Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

आप्तवाणी-३
आप्तवाणी-३
आप्तवाणी-३
Ebook826 pages4 hours

आप्तवाणी-३

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

जीवनात लोकांची अनेक ध्येये आणि उद्देश असतात. पण ‘मी कोण आहे?’ या मूलभूत प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकत नाहीत. आपल्यापैकी अनेकांना ते माहीतच नसते. अनंत काळापासून लोक संसारातील भौतिक साधनांच्या मागे धावत असतात. फक्त ज्ञानी पुरुषच आत्मसाक्षात्कार करवून देऊ शकतात, आणि तुम्हाला संसाराच्या भौतिक बंधनातून मुक्तीही देऊ शकतात. या पुस्तकाच्या पहिल्या भागात परम पूज्य दादाश्रींनी आत्म्याचे गुण आणि अशा अनेक विषयांबद्दल, उदाहरणार्थ ‘स्वतःचे’ (आत्म्याचे) ज्ञान, दर्शन आणि अनेक शक्तींबद्दल सांगितले आहे. सुख, स्वसत्ता, परसत्ता, स्वपरिणाम, परपरिणाम, व्यवहार आत्मा आणि निश्चय आत्मा, अशा अनेक विषयांबद्दलही सांगितले आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात परम पूज्य दादाश्रींनी ‘क्लेशरहित जीवन कसे जगावे’, तसेच योग्य विचारांनी कुटुंबात दु:खी न होता व्यवहार कसा करावा, मुलांशी कसे वागावे याची किल्ली दिली आहे . दुसऱ्यांना सुधारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःला सुधारावे, इतरांशी जुळवून घेणे, सांसारिक संबंध कसे निभावावेत, कुटुंब, पाहुणे, आपले वरिष्ठ, अशा वेगवेगळ्या व्यक्तींशी कसे वागावे, नात्यात सहजपणा कसा आणावा, ह्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. या पुस्तकाचा अभ्यास करून व्यवहारात उपयोग केल्यास जीवन सहज, शांतिमय आणि आनंदमय होईल.

Languageमराठी
Release dateJul 1, 2021
ISBN9789390664306
आप्तवाणी-३

Read more from दादा भगवान

Related to आप्तवाणी-३

Related ebooks

Reviews for आप्तवाणी-३

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    आप्तवाणी-३ - दादा भगवान

    उपोद्घात

    [खंड : 1]

    आत्मविज्ञान

    अनंत काळापासून अनंत लक्ष्ये वेधली परंतु ‘मी कोण आहे?’ हेच लक्ष्य मात्र साध्य करू शकलो नाही. खरा मार्ग ‘मी कोण आहे?’ याचा शोध घेणे हाच आहे किंवा तो मार्ग दाखविणा:यांना पण ख:या मार्गाने चालणारे असे आपण म्हणू शकतो. कागदावर काढलेले दिव्याचे चित्र प्रकाश देऊ शकत नाही, तो फक्त दिव्याची रूपरेखाच देऊ शकतो. प्रकाश मात्र, प्रत्यक्ष दिवाच देतो! म्हणजेच आत्मज्ञानाची प्राप्ती प्रकट प्रत्यक्ष ‘ज्ञानी पुरुषां’च्या माध्यमातूनच शक्य आहे.

    सर्व शास्त्रे एकाच आवाजात बोलू लागली, ‘आत्मज्ञान जाणा.’ अहो! पण ते शास्त्रात सामावलेले नाही, ते तर ज्ञानींच्या हृदयात सामावले आहे.

    अनंत प्राकृत अवस्थांमध्ये अडकलेला आपणहून त्यातून बाहेर निघून आत्मस्वरूप कसा होऊ शकेल? जप, तप, ध्यान, योग सामायिक अशा वेगवेळया क्रिया करून स्थिरता प्राप्त करण्याचा जो प्रयत्न करतो, तो तर स्वभावत:च चंचल आहे, तो स्थिर कसा होईल? ‘दरअसल आत्मा’ (मूळ आत्मा) स्वभावातच अचल आहे एवढीच समज दृढ करावयाची आहे!

    ज्ञानींच्या आज्ञेखेरीज आत्म्याची आराधना अशक्य आहे! ‘ज्ञानी’ तर संज्ञेने समजावून देण्यास समर्थ असतात! जो शब्द-स्वरूप नाही, जो फक्त स्वभाव-स्वरूप आहे, जिथे शब्दांची गरज नाही, जिथे कुठलेही माध्यम नाही, जो फक्त स्वभाव स्वरूप आहे जो फक्त केवळज्ञानस्वरूप आहे अशा आत्म्याचे लक्ष्य अनंत भेदांने, आत्मविज्ञानी अशा ‘ज्ञानी पुरुषां’खेरीज कोणी बसवू शकेल असे नाही.

    मरणाच्या भीतीने कोणी स्वत: औषधांचे मिश्रण बनवून पीत नाही, आणि आत्म्याच्या बाबतीत मात्र स्वत:च (औषधाचे) मिश्रण बनवून पिणे म्हणजे अनंत जन्मांच्या मरणाला आमंत्रण देणे आहे. हाच स्वच्छंद आहे? आणखी काय?

    आत्मा ज्ञानस्वरूप नाही, विज्ञानस्वरूप आहे. ज्याला आत्मविज्ञान समजेल तोच ‘अॅबसोल्यूट’ आत्माप्राप्त करू शकेल. भौतिक विज्ञानांत वर्षानुवर्षे घालविली तरी (मोक्षाचे) काम होत नाही, आणि आत्मविज्ञान तर अंत:मुहूर्तात देखील ‘अॅबसोल्यूट’ बनवून टाकते.

    धातूंच्या मिश्रणाचे विभाजन, त्या त्या धातूंच्या गुणधर्मांच्या ज्ञानाच्या आधारे होऊ शकते. त्याच प्रकारे आत्मा-अनात्मा यांच्या मिश्रणाचे विभाजन जो या दोन्हींचे गुणधर्म जाणत असेल तोच पुरुष वैज्ञानिक प्रयोगाद्वारे करू शकतो.

    अनादि काळापासून विनाशी वस्तूंकडे वळलेली दृष्टी ‘ज्ञानी पुरुष’ स्वत:च्या अविनाशी स्वरूपाकडे वळवितात. ती दृष्टी नंतर परत तिथून हटत नाही! दृष्टीपालटामुळेच संसार उभा आहे. ‘ज्ञानी पुरुषां’ची ही दिव्यातिदिव्य अशी देणगी आहे. जिच्यामुळे ते अंत:मुहूर्तात आत्मदृष्टी करवून देतात, दिव्य दृष्टी देतात, ती स्व आणि पर यांच्या आत्म-स्वरूपालाच पाहते. ते दृष्टी दृष्ट्यात स्थिर करून देतात. मग स्वत:ला ‘मी शुद्धात्मा आहे’ अशी खात्री होते! दृष्टी पण ‘मी शुद्धात्मा आहे’ असे म्हणू लागते! (दृष्टी आणि दृष्टा) यांचा भेद नष्ट होतो आणि ते अभेद होतात!

