Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

प्रतिक्रमण (ग्रंथ)
प्रतिक्रमण (ग्रंथ)
प्रतिक्रमण (ग्रंथ)
Ebook1,512 pages7 hours

प्रतिक्रमण (ग्रंथ)

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

माणूस पावलोपावली कुठली ना कुठली तरी चूक करतच असतो. त्यामुळे इतरांना खूप दुःख होते. ज्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे त्याला या सर्व राग– द्वेष याच्या हिशोबातून मुक्त व्हावे लागेल. यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्याकडून घडलेल्या पापांसाठी प्रायश्चित्त करणे किंवा माफी मागणे. हे करण्यासाठी तीर्थंकरांनी आपल्याला खूप शक्तिशाली हत्यार ( साधन) दिले आहे ज्याचे नाव आहे - प्रतिक्रमण. प्रतिक्रमण म्हणजे आपल्याकडून झालेली अतिक्रमणे धुऊन टाकणे. ज्ञानी पुरुष दादा भगवान यांनी आपल्याला आलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्यान याची किल्ली दिली आहे. या किल्लीद्वारे आपण अतिक्रमणांपासून मुक्त होऊ शकतो. आलोचना याचा अर्थ आहे की आपली चूक कबूल करणे. प्रतिक्रमण म्हणजे त्या चुकीबद्दल माफी मागणे आणि प्रत्याख्यान करणे याचा अर्थ अशी चूक पुन्हा न होवो असा दृढ निश्चय करणे. या पुस्तकात आपल्याला आपण केलेल्या अनेक वेगवेगळ्या अतिक्रमणांतून मुक्त कसे व्हावे याचा मार्ग मिळतो

Languageमराठी
Release dateJun 22, 2022
ISBN9789391375256
प्रतिक्रमण (ग्रंथ)

Read more from दादा भगवान

Related to प्रतिक्रमण (ग्रंथ)

Related ebooks

Reviews for प्रतिक्रमण (ग्रंथ)

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    प्रतिक्रमण (ग्रंथ) - दादा भगवान

    www.dadabhagwan.org

    दादा भगवान प्ररूपित

    प्रतिक्रमण

    मूळ गुजराती संकलन : डॉ. नीरू बहन अमीन

    अनुवाद : महात्मागण

    दादा भगवान कोण?

    जून 1958 संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनवर अलोट गर्दी होती. रेल्वेच्या प्लेटफॉर्म नंबर तीनच्या बाकावर बसलेल्या श्री अंबालाल मूळजीभाई पटेल रूपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मांपासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले ‘दादा भगवान’ संपूर्णपणे प्रकट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भुत आश्चर्य! एका तासात त्यांना विश्वदर्शन लाभले! मी कोण? भगवंत कोण? जग कोण चालवित आहे? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांची रहस्ये संपूर्णपणे प्रकट झाली.

    त्यांना प्राप्ती झाली तशी ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षूनां सुद्धा आत्मज्ञानाची प्राप्ती करवित असत, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भुत ज्ञान प्रयोगाद्वारे! त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हटले जाते. क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढणे! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग! शॉर्ट कट!

    ते स्वत: प्रत्येकाला ‘दादा भगवान कोण?’ याबद्दलची फोड करून देताना म्हणायचे की, ‘‘हे दिसतात ते ‘दादा भगवान’ नाहीत. हे तर ‘ए.एम. पटेल’ आहेत. आम्ही ज्ञानी पुरुष आहोत आणि आत प्रकट झाले ते दादा भगवान आहेत. दादा भगवान तर ‘चौदालोकाचे’ नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात आहेत आणि ‘येथे’ माझ्या आत संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! मी स्वत: भगवान नाही. माझ्या आत प्रकट झालेले ‘दादा भगवान’ यांना मी पण नमस्कार करतो.’’

    आत्मज्ञान प्राप्तीची प्रत्यक्ष लींक

    परम पूज्य दादा भगवान (दादाश्री) यांना 1958 मध्ये आत्मज्ञान प्रकट झाले. त्यानंतर 1962 ते 1988 पर्यंत देश-विदेश परिभ्रमण करून मुमुक्षुंना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करवित असत.

    दादाश्रींनी आपल्या हयातीतच आत्मज्ञानी पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा) यांना आत्मज्ञान प्राप्त करवून देण्याची ज्ञानसिद्धी प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलयानंतर नीरूमा त्यांच्याप्रमाणेच मुमुक्षुंना सत्संग व आत्मज्ञान प्राप्ती निमित्त भावाने करवित असत.

    आत्मज्ञानी पूज्य दीपकभाई देसाई यांना सुद्धा दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धी प्रदान केली होती. वर्तमानात पूज्य नीरूमांच्या आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात निमित्तभावाने आत्मज्ञान प्राप्ती करवित आहेत.

    या आत्मज्ञान प्राप्तीनंतर हजारो मुमुक्षु संसारात राहून, सर्व जबाबदा:या सांभाळत असताना सुद्धा आतून मुक्त राहून आत्मरमणतेचा अनुभव घेत आहेत.

    निवेदन

    ज्ञानी पुरुष संपूज्य दादा भगवान यांच्या श्रीमुखातून अध्यात्म आणि व्यवहारज्ञाना संबंधीत जी वाणी निघाली, तिला रेकॉर्ड करून संकलन व संपादन करून पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित केले जात आहे. विभिन्न विषायांवर निघालेल्या सरस्वतीचे अद्भुत संकलन ह्या पुस्तकात झाले आहे, जे नवीन वाचकांसाठी वरदान रूप सिद्ध होईल.

    प्रस्तुत अनुवादामध्ये विशेष लक्ष ठेवलेले आहे की प्रत्येक वाचकाला दादाश्रींची प्रत्यक्ष वाणीच ऐकली जात आहे असा अनुभव व्हावा. याच कारणाने कदाचित काही ठिकाणी अनुवादाची वाक्य रचना मराठी व्याकरणानुसार ऋूटीपूर्ण जाणवेल, परंतु तिथे जर आशय समजून वाचण्यात आले तर अधिक लाभदायी होईल.

    प्रस्तुत पुस्तकात काही ठिकाणी कंसात दर्शविलेले शब्द किंवा वाक्य दादाश्रींद्वारा बोलल्या गेलेल्या वाक्यांना अधिक स्पष्टतापूर्वक समजावण्यासाठी लिहिले गेले आहेत. तसेच काही ठिकाणी इंग्रजी शब्दांना मराठी अर्थाच्या रूपात ठेवले गेले आहेत. दादाश्रींच्या श्रीमुखातून निघालेले काही शब्द जसेच्या तसेच इटालक्सि मध्ये ठेवलेले आहेत, कारण त्या शब्दांसाठी मराठी भाषेत असे शब्द नाहीत की जे त्याचा पूर्ण अर्थ देऊ शकतील. तरी पण त्या शब्दांचे समानर्थी शब्द कंसात तसेच पुस्तकाच्या शेवटी पण दिले गेले आहेत.

    ज्ञानींच्या वाणीला मराठी भाषेत यथार्थ रूपाने अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु दादाश्रींच्या आत्मज्ञानाचा आशय जसा आहे तसा तर आपल्याला गुजराती भाषेतच अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचे खरे मर्म समजायचे असेल त्यांनी ह्या हेतूने गुजराती भाषा शिकावी असा आमचा अनुरोध आहे. अनुवादासंबंधी उणीवांबद्दल आपले क्षमा प्रार्थी आहोत.

    *****

    समर्पण

    अतिक्रमणांचा सतत होतो वर्षाव;

    विषमकाळी पदोपदी कषायी व्यवहार.

    पती-पत्नी, आई-वडील-मुलांमध्ये वाणीचा गोळीबार;

    वर्तनाने आणि मनाने सतत दु:खांचा उपहार.

    तरीही दादांनी दिले प्रतिक्रमणांचे हत्यार;

    नरकातूनी होते स्वर्ग स्थापना, घरात अन् बाहेर.

    लाखो लोकांनी अंगीकृत केले, बदलले मुळापासूनी संस्कार;

    मोक्षासाठी लायक बनवितो अक्रमचा हा उपहार.

    वीतरागींच्या प्रतिक्रमणांचे, दादांनी केले पुन्हा प्रसार;

    जगास समर्पण, जो झेलील तो पावेल मुक्तीचा हार.

    उपोद्घात

    (राग : वळतरनी इच्छा विना, लुंटावे मोक्षज लक्ष्मी)

    खंड-1 : प्रतिक्रमण

    जीवनात करण्यायोग्य, त्रिकरणाचे एकात्मयोग;

    तो तुटता त्वरित प्रतिक्रमण, अक्रम ज्ञानाचा हा शोध!

    यथार्थ रूपे प्रतिक्रमण, विधी ‘दादा’ दाखवी;

    ‘दादा भगवान’ साक्षीने, समोरच्याच्या आत्म्याशी!

    हृदयी जाहीर करूनी स्वदोष, क्षमा, पश्चात्ताप ‘हार्टिली’;

    परत न करण्याचा निश्चयाने, दोष धुतले जातात ‘सिम्पली’!

    सत्कर्माने होते धर्म, दुष्कर्म तोची अधर्म;

    धर्म-अधर्माच्या पैलतीरी स्थित आहे आत्मधर्म!

    चांगल्या कर्माने ‘क्रेडिट’, त्याने मिळे सुखभोग;

    वाईट कर्माने’ डेबिट’, त्याने मिळे दु:खभोग!

    ‘क्रेडिट-डेबिट’ शून्य झाल्याने आत्मसुखाचा उपभोग;

    पहिले दोन करी संसार वृद्धी, तिसरा मार्गावर मोक्ष खरा!

    इष्टदेव- दादांच्या साक्षीने, ‘हाॢटली’ पश्चात्ताप करूनी;

    हे विज्ञान क्रियाकारी, औषधाचा आविष्कार रोगावरी!

    खाणे-पिणे, स्नान करणे, बोलणे वा भोजन करणे;

    समोरच्यास न दुखावता, सहज व्यवहार आहे क्रमण!

    राग-द्वेष, समोरच्याला दु:ख देणे, ते सर्व आहे अतिक्रमण;

    अतिक्रमणातून परतणे, तो विधी आहे प्रतिक्रमण!

    क्रोध-मान-माया-लोभ, ते सर्व मात्र अतिक्रमण;

    जातील ते सर्व त्वरित, केल्याने त्यांचे प्रतिक्रमण!

    अतिक्रमणाने राग-द्वेष, परिणाम होतसे दोघांवरी;

    प्रतिक्रमण त्याचे होताच परिणाममुक्त दोघेही!

    डाग पडला तर कपडा व धुणारा, श्रम पडे दोघांना,

    क्रमणाचा परिणाम नाही कुणावर, सहजता वर्तते सर्वांना!

    जीवमात्र करी ‘प्रोजेक्ट’, हिंडता-फिरता अनंत वेळ;

    कोमी-हुल्लड ऐकताच, विचार करतो थर्ड वल्र्ड वॉरचा!

    एका सेकंदाचे समय असंख्य, अतिक्रमण करी अपार;

    अतिक्रमणाने उत्पन्न झाला, प्रतिक्रमणाने विराम संसार!

