Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

भाबडे गुरुजींची विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा
भाबडे गुरुजींची विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा
भाबडे गुरुजींची विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा
Ebook400 pages2 hours

भाबडे गुरुजींची विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

'भाबडे गुरुजींची विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा' हे पुस्तक बॉम्बे बेटावरील श्रीमान भानुदास बबन डेमसे उर्फ भा.ब.डे. उर्फ भाबडे गुरुजींनी फुगेयानातून इ.स. १८८३ साली केलेल्या तरंगत्या पृथ्वी प्रदक्षिणेची विलक्षण काल्पनिक हकिकत आहे. त्यांची ही पृथ्वीप्रदक्षिणा अतिशय थरारक तर आहेच; पण प्रवासात अनेक विचित्र अविश्वनीय परिस्थितीला सामोरे जात असतानाच त्यांच्यावर अनेक संकटे कोसळली.
ही हकिकत आहे प्रवासात भाबडे गुरुजींना अकस्मात उतरावे लागलेल्या एका आश्चर्यकारक बेटाची, तेथे भेटलेल्या कल्पनातीत मित्रांची. त्या बेटावरील त्यांच्या आयुष्याची, बेटावरील त्यांच्या वास्तव्याच्या शेवटच्या दिवसाची, जो दिवस होता अत्यंत गडबडीचा, गोंधळाचा आणि अर्थातच मोठ्ठ्या कल्लोळाचा. भल्यामोठ्या आवाजाने, कल्लोळाने भरून राहिलेला जो दिवस भाबडे गुरुजींनी अनुभवला तसा दिवस आजपर्यंतच्या इतिहासात कोणाही दुसऱ्या मनुष्याच्या आयुष्यात आला नाही...
ही कथा आहे त्या बेटावरील ज्वालामुखीच्या ऐतिहासिक सर्वात मोठ्या स्फोटाची तसेच इतिहासातील आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या स्फोटात सापडल्यानंतर तेथून सुखरुप सुटकेसाठी बेटावरील रहिवाशांसोबत एका विचित्र यानातून केलेल्या त्यांच्या विलक्षण उड्डाणाची.
भाबडे गुरुजींची ही पृथ्वीप्रदक्षिणा व हे उड्डाण विलक्षण व काल्पनिक वाटले तरी, या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण वाचल्यानंतर या काल्पनिकतेतही वास्तव आहे हे तुम्हाला समजेल.
माणसाला ज्ञात असलेल्या सर्वप्रकारच्या फुगेयानातून मुक्त प्रवासाबद्दल तसेच आजपर्यंत अज्ञात असलेले फुग्यांच्या वायुयानाच्या बाबतीतील शोधही या पुस्तकात वाचायला मिळतील. इ. स. १७५० ते इ.स. १८९० या काळात जेव्हा अशी वायुयाने लोकप्रिय होती, त्याच काळात ही कथा घडली आहे.
पुस्तकातील बऱ्याच गोष्टी सत्य आहेत. त्यामुळेच गुरुजींच्या पृथ्वीप्रदक्षिणेच्या हकिकतीचा दुसरा काल्पनिक भागही प्रत्यक्षात घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा या अर्ध्या अगदी प्रत्यक्षातील खऱ्या व अर्ध्या शक्य असलेल्या घटनांच्या काळात एका मराठी विज्ञान गुरुजींनी हा विलक्षण जगप्रवास करून अत्यंत कमी वेळात आपली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली असण्याचीही दाट शक्यता आहे.
एप्रिल २०१८ मध्ये प्रकाशित 'विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा' या इ-पुस्तकाची ही नवीन सुधारीत सचित्र दुसरी आवृत्ती आहे.