    जिथे दृष्टी दृष्ट्यात पडते, तिथे संपूर्ण दर्शन प्रकट होते. दृष्टी दृष्ट्यात पडली स्वभावसन्मुख झाली की स्वत:च्या दरअसल (मूळ) शुद्ध स्वरूपाची प्रतीती होते. प्रतीती होते, मग दृष्टी आणि दृष्टा यांचा ऐक्यभाव होतो! जिथे आत्मदृष्टी असते, तिथे निराकूलता असते, आत्मदृष्टीने मोक्षद्वार उघडते! देहदृष्टी आणि मनोदृष्टीने संसार उत्पन्न होतो.

    शुद्ध ज्ञान जे निरंतर विनाशी-अविनाशी वस्तूंचे भेदांकन करून यथार्थ दाखविते, आणि तोच परमात्मा आहे!

    संसार व्यवहार क्रियात्मक आणि आत्मव्यवहार हा ज्ञानात्मक असल्यामुळे दोन्ही सदैव भिन्न रूपानेच वर्ततात. एकाची क्रिया आहे आणि दुस:याचे जाणणे आहे. ‘करतो तो अहंकार’ आणि ‘जाणतो तो शुद्धात्मा’ एवढा फरक ज्याला समजला त्याचा संसार अस्त झाला. ज्याला हे भेदांकन प्राप्त करायचे असेल आणि जर त्याला ‘ज्ञानी पुरुष’ भेटले नसतील तर त्याने ‘हे भगवंता! ज्ञान तुमचे आणि क्रिया माझी.’ ही प्रार्थना आतमधील भगवंताला सतत करत राहावी, तरीही एक न एक दिवस त्याला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही!

    स्वत: आत्मा झाल्याशिवाय त्याला ज्ञाता-दृष्टा असे कसे म्हणता येईल? जोपर्यंत निजस्वरूपाचे भान होत नाही, तोपर्यंत ज्ञाता-दृष्टापणा इंद्रिय ज्ञानाच्या आधारावर आहे. खरे तर अतींद्रिय ज्ञानाच्या आधारावरच यथार्थ ज्ञाता-दृष्टा पदात येता येते.

    ज्ञान आणि आत्मा हे अभेदस्वरूपाने आहेत. मिथ्यादृष्टी गेली आणि सम्यक् दृष्टी प्राप्त झाली की यथार्थ ज्ञानाचे स्वरूप समजू लागते, नंतर ‘ज्ञानी पुरुषां’च्या सत्संगाद्वारा ते ‘फिट’ होत होत, ज्ञान-दर्शन वाढत वाढत प्रवर्तनात (आचरणात) येते आणि जेव्हा केवळ आत्मप्रवर्तनात येते, ज्ञान-दर्शनाशिवाय अन्य कुठलेही प्रवर्तन नसते, तेच केवलज्ञान होय.

    जगात जे ज्ञान चालू आहे, मंत्र, जप, शास्त्रज्ञान, ध्यान, योग, कुंडलिनी ते सर्व इंद्रियज्ञान आहे, भ्रांती ज्ञान आहे. यामुळे संसारात शांती मिळते. पण मोक्ष हा अतींद्रिय ज्ञानानेच होतो.

    शास्त्रज्ञान म्हणजे श्रुतज्ञान किंवा स्मृतिज्ञान, ते आत्मज्ञान नाही. पुस्तकात किंवा शब्दात ‘चेतन’ नाही. होय, जिथे परमात्मा स्वयं प्रकट झाले आहेत अशा ज्ञानींची किंवा तीर्थंकरांची वाणी परमात्म्याला स्पर्श करून बाहेर पडलेली असते, त्यामुळे ती आपल्या सुप्त असलेल्या चेतनाला जागे करते!

    ‘सर्वधर्मान् परित्यज्य, मामेकं शरणं व्रज.’ - देहाचे धर्म, मनाचे धर्म, वाणीचे धर्म की जे परधर्म आहेत, भयावह आहेत, त्या सर्वांचा त्याग करून फक्त माझ्या, म्हणजेच आत्म्याच्या धर्मात ये. माझ्या म्हणजे जो मुरलीवाला दिसतो त्याच्या नाही, तर आत बसलेल्या परमात्म स्वरूपाला शरण यायला सांगितले आहे!!!

    निजस्वरूपाचे अज्ञान तीच भ्रांती आणि तीच माया. ‘स्वत: जे नाही’ त्याची कल्पना होणे म्हणजेच भ्रांती! जो शब्दप्रयोग नाही पण अनुभव प्रयोग आहे अशा निजस्वरूपाला जाणायचे आहे. मुख्य म्हणजे हे सर्व समजून घेण्याची गरज आहे. समजण्यानेच मोक्ष आहे.

    संयोगांच्या दबावामुळे भ्रांती उत्पन्न झाली. खरे म्हणजे आत्म्याला भ्रांती होतच नाही, आत्मा गुन्हेगार नाही. अज्ञानतेमुळे गुन्हेगार आहे असे भासू लागते.

    संपूर्ण ‘ज्ञानी पुरुष’ लपून राहू शकत नाहीत. त्यांना स्वत:ला जे सुख प्राप्त झाले आहे ते जगाला वाटण्यासाठी ते जगाबरोबरच राहतात. मुमुक्षूंना तर ‘ज्ञानी पुरुषां’चे नेत्र बघूनच त्यांची ओळख पटते.

    कोणी खिसा कापो, शिव्या देवो, हात-कापो, कान कापो तरीही ज्याला राग-द्वेष होत नाही, ज्याच्यात अहंकार आणि ममता नाही त्याला चैतन्य सत्तेचा अनुभव आहे, असे समजावे.

    पॅरॅलिसिस झाला असला तरी पण आत्मसुख जात नाही, दु:खांचे रूपांतर सुखात करतो तोच आत्मानुभव. जेव्हा ‘मी कोण आहे’ याचे भान येते तेव्हा आत्मानुभव होतो.

    थिऑरिटिकल म्हणजे समज, आणि अनुभव तर ‘प्रेक्टिकल’ वस्तू आहे. अक्रम मार्गाने आत्मानुभव एका तासातच होतो!!! नाही तर कोटी जन्मांपर्यंत कितीही साधना केली तरी देखील काहीही निष्पन्न होत नाही!