    अपमान करणारा वाटे दोषी, ते ही आहे अतिक्रमण;

    कठोर बोलणे, वा उलट वागणे, हे ही आहे अतिक्रमण!

    मुलांना मारणे, हे ही आहे अतिक्रमण;

    का मला शिवी दिली? असे वाटणे हे ही अतिक्रमण!

    आपल्याकडून कोणाला दु:ख झाले, तर होईल ते अतिक्रमण;

    तेव्हा दादांना आठवून, करा त्वरित प्रतिक्रमण!

    आपल्या हृदयी तिळभरही नाही, दु:ख देण्याचा भाव;

    तरीही दु:ख दिले, दादा म्हणे, तो नैमित्तिक भाव!

    कळत-नकळत दुखाविले कुणास, तर तेही अतिक्रमण;

    न बोलता मन बिघडले, तरीही ते आहे अतिक्रमण!

    मन-वचन-काया योगे, जीव मात्र होई दु:खी;

    आवश्यक त्वरित तयाचे, हृदयपूर्वक प्रतिक्रमण!

    कर्म कमी करतो तो आहे धर्म, वाढवितो तो अधर्म;

    प्रतिक्रमणाने नाही नवीन कर्मबंधन, सार आहे हे सर्वोच्च धर्म!

    शक्ती मागा पुढे जाण्यास्तव, हृदयी करूनी प्रार्थना;

    ज्ञानी वा स्वातमकडूनी, गुरु-इष्टदेव-मूर्ती!

    क्षमा मागा पुकारूनी, चुकांच्या शुद्धीसाठी;

    नष्ट होतील छोट्या चुका, सामायिक विरघळविते गाठी!

    अनंत काळच्या पाप कर्मांपासून होईल कशी निवृत्ती?

    ज्ञानीचे निश्चय ज्ञान, जेव्हा करील हृदयांकित!

    ते न मिळाले, तर मिळेल श्रुतज्ञान सरळ ग्रंथातूनी;

    श्रुतज्ञानातून मतिज्ञानात परिवर्तीत, करी पापकर्म निवृत्ती!

    किंवा पापमुक्त होण्याची, दृढ भावना आणि प्रतिक्रमण;

    निश्चित सोडवी अनंत जन्माचे, पापकर्मांचे गाठोडे!

    व्यवहार वा व्यापारातील अन्याय, काय आहे त्यांचे प्रायश्चित्त?

    प्रभूचरणी करा निश्चय, पुन्हा करणार नाही असे कधी!

    पूर्व जन्मीच्या प्रकृती दोषाने आज दिले जाते दु:ख;

    भोगावे ते समता भावाने, तर मिळे मुक्तीचा आनंद!

    सहन करावे उपकारी भावाने, मिळणारे सर्व दु:ख;

    दादांच्या प्रतिक्रमणाने, सोडा सर्व संसार जंजाळ!

    वैज्ञानिक तत्व हे जैनांचे, आलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्यान;

    अन्य धर्मातही आहे, प्रायश्चित्ताचे प्रमुख स्थान!

    पूर्णता अन सूक्ष्मता, प्राप्त करवी वीतरागी विज्ञान;

    व्यवहार धर्माला टॉपवर नेऊन, प्राप्त करविते धर्मध्यान!

    क्षपक श्रेणी चढवून, प्रतिक्रमणाने लाभे शुक्लध्यान;

    निश्चय-व्यवहार संपूर्ण धर्म, बोधितात तीर्थंकर भगवान!

    दादाश्री समजावितात, आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान सार;

    निजदोषांचे ज्ञानी वा सद्गुरुंपाशी करा स्वीकार!

    निर्भय होऊनी निश्चित मनाने, सोपवा गुरुवर सर्व भार;

    गुरु करवतील प्रतिक्रमण, सहज जागृती राहील वारंवार!

    प्रतिक्रमण आहे कर्म मुक्तीचे, सर्वश्रेठ हत्यार;

    दादांचे प्रतिक्रमण पकडले, तर प्रगती विना गुरु आधार!

    विना जप-तप-उपवास, ध्यान-योगाचे कष्ट अपार;

    निश्चित पोहोचेल मोक्षाला, प्रतिक्रमण एकमात्र तारी संसार!

    पश्चात्तापाने पापांपासून पावन होऊन मुक्त होशील;

    पुन्हा पुन्हा पश्चात्ताप करूनी, क्षमा माग प्रभूचरणी!

    पश्चात्ताप तर सदैव, हार्टिलीच असतो स्वयं;

    प्रतिक्रमणाने सुटतील कर्म, हाच आहे कर्म नियम!

    चुकीसाठी माग माफी ख:या मनाने, हीच मुक्तीची रीत;

    खोट्या मनाने मागितली, तरीही घडेल तुझे आत्महित!

    मद्यपान करीत असेल तर, माफी माग निश्चय करूनी;

    कधी तरी सुटेल अवश्य, ही वैज्ञानिक गोष्ट खरी!

    हे आहे’अक्रम विज्ञान’, अवश्य आहे फलदायी;

    दोन तासात मोक्ष मिळे, मात्र ‘ज्ञानी’ ज्ञान-आज्ञा ऐक!

    कुणाला झाले गर्भित दु:ख, तेही आहे अतिक्रमण;

    कळो वा न कळो, पण करा त्वरित प्रतिक्रमण!

    स्वेच्छेने केले ते स्वैच्छिक, अवश्य कर तिथे पुरुषार्थ;

    दबावामुळे केले ते अनिवार्य, त्याला म्हणतात प्रारब्ध!

    क्रिया आहे अनिवार्य आणि भाव-कुभाव हे स्वैच्छिक;

    अपमान आहे अनिवार्य, आणि प्रतिक्रमण आहे स्वैच्छिक!

    अज्ञान दशेत आहे भावसत्ता, प्रतिक्रमण-प्रत्याख्यानाची;

    खून, चोरी करून होतो खुश, तर पडेल गाठ फार पक्की!

    विषयविकारांचे केले प्रतिक्रमण, तर वाट धरेल हनुमंताची;

    मनापासून केले प्रतिक्रमण तर, दोष-शुद्धी जबाबदारी दादांची!

    कनफेशन करतात ख्रिश्चन, पण तोंड लपवून अंधारात;

    अक्रमात ज्ञानींजवळ, आलोचना करतो अश्रुधारांनी!

    प्रतिक्रमण अन त्रिमंत्र, एकत्र केल्याने निश्चित फलदायी;

    महान पुरुषांच्या भक्तीने, होतसे पूर्ण पापमुक्ती!

    अनंत वेळा केली प्रतिक्रमणे, का न मिळे फळ कधी?

    समजून ‘शूट ऑन साइट’, केले होते का एकदा तरी?

    सकाळ-संध्याकाळ प्रतिक्रमण, पण होतात ते ‘मेकॅनिकल’;

    विना पश्चात्तापाचे प्रतिक्रमण, ते नाही खरे प्रतिक्रमण?

    घोकंमपट्टी करूनी बोलतो रोज, अशी तर रेकॉर्डही बोलते,

    खरा अपराधी सापडत नाही, जो समोर तोच मारला जातो!

    आयुष्यभर केले तरीही, संपला नाही एकही दोष;

    पोपटपंचीचे प्रतिक्रमण, अहो, नाही हा महावीरांचा मार्ग!

    मागधी भाषेत प्रतिक्रमण, कसे समजेल कोणाला?;

    समजे न साधू, श्रावकांना, ‘मी केले’ म्हणून वाढविले अहंकार!

    महावीरांचे शिष्य वक्र व जड, होतील विना एक अपवाद;

    क्रियेला मानतात आत्मा, कोठे करू याची फिर्याद?

    मधल्या बावीस तीर्थंकरांचे, शिष्य होते कसले विचक्षण?

    प्रतिक्षण होते जागृत, दोष होताच करीत प्रतिक्रमण!

    रोजच करतात प्रतिक्रमण, पण अर्थ जाणल्याशिवायच;

    संवत्सरी एका प्रतिक्रमणाने, धुतले जात नाही वर्षभराचे पाप!

    वर्षभराचे पाप पर्युषण वेळी, पाहताच स्वदोष हृदय द्रवते;

    मरावेसे वाटे तेव्हा, अरेरे! किती दुखावले लोकांना?

    असे भाव झाले का कधी? उलट सुंदर कपडे घालून?

    लग्न कराया निघाले जणू, दागीण्याने सजून धजून!

    आवडत्यांना ‘मिच्छामि दुक्कडं’, नावडत्यांकडे जात नाही,

    वीतरागांची अब्रू काढली, नाही हा महावीरांचा धर्म!

    ख:या वीतराग धर्मात, करतात रोज पाचसे प्रतिक्रमण;

    ‘पाहताक्षणी संपविणे’, दोषांचा पश्चात्ताप दिवस-रात्र!

    शासन तर खरे महावीरांचेच, ‘ज्ञानी’ आहेत शासन शृंगार;

    क्रमिक अडकला कलियुगात, ‘आमच्या’ द्वारे उघडला ‘अक्रम’ मोक्षद्वार!

    नकद प्रतिक्रमण केल्याने, संपतात रौद्र-आर्त ध्यान;

    ‘भगवत् पद’ प्राप्ती सहज, अक्रमज्ञानी प्रकटतात तिथे!

    हेतूनुसार फळ प्रतिक्रमणाचा, पुण्य वा संसार मुक्ती;

    ज्ञान वा अज्ञान दशेत, फळ प्राप्तीचा आहे तो मूळ आधार!

    आत्मज्ञानच आहे मोक्षमार्ग, नव्हे मात्र प्रतिक्रमण;

    स्वभान झाल्यानंतरचे प्रतिक्रमण, उघडतात मोक्षाचे द्वार!

    दर्शन मोह गेल्यानंतर, थांबते कर्मबंधन;

    दर्शनमोह असेपर्यंत, प्रतिक्रमण मात्र गज-स्नानावत्!

    प्रतिक्रमण करण्यास सांगितले, ‘शूट ऑन साइट’ करा;

    ते जर जमले नाही तर, ‘रायशी-देवशी’ करा!

    तेही झाले नाही तर पाक्षिक, पाक्षिक नाही तर चारमासी;

    काहीच जमले नाही तर संवत्सरी, शेवटी आई नाही तर मावशी!

    मावशीही सख्खी मिळाली नाही, भाड्याची जणू कळीकाळी;

    कुठूनी मोक्ष? कुठूनी धर्म? रमतात केवळ बुद्धीत!

    करणारा वा करविणा:याचे यथार्थ असावेत प्रतिक्रमण;

    शब्दांचे शृंगार सजविले, भाव विसरलेत अज्ञानात!

    पावलोपावली अतिक्रमण, तरीही उपाय आहे प्रतिक्रमण;

    पण चोरी-लाच चालणार नाही, येथे तर केवळ वीतराग चलन!

    प्रतिक्रमण करतात मृतांचे, जीवितांचे कधी केले नाही;

    खरे आहेत भाव प्रतिक्रमण, क्रियावाले तर निव्वळ खोटे!

    त्याचे फळ नाही यथार्थ, खोटी किंमत लावून मिरवतात;

    मानली कमाई आत्म्याची, जिंकले नाही अहो, हरून बसलात!