Languageमराठी
Release dateDec 25, 2021
ISBN9798201646295
भाबडे गुरुजींची विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा

Related to भाबडे गुरुजींची विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा

Related ebooks

Reviews for भाबडे गुरुजींची विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    भाबडे गुरुजींची विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा - स्नेहल घाटगे

    विवरण

    लेखिका

    स्नेहल घाटगे

    ए२, विधानी माऊंट व्ह्यू, सेक्टर १७, वाशी,

    नवी मुंबई, इंडिया – ४००७०३

    +९१ ९८६७४७६५३१ / ९८२०८९१८६६

    snehal.kg@gmail.com

    shabdavishwa@gmail.com

    प्रकाशक

    शब्दविश्व प्रकाशन, नवी मुंबई.

    A picture containing text, clipart Description automatically generated

    shabdavishwa@gmail.com

    प्रथम इ-आवृत्ती: एप्रिल २०१८ (शब्दविश्व प्रकाशन, नवी मुंबई)

    सचित्र  द्वितीय इ-आवृत्ती डिसेंबर २०२१ (शब्दविश्व प्रकाशन, नवी मुंबई)

    संपादक / Editor

    स्नेहल घाटगे

    परिचय

    ऑगष्ट १८८२

    A picture containing palm, plant, tree Description automatically generated

    बॉम्बे बेटावरील गिरगाव समुद्रकिनारी श्रीमान भानुदास बबन डेमसे गुरुजी, एका माडाच्या झाडाला टेकून वाळूत बसले होते.

    हो. हो. तुमचे बरोबर आहे. आता भानुदास बबन डेमसे हे नाव जरा लांबलचक वाटते नाही? आणि डेमसे हे सुद्धा काय आडनाव झाले? तर स्वत: गुरुजीनांही असेच वाटे. त्यांनाही आपले ‘डेमसे’ हे आडनाव फारसे आवडत नसे. त्यामुळे जिकडे तिकडे ते आपले नाव संक्षिप्तपणे भा.ब.डे. असे लिहित. आता लिहिताना जरी भा.ब.डे. असे लिहिले तरी लोक मधली टिंबं थोडेच वाचणार. ‘भा.ब.डे.’ असे जरी लिहिले तरी ते ‘भाबडे’ असेच वाचणार. त्यामुळे झाले काय की, सगळे लोक त्यांना त्याच संक्षिप्त नावाने ओळखू लागले. म्हणजे भानुदास बबन डेमसे गुरुजी झाले भा.ब.डे गुरुजी. मग कधीतरी ‘भा.ब.डे.’ या संक्षिप्त नावाचेही आणखी संक्षिप्त रुप बनले ‘भाबडे’. त्यांना आधीपासून ओळखणाऱ्या लोकांना त्यांच्या ‘डेमसे’ या आडनावाचा विसर पडला आणि त्यांना आधीपासून न ओळखणाऱ्या लोकांना तर ‘भाबडे’ हेच त्यांचे आडनाव आहे असे वाटे. त्यामुळे सगळीकडे ते ‘भाबडे गुरुजी’ असेच ओळखले जात.

    तर हे भाबडे गुरुजी गिरगावातील एका शाळेत विज्ञान हा विषय शिकवीत. म्हणून ते गुरुजी होते. हो. होतेच, कारण पस्तीस वर्षे शाळेत शिकविल्यानंतर हल्लीहल्ली त्यांना शिकविण्याच्या कंटाळा येऊ लागलेला होता. म्हणून वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी त्यांनी शिकवणे बंद केले होते. म्हणजे आता मागच्या महिन्यातच ते शाळेतून निवृत्त झाले होते. त्यांनी विवाहच केला नसल्याने त्यांचे कुटुंबही नव्हते. गिरगावातील आपल्या घरात ते एकटेच रहात होते.

    तर आज ते मुद्दाम इथे निवांतपणे आले होते. त्यांना काहीतरी विचार करायचा होता. काय विचार असेल बरे त्यांच्या मनात? कोणत्याही निवृत्त माणसाच्या मनात जे विचार असतात तेच त्यांच्या मनात होते. निवृत्त होण्याआधीपासून त्यांना वाटत होते की, शाळेतून निवृत्त झाल्यावर निदान एखादे वर्षं विश्रांती घ्यावी व ते वर्ष प्रवासात घालवावे. म्हणूनच प्रवास कुठे आणि कसा करावा याविषयी निवांत विचार करण्यासाठी आज ते मुद्दाम इथे समुद्रकिनारी आले होते. समुद्रकिनारा त्यांना नेहमीच आवडे. इथे आल्यावर त्यांना विचारही सुचत.