    आत्म्याचे लक्ष्य निरंतर राहते म्हणजेच आत्मसाक्षात्कार. आनंद आणि शोक कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये हजर राहून स्वत:ला सुरक्षित ठेवते तेच ज्ञान.

    खडे ओळखेल त्याला गहू कोणते ते समजेल.

    ‘असत्’ काय ते जाणील तोच ‘सत्’ काय ते जाणील.

    अज्ञानाला जो ओळखील तोच ज्ञानाला ओळखील.

    आत्मानुभव कोणाला होतो?

    पूर्वी ज्याला ‘मी चंदुलाल आहे’ असे भान होते, त्यालाच आता ‘मी शुद्धात्मा आहे’ याचे भान होते, त्यालाच आत्मानुभव होतो.

    विचारांच्या द्वारा उत्पन्न झालेले ज्ञान म्हणजे शुद्ध आत्मज्ञान नाही, विचार स्वयं आवरणकारी असतात. आत्मा निर्विचार स्वरूप आहे. विचार आणि आत्मा अगदीच भिन्न आहेत. आत्म्याचे स्वरूप मन, बुद्धी, चित्त, अहंकार, शब्द आणि विचार यांच्या स्वरूपाहून वेगळे आहे. ज्ञान, दर्शन, चारित्र्य असे ज्याचे स्वरूप आहे आणि परमानंद ज्याचा स्वभाव आहे, अशा आत्म्याला ओळखायचे आहे.

    ‘चंदुलाल’ प्रयोग आहे आणि ‘शुद्धात्मा’ स्वत: प्रयोगी आहे. प्रयोगालाच प्रयोगी मानण्याचा परिणाम म्हणजे चिंता, उपाधी!

    अज्ञाशक्तीमुळे जगाची अधिकरण क्रिया चालू राहते आणि प्रज्ञाशक्तीने ती संपते. स्वरूपज्ञानाची प्राप्ती झाली की प्रज्ञा प्रकट होते आणि अज्ञा निरोप घेते. अज्ञा संसारात भटकवत ठेवते, प्रज्ञा मोक्षाच्या किना:यापर्यंत नेऊन पोहोचविते! प्रकट झालेली प्रज्ञा सतत आत्महितच दाखविते, सतत सावध करत राहते आणि संसारातून मुक्त करते! केवळ प्रकाश स्वरूप आत्मा संसाराच्या बाहेर निघणार तरी कसा? ते काम तर आत्म्याचेच एक अंग स्वरूप असलेली प्रज्ञा करते! आत्म्याच्या मूळ कल्पशक्तीतून अज्ञा उत्पन्न होते, त्यात मग अहंकार मिसळतो आणि मग त्यामुळे संसारचक्र निवांतपणे चालू राहते! संयोगांच्या जबरदस्त दबावामुळे स्वाभाविक ज्ञान-दर्शन विभाविक बनले आहे. सिद्धगतीत संयोग नसतात, संयोगांचा दबाव नसतो म्हणून तिथे विकल्पही नसतात.

    कर्तेपणाबद्दल नि:शंकता म्हणजेच अज्ञदशा. कर्तेपणाबद्दल शंका येणे म्हणजे स्थिप्रज्ञदशा आणि कर्तेपण संपूर्ण नष्ट झाले की प्रज्ञा उत्पन्न होते.

    चित्त आणि प्रज्ञा यात फरक किती? तर चित्त फक्त (पूर्वी) पाहिलेलेच पाहू शकते, याउलट प्रज्ञा सर्व नवीनच पाहते, विशेष जाणते. स्वत:चे दोष पण दाखविते ती प्रज्ञा. चित्त इतर सर्व गोष्टी बघू शकते पण प्रज्ञेला पाहू शकत नाही. मात्र आत्मा प्रज्ञेलाही पाहू शकतो! प्रज्ञा केवलज्ञान प्राप्त होईपर्यंतच शुद्धात्माच्या सेवेत राहते.

    आत्म्याने एक विकल्प केला आणि लगेच पुद्गलाने करामत करून संसार उत्पन्न केला! यात कोणीही स्वतंत्र कर्ता नाही. संयोगाच्या दबावामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. या पुद्गलाचे निरंतर परिवर्तन होतच असते, वेगवेगळया अवस्थांच्या रूपात! तत्त्व स्वरूपात पुद्गल परमाणू स्वरूप आहे जे अविनाशी आहे. पुर+गल म्हणजे पुद्गल. पूरण आणि गलन होतच राहणे म्हणजेच पुद्गल. रूप, रस, गंध आणि स्पर्श हे पुद्गलाचे मुख्य चार गुण आहेत. पुद्गलात ज्ञान-दर्शन नाही, संवेदनेचा अनुभवही नाही, आणि क्षायकभाव पण नाही! जगात फक्त पुद्गल तत्त्वाचीच सक्रियता असते. इतर तत्त्वांचा स्वभाव अक्रिय आहे. पुद्गलाच्या सक्रीयतेमुळे जगात त:हेत:हेची रूपे दिसतात.

    थोडेसे विष देखील ‘चेतना’ला ‘ऑन दी मोमेंट’ (तत्क्षणी) घर (शरीर) सोडून जायला लावते. पुद्गलाची केवढी ही प्रचंड ताकद!!!

    परमाणूंची शुद्ध अवस्था म्हणजे विश्रसा. संयोगांच्या दबावामुळे ‘मी चंदुलाल आहे आणि मी हे केले’ असे अज्ञान जेव्हा उत्पन्न होते तेव्हा परमाणू चार्ज होण्याचा प्रयोग होतो म्हणून त्यांना प्रयोगसा म्हणतात. ‘प्रयोगसा’ झाल्यावर कारण शरीर बनते, आणि तेच पुढील जन्मात मिश्रसा बनते, आणि ते थेट कडू-गोड फळे देईपर्यंत मिश्रसा रूपात राहते. फळ देत असताना ‘बेहोश’ अवस्थेमुळे पुन्हा नवीन ‘चार्ज’ करतो आणि हे चक्र चालतच राहते. लोक ज्याला कर्म भोगले असे म्हणतात, म्हणजेच सुख-दु:ख परिणाम असे म्हणतात त्याला ‘ज्ञान’ परमाणूंच्या बदललेल्या अवस्था स्वरूपात ‘पाहत आणि जाणत’ राहते. त्यामुळे नंतर नवीन ‘प्रयोग’ होत नाही आणि हे चक्र तुटते.

