Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

Share Market : (शेअर बाजार)
Share Market : (शेअर बाजार)
Share Market : (शेअर बाजार)
Ebook306 pages1 hour

Share Market : (शेअर बाजार)

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

Everyone knows the importance of money in this materialistic world. Money may not be everything but no one can deny its importance as the greatest means of life. And one of the important sources of earning money is the stock market. If you invest here intelligently then you can make huge money easily. For that, one must have all the authentic information about stock market, then only you can easily move ahead by avoiding market risks.
The book mentions all the details about stock market.
Dinkar Kumar, the author has put all the important details about the stock market in a very easy manner and also how to cope up with the difficulties come across in the stock market.
Apart from this, the book consists of the addresses and the authentic information about the main offices of the stock market.
Languageमराठी
PublisherDiamond Books
Release dateJul 30, 2020
ISBN9789352617982
Share Market : (शेअर बाजार)

Related to Share Market

Related ebooks

Reviews for Share Market

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    Share Market - Anand Kumar

    पत्ते

    शेअर: एक ओळख

    आजच्या भौतिकवादी जीवनात संपत्तीचे महत्व नाकारता येणार नाही. पैसा कदाचित साध्य नसेल; पण ते सर्वात मोठे साधन आहे. मोठ्या माणसापासून ते सामान्य व्यक्तीपर्यंत सर्वानी पैशाचे महत्व स्वीकारलेले आहे. प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या माध्यमांतून संपत्ती कमावण्याची व्यवहारकुशलता दाखवितो आणि स्वतःचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा संग्रहसुद्धा करतो. पैसा-संचायाचे एक माध्यम बँक प्रणालीसुद्धा आहे. जेथे आपला पैसा पूर्णतः सुरक्षित राहतो; परंतु बँकिंग व्यवस्थेतसुद्धापैश्याची वाढ तेव्हडी तीव्र गतीने होत नाही जेव्हढी तीव्र वर्तमानाची मागणी आहे. अश्या स्तिथीत आपण थोडा विवेक आणि जागरूकतेने आपला पैसा विस्तृत क्षेत्राकडे वळविला तर पैसा वर्तमानाच्या मागणीनुसार विकास पावतो आणि याकरिता सर्वात योग्य आणि सुरक्षित क्षेत्र आहे शेअर बाजार.

    शेअर बाजार म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी प्रथम आपण जाणून घेऊ की शेअर म्हणजे काय? साधारणतः बोलतांना आपण शेअरविषयी बोलत असतो तेव्हा आपला हेतू एखाद्या कंपनीद्वारे आपल्या मूळ धनाला एक निश्चित प्रमाणात वाटप केलेल्या भागाशी असतो. म्हणजेच दुसऱ्या शब्दात शेअरचा मूळ अर्थ कार्यभारात भागीदारी आहे.

    'याचा सरळ सरळ उघड अर्थ आहे' की जेव्हा आपण एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करू पाहत आहात तेव्हा आपण आपला पैसा बाजारातील एखाद्या सौद्याला खरेदी करण्यासाठी खर्च करीत नसता तर एक संपूर्ण व्यवहारात भागीदारी मिळवीत असता. या तऱ्हेने आपण अंशतः त्या कंपनीचे मालक बनता.

    हे तर आपणही जनता की जेव्हा आपण एखाद्या कंपनी वा व्यवहाराचे संचालन करतो तेव्हा आपल्याजवळ फायदा आणि नुकसान दोन्हीची सामान शक्यता गृहीत असते.