    तर भाबडे गुरुजी आता विचार करीत होते –

    ‘या जगात प्रवास करण्याचे दोन प्रकार आहेत. कुठे जायचे आहे हे आधी निश्चित करून, त्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वात जास्त वेग असलेल्या वाहनात बसायचे आणि मग सर्वात जवळच्या रस्त्याने जायचे. हा झाला प्रवासाचा एक सर्वसंमत व लोकप्रिय प्रकार. दुसरा प्रकार मात्र याच्या अगदी उलट आहे. काही लोकांना कुठे जायचे हे निश्चित करायचे नसते. जायला किती वेळ लागेल याची फिकीर नसते; आणि आपण तेथे पोहोचू किंवा नाही याचीही फिकीर नसते; पण स्वत:ला पाहिजे त्याच वाहनाने प्रवासाला निघायचे हे मात्र निश्चित असते. हा झाला प्रवासाचा दुसरा प्रकार.

    या दोन्हीं प्रकारातील फरक समजण्यासाठी एक उदाहरण देता येईल. (आता भाबडे हे हाडाचे गुरुजी असल्यामुळे उदाहरण दिल्याशिवाय त्यांचे पानही हालत नसे.

    समजा दोन कुत्रे शिकारीला निघाले आहेत. दोघांचे स्वभाव वेगळे आहेत. त्यापैकी एकजण नाकासमोर पळत पळत आपल्या सावजाचा पाठलाग करेल, तर दुसरा आपल्या नाकाने वास घेत इकडे तिकडे उगीचच हिंडेल. तो कधी सशाच्या रिकाम्या बिळात तर कधी कचऱ्याच्या पेटीत नाक खुपसेल; किंवा असे काहीच न करता एखाद्या झाडाकडेच जाईल. सावज त्याच्या समोर आले, तरी सुद्धा तो कदाचित त्याच्याकडे ढूंकून पाहणार नाही. या दोन कुत्र्यांच्या वागण्यात जितका फरक आहे, तितकाच फरक आहे प्रवासाच्या या दोन प्रकारांत. रमत गमत इकडे तिकडे फिरण्याचा दुसरा मार्ग मात्र जास्त चांगला. कारण त्यामुळे जगात कुठे काय चालले आहे याकडे जास्त लक्ष देता येते. तसेच निसर्गाचा आनंदही घेता येतो.

    अणूयुग आता काही फार दूर नाही. (हे विज्ञानाच्या गुरुजींना माहीत नसेल तर कोणाला?) त्या युगात प्रवास किती प्रचंड वेगवान होईल याची कल्पना करणे आज काही अवघड नाही. एकदा का निसर्गाची खास रहस्ये माणसाला समजली (विज्ञानाशी त्यांचा रोजचा संबंध असल्यामुळे त्याना खात्रीच होती की, निसर्गाची खास रहस्ये उलगडण्यास माणसाला फार काळ लागणार नाही.) की, जगातील कोणत्याही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणचा प्रवास विनाविलंब तात्काळ होईल. उदाहरणार्थ, आजकाल हे जे वीज[2] व चुंबकत्व[3] यांच्या एकत्रित परिणामे एका जागेहून दुसऱ्या जागी संदेश लहरी पाठवता येणे शक्य आहे असे शोध लागलेत, तसेच काहीसे माणसांच्या बाबतीतही होऊ शकते. तस्सेच. अगदी तस्सेच प्रवास करणेही शक्य होईल.