    शरीर अनंत प्रकारच्या परमाणूंनी गच्च भरलेले आहे. उग्र परमाणूंच्या उदयात तन्मयाकार झाल्याने क्रोधाचा जन्म होतो, एखादी वस्तू पाहताच आसक्तीचे परमाणू उभे होतात, त्यांच्याशी तन्मयाकार झाल्याने लोभाचा जन्म होतो. ‘मान’ मिळताच तन्मयाकार होऊन खुश होतो आणि त्याच्यात ‘स्वत:’ एकाकार होतो तिथे अहंकाराचा जन्म होतो. या सर्व अवस्थांमध्ये ‘स्वत:’ तन्मयाकार झाला नाही तर क्रोध, मान, माया, लोभ या गोष्टी उद्भवणारच नाहीत. फक्त परमाणूंचा परिणाम शिल्लक राहील, आणि त्यांची ‘निर्जरा’ होऊन जाईल!!

    क्रोधात ‘प्रतिष्ठित आत्मा’, ‘बिलीफ आत्मा’ एकाकार होतो, मूळ आत्मा एकाकार होतच नाही.

    पूरण-गलन या विज्ञानाला ज्ञानी आणखी सूक्ष्मपणे समजावतात की जेवण केले याला लौकिक भाषेत पूरण केले असे म्हणतात, पण हे पूरण हे ‘फस्र्ट’ (पहिले) गलन आहे आणि शौचास जाणे हे ‘सेकंड’ (दुसरे) गलन आहे. प्रत्यक्षात जे पूरण असते ती अत्यंत सूक्ष्म गोष्ट आहे, आणि ती फक्त ‘ज्ञानी पुरुष’च पाहू शकतात, जाणू शकतात!

    ज्याला पुद्गलात ‘पारिणामिक दृष्टी’ प्राप्त होते त्याला विषयसुखे फिकी वाटतात. जिलबी खाल्ली त्याची दुस:या दिवशी काय दशा होईल? खीर खाल्ली त्याची ओकारी झाली तर ती कशी दिसेल? अशी पारिणामिक दृष्टी असली पाहिजे.

    शरीराचे परमाणू, मनाचे परमाणू क्षणोक्षणी बदलत असतात. परमाणू सतत बदलत राहतात पण ते कमी-जास्त होत नाहीत.

    ज्याप्रमाणे प्रत्येक आत्म्याचा एकच स्वभाव असतो, त्याप्रमाणे प्रत्येक परमाणूचा पण एकच स्वभाव असतो. पण क्षेत्र बदलल्यामुळे भाव बदलतात आणि भाव बदलल्यामुळे प्रत्येकात होणारा बदल वेगवेगळया प्रकारचा असतो. त्या आधारावरच जगाचे आस्तित्व टिकून आहे. परमाणू जड तत्त्वाचेच असतात. परमाणू जड आहेत पण चेतनभाव प्राप्त केल्यामुळे ते चेतनवाले बनतात, त्यांना मिश्रचेतन म्हणतात. जोपर्यंत परमाणू शरीराच्या बाहेर असतात तोपर्यंत ते विश्रसा असतात, शरीरात प्रवेश केला की ते प्रयोगसा होतात आणि फळ देतेवेळी ते मिश्रसा होतात.

    फक्त आत्महेतूसाठी ग्रहण केलेले परमाणू सर्वश्रेष्ठ असतात. ते मोक्षाला जाईपर्यंत चक्रवती सम्राटासारख्या सुखसोयी देतात.

    जोपर्यंत प्रयोगसा अवस्था असते तोपर्यंत परिवर्तन शक्य असते. मिश्रसा झाल्यावर कोणाची सत्ता चालत नाही. (शरीरा) बाहेर शुद्ध स्वरूपात असलेले परमाणू स्वाभाविक विश्रसा असतात. आत्म्याबरोबर संयोग झाल्यावर विभाविक, प्रयोगसा बनतात. विभाविक पुद्गल विनाशी असते, स्वाभाविक पुद्गल अविनाशी असते. विभाविक पुद्गल स्वतंत्र नसते ते ‘व्यवस्थित’च्या आधीन असते.

    मूळ स्वरूपात परमाणू फक्त केवलज्ञानातच दिसतात.

    ज्याप्रमाणे आत्मा अनंत शक्तीवाला आहे त्याचप्रकारे पुद्गलही अनंत शक्तीवाले आहे. आत्मा या पुद्गलाची शक्ती जाणण्यासाठी गेला आणि स्वत:च त्यात कैद होऊन बसला आहे! पुद्गलाच्या धक्क्यामुळे आत्म्यामध्ये नैमित्तिक कर्तेपणा उत्पन्न झाला आहे.

    दोन सनातन तत्त्वे एकत्र आली की विशेष परिणाम उत्पन्न होतो.

    ‘मी करतो’ हा कर्ताभाव आहे, आणि कर्ताभाव हेच कर्म आहे. जिथे कर्ताभाव नाही, तिथे कर्म नाही आणि म्हणून तिथे पापही नाही आणि पुण्यही नाही!

    देह परमाणूंचे बनलेले आहे. क्रोध आणि मानाचे परमाणूंचे प्रमाण जास्त असले की पुरुष देह मिळतो आणि माया व लोभ यांचे परमाणू जास्त झाले तर स्त्रीदेह मिळतो. परमाणूंच्या प्रमाणात बदल झाले तर दुस:या जन्मात लिंग बदल होऊ शकतो, पण आत्म्यात मात्र भेद नाही.

    चांगले-वाईट विकल्पामुळे दिसते. निर्विकल्पी व्यक्तीला चांगले-वाईट असे काही नसतेच.

    जे डोळयांनी दिसतात, दुर्बिणीने दिसतात ते सर्व स्थूल परमाणू आहेत. मिश्रसा हे सूक्ष्म परमाणू आहेत, प्रयोगसा हे सूक्ष्मतर परमाणू आहेत आणि विश्रसा हे सूक्ष्मतम परमाणू आहेत!

    पुद्गल हे पण सत् म्हणजे अविनाशी आहे. पुद्गलाचे पण पर्याय आहेत, ते ‘स्वत:’च्या प्रदेशात राहून बदलतात आणि ते विनाशी आहेत. पुद्गल पूरण-गलन स्वभावाचे आहे!

    आत्मा सोडून इतर सर्व भाव पुद्गल भाव आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, क्रोध, मान, माया, लोभ हे सर्व पुद्गल भाव आहेत. त्यांना फक्त पहात राहायचे आहे. त्यात तन्मयाकार झाले तर जोखीमदारी येईल आणि तन्मयाकार झाला नाहीत तर सुटाल! पुद्गलभावाला जो पहातो आणि जाणतो तो आत्मभाव आहे. तोंड बिघडले (वाकडे झाले), मनोभाव बिघडले, असा सर्व परिणाम झाला तर त्याला पुद्गल भावाशी तन्मयाकार झाले असे म्हणतात.