    शेअर कसे प्रचलित होतात:-

    सर्व कंपन्या ज्या शेअर प्रचारात आणतात, तेव्हा त्यांची किंमत ठरलेली असते जिला बाजाराच्या भाषेत 'निश्चित मूल्य' अथवा 'पार व्हॅल्यू' असे म्हणतात. हे मूल्य शेअर सर्टिफिकेटवर स्पष्टपणे दर्शविलेले असते. भारतात हे निश्चित मूल्य १० रुपये असते. कंपन्यांनी आता हे मूल्य ५ रुपये, २ रुपये व १ रुपयांपर्यंतच्या शेअरमध्ये विभागणे सुरु केले आहे. दर्शनी मूल्य कंपनीच्या खात्यात शेअरचे संकेतक मूल्य असते. नंतर बाजारात हा कोणत्याही मूल्यावर खरेदी-विक्री केला जाऊ शकतो.

    येथे हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे की बाजारात शेअरचे मूल्य निरंतर वाढत वा घाटात असते आणि त्याचा दर्शनी मूल्याशी काहीही संबंध नसतो; परंतु शेअरवर लाभांश शेअरच्या 'परताव्हॅल्यू' च्या आधारावरच निश्चित केला जातो.

    गुंतवणूक कशाला म्हणतात?

    माना की आपण आपल्या पैशांनी एखादा जमिनीचा तुकडा खरेदी केला आहे ज्याची किंमत त्या वेळी १००० रुपये आहे. रस्ते विकास किंवा आसपासची जबाबदारी लक्षात घेता वरील जमिनीच्या किमतीत पाच वर्षांत फक्त दहा टक्के वाढ झाली आहे. म्हणजे ज्या जमिनीची आजची किंमत ११०० रुपये झाली आहे. जेव्हा की चलनवाढीमुळे रुपयाचे अवमूल्यन १५ टक्के झाले आहे. त्याचाच अर्थ आपण गुंतविलेल्या पैशांचे सध्याचे मूल्य ११५० रुपये झाले आहे. आपण पाहता की , प्रत्यक्षात आपण गुंतविलेल्या पैशात जरी १०० रुपये वाढ झाली; पण चालू चलनाच्या हिशोबात आपले पन्नास रुपयांनी नुकसान झालेले आहे. जर या घटनेला अर्थशास्त्रीय व्याख्येत सांगायचे असले तर असे म्हणता येईल की चलनाचे मौलिक मापदंड मूलतः त्याआधारे खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवा यावरून पारखता येते. स्पष्ट शब्दांत आपण आपल्या जमा संपत्तीचा उपयोग ती जमा स्थिर अथवा तिला वाढविण्यासाठी करतो त्याला गुंतवणूक म्हणतात, वाटले तर आपण त्याचा उपयोग सोने, चांदी अशा वस्तू खरेदीसाठी केला असेल वा जमीन, घर इत्यादी सारखी एखादी अचल संपत्ती खरेदी करण्यासाठी.

    खरे तर आपण भांडवलदार आहात म्हणून आपले भांडवल स्थिर ठेवणे किंवा ते वाढविणे याकरिता आपण त्याचा हो उपयोग करीत आहात. त्याबरोबर आपल्या अपेक्षा काय आहेत? गुंतवणूक करून आपण आपले भांडवल वाढवत आहात का? नियमित उत्पन्न किंवा दोन्ही; पण आपल्या अपेक्षांसोबतच आपल्याकरिता हे ओळखणे आवश्यक आहे की भविष्यात आपल्या अपेक्षा काय आहेत, आवश्यकता काय आहेत हे तपासून पाहिल्यामुळे आपण आपल्या प्राथमिकता सहजपणे निश्चित करू शकाल आणि आपल्या समोर हे स्पष्ट होईल की आपण आपल्या गुंतवणुकीवर किती वाढ आणि किती उत्पन्न इच्छिता. तेव्हा आपल्याला हा निर्णय घेणे सोपे होईल, की कोणती गुंतवणूक आपल्यासाठी उपयुक्त आहे. बाजार समाजाने आणि आपल्या प्राथमिकता निश्चित करणे एक चांगल्या गुंतवणूदारासाठी अति आवश्यक आहे आणि हीच भांडवल गुंतवणुकीची कला आहे.

