Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

अजिंक्य ताराराणी
अजिंक्य ताराराणी
अजिंक्य ताराराणी
Ebook176 pages50 minutes

अजिंक्य ताराराणी

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोघेही मराठी माणसाच्या गळ्यातले ताईत आहेत. आजचा महाराष्ट्र आणि भारत शिवशंभुंचा शतशः ऋणी आहे. पण शिवरायांनी निर्माण केलेले हे स्वराज्य रक्ताचे पाणी करून टिकवणाऱ्या शिवरायांच्या सुनबाई महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाकडे महाराष्ट्राचे अक्षम्य असे दुर्लक्ष झाले आहे असे ताराबाईंचा इतिहास वाचल्यावर माझे मत बनले. औरंगजेबाच्या उरावर बसून त्यांनी स्वराज्य राखलं आणि वाढवलं ही गोष्ट फक्त इतिहासकारांच्या आणि अभ्यासकांच्या पुरती मर्यादित होऊन राहिली आहे. त्यामुळे महाराणी ताराबाईंचा हा जाज्वल्य पराक्रमाने भरलेला इतिहास लाखो तरुणांच्या पर्यंत सोप्यात सोप्या भाषेत जुन्या आणि नव्या डिजिटल पद्धतीने नेऊन महाराणी ताराबाईंनी केलेला पराक्रम आणि त्यांचे भविष्काळावर म्हणजेच आपल्या वर्तमानावर असलेले उपकार लोकांपर्यंत पोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. चला जगाला सांगूया या देशातल्या सगळ्यात मोठ्या बादशहाला नमवणाऱ्या आमच्या एका महान पराक्रमी राणीची गोष्ट!

Languageमराठी
Release dateDec 29, 2023
ISBN9798223494751
अजिंक्य ताराराणी

Related to अजिंक्य ताराराणी

Related ebooks

Reviews for अजिंक्य ताराराणी

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    अजिंक्य ताराराणी - Ranjit Yadav

     लेखकाचे मनोगत

    झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नम्मा, राणी दुर्गावती या मध्ययुगातील महान स्त्री राज्यकर्त्यांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे एका प्रचंड बलशाली राजवटी समोर त्या उभ्या राहिल्या, त्या राजवटीला त्यांनी मुळासकट हलवून टाकलं आणि शेवटी आपल्या लोकांसाठी, राष्ट्रासाठी स्वाभिमानाने त्या मरणाला सामोरे गेल्या. राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नम्मा इंग्रजांविरुद्ध लढताना शहीद झाल्या तर राणी दुर्गावती अकबराच्या साम्राज्यवादाविरुद्ध लढताना वीरमरण पावल्या. मध्ययुगातल्या अनेक लढाऊ स्त्रियांची हीच शोकांतिका आहे. एका महान ऐतिहासिक लढ्यानंतर झळाळणारं पण अपेक्षित नसलेलं वीरमरण! महाराष्ट्राच्या महानेत्या महाराणी ताराबाई या सर्वांना अपवाद आहेत. सहा लाखांची प्रचंड सेना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य संपवण्यासाठी त्याकाळचा आशियातला सर्वात मोठा सत्ताधीश असलेला औरंगजेब महाराष्ट्रात ठाण मांडून बसला असताना महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाविरुद्ध एक नव्हे तर शेकडो लढाया केल्या, ज्यांच्या शेवटी पराभव औरंगजेबाचा झाला, मृत्यूही औरंगजेबाचाच झाला, रणांगण सोडूनही मोगलच पळाले, मोगल साम्राज्याच्या छाताडावर पाय ठेवून महाराणी ताराबाई पुढे अजून 55 वर्षे उभ्या होत्या.

    महाराणी ताराबाईंच्या लढा हा एक अद्वितीय असा लढा ठरला याचे कारण म्हणजे औरंगजेबाने आपल्या हट्टापायी महाराष्ट्रावर लादलेले युद्ध हे एक लोकयुद्ध आहे याची जाणीव ताराबाईंनी इथल्या प्रत्येक माणसात निर्माण केली. आणि बघता बघता हजारोंच्या संख्येने इथला शेतकरी कष्टकरी समाज हातात तलवार घेऊन उभा राहिला. महाराणी ताराबाईंनी चैतन्य फुंकलेल्या या लोकयुद्धाबद्दल विठ्ठलदास नावाचा तत्कालीन कवी म्हणतो..

    पाटील शेटे कुणबी जुलाई

    चांभार कुंभार परीट न्हावी l

    सोनार कोली उदमी फुलारी

    या वेगळे लोक किती बिगारी ll

    ढाला कटार तरवार असंख्य भाले

    घोडे बरे जलदै बैसोनिया निघाले

    सेना समूहा रचला नीच रे समुद्रा

    देश प्रजा करुनी उद्धस तांब्र बघा

    कवीने वर्णन केल्याप्रमाणे सर्व जाती-जमातींचे लोक ढाला, कट्यार, तलवार हाती घेऊन एखाद्या सेना समुद्राप्रमाणे औरंगजेबा विरुद्ध उभे राहिले. लढ्याच्या एका टप्प्यावर औरंगजेब खरोखरच एवढा हैराण झाला की त्यालाच प्रश्न पडला की शिवाजी महाराज आणि त्यांच्या मुलांच्या राज्यात कधीच एवढी मोठी मराठा सेना ऐकली नव्हती आणि आताच एवढे हजारो लोक कुठून आले? महाराष्ट्राच्या मातीत गवताला भाले फुटल्याची अवस्था निर्माण झाली.

