्याच्या काही आठवडे आधी या येऊ घातलेल्या वर्तमानपत्राची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्यातल्या या वाक्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. १५ डिसेंबर २००५ रोजी दैनिक ‘प्रत्यक्ष’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. या पाहिल्या अंकात ‘चालता बोलता इतिहास’ नावाचं सदर देण्यात आलं होतं आणि यातली पहिली लेखमाला होती, विख्यात सिनेसंगीतकार प्यारेलाल शर्मा यांची.

    पहिल्या अंकापासूनच ‘चालता बोलता इतिहास’ला वाचकांनी उचलून धरलं. पुढे या सदरातून विविध क्षेत्रात प्रचंड कर्तृत्त्व गाजविणारी ‘उत्तुंग व्यक्तिमत्त्व’ वाचकांना भेट देत राहिली. कित्येक वर्षे उलटल्यानंतरही या सदरातल्या लेखमाला नव्याने वाचण्याची इच्छा आहे, असे सांगणार्‍या वाचकांशी भेट होत राहिली. आपल्या नातलग किंवा मित्रांनाही ती लेखमाला वाचायची आहे. त्यासाठी जुने अंक मिळतील का? अशी विचारणा त्यांच्याकडून होत असे.

    वाचकांकडून केली जाणारी जुन्या अंकांची मागणी, वर्तमानपत्रात कार्यरत असणार्‍यांसमोरच्या खडतर आव्हानांपैकी एक मानलं जातं. त्यामुळे लवकरच या लेखमालांचं पुस्तक प्रकाशित होणार आहे, असं सांगून आपली सुटका करून घेणं भाग होतं. पण ही मागणी वाढत गेली आणि पुस्तक प्रकाशित करणं अनिवार्य आहे, याची जाणीव झाली.

    ‘आधुनिक इतिहासाचे मानबिंदू’च्या दोन्ही भागांची इंटरनेट आवृत्ती प्रकाशित करीत असताना, बर्‍याच वर्षांपासून प्रलंबित असलेली वाचकांची मागणी पूर्ण होत आहे. यामुळे ‘त्या’ उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची पुन्हा एकदा आणि एकत्र भेट घेण्याची संधी वाचकांना मिळत आहे, यासारखी दुसरी समाधानाची बाब नाही.

    मात्र ही पुस्तके प्रकाशित करीत असताना, एक गोष्ट आवर्जुन सांगायला हवी. काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या या लेखमाला विशेष बदल न करता, त्याच स्वरुपात वाचकांसमोर मांडण्यात आल्या आहेत. यातले स्थळकाळाचे संदर्भही तसेच ठेवण्यात आले आहेत. सुजाण वाचक याची नक्कीच नोंद घेतील.

    वाचकांच्याच मागणीमुळे प्रकाशित झालेल्या या पुस्तकासाठी खरेतर वाचकांचेच मनःपूर्वक आभार व्यक्त करणे श्रेयस्कर ठरेल. ‘आधुनिक इतिहासाचे मानबिंदू’चा पहिला व दुसरा भाग प्रकाशित करीत असताना, यामागे असलेली वाचकांची भूमिका कधीही विसरता येणार नाही.

    जितेंद्र रांगणकर

    - संपादक, दै.‘प्रत्यक्ष‘

    ◆◆◆

    मुरलीधर शिंगोटे

    (वृत्तपत्रसमूह)