    जोपर्यंत स्व-सत्तेला जाणले नाही तोपर्यंत स्वत: परसत्तेत आहे. परसत्तेला स्वसत्ता मानतो तोच अहंकार आहे.

    सत्तेचा थोडा जरी दुरुपयोग झाला तर सत्ता निघून जाते.

    सर्व प्रकारच्या क्रिया आणि क्रियावाले ज्ञान, हे सर्व परसत्ता आहे. जी अक्रिय आहे, ज्ञाता-दृष्टा, परमानंदी आहे, जी क्रियेच्या ज्ञानाला ओळखते, तीच ‘स्वत:’ची स्वसत्ता असते. जितका शुद्ध उपयोग राहील, तितकी स्वसत्ता प्रकट होईल. अत्यंत घोर अपमान झाला असतानाही परसत्ता स्वत:वर कुरघोडी करत नाही तेव्हा त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे असे म्हणता येईल! एक तास स्वभावात राहून प्रतिक्रमण केले तर स्वसत्तेचा अनुभव येईल.

    करतो कोणीतरी दुसरा आणि ‘मी करत आहे’ असे मानतो ती परपरिणती आहे. ‘व्यवस्थित शक्ती’ जे जे करवून घेते, त्याला वीतरागभावाने पहात राहणे, ही स्वपरिणती आहे. एक क्षणदेखील जे परपरिणतीत प्रवेश करत नाहीत ते ज्ञानी! तेच देहधारी परमात्मा! जो स्वपरिणतीत असतो त्याला परपरिणती स्पर्शही करत नाही.

    ‘‘जेव्हा ज्ञान उपयोगात येते तेव्हा तो स्वपरिणतीत येतो.’’

    ज्ञानींची आज्ञा, ज्ञानींचे दर्शन स्वपरिणतीत आणणारे आहेत. जोपर्यंत किंचितदेखील कोणाचे अवलंबन आहे तोपर्यंत परपरिणती असते.

    ‘डिस्चार्ज’ भावांना स्वत:चे भाव मानतो त्यामुळे परपरिणतीत जातो. ‘डिस्चार्ज’ भावांना जो स्वत:चे भाव मानत नाही तो स्वपरिणतीत आहे. एक पण ‘डिस्चार्ज’ भाव स्वत:चा मानत नाहीत ते ‘ज्ञानी पुरुष’!

    स्वपरिणाम आणि परपरिणाम जीवमात्रांना असतातच. परपरिणामांना स्वपरिणाम मानणे आणि करणारा पण मीच आहे आणि जाणणारा पण मीच आहे असे समजणे म्हणजेच अज्ञान.

    पुद्गल आणि आत्मा दोन्ही परिणामी स्वभावाचे आहेत, म्हणून क्षणोक्षणी परिणाम बदलत असतात तरीही ‘स्वत:चा’ स्वभाव कधीही कोणीही सोडत नाही. पुद्गलाच्या पारिणामिक भावांमुळे सांसारिक ज्ञान हजर होते, उदा. बटाटे खाल्ले तर वात होईल. याउलट शुद्धात्म्याचे पारिणामिक भाव म्हणजे ‘ज्ञाता-दृष्टा’! क्रोध, मान, माया, लोभ हे सर्व पण पुद्गलाचे पारिणामिक भाव आहेत. पारिणामिक भावात कधीच बदल होऊ शकत नाही. आता जग ज्याला सोडा असे म्हणते त्याला वीतराग ‘परीक्षा देणे’ असे म्हणतात, मग ‘परिणाम’ आपोआपच येईल.

    आत्म्याचा स्वभाव असा आहे की तो जशी कल्पना करतो तसा तो ताबडतोब होतो. आत्म्याचा प्रकाश बाहेर गेला म्हणून अहंकार निर्माण झाला. मूळ आत्मा चिंतवन करत नाही, परंतु ‘अहंकारा’चे आरोपण करून चिंतवन करतो तेव्हा त्याच रूपाचा विकल्प बनून जातो! चिंतवन म्हणजे विचार करतो ते नाही, पण स्वत: मनात जो आशय निश्चित करतो, त्याला चिंतवन म्हणतात.

    ‘मी दु:खी आहे’ असे चिंतवन केले की (माणूस) दु:खी होतो आणि ‘सुखी आहे’ असे म्हटल्याबरोबर सुखी होतो. एखाद्या वेड्या माणसाने ‘मी शहाणा आहे’ असे चिंतवन केले तर तो शहाणा होईल.

    जोपर्यंत ‘मी स्त्री आहे, मी पुरुष आहे’ अशी मान्यता आहे तोपर्यंत मोक्ष नाही. ‘मी (स्वत:) आत्मा आहे’ असे मान्यतेत आले तर मोक्ष आहे!

    पुद्गल अधोगामी स्वभावाचे आहे, आत्मा उध्र्वगामी स्वभावाचा आहे. बुद्धीशालींच्या टचमध्ये (संर्पकात) आल्यामुळे स्वत: अधोगामी होतो. परमाणूंची आवरणे जितकी अधिक, तितकी अधिक खालची गती. आत्मा जेव्हा निरावरण होतो, तेव्हाच मोक्षात जातो.

    जो गुणधर्मासह आत्म्याला जाणील आणि तद्रूप परिणाम प्राप्त करील, त्यालाच आत्मज्ञान होते. आत्म्याचे अनंत गुण आहेत - अनंतज्ञान, अनंतदर्शन, अनंतशक्ती, अनंतसुख, अव्याबाध, अरूपी, असंग, अविनाशी...

    अनंतकाळापासून अनंत ज्ञेयांना जाणतो-पाहतो तरी पण आत्म्याचे शुद्धत्व नष्ट होत नाही!

    अक्रमज्ञानींचे हे अद्भुत वाक्य ज्याला पूर्णपणे समजेल, त्याला ते पद प्राप्त होईल.

    ‘‘अनंत ज्ञेयांना जाणण्यात परिणमीत झालेल्या अनंत अवस्थांमध्ये मी संपूर्ण शुद्ध आहे, सर्वांग शुद्ध आहे.’’ - दादा भगवान

    जसेजसे पुद्गल पर्याय बदलतात तसेतसे ज्ञानपर्याय बदलतात. पर्याय सतत बदलत असतांनासुद्धा ज्ञान संपूर्ण शुद्ध, सर्वांग शुद्ध राहते!

    ज्ञानात भेद नसतो. केवलज्ञान स्वरूपी आत्म्यात तर ज्ञान आणि दर्शन याचाही भेद नसतो. गुण आणि वस्तू अभिन्न भावाने अभेद भावानेच असतात. मात्र शब्दात वर्णन करताना भेद भासू लागतो!