    महाराणी ताराबाई यांचा इतिहास असा प्रत्येक दृष्टिकोनातून वेगळा आहे. एकूण 86 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या ताराबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांनाही पाहिलं तसं अगदी माधवराव पेशव्यांनाही पाहिलं. या दीर्घायुष्यात त्यांना भविष्यात स्वतःच्या अस्तित्वासाठी देखील लढावे लागले. मराठी राज्यातल्या पेशवे विरुद्ध राजा या लढ्यात देखील राजाचे महत्व टिकवण्यासाठी लढावं लागलं. आयुष्याच्या एका वळणावर सतरा वर्षांसाठी कैदेत खितपत पडावं लागलेल्या महाराणी ताराबाई वयाच्या 86 व्या वर्षी मात्र एक सार्वभौम मराठा नेत्या म्हणून मरण पावल्या. अटक पासून कटक पर्यंत पसरलेल्या मराठा साम्राज्यात प्रत्येकाला महाराणी ताराबाईंचं राजकारणात असणं त्यांच्या स्वाभिमानासाठी गरजेचं वाटत होतं. कारण त्या नसत्या तर मराठा राजा कधीच पेशव्यांच्या ताटाखालचं मांजर होऊन बसला असता. औरंगजेबाला धडा शिकवणाऱ्या महाराणी ताराबाईंनी नानासाहेब पेशव्यांना देखील धडा शिकवला आहे आणि ही गोष्ट देखील त्या वेळच्या राजकारणात अत्यंत गरजेची होती.

    पुढच्या काही पानांत पाहूया भारताच्या मागच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात रणांगण आणि राजकारण अशा दोन्ही आघाड्यांवर औरंगजेबाला नमवून त्याला याच महाराष्ट्राच्या मातीत मिसळणाऱ्या एका महान लढवय्या स्वाभिमानी स्त्री बद्दल, महाराणी ताराबाईंबद्दल...

    रणजीत यादव

    इचलकरंजी

    Youtube Link:-  https://youtube.com/@Maharashtrahistory?si=H1EBQVkl3UyRwk-E

    Email:-  ranjitryadav@gmail.com

    अनुक्रमणिका

    जन्म आणि बालपण     

    मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध   

    सत्तेसाठीचा लढा आणि अज्ञातवास

    पुनर्उदय आणि आत्मसन्मानाचा लढा

    महाराणी ताराबाईंचं चरित्र किंवा त्यांचा इतिहास हा छत्रपती शिवरायांपासून ते अगदी उत्तर पेशवाईच्या सुरुवातीपर्यंतचा मराठ्यांचा इतिहास आहे. त्यांचं जीवन पाहताना तो काळ देखील आपल्याला पाहता येणार आहे ताराबाईंच्या प्रदीर्घ आयुष्याचे आपण चार महत्त्वाचे टप्पे करू शकतो.

    या प्रत्येक टप्प्यावर आपण त्या त्या वेळची भारताच्या राजकारणातील परिस्थिती देखील पाहत जाणार आहोत. कारण ताराबाईंच्या तारुण्याच्या काळातली जवळजवळ एकही महत्त्वाची राजकीय व्यक्ती त्यांच्या शेवटच्या काळात संपूर्ण देशाच्या राजकीय पटलावर नव्हती. त्यामुळे या बदलत्या राजकीय परिस्थितीचा ही मागोवा घेत राहणे गरजेचे आहे.

    जन्म आणि बालपण

    C:\Users\SHRI\Desktop\vasantgad satara_files\vasantgad.jpg

    (सातारा जिल्ह्यातील वसंतगड- या किल्ल्याच्या पायथ्याला ताराबाईंचे माहेर तळबीड वसले आहे)

    छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य जेव्हा गगन भरारी घेत होतं. त्यावेळी उत्तरेकडे मोगल, दक्षिणेकडे विजापूरची आदिलशाही, पश्चिमेकडे इंग्रज आणि सिद्धी या सर्वांना नमवून छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर व्हायला निघाले होते. वर्ष होतं इसवी सन 1674. भारताच्या इतिहासातलं सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवलं गेलेलं वर्ष! जवळजवळ साडेचारशे वर्षांची गुलामगिरी मोडून काढत एका हिंदू राजाने स्वतःला सार्वभौम छत्रपती म्हणून घोषित केले ते वर्ष. स्वराज्याची गेली वीस वर्षे प्राणपणाने सेवा करणाऱ्या हंबीररावांसाठी देखील ते वर्ष खूप महत्त्वाचे होते नेसरीच्या खिंडीत ज्या सात वीरांनी बहलोलखानाविरुद्ध प्राणांची बाजी लावली त्यात एक होते स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर देखील. त्यामुळे ऐन राज्याभिषेकापूर्वी तीन महिन्यातच स्वराज्याच्या सरसेनापतीच्या रिकाम्या झालेल्या पदावर हंबीररावांची वर्णी लागली. हंबीरराव मोहिते शिवरायांचे नवे सरसेनापती झाले. ते वर्ष हंबीर रावांसाठी आणखी एका गोष्टीसाठी महत्त्वाचे ठरलं ती म्हणजे इ. स.1674 सालीच सरसेनापतींच्या पोटी एका मुलीने जन्म घेतला. जन्मताच तिचे सौंदर्य

    Enjoying the preview?
    Page 1 of 1