Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

मी अन् माझ्या बॅलन्स आठवणींचा अल्बम डॉट इन्
मी अन् माझ्या बॅलन्स आठवणींचा अल्बम डॉट इन्
मी अन् माझ्या बॅलन्स आठवणींचा अल्बम डॉट इन्
Ebook195 pages1 hour

मी अन् माझ्या बॅलन्स आठवणींचा अल्बम डॉट इन्

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

Mainly sufferings, struggle, along with my family and friend's memories. My dedicated Scientific Research work at National Chemical Laboratory, Pune. Includes my various foreign visits to number of countries to do advance Scientific work. Includes my achievements and awards too. To make reading more pleasant, while reading. I have given a number of instances throughout.

LanguageEnglish
Release dateDec 29, 2020
ISBN9789390463169
मी अन् माझ्या बॅलन्स आठवणींचा अल्बम डॉट इन्
Author

डॉ.अरविंद कोटस्थाने

I am 80yrs old Senior citizen. Retired as Sr. Principal Scientist from NCL, Pune. I`m dedicated seasoned professional in Scientific R&D. Implementing proven Green & Novel Technologies for industrial Zeolite Catalyst manufacturing having potential applications in Speciality Chemicals and Petrochemical industries. I and wife are Living at Pune, Maharashtra.

Related to मी अन् माझ्या बॅलन्स आठवणींचा अल्बम डॉट इन्

Related ebooks

Biography & Memoir For You

View More

Related articles

Reviews for मी अन् माझ्या बॅलन्स आठवणींचा अल्बम डॉट इन्

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    मी अन् माझ्या बॅलन्स आठवणींचा अल्बम डॉट इन् - डॉ.अरविंद कोटस्थाने

    मी अन् माझ्या बॅलन्स आठवणींचा अल्बम डॉट इन्कनेक्ट द डॉट्‌स

    First published in 2020 by

    Becomeshakespeare.com

    One Point Six Technologies Pvt Ltd.

    119-123, Building No J2, Wadala Truck Terminal, Wadala (East), Mumbai- 400037. T: +91 8080226699

    Copyrights © डॉ. अरविंद कोटस्थाने

    All rights reserved. Any unauthorized reprint or use of this material is prohibited. No part of this book may be reproduced or transmitted in any form or by any means, electronic or mechanical, including photocopying, recording, or by any information storage and retrieval system without express written permission from the author/publisher.

    Please do not participate in or encourage piracy of copyrighted materials in violation of the author’s rights. Purchase only authorized editions.

    ©

    ISBN 978-93-90463-16-9

    अनुक्रम

    १) अभिप्राय, श्री.अरविंद जगताप: (प्रसिध्द लेखक, स्क्रिप्ट रायटर)