    अवस्थेचे ज्ञान विनाशी असते, मूळ स्वाभाविक ज्ञान सनातन असते! ज्ञेय समोर आल्यावर ज्ञान ज्ञेयाच्या आकारासारखे होऊन जाते तरी पण स्वत:ची शुद्धता गमावत नाही, कुठल्याच काळात!

    आत्मा आणि पुद्गल दोन्हीही द्रव्य, गुण आणि पर्याय सहित आहेत. आत्म्याचे गुण अन्वय-सहचारी असतात आणि पर्याय परिवर्तनशील असतात. वस्तूच्या सूक्ष्म अवस्थांना पर्याय म्हणतात.

    ज्ञेयांना जाणतेवेळी राग-द्वेष झाले तर बंधन आहे आणि वीतराग राहिले तर मुक्तच आहे!

    दर्शन सामान्य भावाने असते आणि ज्ञान विशेष भावाने ज्ञान असते, त्यामुळे ज्ञेये वेगवेगळी दिसतात आणि त्यामुळेच ज्ञान-पर्याय ज्ञेयाकार होतात पण दृश्याकार होत नाहीत. आत्मा स्वभावाने आकाशासारखा, ह्या ट्युब लाइटसारखा आहे. ह्या लाइटला डब्यात बंद केले तरी त्याला काही चिकटत नाही, आत्म्याचे द्रव्य ह्या लाइटसारखे आहे. प्रकाशमान (प्रकाशित) करण्याची शक्ती म्हणजे ज्ञान-दर्शन आहे, गुण आहे, आणि त्या प्रकाशात ज्या ज्या वस्तू दिसतात त्या सा:या ज्ञेय आहेत.

    चेतनाचे चेतन पर्याय असतात आणि अचेतनाचे अचेतन पर्याय असतात.

    यथार्थ आत्मा प्राप्त झाल्यानंतरच आत्म्याचा आनंद उत्पन्न होतो. स्थिती कशीही असो तरी निरंतर परमानंद असेल तर त्यालाच मोक्ष म्हणतात. दुस:या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसलेल्या, सहज उत्पन्न होणा:या आनंदालाच आत्मानंद म्हणतात. आनंद हा आत्म्याचा अन्वय गुण आहे. सिद्धगतीत पण सोबत राहणारा गुण आहे! आत्मा जाणल्यानंतरच आत्म्याचा शुद्ध आनंद उत्पन्न होतो आणि तो क्रमश: वाढत वाढत शेवटी संपूर्णते पर्यंत पोहोचतो.

    जीवमात्रांच्या आत अनंत शक्ती आहेत, पण त्यांच्यावर आवरणे आहेत. अहंकार आणि ममता निघून गेल्यावर त्या शक्ती प्रकट होतात! ‘भगवंतां’कडून मागण्यायोग्य शक्ती फक्त ज्ञान शक्ती आणि स्थिरताशक्ती याच आहेत, पुद्गल शक्ती मागणे योग्य नाही! आत्मशक्ती म्हणजेच आत्मवीर्य. अहंकारामुळे आत्मवीर्यावर आवरण येते. जेव्हा आत्मवीर्य कमी होत आहे असे वाटते तेव्हा ‘मी अनंत शक्तीवाला आहे’ असे मोठ्याने 25-50 वेळा म्हटल्याने आत्मवीर्य प्रकट होते! ‘मोक्ष प्राप्त होईपर्यंत त्या मार्गात येणा:या संकटांच्या पुढे मी अनंत शक्तीवाला आहे’ असे म्हणण्याची गरज आहे, मोक्ष मिळाल्यावर त्याची गरज नाही. ‘ज्ञाता-दृष्टा’ राहिल्यामुळे सर्व संकटे नष्ट होतात आणि आत्म्याच्या शक्ती प्रकट होतात. विनाशी वस्तूंच्या मूच्र्छेमुळे आत्म्याची चैतन्यशक्ती झाकली जाते.

    सहाही तत्त्वे शुद्ध स्वरूपात अगुरु-लघु स्वभावाची आहेत. आत्मा टंकोत्कीर्ण आहे त्याचे कारण तो अगुरु-लघु स्वभावाचा आहे.

    ‘क्रोध, मान, माया, लोभ’ हे आत्म्याचेही गुण नाहीत, तसेच जडाचेही गुण नाहीत. ते अन्वय गुण पण नाहीत पण आत्म्याच्या उपस्थितीमुळे उत्पन्न होणारे पुद्गलाचे गुण-व्यतिरेक गुण आहेत. जसे सूर्याच्या उपस्थितीमुळे दगडात उष्णतेचा गुण उत्पन्न होतो त्याप्रमाणे.

    आत्मा अरूपी आहे. अरूपीला रूपी चिकटला हेच आश्चर्य आहे! भ्रांतीमुळे चिकटल्यासारखा वाटतो. पण वास्तवात तसे नाही.

    टंकोत्कीर्ण म्हणजे आत्मा आणि पुद्गल यांचे मिक्स्चर स्वरूप झाले आहे. कंपाउंड (संयुग) नाही! दोन तत्त्वे सोबत आहेत पण ती एक-दुस:यांशी कधीही एकाकार होत नाहीत, त्याचे कारण आत्मा टंकोत्कीर्ण स्वभावाचा आहे! मिक्स्चरच्या स्वरूपात असतो, कंपाउंडच्या स्वरूपात नाही. तेल आणि पाण्याला कितीही एकत्र करा तरीही त्या दोघांचे परमाणू कधीच एकमेकात मिसळून एकाकार होत नाहीत. दोन्ही वेगवेगळेच राहतात. याप्रमाणेच आत्मा आणि अनात्म्याबद्दल म्हणता येईल! सहाही तत्त्वे मूळ स्वरूपात टंकोत्कीर्ण स्वभावाची आहेत! टंकोत्कीर्णचा यथार्थ अर्थ फक्त ज्ञानीच सांगू शकतात! वीतरागांचा हा एकदम विलक्षण शब्द आहे!

    अव्याबाध स्वरूप म्हणजे आत्म्याचा असा गुण आहे की तो कधीही कोणत्याही जीवाला किंचितमात्रही दु:ख देऊ शकत नाही! त्याचप्रमाणे त्याला स्वत:लाही कधीच दु:ख होऊ शकत नाही!!! स्वत:कडून समोरील व्यक्तीला दु:ख होत आहे अशी थोडी शंका जरी आली तर त्या व्यक्तीसाठी प्रतिक्रमण करण्याची गरज आहे. दु:ख, त्रास ‘मानलेल्या आत्म्या’ला होतो, मूळ आत्म्याला नाही. मूळ आत्मा अव्याबाध स्वरूप आहे.