    ◆◆◆

    ‘मराठा’ हे आपलं वृत्तपत्र सुरू करताना आचार्य अत्र्यांनी जबरदस्त विधान केलं होतं. वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय घेऊन आपण फार मोठं धाडस करीत आहोत, याची अत्र्यांना पूर्ण जाणीव होती. म्हणूनच ‘या निर्णयामुळे आमचे मित्र चिंतित झाले आहेत आणि शत्रू आनंदित झाले आहेत’ असं विधान अत्र्यांनी केलं होतं. थोडक्यात, वृत्तपत्र काढणं अवघडच. पण ते चालवणं, त्याचा विस्तार करणं त्याहूनही खडतर आव्हान. पण अशी ‘आव्हानं’ स्वीकारून मुरलीधर शिंगोटे यांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. ‘शून्यातून विश्‍व निर्माण केलं’ यासारखे वाक्प्रचार नेहमी आपल्या कानावर येत असतात. पण त्याची प्रचिती क्वचित कधी येत असेल. वृत्तपत्रसृष्टीत ‘बाबा’ म्हणून संबोधले जाणार्‍या शिंगोटे यांची आजवरची वाटचाल पाहिली, तर खरोखरच ‘शून्यातून विश्‍व’ म्हणजे काय, याचा अनुभव येऊ शकेल. वृत्तपत्र विक्रेत्यापासून वितरक आणि वितरकांपासून वृत्तपत्रांच्या समूहाची मालकी हा बाबांचा प्रवास कुणालाही चकित करील, इतका थरारक आहे. दैनिकांचं महाराष्ट्रभर चोख वितरण करणारे आघाडीचे वितरक म्हणून बाबांनी लौकिक मिळवला आहेच. पण त्याचबरोबर ‘श्री अंबिका प्रिंटर्स अँड पब्लिकेशन्स’ची ‘मुंबई चौफेर’, ‘वार्ताहर’, ‘पुण्यनगरी’ ही मराठी वर्तमानपत्रे, ‘यशोभूमी’ हे हिंदी, तर ‘कर्नाटक मल्ला’ हे कन्नड वर्तमानपत्र आपल्याला पेपर स्टॉल्सवर दिसतात. वितरण आणि वृत्तपत्रांच्या समूहाचं हे साम्राज्य गेल्या पाच दशकांमध्ये उभं राहिलं. पण त्यामागे बाबांचे अविरत कष्ट आणि दूरदृष्टी असल्याचं वारंवार जाणवत राहतं. खिशात पंधरावीस रुपये घेऊन मुंबई गाठणार्‍या मुलापासून ते महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय असलेल्या वृत्तपत्र समूहाच्या मालकीपर्यंतचा बाबांनी केलेला प्रवास आपण पाहणार आहोत ‘चालता बोलता इतिहास’ मध्ये.

    ◆◆◆

    सुरुवातीचा प्रवास

    (दि. २३ मार्च, २०११)

    माझ्या वडिलांचं नाव अनंता दगडू शिंगोटे. ते गवंडीकाम करायचे. आईचं नाव गयाबाई. ती घर, शेती सांभाळायची. आम्ही चार भाऊ, चार बहिणी. ह्या सार्‍या कुटुंबाचा उदरनिर्वाह वडिलांच्या गवंडीकामावरच चालायचा. त्या काळात सिमेंट नव्हतं, चुन्याचा वापर करून घर, विहिरी वगैरे बांधल्या जायच्या. त्यासाठी गवंड्यांना फार मागणी होती. या कामासाठी वडिलांना तब्बल पाच रुपये रोज मिळायचा. हा काळ १९५० सालचा. त्यामुळे पाच रुपयाला फार मोठी किंमत होती. आमच्या कुटुंबाचं अगदी मस्तपैकी चाललेलं होतं. 

    माझं शिक्षणाकडे फारसं लक्ष नव्हतं. आमच्या गावकडची काही माणसं पोटापाण्यासाठी मुंबईत आली होती. ही मंडळी काही दिवसांनी गावी आली की अगदी रुबाबात वावरत. त्यांचे चकचकीत कपडे पाहून मलाही मुंबईचे वेध लागले. चौथी पास झाल्यानंतर मी शाळा सोडली. दोनचार वर्ष मी शेण्या वळण्यापासून ते शेतात मजुरी करण्यापर्यंत बरंच काही केलं. बुवाशेठ दांगटांच्या शेतात खड्डे खणण्याचं काम करून मी काही पैसे कमावले होते. तीन ते चार रुपये रोजीने मिळालेले पैसे मी साठवले. पंधरावीस रुपये साठल्यानंतर मी मुंबई गाठायची, असं ठरवून टाकलं.

    याबद्दल कुणाला घरात सांगायची सोय नव्हती. पोटापाण्यासाठी मुंबईत जाण्याची आम्हाला गरज नव्हती. त्यामुळे केवळ चांगल्या कपड्यांच्या आकर्षणापोटी माझं मुंबईला जाणं, कुणालाही पटणारं नव्हतं. शिवाय तिथे जाऊन काय करायचं, कुठे राहायचं तेदेखील ठरलेलं नव्हतं. म्हणून घरच्यांच्या कानावर ही गोष्ट पडली असती, तर त्यांनी मला जाऊच दिलं नसतं, हे मला पक्कं ठाऊक होतं. 