    समजा तुम्हांला ठाण्याहून कलकत्त्याला जायचे आहे, तर तुम्ही फक्त ठाण्याच्या स्टेशनमध्ये जायचे. तेथे एका खोलीत असलेल्या यंत्रणेने आधीच कलकत्त्यावर नेम धरून ठेवलेला असेल. तुम्ही त्या खोलीत प्रवेश कराल तेव्हा होईल काय की, तेथील यंत्रणेमुळे आपोआपच तुमचे शरीर अशा संदेशलहरीत परावर्तीत होईल. मग या संदेश लहरी बाहेर पाठविल्या जातील. यंत्रणेमधून तुमच्या या संदेश लहरी बाहेर पडल्या रे पडल्या की, त्या थेट कलकत्ता स्टेशनमध्ये पकडल्या जातील. तेथे या लहरी पुन्हा तुमच्या मूळ शरीरात परावर्तीत होऊन त्याक्षणी तुम्ही कलकत्ता स्टेशनमध्ये असाल. अशाप्रकारे ठाणे स्टेशनमधील खोलीच्या दुसऱ्या दरवाज्यातून तुम्ही जेव्हा बाहेर पडाल ते थेट कलकत्ता स्टेशनमध्येच असाल. तिथून मग सरळ कलकत्त्याच्या रस्त्यावर. खोलीच्या एका दरवाज्याकडून दुसऱ्या दरवाजाकडे जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त वेळ तुम्हांला या प्रवासासाठी लागणार नाही. एवढेच काय देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत आपण प्रवास केला हे देखील तुम्हांला जाणवणार नाही.

    एकदा का निसर्गाची खास रहस्ये माणसाला समजली की, अंतर व वेळ यांची जोडी राहणारच नाही. जगात मैल असतील, तास पण असतील; पण ‘दर तासाला एवढे मैल’ ही वेगाची संकल्पानाच जुनाट झालेली असेल.

    पण समजा, तुम्हांला घाई नसेल; कुठे जायचे, कोणत्या दिशेने जायचे हे निश्चित करण्याची कटकट नको असेल; आणि स्वत: पायपीट न करता सर्व काही व्यविस्थत व जवळून पहायचे असेल, तर तुमच्यासाठी प्रवासाचे एकच साधन योग्य आहे. ते म्हणजे फुग्याच्या वायुयानाने प्रवासाला निघणे. फुग्याच्या यानाने प्रवास करताना तुम्हांला फक्त प्रवासाची सुरुवात कधी करायची व कधी थांबायचे एवढेच ठरविणे शक्य आहे. बाकी सर्व निसर्गाच्या हातात. किती वेगाने जायचे, कुठे जायचे हे ठरविणे त्या वाऱ्याचे काम.

    प्रवास करण्याचा हा एक अती रोमांचक प्रकार आहे. यातही हा प्रवास घरापासून शाळेपर्यंतचा असेल तर आणखीच मज्जा. सकाळी लवकर उठावे, शाळेची बॅग घ्यावी व वायुयानाच्या टोपलीत चढावे. शाळेच्या दिशेने पहात फुग्याच्या दोऱ्या सोडाव्या आणि फुररर् उडावे. असा प्रवास करताना शाळेच्या वाटेवर बऱ्याच मजेदार गोष्टी घडू शकतात. जश्या –

    १. वारा थांबेल, तुम्हांलाही थांबवेल; आणि तुम्ही कधी शाळेत पोहोचणारच नाही.

    २. वारा चुकीच्याच दिशेने वाहत असेल तर तो कदाचित तुम्हांला शाळेपासून ५० मैलांवर रानातही घेऊन जाईल.

    ३. एखादे दिवशी तुम्हांला शाळेत गैरहजर रहावेसे वाटले तर वायुयानातून वर तरंगत असाताना तुम्हांला शाळेत जाण्याची जबरदस्ती कोणी करू शकणार नाही.

    ४. कदाचित तुमचे फुगेयान उडत उडत खेळाच्या मैदानावरून जाईल; आणि शाळेत जाण्याचा बेत रद्द करून तुम्ही सरळ मैदानात खेळ पाहण्यास उतरू शकाल.

    ५. शाळेच्या वाटेवर एखाद्या तळ्यावरून जाताना गळ टाकून मासेही पकडू शकाल.’

