Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

डफरं
डफरं
डफरं
Ebook259 pages1 hour

डफरं

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

‘डफरं’ या कथासंग्रहाने अख्ख्या महाराष्ट्रात संजय येरणे यांचे नाव साहित्यप्रांतात उच्चस्थानी पोहचविलेले आहे. किंबहुना त्यांच्या कथासंग्रहाला व अनेक साहित्य संग्रहालाही संस्थात्मक राज्यपुरस्कारही लाभलेले आहेत.


‘डफरं’ कथासंग्रहातील कथा वाचतांना एका वेगळ्याच जाणीवांची, संवेदनांची, मनाच्या भावनांची उकल करणारा, वैचारिक अधिष्ठान लाभलेला, तेवढ्याच चोवीस कॅरेटच्या सोन्याच्या शुद्धतेगत शतप्रतिशत प्रामाणिक इमान राखून समाजाला सत्य विचारांची मांडणी देणाऱ्या कथा आहेत. एकंदरीत संजय येरणे याचं ‘डफरं’ फारच वाजलं, गाजलं. त्याला एक विशेष कारणही आहे. आम्ही शेकडो कथा वाचल्यात पण ह्या कथाकाराची लेखनशैली, भाषा, संवाद, पात्र व समाजघडण नामनिराळी वाटली. आजपर्यंतच्या सामाजिक कथेचा ढाचाच बदलवून नव्या शैलीने प्रयोगात्मक कल्पकतेने पेश होणाऱ्या, पीएच.डी चा प्रबंधच साकारल्या जाईल एवढी सक्षम कथा.....

Languageहिन्दी
PublisherPencil
Release dateJul 15, 2021
ISBN9789354583544
डफरं

Related to डफरं

Related ebooks

Reviews for डफरं

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    डफरं - संजय वि. येरणे

    डफरं

    BY

    संजय वि. येरणे


    pencil-logo

    ISBN 9789354583544

    © संजय वि. येरणे 2021

    Published in India 2021 by Pencil

    A brand of

    One Point Six Technologies Pvt. Ltd.

    123, Building J2, Shram Seva Premises,

    Wadala Truck Terminal, Wadala (E)

    Mumbai 400037, Maharashtra, INDIA

    E connect@thepencilapp.com

    W www.thepencilapp.com

    All rights reserved worldwide

    No part of this publication may be reproduced, stored in or introduced into a retrieval system, or transmitted, in any form, or by any means (electronic, mechanical, photocopying, recording or otherwise), without the prior written permission of the Publisher. Any person who commits an unauthorized act in relation to this publication can be liable to criminal prosecution and civil claims for damages.

    DISCLAIMER: This is a work of fiction. Names, characters, places, events and incidents are the products of the author's imagination. The opinions expressed in this book do not seek to reflect the views of the Publisher.

    Author biography

    : संजय येरणे यांचा साहित्यविषयक परिचय :

    नाव: संजय विस्तारी येरणे.

    पत्ता: ‘येणू भिकाजी’ सदन, वार्ड नं. 6, शिवाजी चैक,

    मु. पो. तह. नागभीड. जि. चंद्रपूर. पिन 441205,

    संपर्क - 9404121098.

    शिक्षण: एम. ए. (मराठी, समाज, डॉ. आंबेडकर थॉटस्) डी. एड, डी. एस. एम.

    जन्म:  19 नोव्हेंबर 1976

    व्यवसाय : प्राथमिक शिक्षक, नागभीड. जि. चंद्रपूर

    साहित्यविशेष कार्य:

    1) लेखक, कथाकार, कादंबरीकार, कवी, संपादक, प्रकाशक, प्रवक्ते.

    2) अनेक वाड्.मयीन नियतकालिकांतून, वृत्तपत्रातून लेख, कथा, कविता, ललित लेखन, स्फुट लेखन प्रसिद्ध.

    3) संस्थापक-अध्यक्ष: भरारी साहित्य शिक्षण कला सेवा संस्था.

    4) ‘मी संताजी बोलतोय’ व ‘संताजीची सावली यमुना’ या एकपात्री प्रयोगाचे लेखन व आयोजन, सादरीकरण.

    5) भरारी साहित्य संघ, ज. तु. साहित्य परिषद चंद्रपूर, अंकुर साहित्य संघ जिल्हासचिव चंद्रपूर, विदर्भ साहित्य संघ शाखा नागभीड द्वारा साहित्य कार्य व अनेक संस्था व संघटनांचा पदाधिकारी. समाजसेवा, बहुजन चळवळीचे कार्य, साहित्यसंमेलन आयोजन, कवीसंमेलन आयोजन, नवोदितांना साहित्य मार्गदर्शन, शैक्षणिक चळवळ व संघटनात्मक कार्य, अनेक संमेलनात कविता वाचन, कथा सादरीकरण, शैक्षणिक मार्गदर्शन व प्रबोधन.