    शब्दन् शब्द बोलणे, ते तर आहे द्रव्य प्रतिक्रमण;

    भावामध्ये ‘असे न होवो’, तो आहे भाव प्रतिक्रमण!

    तोडली नाही दोष शृंखला तर, ती नाही महावीर ‘संवत्सरी’;

    वांझ प्रतिक्रमण करूनी, बिघडवले नाव वीर महावीरांचे!

    माफ करा वाचक हो, हृदय आता भरून आले;

    करतो त्याचे मी प्रतिक्रमण, कडक शब्द जे लिहिले गेले!

    क्रियामात्र आणते आवरण, मार्ग चुकविते मोक्षाचा;

    ‘रायशी-देवशी’ गात राहतात, चोपडण्याचे औषध पितात!

    क्रमिक मार्गात घेतात पच्चखाण, कंदमूळ वा रात्रीभोजन;

    समज नसलेले हे पच्चखाण, मोक्षासाठी नाहीत उपयोगी!

    ज्या दोषांचे प्रतिक्रमण, त्यांचेच करावे प्रत्याख्यान;

    अक्रम विज्ञानाने उघड केले, यथार्थतेने प्रतिक्रमण!

    त्यागासाठी घेतात पच्चखाण, हळूहळू ते सुटतात;

    त्याग केलेल्याचेच घेतात पच्चखाण, काय करावे या समजुतीचे?

    इर्यापथिकिचे प्रतिक्रमण, क्रमिक मार्गात करावे लागे;

    अक्रमात देहापासून वेगळे, त्याला क्रिया स्पर्शत नाही!

    प्रतिक्रमणाने स्वच्छ होतात, पुण्य आणि पाप कर्म;

    मोक्षासाठी तर दोन्ही हेय, उपादेय हा आत्मधर्म!

    दोष होताच प्रतिक्रमण, जागृती विना शक्य नाही;

    ’ज्ञानी’ आत्मा जागृत करतात, मग पतंग दोरी सुटत नाही!

    अज्ञान दशेच्या प्रतिक्रमणाने पाप बंधन कमी होते;

    आत्मदृष्टी झाल्यानंतर, जागृतीसह खरे प्रतिक्रमण!

    कपडे रोजच धुऊन घालतात, रोज लिहितात हिशोब;

    प्रतिक्रमण करतात वर्षाने, मग कपडे का नाहीत धूत वर्षाने?

    ज्ञानी देखील टोकल्यावर, लगेच करतात प्रतिक्रमण;

    ही तर आहे नैसर्गिक रचना, मग यात दोषी कोण?

    तरीही ‘आहे’ त्याला ‘आहे’ म्हणतात, ‘नाही’ त्याला ‘नाही’;

    ‘आहे’ ला ‘नाही’ म्हणणे, असे खरे ज्ञानी कसे म्हणतील?

    दृष्टीत आहे संपूर्ण जग निर्दोष, तरीही चुका काढते वाणी;

    सत्य बोलल्याने दु:ख झाले, तर प्रतिक्रमण करतात स्वयं ज्ञानी!

    आपले दोषच दोषी दाखवितात, तेव्हा दृष्टी धुवावी लागेल;

    नाही तर कषाय उत्पन्न होतील, सापेक्ष सत्यासाठी लढत!

    प्रतिवादी स्वीकारतात, तीच वाणी वीतराग;

    प्रत्यक्ष सरस्वती म्हटली जाते, देशना आणि स्याद्वाद!

    शुद्धात्मा शिवायची गोष्ट खोटी, असे तू निश्चित जाण;

    ‘मी चंदू’ चेही प्रतिक्रमण, हाच खरा समज प्रमाण!

    डॉक्टर वाटतो कठोर, करतो जेव्हा रोग्याचा उपचार;

    रोग निवारण हो न हो, पण प्रतिक्रमण हा त्याचा उपाय!

    ‘दादा’ डॉक्टर धर्माचे, बोलतात साधूंना बोल;

    ‘ज्ञानी’ शोभे मौन पण वाहते करुणा पाहुनी खोटे!

    स्याद्वाद वाणी चुकताच ज्ञानी करतात प्रतिक्रमण;

    वाणीने दोषी म्हटले तरी, प्रतीतीत आहे निर्दोष!

    तीर्थंकरी वाणी सदैव, स्याद्वाद संपूर्ण;

    अक्रम ज्ञानी चतुर्दशी, म्हणून वाणी अभिप्राय भिन्न!

    दोषी दृष्टी असे जेव्हा, वाणी दादांनी अशी भरली;

    दृष्टी आज निर्दोष झाली, तरीही वाणी अशी निघाली!

    गुरु म्हणे, ‘मी जलकमलवत्’, ‘मूर्ख’ म्हणताच होतो भांडाफोड;

    उडून जाती जल व कमल, हा धर्म आहे की आखाडा?

    व्रत-जप-तप आणि नियम, देतात सांसारिक फळ;

    मोक्षासाठी गरजेचे नाही, गरज मात्र प्रतिक्रमणाची!

    साधू-साध्वी क्षमा मागण्यासाठी, करा एक तासाचा नित्यक्रम;

    प्रत्यक्ष नाही, पण मनोमनी, तरीही आहे हा खरा धर्म!

    प्रतिक्रमण आणि अकषाय, दोन्ही आहेत मूळ धर्म;

    अन्य धर्माची गरज नाही, पण सोडला जगाने ‘हा’ मूळ धर्म!

    पाळ तू ज्ञानी वचन, थेट पोहोचशील मोक्षद्वारे;

    दादा घेतात जबाबदारी, हवी मात्र तुझी तयारी!

    मताग्रह हेच मोठे अतिक्रमण, करी देश बरबाद;

    विष कालवी आतल्याआत, ह्या द्रोहाचा करा निकाल!

    क्रमिक मार्गी आदेश देतात, करू नकोस चोरी, लबाडी;

    पाळ अहिंसा-सत्य-अचौर्य, शास्त्रे वदतात ओरडूनी!

    तोंड बिघडवून लोकांनी, त्यजिले सारे ते शास्त्र;

    जीवन तर सुधारत नाही, मग का हवी ही झंझट!

    ‘करायचे आहे, पण होत नाही’, असे म्हणू नये कधी;

    ‘का होणार नाही’ दृढतेने म्हणून, निश्चय करा वारंवार!

    चोरी-लबाडीचे दोष झाले, पण कर त्यांचे प्रतिक्रमण;

    आचरण न बदले कधी, म्हणून बदल तुझी समज!

    जगातील हे सारे धर्म, आहेत देहाध्यासाचे मार्ग;

    केवळ अक्रम विज्ञान असे, देहाध्यास रहित मार्ग!

    त्याग करायचा आहे वा होत नाही, दोन्ही आहेत कर्तापद;

    शौचाला जाण्याची शक्ती नाही! मग अन्य कोणती ते सांग?

    कर्ताभावाने करायचे तर माग शक्ती जरूर;

    दादांनी दिली ‘नऊ कलमे’, कारणे बदलतील, पण कार्य नाही!

    अनंत शक्तीचा मालक स्वत:, मग ‘शक्ती नाही’ असे का बोलावे;

    प्रतिक्रमण पण आहे पुरुषार्थ, होतो तो भ्रांत दशेत!

    अध्यात्म वाणी गातात देशात, संत-भक्तही त्यात अभान;

    ‘इट हेपन्स’ला म्हणे ‘मी केले’, भोव:याला म्हणे ‘माझे ऐक’!

    जर झाली तुझी चूक, तर प्रतिक्रमाणाने ती सुधार;

    भ्रांत पुरुषार्थ त्यास म्हणे, सत् प्राप्तीसाठी हो तू अकरतार!

    कर्ता नाही तू कशाचाच, केवळ आहेस जाणणारा;

    क्रिया नाही बदलणार, भिन्न आहेत कर्ता आणि जाणणारा!

    चुकीला तू चूकच जाण, बदल तुझे अभिप्राय;

    हाच आहे पुरुषार्थ धर्म, ‘पहा’ ‘जाण’ आणि कर निश्चय!

    ‘होत नाही, अहो, होत नाही’, असे बोलू नये कधीही;

    चिंतवन करशील तसे घडेल, आहे आत्म्याचा स्वभाव!

    गोष्ट आहे सूक्ष्म पण, समजल्याशिवाय सुटे न कोडे;

    ‘स्वसत्ता-परसत्ता’चे भेद, मात्र ज्ञानीच पाडू शकतात!

    चोर मुलाला सुधारण्यास, मारू नये कोणी;

    बांधेल तो उलटी गाठ, होईल चोरीचा दृढ अभिप्राय!

    माग शक्ती दादांकडे, ‘या जन्मी न होवो चोरी कधी’;

    दादा समजावतात प्रेमाने, हृदय पलटेल शुद्ध प्रेमाने!

    शक्ती मागूनही चोरी केली, तरीही पुन्हा शक्ती माग,

    औषध हे अभिप्राय बदलण्याचे, परम विनय प्रभूपाशी!

    ‘ज्ञानीं’जवळ सर्व औषधी, अवश्य होईल रोगाचे निदान;

    रोग उघडकर मोकळया मनाने, वैज्ञानिक दादा भगवान!

    मागितली तर अवश्य मिळेल शक्ती, करू नकोस शंका;

    ‘नऊ कलमे’ दिली याच करिता, वैज्ञानिक रहस्याने भरपूर!

    अक्रमात पाहत नाही आचरण, केले त्यास ज्ञानाने निकाली;

    नवे आर्त-रौद्र होत नाही, आणि जुने संपवा ‘पाहूनी’!

    अध्यात्म म्हणजे चित्त शुद्धी, चित्त अशुद्धीने कर्मबंधन;

    कोणत्याही जीवाला दु:ख न होवो, तोच व्यवहार शुद्धी धर्म!

    अक्रमच्या महात्म्यांना होत नाही नवे कर्मबंधन;

    जुनी कर्मे संपवतात, नित्य पाळतात जे पाच आज्ञा!

    चिकट कर्मे उदयास आले तर प्रतिक्रमणाने संपतात;

    एकवतारी ज्ञान हे, गॅरंटी नवीन कर्मबंधन न होण्याची!

    अतिक्रमण आणि आक्रमण, होताच कर तू प्रतिक्रमण;

    पराक्रमाची तर गोष्टच निराळी, तेथे केवळ आत्म-रमण!

    क्रमणाने बनली प्रकृती, पसरली ती अतिक्रमणाने;

    प्रतिक्रमणाने घटत जाते, अक्रम ज्ञानाने समजली!

    चोर असो की वेश्या, एकही भाव बिघडवू नये;

    इच्छा नसते वाईटाची, पण ते संयोगात अडकतात!

    मुढात्मा पाहतो दोष इतरांचे, स्वत:चे दोष दिसत नाहीत;

    कसे करील न्याय, स्वत:च जिथे वकील-आरोपी-जज!

    अज्ञानीही करतो प्रतिक्रमण, काही अंशापर्यंत;

    पश्चात्तापाने दोष संपवतो, कोणी जागृत विचक्षण!

    शुद्धात्मा झाल्यावरही, का करावे प्रतिक्रमण?

    दु:ख दिले जर कुणाला, तर करावे लागे अक्रमात!

    प्रतिक्रमण करूनही, जर दिली नाही त्याने माफी,

    आपण ते पाहू नये, निश्चित होईल दोष मुक्ती!