    आत्मा अव्यय आहे. परंतु भाजनाच्या प्रमाणे त्याचा विस्तार किंवा आकुंचन होते, असे असते. आत्मा निरंतर निराकार आहे. तरीही देहाकारी असतो, त्याचा स्वत:चा स्वाभाविक आकार असतो.

    जोपर्यंत स्वत:च्या निराकार परमात्म्याची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत ज्या देहात परमात्मा प्रकट झाले आहेत अशा प्रत्यक्ष ‘ज्ञानी पुरुषां’ची भजना केल्यामुळे स्वत:चा परमात्मापणा प्रकट होतो.

    आत्मा अमूर्त आहे आणि मूर्तीच्या आत आहे ‘ज्ञानी पुरुष’ ज्यांच्यात अमूर्त भगवंत व्यक्त झाले आहेत त्यांना ‘मूर्तामूर्त’ भगवंत म्हणतात.

    आत्मा परम ज्योती स्वरूप आहे, आतील बाहेरील सर्व वस्तूंना जाणतो, वस्तूला वस्तूच्या रूपात जाणतो आणि अवस्थेला अवस्थेच्या रूपात जाणतो. आत्मा स्व-पर प्रकाशक आहे, म्हणजे स्वत: स्वत:ला प्रकाशित करतो आणि इतर तत्त्वांनाही जाणतो.

    आत्म्याला सुगंध किंवा दुर्गंध स्पर्श करत नाही. ज्या प्रकारे प्रकाशाला सुगंध किंवा खाडीचा दुर्गंध स्पर्श करत नाही त्याप्रमाणे!

    अंतिम देहातून आत्मा जेव्हा मोक्षाला जाण्यासाठी मुक्त होतो, तेव्हा त्याचा प्रकाश संपूर्ण ब्रह्मांडात व्यापतो (पसरतो). ज्ञानभावाने व्यापतो त्या दृष्टीने त्याला सर्व व्यापक असे म्हटले आहे.

    सर्व आत्म्यांचा स्वभाव एकच असतो पण प्रत्येक आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्त्व असते. संसाराच्या कोणत्याही वस्तूचा आत्मा कर्ता नाही. मात्र तो ज्ञानक्रिया आणि दर्शनक्रिया यांचा कर्ता आहे. इतर कोणत्याही बाबतीत त्याची सक्रियता नसते. मात्र, आत्म्याच्या उपस्थितीमुळे दुस:या तत्त्वात सक्रियता उत्पन्न होते.

    ज्ञान + दर्शन म्हणजेच चैतन्य. आत्म्यात अनंत दर्शन आणि अनंतज्ञान असल्यामुळे त्याला चैतन्यघन असे म्हटले आहे.

    अनंत प्रदेशी असलेल्या आत्म्याच्या प्रत्येक प्रदेशात ज्ञायक शक्ती आहे. मात्र ज्ञेयालाच ज्ञाता मानल्यामुळे आत्म्याचे प्रदेश कर्म-मळाच्या आवरणाने झाकले जातात. आत्मा अकर्ता आहे. संसाराच्या कोणत्याही क्रियेचा आत्मा कर्ता नाही. (फक्त) स्वत:च्या स्वाभाविक ज्ञानक्रियेचा आणि दर्शनक्रियेचा कर्ता आहे. या व्यतिरिक्त तो कुठेही सक्रीय नाही.

    ज्ञानावरण, दर्शनावरण अशा आठ प्रकारच्या कर्मरूपी आवरणांमुळे आत्मप्रकाश आच्छादित आहे. आत्मज्ञान झाल्यावर ही सर्व आवरणे तुटत जातात, परिणामी आनंद प्रकट होतो. प्रत्येक जीव आवरणासहित असतो. ज्याचे जेवढ्या प्रदेशांचे आवरण तुटलेले असते, त्या प्रमाणात त्याचा प्रकाश बाहेर येतो.

    ‘‘स्वत:कडे स्वत:ची संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशमान करण्याची जी स्वसंवेदनशक्ती आहे, त्याला केवलज्ञान असे म्हणतात.’’

    - दादा भगवान.

    अज्ञानी दु:ख वेदतो.

    स्वरूपज्ञानी म्हणजे आत्म्याचे अस्पष्ट वेदनवाले दु:खाचे ज्ञाता-दृष्टा रहाण्याच्या प्रयत्नात असतात. ते दु:ख भोगत नाहीत, पण त्यांना दु:खाचे ओझे जाणवते. आणि आत्म्याचे स्पष्ट वेदन असलेले ‘ज्ञानी पुरुष’ दु:ख वेदत नाहीत तर फक्त जाणतात.

    कोण भोगत असतो? तर अहंकार, आत्मा नाही.

    आत्म्याचे चार उपयोग आहेत : अशुद्ध, अशुभ, शुभ आणि शुद्ध उपयोग. शुद्ध उपयोगीला मोक्ष मिळतो. ‘स्वत: शुद्धात्मा आहे’ अशी निरंतर जाणीव असेल, पूर्ण जग निर्दोष दिसत असेल, सगळयांच्यात शुद्धात्मा दिसत असेल, तर तो शुद्ध उपयोग आहे. मनात, वाणीत आणि वर्तनात तन्मयाकार परिणाम होत नसतील तर तो शुद्ध उपयोग आहे. ज्ञानींचा संपूर्ण शुद्ध उपयोग असतो. ज्ञानींना उपयोगात उपयोग राहतो.

    ‘‘शुद्ध उपयोग त्याला ज्ञान स्वरूप म्हणतात आणि उपयोगात उपयोग, त्याला विज्ञान स्वरूप म्हणतात.’’ - दादा भगवान.

    केवलज्ञान म्हणजे केवल आत्मप्रवर्तन. ‘अॅबसोल्यूट’ ज्ञान म्हणजेच केवलज्ञान. आणि फक्त तेच आनंद देऊ शकते. निरंतर निज परिणती, जिथे पुद्गल-परिणती नाहीच, तेच केवलज्ञान.

    ‘‘निज परिणती तीच आत्मभावना आहे, ‘मी शुद्धात्मा आहे’ ही आत्मभावना नाही. - दादा भगवान.

    केवलज्ञान होईपर्यंत पिंडांचे ज्ञेय पाहायचे आणि केवलज्ञान झाल्यावर ब्रह्मांडाचेच ज्ञेय झळकतात.

    केवलज्ञान हे आकाशासारखे सूक्ष्म आहे उलट अग्नि स्थूल आहे. स्थूल सूक्ष्माला जाळू शकत नाही. मारा, कापा, जाळा तरीही स्वत:च्या केवलज्ञान स्वरूपावर काहीही परिणाम होऊ शकत नाही असे असते.

    - दादा भगवान.

