दाहक अपराध - प्रकरण २
()
About this ebook
Read more from – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन
दाहक अपराध - प्रकरण ३ Rating: 0 out of 5 stars0 ratingsदाहक अपराध Rating: 0 out of 5 stars0 ratingsदाहक अपराध - प्रकरण ४ Rating: 0 out of 5 stars0 ratingsदाहक अपराध - प्रकरण ५ Rating: 0 out of 5 stars0 ratingsदाहक अपराध - प्रकरण ६ Rating: 0 out of 5 stars0 ratingsदाहक अपराध - प्रकरण १ Rating: 0 out of 5 stars0 ratings
Related to दाहक अपराध - प्रकरण २
Related ebooks
दाहक अपराध - प्रकरण ६ Rating: 0 out of 5 stars0 ratingsदाहक अपराध - प्रकरण ५ Rating: 0 out of 5 stars0 ratingsदाहक अपराध - प्रकरण ४ Rating: 0 out of 5 stars0 ratingsदाहक अपराध Rating: 0 out of 5 stars0 ratingsदाहक अपराध - प्रकरण १ Rating: 0 out of 5 stars0 ratingsअजब मुलांच्या गजब गोष्टी: बालकथा, #1 Rating: 0 out of 5 stars0 ratingsदाहक अपराध - प्रकरण ३ Rating: 0 out of 5 stars0 ratingsगैरसमज: एक मार्गदर्शक आत्मा, एक वाघाचे भूत आणि एक भितीदायक आई! Rating: 0 out of 5 stars0 ratingsCollege Days: Freshman To Sophomore कॉलेज डेज : फ्रेशमन टू सोफोमोअर Rating: 0 out of 5 stars0 ratingsNillu And Billu: निल्लु आणि बिल्लु Rating: 0 out of 5 stars0 ratingsरक्ताळ शाई (Raktal Shai): झुंज नक्षल चळवळीशी Rating: 0 out of 5 stars0 ratingsअज्ञातवास Rating: 0 out of 5 stars0 ratingsपाळक करतात त्या दहा मुख्य चुकां Rating: 5 out of 5 stars5/5
Reviews for दाहक अपराध - प्रकरण २
0 ratings0 reviews
Book preview
दाहक अपराध - प्रकरण २ - – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन
purchaser.
दाहक अपराध
प्रकरण २
२४ लिबेरो डायपर्स,- मऊ, ऑरगॅनिक हिप बेबीफूड - बनाना आणि राईस पुडींग, १२ ऑरगॅनिक अंडी,आणि २० ग्रीन किंग सिगरेट्सचं पाकीट.या सामानाच्या यादीवरून ही व्हिनस रोडवरची लिस असल्याची तिला शंका आली. तिने नुकताच एका मुलाला जन्म दिला होता आणि ती कायम ऑरगॅनिक अन्नपदार्थ खात असल्यामुळे निरोगी होती. सिगरेट्स तिच्या नवर्यासाठी होत्या. तो अगदी क्वचितच खरेदीसाठी यायचा. तिला वर बघायची पण गरज पडली नाही;ऑरेन्ज ब्लॉसम या सेंटच्या वासाने लगेच तिची ओळख पटवली.
याचे १७९.९५ क्रोनर्स झाले
.
तू सरळ १८० असं का सांगत नाहीस?
लिस कुरकुरत म्हणाली. तिने स्लॉटमध्ये कार्ड टाकलं आणि मागच्या माणसाला दिसू नये म्हणून हाताचा आडोसा करत कोड टाईप केला. तिचं चमकणारं त्वचेच्या रंगाचं नेलपॉलिश बघून लिव्ह लुकाला वाटलं बहुतेक हेदेखील ऑरगॅनिक असावं.
तिने पुढच्या माणसाने घेतलेल्या गोष्टी स्कॅन करायला सुरुवात केली. पेलिकरचे कोल्ड कट्स,काअरगार्डनचा बटरचा खोका,कार्ल्सबर्गचा ६ चा पॅक,स्ट्रॅन्सची लिव्हर पेट, डॅन गामला फॅब्रिकची जॅमची बॉटल आणि विसकसचे मांजरीचे खाणे......सगळे अगदी खास डॅनिश ब्रॅंड्स. सगळा हिशोब करत वर न बघताच तिने किंमतीचा एकूण आकडा सांगितला. म्हातारा वर्नर नेहमी कॅशच वापरत असे क्रेडीट कार्ड वापरले पाहिजे किंवा वृद्ध लोकांनीही आता कॉम्युटर शिकला पाहिजे वगैरे अशा मूर्ख कल्पनांना त्याने कधीच भीक घातली नव्हती. ते कसे वापरायचे हे अजून नीटसं सरकारला पण कळलं नाही आहे, तो म्हणाला.
लोकांबद्दलचा अंदाज किती सहज बांधता येतो. त्यांच्या सवयीच तो अंदाज दाखवून देतात. त्यांच्या कचर्यावरून बांधता येतो तितकाच अंदाज त्यांनी खरेदी केलेल्या वस्तुंवरुनही बांधता येतो. ही सगळी ब्रॅन्ड्सची नावं तिच्या डोक्यात नोंदली जात असत कारण त्यालाही काहीतरी अर्थ होता. काही ब्रॅन्डसनी स्वस्तात पदार्थ किंवा वस्तू बनवल्या होत्या तर काहींचा गुणवत्तेवर जास्त भर होता. महागड्या ब्रॅन्डसच्या वस्तु खरेदी करणारे लोक सहसा खूप शिक्षण घेतलेले,चांगली नोकरी असणारे आणि जास्त कमावणारे असत. किंवा त्यामुळे त्यांच्या महिन्याच्या अंदाजपत्रकात फारसा फरक पडत नसे. कॉन्डम्स खरेदी करताना लाजेने लाल होणारे तरुणांचे चेहरे बघून तिला मजा वाटत असे. शक्यतो ते अशी खरेदी कॅन्डी बॅग किंवा अशाच कशाच्यातरी खाली लपवून करत असत. नंतर ते तरुण दुकानात येणं बंद झालं. एकतर त्यांनी कॉन्डम्स वापरणं तरी बंद केलं असावं किंवा तिच्या नजरेला नजर द्यावी लागू नये म्हणून त्यांनी ते ऑनलाईन खरेदी करणं सुरू केलं असावं. ती त्यांना नेहमी एक तर डोळे मिचकावून किंवा मजा करा असं सांगून चिडवत असे. संभोग करणे यात इतकं कावरंबावरं होण्यासारखं काय हे तिला कळत नसे. किंवा कॉन्डम वापरतोय हे