    अतिक्रमणाच्या विरोधाचा, पत्ता लागे प्रतिक्रमणाने;

    असहमती दोषांशी तर, मुक्त होतो दोषी स्वभावापासून!

    दोष सर्व आहेत निकाली, ‘माझे’ हे भाव नाहीत;

    अशी जागृती राहिली तर जरूर नाही प्रतिक्रमणाची!

    अतिक्रमण रहित असलेला सर्व, निकाली आहे व्यवहार;

    अतिक्रमणाचे प्रतिक्रमण, तर निकाल होईल आत आणि बाहेर!

    खरे प्रतिक्रमण तर तेच, ज्याने घटतात दोष,

    घटले नाहीत दोष तर, कसे होईल कल्याण?

    प्रतिक्रमणाने धुतले सारे, तर राहे न कुणाला दु:ख;

    कधी न होतील मतभेद, संबंध राहतील सुरेख!

    पाप धुण्याची प्रतीती, मन होते स्वच्छ;

    मुखावर येते आनंद, लगेच होऊनी हलके फूल!

    ‘चंदू, तुझी आहे चूक’, कोणी म्हटले तुला तर;

    सांग, ‘चंदू, तुझी असेल चूक’, म्हणून तुला रागावला!

    अंडरहँडचे दोष, पाहू नयेत शेठने कधीही;

    पोलिस, जज व पत्नीसमोर, का बोलत नाहीस कधी?

    प्रतिक्रमणास झाला उशीर, तर कर त्याचेही प्रतिक्रमण;

    आरती, विधीत चित्त भटकले, तर कर अजागृतीचे प्रतिक्रमण!

    दोष होणे आहे स्वाभाविक, म्हणून आहे विमुक्तिचा मार्ग;

    फक्त ज्ञानीच दाखवी, प्रतिक्रमण कर हे सुभाग्य!

    दोष होतसे स्व-हस्तक्षेपाने, समोरच्याचा यात संबंध नाही;

    सावधान, त्याची पोस्ट आहे बंद, आपली तर आहे जागी!

    अक्रमज्ञानने प्रज्ञा प्रकट, प्रतिक्रमण होतात स्वयं;

    वीतद्वेष तर झाला, तोच आहे खुदा, ज्याचा संपला अहं!

    ‘अ-मारी’ शब्द हा महावीरांचा, ‘मार’चा कर प्रतिक्रमण;

    समाधान किंवा निकाल करा, लढण्यासाठी नाही हा जन्म!

    क्रमिकच्या ज्ञानींना नसे, दोषांचे असे सुदर्शन;

    अक्रमाची जागृती पाहा, प्रतिक्षण आहे प्रतिक्रमण!

    सद्गुण ज्याचे दिसतात, त्याचे नसे प्रतिक्रमण;

    भावपूर्वकच आपले होत असे त्यांच्याशी सुवर्तन!

    अहं झाकतो स्वदोषाला, स्वत:चीच बाजू घेतो;

    मोठमोठे साधूही करतात, लग्न अहंकाराशी!

    व्यापारात वाढविले भाव, तर ग्राहकालाही होते दु:ख;

    तेथे कर्ता ‘व्यवस्थित’, समकितला नाही जोखीम!

    दादांनी आम्हा कसे बनविले, कर्म करता अकर्म स्थिती;

    हा जन्म ‘व्यवस्थित’च्या ताब्यात, तरीही प्रतिक्रमणाने मुक्ती!

    अक्रम सिद्धांत पाहा, बुद्धीलाही जुमानत नाही;

    चारी बाजुंनी बसतो मेळ, बुद्धू बनवून त्याला आणतो मार्गी!

    काळा बाजारीचा हा काळ, ‘व्यवस्थित’ जर समजले;

    प्रतिक्रमण त्यावर उपाय, प्रकृती मग विरघळेल!

    अज्ञानीने खाल्ले व्याज तर, बनतो तो कसाई;

    समकिती करूनी प्रतिक्रमण, करतो दोषाची धुलाई!

    कर्जदाराच्या प्रतिक्रमणाने, सरळ होतो परिणाम;

    राग-द्वेष वा शिवीगाळ, ‘एक्स्ट्रा आयटम’ करार!

    चिडणे वा चोरी करणे, अप्रामाणिक अनीति;

    रागावणे वा रोखणे, प्रतिक्रमणाने स्वच्छ पाटी!

    साहेबांने डिसमिस केले, अन शुद्धात्म्यात जर राहिले;

    नाही बंधन फाशीचेही, जज तर करी कर्तव्य!

    विंचवाला चावू देतो तो, मूढ स्वत:च्या अहंकाराने,

    ज्ञानी त्याला बाजूला सारून, करून घेतात प्रतिक्रमण!

    पाहणेही न वाटे चांगले, पूर्व जन्माचे वैर कळते;

    तिरस्कार वा अभाव, प्रतिक्रमणाने जाईल सुटून!

    पती-पत्नी, सासू-सून, आहेत हिशोबवाले संघर्ष;

    रिलेटिव्ह हे सारे संबंध, कर त्यांचे ही प्रतिक्रमण!

    संसार म्हणजे हिशोब चुकविण्याचे आहे स्थान;

    प्रतिक्रमण करून सुटा, म्हणते अक्रम विज्ञान!

    प्रतिक्रमणाने सुधारतात संबंध; दुसरे नुकसान ओढवू नये;

    पोहोचतात त्याचे प्रतीस्पंदन, नाही तर हिंदू-पाक लढाई!

    अपमान होतो, विश्वास उठतो, दोष धुतल्याने जाई;

    वारंवार धुवावे लागे, जर काढले मीठ दुधातून!

    समोरच्यास दु:ख झाले, तर येते कळून त्वरित;

    टोचणारे शब्द निघताच, चेहरा उतरतो, हास्य होते गायब!

    दु:ख दिल्याने निघते दिवाळे, रुबाबाने घाबरविले;

    मन दु:खविले, झिडकारले, तर सर्प होऊनी घेतील सूड!

    सासू-सूनेच्या भांडणात, ठेच, आघात वा आत्मघात;

    खोल प्रतिक्रमण, स्वत:ला रागावून, करा पश्चात्ताप बेसुमार!

    ज्ञानी म्हणे, झालेच कधी इच्छा नसून कोणास दु:ख;

    अपवाद रूपे घडले तरीही, होतात प्रतिक्रमण विशेष!

    ‘तो पडू नये’ असे रक्षण, त्याच्या विचारांना पकडून;

    घर बसल्याच थांबवितो, ‘व्यवस्थित’ त्याचा हातात घेवून!

    चूक केली, माफी मागितली, तो चुका करतो वारंवार;

    तेथे समजावून प्रेमाने, माफ कर चांगले विचार!

    समोरचा चुका करत राहतो, होत नाही कधी त्याला भान;

    ना पश्चात्ताप, ना माफी, तर उरत नाही प्रेम आणि मान!

    अशांचा करा विरोध, अर्थ नाही त्याला निभावण्यात;

    करावे त्यास त्याचे भान, पण माफ करा आतून!

    तरीही सुधारला नाही, तर शेवटी त्याला निभावून घ्यावे;

    अन्यथा मनोभाव बिघडतील, ‘असेच असते’ म्हणूनी चालवावे!

    कोणी दुखावला वा चिडला, पुन्हा कधी येणार नाही आपल्याकडे;

    प्रतिक्रमण करून संपवला, पूर्ण केला मी हिशोब!

    अहंकार करूनी सोडला, त्यात कुठे काय वाईट?

    ज्ञानी म्हणे ही तर आहे चूक, निमित्त बनण्याचा हिशोब!

    तरी समोरचा भडकला, तर सोडा त्याला नका मारू;

    करत रहा प्रतिक्रमण, कधीतरी विझेल अंतर दाह!

    दीर्घ वादावादीचा करा शेवटी एकत्र प्रतिक्रमण;

    ‘दादा भगवान’ मी तर याचे करतो एकत्र प्रतिक्रमण!

    संसारातील संघर्ष, तो आहे हिशोबी व्यवहार;

    प्रतिक्रमणाने जोडा मन, तोडू नये हे ज्ञान सार!

    संघर्ष पुद्गलाचा, प्रतिक्रमणाने होतो समूळ नष्ट;

    संघर्ष ज्याचा बंद झाला, त्याचा मोक्ष तीन जन्मात!

    समोरच्याने केले गुणाकार त्या रकमेने तू कर भागाकार;

    घर्षण वा संघर्ष टाळे, अक्रमाचा घे तू हा लाभ!

    वाणी-कायेचा संघर्ष, तो आहे ‘स्थूल’ स्वरुप;

    समोरच्यास जे न कळे, ते आहे मनाचे ‘सूक्ष्म’!

    पाहतो कुणाला मारताना, तेथे हजर ज्ञान ‘व्यवस्थित’;

    तरीही दोष त्याचा दिसला, तर ते झाले ‘सूक्ष्मतर’!

    स्वत: करतो दृढ निश्चय, यात नाही दोष कुणाचा;

    तरीही यात दिसले दोष, तर तो झाला सूक्ष्मतम संघर्ष!

    फाइल नंबर ‘एक’ शी, तन्मयता हे ‘सूक्ष्मतम’;

    जागृत होऊन कर प्रतिक्रमण, मुक्त होण्याचे हे श्रेष्ठ साधन!

    प्रतिक्रमणाची स्पंदने, पोहोचतात त्वरीत समोरच्यास;

    अहंकार आणि बुद्धी मिळूनी, अतिक्रमणाने बांधती कर्म!

    राग वा द्वेष बीजाने, पसंत-नापसंत ही फळे;

    प्रतिक्रमण उपाय एकमेव, उपटते राग-द्वेषाचे मूळ!

    मान, ईर्षा वा शंकेमुळे येतात, उलट-सुलट विचार;

    करा त्वरित प्रतिक्रमण, नाही तर लगेच पोहोचतील समोरच्यास!

    ‘लूटारू लुटतील’ ही शंका, सुखीला करी दु:खी दु:खी;

    ब्रह्मांडाचा मालक तू, दवबिंदू विझवते ज्वालामुखी!

    भय का तुजला वाटे? टेम्पररी मानतो स्वत:ला;

    नित्य आहे माझे स्वरूप, समजल्याने भय न प्रकटे!

    पश्चात्तापने दोष बनतात, जळलेल्या सुंभासारखे;

    पुढच्या जन्मी स्पर्श करताच, मुळासकट दोषांची मुक्ती!

    ज्ञानानंतर प्रतिक्रमणही, इफेक्ट स्वरूपी होई;

    इफेक्टला इफेक्टने छेदून, स्वत: शुद्ध राहून स्वच्छ होई!

    खाण्या-पिण्यातील अतिक्रमण, ओढवितात शारीरिक दर्द;

    अतिक्रमण आहे स्वाभाविक, प्रतिक्रमणाने होतो पुरुषार्थ!

    खाण्यात नियम भंग, माग माफी ज्ञानींजवळ;

    व्यसनांचे समर्थन नाही, नक्की सुटतील कधीतरी!

    प्रतिक्रमण झाले नाही तर परत चिकटतील परमाणू;

    पुढल्या जन्मी पुन्हा व्यसन अभिप्राय राहिल्याने चिकटतील!