    आपल्या प्रवासाविषयी विचार करता करता या साऱ्या कल्पना भाबडे गुरुजींच्या मनात आल्या आणि मनात चाललेल्या विचारांना एक दिशा मिळाली. चला ‘प्रवास कसा करायचा?’ या आपल्या प्रश्नाचे उत्तर तर मिळाले. आणि या उत्तरातच दुसऱ्या प्रश्नाचे उत्तरही आहे. कारण अशा फुग्याच्या वायुयानाने प्रवास करताना ‘कुठे?’ या प्रश्नाचे उत्तर निसर्ग व वारा हेच देणार, तर आपण आपल्या बुद्धीला ताण कशाला द्या?

    विश्रांती व प्रवास या दोन्ही गोष्टी साध्य होण्यासाठी फुगाच्या वायुयानाने प्रवास करणे हे सर्वात उत्तम. ठरले तर मग, आपण असाच प्रवास करायचा.

    ‘विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा’ हे पुस्तक श्रीमान भानुदास बबन डेमसे उर्फ भा.ब.डे. उर्फ भाबडे गुरुजींनी फुगेयानातून प्रवास करीत केलेल्या पृथ्वीप्रदक्षिणेची हकिकत आहे. त्यांचा हा प्रवास व पृथ्वीप्रदक्षिणा थरारक तर आहेच; पण प्रवासात अनेक विचित्र अविश्वनीय परिस्थितींना सामोरे जात असतानाच त्यांच्यावर अनेक संकटे कोसळली.

    ही हकिकत आहे प्रवासात भाबडे गुरुजींना अकस्मात उतरावे लागलेल्या एका आश्चर्यकारक बेटाची, तेथे भेटलेल्या कल्पनातीत मित्रांची. त्या बेटावरील त्यांच्या आयुष्याची, बेटावरील त्यांच्या वास्तव्याच्या शेवटच्या दिवसाची, जो दिवस होता अत्यंत गडबडीचा, गोंधळाचा आणि अर्थातच मोठ्ठ्या कल्लोळाचा. भल्यामोठ्या आवाजाने, कल्लोळाने भरून राहिलेला जो दिवस भाबडे गुरुजींनी अनुभवला तसा दिवस आजपर्यंतच्या इतिहासात कोणाही दुसऱ्या मनुष्याच्या आयुष्यात आला नाही...

    ही कथा आहे त्या बेटावरील ज्वालामुखीच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठ्या स्फोटाची. तसेच स्फोटात सापडल्यानंतर तेथून सुखरुप सुटकेसाठी बेटावरील रहिवाशांसोबत एका विचित्र यानातून केलेल्या त्यांच्या विलक्षण उड्डाणाची.

    माणसाला ज्ञात असलेल्या सर्वप्रकारच्या फुगेयानातून मुक्त प्रवासाबद्दल तसेच आजपर्यंत अज्ञात असलेले फुग्यांच्या वायुयानाच्या बाबतीतील शोधही या पुस्तकात वाचायला मिळतील. इ. स. १७५० ते इ.स. १८९० या काळात जेव्हा अशी वायुयाने लोकप्रिय होती, त्याच काळात ही कथा घडली आहे.

    भाबडे गुरुजींची ही पृथ्वीप्रदक्षिणा व हे उड्डाण विलक्षण व काल्पनिक वाटले तरी, त्यांच्या या प्रवासात घडलेल्या बऱ्याच गोष्टींना ऐतिहासिक व भौगोलिक सत्य आधार आहे. या पुस्तकातील ‘कल्पनेतील वास्तव’ हे शेवटचे प्रकरण किंवा जागोजागी दिलेल्या तळटीपांच्या दुव्यांच्या आकड्यांवर टिचकी मारून तुम्ही त्या तळटीपा वाचल्यात, तर या पुस्तकातील बऱ्याच गोष्टींमागील सत्य आधार तुम्हाला समजेल. गुरुजींच्या हकिकतीचा काल्पनिक भागही प्रत्यक्षात घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    अशा या अर्ध्या अगदी वास्तवातील खऱ्या व अर्ध्या शक्य असलेल्या घटनांच्या काळात एका मराठी विज्ञान गुरुजींनी हा विलक्षण जगप्रवास करून अत्यंत कमी वेळात आपली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली असण्याचीही दाट शक्यता आहे.