    २) मनोगत

    ३) प्रस्तावना

    ४) पूर्व-परिचय बालपण

    ५) प्रार्थमिक शिक्षण

    ६) सेकंडरी स्कूल

    ७) कॉलेज

    ८) ग्रॅज्युएट नंतर

    ९) विवाह

    १०) अपघातचा आघात

    ११) काळाची झडप

    १२) तुझी आठवण

    १३) झिओलाइट

    १४) विदेश सफरी

    १५) रशिया

    १६) बेल्जियम, फ्रान्स

    १७) अमेरिका

    १८) हंगेरी, फिनलँड

    १९) जर्मनी: म्युनिक

    २०) ते मंतरलेले क्षण

    २१) जबाबदारीची धुरा

    २२) मन की बात

    २३) निरोप

    अभिप्राय

    Arvind Jagtap

    प्रिय अरविंद कोटस्थाने सर,

    आपलं पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधी वाचायला मिळालं. आपण मोठ्या प्रेमाने ते वाचायला सांगितलं. पुस्तकाबद्दल लिहायला सांगितलं. पण पुस्तक वाचल्यावर मला जाणवलं की एखाद्या टेकडीने हिमालयावर टिप्पणी केल्यासारखं होईल ते. तुमचा ऐंशी वर्षांचा प्रवास वाचून थक्क व्हायला होतं. विज्ञानासारख्या क्षेत्रात तुम्ही महत्वाचं काम केलय. जग फिरलात. तुमच्या आयुष्याबद्दल काही बोलायचं म्हणजे डॉक्टरला पेशंटने सल्ला दिल्यासारखं आहे. हे पुस्तक चांगलं आयुष्य जगण्याची इच्छा असणाऱ्या माणसाने आवर्जून वाचायला हवं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा तुमच्या एकट्याच्या आठवणीचा अल्बम नाही. यात तुमच्या नजरेने तो काळ आणि जग पाहता येतं. तुमच्या काळात एक बरं होतं. सेल्फी कॅमेरा नव्हता. त्यामुळे तुमच्या पिढीच्या अल्बममध्ये फक्त स्वत:चेच फोटो नसतात. स्वत:च्याच आरत्या ओवाळलेल्या नसतात. तुमचं सगळं जग असतं तुमच्या आठवणीत. आजकाल लोक आपल्या सेल्फीत बाकी कुणीच कसा येणार नाही याची खूप काळजी घेतात. आला तरी क्रॉप करतात फोटो आणि एकट्याला ठेवतात. तुमच्या पिढीचा स्वभाव वेगळा होता. कर्ती माणसं तर खुपदा पडद्यामागे असायची. फोटो काढणारी असायची. फोटोत दिसायची नाहीत. ज्याला चांगले क्षण टिपता येतात तो त्या प्रतिमेत खूप कमी वेळा असतो. पण त्याचा वावर असतो. त्याचं कर्तृत्व असतं. त्याची माया असते. तुमच्या आठवणीत हे सगळं आहे. तुम्हीही आहात खूप निर्मळपणे.

    आठवणी म्हणजे काही सुख, काही दु:ख असणारच. पण यात अतिशय शांतपणे आणि प्रामाणिकपणे जगणारी माणसं उठून दिसतात. सुखात आणी दु:खद प्रसंगात पण. तुमच्या आठवणींचा उल्लेख करून त्यातला वाचकांचा उत्साह घालवायचा नाही. त्या त्यांनी मुळातून वाचल्या पाहिजेत. वय कधी वाढतं कळत नाही. दिवस कसे सरतात कळत नाहीं. पण आपल्याकडे भरपूर सांगण्यासारखं असेल तर आपलं आयुष्य आपण छान जगलोय असं म्हणता येतं. खुपदा लोकांना आपल्या वयाची जाणीव होत नाही. थांबायचं कळत नाही. त्यांचं खूप काही सांगायचं राहून जातं. वय शहराच्या लोकसंख्येसारखं वाढत असतं. नकळत. वारंवार ट्राफिक जाम झाल्यावर जशी लोकसंख्या वाढलीय हे जाणवू लागतं. तसं काहीसं आरोग्याच्या तक्रारी सुरु झाल्यावर वयाची जाणीव होऊ लागते. पण तक्रारीचा पाढा सुरु व्हायच्या आत वयाचा हिशोब जमला पाहिजे. वय वाढलय हे सहजपणे स्वीकारलं की वयाचा त्रास होत नाही. डोळ्यांना कमी दिसू लागतं. खरतर यात वाईट काहीच नाही. उलट आपण हे मान्य केलं पाहिजे की आपण आता कुठे बारकाईने बघायला लागलोय सगळ्या गोष्टी. पण आपण डोळ्यांना कमी दिसतय हेच कबूल केलं नाही तर बारकाईने बघणार कसे? तुमच्या प्रत्येक ओळीत बारकाईने बघण्याची सवय डोकावते. हे महत्वाचं आहे.