    गुंतवणुकीची आवश्यकता जर आपण आपल्या वर्तमानापासून काही दशके मागे गेली आणि २० व्या शतकातील दशकांच्या बाजारावर लक्ष दिले तर आपणास आढळून येईल की तीस-चाळीसच्या दशकात बाजारात वस्तूंचे मूल्य जवळजवळ स्थिर राहत असे. जर बाजार मूल्यात थोडी बहुत तेजी-मंदी आली तरी सुद्धा अशी नसायची, की आपली दैनंदिन जीवनावर काही प्रत्यक्ष प्रभाव पडू शकेल. हेच कारण होते, की जेव्हा आपल्याला आर्थिक असुरक्षेचे ज्ञान नव्हते. परंतु हळूहळू बाहेरच्या स्वरूपात बदल सुरु झाले आणि बाजार सामान्य ग्राहकांच्या संसारातून निघून जगाच्या विशिष्ट ग्राहकांच्या जगात प्रवेश करत झाला. सहावे दशक येता येता बाजार मूल्यात अव्याहत वृद्धी होत राहिली आणि रुपयाच्या मूल्याचा ऱ्हास होऊ लागला. परिणाम असा झाला की निश्चित उत्पन्न असणारा समाज (साधारणपणे उच्च मध्य वर्ग) आपली आर्थिक सुरक्षा एकाएकी हरवून बसला. सत्तर आणि ऐन्शीच्या दशकात तर ही स्थिती अत्यंत वाईट झाली. गत काही दशकांत ग्राहक भावात १० पट वाढ झाली. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर ६० च्या दशकात १ रुपयाची क्रयक्षमता होती आज तीच एकूण ४ पैसे इतका झाली आहे. मागील ४० वर्षांत चलनवाढीचा दरसाल वाढीचा दर ७-८ टक्के राहिला आहे.

    जागतिकीकरणाच्या या चालू स्थितीमध्ये आता चलनवाढ अर्थव्यवस्थेचा एक आवश्यक भाग बनला आहे. 'फरक फक्त एवढाच' आहे की याचा दर कधी कमी होऊ शकतो तर कधी जास्त. अशामध्ये आपण विसाव्या शतकात आर्थिक मापदंड कायम ठेवून परंपरागत पद्धतीने फक्त पगार, पेंशन किंवा एका मर्यादित प्रमाणात कृषी संसाधनांपासून प्राप्त उत्पन्नाने आपले पाऊल वर्तमान व्यवस्थेशी मिळवून चालू शकू, हा विचार करणेसुद्धा फक्त एक कल्पना आहे. अशा स्थितीत आपले भविष्य सुविधाजनक आणि सुरक्षित बनवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे, की आपण आपल्या जमा संपत्तीची क्रयक्षमता वाढविण्यासाठी एका सुविधाजनक मार्गाचा शोध ध्यावा आणि त्यासाठी एक चांगली पद्धत आहे चांगली गुंतवणूक. अशी गुंतवणूक जीमध्ये आपणा फक्त आपल्या जमा पैशांचे, मूल्य वाढवू शकू, नाही तर या वृद्धीला चलनवाढीच्या दरापासून वेगळे ठेवू शकू. जर चलनावाढीचा दर ८ टक्के आहे तर कर वगैरे वजा करून उत्पन्नात १०-१२ टक्के वृद्धी झाली तरच आपण आपली क्रयक्षमता वाढवू शकाल.

    आपल्यासाठी गुंतवणुकीचा मूल सिद्धांत समजणे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजे आपण वर्तमानाशी पावलाला पाऊल मिळवून चालू शकू आणि आपले भविष्य सुरक्षित बनवू शकू.

    आपण शेअर बाजारात होणाऱ्या प्रचंड कमाईच्या कथा जरूर ऐकल्या असतील आणि आपल्या मनातही या तन्हेचा नफा कमावण्याची इच्छा झाली असेल. पण आपण आपल्या एखाद्या मित्राच्या संदर्भात अशी भीतिदायक बातमी ऐकली असेल की तो कशा तऱ्हेने शेअर बाजारात आपले भांडवल घालवून बसला आहे आणि तेव्हा आपण स्वतःलाच धीर दिला असेल की शेअर बाजारात पैसे न गुंतवून आपण योग्यच केले आहे.

