Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

Secularismche Prayog सेक्युलरिझमचे प्रयोग
Secularismche Prayog सेक्युलरिझमचे प्रयोग
Secularismche Prayog सेक्युलरिझमचे प्रयोग
Ebook158 pages50 minutes

Secularismche Prayog सेक्युलरिझमचे प्रयोग

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

सेक्युलरिझमच्या प्रयोगांच्या प्रभावातून हिंदू समाजाला मुक्त करण्यासाठी, हिंदू समाजावर करण्यात आलेले हे सेक्युलरिझमचे प्रयोग कशाप्रकारे अंमलात आणले गेले आणि त्यांचा हिंदू समाजावर काय परिणाम झाला? या गोष्टींच्या तात्विक चिंतनात न अडकून पडता केवळ या विषयाचे आकलन व्हावे यादृष्टीने अत्यंत सोप्या शब्दात लिहिलेले पुस्तक. या प्रयत्नांतून माझ्या तमाम हिंदू बंधू-भगिनींना समाजाकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी आणि त्यादृष्टीने हिंदू हिताचा विचार करण्याची दिशा मिळावी हाच या पुस्तकाचा उद्देश आहे

Languageमराठी
PublisherPrasad Shirke
Release dateJun 22, 2020
ISBN9780463947395
Secularismche Prayog सेक्युलरिझमचे प्रयोग

Related to Secularismche Prayog सेक्युलरिझमचे प्रयोग

Related ebooks

Reviews for Secularismche Prayog सेक्युलरिझमचे प्रयोग

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    Secularismche Prayog सेक्युलरिझमचे प्रयोग - Prasad Shirke

    सेक्युलरिझमचे प्रयोग हा काही आजचा विषय नाही. हे प्रयोग स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारताच्या राजकारणात सक्रिय असल्यामुळे भारतीय जनतेच्या जीवनावर प्रभाव टाकू शकणाऱ्या महात्मा गांधी, काँग्रेस पक्ष, डाव्या विचारसरणीच्या मंडळींनी भारतीय समाजावर केले. नव्हे लादलेच! मग ते महात्मा गांधींचे तथाकथित हिंदू मुस्लिम ऐक्यासाठीचे प्रयत्न असतील, याच ऐक्यासाठी हिंदुस्थानाच्या जनतेवर लादलेली खिलाफत चळवळ असेल, जवाहरलाल नेहरूंची गंगा-जमूनी तहजीब असेल, भारतावर लादलेली फाळणी असेल, डाव्यांनी भारतीय इतिहासाचे केलेले विकृतीकरण असेल, की १९७६ मध्ये भारताच्या राज्यघटनेत टाकलेला 'सेक्युलर' हा शब्द असेल. असे किती प्रयोग मोजून दाखवावे? या विषयावर संशोधन करू तितके कमीच! त्यामुळे त्यात फारसे अडकून न पडता भविष्याचा विचार करून वर्तमानात काय करता येण्यासारखे आहे? याचे चिंतन महत्त्वाचे! आपल्या देशात या सर्व गोष्टी घडल्या आणि त्यांचे परिणाम आपल्या देशातील अर्ध्याधिक जनतेच्या जीवनावर झाले; या सत्याचा स्वीकार करायलाच हवा. या खेरीज ज्या सत्याकडे आपल्याला वाटचाल करायची आहे, तो मार्ग सुस्पष्ट होणार नाही.

    सेक्युलरिझम या संकल्पनेचा आजच्या हिंदू समाजावर इतका प्रभाव आहे की, या संकल्पनेमुळे हिंदू समाजाला आपल्या गौरवशाली इतिहासाचे, जगातील सर्वांत प्राचीन असलेल्या आपल्या हिंदू संस्कृतीचे स्मरणच नसते. भौतिकतावादी जीवन पद्धतीत ते माहीत असण्याचे काही कारण नसल्याने, स्मरण करून देणारेही कोणी नसते! परिणाम स्वरूप, या सेक्युलरिझमच्या प्रयोगांमुळे हिंदू समाज अधिकाधिक आत्मविस्मृत होत चालला आहे. इतका की, आजच्या हिंदू समाजाला स्वतःच्या मूळ अस्तिवाचा बोधच होत नाही. बोध होतो तर तो फक्त सेक्युलर देशात, सेक्युलर होऊन जगण्याचा! हिंदूंना स्वतःला स्वतःच्या हिंदुत्वाचा बोध होऊ न देता त्याने स्वतःला फक्त आणि फक्त सेक्युलर समजावे यासाठी आपल्या देशात जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आलेले आहेत. अर्थात आजच्या हिंदू समाजाची जी काही चांगली-वाईट वैचारिक जडणघडण झालेली आहे, हा समाजावर करण्यात आलेल्या सेक्युलरिझमच्या प्रयोगांचा परिणाम आहे.

    वर-वर पहाता, १९७६ पासून आपल्या देशाला सेक्युलर देश बनवण्यात आले, असे दिसत असले तरी त्यासाठीची पार्श्वभूमी आणि देशाची तशी मानसिकता तयार करण्याचे कार्य स्वतंत्र भारतातील सत्ताधाऱ्यांनी १९४७ पासूनच आरंभिले होते. अर्थातच योजना त्याआधीच तयार केलेली होती! १९७६ मध्ये फक्त ती अधिकृतपणे अंमलात आणली गेली इतकेच...