    नारायणगाव ते तळेगावपर्यंत एसटीचं तिकीट काढून प्रवास केला. एसटीत तिकिटाशिवाय प्रवास करता येत नाही. पण रेल्वेत ते शक्य असतं. तळेगावपासून मुंबईपर्यंतचा प्रवास मी तिकीट न काढता केला. इथे कुणाकडे राहायचं वगैरे ठरलं नव्हतं. पण भायखळा स्टेशनवर मला शाळेतले एकदोन मित्र भेटले. सँडहर्स्ट रोडला किसन मारूती हांडे हा माझा जोडीदार दिसला. त्याने माझं मुंबईत मनापासून स्वागत केलं. हॉटेलमध्ये नेलं, नाश्ता दिला. त्या काळात भायखळा मार्केटला आमच्या गावाकडचे बरेच लोक होते. त्यांच्या ओळखीने मी बाजारात राहिलो. 

    सुरुवातीच्या काळात मी मोसंबी विकत असे. हे कुणी शिकवलं नव्हतं, स्वतःच्याच डोक्याने मोसंबी विकण्याचा धंदा सुरू केला. एकदोन डझन मोसंबी विकत घ्यायची आणि फेरीत ती विकायची, यात चांगले पैसे सुटायचे. पुढे मी मार्केटमधल्या एका व्यापार्‍याकडे कामाला लागलो. पण वर्ष सहा महिन्यानंतर त्या व्यापार्‍याचा भाऊ तिथे आला. त्यामुळे मला ‘दुसरीकडे नोकरीची सोय कर’ असं त्या व्यापार्‍याने सांगून टाकलं. 

    या काळापर्यंत मार्केटमध्ये माझं ‘गुडविल’ तयार झालं होतं. बरेच व्यापारी मला आपल्याकडे नोकरीसाठी बोलवत होते. कारण मी ‘विक्री’त अगदी एक्सपर्ट झालो होतो. पण मी नोकरी केली नाही. कोथरूडचे डोंगरे नावाचे एक व्यापारी होते. त्यांनी मला छान ऑफर दिली. ‘माझ्याच दुकानात मालाची विक्री कर, त्यात चांगले पैसे मिळतील’ असं डोंगरेंनी सांगितलं. नोकरीत मला एक रुपया रोज आणि चार आण्याचा नाश्ता मिळत असे. पण किरकोळ विक्रीत महिन्याला दोनशे रुपयांची कमाई होऊ लागली. 

    मी मुंबईत आलो १९५० साली. त्या काळात घरदार सोडून आलेल्या माझ्यासारख्याला खानावळीची सोय होती. एक वेळ मी खानावळीत जेवत असे. तर एकवेळ मोसंबी वगैरे खाऊन दिवस काढायचो. पण वयाच्या दहाव्या वर्षी मुंबई गाठूनही अगदी थोड्याच काळात भायखळा मार्केटमुळे माझा चांगला जम बसला. असं सगळं सुरू असताना, माझ्या रोजीरोटीची सोय करणारं हे मार्केट धोक्यात आलं. तीन वेळा या मार्केटला आग लागली. त्या काळात भायखळा मार्केट ‘ताडपत्री’ बाजूच्या पुलावरून लोक विडीकाडी फुकत जायचे आणि थोटकं टाकायचे. यामुळे मार्केटला वारंवार आग लागत असे. ते थांबविण्यासाठी मार्केट बांधायचं ठरलं. यामुळे त्याच्यावर अवलंबून असलेले आम्ही बेकार झालो. या काळात काय करायचं हा प्रश्‍न होता. 

    बोरीबंदरला ए.एच.व्हिलर कंपनी होती. इथे दुपारी तीन वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत पेपर विकण्याचं काम मी पत्करलं. इथून माझा वर्तमानपत्रांशी संबंध आला. गाड्या उभ्या राहिल्या, की बोंब मारत हातातली वर्तमानपत्रं विकत असे. संध्याकाळची नोकरी मिळाली तरी सकाळचा वेळ रिकामा असायचा. या वेळात काही तरी काम हवं होतं. बुवाशेठ दांगट आमचे गाववाले. व्ही.टी. स्टेशन जवळच्या केळकर हॉटेलच्या शेजारी त्यांचं ऑफिस होतं. सकाळपासून दुपारपर्यंत मी तिथे नोकरी करू लागलो. दुपारपर्यंत बुवा दांगटांकडे नोकरी आणि तीन वाजल्यानंतर पेपर विकायचे असा माझा दिनक्रम सुरू होता.