    6) विद्यार्थ्याकरिता प्रयोगात्मक ‘इंग्रजी रिडींग पॅटर्न’ ची निर्मिती व पुस्तक रूपाने प्रकाशन करून अनेक शाळात इंग्रजी कमी वेळात व कमी श्रमात वाचता येणे याविषयी प्रात्यक्षिक सादर व व्याख्यान मार्गदर्शन करणे.

    7) विविध विषयावर व्याख्याता म्हणून सादरीकरण. संताजी जगनाडे महाराजांच्या जीवनचरित्राचे अभ्यासक, प्रवक्ते.

    Contents

    १. डफरं

    २. सेवाव्रती

    ३. केसाला फुगे

    ४. फयान

    ५. संचारबंदी

    ६. अंतर

    ७. सोनझारी

    ८.  सूरकुळा

    ९. इंदा

    १०. पाल

    ११. विहार

    १२. लोकल

    Epigraph

    माझे आजी - आजोबा

    स्मृतिशेष येनुबाई - भिकाजी चाफले

    यांच्या स्मृतीस 

    सादर समर्पण... .

    तथा

    आई-वडील

    सौ. सुमन- विस्तारी येरणे

    यांना सविनय सादर.

    Preface

    मनातलं :

    ‘डफरं’ हे माझं प्रकाशित होणारं कथासंग्रह.... निंश्चितच मनाला उधाण आलंय. वाचक रसिक माझ्या कथेचं स्वागत करणार असा मला मनोमन विश्वास आहे. कारण कथा ही कशी असावी याची चांगलीच जाण मला आहे. खरे तर ‘डफरं’ मधील कथा माझ्या अस्वस्थ मनाची घालमेल आहे. समाज जीवनातील निरीक्षणात्मक नोदींचा आलेख यादृष्टीने मांडण्याचा कथारूपी प्रयत्न होय. माझ्या कथेबद्दल मीच काय सांगावे? कथेतील पात्र, प्रसंग, घटनांचे आशय व स्वरूप विषद करण्यापेक्षा आपण रसिक म्हणून ते ज्ञात करणार आहातच..

    मात्र साहित्यप्रवासात रूढ होतांना आजवर केलेला बराचसा लांब प्रवास मला अत्यानंद देवून जात आहे. कादंबरी व कथा या प्रकारात रमतांना तासनतास दयावी लागणारी बैठक, वेळ याकडे बघू जाता अगदी व्यस्त कालावधीतही मी अनेक साहित्यकृती समोर आणतांना एका वेगळया उद्दिष्टातून समोर गेलो आहे. प्रसंगी सातत्याने फिरणं आलंच. आपल्या साहित्यातून रसिकांनाही आनंद मिळतांनाच, समाज जडणघडणीसाठी आवश्यक विचारांची पेरणी करणे व ती रसिकांच्या हृदयात उतरविणे महत्त्वाचे वाटते. वाचकांनी दिलेला कौल हाच माझा सर्वोत्कृष्ट गौरव मला वाटतो आहे. यातील अनेक कथा बऱ्याच मासिक, वार्षिकांकात पूर्वप्रकाशित झालेल्या आहेत. त्यावेळेस मिळालेली दाद यामुळेच सदर संग्रह आपणासमोर ठेवीत आहे.

    माझ्या साहित्यकृतीला नेहमी समोर आणण्यास्तव माझ्या पाठीशी खंबीर उभे राहात सहकार्य करणारे माझे जेष्ठ्य साहित्यबंधू पुनाराम निकुरे सर, स्मृतिशेष बंडू कत्रोजवार यांचे आभार मानने माझे कर्तव्य आहे.  यांचेही आभार. माझी पत्नी सौ. संगीता तथा मुले पार्थ, शिव, काव्य यांच्या सहकार्यानेही माझे साहित्य फुलते आहे. यापूर्वीही माझे अनेक साहित्य प्रकाशन झालेले आहेत. अनंत वाचक व त्यांचे अभिप्राय मला सदोदीत येत आहेत. माझ्या लेखनावर भरभरून प्रेम करणाऱ्या, दाद देणाऱ्या, पुढे साहित्य कधी येणार म्हणून वाट बघत विचारणा करणाऱ्या, तथा माझ्या साहित्यकृतीला मानाने स्थान देणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या, सर्व स्नेही सृजनांचे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभलेल्या सहकार्याचा मी अनंत आभारी आहे.

    पाठराखण : ‘डफरं’ या कथासंग्रहाने अख्ख्या महाराष्ट्रात संजय येरणे यांचे नाव साहित्यप्रांतात उच्चस्थानी पोहचविलेले आहे. किंबहुना त्यांच्या कथासंग्रहाला व अनेक साहित्य संग्रहालाही संस्थात्मक राज्यपुरस्कारही लाभलेले आहेत.