    या सेक्युलरिझमच्या प्रयोगांच्या प्रभावातून हिंदू समाजाला मुक्त करण्यासाठी, हिंदू समाजावर करण्यात आलेले हे सेक्युलरिझमचे प्रयोग कशाप्रकारे अंमलात आणले गेले आणि त्यांचा हिंदू समाजावर काय परिणाम झाला? या गोष्टींच्या तात्विक चिंतनात न अडकून पडता केवळ या विषयाचे आकलन व्हावे यादृष्टीने अत्यंत सोप्या शब्दात हा विषय मांडण्याचा या पुस्तकातुन प्रयत्न करण्यात आलेला आहे. या प्रयत्नांतून माझ्या तमाम हिंदू बंधू-भगिनींना समाजाकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी आणि त्यादृष्टीने हिंदू हिताचा विचार करण्याची दिशा मिळावी हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. - अॅड. प्रसाद शिर्के

    हरवलेली हिंदू चेतना!

    मी हिंदू आहे. मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. परंतु मी सेक्युलरिझम वर विश्वास ठेवणारा हिंदू आहे. इतर धर्मियांविषयी देखील माझ्या मनात आदराची भावना आहे. कारण जगातील सर्वच धर्म समान आहेत. ते मानवतेचीच शिकवण देतात! म्हणूनच तर मला मशिदीसमोर, चर्चमध्ये मस्तक झुकवून प्रार्थना करणाऱ्यांविषयी किंवा करण्यात काही वावगे वाटत नाही. मी माझ्या मुस्लिम मित्र-मैत्रिणींना ईदच्या, रमजानच्या शुभेच्छा देतो. मी माझ्या ख्रिस्ती मित्र-मैत्रिणींबरोबर ख्रिसमस साजरा करतो. मी वेलेन्टाइन डे, फ्रेंडशिप डे, ३१ डिसेंबरही मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे आतंकवादाला धर्म नसतो यावर माझा अजूनही विश्वास आहे. त्यामुळे मी सेक्युलर हिंदू आहे. अशी जर आपल्या मनाची धारणा झालेली असेल व आपल्याला असे असण्याचा सार्थ अभिमान असेल तर आपल्याला आपल्या धर्माचा पूर्णपणे बोध झालेला नसून आपण इतर धर्मांविषयी भ्रामक कल्पना डोक्यात ठेऊन, केवळ सेक्युलरिझम नावाची भ्रामक संकल्पना अंगीकरून जगणारे हिंदू आहात. अशाप्रकारच्या हिंदूंना भविष्यात फक्त आणि फक्त सहानुभूतीच मिळू शकते. कारण तथाकथित सेक्युलरिझम या भ्रामक संकल्पनेच्या आहारी जाऊन आपण नकळतपणे स्वतःचीच फसवणूक करून, स्वतः वरच अन्याय करत आहोत; याचे आपल्याला भान नाही. यात आपली काही चूक आहे का? एक हिंदू म्हणून आपण कशाप्रकारे आचरण करावे? असे केल्याने हिंदुत्व धोक्यात येईल का? हे विषय गौण असून, आपल्या मनाची धारणा व त्याअनुषंगाने आपली कृती अशी का? याचा जरी विचार केला, तरी आपल्या मनातील याविषयीचे भ्रम दूर होतील.

    तथाकथित सेक्युलर असणाऱ्या हिंदूंनी खरोखरच सर्व धर्म समान आहेत का? इतर धर्म त्यांच्या अनुयायांना त्यांच्या ईश्वरावर श्रद्धा न ठेवणाऱ्यांविषयी सद्भावना, सहिष्णुता बाळगण्याची शिकवण देतात का? आणि जर इतर धर्मीय त्यांचा धर्म सोडून अन्य धर्मियांप्रति सद्भावना ठेवत नसतील, तर त्यांचे अनुयायी कधी सेक्युलर होऊ शकतील का? या प्रश्नांची उत्तरे शोधल्या खेरीज सेक्युलरिझम ही हिंदूंना त्यांच्या धर्मापासून परावृत्त करून त्यांच्यासाठी आत्मघातकी असलेली भ्रामक संकल्पना आहे; हे सहजासहजी लक्षात येणार नाही. आज बऱ्याचशा तथाकथित हिंदूंना स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यापेक्षा सेक्युलर म्हणवून घेण्यातच जास्त अभिमान वाटतो. खरंतर सेक्युलरिझम ही पाश्चिमात्य संकल्पना आहे. तरी या संकल्पनेला अभिप्रेत असे आचरण हिंदू सनातन काळापासून करत आलेला आहे. त्यामुळे जर आपल्याला स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यापेक्षा सेक्युलर हिंदू म्हणवून घेण्यात जास्त अभिमान वाटत असेल तर आपण हिंदूत्व समजूनच घेतलेले नाही. सहिष्णुता किंवा इतरांप्रति समभाव

    Enjoying the preview?
    Page 1 of 1