    शेअरविषयी पूर्वावग्रह सोडून हे जाणून घेण्याचे प्रयत्न करा की शेअर म्हणजे काय. विचारवंत गुंतवणूकदार सूपच समजदारीने शेअर खरेदी करतो आणि नका मिळविण्यात यशस्वी होतो.

    अनेक अभ्यासानंतर हे स्पष्ट झाले आहे की दीर्घावधीमध्ये इतर सर्व संपत्तीच्या तुलनेमध्ये शेअरपासून सर्वांत जास्त मिलकत होते. याचा अर्थ हा आहे की, आपण बॉण्ड फिक्स्ड डिपॉझीट वा सोन्यात गुंतवणूक करून जेवढा नफा कमवाल त्यापेक्षा जास्त नफा शेअर बाजारात गुंतवणूक करून मिळवू शकता.

    हे सुद्धा खरे आहे की, शेअरसोबत जोखीमसुद्धा आहे; पण जर आपण दीर्घ काल गुंतवण्यावर विश्वास ठेवाल तर आपणास नफा कमावण्यास कोणीही प्रतिबंध करू शकत नाही.

    शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आपण शेअरविषयक आवश्यक महिती जाणून घेणे आवश्यक आहे.

    शेअरविषयी समजून घेणे अंतरीक्ष विज्ञान समजून घेण्याएवढे कठीण नाही. आपण आपली संपत्ती कशा तऱ्हेने जास्तीत जास्त वाढवू शकतो आणि नुकसानीचे कारण कशा प्रकारे दूर करू शकतो,आपण या प्रकारचे बनण्यासाठी अत्याधिक ज्ञानी होण्याचे आवश्यक नाही.

    जर आपण विचार कराल की व्यूहरचना करायला आपल्याजवळ पुरेसा वेळ नाही तेव्हा आपण एखादा कार्यालयीन व्यवस्थापक किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता; परंतु आपल्याला काही मूलभूत बाबींची माहिती ठेवावी लागेल. हे जाणून घ्यावे लागेल की कोणता फंड चांगला आहे? फंड व्यवस्थापकाची निवड कशी करावी आणि त्याच्या कार्यावर कसे लक्ष ठेवावे?

    कोणत्याही व्यवसायात अनेक प्रकारची संपत्ती असू शकते - यंत्र, इमारत, फर्निचर, रोकड वगैरे.

    अशा प्रकारच्या व्यवसायात देणेसुद्धा असू शकते. कंपनीवर दुसऱ्यांचे कर्ज असू शकते. बँकेचे कर्ज, उधार घेतलेली सामुग्री वगैरे देणी असू शकतात. मूळ संपत्ती-देणी मूळ भांडवल.

    मूळ भांडवल म्हणजे तो पैसा जो व्यवसायात व्यक्तीजवळ असतो. जस जसा व्यवसाय वाढतो आणि लाभ होऊ लागतो तस तसे मूळ भांडवल वाढत जाते. याच मूळ भांडवलाला शेअर (वा स्टॉक) रूपात विभाजित केले जाते.

    जर एखाद्या कंपनीचे मूळ भांडवल १० कोटी रुपये आहे तर याला १० रुपये प्रति शेअरप्रमाणे एक कोटी शेअर्समध्ये विभाजित केले जाऊ शकते.

    मूळ भांडवलाचा भाग वा काही शेअर ज्याच्या जवळ राहतात ते व्यवसाय सुरू करतात आणि त्यांना 'प्रमोटर्स' म्हणतात.