    डिस्चार्जला ‘पाहत-जाणत’ नाही, होत नाहीत प्रतिक्रमण;

    मन बांधणे चालू राहते, राहिले जर अभिप्राय!

    पुरुष बनून पुरुषार्थ केल्याने, होईल त्याचा अवश्य मोक्ष;

    परंतु स्वत:ची राहते कमी, आज्ञा, प्रतिक्रमण करण्याची!

    दादा चहा कधीतरी पिता, प्रथम करी प्रत्याख्यान;

    अन्यथा तो चिकटेल, ज्ञानी मात्र जागृत कायम!

    होता शारीरिक वेदना, केवळ वेगळे ‘पाहा’ आणि ‘जाण’;

    अहिंसक भाव, वेगळेपण, न आर्त आणि रौद्रध्यान!

    अतिक्रमणाने होते कर्मबंधन, न होते बंधन अतिचाराने;

    नाही स्पर्शले ‘अंबालाल’नां, वेदनीय क्षण ‘विज्ञानाने’!

    आर्त अन रौद्रध्यान, क्षणोक्षणी देतात त्रास;

    आर्तध्यानचे फळ तिर्यंचगती, रौद्र नेई नरकास!

    स्वत: स्वत:लाच दु:खी करतो, अग्रशोच असे आर्तध्यान;

    गोळी न लागे अन्य कोणास, पत्नीलाही कळत नाही!

    गोळी सोडतो दुस:यांवर, कुणाला दु:ख विचारानेही;

    रौद्रध्यान त्यास म्हणावे, जर परिणाम झाला कोणावरही!

    आर्तध्यान अन रौद्रध्यानाचे, विचार येताच त्यांना बदला;

    माझ्याच कर्माचा उदय हा, पाहा समोरचा तर निमित्त मात्र!

    जगाला निर्दोष पाहतो, त्याला म्हटले धर्मध्यान;

    प्रतिक्रमण करून दोष धुतो, ज्ञानी म्हणतात धर्मध्यान त्यास!

    एकदा केला पश्चात्ताप, तर रौद्र बनेल आर्तध्यान;

    पुन्हा त्याचेच प्रतिक्रमण, तर आर्ताचे होईल धर्मध्यान!

    तुम्ही झालात शुद्धात्मा, पुद्गल करतो आर्त-रौद्र;

    पुद्गल करते प्रतिक्रमण, होते तेव्हा धर्मध्यान!

    शुद्धात्म्याचे शुक्लध्यान, धर्मध्यान हे पुद्गलाचे;

    असे घडते जेव्हा अंती, शुद्ध विश्रसा परमाणू!

    अक्रम ज्ञानात कधी, होत नाहीत आर्त-रौद्र ध्यान;

    आत ‘शुक्ल’, बाहेर ‘धर्म’, कारण मृत आहे अहंकार!

    अप्रतिक्रमण दोषांनी, दोष आता जे होतात;

    यथार्थ प्रतिक्रमण केल्याने, त्या दोषांपासून सुटाल!

    दोषांना जाणले, ते धर्मध्यान, आत्मध्यान आहे शुक्लध्यान;

    आत ‘शुक्ल’, बाहेर ‘धर्म’, एकावतारी पद तू जाण!

    अक्रम मार्गाने शक्य आहे, एकावतार या काळात;

    आत, बाहेर ‘शुक्ल’, तर मोक्ष होईल त्याच जन्मात!

    ‘रात्री उशिरा पाहुणे आले’, पाहताच मनोभाव बिघडले;

    ‘आता कुठून टपकले’, सहज शब्द येतात मनात!

    समोर बोले, ‘या या, चहा घेणार का थोडा थोडा?’;

    पाहुणे मागतात खिचडी-भाजी, त्यावर असुदे कढी जरा!

    चिडते पत्नी, जेव्हा पती विचारतो ‘केव्हा जातील हे?’;

    पत्नी म्हणे, ‘मला काय माहीत? मित्र तुमचे, तुमचीच लावली सवय!

    अतिथि देवो भव, तरीही होई आर्त-रौद्र ध्यान;

    त्याचे करावे प्रतिक्रमण, अन्यथा नुकसानची खणली खाण!

    भाव न बिघडे समकितीचे, प्रतिक्रमण केल्याने;

    दोष सुटतो कायमचा, प्रतिक्रमण-प्रत्याख्यानने!

    झाले नाही प्रतिक्रमण तर, दोष राहतो पेंडिंग;

    एक-दोन जन्म वाढतील, कॅश केल्याने मोक्षात-लॅंडिंग!

    समोरासमोर भांडतो, तो तर सुटतो आजच;

    मनाने भांडला तर, बांधेल पुढील जन्माचे कर्म!

    द्वेषाचे कर प्रतिक्रमण, कारण होत असे अॅटॅक;

    राग तर आहे डिस्चार्ज, ज्ञानी समजावतात अंतिम अर्थ!

    जर जागृती राहीली नाही, नाही झाले आज्ञा पालनही;

    तर रागाचेही कर प्रतिक्रमण, नाही तर घसरून पडशील!

    तंत आणि हिंसकभाव दोन्ही, असतील तर आहे कषाय;

    ते नाही तर कषाय नाही, तेव्हा होई मात्र डिस्चार्ज!

    पण डिस्चार्ज कषायाने, समोरच्यास जर झाले दु:ख;

    त्याचे करावे प्रतिक्रमण, वदे वाणी तीर्थंकराची!

    कितीही भारी कषाय, अंती तर तो प्राकृतिक माल;

    ‘पाहणारा’ भाजत नाही, ज्ञान बनते तिथे ढाल!

    डिस्चार्ज गुन्ह्यांना मान मृत, ज्ञानानंतरच्या दशेत;

    त्याचे कर्म न भारी, ज्ञानी हसवी गुन्ह्यांमध्येही!

    मनापासून प्रतिक्रमण केल्याने, त्वरीत संपतील दोष;

    प्रतिक्रमण करता करता, जंजाळ सुटते नियमानेच!

    चालेल सामूहिक प्रतिक्रमणे, जेथे असेल दोषांचा तांडा;

    ‘दादा’, करीत आहे एकत्र, करावा याचा पूर्ण स्वीकार!

    हिम्मत नसेल समोरासमोर, तर माग माफी मनात;

    नोबल असेल तर प्रत्यक्ष जाऊन, अन्यथा करील तो दुरुपयोग!

    मोक्षाला जाण्यापूर्वी, माग माफी सूक्ष्म काय जीवांची;

    कर सामूहिक प्रतिक्रमण, शेवटी सुटशील सर्वांपासून!

    पुरुषार्थ म्हणावे त्याला, जो करतो दोषांचे प्रतिक्रमण;

    जाणणा:यालाही जाणत राहतो, दशा ती पराक्रम!

    ‘अनंतानुबंधी’ क्रोध, जशी पर्वतात पडली खोल दरी;

    प्रतिक्रमण केले नाही तर, होतील जन्मोजन्मीचे करार!

    अप्रत्याख्यानी क्रोध तर, जशी शेतात पडली फट;

    प्रत्याख्यान वा प्रतिक्रमण, झाले नाहीत म्हणून घडले असे!

    पांचव्या गुणस्थानकात आहेत, सामूहिक प्रतिक्रमण-प्रत्याख्यान;

    म्हणून येतो सहाव्यात, ‘प्रत्याख्यानी’ गुणस्थान!

    दोषांचे आवरण आहेत लाखों, लाखों वेळा प्रतिक्रमण;

    सामूहिक केले पूर्वी, म्हणून राहिले आवरण आवृत्त करणारे!

    ‘प्रत्याख्यानी’ आवरण आहेत, जशा वाळूत ओढल्या रेषा;

    ‘संज्वलन’ कषायात जशा, पाण्यात ओढल्या रेषा!

    उदयात असतील कषाय, तर होतात कार्यकारी आत;

    दु:ख भोगावे लागते, ‘प्रत्याखाणी’ त्याला म्हणतात!

    उदयात असतील कषाय, पण कार्यकारी होत नाहीत;

    आत वर्तते समाधी सुख, ‘संज्वलन’ त्याला म्हणतात!

    समकित झाले तर चौथा, पाचवा ‘अप्रत्याख्यानी’;

    सहाव्या ‘प्रत्याख्यानी’मध्ये, व्यवहारात भारी फाइल!

    सहाव्या गुणस्थानकात, बाह्य चारित्र्य मानत नाही;

    सातव्यात उदय ‘अप्रमत्त’चा, ‘अपूर्व’ आठव्या गुणस्थानकात!

    विषयात निग्रंथ झाल्यावर, स्त्री परिग्रहही सुटे;

    तेव्हा नववा पार करूनी, दहाव्यावर मग चढे!

    क्रोध-मान-माया-लोभाचा राही न परमाणूमात्र;

    झाली कषायांची शून्यता, तर भगवान पद मात्र!

    डिस्चार्जमध्ये न दिसे, कषाय परमाणू एकही;

    दादांनी पाहिला केवल आत्मा, अनुभव पदाची प्राप्ती!

    कषायसहितची प्ररूपणा, जाईल अवश्य नरकास रे;

    वकील होऊन केला गुन्हा, तर शिक्षेत मोठा फरक रे!

    मिथ्यात्वीने सिंहासनी बसून, देऊ नये उपदेश;

    ‘स्वाध्याय करत आहे’ म्हटले तर घेता येईल सर्वांना लाभ!

    स्वत: शुद्धात्मा झाला, ‘व्यवस्थित’ला मानतो कर्ता;

    प्रतिक्रमण त्वरित करतो, वीतद्वेष झाला मात्र ज्ञाता!

    दोष कुणाचे दिसत नाहीत, वर्तते दशा सर्व विरति;

    संसारात सर्वकाही करूनी, अशी ही अक्रमची रीती!

    क्रोधाचा अभाव जेथे, ती क्षमा महावीरांची;

    द्यायची गोष्ट नव्हे ही, सहज क्षमा शूरवीराची!

    ज्ञाता-द्रष्टा राहतो तेथे, कषाय आहेत संपूर्ण बंद;

    ज्ञाता-द्रष्टापण चुकला तर, कषायांचेच चलन!

    करत राहिला प्रतिक्रमण तर, गाढ कर्म होतील हलके;

    शिसे ओतले कानात, म्हणून महावीराला आले भोगणे!

    जेथे जेथे हिंसा केली, डास, ढेकूण मारले;

    त्या जिवांना आठवून कर, पश्चात्ताप तर होईल सुटका!

    भाव सदा असे राख, सर्व जीवांना वाचविण्याचे;

    मग वाचतील किंवा न वाचतील, पण जोखीमेपासून सुटका!

    शेतात औषध फवारणी, कापे गवत व कोंब;

    करा त्याचा पश्चात्ताप, मग जरी तसे करावे लागे!

    रोज दहा मिनिटे, हृदयापासून प्रभूला पुकारा;

    कुठून नशिबी आला, हिंसक धंदा मज पदरी!

    भावात संपूर्ण अहिंसक, म्हणून बांधत नाही हिशोब;

    वैर, हिंसा, राग-द्वेषाची, प्रतिक्रमणाने होते सुटका!

    कसलेही असो वैर, तरी सुटतील नक्की प्रतिक्रमणाने;

    समोरचा सोडे न सोडे, आता जोखीम त्याच्या माथी!

