Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

Timiratuni Tejakade (Educational guidance and inspiration for students and parents)
Timiratuni Tejakade (Educational guidance and inspiration for students and parents)
Timiratuni Tejakade (Educational guidance and inspiration for students and parents)
Ebook332 pages2 hours

Timiratuni Tejakade (Educational guidance and inspiration for students and parents)

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

Education is the key to human development.The overall development of students is the goal of education.As every child is unique, it is the function of the education proce

Languageमराठी
Release dateApr 30, 2024
ISBN9789362612472
Timiratuni Tejakade (Educational guidance and inspiration for students and parents)

Related to Timiratuni Tejakade (Educational guidance and inspiration for students and parents)

Related ebooks

Reviews for Timiratuni Tejakade (Educational guidance and inspiration for students and parents)

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    Timiratuni Tejakade (Educational guidance and inspiration for students and parents) - Dr. Tukaram Bobade

    १.

    जाणा महत्व शिक्षणाचे

    प्रस्तावना:

    आज मी शिक्षणक्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करतोय. साहजिकच, २००२ पासून काम करत असताना शिक्षण प्रक्रिया जवळून अभ्यासता आली. शिक्षणाच्या माध्यमातून होणारे परिवर्तन अभ्यासता आले, जवळून अनेक विद्यार्थ्यांमध्ये पाहता आले. माझ्या स्वतःच्या जीवनातील झालेले विकासात्मक बदल आणि त्यांचे परिणाम मी अनुभवतोय. शिक्षण ही वास्तविक पाहता खूप मोठ्या संपत्तीची चावी व्यक्तीच्या हातात बहाल करते आणि जीवन विविध पातळीवर खूप समृद्ध बनवते. ज्याला शिक्षणाचे महत्व समजले त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल होतो. प्राचीन काळापासून शिक्षणव्यवस्था अस्तित्वात आहे. ज्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात प्रवेश केला, त्यांचे मार्ग बदलले. इतिहास साक्ष देतो की, अशा व्यक्तीच्या आयुष्यात खूप मोठे परिवर्तन होऊन त्यांनी इतरांच्या सुद्धा आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणलेले आहेत. शिक्षणाच्या ताकदीबद्दल कोणताही संशय नाही. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या, मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा जिथे रोजचा संघर्ष करावा लागतो अशा परिस्थितीत वाढत असतांना आपण एका चांगल्या पदावर पोहचू आणि समाजात सन्मानाने जगू अशी कल्पना अशक्य वाटायची. परंतु, आज ते कल्पनेतील विश्व अस्तित्वात आले आहे. हे सर्व घडून आलंय ते शिक्षणाच्या माध्यमातून. म्हणून आजच्या माझ्या विद्यार्थी मित्रांना शिक्षणाचे महत्व समजणे गरजेचे वाटते. त्यासाठीच ह्या प्रकरणाचे नियोजन आहे.

    शिक्षण एक दीप आहे:

    शिक्षण हे सर्वार्थाने व्यक्तीला मार्ग दाखवणाऱ्या व उर्जा देणाऱ्या प्रकाशाचे कार्य करते. अंधारामध्ये चालणाऱ्या वाटसरूला मार्गक्रमण करत असतांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्याला डोळे असूनही अंधारावर मात करता येत नाही. चालतांना चाचपडत, अडखळत चालावे लागते. ज्यावेळी व्यक्तीला काहीच दिसत नाही त्यावेळी त्याची कोणतीही क्षमता पूर्णपणे कामी येत नाही कारण त्याला त्याच्या सभोवतालची परिस्थितीच लक्षात येत नाही. तो त्या परिस्थितीशी अनभिज्ञ असतो. म्हणून मार्ग दिसत नाही आणि त्याची दिशा व दशा या दोन्हीवर परिणाम होतो. अशा मार्गावरून जात असतांना त्या वाटसरूच्या हातात जर एखादे प्रकाशाचे साधन प्राप्त झाले तर त्याच्या सर्व अडचणी दूर होतील. त्याला त्याचा मार्ग व्यवस्थित दिसायला लागेल. त्याचा आत्मविश्वास वाढलेला असेल. त्या सहाय्याने त्याला ज्याठिकाणी पोहचायचे असेल त्याठिकाणी तो व्यक्ती व्यवस्थित, सुरक्षित पोहचेल. प्रत्येक पाऊल टाकतांना त्याला चाचपडण्याची, गोंधळून जाण्याची गरज नाही. म्हणून मानवी जीवनात प्रकाशाला आणि प्रकाशाच्या साधनांना महत्व आहे. निसर्गाने आपल्याला चंद्र, सूर्य, तारे अशी साधने उपलब्ध करून दिली आहेत जी सातत्याने प्रकाश आणि उर्जा देतात. त्यासोबतच मानवाने आपल्या गरजेनुसार अनेक साधनांचा शोध लावून त्यांचा विकास केलेला आहे. अशा साधनांनी मानवी जीवन पूर्णपणे बदलून गेले आहे. प्रकाश देणारी साधने अनमोल आहेत.