    ‘डफर’ कथासंग्रहातील कथा वाचतांना एका वेगळ्याच जाणीवांची, संवेदनांची, मनाच्या भावनांची उकल करणारा, वैचारिक अधिष्ठान लाभलेला, तेवढ्याच चोवीस कॅरेटच्या सोन्याच्या शुद्धतेगत शतप्रतिशत प्रामाणिक इमान राखून समाजाला सत्य विचारांची मांडणी देणाऱ्या कथा आहेत. एकंदरीत संजय येरणे याचं ‘डफरं’ फारच वाजलं, गाजलं. त्याला एक विशेष कारणही आहे. आम्ही शेकडो कथा वाचल्यात पण ह्या कथाकाराची लेखनशैली, भाषा, संवाद, पात्र व समाजघडण नामनिराळी वाटली. आजपर्यंतच्या सामाजिक कथेचा ढाचाच बदलवून नव्या शैलीने प्रयोगात्मक कल्पकतेने पेश होणाऱ्या ह्या कथा होय. प्रत्येक कथेच्या गुंफणीत साहित्यमूल्यांच्या परिक्षणात गेलो तर एक पीएच.डी चा प्रबंधच साकारल्या जाईल एवढी सक्षम कथा संजय येरणे यांची आहे.

    आपल्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत....!

    संजय वि. येरणे

    नागभीड. जि. चंद्रपूर,

    मो. ९४०४१२१०९८

    १. डफरं

    चैतालं डमडम डफरं वाजू लागलं, ‘उन्हाची लाही लाही, सुरयाची आग नं डफऱ्यानं दिली जाग’ आसं समधे म्हणायचे. साळूबाईच्या जत्रेलं मस्त ठेक्यावर बदडत नाचायचं. तवा येणारी मजा न्यारीच असायची. आम्ही समधी मादग्याची पोरं त्या येरेची वाटच पाहात रावाचो.

    अमदाची साळूबाईची जत्रा जरा येगळीच खुशी देईल आसं मनोमन वाटायचं. म्या बी आता चांगला समजूतदार झालो व्हतो. माले बी आता चांगलं समजायला लागलं व्हतं. लहानश्या वयात लोकायच्या तोंडाकडं मुलमुल पायणारं आमचं मन चांगलं न वाईट आता समजून घेत व्हतं. चार दोन पुस्तकं वाचता येवालं लागलं म्हुण का असेना पण माही माय त्या दिशी कडाडनं कपाराच्या चाऱ्यावर बोटं शिलगीत मोडली न म्हणली,

     ‘लई शहाणा रं माहयं राजा. आता तुले अककल दाढ आली, साळूचं कुरपो बापू माहयं काळ काढजो. डिट बिट नोको लागो.’

    कसं तरी चैतापातुर रोजीरोटीची कामधंद मायबाप नं आम्ही कराचू. मात्र आता सप्पा कामधंद बंद होवाचं. तवा वरच्या पाव कमाईवर जगणं सुरू होवाचं तवा साळूबाईची जत्रा नं त्यात डफरं बदडवून चामड्याले ताव देणं होवाचं. म्याबी डफऱ्याले निंबकाडीच्या विस्तवात शेकून चांगलच बदडवू लागलो होतो. माले बी डफरं वाजवता येवाचं. बाचं वाजवणं पाहून म्याबी अंदामधांत शिकून घेतलं व्हतं. चार पैकं मिळवण्यात हातभार लागला तं मायबापाले खुशी का नाय होणार?

    वैशाखानंतर आसपास गावामंदी डफरं वाजवून बा कमाई कराचा न पोट भराचा. म्या घुंगरं वाजवून बाच्या मागं मागं रावाचं. नवऱ्या पोराच्या वरातीत वेडेवाकडं हातभट्टीचं दारू ढोसून लवणारं पोट्टे चार-चार आणं बक्षिसी देवाचे तवा पटकन म्या जमा कराचा. कवा-कवा चांगले पाटील लोक एखादं रूपयाचं नोट जिमीनीवर ठेवून बाले डफऱ्यावर नाचाले लावाचं. तवा बा मोठ्या खुशीनं डफरं वाजवत छलांग माराचं न कपारात नोट चिपकवून उचलाचं. तवा वरातीत सप्पाले मोठा आनंद होवाचा. म्या पटकन बापूच्या हातातलं नोट फाटक्या पॅंन्टच्या खिशात कोंबाचा नं बा ढाम्या वाघाचं ताल वाजवताच वरातीचं वऱ्हाड बाच्या ठेक्यावर नाचाचं ताल धराचं. वरातीतून येतांनी बापूले हळूच खुशीनं म्हणायचा.