    मागील दोषांच्या प्रतिक्रमणाने, दोषांचा होतो निकाल;

    नवीन चित्रित केले नाही, तर बंधनचा प्रश्नच नाही!

    भूतकाल गेला निघून, भविष्य ‘व्यवस्थित’च्या हाती;

    वर्तमानात वर्ततात सदैव, ऐक ज्ञानी पुरुषांचे म्हणणे!

    माळ पेटली, काय करावे, फटाके फुटत जात;

    केले प्रतिक्रमण बॉम्बचे, तर तो होईल फुस्स!

    प्रतिक्रमण करता-करता, अतिक्रमण होते सुरू;

    धूत राहा धीराने, कमी पडणार नाही कधी हा साबण!

    वैरीसाठीही करू नये एकही उलटा विचार;

    तो तर आहे उदयाधीन, जागृत आहे तो सुटणार!

    पारसनाथांनाही फेडावे लागले, दहा जन्मांचे वैर;

    अक्रमात जागृती सोडविते, समतेने हे वैर!

    आत्मा प्रकट झाला आता, पुरुषार्थाने पराक्रम;

    अटकण व अभिप्राय उपटून, कर मग त्यांचे प्रतिक्रमण!

    प्रकृती बनविते अभिप्राय, प्रज्ञा त्यांना सोडत जाते;

    अभिप्रायांना खोटा म्हणून, नष्ट करी मुळापासून!

    अभिप्रायाचा होतो परिणाम, समोरच्याला होतो अभाव;

    फळ त्याचे मिळते अचूक, चुके आत्म्याचा स्वभाव!

    आवडते-नावडते मिळे, पुण्य आणि पापाधीन;

    पाह तू निमित्तास आत्मरूप, पुद्गल आहे पर-पराधीन!

    प्रतिक्रमणाने अभिप्राय मुक्त, नाही सहमत क्रियांमध्ये;

    संयोगाधीन बनला चोर, नको ठेवू दोष हृदयात!

    अभिप्राय बदलताच सुटले, दोष आपोआप समूळ;

    पूर्वी केले चुकीचे समर्थन, म्हणून बसली डोक्यावरी!

    अभिप्राय सुटले तर, होतील परमाणू विश्रसा;

    बंध पडल्याविना झाले शुद्ध, फलित झाले तर मिश्रसा!

    पुद्गल परमाणू म्हणे, ‘तुम्ही’ झालेले आम्हावर लुब्ध;

    आता झालात शुद्धात्मा तुम्ही, तर करा आम्हासही शुद्ध!

    प्रतिक्रमण करताच व्हाल, अभिप्रायांचे विरोधी;

    रिलेटिव्हमध्ये निर्दोष पाहा, रियलमध्ये पाहा शुद्ध!

    सकाळी बोला पाच वेळा, ‘पडायचे नाही आता विषयात’;

    उपयोग राहतो रुपये मोजण्यात, तसे हे बोलावे!

    या काळी झाले कर्मबंधन तर, मनुष्यातून तिर्यंच;

    पाचातून एकेन्द्रियात, अजून सावध हो, जा मोक्षाला!

    अक्रम ज्ञान मिळाले आता, अटकण सारी उपटून टाक;

    प्रतिक्षण जागृत हो, आता तरी सूट या विषयापासून!

    निज दोष दिसत नाहीत, कैफ विषयाचा दिवसभर;

    विषय बाधक महा-महा सुटू देत नाही कधी!

    पाहताच आला विषय विचार, याचे रहस्य तू जाण;

    भरलेला हा मोह म्हणून, संयोग आले जुळूनी!

    तेव्हा मन पर्याय दाखवी, भरलेल्या मोहानुसार;

    प्रतिक्रमण करत तू वारंवार, विरघळवून टाक विषयाची गाठ!

    मळ धुवत रहा, कर तू खेद शेवटपर्यंत;

    होईल स्वच्छ धुतल्याने अवश्य, मग येईल स्पष्ट वेदन!

    विषय बीज पडल्यावर, येईल अवश्य ते रुपकात;

    परंतु बंधनापूर्वी धूत राहिले, तर होईल ते हलके!

    आला ताप दोघांनाही, तरच प्यावे औषध;

    दबाव किंवा याचना, ही तर आहे फोर्जरी!

    विषयाची अटकण हेच तर परिभ्रमणाचे कारण;

    बदल सुखाचे अभिप्राय, प्रतिक्रमण आहे उपाय!

    एक पत्नीव्रत या काळात, आहे ब्रह्मचर्याचे वरदान,

    परस्त्रीसाठी कधीही जर बिघडले नाही तुझे मनोभाव!

    स्त्रीचे मुख न पाहे साधू, त्यात कोण आहे गुन्हेगार?

    तुला जन्म कोणी दिला, पकड चुकीला अन् मिटवून टाक!

    मनाची चंचलता संपते, ब्रह्मचर्याने मन बांधले जाते;

    किंवा मग आत्मज्ञानाने, मनच काय, जग जिंकता येते!

    ज्ञानींचे वचनबळ, आणि तुझा दृढ निश्चय;

    विवाहित वा कुमार, पाळू शकतात बह्मचर्य!

    अक्रम ज्ञानासह, ब्रह्मचर्याने होशील तू पार;

    राजांचा राजा होशील, जग करी त्याला नमस्कार!

    विषय जिंकण्यास हवी, जागृती व क्षणोक्षणी प्रतिक्रमण;

    सामायिक, व्रताचा विधी, त्याने होते शुद्ध त्रिकरण!

    बिनहक्काच्या विषयाने होते जनावर गती;

    दिवसभर प्रतिक्रमण व दृढ निश्चयाने, यातून सुटता येते!

    लोभ-हव्यासात फसलेला, जर करीत राहीला प्रतिक्रमण;

    दृढ आज्ञापालन केले, तरच तुटेल हे आवरण!

    दादांची प्रत्येक क्रिया, ज्ञानात प्रगती करविण्यासाठी;

    छेदून प्रकृती पूर्णपणे, रममाण हो आता आत्मज्ञानात!

    अतिक्रमणाच्या अंतिम हद्दीवर, वासुदेव-प्रतिवासुदेव;

    सातवे नरक भोगतात, इतर न कोणी पोहोचू शके!

    बिघडलेली बाजी अशी सुधार, बिघडवू नको भाव कधी;

    बिघडल्याचे कर प्रतिक्रमण, या प्रमाणे कर ‘वस्तू’ सिद्ध!

    खोटे बोलणे ते कर्मफळ, त्यात भाव ते कर्मबंध;

    म्हणून पश्चात्ताप करून, बदल सारे अभिप्राय!

    खोट्याचे अभिप्राय संपल्यावर, उरत नाही जबाबदारी;

    खोटे बोलणे हे कर्मफळ, त्याचेही येईल फळ, ठेव लक्षात!

    रिलेटिव्ह धर्मात चुकीबद्दल, ‘करावे लागते’ प्रतिक्रमण;

    रियल धर्मात ‘ज्ञाता-द्रष्टा’, ‘होतात’ त्याचे प्रतिक्रमण!

    आयुष्यभर करायचे हेच, ‘चंदू करतो’ ते पाहत राहा;

    चांगल्या-वाईटाचे करा निकाल, दुकान रिकामे, भरू नका नवे!

    वाणीने दुखविल्यास, कर त्याचे त्वरित प्रतिक्रमण;

    आज्ञेत राहण्याचा निश्चय, वाणी जाणा पर अन् पराधीन!

    आपल्याकडून टोकले जाते, अभिप्राय दाखविते भिन्न;

    आत्मार्थे खोटे बोलणे, हे तर आहे महा सत्य तू जाण!

    जगाला दादांनी सांगितले, व्यवहार आहे अनिवार्य;

    व्यवहार व्यवस्थिताच्या आधीन, प्रतिक्रमण ऐच्छिक!

    सर्व त:हेने मागितली माफी, प्रत्यक्ष वा अश्रुनयन;

    तरीही टपली मारली तर, झुकणे कर तू बंद!

    टोकण्याचा हेतू सोन्याचा, पण समोरच्याला दु:ख;

    सांगता आले नाही, म्हणून कर असे तू प्रतिक्रमण!

    समोरच्याला दु:ख न होवो, अशी निघावी वाणी;

    नाटकी व्यवहार करा, नाही तर ते लागेल धुवावे!

    मस्करी, विनोद, ‘जोक’चे, करावे लागे प्रतिक्रमण;

    नाही तर ज्ञानींची वाणी, टेप-रेकार्ड मंद निघे!

    तेज बुद्धीवाला करतो मस्करी, कमी बुद्धीवाल्याची;

    प्रकाशाचा हा गैरवापर, शेवटी मस्करी आत असलेल्याची!

    वाणी किंवा भावात, निघाले जर उलट;

    समोरचा करी टेप त्वरित, जरूर तेथे प्रतिक्रमण!

    प्रतिक्रमण केल्याने वाणी सुधरे या जन्मात;

    स्याद्वाद वाणी दादांची, व्यवहार शुद्ध झाल्याने!

    खेद करण्याऐवजी, राखा जागृती विशेष;

    अंतराय आले तर त्यांना, धुवून करा नि:शेष!

    ‘या’ सत्संगाचे विषही चांगले, बाहेरचे अमृत वाईट;

    येथे भांडलास, तरीही मोक्ष, कर प्रतिक्रमण मोठे!

    दादांजवळ येता आले नाही, तर खेद व प्रतिक्रमण;

    चिंता, राग-द्वेष धुऊन, कर दादांचे नित्य स्मरण!

    लघवीत मुंगी वाहिल्याने, दादा करतात प्रतिक्रमण;

    विधी विना पुस्तक वाचले, ती झाली चूक!

    हित सर्वांचे असले तरी, वेगळे केले दोघांना;

    अज्ञानीचे भले केले, तरीही करावे लागे प्रतिक्रमण!

    प्रतिक्रमण होत नाही, हा आहे प्रकृतीचा दोष;

    अंतराय कर्म नाही, ठेव भावात ‘पाहण्या’चा जोश!

    निकाचित कर्म धुण्यासाठी, चिकटपणानुसार वापरा साबण;

    जोर अधिक लावावा लागेल, मग व्हाल ज्ञाता-द्रष्टा पक्के!

    राहते जुन्या चुकांचे ओझे, धुण्यावाचून गत्यंतर नाही;

    प्रकृती धुवा ‘प्रतिक्रमणाने’, हाच तो दादाई गुटका!

    चिकट फाइलींचे प्रतिक्रमण, करा तासभर बसून;

    होईल नरम, परत फिरेल, होईल जरूर परिवर्तन!

    प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान, उत्तम होईल शुद्धीकरण;

    ‘परत नाही करणार’ तो निश्चय, महावीरांचे पच्चखाण!

    तू तर कर मात्र भाव, की करायचे आहे समभावी निकाल;

    निकाल हो न हो, तो मग निसर्गाचा प्रश्न!

    चीकट फाइल नंबर एक, तिला ‘पाहिल्यानेच’ जाईल;

    तेथे गरज नसे प्रतिक्रमणाची, अक्रम ज्ञान सरळ उपाय!