    एक दिवा सुद्धा तेच कार्य करतो. त्याच्या अंगी असणाऱ्या सामर्थ्याच्या बळावर अंधारावर मात करत इतरांना प्रकाश देऊन आत्मविश्वास निर्माण करण्याची किमया एक छोटा दीप करतो. एवढे प्रचंड बळ त्याच्या आधारे मिळत असते. तेच कार्य मानवी जीवनात शिक्षणाचे आहे. अज्ञानामुळे व्यक्ती जीवनात चाचपडत जगत असतो. ज्याच्या हातात शिक्षणाचा दीप आहे त्याच्या मनात जगण्याचा आणि प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. शिक्षणाच्या माध्यमातून अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होऊन ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो. व्यक्तीच्या सर्व क्षमता विकसित होतात. त्याच्यात एक वेगळे बळ निर्माण होते. त्याला आजूबाजूच्या जगाची पारख होते. जगण्याच्या वाटेवरील प्रत्येक अडचण आपल्या विकसित बौद्धिक, शारीरिक व मानसिक क्षमतांच्या आधारे दूर करून यशस्वीपणे वाटचाल करता येऊ शकते. शिक्षण हा एक दीप आहे. ज्याच्या आयुष्यात याचे अस्तित्व निर्माण होईल त्याचे आयुष्य समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. हा शिक्षणाचा दीप जीवनाचा मार्ग सुकर करतो म्हणून प्रत्येक मुलाला या शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी पालकांनी, शिक्षकांनी आणि एकूणच समाजाने आटोकाट प्रयत्न करणे गरजेचे आहे.

    आदर्श उदाहरणे:

    अनेक महान व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास केल्यास शिक्षणाच्या माध्यमातून काय अगम्य परिवर्तन होऊ शकते याची कल्पना आपल्याला येऊ शकते. जवळपास सर्व महान व्यक्तींनी शिक्षण घेतले आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनात बदल झाला त्यासोबतच समाजातील अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी विवध प्रकारे केल्याची नोंद इतिहासात आढळते. वर्तमानातही अनेक व्यक्तींच्या बाबतीत शिक्षणाच्या माध्यमातून होणारे परिवर्तन आपल्या आजूबाजूला दिसतील. या बाबतीत अनेक उदाहरणे आपल्याला मांडता येतील परंतु मला प्रेरित करणारी दोन महान उदाहरणे याठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करतोय.