    या काळात ‘फ्री प्रेस’चं ‘बुलेटीन’ टाईम्सचं ‘इव्हिनिंग न्यूज’ आणि अत्र्यांचा ‘सांज मराठा’ ही संध्याकाळची वृत्तपत्र जोरदार खपायची. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन सुरू झालं आणि मग अनेक पत्रिका, साप्ताहिकं निघू लागली. त्यांचाही बराच खप व्हायचा. त्यातूनही चांगले पैसे सुटू लागले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण निघाली म्हणून सांगतो. फाऊंटनला जो गोळीबार झाला, त्यावेळी मी तिथे होतो. माझ्या डोळ्यांनी तो गोळीबार पाहिलाय.

    (क्रमश:)

    ◆◆◆

    संस्कारांची शिदोरी

    (दि. ३० मार्च, २०११ )

    भायखळा मार्केटचं बांधकाम सुरू झाल्यानंतर मिळालेली संधी मोठी होती. दुपारी तीन वाजल्यानंतर सायंदैनिकं विकण्याचं काम ए.एच.व्हिलर कंपनीने दिलं. ते मी मोठ्या उत्साहाने करायचो. बोरीबंदरला गाडी थांबली रे थांबली की मी जोरजोरात ओरडत सायंदैनिकांची विक्री करीत असे. यावेळच्या सायंदैनिकांबद्दल मी सांगितलेलं आहेच. पण ‘सांज मराठा’, ‘बुलेटीन’ यासारख्या दैनिकांबरोबरच इतरही अनेक पत्रिका आणि साप्ताहिकं निघत असतं. त्यांचाही चांगला खप होत असे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात असल्याने या सार्‍यांना वाचकांकडून चांगली मागणी होती.

    संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अतिशय गाजली. हे वातावरण अतिशय भारलेलं होतं. फाऊंटनला आलेल्या मोर्च्यावर जेव्हा गोळीबार झाला, त्यावेळी मीही तिथे हजर होतो. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत हा मोर्चा फाऊंटनला आला आणि पोलिसांनी गोळीबार सुरू केला. यावेळी मी तिथेच कुठेतरी एक कोपरा पकडून उभा राहिलो. त्या गोळ्यांच्या फैरींची भयानक आठवण अजूनही अंगावर काटा आणणारी आहे. महाराष्ट्राची जनता ही जखम कधीही विसरू शकत नाही. 

    पैसे चांगले मिळत असले तरी सकाळचा वेळ फुकट जातो म्हणून मी बुवाशेठ दांगटांकडे नोकरी पत्करली. दांगटांचे आणि आमचे जुने संबंध. माझी आई दांगटांच्याच कुळातली. त्यांचं घर देखील आमच्या घरापासून जवळपास अर्धा किलोमीटरवर होतं. मुंबईत येण्यापूर्वी मी बुवाशेठच्या शेतावरच मजुरी करीत होतो. मुंबईला येण्यासाठी लागणारे पैसेदेखील मी दांगटांकडे मजुरी करूनच कमावले होते. 

    ही नोकरी मला भावली. त्यानंतर मी दुपारची नोकरी सोडून दिली आणि पूर्णवेळ बुवाशेठकडेच काम करू लागलो. ही नोकरी २४ तासांची होती. चांगली कमाई करून देणारं काम सोडून मी इथे पूर्णवेळ नोकरी का पत्करली, असा प्रश्‍न कदाचित तुम्हाला पडला असेल. पण ही कायमची नोकरी होती. या नोकरीने माझे बरेच प्रश्‍न सोडविले होते. कारण या काळात आमचं जेवणखाण, राहणं वगैरे सारं बुवाशेठकडे असायचं. या नोकरीत रोज खर्चाला चार आणे मिळायचे आणि पगाराचा हिशेब चार वर्षांनी व्हायचा. आजच्या काळात हे ऐकून आश्‍चर्य वाटेल. पण तो काळ वेगळा होता. चार वर्षांनी पगाराचा हिशेब होतो, यात आम्हाला काही वाटत नव्हतं. दरवर्षी यात्रेसाठी मी गावी जायचो. त्यासाठी ‘उचल’ मिळायची. 