    गुन्हा करतो आरोपीच, जज ने घेऊ नये स्वत:वर;

    चुका करतो चंदुलाल, तर प्रतिक्रमणही त्याच्याच शिरावर!

    अक्रम ज्ञान मिळाल्यावर, कधी होईल टाकी रिकामी?

    अकरा वा चौदा वर्षाने, मग उरणार नाही काही बाकी!

    कधी तरीच होतो वाद, कधी तरीच मरण;

    जे ‘घडणार’ आहे ते नाही, पण ‘घडले’ तेच व्यवस्थित!

    भयंकर उदयामध्येही जर, राहिले ‘व्यवस्थित’चे ज्ञान;

    ‘पाहत’ रहा जे घडते ते, मग गरज नाही प्रतिक्रमणाची!

    खरे प्रतिक्रमण त्यास म्हणावे, जे ‘बोलते’ तिस:या दिवसी;

    आकर्षण स्वत: दादांचा, होतो आपल्यावर!

    मृतांचे प्रतिक्रमण केल्याने, अमर आत्म्यास पोहोचते;

    गुंता सुटतो आपला, ‘मरत नाहीत’ या विचाराने!

    वाणी-देहाचे प्रतिकार, आहेत जोवरी व्यवहारात;

    प्रकट होत नाही संपूर्ण शक्ती, जरी मनानेही झाले प्रतिकार!

    मनातील विचारांना पाहून, वेगळे ठेवल्यावर उडतात;

    झाले जर कुणास दु:ख, तर त्याचे करावे प्रतिक्रमण!

    बिघडले आपले भाव, किंवा समोरच्याचे आपल्यासाठी;

    का बिघडले ते पाहू नये, चालावे प्रतिक्रमणाच्या मार्गी!

    नावडते जेव्हा स्वच्छ मनाने, सहन करील तेव्हा वीतराग;

    बिघडले तर कर प्रतिक्रमण, शक्ती त्यासाठी तू माग!

    रात्री शुद्धात्म्याचे वहीखाते, तपासून कर स्वच्छ;

    पाहूनी जगाला निर्दोष, प्रतिक्रमण कर मग झोप!

    ज्ञानी किंवा तीर्थंकराबद्दल उलटे भाव, त्वरितच धुवावे;

    वारंवार माफी माग, नखरे मनाचे तू ‘पाहत’ जा!

    देवस्थानच्या अशाताना, प्रतिक्रमणाने धुवाव्या;

    नंतर होईल अभ्युदय, नसे अन्य कोणते निवारण!

    मागील दोष दिसल्यावर, उपयोगाने छेदा आवरण;

    आठवतात ते धुण्यासाठी, कर तात्काळ तू प्रतिक्रमण!

    केले नाहीत प्रतिक्रमण, म्हणून आठवतात;

    प्रत्याख्यान केले नाही, म्हणून होते इच्छा!

    वारंवार दोष आठवले तर, वारंवार त्यांना धुवावे;

    कांद्याची पाकळी निघते जशी, अंती नष्ट होतील समूळ!

    आठवणीचे तू कर प्रतिक्रमण, इच्छांचे कर प्रत्याख्यान;

    पूर्वी मानले सुख त्या गोष्टींची इच्छा, अर्पण कर मिथ्या जाण!

    त्याच्या शुद्धात्म्याच्या उपस्थितीत, फोन करून पाहिल्या चुका;

    पश्चात्ताप सह माफी मागितली, शॉर्ट प्रतिक्रमण अक्रमी!

    होतात जे दोष पूर्व जन्मी, प्रकटतात ते या जन्मी;

    प्रतिक्रमण यथार्थ झाल्याने, प्रकटे आनंद अपार!

    रोज एक तास जरी, घालवला प्रतिक्रमणासाठी;

    नातेवाईक, शेजा:यांचे, दोष धुण्याची उत्तम संधी!

    त्याने होतील दोष भस्मीभूत, फिल्म दिसेल आपोआप;

    असे करूनी निवारण, सुटता येईल जग संबंधातून!

    दादा म्हणे, आम्ही असे केले, एकेकाचे धूतले दोष;

    कुणी जर झाले मनात दु:खी, तोवर मला पडे ना चैन!

    काम साधून घ्या अक्रमाने, परत नसेल असा सरळ मार्ग;

    सोडा शौक खुशामतीचा, जागा हो, राहीला अर्धा जन्म!

    ज्ञानी दाखवी तेच करावे, नका घालू निज छंद रंग;

    परिणाम वाहे कोठून कुठे, त्यास म्हणती स्वछंद!

    प्रतिक्रमणाने सुटतात, याच जन्मी सर्व वैर;

    सिद्धांत हा महावीरांचा, नाही अन्य उपाय!

    दोघे समोरासमोर करतील, तर त्वरित होईल सुटका;

    अध्र्यातच होईल काम, अन्य गुंतेही सुटतील!

    एक दोषामागे परत, सुरू होते दोषांची परंपरा;

    भेसळ, भ्रष्टाचार, आहेत सर्व पशुगतीत नेणारे!

    प्रतिक्रमण यथार्थ तेच, जे होत राहते प्रतिक्षण;

    आयुष्यभराचे दोष ‘पाहून’, ‘जाणून’, धुतले जातील!

    अपूर्व प्रतिक्रमण अक्रमाचे, सैद्धांतिक परिणामिक;

    बालपणापासून आजपर्यंतचे व्हिडियोसारखी दिसते लिंक!

    हलके फूल, मुक्त होता येते, स्थूल ते सूक्ष्म धुतले जाते;

    शेवटी मूळ चूक समजल्याने अपूर्व आनंद उसळतो!

    झाले सुरू एकदा प्रतिक्रमण, मग थांबत नाही कधीही;

    बंद करण्यास सांगितले, तरी फिरत राहतो चरखा!

    जीवनाचे प्रतिक्रमण करताना, न दशा, मोक्ष, वा संसार;

    प्रकट होते आत्मशक्ती, प्रज्ञा दाखवी फोडून पाताळ!

    अंत:करण संपूर्ण बंद, प्रज्ञा मात्र क्रियावंत;

    एक एक थर तोडतो, सार जन्म-मरणचा अंत!

    प्रतिक्रमण करता, होत नाही आत्म्यावर परिणाम;

    राग-द्वेषाची सही झाल्याने, दोष बांधले जातात आत!

    प्रतिक्रमणाची लागे लिंक, आणि होतो आत्मानुभव;

    संपूर्ण ज्ञाता-द्रष्टा पद, अन् आनंदाचा उद्भव!

    दोषांचा झाला स्वीकार, तर त्वरित ते जातात निघून;

    घरातील सर्व निर्दोष दिसतील, तेव्हा होई खरे प्रतिक्रमण!

    समोरचा खरोखर दोषी केव्हा? जर आत्मा करील तेव्हाच;

    परंतु आत्मा तर आहे अकर्ता, क्रिया मात्र डिस्चार्ज रे!

    कोणी जीव दिसला दोषी, तर झाली नाही अजूनी शुद्धी;

    इंद्रिय ज्ञान असेपर्यंत, धुऊन टाक प्रतिक्रमणे अशुद्धी!

    प्रतीतीत दिसे जग निर्दोष, अनुभवात येईल केव्हा?

    डास, साप, जेव्हा घेरतील, निर्दोष दिसतील तेव्हा!

    ज्ञानींना प्रतीती अन् वर्तनात, जग दिसे निर्दोष;

    उपयोग चुकल्याचे प्रतिक्रमणाने, जागृत दशा कायम राहते!

    औरंगाबादमध्ये विधी करवित, दादा वर्षातून एकदा;

    समोरासमोर माफी मागून, धुतले वैर अनंत अवतारचे!

    खूप मोठा विधी करती, स्वच्छ सर्वांचे करण्यासाठी;

    एकमेकांच्या पाय पडूनी, रडून होई सर्व हलके!

    धर्मबंधूंशीच बांधतो जन्मोजन्मीचे वैर;

    प्रतिक्रमण करून मुक्त हो, ज्ञानी आज्ञा हृदयी ठेव!

    ज्ञानींजवळ आलोचना, केली प्रत्यक्ष किंवा कागदावरी;

    ज्ञानींना सोडवावे लागे, झाला अभेद अंतरी!

    जाहीर करतो गुप्त दोष, ज्ञानी धुतात ते विधी करून;

    प्रतिक्रमण-पश्चात्ताप करवितात, पढवून आलोचना महिनाभर!

    जेथे प्युरिटी हृदयाची, एकता लागे सर्वांसंगे;

    मोठे दोष प्रत्यक्ष उघडल्याने, मन रंगते ज्ञानी रंगी!

    भगवंताची कृपा बरसते, मिळे आलोचनाचे फल;

    आलोचना राहते सदा गुप्त, ज्ञानी न करती त्यात छल!

    ज्ञानींजवळ जर झाकले दोष, तर होतील दोष डबल;

    सुटका होईल अवघड, जागृती होईल आवृत!

    आलोचना करावी गुरुंजवळ वा आतील ‘दादां’जवळ;

    प्रत्यक्ष झाले नाहीत आतील, तोवर भज ‘या’ दादांना खास!

    विषय दोष विचित्र या काळी, पुत्री-भाऊ-बहीणीशी;

    सत्संगात, सहाध्यायीत आता सावध हो, धुऊन टाक!

    जसे पत्नी पतीला, न विसरे एकही क्षण;

    तसे झाले जर प्रतिक्रमणाशी, तर अनंत दोष होतील नष्ट!

    छोटा प्रतिक्रमण बॉम्बार्डिंगने, शुद्धात्म्याजवळ माफी;

    पश्चात्ताप करून ‘पुन्हा करणार नाही’, इतकेच आहे पुरेसे!

    तिव्र वैर असल्यावर कर प्रतिक्रमण पद्धतशीरपणे;

    तरच सुटेल वैर, थांबेल नवीन अतिक्रमण!

    खोल उतरले प्रतिक्रमणात, तर पूर्वजन्म पण दिसेल;

    कुण्या सरळ परिणामीची, आवरणे तुटतात आरपार!

    होलसेलमध्ये दोष असती त्याचे, एका बरोबर शत-शत दोष;

    एकत्र प्रतिक्रमणे करून, मग कर तू प्रत्याख्यान!

    जाणतेपणी झालेल्या दोषांना, धुवावे लागेल व्यक्तिगत;

    अजाणतेपणीचे सामुहिक कर, प्रतिक्रमणाने मार्ग मिळे!

    कुणा विषयाचे असंख्य, दोष धुवावेत एकत्रीपणे;

    तेव्हा होईल ध्येय सिद्ध, अन्यथा भटकत राहशील!

    लग्न करताना बाशिंग बांधून, रुबाब दाखविला अपार;

    प्रतिक्रमणे करावी लागतील, जर आले नसतील तेव्हा विचार!

    निज भावातून पर भावात, परद्रव्यात तन्मयाकार;

    पाच आज्ञा पाळणारा जाऊ शकत नाही परमध्ये!

    आत्मा कधीही होत नाही, परभावात तन्मयाकार;

    ‘जाणतो’, आत्मा तन्मयतेला, तन्मय झाला तो अहंकार!

    स्वप्नातही होऊ शकते, प्रतिक्रमण यथार्थ;

    जाग आल्यावरही होऊ शकतो, गुन्हा कबूल कधीही!