    आश्चर्यकारक निष्ठा

    सप्टेंबर १८८३

    ऑक्टोबर १८८३ महिन्यातील शेवटच्या आठवड्यात बॉम्बे बेटावरील ‘बॉम्बे साहसी मंडळा’ला[4] पूर्वी कधी मिळाला नसेल असा एक मान मिळाला. एका विलक्षण आणि असामान्य अशा धाडसाची सविस्तर हकिकत सर्वप्रथम ऐकण्याचा मान. या वर्षातील सर्वात मोठी बातमी सर्वप्रथम सविस्तर ऐकण्याचा मान, जी ऐकण्यासाठी सर्व जग आतूर होते अशी एक हकिकत. श्रीमान भानुदास बबन डेमसे गुरुजी यांच्या असामान्य, अद्वितीय, एकाकी प्रवासाची विलक्षण हकिकत सर्वप्रथम हे मंडळच तर ऐकणार होते.

    ७ ऑगष्ट १८८३ रोजी भाबडे गुरुजींनी एका महाकाय फुगेयानाच्या साहाय्याने बॉम्बेतून पश्चिमेकडे अरबी समुद्रावर उड्डाण केले होते. फुगेयानाने उड्डाण करून अरेबियन समुद्र पार करणारा पहिला मराठी माणूस होण्याची आपली इच्छा आहे, असे त्यावेळी त्यांनी वार्ताहरांना सांगितले होते.

    त्यानंतर तीन आठवड्यांनी पार पूर्वेकडे असलेल्या प्रशांत महासागरातून त्यांना बाहेर काढण्यात आले होते. थकून अर्धमेले झालेले, भूकेने व्याकूळ असे भाबडे गुरुजी, हवा गेलेल्या काही फुग्यांना पकडून, प्रशांत महासागरात तरंगत असलेले आढळून आले होते. हवा गेलेल्या त्या फुग्यांच्या जंजाळातून गुरुजींना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते आणि हे काम केले होते मद्रासकडे निघालेल्या ‘ईस्ट इंडिया ग्लोरी’ या बोटीच्या कप्तानाने. त्यावेळी गुरुजी अतिशय थकले होते. थंड पाण्याने गारठून गेल्याने त्यांचा रक्तप्रवाह बरोबर होत नव्हता. ते अतिशय आजारी होते. लगेच अंथरुणावर झोपवून त्यांना विश्रांती दिली गेली. बोटीवरील डॉक्टरने त्यांच्यावर लगेच औषधोपचार चालू केले होते. तसेच बोटीच्या स्वयंपाक्याने त्यांना अन्न व ब्रॅन्डी देऊन तरतरी आणली होती.

    ‘ईस्ट इंडिया ग्लोरी’ बोटीचा कप्तान श्री. सुब्रमण्यम यांनीही त्यांना पूर्ण आदराने वागविले. बोलण्याइतपत गुरुजी बरे झाले तेव्हा श्री. सुब्रमण्यम, डॉक्टर व स्वयंपाकी हे तिघेही त्यांच्याभोवती गोळा झाले. त्या तिघांना अतिशय उत्कंठा होती. उत्सुकतेपोटीच त्या तिघांनी तामिळ भाषेत एकच प्रश्न विचारला, आता कसे वाटते? भाबडे गुरुजींच्या चेहऱ्यावरील भाबडे भाव पाहून आपली भाषा या व्यक्तिला कळत नाही हे त्या तिघांना समजले. मग श्री. सुब्रमण्यम यांनी त्यांना इंग्रजीत विचारले, हाऊ आर यू फिलिंग?

    भाबडे गुरुजींना अर्थातच इंग्रजीचे ज्ञान होते. तुम्ही नसता तर माझी स्थिती खूपच खराब झाली असती. क्षीण आवाजात भाबडे गुरुजी उत्तरले.