    भारतीय समाजात एक मोठी क्रांती शिक्षणाच्या माध्यमातून घडवून आणली ती सावित्रीबाई फुले यांनी. एक अशिक्षित महिला ते पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका व एक महान क्रांतिकारक इथपर्यंतचा प्रवास जगासाठी एक अद्भुत अशी प्रेरणा आहे. भारतासारख्या खंडप्राय विशाल असणाऱ्या आणि स्त्रीसाठी अनेक समस्यांचे माहेरघर असणाऱ्या देशात स्त्रीशिक्षणाची दारे खुली करून स्त्रियांना सन्मानाचे जीवन प्राप्त करून देण्यात अतुलनीय योगदान देणाऱ्या सावित्रीबाई एक आदर्श उदाहरण आहेत. त्यांनी जगाला दाखवून दिले आहे की , शिक्षणाच्या माध्यमातून एखादा व्यक्ती त्याच्यातील मानवी क्षमता किती उच्च पातळीपर्यंत विकसित करू शकतो. अशिक्षित असणाऱ्या सावित्रीबाई यांना त्यांचे पती महात्मा ज्योतीराव फुले यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देऊन अगोदर त्यांना शिकवले. ज्योतीराव फुले हे एक महान शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक म्हणून इतिहासाला परिचित आहेत. त्यांना अज्ञानामुळे समाजाचे होणारे नुकसान माहित होते. ते सातत्याने याचे महत्व विविध माध्यमातून समाजासमोर आणि शासनाच्या दारी मांडायचे. एक कर्ते सुधारक या नात्याने त्यांनी स्वतःच्या पत्नीला शिक्षण देऊन इतर मुलींना शिकवण्यासाठी तयार केले. आपल्या पतीला साथ देत तीच तळमळ सावित्रीबाई यांच्या अंगी निर्माण झाली. त्याच तळमळीने त्या स्वतः शिकल्या आणि पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरु केली. हे कार्य करत असतांना सावित्रीबाई यांना झालेला त्रास मांडतांना इतिहासाला सुद्धा थरकाप उडतो. एवढ्या त्रासाला सामोरे जाण्याची, स्वतःचे विचार परखडपणे मांडण्याची, इतरांच्या आयुष्यात त्यांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा देण्याची ताकद कुठून आली? या प्रश्नाचे उत्तर आहे त्यांनी घेतलेल्या शिक्षणात. जर सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण घेतले नसते तर आज इतिहासाने त्यांची नोंद घेतली असती का असा प्रश्न निर्माण झाल्यशिवाय राहणार नाही. सावित्रीबाई यांनी खूप मोठ्या प्रमाणात लिखाण केले जे त्यांच्या प्रकाशित झालेल्या साहित्यातून अजरामर आहे. आज अनेक वर्षानंतर सुद्धा त्यांचे अस्तित्व पिढ्यानपिढ्या गौरवान्वित केले जाते. जोपर्यंत ही मानवजात पृथ्वीतलावर आहे तोपर्यंत हे नाव अमर असेल. एका व्यक्तीला कसल्याही प्रकारचे अस्तित्व सामाजिक परिस्थितीने बहाल केलेले नसतांना त्या परिस्थितीशी संघर्ष करून काळाच्या छाताडावर आपले नाव कोरण्याची हिम्मत फक्त शिक्षण निर्माण करू शकते हेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनप्रवास आणि इतिहासातून प्रकर्षाने समोर येते.