    ‘बा माहयं पॅंट फाटलं, देतेस नवं घेवून?’

     बा खुशीनं ‘हुं.... ’ म्हणायचा. न वरातीत झालेली कमाईचं हिशेब मनात घोळवित घराकडं झपझप पावलं टाकायचा, म्या त्याच्या मागं मागं दुडुदुडु धावत चालू लागो. तवा नवा पॅंट भेटल म्हुण म्या आनंदलो रावायचो.

    कधीमधी बाले चांगल्या घरची लोकं आहेरात धोतर जोडी नं मायेलं झाम्पर बी देवाचे. पण आसं एखादच पाटलाचं घर भेटाचं. आता लोक बी भाय कंजूस झालेत. दिसरात लगनामंदी चार-चार दिस डफरं बदडवून पैसं देवालं घासाघीस कराचे. मात्र असा कितीक खर्च दारू पाण्यात खर्च कराचे. पण का करणार, ‘गरिबीले गत नाय नं कोणी खावाले देत नाय.’

    आता आमी शंकरपुराले गावठाणावं जागा जमवून माह्या जन्मापासून तेथं रावू लागलो आसं बा म्हणायचा. त्या अगुदर माहयं मायबाप या गावाहून त्यागावी हिंडायचे. पोट भरल तेथं चार दिवस रावाचे. आसं भटक्याची भटकी जिंदगाणी, चालून चालून मायबापाचं हाडंगुळ झिजले तवा कुठं ह्या शंकरपुराले इसावा भेटला. मेलेल्या मुडद्याले मसनखाटात नेतांनी तरी इसाम्यावर इसावं भेटते. पण आमच्या सारख्या भटक्या जिंदगाणीले हा समाज साधं रावाले गाव नाय तं इसावा कुठून देणार. दोन कुत्री, चार दोन डुकरं, एक गधा, त्याच्या पाठीवर चाललं बिराड, सोबतीला डमडम डफरं. समधं जिंदगाणीचं डफरं वाजलं व्हतं.

    मेलेल्या जनावराचं कातडं सोलणं हाच आमचा धंदा. ढोर मरायची वाट पाहायची नी ढोरं मेलं की तुटून पडाचं. गिधाडावाणी त्याचं चामडं वढायचं, चार दिसानं कुत्रं गिधाडांनी मास खाल्ल्यावर त्याचं हाडं गोळा करायची, सडलेल्या ढोरायची वास, पडलेलं किडं आंगावर चढाचे, पण पोटासाठी गिधाड-कुत्रं मास खातेतच नव्हं. आम्ही तं माणसाच्या जातीचं, आमाले बी पोट हाय. ते पोट भराचं आसल तं कसली आली वास नं किडे. दहा पैसे किलो हाड बोनमिल मंदी विकाची, आसी सवय झाल्यानं काहीबी वाटाचं नाय. मातर बा हाडं घेवून जावाले लागला का लोकं नाकात बोटं घालाची. जवळ येणं तं दूरच राहिलं, समाजाचीच घाण साफ करणारं आमी समाजापासून असं दूरच राहिलो. ‘कामापुरत मामा नं ताकापुरतं आजीबाई’ आसी म्हण हाय. आसच वागवायचं आमाले समाज. हिन जातीचं म्हुण जगावं लागलं व्हतं आमाले. लोक आमचं विटाळ मानायची. आमच्या जवळ बी याचची नाय, पण काम असलं तं आमच्यावाचून त्यायचं अडून रावाचं. बाची हाजी-हाजी कराची, बा म्हणायचा बी, ‘किती निष्ठूर हाय नाय का समाज, खालच्या जातीत जनमलं तं खालचीच कामं कामुन कराची? असली जातीव्यवस्था कोणाले बरं पटल? कधी ईचार केला का आमच्या जागी तुमी न तुमच्या जागी आमी असतो तं. पण कोणाले समजतं एवढं.’

    साली किळस येवाची या हलकट वृत्तीची. कधी साखरपुडा, बारसं, लगन नं मेलेल्या माणसाचं विघन, मातूर आमच्या डफऱ्यानं वाजाचं. तवा मनाले तेवढीच खुशी होवाची. चार घास सुखानं चांगलं खावाले भेटे, नाय तं नेहमीच आपलं. आरण भात, चुनभात खाणं. विट येवाचं, कधी तं दोन दोन रोज चूल बी पेटाची नाय, तवा माय गावातनं चार घरं लेकरा बाराले मागून आणाची. पोटात कावळं बोंबलाचं, मायची वाट पाहण्यात दिस जायचं. भेटलेला भाकरतुकडा खावून पोट भराचं, चार गिलास वरून पाणी पेवाचं. आसी

    Enjoying the preview?
    Page 1 of 1