    केस वाढतात, उंची वाढते, चष्म्याचा नंबर वाढतो. पण यात आपण फार काही करू शकत नाही. बऱ्याचदा या गोष्टी आपोआप होतात. पण वय आपोआप वाढत नाही. लोक नेटाने, शिस्तीत जगत असतात  म्हणून वय वाढत असतं. त्यांनी फक्त उन्हाळे आणि पावसाळे पाहिलेले नसतात. त्यांनी चटकेही सोसलेले असतात आणि पावसात भिजलेलेही असतात. आणि या सगळ्या गोष्टी त्यांना कुणालातरी सांगायच्या असतात. प्रत्येक माणूस एक गोष्ट असतो. कुणी कथा असतो कुणी कादंबरी असतो. फक्त ती नीट सांगता आली पाहिजे. आणि तुम्ही तुमची गोष्ट खूप उत्तम सांगितलेली आहे. येणाऱ्या पिढ्यांना ती खूप महत्वाचं काही सांगणारी आहे. तुमची गोष्ट तुम्ही तटस्थपणे सांगितली असली तरी तुमच्या गोष्टीचे तुम्ही हिरो आहात. तुमच्या कामाचा अभिमान वाटतो. तुमचा प्रत्येक वाचक माझ्याशी नक्कीच सहमत होईल. तुम्ही खरच आमच्यासाठी हिरो आहात. आदर्श!

    तुमच्यासारख्या चांगल्या माणसांना लिहावं वाटलं. तुमचे अनुभव, तुमचं ज्ञान भावी पिढीला आवश्यक आहे. वय वाढलं की चष्म्याचा नंबर वाढतो. चष्म्याचा नंबर वाढला की फक्त काच बदलत नाही. दृष्टीकोन पण बदलतो. लोक म्हणतात धूसर दिसू लागतं. पण खरी गोष्ट ही आहे की इतरांचे दोष कमी दिसू लागतात. गुण दिसतात फक्त. ते समृध्द आयुष्य जगलेल्या माणसाचं लक्षण असतं. आणि तुमच्या लिखाणात ते जागोजागी जाणवतं. तुमच्या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा!

    तुमचाच

    अरविंद जगताप

    मी अन् माझ्या बॅलन्स आठवणींचा अल्बम डॉट इन्

    आदरणीय प्रिय श्री. अरविंद जगताप ---

    -- सादर प्रणाम !

    नमस्कार ! आपण मी अन् माझ्या बॅलन्स आठवणींचा अल्बम डॉट इन् ह्या माझ्या प्रथम लिखित प्रकाशन-पूर्व पुस्तकाचं वाचन केलेत. परीक्षणात्मक अभिप्राय वाचून धन्य वाटलं. आपल्यासारख्या प्रथितयश दिग्गज लेखकानं केलेलं समीक्षण स्तुत्य आहे. आपण मला व ह्या पुस्तकास एका नवीन उंचीवर नेलं. सुंदर व स्पष्ट भाषेतील परीक्षण खूप भावलं, वाचकां समवेत हे शेअर करावे ही मनस्वी इच्छा आज पूर्ण झाली. धन्यवाद !

    पुन:श्रच्य मी व कोटस्थाने कुटुंबिय आभारी आहोत. आपले धन्यवाद !!

    आपला स्नेहांकित

    अरविंद कोटस्थाने.

    नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: !

    न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: !!

    मी अन् माझ्या बॅलन्स आठवणींचा अल्बम डॉट इन्

    प्रिय शशांक स्मृतीस

    समर्पित

    "अशी पाखरे येती - - - !

    आणिक स्मृति ठेवूनी जाती - - - -!" 

    - - - मंगेश पाडगांवकर.

    मनोगत!

    प्रिय वाचक मित्रांनो, नमस्कार !!

    मी प्रसिध्द लेखक किंवा कादंबरीकार नाही, हे माझे पहिलेच पुस्तक. मला हे का लिहावसं वाटलं?. ह्या विषयी थोडस् सांगतो.

    प्रत्येक व्यक्ती जन्माला येते आणि आपले आयुष्य जगते, काही आयुष्य जगतात, तर काही आयुष्य जगवतात. आपला जन्म झाला त्या क्षणापासून या क्षणापर्यंत आपले कुटुंब, आपलंघर, इष्टमित्र, आपण केलेल्या आणि न केलेल्या सर्व गोष्टी हे सर्वकाही आपल्यास प्रभावित करीत असतात.’मागे वळून पाहताना’ गेल्या ८० वर्षात मला जे काही अनुभवास आले, मी जे काही अनुभवले हे मला खरोखच

    Enjoying the preview?
    Page 1 of 1