    दुसरे एक महान उदाहरण या अनुषंगाने प्रकर्षाने मांडावे असे मला वाटते ते महान अमेरिकन व्यक्तिमत्त्व बुकर टी. वाशिंग्टन यांचे. त्यांचा शिक्षणासाठीचा संघर्ष प्रत्येक विद्यार्थ्याला खूप मोठी प्रेरणा देणारा आहे. त्यांनी ‘Up From Slavery’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास रेखाटलेला आहे. गुलाम आईच्या पोटी जन्माला आलेल्या, लहानपणापासून फक्त जिवंत राहण्याचा संघर्ष नशिबी आलेल्या, कल्पनाही करवत नाही अशा अनेक प्रतिकूल प्रसंगाला सामोरे जावे लागणाऱ्या या व्यक्तीने पुढे जाऊन अनेक गरजू विद्यार्थ्यांचे जीवन उद्धरावे ही खऱ्या अर्थाने अफलातून अशी गौरवास्पद कामगिरी आहे. असे महान कार्य करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात कुठून आले? ते म्हणजे त्यांनी घेतलेल्या शिक्षणातून. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी जी तळमळ दाखवली ती प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्यात आपल्या समोर ठेवावी आणि आहे त्या परिस्थितीत कसे उत्तम शिकता येईल याची शिकवण घ्यावी. त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग खूप महत्वाचा आहे. १८७२ मध्ये तो एका कोळशाच्या खाणीत काम करत असतांना त्याने वर्जिनिया प्रांतातील एका नामांकित शाळेविषयी चर्चा ऐकली. त्याच्या मनात त्या शाळेविषयी आकर्षण निर्माण झाले. त्याने शाळेत प्रवेश घ्यायचे ठरवले. आपल्या आईची परवानगी घेऊन तो त्या शाळेकडे निघाला परंतु ही शाळा नेमकी कुठे आहे, किती अंतरावर आहे याचा त्याला काहीही अंदाज नव्हता. खिशात थोडके पैसे आणि पाठीवर कपड्याची छोटी पिशवी याव्यतिरिक्त त्याच्याकडे काहीच नव्हते. कधी पायी, कधी कुण्या वाहन चालकाने आधार दिला तर, अशा पद्धतीने त्याने प्रवास चालू केला. पोटात अन्नाचा कण नव्हता. असाच कित्येक मैलाचा प्रवास केला. खिशात पैसे नाहीत, पोटात भुकीची आग आहे. अशा परिस्थितीत पुढे जावे कसे हा प्रश्न होता. रस्त्याच्या कडेला कोणत्याही आधाराविना मुक्काम करून, नंतर एका जहाजावर काम करून गरजेपुरते पैसे कमवून पुढचा प्रवास केला. शाळेचे ठिकाण गाठले. त्याही ठिकाणी प्रवेशाच्या अगोदर पूर्ण शाळा स्वच्छ करावी लागली. पण तीच आपल्यासाठी संधी आहे असे मानणाऱ्या या मुलाला त्याचे काम आणि शिकण्याची तळमळ पाहून शाळेत प्रवेश मिळाला. पुढे सातत्याने अशीच परीक्षा प्रत्येक क्षणाला द्यावी लागली आणि जिद्दीच्या बळावर आयुष्यातल्या प्रत्येक संकटावर मात करत स्वतःचे शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण केले. हाच मुलगा पुढे जाऊन अनेकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारा आशेचा किरण बनतो. शिक्षणामध्ये खूप मोठी जादू आहे जी व्यक्तीला खोल दरीतून बाहेर काढून एका उच्च शिखरावर नेऊन पोहचवते. अशी अनेक आदर्श उदाहरणे आपल्या आजूबाजूला पाहायला आणि ऐकायला मिळतात. गरज आहे फक्त विद्यार्थ्यांनी त्यातून प्रेरणा आणि बळ घेण्याची.

    शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन:

    Studies serve for delight, for ornament, and for ability.

    - Francis Bacon

    शिक्षण व्यक्तीच्या जीवनात क्रांती निर्माण करते. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा सक्षमीकरणाचा प्रवास चालू होतो. त्याच्या विविध प्रकारच्या क्षमता त्याला कळू लागतात आणि त्या विकसित पावण्याच्या दिशेने शिक्षण त्याला सहाय्य करते. व्यक्तीकडे शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि सामाजिक स्वरूपाच्या विविध क्षमता अंगभूत असतात. फक्त गरज असते ती जाणिवेची आणि त्यांना विकसित स्वरुपात आणण्याची. अनौपचारिक शिक्षण तर जन्मतःच चालू होते ज्या माध्यमातून सामाजिक विकास साधत असतो. शारीरिक विकास हा वयोमानाने आहार-व्यायाम, शारीरिक कष्ट-हालचाल अशा माध्यमातून होत असतो. बौद्धिक आणि मानसिक विकास साध्य करण्यासाठी औपचारिक शिक्षणाचा आधार व्यक्तीला घ्यावा लागतो. अक्षर ओळख, वाचन-लेखन, विविध विषयाच्या अध्ययनाच्या माध्यमातून व्यक्तीच्या बुद्धीच्या आणि मनाच्या क्षमता विकास पावत असतात. फ्रान्सिस बेकन या साहित्यिकाने आपल्या एक निबंधात लिहून ठेवलंय त्याप्रमाणे Histories make men wise; Poets witty; the mathematics subtle; natural philosophy deep; moral grave; logic and rhetoric able to contend. व्यक्तीमधील अंगभूत सुप्त उर्जा वेगवेगळ्या माध्यमातून निर्मितीच्या दिशेने वळवणे हे शिक्षणाचे सर्वात महत्वाचे साध्य आहे.