    तुमच्याविषयी काही सांगण्याइतपत तुमच्यात शक्ती आहे असे तुम्हांला वाटते का? सुब्रमण्यमनी विचारले.

    आता अंगात बरीच शक्ती आलीय असे मला वाटते. आणि हो, तुम्ही मला वाचवल्याबद्दल व त्यानंतर घेतलेल्या काळजीबद्दल व माझ्याकडे इतके लक्ष दिल्याबद्दल, सर्वात प्रथम मी तुम्हा तिघांचे आभार मानू इच्छितो. गुरुजी उत्तरले. ते पुढे म्हणाले, पण महाशय, ‘बॉम्बे साहसी मंडळाचा’ मी सन्माननीय सदस्य आहे आणि माझ्या या असामान्य धाडसाबद्दल, माझ्या या नामांकित मंडळालाच सर्वात प्रथम सांगणे हे एक सदस्य म्हणून मी माझे कर्तव्य समजतो.

    गुरुजींच्या या बोलण्याने कप्तान सुब्रमण्यम अर्थातच थोडे दुखावले गेले. हवा गेलेल्या फुग्यांच्या आणि मोडक्या फळ्यांच्या जंजाळात अडकलेले, अर्धमेल्या अवस्थेत प्रशांत महासागरात तरंगत असलेले हे महाशय दृष्टीस पडल्यानंतर, त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे व त्यांचा जीव वाचविण्याचे आदेश सुब्रमण्यमनीच तर दिले होते. त्यामुळे तर गुरुजींचा जीव वाचला होता. बोटीवरील डॉक्टरने त्यांच्यावर उपचार करून, काळजीपूर्वक त्यांची सुश्रुषा करून त्यांना बरे केले होते. बोटीच्या स्वयंपाक्याने त्यांच्यासाठी खास वेगळा पौष्टीक व रुचकर आहार बनवून दिला होता. गुरुजी महाशयांच्या अशा बोलण्याने ते तिघेही नाराज झाले; पण त्या बोलण्याने त्यांची उत्सुकताही वाढविली.

    गुरुजींनी आपली हकिकत सांगावी म्हणून त्या तिघांनी हरतर्‍हेने प्रयत्न करून पाहिले. त्यांनी वाद घालून पाहिला. विनंती करून पाहिली. थोडे फसवूनही पाहिले. चिडवून पाहिले. दारूची लालूच दाखविली. गुंगीचे औषधे देऊन माहिती काढण्याचा प्रयत्न केला; पण या सर्वांमुळे गुरुजींचा निश्चय आणखीच बळावला. त्यांच्या अंगात असेल नसेल तेवढी सर्व शक्ती एकवटून ते म्हणाले, ‘बॉम्बे साहसी मंडळा’ चा मी एक सन्माननीय सदस्य आहे आणि या मंडळाच्या सभागृहातच माझी गोष्ट सर्वप्रथम सांगितली जाईल.

    पण आपण आपले नाव तर सांगाल का? म्हणजे बोटीच्या नोंदपुस्तकात तुमच्या बचाव मोहीमेची नोंद व सविस्तर हकिकत मी लिहू शकेन. कप्तान सुब्रमण्यमनी विचारले.

    नक्कीच. ही माहिती मी अर्थातच तुमच्यापासून लपविणार नाही. माझे नाव आहे भानुदास बबन डेमसे ऊर्फ भाबडे. गुरुजी म्हणाले.

    आता आणखी एकच प्रश्न, सुब्रमण्यम म्हणाले.

    त्याला मध्येच अडवत गुरुजी म्हणाले, आता आणखी प्रश्न नाहीत. मला वाचविल्याबद्दल तुम्हांला योग्य ते बक्षीस मिळेलच. शिवाय बोटीच्या या प्रवासाच्या खर्चापोटीची सर्व रक्कम तुम्हांला दिली जाईल. बाकीची सर्व हकिकत मी राखून ठेवित आहे फक्त माझ्या ‘बॉम्बे –

    त्यांना मध्येच थांबवत कप्तान म्हणाला, "ठीक आहे,

    Enjoying the preview?
    Page 1 of 1