    उपयोगात उपयोग वर्तत असतो ते केवलज्ञान आहे. स्वत: शुद्ध आहे हेही पाहतो, आणि समोरचाही शुद्ध आहे असे पाहतो, याला शुद्ध उपयोग म्हणतात आणि त्या शुद्ध उपयोगावर उपयोग राहतो त्याला उपयोगावर उपयोग असे म्हणतात.

    ‘‘केवलज्ञान स्वरूप कसे दिसते? संपूर्ण शरीरात आकाशाचा जो भाग आहे तो स्वत:चा दिसतो, आकाशच दिसतो, इतर काहीच दिसत नाही. कोणतीही मूर्त वस्तू त्यात दिसत नसते.’’ - दादा भगवान.

    ‘‘या जगात जे जे काही केले जाते ते जगाला परवडो किंवा न परवडो, तरीही ‘मी काहीच करत नाही’ असे सतत लक्षात असणे म्हणजेच केवलदर्शन. अशी समज राहणे म्हणजेच केवलज्ञान!’’

    -दादा भगवान.

    मन, वचन, काया यांच्या सर्व संगी क्रियांपासून शुद्ध चेतन पूर्णत: असंगच आहे. - दादा भगवान.

    ‘‘मन, वचन, काया, यांचे जे लेपायमान भाव येतात त्यापासून ‘शुद्ध चेतन’ संपूर्ण निर्लेपच आहे.’’ - दादा भगवान.

    मनात जे भाव, विचार येतात ते, वाणी आणि काया ही सर्व अज्ञानदशेची स्पंदने आहेत, ज्ञानदशेत कोणतीही स्पंदने होत नाहीत.

    स्वरूपज्ञान झाल्यावर मनात जे भाव येतात ते लेपायमान करण्याचा प्रयत्न करतात, पण तेव्हा जर अशी जागृती राहिली की ‘हे माझे स्वरूप नाही, यापासून मी मुक्तच आहे’ तरच निर्लेप राहता येईल.

    ‘‘मन, वचन, काया यांच्या सर्व सवयी आणि त्यांचे स्वभाव ‘शुद्ध चेतन’ जाणतो आणि स्वत:च्या स्व-स्वभावाला पण तो जाणतो कारण तो स्व-पर प्रकाशक आहे.’’ - दादा भगवान.

    मनाच्या, वाणीच्या, कायेच्या सवयींना स्वत: जाणतो आणि सवयींच्या स्वभावाला पण स्वत: जाणतो. सवयींचा स्वभाव म्हणजे ही सवय जाड (पक्की) आहे, ही पातळ आहे, ही चिकट आहे, ही खोल आहे, ही उथळ आहे, असे सगळे स्वत: जाणतो. सवयी मृत्यूपर्यंत जात नाहीत, पण सवयींचा स्वभाव आत्मज्ञानानंतर हळूहळू जातो.

    ‘‘स्थूल संयोग, सूक्ष्म संयोग, वाणीचे संयोग पर आहेत आणि पराधीन आहेत, आणि शुद्ध चेतन यांचा ज्ञाता-दृष्टा आहे’’

    - दादा भगवान.

    आतील मनाचे, बुद्धीचे, चित्ताचे आणि अहंकाराचे संयोग हे सर्व सूक्ष्म संयोग आहेत. वाणीचे संयोग सूक्ष्म-स्थूल आहेत आणि व्यवहाराचे संयोग हे स्थूल आहेत. हे सर्व संयोग ‘पर’ आहेत आणि ‘पराधीन’ आहेत.

    ‘‘प्रकृतीचा एकही गुण ‘शुद्ध चेतना’त नाही आणि ‘शुद्ध चेतना’चा एकही गुण प्रकृतीत नाही. गुणांच्या बाबतीत हे दोघे संपूर्ण भिन्न आहेत.’’

    - दादा भगवान.

    प्रथम अज्ञानातून मुक्ती आणि नंतर अज्ञानामुळे उत्पन्न होणारे ‘इफेक्टस्’ (परिणाम) यातून मुक्ती मिळवायची आहे.

    आत्मद्रव्य कधी बदलत नाही, परंतु ‘व्यवहार आत्म्याला’ संसारी भावामुळे स्पर्श झालेले द्रव्य, क्षेत्र, काळ, या भाव ते सर्व एक दुस:यांच्या आधाराने बदलत राहतात.

    राग-द्वेष हे ‘राँग बिलीफ’मुळे उत्पन्न होत असतात. तो काही आत्म्याचा स्वभाव की गुण नाही.

    ‘रिलेटिव्ह’मध्ये आत्मा आणि ‘रियल’मध्ये परमात्मा. ‘रिलेटिव्ह’ची भजना केली तर ‘स्वत:’ विनाशी आहे आणि ‘रियल’ची भजना करील तर ‘तो’ ‘परमात्मा’ आहे!

    जीवमात्रात चेतन एकाच स्वभावाचे आहे. परंतु आवरणात फरक आहे.

    अविनाशीचे ‘चिंतवन’ केले तर माणूस अंतर्मुखी होत जातो आणि विनाशीचे चिंतवन केले तर बहिर्मुखी होत जातो.

    मोक्षाला जाणारा सरळ रस्ता म्हणजे मोक्षमार्गाच्या मार्गदर्शकाच्या मागे-मागे चालत राहणे.

    जोपर्यंत मन, वचन, काया यांची ममता आहे तोपर्यंत समता कशी येईल?

    बाहेरील कोणत्याही निमित्ताने, पंचेद्रिंयांद्वारे, मानपान, लक्ष्मी, विषय अशा कोणत्याही गोष्टीपासून सुख येत नसेल तरी पण आतमध्ये जे सुख वर्तत असते ते आत्म्याचे सुख आहे. जोपर्यंत विषयांचे सेवन चालू आहे तोपर्यंत आत्म्याच्या स्पष्ट सुखाचे वेदन (अनुभव) होत नाही.

    ज्या प्रकारे लिफ्टमधून जाणारी व्यक्ती आणि लिफ्ट दोन्ही वेगळे आहेत त्याप्रमाणे आत्मा आणि शरीर पूर्णपणे वेगळेच आहेत. लिफ्टच सर्व काम करते, स्वत:ला फक्त बटणच दाबावे लागते. त्याचप्रकारे ज्याला भौतिक इच्छा आहेत त्याला अहंकाराचे बटण दाबले पाहिजे आणि ज्याला मोक्षाला जाण्याची इच्छा आहे त्याने आत्मभावाने बटण दाबले पाहिजे.

    जो स्वसत्तेत येतो, पुरुष बनून पुरुषार्थात येतो तो भगवंत, जो प्रकृतीच्या सत्तेत खेळत राहतो तो जीव.

    आत्म्याने देह स्वरूप धारण केलेलेच नाही.

    Enjoying the preview?
    Page 1 of 1