    वितरणाचा व्यवसाय, स्वतःचे छापखाने आणि स्वतःची वर्तमानपत्रे झाल्यानंतरही तुमच्या राहणीमानात, वागण्याबोलण्यात काही फरक का दिसत नाही, असा प्रश्‍न काहीजण विचारतात. पण त्याला माझ्यावर झालेले संस्कार जबाबदार आहेत. मी बुवाशेठकडून बरंच काही शिकलो. त्यांचं वागणं अगदी साधं असे. 

    त्याकाळी मुंबईतून लोकं गावी गेले की त्यांचे कपडे अगदी वेगळे असत. पण बुवाशेठचं तसं नसे. ते मुंबईत आणि गावात सारखाच ड्रेस घालत. जे कपडे घालून आपल्याला नांगर धरता येणार नाही, असे कपडे आपण कधीच घालायचे नाही, असं मला त्यांनी सांगितलं होतं. वास्तविक मी गावात आलेल्या मुंबईकरांचे कडक इस्त्रीचे ड्रेस पाहून त्यांच्यासारखं मोठं होण्यासाठी मुंबईत आलो होतो. पण बुवाशेठमुळे माझ्यावर योग्य ते संस्कार झाले. उगाच डामडौल करणं छानछोकीने वागणं योग्य नाही, हे त्या काळात रुजलेले संस्कार मला आयुष्यभर उपयोगी ठरले. 

    सधन असूनही बुवाशेठ साधे राहत. छानछोकीने राहिलं, म्हणजेच माणूस मोठा होतो, असं नाही. साधंसुधं राहूनही माणसाला प्रगती करता येते, मोठं होता येतं, ही शिकवणही मला इथेच मिळाली. बुवाशेठ फार गरिबीतून पुढे आले. त्यांनी शून्यातून विश्‍व निर्माण केलं. पुढे त्यांना यश मिळालं पण ते त्यांच्या डोक्यात कधीच गेलं नाही. साध्या राहणीमानावर त्यांचा विश्‍वास होता. वायफळ खर्च करणं त्यांना अजिबात आवडत नसे. मी त्यांच्याकडे चार-पाच वर्ष नोकरी केली. या काळात मी बुवांना कधी हॉटेलमध्ये चहा पिताना पाहिलं नाही की टॅक्सीमध्ये बसलेलं पाहिलं नाही. त्यांचा स्वभाव अतिशय हिशेबी होता. वितरणाच्या व्यवसायात त्याचा त्यांना फार मोठा लाभ झाला. 

    उभ्या आयुष्यात बुवाशेठसारखा माणूस माझ्या पाहण्यात आला नाही. त्यांचा हिशेब अतिशय काटेकोर असे. दैनंदिन हिशेबात मला पाच पैसे अधिक मिळाले तर ते का मिळाले किंवा पाच पैसे कमी मिळाले तर ते का मिळाले, याचा बुवाशेठ शोध घेत. त्यातून मी बरंच काही शिकलो. बुवांचा फार मोठा प्रभाव माझ्यावर पडला. पुढे मीदेखील वितरण व्यवसायात आलो आणि वितरक बनलो. तो इतिहास पुढे येईलच. पण बुवा आणि मी या व्यवसायातल्या स्पर्धेचा आमच्या नातेसंबंधांवर कधीही परिणाम होऊ दिला नाही. हे तत्त्व आम्ही कायम पाळत आलो आहोत. व्यवसाय करणं महत्त्वाचं आणि त्याच्या बरोबरीने नातं सांभाळणंही तितकंच महत्त्वाचं असं आम्ही मानतो. 

    असो. बुवाशेठकडे नोकरी करीत असताना माझी धडपड थांबली नाही. ही नोकरी करूनही मी भायखळ्याला पानपट्टीची गादी टाकली. ही काही मी फार काळ चालवली नाही. साधारण वर्ष-सहा महिन्यांपर्यंत ही गादी मी चालवली असेन. नंतर ती बंद करून टाकली. 

    या नोकरीत असतानाही आपण काही तरी व्यवसाय केला पाहिजे, असं मला वाटायचं. इतक्यात तशी संधीही मिळाली. ‘ऊर्दू टाईम्स’ नावाचं वर्तमानपत्र त्या काळात होतं. अजूनही हे सुरू आहे. मला त्याच्या डिलिव्हरीचं काम मिळालं. मी सायकलवरून या वर्तमानपत्राची डिलिव्हरी करायचो. बुवांकडची नोकरी सुटली आणि मग माझं हे काम सुरू झालं. त्यातून मला चार-दोन रुपये मिळायचे. याच कामामुळे हळूहळू मला दुसर्‍या वर्तमानपत्रांची ‘एजन्सी’ मिळू लागली आणि वितरणाच्या व्यवसायात मी स्वतंत्रपणे पावले टाकू लागलो.