    बाकी शेअर्स गुतवणूकदाराकडे असतात. हे गुंतवणूकदार तुम्हा आम्हासारखे सामान्य लोक असतात म्युच्युअल फंड आणि अन्य संस्था गुतवणूकदार असतात.

    शेअर खरेदीचा अर्थ

    आता आपणास समजले असेल की शेअर खरेदीचा अर्थ व्यवसायात भागीदारी मिळविण्यासारखाच असतो.

    जेव्हा आपण शेअरमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा आपण बाजारात गुंतवणूक करीत नाहीत. आपण एका कंपनीच्या इक्विटी शेअरमध्ये गुंतवणूक करतो. या तऱ्हेने आपण कंपनीचे 'शेयर होल्डर ' वा अंशरूपाने मालक बनतो.

    आपण कंपनीच्या संपत्तीच्या अंशाचे मालक असतात म्हणून या तऱ्हेने संपत्तीपासून मिळणाऱ्या नफा वा नुकसानाचे भागीदारसुद्धा बनता.

    समजा आपण गुजरात अंबुजा सिमेंटच्या १०० शेअरचे मालक आहात तर याचा अर्थ आहे की, आपण त्या कंपनीचे क्षुद्र भागांचे मालक आहात कारण त्या कंपनीचे लाखो शेअर आहेत.

    शेअर खरेदीचा अर्थ आहे की, एखादा व्यवसाय चालविण्याची डोकेदुखी विकत घेणे शिवाय त्या व्यवसायाचा भागीदार बनणे, उदाहरणार्थ गुजरात अंबुजा सिमेंटला नफा झाला तर आपल्या शेयरचा दरसुद्धा वाढू शकतो वा नुकसान झाल्यावर शेअरचा भाव कमी होऊ शकतो.

    भाव वृद्धीचा अर्थ

    जर एखाद्या कंपनीने आपले मूळ भांडवल १० रुपये प्रति शेअर हिशेबाने विभाजित केले तर १० रुपये शेअरची 'फेस व्हॅल्यू' म्हटली जाईल. जेव्हा शेअरची खरेदी-विक्री शेअर बाजारात केली जाईल तेव्हा त्याची मागणी आणि पुरवठा याच्या आधारावर त्याच्या भावातसुद्धा फरक पडेल.

    जर सगलेच त्या कंपनीचे शेअर खरेदी करण्यास इच्छुक असतील तर भाववृद्धि होईल. जर कोणीही शेअर खरेदी करण्यास उत्सुक नसेल तर आणि ज्यास्त संख्येने लोक त्या कंपनीचे शेअर विकू इच्छीत असतील तर भाव कमी होईल.

    कोणत्याही वेळी शेअर बाजारातील शेअरच्या मूल्याला 'शेअरचे मूल्य' वा शेअरची मार्केट व्हॅल्यू म्हटले जाते. अशा तऱ्हेने १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे शेअर ५५ रुपयात (फेस व्हॅल्यूच्या तुलनेत जास्त किमतीला) वा ९ रुपयात (फेस व्हॅल्यूच्या तुलनेत कमी किमतीला) विकले जाऊ शकतात.

    जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअरची संख्या व त्यांची मार्केट व्हॅल्यूचा गुणाकार केला जातो तेव्हा मार्केट कॅपिटलायझेशन समोर येते.

    उदाहरण घ्यायचे म्हणून १नोव्हेंबर २००६ ला एका कंपनीच्या एक कोटी शेअर्सची फेस व्हॅल्यू १० रुपये आणि मार्केट व्हॅल्यू ३० रुपये आहे तेव्हा १नोव्हेंबर २००६ ला त्याचे मार्केट कॅपिटलायझेशन ३० कोटी म्हणता येईल.

    शेअर खरेदी कशी करावी?

    ही एक चांगली बाब आहे की, आपण शेअर बाजारात नशीब अजमावून पाहू इच्छिता. स्टॉक एक्सचेंजमध्ये शेअर्सची खरेदी

    Enjoying the preview?
    Page 1 of 1