    व्यक्तीचे स्वतंत्र विचार विकसित होतात. तो स्वावलंबी होतो. आयुष्य जगण्याच्या बाबतीत इतरांवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही. जगण्याचा परिपक़्व दृष्टिकोन विकसित होतो. आत्मविश्वास आणि जीवनदृष्टी प्राप्त होते. चांगले-वाईट, चूक-बरोबर याची पारख करता येऊ शकते. अशा संपूर्ण व्यक्तिमत्वाचा अविष्कार झाल्यास व्यक्ती आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यास सज्ज होत असतो. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या ज्ञानकक्षा रुंदावतात आणि सामाजिक जीवनात इतर व्यक्तीसोबत येणाऱ्या संबधातून ते परिवर्तित होत असते. यातून त्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते. संपूर्ण व्यक्तिमत्व विकास यापलीकडे जीवनाचा दुसरा कोणता उद्द्येश नाही. म्हणून संपूर्ण उद्द्येश साध्य करण्यात शिक्षण व्यक्तीला सहाय्यभूत ठरत असते.

    सामाजिक परिवर्तनाचे माध्यम:

    मानवी जीवनात शिक्षणामुळे परिणाम होतो हे नक्कीच आहे. व्यक्तीपासून समाज निर्माण होतो. ज्या समाजात शिक्षित व्यक्तींची संख्या जास्त असेल त्या समाजाचा विकास चांगल्या पद्धतीने होतोच. त्यामुळे शिक्षण हे सामाजिक विकासाचे माध्यम या नात्याने सुरुवातीपासून शिक्षणावर अनेक महापुरुषांनी भर दिलेला आहे. देशाचे भवितव्य निर्धारित करण्यामध्ये शिक्षणप्रक्रियेचा खूप मोठा हातभार असतो. त्यामुळे देशाच्या नेतृत्वाने प्रत्येक व्यक्तीच्या शिक्षणाची काळजी घेणे गरजेचे आहे. इतिहासातील अनेक मोठ-मोठ्या परिवर्तन चळवळी शिक्षित व्यक्तींच्या माध्यमातूनच उभारलेल्या आहेत. शिक्षणाने आपले अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव होऊन व्यक्ती एक जागरूक नागरिक होण्याच्या दिशेने वाटचाल करत असतो. तो कुणाचाही गुलाम सहजासहजी बनू शकत नाही. नेतृत्वाचे गुण विकसित होत असतात. म्हणून अनेक देशांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे मूळ हे शिक्षणात आढळते. जे देश विकसित आहेत त्यांच्या विकासाचे कारण त्या देशातील शिक्षित नागरिक आहेत यात काहीच वाद नाही. त्यासाठी शिक्षण हे व्यक्ती आणि समाज या दोन्हीसाठी गरजेचे आहे.

    शिक्षण म्हणजे फक्त पदवी नाही:

    व्यक्ती जन्मतःच अनेक क्षमता अंगभूत घेऊन आलेला असतो. त्या क्षमतांना लहान रोपट्या प्रमाणे जोपासत आणि पोषण करत वाढवले तर त्याचे एक दिवस मोठ्या वृक्षात रुपांतर होते. मानवी क्षमता वाढीस लावण्यासाठी अभ्यास हा एकमेव पर्याय आहे. शिक्षण मानवी क्षमतांना जोपासणारे आणि विकसित करणारे माध्यम आहे. परंतु, आजच्या परिस्थितीत शिक्षणाची संकल्पना बदलत चालली आहे. गुणवत्ता कमी होऊन संख्यात्मक वाढ जास्त दिसतेय. उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत चाललय. पैकीच्या पैकी गुण घेणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दिसताहेत. व्यावसायिक दृष्टिकोन प्राधान्याने जोपासला जातोय. शिक्षणाचा उद्द्येश फक्त नोकरी किंवा अर्थप्राप्ती हाच गृहीत

    Enjoying the preview?
    Page 1 of 1