    (क्रमश:)

    ◆◆◆

    कष्ट आणि कष्टकरी

    (दि. ०६ एप्रिल, २०११)

    वर्ल्डकपची फायनल पाहताना फार धास्ती वाटत होती. सचिन बाद झाल्यानंतर आपण वर्ल्डकप गमावतो की काय, असंच वाटत होतं. पण हा सामना आपण जिंकला. सुरुवातीला मुंबईत आलो त्यावेळी मला क्रिकेटमधलं काही कळत नव्हतं. पण एक लक्षात आलं. क्रिकेटचा सामना आपण जिंकलो की वर्तमानपत्रांचा खप वाढतो. आपला संघ जिंकला की पाहिलेल्या सामन्याबद्दल वाचायला लोकांना आवडतं. यामुळे वर्तमानपत्राच्या खपात पाच ते दहा टक्क्यांचा फरक पडतो, असा माझा अनुभव आहे. शहरी भागांमध्ये हे प्रमाण दहा टक्के तर ग्रामीण भागात हे प्रमाण पाच टक्के इतकं असतं. याच्या उलट आपण सामना हरलो, तर वर्तमानपत्रांचा खप कमी होतो. हे लक्षात आल्यानंतर मी क्रिकेटचे सामने बारकाईने पाहू लागलो. 

    विक्रेता ते वितरक आणि वितरक ते वर्तमानपत्रांचा मालक या प्रवासात अशा अनेक गोष्टी मी शिकत गेलो आणि अजूनही शिकत आहे. वृत्तपत्रसृष्टीत झपाट्याने बदल होत आहेत. नवनवीन संधी आणि आव्हानं समोर येत आहेत. अशा परिस्थितीत काळानुरूप योग्य ते बदल केले नाही, तर आपण स्पर्धेत नक्की मागे पडू शकतो. म्हणूनच काळानुसार योग्य ते बदल आपण करायलाच हवेत, या मताचा मी आहे. त्याच्यासाठी सदैव सजग राहणं, नवनवीन गोष्टी शिकत राहणं आवश्यक आहे. 

    माझं वय ७० च्या पुढे गेलं आहे. ह्या वयात मी आराम करावा, असा सल्ला मला बरेचजण देतात. पण मला स्वस्थ बसून राहणं आवडत नाही. जमतही नाही. काही दिवसांपूर्वीची गोष्ट. मी आमच्या शेतात चांगलं चारपाच तास काम केलं. खरंतर उन्हातान्हात काम करून मला थकवा यायला हवा होता. पण तसं झालं नाही. उलट मला फार छान वाटलं. तरुण असताना मी कधी उन्हातान्हाची पर्वा करून काम केलं नाही. 

    झाडांना वाढीसाठी ऊन, पाणी आवश्यक आहे. पण हा निसर्गाचा नियम फक्त झाडांसाठीच लागू असतो असं नाही. माणसांनाही हा नियम तितकाच लागू पडतो. आपण पाण्यावाचून जगू शकत नाही. तसंच ऊनही आपल्याला आवश्यक असतं. उन्हात काम करायचं नाही, असं म्हणून आपण कायम सावलीत विसावा घेत राहिलो तर कसं जमेल? कायम आराम, सुखसोयी यांचा विचार करायचा, त्याचवेळी अधिक पैसा कसा मिळेल ते पाहायचं, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य नाही. काबाडकष्ट करणारा आणि अजिबात काम न करणारा, अशा दोघांना समोरासमोर उभं केलं, तर त्यांच्यातला फरक तुमच्या लक्षात येईल. कष्टाळू इसम तजेलदार दिसतो, निरोगी असतो, त्याचं आयुष्यमानही कष्ट न करणार्‍यापेक्षा अधिक असतं. 

    मला कष्ट करणारी माणसं आवडतात. मी त्यांच्यातलाच आहे. मी स्वतःला माझ्या कामगारांपेक्षा वेगळा मानत नाही. माझं जेवणखाणं वगैरे सारं काही त्यांच्याबरोबर होतं. कधी काही खाणं वगैरे मागवायची वेळ आली, की

    Enjoying the preview?
    Page 1 of 1