Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

भारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह
भारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह
भारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह
Ebook108 pages38 minutes

भारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह

Rating: 5 out of 5 stars

5/5

()

Read preview

About this ebook

९ फेब्रुवारी २०१६ ला जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही विद्यार्थ्यांनी आणि इतर जमावाने भारतविरोधी घोषणा दिल्या. यानंतर त्यावर केंद्र सरकारने कठोर पावले उचलल्यासारखे दाखवले. अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आलेले असल्याने सर्व राजकीय पक्षांना यात आपापला स्वार्थ दिसला. आणि मग सर्व माध्यमातून मत मतांचा तीव्र कोलाहल उठला. यामुळे माझ्या मनात आलेले विचार ताडून बघण्यासाठी इतिहासाची पुस्तके उघडली आणि त्यातून जे उमगले ते इथे लिहिले आहे.

Languageमराठी
PublisherAnand More
Release dateMar 19, 2016
ISBN9781311131812
भारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह

Related to भारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह

Related ebooks

Reviews for भारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह

Rating: 5 out of 5 stars
5/5

1 rating0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    भारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह - Anand More

    भाग ५ - भारतीय राज्य घटनेची रचना

    भाग ६ - कलम 124A आणि देशद्रोह

    भाग ७ - घोषणा, सरकार आणि आपण

    लेखकाविषयी

    भाग १ - पूर्व पिठिका

    विष्णू पुराण" म्हणते की,

    उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।

    वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।।

    म्हणजे राजा भरताचे साम्राज्य आसेतुहिमाचल होते. पण या सम्राट भरताच्या पुढच्या पिढ्या जगात येईपर्यंत ते खंड खंड झालेले होते. महाभारतकाळात तर कुठे जरासंधाच्या मगधासारखी साम्राज्यवादी राजेशाही नांदत होती, तर कुठे मथुरेसारखी छोटी छोटी गणराज्ये. म्हणजे भरताच्या वंशजांना आम्ही चालवू हा पुढे वारसा काही जमले नसावे. आणि मग महाभारताच्या युगांतकारी युद्धानंतर तर छोटी छोटी राज्ये किंवा गणराज्ये किंवा स्वत:च्या सीमेत तुष्ट रहाणारे नंदांचे मगध साम्राज्य, हाच या भूमीच्या लोकांचा स्थायीभाव झाला होता.

    या स्थायीभावाला प्रवाही केले ते कुठल्या हिंदूने नव्हे तर एक यवन राजा अलक्स्येन्द्र किंवा अलेक्झांडरने. आणि त्यानंतर मोडक्या राज्य, गणराज्यांतून एकसंध राष्ट्र बनवण्याचा बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न केला चंद्रगुप्त - चाणक्य या जोडीने. पण जर अनुक्रमे मौर्य, चेरा - चोला - पंड्या, सातवाहनशुंग, महामेघवाहनगुप्त, वाकाटककदंब, हूण, चालुक्य, राष्ट्रकूटपल, चोल, गुर्जर - परिहार, चालुक्य, घोरी, दिल्ली, मुघल, मराठा आणि अगदी शेवटच्या ब्रिटीश साम्राज्यांच्या वेळच्या भारतीय नकाशांवर नजर टाकली तर आपले भारत हे राष्ट्र आसेतुहिमाचल असे कधी नव्हतेच किंबहुना ते तसे होते ही पुराणातली वानगी आहेत हे लगेच लक्षात येऊ शकते. आपण ज्याला भारत देश म्हणतो आणि ज्याच्या राष्ट्रवाद हाका आपल्या कानातून घुमू शकतात किंवा ज्या तश्या घुमताहेत म्हणून काही जणांना त्रास होऊ शकतो त्या भारताचा इतिहास खरा सुरु होतो तो १९४७ पासूनच. त्या आधीचा इतिहास हा आर्यावर्ते, रेवाखंडे, जम्बुद्वीपेच्या भूमीचा इतिहास आहे. हिंदुस्थान नामक काल्पनिक राष्ट्राचा नाही. भारत नामक देशाचा तर अजिबातच नाही.

    भारत किंवा इंडिया नामक देशाचा ( मी इथे राष्ट्र हा शब्द जाणून बुजून टाळला आहे) जन्म ही एक दीर्घकाळ चाललेली आणि अजूनही अपूर्ण असलेली सामाजिक प्रक्रिया आहे. ती माझ्या सामान्य दृष्टीला कशी दिसते, ते सांगण्यासाठी आधी माझ्या मते देश आणि राष्ट्र या शब्दांचा अर्थ काय? ते सांगतो. देश म्हणजे भूभाग, ज्यात जमीन, जंगले, नद्यापर्वतमाला, सजीव - निर्जीव असे सगळे काही आले. त्यामुळे देश ही संकल्पना आपोआप एका सलग भूभागाशी संबंधित आहे. तर राष्ट्र म्हणजे समाजमनथोडक्यात देश म्हणजे हार्डवेअर आणि राष्ट्र म्हणजे सॉफ्टवेअर असे माझे गृहीतक आहे. रोजच्या व्यवहारातले उदाहरण घ्यायचे असल्यास देश म्हणजे आपली इमारत, तिच्या पुढची बाग, तिच्या कंपाउंड पर्यंतचा भाग. आणि राष्ट्र म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थेची संकल्पना. मग ती संकल्पना हौसिंग सोसायटीची असू शकते किंवा अपार्टमेंट्सची. संकल्पना व्यक्तींचे हक्क आणि कर्तव्ये ठरवते आणि आपसातले वर्तन देखील.

    आता हेच उदाहरण पुढे चालवायचे म्हटले तर, सहकारी गृह निर्माण प्रकल्पामागची सैद्धांतिक कल्पना आहे की, समविचारी लोक एकत्र येउनआपली संस्था स्थापन करून, पैसे जमा करूनजमीन खरेदी करून, ती विकासकाकडून विकसित करून घेतात. म्हणजे संस्था आधी जन्माला येते आणि इमारत नंतर. सॉफ्टवेअर आधी बनते आणि मग त्या अनुषंगाने हार्डवेअर. अश्या सोसायटी मध्ये लोकांचे वर्तन एकसारखे असण्याची शक्यता जास्त असते. सामंजस्य आणि परस्पर सहकार्य इथे थोड्या जास्त प्रमाणात असू शकते. पण अश्या सोसायट्या आदर्श असल्या तरी फार क्वचितच बनतातप्रत्यक्ष आयुष्यात, आपण बघतो की एखादा विकासक जमीन खरेदी करून, त्यावर इमारत बांधून, त्यातील घरे वेगवेगळ्या व्यक्तींना विकून, मग त्यांची एक सोसायटी तयार करून देतो आणि बाजूला होतो. म्हणजे इथे हार्डवेअर आधी तयार झाले आणि सॉफ्टवेअर नंतर. इथे सर्व सभासदांची मने चटकन जुळतीलच याची खात्री नाहीको-ऑपरेशन नावालाच असते आणि लहान सहान गोष्टीवरून कुरबुरी चालू असतात. हे उदाहरण लक्षात ठेऊन आपण पुन्हा भारत देशाच्या

    Enjoying the preview?
    Page 1 of 1