    ‘सॉरी’ हे नाही प्रतिक्रमण, तरीही आहे ते चांगले;

    मनात अॅटॅक राहत नाही, समोरच्याचाही संपतो नाही द्वेष!

    शुक्ल ध्यान झाल्यावर, प्रतिक्रमण आहे पॉइजन ‘क्रमात’;

    प्रतिक्रमण असे अक्रमाचे औषध, स्वत: पीत नाही, पाजवतो!

    ‘स्वत:’ न करता, करवून घ्यावे, ‘फाइल एक’कडून;

    प्रकट आहे प्रज्ञा शक्ती, दोष दाखवून करे आम्हा सावधान!

    अक्रम ज्ञान प्राप्तीनंतर, ‘स्वत:’ होतो शुद्धात्मा;

    बाकी राहिले ते ‘व्यवस्थित’, केवळ ‘पाहा’ फाइलला!

    ‘चंदू करतो’ ते पाहत राहा, अन्य न करणे काही;

    ‘पाहणे’ जर चुकले तर, करा त्याचे प्रतिक्रमण!

    निज विपरिणामाने, एकत्र होतात सर्व संयोग;

    प्रतिक्रमणाने शुद्धी होवून, होतो त्यांचा वियोग!

    ख:या सायंटिस्टला, गरज नसे प्रतिक्रमणाची;

    बोट घालत नाही प्रयोगात, भाजलेल्याच गरज मलमाची!

    ज्ञानीवाणी भासते विरोधाभासी, वास्तवात तर आहे निमित्ताधीन;

    ताप दिसे एकसारखा, एकाला क्वीनाईन, दुस:याला मेटासीन!

    पुद्गल करते अतिक्रमण, पुद्गल चालवी जगत;

    चेतन भाव प्राप्त केलेले, परमाणू आहेत पूरण-गलन!

    स्वपरिणीती कर्ताभावाने, तर त्याला म्हणती पूरण;

    परपरिणीती अकर्ताभावाने, तर त्याला म्हणती गलन!

    प्रतिक्रमण करते पुद्गल, माफी मागे शुद्धात्म्याकडे;

    पुद्गलास फोन करतो आत्मा, होतात प्रतिक्रमण पुद्गलाचे!

    स्वत:च्या पुद्गलाचे प्रतिक्रमण, प्रज्ञा करविते स्वत:कडून;

    समोरच्या पुद्गलाचे प्रतिक्रमण, झाले नुकसान तरच!

    माफी मागतो शुद्धात्म्याकडे चूक झाली निज पुद्गलाने;

    प्रतिष्ठित आत्म्यापाशी, चुका धूतो प्रतिक्रमणाने!

    दोषांना जाणणारा स्वत:, आणि करणारा तर वेगळाच;

    ज्ञायकभाव टिकत नाही, म्हणूनच करा प्रतिक्रमण!

    पॅकिंग आहे ‘चंदू’चे आज, त्याला बनवा भगवंत;

    आत्म्याचे प्रतिबिंब दिसे, तोपर्यंतचा आहे चढ!

    अतिक्रमण करतो अहंकार, प्रतिक्रमण करतो अहंकार;

    दोष होता प्रज्ञा करते सावध, शक्ती सरळ आत्म्याची!

    दु:ख त्याच्या अहंकाराला, डाग आपल्या रिलेटिव्ह वर;

    ते धुण्याकरीता कर प्रतिक्रमण, परसत्ता आहे अतिक्रमण!

    समजा म्हणणे वीतरागाचे, करणे नाही काही ही;

    काही ‘केल्याने’च आहे बंधन, मग धर्म करा किंवा नाही!

    निर्दोष जग जाणले स्थूलात, म्हणून येत नाही वर्तनात;

    जाणले जर सूक्ष्मतमपर्यंतचे, तर ते येईल वर्तनात!

    दोष होण्याआधीच, होतात ज्ञानींचे प्रतिक्रमण;

    लिहिल्यावर त्वरित मिटतात, ज्ञानींची अशी चरम जागृती!

    सूक्ष्मतर अन् सूक्ष्मतमच, असतात चुका ज्ञानींच्या;

    जग ऐकून आफरीन होते, तरीही आहेत दोष नियमाने!

    दादा पाहतात दोष सर्वांचे, तरीही दृष्टी शुद्धात्म्याकडे;

    म्हणून रागावले नाही कधीही, दोषांना मानून उदयकर्म!

    यात्रेमध्ये महात्मा भांडतात, मग करतात प्रतिक्रमण संध्याकाळी;

    समोरासमोर पाया पडून, पाहा कसे हे अद्भुत अक्रम!

    आज्ञांमध्ये निश्चित राहावे, तरीही त्यात चुकल्यावर;

    लगेच त्याचे प्रतिक्रमण करून, मिळवतो शंभर गुण पुरे!

    आज्ञांमध्ये राहतो तो परमात्मा, चुकल्यावर प्रतिक्रमण;

    करू नये आज्ञेत स्वच्छंद, नरकास जाण्याचे ते कारण!

    शिव्या मिळतात तेव्हा पाहतो, शुद्धात्मा आणि उदयकर्म;

    शुद्ध राहून शुद्धलाच पाहतो, शुद्ध उपयोग आत्मधर्म!

    अनिवार्य आहे आत्मज्ञान, मोक्षासाठी, नाही अन्य काही;

    प्रतिक्रमण आहे उपाय, सर्वांसाठी ते जरूरी नाही!

    अक्रमात करण्यास सांगितले, जेव्हा वर्तते जागृती डिम;

    मोक्षाला जाण्यासाठी अक्रमने दिली, आज्ञा-प्रतिक्रमण याची टीम!

    नुकसान केले तर ते परिणाम, हेतू आहे त्यात कारण;

    कारणाला निर्मूल करते, अक्रमचे हे प्रतिक्रमण!

    दादा म्हणती बेअक्कल, अशा अतिक्रमणाने आनंद;

    अपवाद आहे हे अतिक्रमण, सर्वांना आहे अति पसंद!

    ‘चंदू’ जे करतो तो चारित्रमोह, त्याला ‘पाहिल्या’ने अनुभव;

    तेथे प्रतिक्रमणाची गरज नाही, आत्म दृष्टीनेच होतो नष्ट!

    पूर्वी बिघडलेले परमाणू, प्रतिक्रमणाने शुद्ध होत नाहीत;

    प्रतिक्रमणाने समोरच्याला झालेले दु:ख, तेवढेच धुतले जाते!

    ज्ञाता-द्रष्टा राहिल्याने, परमाणू होतात शुद्ध;

    कर्तापदाने अतिक्रमण, अकर्ता पदाने होतो मुक्त!

    ‘काहीच करत नाही मी’ ध्यानात राहिलेच निरंतर;

    तेथे नाही गरज प्रतिक्रमणाची, पण राहत नाही सर्वांना निरंतर!

    अक्रमाने सरळ उडी मारली, ‘के.जी.’ ते ‘पी.एच.डी.’;

    मधली क्लासेस ‘मेकअप’ करण्यास, प्रतिक्रमण आहे अदृश्य सिडी!

    अक्रम विज्ञान संपूर्ण, सैद्धांतिक क्रियाकारी;

    जेथे करायचे नसते काहीही, अहा, अहा, कसे उपकारी!

    आत्मज्ञान देऊन, दादांनी दिले हे संपूर्ण विज्ञान;

    भिन्न भिन्न मार्ग दाखविले, मध्यभागी आत्म संधान!

    कदाचित भासे विरोधी गोष्ट, पण नसे कधी ज्ञानींची;

    गरजेनुसार वितरण ‘ए.सी.’, ‘हीटर’, ‘जनरेटर’चे!

    म्हणून नाही त्यात विरोधाभास, विजेचीही असली रिती;

    लक्षात ठेवून वाचा, सूज्ञ वाचकांना ही नम्र विनंती!

    खंड-2 : सामायिकची परिभाषा

    अक्रमाच्या सामायिक आणि प्रतिक्रमणात आहे फरक;

    अतिक्रणाचे प्रतिक्रमण, कचरा साफ करतो स्व-घरी!

    ‘मी शुद्धात्मा आहे’ याचे भान, पंचाज्ञेत राहणा:याला;

    सहज, स्वाभाविक दशा, तीच आहे सामायिक निरंतर!

    ‘सामायिक’मध्ये ‘जाणणे’ वर्तते, वर्तमान प्रतिक्षणाचा;

    उपयोग सतत राहिला नाही, तर दिसते ते सामायिकमध्ये!

    अक्रम सामायिकाने, विरघळते मन-वचन-काया याचा स्वभाव;

    महात्म्यांना राहतो दिवसभर ‘सामायिकसारखा प्रभाव’!

    दोन घडी करण्यास सांगितले, भरला सारा माल भंगार;

    निकालाचा नाही अन्य मार्ग, शिवाय पात्रतेतही नाही सार!

    लौकिक सामायिकात, हाकलत राहतात विचारांना;

    मन स्थिर करू इच्छितात, पाचशेरी बेडकांनी!

    मन राहील कसे स्थिर, बघत राहतात वाळूचे घडयाळ;

    मग गप्पागोष्टी करत करत, ऐकतात व्याख्यान!

    सामायिकेत बसल्यावर, दोन घडीची मिळाली सूट;

    मनमानी करतात त्यात, निंदा, चुगली, आणि कपट!

    उपाश्रयात सामायिक, बघण्यासारखी होईल;

    गादीपती जागे व्हा आता, मेढ्यांसारखे वागू नका!

    मन सैल झाल्यावर, कसे बांधावे वर्तुळात;

    ठरवितो दुकान आठवायचे नाही, दुकान दिसे सर्वाधी!

    सामायिकेत पुस्तक वाचतो, तो तर आहे स्वाध्याय;

    उपयोग गुंतवला अन्य ठिकाणी, वास्तवात हे नाही खरे!

    कोठे ते पुनियाचे सामायिक, एकही होणार नाही कुणाकडून;

    साधू, आचार्य, मुनिवर, गच्छाधिपतीही कमी पडतात त्यात!

    द्रव्य सामायिक करीत राहिले, कधी न केले भाव सामायिक;

    भावांना तर पळवून लावले, राहिले मात्र द्रव्य क्रमिक!

    अशी सामायिक करण्यापेक्षा, राखा समता संसारात;

    घरी पती, मुले, सासू, जावा व नातेवाईकांमध्ये!

    बेढब ओढाताणीची सामायिक, लागे ना कामी;

    मन राहे ना स्थिर जिथे, किंमत आहे कौडीची!

    येथे तर आहे महावीरांचा तराजू, वीरगत स्वीकार्य;

    नाही ही अंधेर नगरी, चालणार नाही गडबड जराशी!

    आर्त-रौद्र ध्यान संपतात, हेच आहे जैन धर्माचे सार;

    संपले नाहीत ते जर, तर व्यर्थ आहे तुज जन्म!

    मन वशरहित सामायिकने, आत्म्याचे होत नाही काही;

    मात्र हाकलतात कुत्री-मांजरी, ही सामायिक आहे की सोंग?

    समरंभ म्हणजे मनाने कर्म, समारंभ म्हणजे वचनाने;

    नियम कर्मबंधनाचे, आरंभ होतो

    Enjoying the preview?
    Page 1 of 1